आपण 'नाही ' ला घाबरतो. विचारायचे असते,पण नकार मिळेल ह्या भितीने विचारतच नाही.
१९९४ साल असावे. भारतात "फ्लाय बाय कंप्युटर" ची बोईंग विमाने सुरु झाली होती. कुटुंबासकट गोव्याला कुलदैवताला जायचा बेत रचला. विमानाची तिकीटे काढली. चेक इन करेपर्यंत ३०३ बोईग आहे हे माहित नव्हते. विमानात शिरल्यावर एकंदरीत स्टाइलने खुश झालो. बायको तर अवाक झाली. टेकऑफ घेतल्यावर चिरंजिवांनी (वय सुमारे साडे पाच)कॉकपीट बघायचा हट्ट धरला. खरे तर मला पण बघायचे होते. मी उठलो. लगेच बायकोने लगेच आहेर दिला. "वेड लागले आहे का? गप्प बसा. असे कोणालाही पायलट आत घेत नाही. अपमान कशाला करुन घेताय"? मी बसलो. मुलाला धीर निघेना. त्याने शर्ट खेचायला सुरु केला. होईल ते होईल ह्या विचाराने परत उठलो. बायको तोंडातल्या तोंडात काहीतरी पुट्पुटली. दुर्लक्ष केले. हवाईसुंदरीने करवली सारखे केबीन च्या दरवाजाबाहेर अडवले. "रिस्ट्रिक्टेड एरिया" "म्हणुन कणी कापली. आलो बापडा परत सीटवर. बायकोची विजयी मुद्रा निर्विकार पणे बघितली.
सुमारे १५ मिनिटाने मुलाला डोळा मारला. त्याने पण लगेच बोट वर केले. टॉयलेटच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॉकपीट कडे मार्गक्रमण केले. हवाईसुंद-या वाढप्याच्या कामात मग्न होत्या. त्यामुळे माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सऱळ केबिन कडे जाउन दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला. पायलट बाहेर आला. त्याचे आय कार्ड बघितले. आडनाव बघुन कोकणीतच विचारले. अरे सायबा, चेल्ल्यान (मुलाने)कॉकपीट पळवचे (बघायचे) आसा म्होण बॉड (डोके) वाइट केल्यान. भायल्यान पळवपाक दी रे.
तो कॅप्टन हसला. त्याने मुलाला माझ्या हातातुन घेतले. आत नेले. . मी आपला दरवाजाबाहेर उभा. सुमारे दहा मिनिटाने दोघेही बाहेर आले. बाहेरुन मलाही कॉकपीट दर्शन झाले. जबडा पडणे म्हणजे काय ते त्या दिवशी मला कळले. हातात मुलाला दिल्यावर कॅप्टन म्हणाला, बरो हुशार आसा रे तुगेलो पुत. आता ताणे बोईंग प्लेन चलयला. ताका पायलट कर. चिरंजीवांच्या चेहे-यावर विलक्षण समाधान दिसत होते. 'कंप्युटर ड्रिवन ऑटो नेविगेशन सिस्टिम" विमान आपोआप उडत होते. आणि त्या मुळे त्याला स्टीक पण हातात दिली होती त्या कॅप्टन ने. आजही हा प्रसंग आठवतो तेंव्हा एकच विचार येतो, मुलाची फँटसी पुर्ण करु शकलो ते फक्त 'नकार" समिकरणातुन बाहेर काढल्यामुळे.
पुढच्या वर्षी हाच फंडा वापरुन कुमठा ते कारवार प्रवास ट्रेन च्या ड्रायवर केबिन मधुन केला. को पायलट च्या सीट वर चिरंजीव्.ताशी १०० ने झालेला तो प्रवास कधीच विसरता येणार नाही. बाप भी खुश बेटा भी खुश. त्याच्या पुढच्या वर्षी 'मांडवी क्रुझ" पण कॅप्टनच्या सीट वर बसुन स्टीयरीग हातात घेउन मुलगा तर बाप बाजुला हातात बिअर च्या ग्लासा सकट.
बर्-याच वेळेला असे वाटते अशा किती तरी संधी आपण सोडतो फक्त विचारायला घाबरुन. नकार मिळायच्या आधीच तो गृहित धरुन. भोक पडत नाही अंगाला नकार आला म्हणुन."प्राईम मिनिस्टर आहे का, नकाराने अपमान व्हायला".
जाताजाता: प्राईम मिनिस्टर ला पण नकार घ्यावा लागतो. नकाराने अपमान होत असेल तर तो करुन घ्यावा लागतो. मग तुमची आमची काय कथा? पण चुकुन होकार आला तर "मौजा ही मौजा".
मौजा ही मौजा
गाभा:
प्रतिक्रिया
4 Jan 2009 - 7:21 pm | ऋषिकेश
गोष्ट मस्तच!.. आशय महत्त्वाचा.. अगदी पटला.. हल्लीच्या जगात तर जे हवे ते मागणे/विचारणे अत्यावश्यक आहे
-ऋषिकेश
6 Jan 2009 - 7:02 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो.
प्रभु यांचे अनेक अनुभव माझ्यासारख्याला आवडतात आणि मुख्य म्हणजे प्रेरणादायी वाटतात. याचे एक कारण म्हणजे , ज्या दोषांवर प्रभु आपल्या मूळ स्वभावानुसार , अगदी नैसर्गिकपणे मात करतात ते दोष माझ्याठायी होते/अजूनही आहेत. हे दोष म्हणजे घुमेपणा, भीड , अकारण बसणारी दातखीळ, ब्र न फुटणे. अशी माणसे वाळवंटात थकून भागून , कंठ फुटून तहानेने मरतील पण पाणी मागणार नाहीत. "केवळ तुमचे तोंड उघडा , मग पहा , कुलपेसुद्धा उघडतील !" हा जो संदेश आहे तो मला महत्त्वाचा वाटतो. माझ्या मुलांनी माझ्यासारखे (बि)घडू नये , चारचौघात बोलावे याची पुन्हा एकवार जाणीव या लेखाने मला करून दिली. धन्यवाद.
4 Jan 2009 - 7:31 pm | सुनील
वा मास्तर, अगदी बोलता बोलता मस्त पॉझिटीव्ह विचार करायचा संदेश दिलात की!
(पॉझिटीव्ह) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Jan 2009 - 7:32 pm | चतुरंग
एकदम असेच वाटते मला.
परवाचाच अनुभव, म्हटले तर एकदम छोटा पण जरा लावून धरले तर काम होऊन जाते हे सांगणारा - इथे बर्फ पडला. स्नो बोर्डिंगसाठी जायचे म्हणून स्नो बोर्ड आणायला म्हणून निघालो कुठल्याच दुकानात मिळेना सगळे सोल्ड आउट! बरीच दुकाने झाली शेवटी 'टारगेट' नावाच्या दुकानात दिसला एकच बोर्ड. तिथल्या सेल्सगर्लला विचारले तर म्हणाली हा डिफेक्टिव आहे त्यामुळे देता येणार नाही हा आम्ही ट्रॅश करतो. मुलगा नाराज झाला. त्याला म्हटले थांब. सेल्सवाल्यांच्या मॅनेजरकडे गेलो त्याला विचारले असा असा बोर्ड आहे त्याचे तुम्ही काय करता. तर म्हणाला बनवणार्या कंपनीकडे पाठवतो ते निम्मे पैसे देतात. मी म्हणालो "मी निम्मे देतो मला बोर्ड दे". थोडे आढेवेढे घेऊन तयार झाला. एक किरकोळ डिफेक्ट असलेला बोर्ड निम्म्या किमतीत मिळाला. पहिल्या सेल्सगर्लचे ऐकून गप्प बसलो असतो तर ही संधी हुकली असती.
चतुरंग
4 Jan 2009 - 7:33 pm | परिकथेतील राजकुमार
बर्-याच वेळेला असे वाटते अशा किती तरी संधी आपण सोडतो फक्त विचारायला घाबरुन. नकार मिळायच्या आधीच तो गृहित धरुन.
मस्तच !! एकदम पटले !
आमचे काही मित्र तर स्वतःच्या कार्यालयात सुद्धा काही विचारायला घाबरतात.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
4 Jan 2009 - 7:41 pm | प्रदीप
समजला व पटलाही.
पण असेच कौतुक एका पायलटने स्वतःच्या मुलाचेच केले ते थोडे महागात पडले, तेही आठवले.
5 Jan 2009 - 1:12 am | पांथस्थ
हा एपिसोड टी.व्ही. वर पाहिला होता (मला वाटत 'Air Crash Investigations' का असेच काहितरी). त्या अनुषंगाने सांगावेसे वाटते कि नकार पचवायले शिकले पाहिजे तेव्हढेच किंबहुना त्याहुन महत्वाचे आहे - नकार द्यायला देखील शिकले पाहिजे. अनेक वेळा भिडस्त स्वभावामुळे नकार देता येत नाहि आणि नको त्या ठिकाणी आपण अडकतो. त्या पायलट ने त्याच्या मुलाला नकार दिला असता तर आज त्या विमानातले सर्व प्रवासी जिवंत असले असते. असो.
प्रभुजी,
आता असाच एखादा छान लेख नकार देण्यावरहि येउ देत! (पुर्वी येउन गेला नसेल तर :) )
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
5 Jan 2009 - 12:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता असाच एखादा छान लेख नकार देण्यावरहि येउ देत!
पूर्वी येऊन गेला आहे, हा बघा. हा बघा, तेव्हाच्या नाना चेंगटांनी, आताच्या अवलियांनी, लिहिला होता.
बाकी आपण आधी बोलल्याप्रमाणे विप्र, तुमचं म्हणणं पटतं. फारफार काय समोरचा नाही म्हणेल.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
5 Jan 2009 - 11:35 am | संजय अभ्यंकर
Michael Crichton च्या Airframe पुस्तकाची आठवण झाली.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
4 Jan 2009 - 7:45 pm | शितल
>>>>बर्-याच वेळेला असे वाटते अशा किती तरी संधी आपण सोडतो फक्त विचारायला घाबरुन. नकार मिळायच्या आधीच तो गृहित धरुन. भोक पडत नाही अंगाला नकार आला म्हणुन."प्राईम मिनिस्टर आहे का, नकाराने अपमान व्हायला".
काका,
अगदी खरे आहे.
आपणच आपल्या विचारांन मुळे अनेक संध्या गमावुन बसतो.
:)
5 Jan 2009 - 1:24 am | प्राजु
संध्या की संधी??
शितल,
संधी चं बहुवचन संधी असंच होतं.
इथे बघ, विप्र आणि टारूने लगेच 'संध्या' कशी गमावली ते सांगितल आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Jan 2009 - 7:48 pm | विनायक प्रभू
अशी एक संध्या मी पण गमावली होती.
4 Jan 2009 - 10:42 pm | टारझन
मला मात्र संध्या बरोबर फारंच गम्मत आलेली.. दिड वर्षांपुर्वी हैदराबादला जाताणा पुणे एयरपोर्टावर सुमारे ३० मिणिटे मस्त वार्तालाप चालू होता, मराठि-इंग्लिश-हिंदी एकाच वेळी सुळसुळीत पणे बोलू शकतो असं मला वाटत होतं ..
जाता जाता : संध्या किंगफिशरमधे आहे , णंतर फ्लाईटमधे तीच होती ... मला डबल चिकन मिळालं .. त्यामुळे संध्या सोडू णयेत ..
- (संध्यासाधू) टारायक महाप्रभू
4 Jan 2009 - 8:00 pm | अनंत छंदी
प्रभू सर नमस्कार
तुम्ही मांडलेला विचार अगदी खरा आहे. कित्येकदा नकारच्या भीतीमुळे आपले नुकसान होते.
4 Jan 2009 - 8:07 pm | सहज
लेखातील आशय योग्य आहे.
4 Jan 2009 - 8:11 pm | वेताळ
संध्या फुकट घालवल्या आहे.खुपच सुंदर आणि माहितीपुर्ण लेख.धन्यवाद विप्र सर.
वेताळ
4 Jan 2009 - 8:44 pm | संजय अभ्यंकर
प्रभू सरांनी एका योग्य मुद्याला आपणापूधे मांडले.
डॉ. वेन डायरची पुन्हा आठवण झाली.
त्याची पुस्तके: Pulling Your Own Strings, Sky is The Limit ह्या मध्ये अशा अनेक मुद्यांवर सोदहरण वोवेचन केले आहे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
5 Jan 2009 - 12:54 am | पांथस्थ
भिडस्त मनोवृत्तीच्या लोकांसाठि हे पुस्तक वरदान आहे! (आम्ही आधीच रोखठोक असुन देखील हे पुस्तक वाचले - त्यात पुणेरी - त्यामुळे नको तेव्हढा "ऍसर्टीव्हनेस" अंगात भिनला आहे ;) )
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
4 Jan 2009 - 8:57 pm | सर्वसाक्षी
मानले!
हे फक्त गुजराथ्यांनाच जमत असते. बेधडक हवे ते विचाराचे, फार तर काय समोरचा नाही म्हणेल. पण न मागता माघार का?
जर मागाल तर मिळेल. अगदी पूर्ण सहमत.
4 Jan 2009 - 10:29 pm | कोलबेर
अनुभव मस्त!
अगदी अगदी...
आमचाही अनुभव :
आमच्या भारतवारी मध्ये सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ह्यांचा 'आयुष्यावर बोलु काही' कार्यक्रम बघायला गेलो होतो. आम्ही नाट्यगृहापाशी पोहोचलो तर कार्यक्रम हाउसफुल्ल अशी पाटी लावुन तिकिट खिडकी बंद केली होती. हताशपणे आम्ही जायला निघालो तर म्हंटल एक प्रयत्न करुन बघु. मागच्या दाराने तिकिटखिडकी वरच्या माणसाला गाठले. त्याला विचारले की 'अगदी काहीच सोय होऊ शकणार नाही का? लांबुन आलोय.' त्यावर तो म्हणाला, 'माझ्याकडे काही सभसदांसाठी राखिव तिकिटे आहेत ते सभासद ऐनवेळेला न आल्यास तुम्हाला देतो पण कार्यक्रम सुरु होईपर्यंत वाट पहावी लागेल.' मग काय आम्ही एका पायावर वाट बघत बसलो. कार्यक्रम सुरु झाल्यावर साधारण पहिले गाणे अर्धे झाले असताना त्याने आम्हाला चक्क पहिल्या रांगेतील 'सभासदांसाठी राखीव' ४ तिकिटे दिली. इतरांसारखे हाउसफुल्लचा बोर्ड बघुन घरी गेलो असतो तो तर इतक्या सुंदर कार्यक्रमाला मुकलो असतो.
4 Jan 2009 - 10:55 pm | विनायक पाचलग
माझे पण असेच झाले होते कार्यक्रमाला गेलो पाहिला म्हटले भेटुया तरी पण ही गर्दी ,पण शेवटपर्यंत थांबलो आणि अगदी रात्री एक वाजता सगळे सभाग्रुह रीकामे झाल्यावर त्याना भेटलो
राहुदे म्हटले असते तर........
जाउ दे थिंक पॉझीटीव ..
आम्हाला जे शतदा प्रेम करावे मधुन सांगायला जमले नाही ते सरानी त्याहुन निम्या शब्दात पटवले
लय भारी
(यानंतर मी सलीले संदीप ला २ दा भेटलो बोललो चर्चा देखील केली पण ती भेट लय भारी)
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
4 Jan 2009 - 11:00 pm | अवलिया
चांगले प्रकटन.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
4 Jan 2009 - 11:02 pm | संदीप चित्रे
दिवाळीला भारतात गेलो तेव्हा आमच्या विमानात साक्षात नारायण मूर्ती होते. बोर्डिंग करताना माझ्या बाजूच्याच रांगेत होते त्यामुळे त्यांचे अगदी जवळून दर्शन झाले.
(होय... 'दर्शन' हाच शब्द योग्य वाटतोय. आपण देवाचे दर्शनचे घेतो ना? नारायण मूर्ती तमाम आय्.टी.वाल्यांचे देव आहेत :) !!)
तर, नंतर विमानात हवाई सुंदरीला विचारले की त्यांना थोडा वेळ भेटता येईल का? तिने अगदी नीट विनंती केली की प्लीज त्यांना डिस्टर्ब करू नये.
मी ही तो नकार पचवला... प्रभू सर म्हणाले तसे.. अंगाला भोकं पडली नाहीत पण प्रयत्न केल्याचे समाधान नक्की मिळाले :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
4 Jan 2009 - 11:20 pm | रेवती
फार म्हणजे फारच छान लिहिलयत आपण.
माझे बाबा आम्ही लहान असताना हेच सांगायचे आम्हाला, आता त्यांच्या सूनांना सांगतात.:)
रेवती
4 Jan 2009 - 11:27 pm | सूर्य
प्राईम मिनिस्टर ला पण नकार घ्यावा लागतो. नकाराने अपमान होत असेल तर तो करुन घ्यावा लागतो. मग तुमची आमची काय कथा? पण चुकुन होकार आला तर "मौजा ही मौजा".
प्रभुकाका.. एकदम पटले..
- सूर्य.
4 Jan 2009 - 11:40 pm | भाग्यश्री
आशय आणि 'नकार घेतल्याने काही भोकं पडत नाहीत!" हे फार आवडलं...
http://bhagyashreee.blogspot.com/
5 Jan 2009 - 1:20 am | प्राजु
विप्र...
आपण अगदीच मुद्द्याला हात घातलात. मस्तच..
खरंच आपण आधीच तर्क बांधून रिकामे होतो. नकार पचवायला आलाच पाहिजे. आपल्या या लेखाने मला खरंच एक प्रकारचा उत्साह आला आहे आणि एक नवी दृष्टी दिली आहे दैनंदिन जीवनाकडे बघण्याची.
आपले आभार कोणत्या शब्दांत मानू!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jan 2009 - 4:09 am | चतुरंग
अमेरिकेत आल्याआल्या इथल्या बँकेचे व्यवहार समजायला थोडा वेळ लागला. त्यावेळची आठवण.
एक पेमेंट चेकने केले होते. खात्यात पुरेसे पैसे नव्हते पण चेक पोस्ट्डेटेड असल्याने आणि चेकवरच्या तारखेआधी आधी काही रक्कम जमा होणार असल्याने काळजी नव्हती. पैसे जमा झाल्यावर ऑनलाईन अकाऊंट चेक करताना $३५ "ओव्हरड्राफ्ट फी" चार्ज केलेली दिसली.
बॅंकेत गेलो. तिथल्या कर्मचार्याने सांगितले की खात्यात पुरेसे पैसे नसताना चेक वठवल्याने ओव्हरड्राफ्ट चार्जेस लागलेत. चेक पोस्टडेटेड असल्याचे सांगितले तो म्हणाला की "पोस्टडेटेड म्हणजे काय?" त्याच्याशी बोलल्यावर समजले की इथे अशी काही भानगड नसतेच. चेकवर रक्कम, सही आणि कोणाला द्यायचाय हे असले की चेक पास होतो, नंतरची तारीख असली तरी काही फरक पडत नाही. मी त्याला ते चार्जेस परत मिळतील का अशी विचारणा केली. त्याच्या अधिकारात ते नव्हते.
मॅनेजरकडे गेलो तिला सांगितले की मी नुकताच भारतातून आलोय आणि तिकडे पोस्टडेटेड चेक्स चालतात आणि ते त्यावर लिहिलेल्या तारखेला किंवा नंतरच ऑनर होतात. मला इथली व्यवस्था माहीत नसल्यामुळे हा गोंधळ झाला. तिने तिचा अधिकार वापरुन लगेच माझे ३५$ परत खात्यात जमा केले.
मी बँकेत गेलो नसतो आणि मॅनेजरपर्यंत पाठपुरावा केला नसता तर पैशाचे नुकसान सोसलेच असते आणि हा बँकांच्या व्यवहारातला फरकही लक्षात आला नसता.
चतुरंग
5 Jan 2009 - 6:49 am | धनंजय
मोगाळ आशिल्लो. पुणून नाशिल्लो तरी किते म्हणटलो - "ना" म्हूण नी? तुवें केले ते बरेच केले.
तुज्या चल्याक हो आगळो अणभव मेळ्ळो - ना जाल्यार "केन्ना-केन्ना 'ना' आयकूंक मेळटा, तो बरे भाशेत आयकपाचो" हो लिसांव मेळत - तो पुणून फायदोच!
5 Jan 2009 - 9:06 am | प्राजु
हा धनंजय गोवेकरांचा प्रतिसाद कोणीतरी मराठीत भाषांतर करून मला सांगाल का? :(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jan 2009 - 2:19 pm | सुनील
माझा (स्वैर) प्रयत्न -
प्रेमळ होता (बिचारा!) म्हणून नकार तरी कसा देणार? कुणाला "नाही" म्हणू नये! तुम्ही केलेत ते योग्यच केलेत.
तुमच्या मुलाला हा आगळावेगळा अनुभव मिळाला. आणि नसता जरी मिळाला तरी, जेव्हा केव्हा नकार ऐकून घ्यायची पाळी येईल, तो सकारात्मक रीतीने घ्यायचा, हा धडा तरी मिळाला असता, हा ही फायदाच की!
मास्तर, भाषांतर लायक असा?
(अर्धकोंकणी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jan 2009 - 5:27 pm | विनायक प्रभू
एकदम करेट सुनील राव.
मला कोकणी बायकोमुळे यायला लागले. कोकणीत विचारल्या शिवाय सहकार्य मिळणार नाही हा दम भरल्यामुळे.
6 Jan 2009 - 11:02 am | पिवळा डांबिस
कोकणीत विचारल्या शिवाय सहकार्य मिळणार नाही हा दम भरल्यामुळे.
हे क्रिप्टीक आम्हालासुद्धा कळले बरं कां!!!!!
:))))
6 Jan 2009 - 7:08 pm | ब्रिटिश
'चला आता सहकार्य करूया ' ह्ये कोकनीत कस ईचारतान ?
आगरीत सार्वजनीक कार्य करून दमलेला
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
5 Jan 2009 - 8:17 am | रामदास
ट्रेनींग प्रोग्राम मध्ये एक गोष्ट नेहेमी सांगतो ती अशी.
दोन वर्षापूर्वी माटुंग्याला एका लग्नासाठी गेलो होतो. जेवताना समोर एक सुंदर बाई बसल्या होत्या. आधी लक्षात आलं नाही पण पोट भरत आल्यावर आठवलं की ही तर सरू कोठारी.इंटरला आम्ही एका वर्गात होतो. नंतर मुद्दाम भेटलो आणि विचारलं
सरू ओळखलं का.?(आता पटकन हो म्हणेल ती बाई कुठली)
थोड्या वेळानी म्हणाली हो , हो आता आठवतंय.आपण इंटरला सोबत.....
मग मला म्हणाली आता वीसएक वर्षानी तू कसं ओळखलं मला.
मी म्हंटलं की तू कॉलेजला होतीस तेव्हढीच आणि तशीच सुंदर दिसत्येस अजूनही .आता तुझ्यासारख्या सुंदर मुलीला कोण ओळखणार नाही ?
त्यावर ती एव्हढंच म्हणाली
हे कॉलेजमध्ये असताना सांगायला काय झालं होतं रे.?
असो. संधी गमावली ती अशी.
5 Jan 2009 - 10:46 am | विनायक प्रभू
आता सांगितल्यावर काय झाले?
5 Jan 2009 - 11:45 am | सुनील
अवलीयांची (तेव्हाचे नाना चेंगट) यांनी इथेम मिपावर लिहिलेली एक कथा आठवली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Jan 2009 - 8:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:) रामदासराव, विचारण्याचे फायदे होतात हे मात्र खरं आहे !!!
6 Jan 2009 - 11:06 am | पिवळा डांबिस
हे कॉलेजमध्ये असताना सांगायला काय झालं होतं रे.?
असो. संधी गमावली ती अशी.
अरारारांरा!!
लंगोटीवाल्या रामदासाचा पारोवाला देवदास झाला की रे........
:)
म्हणुन म्हणतो की काही कामं वेळच्यावेळीच्च म्हायला पाह्यज्येत....
:)
5 Jan 2009 - 10:57 am | डॉ.प्रसाद दाढे
माझ्या मित्राला मु॑बई- ब॑गलोर विमानप्रवासात असाच अनुभव आला. पुढच्या सीटवर फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ बसले होते. मित्राला सहीचा मोह आवरेना, पण काय सा॑गा, म्हातारबुवा एकदम उखडले तर काय घ्या म्हणून बराच वेळ चुळबुळ करीत बसला. शेवटी धीर करून त्याने हवाईसु॑दरीला विचारले. ती म्हणाली त्या॑ना विचारून पाहते.
'एक्स्यूज मी सर, दॅट बॉय वॉन्ट्स टू टेक युवर ऑटोग्राफ' तिच्या पहिल्याच शब्दावर सॅमबहाद्दूरा॑नी त्या देखण्या कमनीय हवाईसु॑दरीच्या कमरेला विळखा टाकला व तिला थोडे जवळ ओढून वगैरे 'येस माय डियर, हाऊ कॅन आय हेल्प यू' असा सवाल टाकला. ती तर एकदम गडबडूनच गेली :)
अर्थातच मित्राला सही मिळाली!
5 Jan 2009 - 11:26 am | मेथांबा
मुंबईत खास फ्लेमिंगो बघायला म्हणून गेलो होतो. शिवडी भाग सगळा मोठ्या मोठ्या कार्यशाळा / उद्योग असलेला आहे त्यामुळे विचारत विचारत जावे लागले. पण खाडीवर पोहोचल्यावर लांबून फ्लेमिंगो बघता येऊ लागले. थोडं पुढे गेलो तर एक संशोधकांचा जत्था दुर्बिणी आणि इतर अवजारे घेऊन उभा दिसला. त्यांना विनंती केल्यावर त्यांनी दुर्बिणीतून पाहू दिले, स्वत:कडचे फ्लेमिंगोचे फोटो दिले, फ्लेमिंगोची शास्त्रीय माहिती दिली. तिथे गेल्याचे चीज झाले.
गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा
5 Jan 2009 - 7:26 pm | मदनबाण
मिरज जंक्शनवर बर्याच वेळी एखादी ट्रेन आली व जिचा शेवट मिरज जंक्शनच आहे अशा ट्रेनचे इंजिन बराच वेळ चालु राहत असे व शेवटी बर्याच वेळाने ती यार्डात निघुन जात असे...मी विचार करायचो च्यामारी किती वेळ हे इंजिन चालु राहते व त्यामुळे विनाकारण डिझेल वापरले जाते व त्याचा अपव्यय होतो..शेवटी एकदा ट्रेनच्या ड्रायव्हरला विचारले मला इंजिन आतुन कसे असते ते बघायचे आहे वर येउ का?ड्रायव्हर म्हणला ये ना..मी त्या धडधडणार्या ईंजिन केबीन मधे गेलो..ब्रेक कसे असताता..काही सिग्नलींगची माहिती..इं गोष्टी कळाल्या शेवटी मी त्या ड्रायव्हरला विचारले की इतका वेळ हे इंजिन विनाकारण चालु असते ते बंद करुन परत चालु का नाही करत!!! तेव्हढच डिझेल वाचेल,,,तो ड्रायव्हर हसला व मला म्हणाला तसे केले तर इंजिन चालु करण्यात ४५ ते ५५ लिटर एका झटक्यात उडतं..म्हणजे ते इंजिन नुस्त चालु करायलाच तेव्हढ डिझेल एका वेळी लागत त्या पेक्षा ते नुसत चालु ठेव्हण परवडत!!!
विप्र काका एक गोष्ट पक्की मनात ठेवतो जास्तीत जास्त काय समोरचा ना म्हणेल पण विचारुन पाहायला काय हरकत आहे ???
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
5 Jan 2009 - 8:23 pm | लिखाळ
प्रभूसर,
छान लेख. प्रतिसाद सुद्धा छान आहेत.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
5 Jan 2009 - 9:26 pm | कपिल काळे
नो
एन ओ--
नेक्स्ट वन
एन ओ--
नेक्स्ट ऑपारच्युनिटी..
तेव्हा नो मिळाला तर घाबरु नका. प्रयत्न करा. पुढ्च्या वेळी नक्की जमेल.
5 Jan 2009 - 9:32 pm | रेवती
एन् ओ, नो चा हा अर्थ छानच आहे.
अश्या नो ची भिती नाही वाटणार.
(तशी त्या दुसर्या नो चीही भीती नाहीये)
रेवती
5 Jan 2009 - 11:28 pm | पांथस्थ
वाह कपिलराव मस्तच कि!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
6 Jan 2009 - 12:07 am | शक्तिमान
टाळ्या...
मनातलं बोललात...
6 Jan 2009 - 12:38 am | आपला अभिजित
नकाराच्या भीतीनेच अनेक कॉलेजसुंदरींच्या जीवनातील माझे आडनाव लावण्याची अमूल्य संधी हुकली आहे. असो!!
असतं एकेकीचं नशीब!!
6 Jan 2009 - 10:41 am | घासू
विग्रंजीत म्हनत्यातना पॉजिटीव एटिट्युड तेच ते. नकाराचा विचार आला कि, लढाई हरलीच.
6 Jan 2009 - 10:48 am | एकलव्य
... स्टाईल आवडली. नो हार्म इन ट्राईंग चा मंत्र आम्ही नेहमीच जपतो... आपले जमायला हरकत नाही.
:)
6 Jan 2009 - 6:07 pm | ब्रिटिश
नकार मिल्ल्यावर तो मान्य करने हि पन नीगेटीव गोस्ट हाय
नकाराला होकारामदे कन्वर्ट करने ह्येच त खरा स्कील हाय
मार्केटींग मॅनेजर
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)