महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी दुसरी बाजू न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात " स्वामी अस्वस्थानंद रसवंती" हे नाव चर्चेत येत आहे . स्वामीजींची भेट झाली. त्यांच्याबद्दल नेटवर वैयक्तिक जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. त्यांनी चर्चेत खालील मुद्दे उपस्थित केले.
शनीच्या चौथर्यावर जाणाराने सहा महीने कुठल्याही महिलेशी संपर्क करणे निषिद्ध आहे. शास्त्राप्रमाणे हा कालावधी सहा वर्षे आहे. पण ट्वेन्टी ट्वेन्टीच्या जमान्यात तो शिथिल झाला आहे.
ज्या गावामधे शनीचं पूजन करण्याची किंवा त्याचं मंदीर असण्याची परंपरा आहे त्या गावात स्त्रियांना मनाई आहे. सबब गावातील पुरूषांना लग्न आदि विधी मधे सक्रीय सहभाग नोंदवणे शास्त्रास धरून नाही. तसेच गावातील ग्रामस्थांनी वेस ओलांडू नये याचे कारण वेशीच्या बाहेर स्त्रीच्या स्पर्शाने विटाळ झालेली भूमी असेल त्याचे कण पायास लागून गावामधील भूमीस विटाळ होतो. त्यातून निघणा-या तमोगुणांमुळे शनीमहाराजांचा कोप होण्याची शकता असते.
शनी या ग्रहाचा नऊ या क्रमांकाशी संबंध असल्या कारणाने त्याचे शून्याशी जमत नाही. कारण शून्य नंतर आलेले आहे. त्यामुळे नऊ, एकोणीस असे अंक शनीमहाराजास चालू शकतात. परंतु दहा किंवा वीस हे अंक निषिद्ध आहेत. या अंकाचा उल्लेख नावात असलेली व्यक्ती देखील शनीमहाराजांना चालत नाही. त्यामुळे या गावावर अशा व्यक्तीची सत्ता नको.
वरील धोक्याची घंटा पाहता
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा आणि त्यासोबत नव्यानेच उजेडात आलेले शास्त्र पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीचे गाव असलेली वेस ओलांडून जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
प्रतिक्रिया
29 Jan 2016 - 7:40 pm | बबन ताम्बे
मग या न्यायाने खालील प्रथा परंपरा पण बंद न करता चालू ठेवायच्या होत्या काय?
१. सतीची चाल
२. बालविवाह
३. हरिजनांना मंदिर प्रवेश बंदी
वगैरे वगैरे..
29 Jan 2016 - 9:24 pm | उगा काहितरीच
ताम्बे सर, माझे असे मत आहे की , ज्या प्रथा चालू ठेवण्यात विशेष नुकसान नाही त्याच चालू ठेवाव्यात (व जर समाजाचे अहित करणाऱ्या असतील तर समाजप्रबोधनाने हळूहळू नष्ट कराव्यात) . व काही प्रथा या सक्तीने , समाजाचा विरोध झुगारूनही बंद कराव्यात जसेकी सतीप्रथा इत्यादी .
ही बंदच करायला हवी होती./ बंद झाली ते चांगलंच झालंय कारण यात एका निरपराध व्यक्तीचा विनाकारण बळी जात होता.
.
ही प्रथा बंद केली ते योग्यच होय. कारणा वैद्यकीय दृष्ट्या शरीराची वाढ वगैरे झालेली नसते. जे आपणांस माहीतच आहे.
.
ही पण प्रथा बंद झाली ते योग्यच आहे. निसर्गाने/देवाने जर माणसात भेद नाही केला तर तुम्ही आम्ही कोण ते भेद करणारे ?
30 Jan 2016 - 1:33 pm | संदीप डांगे
सतीची चाल, बालविवाह, दलितांना प्रवेशबंदी यात ऐच्छिक व टाळता येण्यासारखे काय होते? ह्या तिन्ही बाबी कंपल्सरी होत्या. शनीचौथर्यावर महिलांनी न जाणे ही एक ऐच्छिक परंपरा आहे. ह्यात काही जबरदस्ती दिसते आहे काय? यच्चयावत महिलांनी तिथे गेलेच पाहिजे अन्यथा समाजातून बहिष्कृत केले जाईल असा काही दंडक असता तर आंदोलनाला, विरोधाला महत्त्व असते.
हा संपूर्ण वाद इतका पोकळ आणि तकलादू आहे की ज्याचे नाव ते. आमच्या नाशकात खूप सारे शनि मंदिरं आहेत आणि कुणावर कसलीही बंदी नाही. त्यामुळेच कदाचित ते शिंगणापुरएवढे फेमस नसावेत.
30 Jan 2016 - 1:39 pm | प्रचेतस
शनीमंदिरे आजकाल सर्वत्रच असतात. शनीमंदिराला जोडून इतर अष्टग्रह आणि मारुती. दर शनीवार हाती तेलाची वाटी घेतलेल्या तरुण मुलामुलींची गर्दी शनिमंदिरांत पाहायला मिळते. आमचा एक मित्रही जायचा पण त्याचे समुपदेशन केल्यावर जाणे बंद झाले त्याचे.
30 Jan 2016 - 1:41 pm | प्रचेतस
अवांतरः त्या मित्राला हल्ली पिरॅमिड्सचे वेड लागलेय. त्याचे घरी जिकडे बघावे तिकडे भिंतींवर, छतावर पिरॅमिड्स दिसतात. अगदी संडास बाथरूमात सुद्धा. चेष्टा नाय.
30 Jan 2016 - 1:47 pm | संदीप डांगे
हा हा हा. ते पिरॅमिडवाले डोक्यात जातात राव! कल्याणमध्ये एक नवीनच हॉटेल सुरु झाले होते, तिथे इतक्या जागी इतक्या वेगवेगळ्या साइझचे पिरॅमिड लावले होते की बास. मी हॉटेलमालकास टेबल व खुर्च्यांवर पिरॅमिड लावले नाही याबद्दल धन्यवाद देता झालो. कुणास ठावुक खुर्चीच्या खालून उलटे पिरॅमिड लावले असतील ते :) वर नाही लावले ते नशिब!
30 Jan 2016 - 9:53 pm | मास्टरमाईन्ड
अजून बर्याच ठिकाणी (बाथरूम वगैरे) पिरॅमिड्स लावलेले पाहिलेत.
30 Jan 2016 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
फ्यारोने पुनर्जन्म घेतला असेल =)) =))
31 Jan 2016 - 12:00 am | प्रचेतस
=))
29 Jan 2016 - 7:51 pm | भाते
बीसीसीआयने आयसीसी मधुन बाहेर पडावे काय?
भारताने ब्रिक्स / आयएमएफ मधुन बाहेर पडावे काय?
मुंबई… महाराष्ट्र… जाऊ दे, ते पुन्हा कधीतरी.
प्रत्येक वेळी नविन धागा काढण्यापेक्षा, कोणी, कुठुन, कसे, बाहेर पडायचे याची चर्चा एकाच धाग्यावर करणे सोपे नाही का?
29 Jan 2016 - 7:54 pm | खटासि खट
त्यांना कुणी रोखलेय हो ? शिवाय बाहेर पडले तर कुणाचा कोप होणार??
29 Jan 2016 - 7:55 pm | बबन ताम्बे
स्वामींचे नाव पहा - "स्वामी अस्वस्थानंद रसवंती" :-)
29 Jan 2016 - 7:59 pm | यशोधरा
हे विडंबन आहे ना?
29 Jan 2016 - 8:02 pm | माहितगार
:)
29 Jan 2016 - 9:27 pm | उगा काहितरीच
खटासि खट , हे विडंबन समजावे का ?
(स्वगत:प्रमोशन झालं का काय ? आजकाल आपल्यापण धाग्याचे विडंबन पडत आहेत! )
29 Jan 2016 - 9:30 pm | एस
जमेश!
पण 'कोडॅईकॅनाल' आणि 'भूछत्र' नसल्यामुळे फाऊल धरण्यात येत आहे. ;-)
ता. क. : 'गरम पाण्याचे कुंड' राहिलेच की!
29 Jan 2016 - 9:53 pm | पैसा
:D
30 Jan 2016 - 5:48 am | कंजूस
मुक्तपीठातून
Back
अक्कल विकत 'देणारं' तीर्थाटन (अनुभव)
21 जानेवारी 2016 - 01:32 PM IST
नु
कताच तीर्थाटनाचा योग झाला. खासगी गाडीने कोल्हापूरहून निघालो. वाटेत मोरगाव व रांजणगाव या दोन गणरायांच्या दर्शनाने सुरवात केली. पुढे शनी शिंगणापूर, शिर्डी, शेगावकडे रवाना झालो. सुपे, अहमदनगरनंतर मुख्य रस्त्यापासून शिंगणापूर 25 कि.मी. आत आहे.
शनिवारचा दिवस म्हणजे शनी देवाचा वार.----------
30 Jan 2016 - 8:38 am | अजया
वेगळाच लेख उघडतोय लिंकमधुन.
30 Jan 2016 - 10:29 am | संदीप डांगे
हा बघा
30 Jan 2016 - 1:54 pm | अजया
धन्यवाद.
हे सर्व माहिती असूनही लोक देवस्थानांना जाऊन का तडफडतात हा सनातन प्रश्न नेहमीप्रमाणे मनात आलाच.
शिंगणापूरच्या शनीला ,इतरत्र असणाऱ्या शनींपेक्षा जास्त पावर आहे काय?
30 Jan 2016 - 1:56 pm | संदीप डांगे
अजयातै, लोक असा सारासार विचार करते असते तर काय पाहिजे होतं अजून?
30 Jan 2016 - 8:29 pm | खटासि खट
लोकहो
शिंगणापूरच्या लोकांनी गावातून बाहेर का पडावे असा प्रश्न इथे चर्चेला घेतलेला आहे. त्यांच्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावतात. आमच्या श्रद्धेप्रमाणे त्यांनी आणि दर्शन घेऊन आलेल्या लोकांनी इतरत्र जाऊन समाजात मिसळू नये असे शास्त्र सांगते. तरी त्याचा अनादर होऊ नये.
काय गरज काय आहे गावातून बाहेर पडायची ?
30 Jan 2016 - 9:50 pm | गामा पैलवान
खख, त्या शास्त्राचं नाव कळेल काय?
आ.न.,
-गा.पै.
30 Jan 2016 - 10:17 pm | खटासि खट
बायकांनी दर्शन घेऊ नये हे कुठल्या शास्त्रात लिवलंय हे पयल्यांदा सांगा. नैतर आमी नाई ज्जा !
30 Jan 2016 - 10:34 pm | यशोधरा
=))
31 Jan 2016 - 10:53 am | अजया
=))))