पॉर्नची गरज आहे का?

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in काथ्याकूट
25 Jan 2016 - 2:25 pm
गाभा: 

पॉर्नची गरज आहे का?
या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे.
पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे.
संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे.
काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही.
सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे.
बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते?
पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते.
त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते.
अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे.
म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते.
मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.)
काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती.
आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते.
या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो.

पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.
वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात.
नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर).
बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.
अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात.
बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते.
उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते.
एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे.
परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो.
ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका"
असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो.
प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील.
१००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे.
परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते.
हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

25 Jan 2016 - 2:41 pm | पिलीयन रायडर

पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते.

हेच अगदी महत्वाचे आहे.

कुण्या एका माणसाच्या कवी कल्पना वाचण्यापेक्षा तुमचे ह्या क्ष्रेत्रात काम करताना आलेले अनुभव जास्त महत्वाचा विदा आहे.

लेख आवडला. जमिनीवर काय घडते ह्याची जाणीव ठेवुन लिहीलेला असल्याने भावला.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2016 - 8:17 am | अत्रुप्त आत्मा

@जमिनीवर काय घडते ह्याची जाणीव ठेवुन लिहीलेला असल्याने भावला >> +++१११

पैसा's picture

25 Jan 2016 - 2:43 pm | पैसा

उत्तम माहितीपूर्ण लेख

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jan 2016 - 2:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

डॉक्टर साहेब,

प्रथमतः वैज्ञानिक दृष्ट्या विषयाला तोंड फोडल्याबद्दल आभार.

माझा एक प्रश्न आहे, बरेच आधी एक लेख वाचला होता तो पॉर्न विरोधी होता अर्थातच, त्यात दिले होते की सतत पॉर्न पाहिल्याने अल्टरनेटिव न्यूरल पाथ तयार होतात अन त्यायोगे नॉर्मल सेक्सुअल अरौसलला गरजेचे असणारे न्यूरल पाथ बायपास होऊन पुरुष नैसर्गिक कामक्रियेप्रती 'निरुत्साही' होऊन फ़क्त पॉर्न पाहूनच उत्तेजित होतो असे काहीसे.

हे तथ्य वैज्ञानिक आहे का? ह्या बाबतीत काही उद्बोधन केल्यास आभारी राहीन मी आपला

तरीही या दाव्यात बरेचसे तथ्य असावे असे मला वाटते. कारण मध्यंतरी मी डेंटीस्टकडे गेलो असताना तिथे बाहेर पडलेली मासिके चाळत होतो त्यातल्या एकात प्लेबॉय या मासिकाचा जनक आणि मालक ह्यूज हेफ्नरबद्दल लेख होता.
जगातली अतिसुंदर आणि कमनीय मॉडेल्स ज्याच्याबरोबर काम करतात असा ह्यूज, याने अनेक लग्ने केली आणि त्याव्यतिरिक्त अनेक स्त्रिया उपभोगल्या. त्यातल्या एकीची मुलाखत त्या लेखात होती तिने म्हटले होते "जगातली अतिशय कमनीय मॉडेल्स, ज्यांची केवळ चित्रे बघून आणि चित्रफिती बघून लोक समाधान मानतात अशा ४-५ अर्धनग्न, पूर्णनग्न स्त्रिया एकावेळी सोबत असतानाही ह्यूजला पुरेशी उत्तेजना येत नसे, त्याचे समाधान होत नसे. शेवटी आम्हा सौंदर्यवतींच्या गराड्यात बसून तो पोर्न मूवी लावत असे किंवा आम्हाला लेस्बिअन अ‍ॅक्ट करायला लावी आणि मग हस्तमैथुन करुनच त्याचे समाधान होई!!"
त्यावर पुढे एका डॉक्टराने त्याचे मत मांडले होते की "सातत्याने पॉर्न बघून असे होते, मेंदूत कायमस्वरुपी बदल होतात आणि नॉर्मल सेक्सुअल अरौजलला अडथळे येतात".
यालाच व्यसन म्हणत असावेत.

सुबोध खरे's picture

25 Jan 2016 - 11:35 pm | सुबोध खरे

अल्टरनेटिव न्यूरल पाथ तयार होतात अन त्यायोगे नॉर्मल सेक्सुअल अरौसलला गरजेचे असणारे न्यूरल पाथ बायपास होऊन पुरुष नैसर्गिक कामक्रियेप्रती 'निरुत्साही' होऊन फ़क्त पॉर्न पाहूनच उत्तेजित होतो
बापूसाहेब या बद्दल मी वाचलेले नाही तेंव्हा त्याचा अभ्यास करूनच मी उत्तर देऊ शकेन.
सध्या तरी क्षमस्व

माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.

पोर्न अ‍ॅडिक्शनबाबत, ब्रेनच्या रिवार्ड सर्किटरीवर परीणाम होवून अ‍ॅडिक्शन होते असे एका लेखात वाचले होते. दारुचे व्यसन जसे काहीच जणांना लागते तसेच याबाबतही असणार ना?

वेल्लाभट's picture

25 Jan 2016 - 2:51 pm | वेल्लाभट

उघडपणे चर्चिल्या न जाणा-या विषयावर वास्तवदर्शी व माहितीपूर्ण भाष्य केलंत. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हा विषय गहन आहे. पण जितकी लपवली जाणारी याची कारणं आहेत, तितकेच उघड परिणाम.

चलत मुसाफिर's picture

25 Jan 2016 - 2:58 pm | चलत मुसाफिर

लेखाचे "सोवळे" शीर्षक वाचून हा लेख खोडून काढलाच पाहिजे, असा विचार मनात आला होता. पण वाचत गेलो, तेव्हा लेख फारच भावला. या विषयावर निकोप आणि निर्मळ चर्चेस सुरुवात करून दिल्याबद्दल अभिनंदन.

नाखु's picture

25 Jan 2016 - 3:11 pm | नाखु

या विषयावर निकोप आणि निर्मळ चर्चेस सुरुवात करून दिल्याबद्दल अभिनंदन.

थेट व्यव्सायाशी संबंधीत माहीती असल्याने "हवेत गोळीबार " नाही म्हणून जास्त भावले.

काहींना समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा धर्म-नैतीकता-सदाचार-संस्क्रुती यांचे गुर्‍हाळ लावावे वाटेल त्यांनी आवर्जून दूर राहिले पाहिजे अश्या थेट माहीतीपासून.

डॉ. खर्‍यांचा खराखुरा वाचक नाखु

पद्मावति's picture

25 Jan 2016 - 3:02 pm | पद्मावति

उत्तम लेख.

माझे दोन पैसे
एक साधारण पॉर्न विरोधात मांडला जाणारा मुद्दा म्हणजे पॉर्नची गरज नाही खरा समागम त्या शिवाय शक्य आहे.
एका मर्यादीत अर्थाने सत्य आहे. कारण एक उत्स्फुर्तता एक नैसर्गिक उत्स्फुर्तता प्रथेक स्त्री-पुरुषात जन्मजात निसर्गतः असतेच असते. एका विशिष्ट कोवळ्या वयापर्यंत एक उत्फुल उत्स्फुर्त वासना प्रत्येक जणात असते. तेव्हा त्या व्हर्जीन सुंदर काळात मुलगा वा मुलगी अगदी सहज परस्परांच्या स्पर्श तर फार दुर दर्शनाने किंवा साध्या चाहुलीने वा विचारांनी पण तीव्रतम उत्तेजनेचा अनुभव घेतात. त्यांच्या बाबतीत उत्तेजना गोड हुरहुर ओढ पॅशन हे अगदी नैसर्गिक असते. ते करावे/घडवावे लागत नाही सहज साध्य असते. खर म्हणजे किया नही जाता हो जाता है असे असते. तेव्हा त्यांचे ते तरुण शरीर व तरुण मन व्हर्जीन माइंड त्या नैसर्गिक उर्मींना तोलामोलाचा प्रतिसाद देत असते. अगदे स्वतःहुन काहीही न करावे लागता. या आता या फेजपर्यंत जो पर्यंत उत्स्फुर्तता व्हर्जीनीटी वा समागम अजुन ताजा आहे (म्हणजे शिळा न झालेला नव विवाहीतांचा ) तो पर्यंत पॉर्न इ. साधनांची साहजिकच आवश्यकता नसतेच काहीच नसते. म्हणुन इथपर्यंत ते ठीक आहे.
या नैसर्गिक उत्स्फुर्तते ला पुढे माणुस का गमावुन बसतो कसा गमावतो हा एक वेगळा खरोखर चिंतन योग्य विषय आहे.
पण या नंतर जेव्हा माणुस ती फेज पार करतो व जसजसा मोठा होतो. कोवळेपणा उत्स्फुर्तता अनुभवाचे नाविन्य हरवुन बसतो. थोडक्यात "सराईत" होतो. तेव्हा मात्र जी उत्तेजना उत्स्फुर्तता एकेकाळी सहज होती ती कठीण होऊन बसते. माणुस जसा जसा अनुभवी होतो त्याच्या जीवनाचे वेगवेगळे ताण तणाव जबाबदारी त्यावर मात करतात. रहाटगाडग रुटीन जेव्हा त्या माणसाला पुर्णपणे यांत्रिक बनवत. तेव्हा जीवनात जो एक यांत्रिकपणा रटाळपणा येतो. जी सहज संवेदनेची क्षमता कमी वा गायब होते. तेच ते तेच ते जेव्हा भयावह रीपीटेशन होत. तेव्हा त्याच्या लैंगिक आयुष्यातही कीतीही कोणीही पोहोचलेला असला तरी एक " यांत्रिकता" बोअरडम हमखास येतोच. आता हे कटु वास्तव आहे पटो वा न पटो.त्याला जो तो ज्याच्या त्याच्या वकुबा संस्कारानुसार मार्ग काढुन मात करण्याचा प्रयत्न करतो.
या फेज मध्ये "पॉर्न" एक साधन म्हणुन एक निरुपद्रवी ( काही मर्यादेपर्यंत ) साधन होऊ शकते. हे वास्तव आहे.
आता जो ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्याने तसे केले तर त्यात वावग काही वाटु नये.
मुळ प्रश्न आपण आपली सहजता उत्स्फुर्तता ( लैंगिकच नाही एकुण सर्वच) का व कशी हरवुन बसतो ती परत कशी मिळवावी हा माझ्यापुरता मला महत्वाचा वाटतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2016 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल त्या धाग्यात प्रतिसादात मी हेच म्हणत होतो की वयपरत्वे या गोष्टींची तीव्रता कमी होत जाते. विशिष्ट वयानंतर त्यात तर यांत्रिकता यायला लागते आणि मग चलो आज कुछ तूफानी करते है चा शोध सुरु होतो.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

25 Jan 2016 - 11:42 pm | सुबोध खरे

सहमत आहे
अतिपरिचयात अवज्ञा या नात्याने आपली सुंदर बायको सुद्धा साधारण वाटू लागते. यासाठी थोड्या थोड्या काळाने आपापल्या रुटीन मधून वेगळे काही तरी करावे. यातून काही जोडपी पॉर्न बघतात आणि त्यातील विविधता आपल्या नात्यात आणण्याचा प्रयत्न करतात. अर्थात काही काळाने त्याचा हि कंटाळा येतो. असेही बर्याच जोडप्यांकडून ऐकले आहे. बरेच लोक पर्यटन करतात याचे कारणही हेच आहे कि रोजच्या कटकटीतून मुक्तता मिळाली कि आपणहून संबंधाला एक वेगळा आयाम येतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2016 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोजच्या जीवनाशी निगडित असलेल्या एका महत्वाच्या पण दुर्लक्षिलेल्या / निषिद्ध मानला गेलेल्या / उघडपणे चर्चा न केला जाणार्‍या विषयावरचा शस्त्रिय माहितीवर आधारलेला (वैयक्तिक कल्पनाविलासावर नाही) आणि म्हणूनच अत्यंत उपयोगी लेख !

हा धागा वेगळा टाकण्याचा उत्तम निर्णय घेतला आहे तुम्ही, डॉक्टरसाहेब. त्यामुळे इथे "वास्तवाचे व आधुनिक शास्त्राचे" भान राखून चर्चा होणे सुलभ होईल.

अजया's picture

25 Jan 2016 - 3:39 pm | अजया

सहमत आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Jan 2016 - 3:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

उत्तम विषयाची तितकीच चांगली मांडणी केल्याबद्दल डॉ. चे आभार. आणि मारवाजींचा प्रतिसादपण मस्त.

बरेचदा जोडप्यांमधे लग्न झाले म्हणुन मुले झाली आणि मुले झाली म्हणुन संसार झाला अशी परिस्थिती दिसुन येते.किंवा पहिले चांगले चाललेले असते पण बर्‍याच वर्षांच्या सहवासामुळे स्टिरिओटाईपनेस येउ शकतो.

किंवा फिरतीच्या नोकरीमुळे/ दगदगीमुळे कामभावनांचे दमन करावे लागते( दोघांना).किंवा मग डॉ. नी म्हटल्याप्रमाणे मधुमेह वगैरे मेडिकल प्रॉब्लेम्स.... अशा वेळी पोर्न आधार होउ शकतो असे वाटते. अर्थात जाणकारांनी जे सांगितले त्यात माझे चार शब्द ईतकेच. शेवटी प्रत्येकाची समस्या आणि त्यावर शोधलेले उपाय वेगवेगळे.

मारवा's picture

25 Jan 2016 - 3:33 pm | मारवा

दर्जेदार पॉर्न न बघितल्याने पॉर्न म्हणजे गलिच्छ काहीतरी असा एक मोठा गैरसमज न बघितलेल्यां मध्ये जास्त च असतो.
प्रत्येक साहीत्यात कलाकृतीत जसे स्तर असतात तसेच पॉर्न मध्ये ही असतात.
बहुसंख्य पॉर्न कचरा असले तरी काही अत्यंत दर्जेदार क्रिएटीव्ह आणि अत्यंत सुंदर उन्न्त करणारे असे असतात.
यात साहित्य आणि व्हिज्युअल संदर्भात वरील विधान आहे.
लास वेगास मध्ये काही अत्यंत दर्जेदार उत्कट असे सेक्स शो बघितलेले आहेत .
जे बनवायला केवळ असामान्य दर्जाची प्रतिभाच हवी
पॉर्न म्हणजे घाण काहीतरी कचरा काही तरी असे नाहीच

काकासाहेब केंजळे's picture

25 Jan 2016 - 4:37 pm | काकासाहेब केंजळे

खास स्त्रीयांसाठी बनवलेल्या पोर्न क्लिप्स जास्त उत्कट असतात,ज्यात फोर् प्ले, ऑर्गॅझ्म वगैरे संकल्पना नीट हातळालेल्या असतात.त्याच बरोबर लेस्बियन पोर्नमधुनही पार्टनरला आनंद् कसा द्यावा हे लेस्बियन पॉर्न अक्ट्रेसकडून शिकता येते.
मेनस्ट्रीम पोर्नमधील गुदमैथुन, मुखमैथुन प्रकार पाहून सेक्स म्हणजे फक्त वासना शमवण्याचा मार्ग असा गैरसमज होऊ शकतो.

प्राची अश्विनी's picture

25 Jan 2016 - 4:47 pm | प्राची अश्विनी

फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित मांडलेला विषय . पण काही अजून मुद्दे . इथे मुख्यत: विवाहित लोकांचा विषय चर्चिला आहे.
तसेच यात सोशिओलोजिकल घटकांचा अंतर्भाव करावा का?
मुंबई मध्ये भारतभरातून तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी येतो . त्यात अशिक्षित , अविवाहित किंवा ज्यांचे कुटुंब गावी आहे असे तरुण बरेच असतात . त्यांच्या नैसर्गिक लैंगिक भावना पोर्न बघितल्याने क्षमतात का? की दिवसभर कुठल्याही वेळी अत्यंत सहजपणे पोर्न उपलब्ध असल्याने अधिक उद्दीपित होऊन अपुऱ्या राहतात? विशेषत; low income group. त्यामुळे स्त्रियाना छेडछाड, बलात्कार वगैरे गोष्टीं वाढल्यात का? ( यात बलात्कार , छेडछाड फक्त असेच लोक करतात असे म्हणायचे मुळीच नाही .)

काकासाहेब केंजळे's picture

25 Jan 2016 - 5:46 pm | काकासाहेब केंजळे

@प्राचि अश्विनी ,तुमचे निरीक्षण अगदी योग्य आहे ,बहुतांशी बलात्कारी हे झोपडपट्टीत राहणारे ,लो इन्कम ग्रुपमधलेच असतात.एक तर व्यसनी अस्तात ,त्यात लहानपणापासून वाईट संगतीत असतात.अशे लोक नैसर्गीकच पशुत्वाकडे झुकणारे असतात अधिक यांच्या बायकाही दिसायला अगदीच ओंगळवाण्या असतात,त्यामुळे सुंदर सालस स्त्रीशी रत होण्याचा एकच मार्ग यांना ठाऊक असतो ,तो म्हणजे छेडछाड किंवा बलात्कार.

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 5:52 pm | संदीप डांगे

काकासाहेब,

बेछुट गोळीबार करण्याआधी विदा हाताशी ठेवा. एका विशिष्ट सामाजिक गटाबद्दल कसलाही विदा नसतांना बेछूट विधाने करत आहात.

मारवा's picture

25 Jan 2016 - 6:49 pm | मारवा

एका भारतीय जज ची केस होती मागे त्याने दुसरया महीला जज ला पार्टीत आयटेम डान्स करण्यास फोर्स केला होता.
एक नोबेल विजेता कार्यालयातील महीलेशी छेडछाडी करण्याच्या केस मध्ये आहे.
एक सुपर कॉप महीला आय ए एस अधिकारीची छेड काढण्यात शिक्षा भोगलेला आहे.
सर्व भारतीयच आहेत.
यापैकी कोणीही झोपडपट्टीत राहत नव्हते कोणीही सुंदर स्त्रीयांशी अपरीचीत असंबधित राहीले अस नव्हत.
तरीही त्यांनी असे सर्व प्रकार केलेत.
विकृती विकृती आहे एकदम सरसकटीकरण करु नका असे नमुद करतो.

आपला प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा..तुम्हि अस इतक ठामपणे कस म्हणु शकता ?

काकासाहेब केंजळे's picture

25 Jan 2016 - 6:48 pm | काकासाहेब केंजळे

@संदीप डांगे,@ होबासराव, आपण मागच्या चार वर्षातले बलात्कार ,सामुहीक बलात्कार यातले आरोपी पाहीलेत तर एक जात सगळे झोपडपटटीत राहणारे आहेत.निर्भया प्रकरण, शक्तीमील गॅंगरेपमधले आरोपी आजुबाजुच्या झोपडपट्टीतलेच होते.
स्त्रीयांनी बलात्काराच्या धोक्यापासून लांब राहयचे असल्यास शक्यतो झोपडपट्टीतील वर्ग व ब्लू कॉलर जॉब करणार्या पुरुषांबाबातीत विशेष खबरदारी घ्यावी या मताचा मी आहे.

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 6:57 pm | संदीप डांगे

काकासाहेब, जरा विदा काढा. मग बोलू. चार बातम्यांमुळे आपण असा ग्रह करुन घेत असाल तर तो घातक आहे तसाच झोपडपट्टीतल्या वर्गाचा अपमान आहे. वर मारवा यांनी सांगितल्याप्रमाने विकृती विकृती असते तिचा कुठलाही वर्ग नसतो. सभ्य म्हणवल्या जाणार्‍या समाजात किती बलात्कार नोंदवले जातात ह्याचा विदा काढून बघा. दूध का दुध पानी का पानी होऊन जाईल. विशिष्ट वर्गाबद्दल जाणूनबुजून आकस ठेवणे योग्य नाही. त्यात तुम्ही तुमच्या प्रतिसादात लिहलंय ते बघता आपणांस ह्या सर्व समाजाबद्दल किती घृणा वाटते तेही दिसून येते. तुम्हाला ही घृणा आधीच वाटत असेल, बलात्कार हे फक्त निमित्त आहे त्या घृणेला बाहेर काढण्याचे.

नारायण दत्ता तिवारी, तहेलकाचा तरुण तेजपाल ह्यांना विसरलात काय? मोठ्यांचे बाहेर येत नाहीत. इन्फोसिसचे फानिश मूर्ती? ते जावू द्यात. विन्ग्लंडच्या य्मपी लोकसचे कारनामे विसरलात काय? पोर्ण पाहून वर बिल पारलमेंटला दिले होते. प्रख्यात फुटबॉल प्येलर ह्यांचे कारनामे वाचाच. आपल्याकडे बाहेर येत नाही इतकेच आहे. नाहीतर जितके झोपडपट्टीतील लोक करतात तितकेच पांढरपेशे पण करतात. संधी मिळाल्यावर पांढरपेशे पण आपला रंग दाखवतात. फार कमी लोक आतून आणि बाहेरून संत असतात. तेंव्हा फक्त वृत्तपत्रातल्या बातम्यांवरून हे असे निष्कर्ष काढणे थोडे चुकीचे वाटते.

प्रदीप साळुंखे's picture

25 Jan 2016 - 8:30 pm | प्रदीप साळुंखे

सामुहीक बलात्कार यातले आरोपी पाहीलेत तर एक जात सगळे झोपडपटटीत राहणारे आहेत.निर्भया प्रकरण, शक्तीमील गॅंगरेपमधले आरोपी आजुबाजुच्या झोपडपट्टीतलेच होते.

विषयाशी संबंधित नाही,
पूर्णपणे बरोबरही नाही,
पण पूर्णपणे चुकीचे आहे असेही नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2016 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

काकासाहेब तुमचा हा प्रतिसाद उपरोधिक असावा. इतरत्र तो शोभला असता तरी इथे तो तितकासा ठीक नाही असे वाटते. कारण त्याने इतकी चांगली चाललेली चर्चा भरकटण्याचाच जास्त संभव आहे. असो.

जर हा प्रतिसाद उपरोधिक नसेल तर मात्र, नक्कीच तुमचा गैरसमज झाला आहे. गंभीर विषयासंबंधी अशी एकांगी विधाने करण्याने त्या विधानांचे व विधान करणार्‍याचे वजन कमी होते. असो.

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 8:12 pm | संदीप डांगे

सहमत.

संपादकांना विनंती की जमल्यास ही अवांतर चर्चा पूर्णपणे काढून टाकावी.

जव्हेरगंज's picture

25 Jan 2016 - 9:53 pm | जव्हेरगंज

+1

प्राची अश्विनी's picture

25 Jan 2016 - 8:41 pm | प्राची अश्विनी

@ काकासाहेब केंजळे ,
तुम्ही माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला आहे. तुमच्या मताशी पूर्णपणे असहमत.
"बहुतांशी बलात्कारी हे झोपडपट्टीत राहणारे ,लो इन्कम ग्रुपमधलेच असतात.एक तर व्यसनी अस्तात ,त्यात लहानपणापासून वाईट संगतीत असतात.'
९८% रिपोर्टेड बलात्काराच्या केसेसमध्ये माहितीतील लोकांनी गुन्हा केला आहे.
बाकी तुमच्या मतांवर न बोलणेच जास्त योग्य.

चलत मुसाफिर's picture

25 Jan 2016 - 10:02 pm | चलत मुसाफिर

हा प्रतिसाद म्हणजे विनोदनिर्मितीसाठी केलेला खवचटपणा असेल तर ठीक आहे. नाहीतर मात्र संतापजनक आहे.

बोका-ए-आझम's picture

25 Jan 2016 - 11:47 pm | बोका-ए-आझम

गुन्हा हा गुन्हा असतो. तो करणाऱ्याने का केला हे महत्त्वाचं. तो कशा परिस्थितीतून आलाय आणि त्याच्या आजूबाजूला काय वातावरण आहे हे मुद्दे निर्णायक नसतात. सगळेच लो इन्कम ग्रुपमधले आणि व्यसनी लोक बलात्कार किंवा तत्सम गुन्हे करत नाहीत. असं सरसकटीकरण करुन तुम्ही गरिबीत राहूनही कुठल्याही प्रकारचा गुन्हा न करता आयुष्य जगणाऱ्या लोकांचा अपमान करताय असं तुम्हाला वाटत नाही का?

सूड's picture

25 Jan 2016 - 7:22 pm | सूड

विशेषत; low income group. त्यामुळे स्त्रियाना छेडछाड, बलात्कार वगैरे गोष्टीं वाढल्यात का? ( यात बलात्कार , छेडछाड फक्त असेच लोक करतात असे म्हणायचे मुळीच नाही .)

बाई/मुलगी कार्ड स्वाईप करुन आत शिरली की डेस्कपर्यंत जाईस्तवर तिला नखशिखान्त 'स्कॅन' करणारा एक टीम लीडर होता. सो इन्कम ग्रूपशी काही घेणं देणं नसतं.

प्रत्येक हेट्रोसेक्शुअल अ‍ॅट्रॅक्शन असणारा पुरुष (घरी भोळा सांब बनत असला तरी) जरा बरी बाई दिसली की वळून बघतो'च'!! त्यामुळे लोकांवर ताशेरे मारताना आपल्या सौभाग्याचे धनी पण हेच करत असतात हे बायका सपशेल विसरतात. दृष्टीआड असली म्हणून ती सृष्टी अस्तित्वातच नसते असं नाही.

प्राची अश्विनी's picture

25 Jan 2016 - 8:58 pm | प्राची अश्विनी

@ सूड,
अशा गुन्ह्यांचं सामान्य वर्गीकरंण करायचं झालं तर हे तीन ठिकाणी होतात.
१ घरात ( बर्‍याचदा ऑळखीच्या व्यक्ती, नातेवाइकाकडून)- एकूण रिपोर्टेड केसेसच्या ९८%
२ कामाच्या जागी ( तरुण तेजपाल, ई. )
३ सार्वजनिक ठिकाणी ( निर्भया केस)
या प्रत्येक ठिकाणच्या गुन्हेगाराचं सोशिओइकॉनाँमिक स्टेटस वेगवेगळे असते.
जेव्हा मी low income groupम्हट्ले त्यात सार्वजनिक ठिकाणचे गुन्हे म्हणायचे आहेत.

"प्रत्येक हेट्रोसेक्शुअल अ‍ॅट्रॅक्शन असणारा पुरुष (घरी भोळा सांब बनत असला तरी) जरा बरी बाई दिसली की वळून बघतो'च'!! त्यामुळे लोकांवर ताशेरे मारताना आपल्या सौभाग्याचे धनी पण हेच करत असतात हे बायका सपशेल विसरतात. दृष्टीआड असली म्हणून ती सृष्टी अस्तित्वातच नसते असं नाही."

बहुतांश पुरुष दिसलेल्या स्त्रीला आपल्या कल्पनेत आणून बघतात हे सत्य आहे. कुणी उघड्पणे स्कॅन करत किंवा कुणी मनातल्यां मनात. पण हे आणि छेड्छाड यात फरक नाही का? हे म्हणजे "पॉर्न बघणारा माणूस बलात्करी असतो" असं मानण्यासारखं आहे.

सुबोध खरे's picture

26 Jan 2016 - 12:08 am | सुबोध खरे

प्रत्येक पुरुष( वय १५ ते ७५ ) बाजूने जाणार्या चांगल्या रूपाच्या किंवा पोषाखाच्या स्त्रीकडे एकदा तरी बघतोच. पण ते बघणे केवळ वासनेने भरलेले नसते. तर पुरुषाचा मेंदू तसाच काम करतो. स्त्रीकडे पाहून मेंदू त्याचे विश्लेषण करतो आणि त्याप्रमाणे मेंदूची पुढची प्रतिक्रिया असते.उदा . मुलगी लहान असेल तर तो तिला आपल्या मुलीकडे पाहतो तशा नजरेने पाहिल.
काही माणसे मात्र नतद्रष्ट आणि वासनेने भरलेल्याच नजरेने कोणत्याही वयाच्या स्त्रीकडे पाहतात. म्हणून प्रत्येक पुरुष स्त्रीकडे लाल्सेनेच पाहतो हे म्हणणे चुकीचे ठरेल.
सर्व स्त्रियांनी आपला नवरा इतर स्त्रियांकडे पाहतो म्हणून लगेच त्याच्या हेतूंबद्दल शंका घेऊ नये. जेंव्हा तो इतर स्त्रियांकडे पाहणे सोडेल तेंव्हा तो तुमच्याकडे सुद्धा पाहणे सोडून देईल. यालाच विरक्ती म्हणतात.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2016 - 2:18 am | प्रभाकर पेठकर

१०० टक्के सहमत.
कित्येकदा सौंदर्यवतीचे सौंदर्य वाखाणण्याच्या हेतुनेही पाहिले जाते. तिथे वासनेला स्थान नसते.
प्रत्येक पुरुष वासनेने लिप्त नसतो.

चौकटराजा's picture

26 Jan 2016 - 2:37 pm | चौकटराजा

माझ्या ओफीसात माझ्या शेजारीच एक सुन्दर मुलगी काम करीत असे. मी तिच्याशी बर्‍यापैकी मनमोक॑ळे पणे उघड होत असे. आमचा ओफीसात एखादी तिशीवरची स्त्री आली तर मी या मुलीकडे प्रतिक्रिया देत असे. एकदा तिने मला विचारले " तुम्हाला सगळ्या आन्ट्या कशा आवडतात दिसण्यात ? आमच्या पैकी तुम्ही कुणाला सुन्दर आहेस हे म्हटल्याचे दिसत नाही. तेम्व्हा मी दिलेले उत्तर असे " त्याना तरी मी कुठे म्हटलेय की तुम्ही सुदर आहात म्हणून नम्बर दोन तुम्हाला पाहिले तर मी तुम्ही मुली आहात बाया नाही या रितीने पहातो. व जर म्हटले की सुन्दर आहात तर आपल्या वयातील अन्तराने त्या पावती पेक्षा पोलीसान्च्या दंडाची पावती नशीबाला येईल की काय असे भय असतेच ! "

हे झाले अवांतर . मी पत्नीशी इतके मोकळे नाते ठेवून आहे की नात्यातील सर्व स्त्रीयांचे दिसण्याविषयीची आवड नावड मी खुलेपणाने तिच्याकडे व्हक्त करू शकतो. लोकशाही आहे आमचा इथे. पण आज ५० वर्शात थेटपणे तू सुंदर आहेस किंवा तुम्ही सुन्दर आहात असे कोणाला म्हटल्याचे स्मरत नाही.( बायको त्यात आलीच )

"पॉर्न बघणारा माणूस बलात्करी असतो" असं मानण्यासारखं आहे.

तुमच्या आधीच्या प्रतिसादातून तसंच ध्वनित होतंय म्हणून लिहावं लागलं. वरचं जे काही वर्गीकरण दिलयंत, ते आधीचा उथळ प्रतिसाद द्यायच्या आधी लक्षात आलं असतं तर फार बरं झालं असतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jan 2016 - 7:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता गंमत वाटेल कारण या विषयावर बरंच संशोधनही झालं आहे. पण एकेकाळी, दुसऱ्या पिढीतल्या, कडेलोट* अमेरिकन स्त्रीवादी स्त्रिया म्हणत असत - पॉर्न या सिद्धांताची बलात्कार ही सिद्धता आहे. Porn is the theory, rape is the practice. रॉबिन मॉर्गन या बाईचं हे विधान होतं, कॅथरीन मककिनॉन, आंद्रेया ड्व्रॉर्किन अशा काही प्रसिद्ध (कडेलोट) स्त्रीवाद्यांना हे विधान खरं वाटत असे.

*कडवा शब्दही थोडा गोड वाटावा म्हणून कडेलोट

मृगनयनी's picture

25 Jan 2016 - 10:35 pm | मृगनयनी

सुबोध'जी... अतिशय सुन्दर आणि महत्वपूर्ण लेख!!!... अत्यंत वास्तववादी निरीक्षण!!!... आवडला! :)

सुबोध खरे's picture

25 Jan 2016 - 11:52 pm | सुबोध खरे

पॉर्न बघण्यामुळे बलात्कारात किंवा छेड छाड मध्ये वाढ होते हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा अद्याप तरी मिळालेला नाही. पोर्न पाहून उलट माणसे हस्तमैथुन करून "शांत" होतात
या उलट सिनेमात अर्ध वस्त्रांकित नट्या पाहून सेक्स पासून लांब असलेल्या अशा तरुणांच्या भावना जास्त चाळवल्या जातात आणि त्यातून हे तरुण असे गुन्हे करायला उदयूक्त होतात. शिवाय सिनेमातील नायकांची /खलनायकांची रांगडी भाषा अशा तरुणांना जास्त भावणारी असते असते.

माहितगार's picture

27 Jan 2016 - 2:34 pm | माहितगार

मुंबई मध्ये भारतभरातून तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी येतो . त्यात अशिक्षित , अविवाहित किंवा ज्यांचे कुटुंब गावी आहे असे तरुण बरेच असतात . त्यांच्या नैसर्गिक लैंगिक भावना पोर्न बघितल्याने शमतात का? की दिवसभर कुठल्याही वेळी अत्यंत सहजपणे पोर्न उपलब्ध असल्याने अधिक उद्दीपित होऊन अपुऱ्या राहतात?

या तर्कात एक बाजू लक्षात घेतलेली नाही कि आधूनिक माध्यमे उपलब्ध नसली तरीही परंपरागत माध्यमातूनही कामुक साहित्याची निर्मिती होते, इतरवेळी सर्वसामान्य वस्तु अथवा क्रियांचा अनपेक्षीत पणे कामुक विचारांशी संबंध लावला जाऊ शकतो, अगदी अमूर्ततेत इतर मूर्त रुपही शोधता येते तसे कामुकता अमूर्ततेतही शोधता येऊ शकते. एकुण कोणत्याही वस्तु अथवा सर्व कामुक साहित्य उपलब्ध नसले तरीही कामुकतेची भावना निर्माण होऊ शकते, कामुकतेची भावना पॉर्न डिपेंडंट नसावी.

या तर्कात अजून एक बाजू लक्षात घेतलेली नाही कि उद्दीपित झालेल्या नैसर्गिक लैंगिक भावनांच्या शमनासाठी मानवाकडे -स्त्री असो अथवा पुरुष- हस्तमैथूनाचे साधन आहे जे बर्‍यापैकी प्रभावीपणे वापरात असते.

आधूनिक माध्यमांतून पॉर्नची उपलब्धता सहज होऊ शकते, ज्या प्रमाणात आधूनिक साधनांनी पॉर्नची उपलब्धता वाढली त्या प्रमाणात क्राईम वाढला असता तर या नववर्षाच्या रात्री जर्मनीत जी स्थिती होती ती सर्वत्र सातत्याने राहिली असती तसेही होताना दिसत नाही.

तरीही पॉर्नने शरीराचे ऑब्जेक्टीफिकेशन होते का ? आणि सुख हे ओरबाडून मिळवण्याची वस्तु आहे अशा मिथकाची निर्मिती बाजारू पॉर्न मधून होत असेल तर बेसिकली तो पॉर्नद्वारे लैंगिक गोष्टी दाखवताना सुयोग्य लैंगिक दृष्टिकोणाची निर्मिती होत नाही हा क्वालिटीचा प्रश्न झाला त्यामुळे सुयोग्य लैंगिक दृष्टिकोणाची निर्मितीस साहाय्यभूत पॉर्नची उपलब्धता सहज ठेऊन गैर दृष्टीकोण निर्माणकरणारे पॉर्न मागे टाकले जाण्यासाठी काही मार्ग उपलब्ध झाल्यास बरे पडेल का ? आणि त्यासाठी काही मार्ग असू शकतो का ? हा प्रश्न अधिक महत्वाचा असावा असे वाटते.

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 3:06 pm | संदीप डांगे

प्रतिसाद आवडला. अगदी मुद्द्याचे प्रश्न आहेत.

खूप वर्षांआधी ओशोच्या एका वाक्याने मला फार विचारात पाडले होते. ते म्हणजे असे की "कागदावर दिसणार्‍या रंगरेषांमधून जर कामभावना उत्पन्न होत असेल तर ती तिथे कागदावरच्या रेषांमधे आहे काय?"

कामभावना ही मनात आहे. बाह्य वस्तू ट्रीगर आहेत. त्यात शब्द, रेषा, देह हे काहीही कारण पुरते. ज्याच्या मानेवर तलवार ठेवली आहे, कुठल्याही क्षणी जीव जाईल तेव्हा ह्यापैकी कोणतीही वस्तू त्याची कामभावना उद्दिपित करणार नाही. असो, हे सगळे विचार फिलॉसॉफिकल आहेत. या धाग्यावर ते संयुक्तिक वाटणार नाहीत. पण तुमच्या प्रश्नांच्या गाभ्यात ह्या विचारांचा प्रतिध्वनि आहे असे वाटते.

प्राची अश्विनी's picture

28 Jan 2016 - 9:39 am | प्राची अश्विनी

@ सूड,
तुमच्या बुद्धीला जर प्रतिसाद कळला नसेल तर तो उथळ? असो.
@मारवाजी,
काही महिन्यापूर्वीची एक घटना . कित्येक वर्ष नियमाने येणारा इस्त्रीवाला भैय्या मध्ये काही दिवस आला नाही . चौकशी केल्यावर कळले की पोलिसांचे लफडे झाले . घडले ते असे. एका इस्त्रीवाल्याकडे सुमारे १० ते १५ मुले असतात . १२, १३ वयापासून २० २२ वर्षाची . हे सर्व एका खोलीत राहतात .बऱ्याचदा एक वयस्कर आजी सगळ्यांचा स्वयंपाक करते . प्रत्येक मुलाला मिळालेल्या पैशाचे तीन भाग होतात . एक घरी पाठवला जातो, एक मुख्य इस्त्रीवाल्याला राहण्या जेवणाचा खर्च म्हणून दिला जातो आणि उरलेला स्वत:साठी . साधारणत: महिन्याला १०००० पर्यंत एवढे उत्पन्न असते. प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतोच . अशाच एका मुलाला ट्रेन मध्ये धक्काबुक्की करताना पोलिसांनी पकडलं होतं .
"क्या करे म्याडम ,हम भी ऐसेही राहते थे लेकिन आजकाल के लडके पुरा दिन मोबाईल देखते रहते है , फिर रहा नाही जाता , हफ्ते में एकबार छुट्टी लेके लोकल ट्रेन, स्टेशन में होके आते है .वो भी क्या करेंगे " गर्दीच्या ठिकाणी छेडछाड करताना असाच एक मुलगा पकडला गेला .
माझ्या अनुभवत फक्त इस्त्रीवालेच नाही तर गाडी पुसणारी मुले देखील अशी राहतात. (इतर अनेक व्यवसायही असतील .)
शाळेत कॉलेजात जाणाऱ्या मुलामुलीना मित्र मैत्रिणी असतात . या वयात अत्यंत नैसर्गिक अशी opposite sex च्या व्यक्तीच्या सहवासाचे आकर्षण थोडाफार मैत्रीतून पूर्ण होते .
पण या मुलांनी काय करावे? किवा ते काय करतात?
"मुंबई मध्ये भारतभरातून तरुण वर्ग नोकरी धंद्यासाठी येतो . त्यात अशिक्षित , अविवाहित किंवा ज्यांचे कुटुंब गावी आहे असे तरुण बरेच असतात . त्यांच्या नैसर्गिक लैंगिक भावना पोर्न बघितल्याने क्षमतात का? की दिवसभर कुठल्याही वेळी अत्यंत सहजपणे पोर्न उपलब्ध असल्याने अधिक उद्दीपित होऊन अपुऱ्या राहतात? विशेषत; low income group. त्यामुळे स्त्रियाना छेडछाड, बलात्कार वगैरे गोष्टीं वाढल्यात का?" याचा अभ्यास होणे गरजेचे आहे .
आणि म्हणूनच अदिती ताईने केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणेच अशा प्रकारच्या सर्वेक्षणात सोशिओइकोनोमिकॅल घटकांचा अंतर्भाव असावा .
--

प्रतिक कुलकर्णी's picture

25 Jan 2016 - 4:53 pm | प्रतिक कुलकर्णी

त्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर माणसाने लिहिले असल्याने विश्वासार्ह वाटले :)

वैद्यकीय दृशिकोनासोबत भारतीय कायदा पोर्न बाबद काय म्हणतो ते जाणून घेण्यास आवडेल.

विवेक ठाकूर's picture

25 Jan 2016 - 5:07 pm | विवेक ठाकूर

वंध्यत्वावर तुम्हीही काम केलं आहे आणि मी देखिल काम केलं आहे. तुमचे अनुभव पेशंटचे आहेत, माझा अनुभव वैयक्तिक आहे. इथे विस्तारानं लिहीणं धोरणात बसणार नाही म्हणून संक्षेपात लिहीतो. लग्नाला चार वर्ष होऊन, वंध्यत्त्वावरचे सगळे उपाय थकल्यावर (खरं तर त्यासाठी होणारा अफाट खर्च आणि तिची ओढाताण यांना कंटाळून), असे सर्व उपचार पूर्णपणे बंद करून, केवळ पारस्पारिक अनुबंधावरच्या कमालीच्या विश्वासामुळे आम्हाला मुलगा झाला आहे. इतकंच नाही तर तो शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे सक्षम आणि देखणा आहे. या शिवाय तिची इंडोक्राइन सिस्टम, जी मेडिकली मॉनिटर करावी लागे, ती कोणत्याही औषधाविना पूर्णपणे सक्रिय झाली आहे.

तस्मात, स्त्री देह, त्याची कार्यप्रणाली, इंडोक्राइन सिस्टम, स्त्रीची मानसिकता, तिचं भावविश्व, तिची जननाकांक्षा, प्रणयाचे सर्व पैलू यावर, एका स्त्रीसाठी का होईना, गहन आभ्यास केला आहे. या सर्व आभ्यसाचा निष्कर्ष असा की पारस्पारिक अनुबंध असेल तर वंध्यत्वासारखा गहन प्रश्न असो की रोजच्या जगण्यातले मतभेद असोत, सर्व प्रश्न सुटू शकतात.

याही पुढे जाऊन मला असं वाटतं की, जर एक पुरुष स्त्रीला तिच्या गहन प्रश्नातून सोडवणूक मिळवून देऊ शकतो तर, त्याचा कॉनवर्स म्हणून, पुरुषावर संपूर्णपणे फिदा असलेली स्त्री, पुरुषाचे सगळे न्यूनत्त्व देखिल दूर करु शकते, कारण स्त्रीची प्रणय शक्ती अफाट आहे.

त्यामुळे तुम्ही म्हटलंय :

पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.

तसं नाही... जर युगुलात अनुबंध असेल तर त्यांचा प्रणय ही कायम रंगणारी मैफिल आहे. त्यासाठी कोणत्याही उस्तादगीची गरज नाही. एकमेकांप्रती वाटणारी कृतज्ञता आणि एकमेकांना सुख देण्याचा भाव ही परिमाणं प्रणयाचा रंग गहिरा करतात.

तर साधा मुद्दा असाये की, जिथे काहीही प्रश्न नाही तिथे प्रणय निसर्गतःच उत्कट असायला हवा आणि पॉर्नची गरज नाही. तुम्ही दिलेल्या उदाहरणात, स्टार्ट-अप म्हणून ती गरज असेल हे मान्य आहे पण कंटीन्यूटीसाठी, एकमेकांच्या सहवासाची ओढ आणि त्या उबेत रमण्याची मजा नसेल तर मग प्रणय जनना पलिकडे निरर्थक आहे. आणि अशा निरर्थक प्रणयावर काय लिहीणार? तिथे पॉर्नचे सायकॉलॉजिकल प्रॉप्स जितका काळ काम करतील तितका करु देत .

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2016 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

ठाकूर साहेब,

तुमचे म्हणणे तुमच्या वैयक्तिक बाबतीत सत्य व योग्य असेल, नाही असे नाही.

मात्र, तुमच्या इथल्या आणि मिपावरील इतर प्रतिसाद लेखनावरून असेच दिसते की तुमच्या इतकी मानसिक, वैचारीक, अध्यात्मिक, इ ताकद सर्वसामान्य माणसात असणे शक्य नसते. तेव्हा केवळ शास्त्रिय शब्दांत म्हणायचे झाले तर...

तुमचे अनुभव उत्तम आणि प्रशंसनिय असले तरी ते शास्त्रियदृष्ट्या "अपवादात्मक (आऊटलायर)" आहेत व त्यांची उंची सर्वसामान्य माणसाला गाठणे शक्य होत नाही. अर्थातच, सर्वसामान्य लोकांच्या आचार-विचार-उपचार संबंधांत असे अनुभव उपयोगी ठरण्याची शक्यता फार कमी असते.

सर्वसामान्य माणसांच्या संबंधांत, सर्वसामान्य माणसांच्या मनोवस्थेचा विचार करून, आचार-विचार-उपचार संबंधी सल्ला दिल्यासच तो उपयोगी ठरेल. या लेखात डॉक्टरसाहेबांचा आणि प्रतिसादांत बहुतेक सर्वांचा हाच प्रयत्न चालू आहे.

विवेक ठाकूर's picture

25 Jan 2016 - 11:14 pm | विवेक ठाकूर

मी सामान्य व्यक्ती असून सामान्यांना उपयोगी तेच लिहीतो आहे. त्यात आध्यात्मिक परिमाण तर अजून आणलेलं देखिल नाही, ते आणलं तर प्रतिसाद अजून गहिरे होतील. तुम्ही म्हटलंय :

तुमचे अनुभव उत्तम आणि प्रशंसनिय असले तरी ते शास्त्रियदृष्ट्या "अपवादात्मक (आऊटलायर)" आहेत व त्यांची उंची सर्वसामान्य माणसाला गाठणे शक्य होत नाही. अर्थातच, सर्वसामान्य लोकांच्या आचार-विचार-उपचार संबंधांत असे अनुभव उपयोगी ठरण्याची शक्यता फार कमी असते.

परस्परात प्रेम असणं यात अपवादात्मक असं काय आहे? आणि प्रेम नसेल तर त्या व्यक्तीचा सहवास प्रिय कसा वाटेल? मग कोणताही पॉर्न पाहून व्यक्ती कितीही बेभान झाली तरी जिच्याशी संग करायचा ती व्यक्तीच मान्य नसेल तर त्या प्रणयातून सुख कसं आणि कुणाला मिळेल? तस्मात, फँटसीला काय अर्थ आहे?

सामान्य माणूसच स्वतःच्या पत्नी समवेत आयुष्य जगत असतो. दोघं एकमेकांच्या संगतीनंच तर संगोपन, अर्थार्जन, भोजन, ते पार हॉस्पिटलायजेशन, आप्तांचे मृत्यू असे जगण्यातले बरे वाईट अनुभव, शेअर करत असतात. जर विवाहितांना आपल्या साथिदाराचा सहवास प्रिय असेल तर उत्तेजना स्वाभाविक आहे. आणि अत्यंत सरळ सांगायचं तर स्पर्श ही पॉर्नपेक्षा कैक पटीनं प्रभावी उत्तेजना आहे. जर पत्नीच्या स्पर्शानं पती उत्तेजित होऊ शकला नाही तर पॉर्न हे केवळ काल्पनिक उत्तेजक आहे, त्याचा टिकाव फार वेळ राहात देखिल नाही, मग अशा पॉर्नचा उपयोग काय? आणि जो पती आपल्या पत्नीला उत्तेजित करु शकत नाही त्याची पत्नी त्याला काय प्रणय सुख देणार?

सर्वसामान्य माणसांच्या संबंधांत, सर्वसामान्य माणसांच्या मनोवस्थेचा विचार करून, आचार-विचार-उपचार संबंधी सल्ला दिल्यासच तो उपयोगी ठरेल. या लेखात डॉक्टरसाहेबांचा आणि प्रतिसादांत बहुतेक सर्वांचा हाच प्रयत्न चालू आहे.

बहुदा आपण काल्पनिक परिस्थितीचा विचार करतो आहोत असं प्रतिसादांवरून आणि लेखातून दिसतंय. कुणीही स्वतःला केंद्रस्थानी ठेवून, पॉर्नची प्रणयातली आवश्यकता याविषयी लिहीतांना दिसत नाही. संदीपनं म्हटलंय त्याप्रमाणे `पॉर्नचा स्टँड अलोन उपयोग आहे किंवा नाही' याविषयी लेखात किंवा प्रतिसादात चर्चा दिसत नाही. तशी चर्चा झाली तर पॉर्नपेक्षा प्रेम ही प्रत्यक्ष आणि कमालीची उत्कट उत्तेजना आहे हे उघड दिसेल. आणि मुद्दा तर इतका सरळ आहे की स्पर्श हाच प्रणयाचा आत्मा आहे. पॉर्न हा विज्युअल स्टार्ट-अप असेलही पण जर स्पर्श सुखाचा भाग वेगळा केला तर प्रणय उथळ आणि अर्थशून्य होईल. तस्मात, वैवाहिकात अनुबंध नसेल तर स्पर्शसुखापासून व्यक्ती कायम वंचित राहातील आणि म्हणून पॉर्न एका मर्यादेपलिकडे निरुपयोगी आहे.

आता या प्रतिसादात मी काय असामान्य लिहलंय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2016 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे

साहेब,

आपण बहुतेक सर्वजण, बहुतेक सर्व त्याच गोष्टी, करतो... पण प्रत्येकाची त्या गोष्टी समजण्याची आणि अनुभवण्याची तीव्रता वेगवेगळी असते.

तुमची आकलन व भावनिक तीव्रता सर्वसामान्य माणसाच्या तीव्रतेपेक्षा खूपच अत्युच्य स्तरावर आहे असे तुमच्या लेखनातून तरी स्पष्ट दिसते. त्यात वाईट काहीच नाही, किंबहुना त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य माणसांना न कळणार्‍या अनेक आनंदांची अनुभूती येते असे तुमच्या लेखनातून सतत जाणवते. (केवळ मिपाचा एक जुना सदस्यच तुमच्या तीव्रतेच्या जवळपास येत होता.)

याच तीव्र वेगळेपणाने (आउटलायर क्वालिटी) तर सर्व काही फरक पडतो. तुमचे विचार व अनुभव तुमच्यासाठी १००% खात्रीचे असले तरी ते इतरांना सहजतेने पटत नाहीत याचे हेच कारण आहे. दोष तुमचा नाही, दोष मानवातील विविधतेचा व त्यातल्या तीव्र वेगळेपणाचा आहे. असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे.

विवेक ठाकूर's picture

26 Jan 2016 - 6:54 am | विवेक ठाकूर

तुमची आकलन व भावनिक तीव्रता सर्वसामान्य माणसाच्या तीव्रतेपेक्षा खूपच अत्युच्य स्तरावर आहे असे तुमच्या लेखनातून तरी स्पष्ट दिसते. त्यात वाईट काहीच नाही, किंबहुना त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य माणसांना न कळणार्‍या अनेक आनंदांची अनुभूती येते असे तुमच्या लेखनातून सतत जाणवते.

स्वतःच्या पत्नीबरोबर दळण आणायला जाणं, भाजी निवडणं, तिच्यासाठी साडी, ड्रेस किंवा जिन्स आणि टॉप खरेदी करणं, वेळ आली तर तिच्याशी तोल सोडून भांडणं आणि मग निर्माण झालेल्या दुराव्यावर, साधंसं कारण काढून, पुन्हा जवळीक साधणं.....या गोष्टींसाठी कुठे आकलन किंवा भावनेची तीव्रता लागते? जस्ट अ‍ॅन अंडरस्टँडींग, दॅट शी इज योर्स. ती आपली आहे इतकी साधी आपुलकी असली की झालं.

आणि जाणीव ही परस्पर-संवादी आहे, तुम्ही तिला आपली मानली की ती तुम्हाला प्रतिसाद देतेच.

लोक दगडाला देव मानतात, सकाळी उठून, शुचिर्भूत होऊन, त्याची भक्तीभावानं पूजा करु, त्यासाठी उपास-तापास काय, कमालीची पायपीट असणार्‍या दुर्गम तिर्थयात्रा काय, निर्बुद्ध नवस बोलून त्याची फेड काय, तासंतास रांगेत उभं राहून दानाची खैरात काय....काय वाट्टेल ते करतात. आणि आपल्या स्वतःच्या पत्नीला आपली मानणं तुम्हाला असामान्य वाटतं? एक साधीशी गोष्ट जी दोघांचं संपूर्ण जीवन बदलते, तिला तुम्ही `आउटलायर क्वालिटी' म्हणता ?

आपल्या पत्नीवर प्रेम करणं ही मला तरी, आकलन आणि अनुभुतीची अत्यंत प्राथमिक पातळी वाटते.

आणि सुबोधजींच्या सुद्धा या वाक्यांचं आश्चर्य वाटतं :

बाकी आपली बरीच वाक्ये हि आदर्शवादी आहेत. सगळ्यांची लग्ने अनुरूप व्यक्तीशीच होत नाहीत. तेंव्हा आहे त्या जोडीदाराबरोबर संसार करणे आवश्यक असते. आपले सर्व विचार जुळत नाहीत पण म्हणून कुणी काडीमोड घेत नाही. तेंव्हा दोन व्यक्तींमध्ये एकरूपता झाली तर हा "तर"च महत्त्वाचा ठरतो.
कमी पगाराच्या माणसाला आणि कमी सुंदर दिसणाऱ्या मुलीला बर्याच तडजोडी कराव्या लागतात बरेच वेळेस आईबाप ठरवतील त्या जोडीदाराबरोबरच संसार करावा लागतो अशा परिस्थितीत आपण म्हणता तसे सर्वाना एकरूप होणे सोपे नाही / शक्य नाही. नि हि परिस्थिती बर्याच वेळेस असते अपवादात्मक स्थितीत नाही

जी तुमच्या बरोबर आज आणि आत्ता आहे ती तुम्हाला अनुरुप वाटत नसेल तर कोणतीही स्त्री कधीही अनुरुप वाटू शकणार नाही. कारण तुम्ही आज शोधलेली अनुरुप, कालपरत्वे तुम्हाला विजोड वाटायला लागणार. अशी `अनुरुप' मिळत असती तर हृतिक रोशन, आमीर खान, सैफ अली खान....आणि कोण कोण, असल्या देखण्या आणि कमालीच्या ऐश्वर्यात जगणार्‍यांना डिवोर्स कशाला घ्यावे लागले असते?

सुबोधजी, अनुरुप पत्नी कुणालाही आणि कधीही मिळत नाही. तुमच्या पाहाण्यात असं कुणी जोडपं असेल तर त्यांनी फक्त एकमेकांना अ‍ॅक्सेप्ट केलंय इतकाच त्याचा अर्थ आहे. दोन भिन्न व्यक्ती चोविस तास एकत्र राहाणार म्हटल्यावर प्रत्येक मतभेद उफाळून येणारच. तस्मात, प्रश्न अनुरुपतेचा नाही, प्रेमाचा आहे. एकदा तुम्ही परस्परांना अत्यंत प्रामाणिकपणे आपलं मानलं की अनुरुपता आपसूक येते. मग तुमची पत्नीच तुमची आई, मुलगी आणि मैत्रिण होते आणि तुम्ही तिच्यासाठी पिता, पुत्र आणि प्रियकर होता.

लोक कल्पनाविलास करतात आणि त्यापुढे त्यांना वास्तविक फिकं वाटायला लागतं...पण जगायला आणि उपभोगायला नेहमी वास्तविकच उपलब्ध असतं ही एक गोष्ट लक्षात आली तर सगळे प्रश्न सुटतात. कुठल्याही फँटसीची आणि पॉर्नची गरज उरत नाही. तिचा सहवास तुमच्यासाठी उत्तेजक ठरतो आणि तुमचं प्रेम तिला संपूर्ण मोकळी व्हायला उद्युक्त करतं. आणि मग सनी लिओन काय देईल असा रिस्पॉन्स तुमची पत्नी तुम्हाला देते.

फार साधी आणि एका अत्यंत सामान्य माणसानं तुम्हाला सांगितलेली एवढी एक गोष्ट करुन पाहा. कुणीही आणि कशीही असो, तुम्ही तिला पत्नी म्हणून घरी आणलीये, तिला मनापासून आपली म्हणा मग ती तुमच्याशी अनुरुप झाली नाही तर मी काहीही हारायला तयार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2016 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

महत्वाचे : जीवनातली उत्त्तम तत्वे मलाही खूप आवडतात व ती मी शक्य तेवढी आचरणात आणतो. पण, इथे मी किंवा तुम्ही असा विचार नाही तर सर्व समाजाचा विचार चालला आहे आणि समाजातले सर्व लोक मानसिकरित्या एकसमान नसतात हे एक नैसर्गिक सत्य आहे.

तुम्ही आम्ही वैयक्तिकरित्या काय विचार व कृती करतोय यापेक्षा समाजातले बहुतेक लोक काय विचार व कृती करतात यावर समाजजीवन चालते... कोणतीही सामाजिक उपाययोजना करताना हा कळीचा मुद्दा ध्यानात घेतला नाही तर योजलेले उपाय केवळ दिवास्वप्ने ठरतात.

असो. आतापर्यंत आपल्याला एकमेकाची मते कळली आहेत असे मला वाटते. शिवाय, यापेक्षा जास्त विस्तारून मला काही सांगायला येणार नाही. तेव्हा या मुद्द्यावर इथेच थांबूया.

चिगो's picture

28 Jan 2016 - 6:33 pm | चिगो

लोक कल्पनाविलास करतात आणि त्यापुढे त्यांना वास्तविक फिकं वाटायला लागतं...पण जगायला आणि उपभोगायला नेहमी वास्तविकच उपलब्ध असतं ही एक गोष्ट लक्षात आली तर सगळे प्रश्न सुटतात. कुठल्याही फँटसीची आणि पॉर्नची गरज उरत नाही. तिचा सहवास तुमच्यासाठी उत्तेजक ठरतो आणि तुमचं प्रेम तिला संपूर्ण मोकळी व्हायला उद्युक्त करतं. आणि मग सनी लिओन काय देईल असा रिस्पॉन्स तुमची पत्नी तुम्हाला देते.

लाखमोलाचं बोललात, सर.. दंडवत !!

आता पॉर्नबद्दलः

पॉर्नमुळे काहीच्या काही कल्पनाविलासाला लागतात लोक कधीकधी.. आता बायको सनी लिओनी सारखी उन्मादक, वळसेदार हवी असेल, तर नवर्‍यानीपण त्या पॉर्नस्टार्ससारखं अचाट आणि टिकावू असावं, असं बायकोनी म्हटलं तर किती पुरुषांना पटेल? मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यातल्या धबगड्यात, नोकरी-संसार-बाळंतपण-पोरांचे संगोपण ह्यात बायकोला खरंच स्वतःला 'मेंटेन' ठेवणं शक्य आहे का, ह्याचा तरी विचार करावा माणसानी.. अगदी हाच प्रॉब्लम मला लोकांच्या 'सिक्स पॅक ऑब्सेशन'शी आहे. प्रत्येकानी सुदृढ, सुडौल आणि आरोग्यपुर्ण राहण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असलं तरी 'फुल टाईम हृतिकवानी सिक्स पॅक दिसले पाय्जेल' म्हणणं हे 'चोवीसही तास इरेक्शन तसंच पाहीजे' म्हणण्याइत्कचं मुर्खपणाचं आहे.

लेखाबद्दलः
अनुभवसिद्ध लेख पटला. ठाकूरसाहेबांच्या 'लव इज द बेस्ट अ‍ॅफ्रोडेसिअ‍ॅक' ह्या म्हणण्याशी सहमत असलो, तरी जगात आणि समाजात विविध कारणांमुळे पॉर्न आणि त्याची गरज राहणारच, ह्याबद्दल शंभर टक्के सहमत..

संदीप डांगे's picture

25 Jan 2016 - 5:41 pm | संदीप डांगे

वैद्यकिय असली तरी पोर्नची ही एक एकांगी बाजू झाली. विशिष्ट केसस्टडीजमध्ये पोर्नचा कसा उपयोग झाला-होतो ह्याबद्दल आपण लिहिले आहे. आपल्या वैद्यकिय ज्ञान व अनुभवाबद्दल नितांत आदर आहे. पण एखाद्या क्षेत्रातल्या अधिकाराच्या आधारे समाजाच्या सर्व स्तरांना स्पर्श करणार्‍या एखाद्या विस्तृत विषयावर एकाच बाजूने मत व्यक्त होत आहे असे वाटते. स्वयंभू म्हणून पोर्न काय आहे व त्याची सामान्यस्थितीत काय गरज आहे ह्याबद्दल आपला लेख विशेष काही सांगत नाही. विवेक ठाकूरांचे प्रतिसाद आणि आपला लेख दोन्ही विरुद्ध बाजू आहेत. दोन्ही विचार आपआपल्या जागी योग्य आहेत. भूक लागत नाही तेव्हा टॉनिक घेणे वेगळे आणि गरज नसतांना टॉनिक घेणे वेगळे. विवेक ठाकूर, 'गरज नसतांना घेतल्या जाणार्‍या टॉनिकबद्दल व मग त्याच्या लागणार्‍या अनैसर्गिक सवयी' बद्दल बोलत होते असे वाटते.

प्राची अश्विनि यांनी उपस्थित केलेला मुद्दाही एक मोठे क्षेत्र चर्चेसाठी खुले करत आहे.

भारतीय समाजात स्त्री व पुरुष या दोघांनाही संभोगाबद्दल शास्त्रिय माहिती उपलब्ध करून देणे, त्यांच्या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करणे, समुपदेशन करणे हे सरसकट पोर्न दाखवण्यापेक्षा जास्त गरजेचे आहे असे मला वाटते. 'भावना मोकळ्या करण्यासाठी पोर्न' हे रोगापेक्षा इलाज भयंकर असे असू शकते. भारतीय समाजात विवाहपूर्ण संभोग निषिद्ध आहे तर हस्तमैथुनास मान्यता आहे का? लग्न होईपर्यंत मुला-मुलीने पोर्न बघून हस्तमैथुनाद्वारे भावना मोकळ्या कराव्यात असे पालकांना पटेल काय? म्हणजे इथे बरेच पालक असतील त्यांनी याबद्दल भूमिका सांगावी.

संभोगासाठी बायको सनी लियोनच असली पाहिजे वा नवरा जॉन अब्राहमच असला पाहिजे हे जे विचार आहेत हे बाह्य-प्रतिमा संस्करण आहे. तेच चित्रपट-पोर्न-सॉफ्टपोर्न-मासिकांमधून अधिकाधिक समाजात पसरत जात आहे. पडद्यावर दाखवल्या जाणार्‍या दृश्यांमधली उत्कटता ही त्या शरिरांमुळे आहे हे मनावर ठसत जाते. फिगर ३६-२४-३६ नसली तरी प्रणयाची उत्कटता साधता येते. ज्यांना बायको सनी लियोन हवी असेल त्यांना प्रणय-संभोग कळला नाही असे म्हणावे लागेल.

उत्कृष्ट प्रणय-संभोगानुभवामध्ये विरुद्ध-पार्टी कोण आहे हे इमॅजिन करण्याची गरजच पडू नये. शंभर टक्के फोकस्ड, रीलॅक्स्ड शरिरसंबम्ध असावेत. त्यातून येणारा आनंद ड्युरेबल असतो. इमॅजिनेशनचा आनंद तृप्ती देत नाही. फक्त यांत्रिकतेने क्रिया पूर्ण करतो. अशा प्रकारालाच पाट्या टाकणे म्हणतात, पोर्न बघून कोणी उद्दिपित होऊन संभोग करत असेल तर ते पाट्या टाकणेच होय. त्यातून अधिक अस्वस्थता व भुकेलेपण वाढू शकते. खरा आनंद हा शरिरापलिकडचा आहे, शरिर हे माध्यम आहे, साध्य नव्हे. जे शरिरावरच थांबतात त्यांना शाश्वत आनंद मिळत नाही. आणि मग फॅन्टसीजच्या जंजाळात तळमळत राहण्याशिवाय हाती काही लागत नाही.

असो. सहजसोप्या गोष्टींचे त्रांगडे करुन ठेवणे आणि मग उपाय शोधत गावभर फिरणे मनुष्यस्वभाव आहे. त्याला कुठल्याही मेडिसिनमध्ये औषध नसेल.

विवेक ठाकूर's picture

25 Jan 2016 - 6:27 pm | विवेक ठाकूर

स्वयंभू म्हणून पोर्न काय आहे व त्याची सामान्यस्थितीत काय गरज आहे ह्याबद्दल आपला लेख विशेष काही सांगत नाही

करेक्ट.

विवेक ठाकूर, 'गरज नसतांना घेतल्या जाणार्‍या टॉनिकबद्दल व मग त्याच्या लागणार्‍या अनैसर्गिक सवयी' बद्दल बोलत होते असे वाटते.

नाही. एकमेकात प्रेम असेल तर पॉर्नची गरज नाही असं माझं मत आहे. आणि त्याचं कारणही उघड आहे, पॉर्न हा मेंटल स्टार्ट-अप आहे आणि प्रणय ही वास्तविक शारीरिक क्रिया आहे. जर एकमेकांचा सहवास उद्दिपक असेल तर पॉर्न व्यर्थ आहे. बाय द वे, हा आणि या आधीचा धागा वाचून माझं असं मत झालंय की सहवास उद्दिपक वाटत नाही म्हणून पॉर्नची गरज आहे.

भावना मोकळ्या करण्यासाठी पोर्न' हे रोगापेक्षा इलाज भयंकर असे असू शकते

हे बहुदा पॉर्न अ‍ॅडिक्शन नंतर कळत असावं!

ज्यांना बायको सनी लियोन हवी असेल त्यांना प्रणय-संभोग कळला नाही असे म्हणावे लागेल.

एकदम सही. प्रेम हा शरीरापेक्षाही थोर पैलू आहे.

खरा आनंद हा शरिरापलिकडचा आहे, शरिर हे माध्यम आहे, साध्य नव्हे. जे शरिरावरच थांबतात त्यांना शाश्वत आनंद मिळत नाही. आणि मग फॅन्टसीजच्या जंजाळात तळमळत राहण्याशिवाय हाती काही लागत नाही.

क्या बात है! खरा आनंद हा एकमेकाशी एकरुप होण्याचा आहे आणि प्रणय एक बहाणा आहे.

सहजसोप्या गोष्टींचे त्रांगडे करुन ठेवणे आणि मग उपाय शोधत गावभर फिरणे मनुष्यस्वभाव आहे. त्याला कुठल्याही मेडिसिनमध्ये औषध नसेल.

तेही आहेच. पण एखाद्यानं सोपा उपाय सांगितला तर त्यालाच अपवादात्मक ठरवून साध्या गोष्टी क्लिष्ट करुन ठेवण्याची सवय तर पूर्वापार दिसते.

सुबोध खरे's picture

26 Jan 2016 - 12:36 am | सुबोध खरे

डांगे साहेब आणि ठाकूर साहेब
मी कुठेही असे म्हटलेलं नाही कि प्रत्येकाला पॉर्न ची गरज पडतेच. किंबहुना बर्याचशा लोकांना पॉर्नची गरज पडत नाही.
फक्त मी पॉर्नची गरज केंव्हा पडते याचा उहापोह केला आहे.
माझे म्हणणे एवढेच आहे कि आपण म्हणता कि पॉर्नची गरजच नाही हे हि सत्य नाही.शिवाय ज्यांना पॉर्न पहायचे असेल त्यांनी ते पाहावे. त्यात काही गुन्हा आहे असेहि नाही. तसेच हस्तमैथुनातहि काहीही गैर नाही. ब्रम्हचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश म्हणजे मृत्यू यात काहीही तथ्य नाही.
आपण प्रेम आणि पॉर्न यात गल्लत करीत आहात. कोणत्याही माणसाचे असे म्हणणे नसेल कि पॉर्न हे प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे.
तरीही आपली खालील वाक्ये नक्कीच स्तुत्य आहेत
जर युगुलात अनुबंध असेल तर त्यांचा प्रणय ही कायम रंगणारी मैफिल आहे
पॉर्न एका मर्यादेपलिकडे निरुपयोगी आहे.
जे शरिरावरच थांबतात त्यांना शाश्वत आनंद मिळत नाही"

बाकी आपली बरीच वाक्ये हि आदर्शवादी आहेत. सगळ्यांची लग्ने अनुरूप व्यक्तीशीच होत नाहीत. तेंव्हा आहे त्या जोडीदाराबरोबर संसार करणे आवश्यक असते. आपले सर्व विचार जुळत नाहीत पण म्हणून कुणी काडीमोड घेत नाही. तेंव्हा दोन व्यक्तींमध्ये एकरूपता झाली तर हा "तर"च महत्त्वाचा ठरतो.
कमी पगाराच्या माणसाला आणि कमी सुंदर दिसणाऱ्या मुलीला बर्याच तडजोडी कराव्या लागतात बरेच वेळेस आईबाप ठरवतील त्या जोडीदाराबरोबरच संसार करावा लागतो अशा परिस्थितीत आपण म्हणता तसे सर्वाना एकरूप होणे सोपे नाही / शक्य नाही. नि हि परिस्थिती बर्याच वेळेस असते अपवादात्मक स्थितीत नाही.

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 2:54 pm | संदीप डांगे

तुम्हीच मागे एका धाग्यावर ही मानसिकता सांगितली होती की लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने, आहारनियंत्रण वैगेरे कष्ट पडणार्‍या गोष्टी नको असतात. त्यांना एखादी गोळी, औषध, शस्त्रक्रिया हवी असते. परंतु आता ह्या लेखात आपण उलटी बाजू मांडली आहे असे वाटले.

प्रस्तुत लेख आपण ठाकूरांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने लिहिला असे वाटले म्हणून मी प्रतिसाद दिला. झाले असे की सामान्यपणे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आम्ही म्हणतोय व्यायामाची आवश्यकता आहे, शस्त्रक्रिया वा औषधांची नाही. तर तुम्ही ज्या केसेस मधे व्यायाम व तत्सम गोष्टींचा उपयोग नाही, फक्त औषध, शस्त्रक्रियेचीच आवश्यकता आहे त्याच केसेस चे उदाहरण देऊन औषध, शस्त्रक्रियेचे लठठपणाच्या उच्चाटनामधली गरज अधोरेखित करत आहात. इथे फोकस कशावर असावा? साधनांवर की साध्यावर? साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही असे माझे म्हणणे तर पॉर्नची आवश्यकता कुठे आहे हे सांगणारा तुमचा लेख तत्त्वतः दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यात म्हात्रेसर सामान्य जनतेचे जेव्हा उदाहरण देतात तेव्हा जरा गोंधळायला होतं.

डॉक्टरसाहेब, या विशिष्ट विषयाबाबत आपल्या दोघांच्या विचारपद्धतीत मूलभूत फरक आहे. संभोगापासून चिरंतन सुख मिळवण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान भारतीय समाजात फारच दुर्मिळ असल्याने प्रस्तुत समस्या उद्भवतात. तुम्ही सुचवताय ते उपाय वरवरचे, तात्पुरते, लगेच परिणाम देणारे आहेत. माझे वा ठाकूरांचे उपाय चिरंतन सुख देणारे आहेत. संभोगाचा आनंद लुटायलाही थोडे कष्ट आवश्यक आहेतच, पण सामान्य जनतेस इन्स्टंट रेमेडी हवी असते. त्यांना ते हवे म्हणून तेच द्यावे अशी मानसिकता वैद्यकिय क्षेत्रात आहे याबद्दल आश्चर्य वाटले.

इथे आपण "अनुरुप" ह्या शब्दाचा खूपवेळ वापर केला आहे. संभोगाच्या सुखासाठी जोडीदार 'अनुरूप' असायची गरज नाही हेही वारंवार सांगितले. मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात. (संपादित) अगदी सामान्य रंगरुप असणार्‍या स्त्रिया असतात. सततच्या संभोगामुळे त्यांची लैंगिक भावना मेलेली असते. तिथले वातावरण गलिच्छ, ओंगळवाणे असते, त्या स्त्रिया चुंबन टाळतात, थोडक्यात संभोगासाठी त्यांच्या टर्म्स आणि कंडीशन असतात. अशा दिव्य स्थितीमध्येही तिथे जाणार्‍या पुरुषांना कसल्याही बाह्य उद्दिपनाची गरज का पडत नसावी आणि त्यापेक्षा कैक पटीने चांगली परिस्थिती घरात असून ते उद्दिपित का होत नसावे ह्यावर विचार करण्यासारखे आहे.

सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे.

इथे कुणी पॉर्न अ‍ॅडिक्शन चे व्यक्तिगत अनुभव सांगितलेले नाहीत. मला माझे अनुभव सांगायला आवडेल पण परत त्या अनुभवांकडे 'सामान्यांपेक्षा वेगळी अशी विशिष्ट केस" म्हणून बघितले जाणार असेल तर मग उपयोग नाही.

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 3:03 pm | संदीप डांगे

प्रस्तुत प्रतिसाद पुरुषांच्या मानसिकतेतून लिहिला आहे. स्त्रियांचे पोर्नबाबतचे मत त्यांनीच व्यक्त केलेले बरे.

भारतीय विवाहसंस्थेत वडीलधार्‍यांच्या आवडी नुसार जोडीदार मिळत असल्याने स्त्रियांची कुचंबणा होते हे सर्वश्रुत आहे. पण ज्या जोडीदारासोबत संग करायला साधारण परिस्थितीत आवडणार नाही त्याच जोडीदारासोबत पॉर्न पाहून उद्दिपित होऊन संग करायला आवडेल काय ह्या प्रश्नांचे उत्तर मिळाले तर बरे होईल.

साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही असे माझे म्हणणे तर पॉर्नची आवश्यकता कुठे आहे हे सांगणारा तुमचा लेख तत्त्वतः दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यात म्हात्रेसर सामान्य जनतेचे जेव्हा उदाहरण देतात तेव्हा जरा गोंधळायला होतं.

सुहासजींना, सुबोधजी हाताळत असलेल्या केसेस सामान्य वाटायंत. आणि ज्यांना पॉर्नच्या प्रॉपची गरज नाही त्या `असामान्य' वाटतायंत, त्यामुळे तुम्हाला गोंधळायला झालंय! पण तुमच्या या मताशी, 'साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही' मी संपूर्ण सहमत आहे.

तुम्ही सुचवताय ते उपाय वरवरचे, तात्पुरते, लगेच परिणाम देणारे आहेत. माझे वा ठाकूरांचे उपाय चिरंतन सुख देणारे आहेत. संभोगाचा आनंद लुटायलाही थोडे कष्ट आवश्यक आहेतच, पण सामान्य जनतेस इन्स्टंट रेमेडी हवी असते. त्यांना ते हवे म्हणून तेच द्यावे अशी मानसिकता वैद्यकिय क्षेत्रात आहे याबद्दल आश्चर्य वाटले.

वैद्यक काय की मानसशास्त्र काय रुग्णाशी डील करतं, नॉर्मलशी त्यांचा संबंध नाही. त्यांना रुग्णाची सोडवणूक करायची असते म्हणून ते स्टँडर्डायजेशन करुन उपाय शोधतात. त्यामुळे ज्या सामान्य व्यक्तीला, सामान्य परिस्थितीत, नैसर्गिकपणे उपलब्ध असलेलं रतीसुख मिळत असेल, तो वैद्यक किंवा मानशास्त्राकडे जातच नाही. तस्मात, यांच्या सर्व केस स्टडीज अ‍ॅबनॉर्मलवरच बेस्ड असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल आश्चर्य नाही.

इथे आपण "अनुरुप" ह्या शब्दाचा खूपवेळ वापर केला आहे. संभोगाच्या सुखासाठी जोडीदार 'अनुरूप' असायची गरज नाही हेही वारंवार सांगितले. मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात.... अशा दिव्य स्थितीमध्येही तिथे जाणार्‍या पुरुषांना कसल्याही बाह्य उद्दिपनाची गरज का पडत नसावी आणि त्यापेक्षा कैक पटीने चांगली परिस्थिती घरात असून ते उद्दिपित का होत नसावे ह्यावर विचार करण्यासारखे आहे.

हा अत्यंत भारी मुद्दा आहे आणि याचं एकच उत्तर आहे : पत्नीवर प्रेम नाही त्यामुळे तिचा सहवास उत्तेजक वाटत नाही.

सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे.

हा त्याहून ही भारी मुद्दा आहे त्यामुळे खास तुमच्यासाठी लिहीतो. कदाचित, तुम्हाला आयुष्याच्या शेवटापर्यंत उपयोगी पडणारी मेख सापडेल.

आपल्या फ्रस्ट्रेशनच्या बचावासाठी, पारस्पारिक अनुबंध नसलेल्यांनी, हा पद्धतशीरपणे पसरवलेला गैरसमज आहे. मला माझ्या पत्नीचा कधीही कंटाळा येत नाही. याचं कारण मी तिच्याकडे कधीही `पत्नी' म्हणून पाहात नाही. या क्षणात जगण्यासाठी, माझ्याबरोबर असलेली संगीनी म्हणून पाहातो. त्यामुळे माझ्या मनावर नात्याचं ओझं नसतं. ती मला कायम नवी असते. यामुळे मी मानसशात्राच्या कायम बाहेर असतो. माझ्या या अत्रंगी स्वभावला ती सुद्धा सरावलीये, त्यामुळे कधीही आणि कितीही कलह झाले तरी आमच्यापैकी कुणीही निर्लज्जपणे एकमेकांशी पुन्हा जवळीक साधायला हात पुढे करतो. आणि मग दुसराही, तितक्याच सहजतेनं, तो हात हातात घेतो.

इथे कुणी पॉर्न अ‍ॅडिक्शन चे व्यक्तिगत अनुभव सांगितलेले नाहीत. मला माझे अनुभव सांगायला आवडेल पण परत त्या अनुभवांकडे 'सामान्यांपेक्षा वेगळी अशी विशिष्ट केस" म्हणून बघितले जाणार असेल तर मग उपयोग नाही.

तुम्ही बिनधास्त लिहा. मला पत्नीचा सहवास हे एकमेव अ‍ॅडिक्शन आहे पण तुम्ही पॉर्न अ‍ॅडिक्शनमधून स्वतःची सुटका कशी केलीत हे वाचायला जरुर आवडेल. किंवा तुम्हाला सुटका हवी असेल तर तुमच्याशी चर्चा करायला आनंद होईल.

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 6:35 pm | संदीप डांगे

बाकी सर्व ठिक आहे. फक्त...

कदाचित, तुम्हाला आयुष्याच्या शेवटापर्यंत उपयोगी पडणारी मेख सापडेल.
खास तुमच्यासाठी सांगतो, आम्हाला आमची मेख सापडली आहे, ती आयुष्यभर पुरणारी आहेच हे कदाचित माझ्या प्रतिसादांमधून आपणास कळले नसावे. अन्यथा न मागता या पद्धतीने सल्ला आपण दिला नसता. मला तुमचे विचार आवडतात, पटतात, एकच खटकते ते हे की दुसर्‍याला अज्ञानी समजून, स्वत:ला सर्वज्ञानी समजून 'अंधकार दूर करण्याच्या' थाटात अहंकारी सल्ले, उपदेश देणे. तेवढे आपल्याजवळच ठेवावे अशी विनंती. जालावर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे आमच्या स्वभावात नाही, म्हणजे आम्ही ज्ञानी नाही असा कुणाचा समज असेल तर त्याच्याबद्दल किव वाटेल. बाकी आपण सुज्ञ आहात. स्पष्टपणे बोललो, राग मानू नये.

तुम्ही पॉर्न अ‍ॅडिक्शनमधून स्वतःची सुटका कशी केलीत हे वाचायला जरुर आवडेल. किंवा तुम्हाला सुटका हवी असेल तर तुमच्याशी चर्चा करायला आनंद होईल.
आमचे अनुभवविश्व फारच विशाल असल्याने काय काय लिहावे हा प्रश्नच पडतो. आता आम्हाला फक्त मिपाचे अ‍ॅडिक्शन आहे त्यापासून सुटका कशी करावी याबद्दल सतत मिपावर शोधाशोध करत असतो. त्याबद्दल काही मदत होत असेल तर बघा.

विवेक ठाकूर's picture

26 Jan 2016 - 10:36 pm | विवेक ठाकूर

किमान तुम्हाला तरी चर्चेच्या अनुषंगात आलेला हार्दिक सल्ला आणि अहंकारी ज्ञानप्रदर्शन यातला फरक समजत असेल अशी आशा होती. ज्याला मेख सापडली तो प्रश्न विचारत नाही. आणि ज्याला मनापासून प्रश्न विचारायचा आहे त्याला दुसर्‍यानं दिलेलं उत्तर म्हणजे त्याच्या ज्ञानाचं प्रदर्शन वाटत नाही. असा दृष्टीकोन असेल तर चर्चा होऊच शकत नाही. तुम्ही देखिल सूज्ञ आहात तस्मात, उत्तर माहिती असतांना प्रश्न करणे म्हणजे एकतर दांभिकपणा असतो किंवा मग स्वतःबद्दल खात्री नसल्यानं चाचपणी असते.

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 12:00 am | संदीप डांगे

उत्तर माहिती असतांना प्रश्न करणे म्हणजे एकतर दांभिकपणा असतो किंवा मग स्वतःबद्दल खात्री नसल्यानं चाचपणी असते.

मी दिलेले प्रतिसाद नीट वाचावेत अशी विनंती करतो. त्यात कुठेही माझ्या व्यक्तिगत समस्यांबद्दल प्रश्न नाहीत. तसे असतील तर दाखवून द्यावेत.

सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे.
ह्या वाक्यावर आपण मेख सांगताय तो डॉक्टरांच्या लेखाच्या व त्यांच्या अनुभवसंपन्न मताच्या आधारे पुढे आलेला मुद्दा होता. तो माझा वैयक्तिक अनुभव नाही हे माझे इतर प्रतिसाद नीट वाचले असता कळले असते. मला व्यक्तिगत बाबी त्यातही लैंगिक बाजूच्या जाहिररित्या प्रदर्शित करणे आवडत नाही. माझे आणि बायकोचे संबंध किती उत्कृष्ट आहेत हे जगाला सांगण्यात काहीच पॉईण्ट वाटत नाही. कारण त्याचा आम्हा दोघांव्यतिरिक्त कोणाला अनुभव येण्याची शक्यता शून्य आहे. माझी बायको उत्कृष्ट पुरणपोळी करते हे मी जगाला पटवून देऊ शकतो ती प्रत्यक्ष खायला घालून, प्रणयाच्या बाबतीत शक्य नाही ना..!

मी ज्या मुद्द्यांवर इथे प्रतिसाद लिहितोय ते युनिवर्सल मुद्दे आहेत, फक्त व्यक्तिगत अनुभव नाहीत. गेल्या २० वर्षात याबद्दल भरपुर वाचले आहे, भरपूर लोकांचे समुपदेशन केले आहे. असंख्य मित्रांचे, ओळखीच्यांचे अनुभव (यात स्त्रियाही आल्या) त्यांनी माझ्याशी मनमोकळेपणाने शेअर केले आहेत. यातून एक थोडी समज आली आहे.

प्रत्येक बाबतीत स्वतःच्या मर्यादित व्यक्तिगत अनुभवानुसार जगाला ज्ञानसंपन्न करत सुटणे माझा पिंड नाही. जेवढे आवश्यक, जनहितार्थ व चर्चेस आवश्यक तेवढेच मी चर्चेत मांडतो. म्हणून मलाच काही समस्या आहेत असे कुणी समजत असेल तर धन्य आहे.

लोभ असावा, धन्यवाद!

विवेक ठाकूर's picture

27 Jan 2016 - 12:29 am | विवेक ठाकूर

.....त्यात म्हात्रेसर सामान्य जनतेचे जेव्हा उदाहरण देतात तेव्हा जरा गोंधळायला होतं.

ही तर तुमच्या प्रतिसादाची सुरुवात आहे. का हा युनिवर्सल प्रश्न आहे?

थोडक्यात, तुम्ही लिहीतायं ते सर्व युनिवर्सल आणि माझं लेखन म्हणजे केवळ सिमित व्यक्तीगत अनुभव असा थोर विचार करण्यापूर्वी, सदर लेख हा सुबोधजींनी माझ्या मतांचा प्रतिवाद करण्यासाठी लिहीला आहे, इतपत दखल घेतली असती तरी पुरेसं झालं असतं.

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 12:43 am | संदीप डांगे

आर्र्रारा... लैच कंफुजन है जनू....

१. विवेक ठाकूर: सामान्य परिस्थितीत पॉर्नची गरज नाही.
२. डॉ. खरे: पॉर्नची गरज असमान्य परिस्थितीतही आहेच.
३. डॉ. म्हात्रे: विधान १ हे असामान्य परिस्थिती आहे. विधान २ हे सामान्य परिस्थितीत सुचवले जाते.

आलं काय ध्यानात गुरुजी? खरा गोंधळ आणि वाद-प्रतिवाद आपल्या तिघांच्या विधानांमधे आहे. तिन्ही विधाने एकत्र वाचली तर गोंधळ होतो. ह्याचा अर्थ माझ्या लैंगिक जीवनात गोंधळ आहे हा असामान्य अर्थ आपण काढलात हे लॉजिक तर लैच डॉक्यावरून घेलं बगा...

तसेच 'आपल्या मतांचा प्रतिवाद करायला डॉ. खरेंचा प्रस्तुत लेख उपयुक्त ठरत नाही' हे मी व्यक्त केलेले मतही आपण विचारात घेतलेले दिसत नाही.

अजुनही काही कन्फुजन असेल तर बिन्दास विचारा... उगा नको ती चर्चा फुफाटत चाललीये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2016 - 2:03 am | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या विधानांसंबंधी तुमचा खरोखरच गोंधळ झालेला आहे :)

माझ्या सगळ्या प्रतिसादांचे सार असे आहे:

१. वस्तुस्थिती : ठाकूर यांच्या प्रतिसादात व्यक्त केली जाणारी त्यांची स्वत:ची मनःस्थिती व कृती उच्च, आदर्श आणि स्वागतार्ह आहे, पण खर्‍या जीवनात सतत तेवढी उंची गाठणारी माणसे अत्यंत विरळ (आउटलायर्स) असतात... हे दुर्दैवी आहे पण सत्य आहे. "समाजातिल सर्वजण आदर्श आहेत/असावेत" हा दावा केव्हाही सत्यपरिस्थितीला धरून होऊ शकत नाही. "काय असावे (आदर्श)" आणि "काय आहे (वस्तुस्थिती)" यातला फरक जाणण्याचे (गॅप अ‍ॅनॅलिसिस) भान राखणे ही यशस्वी उपाय शोधण्याची पहिली पायरी आणि गुरुकिल्ली आहे.

२. सामाजिक उपाययोजना : व्यवहारातल्या सत्याकडे दुर्लक्ष करून केवळ आदर्श विचारसरणीच्या आधारावर केलेली सामाजिक उपाययोजना स्वप्नरंजन होईल व अयशस्वी ठरेल. त्याऐवजी, जमिनीवरचे सत्य (मग ते कितीका कटू असेना) परखडपणे जमेस धरून स्थळ-काळानुरूप जरूर ती उपाययोजना केल्यास यश मिळण्याची जास्त शक्यता असते.

३. व्यक्तिगत उपाययोजना : समाजात "टोकाचे आदर्शवादी" ते "टोकाचे आदर्श धुडकावून देणारे" ही दोन टोके पकडणारे कमी संख्येने आणि त्यांच्यामधल्या वर्णपटात कोठेतरी बसणारे बहुतांश लोक असतात (व्यक्ती तितक्या प्रकृती !). त्यामुळे, एका व्यक्तीत, एका परिस्थितीत यशस्वी ठरलेली उपाययोजना दुसर्‍या व्यक्तीत, त्याच/दुसर्‍या परिस्थितीत यशस्वी होईलच असे नाही. अर्थातच, व्यक्तीगत उपाययोजना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे व तिच्या सद्य परिस्थितीचे स्वतंत्र मुल्यमापन करून मग त्यानुरूप उपाययोजना करणे जरूरीचे असते.

हे सगळे केवळ पोर्न/लैंगिक मुद्द्यांबाबत नाही तर सर्वच सामाजिक व वैयक्तिक आचार-विचार-समस्यांशी निगडीत मुद्द्यांबाबत खरे आहे.

असे जर नसते तर, केवळ आदर्शवादी मुल्यांवर आधारलेल्या उपाययोजना करून शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ/विचारवंतांनी पृथ्वीवरच्या सर्व माणसांच्या सर्व समस्या फार पूर्वीच संपवल्या असत्या व पृथ्वीवर नंदनवन (युटोपिया) अवतरले असते, नाही का ?

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 2:24 am | संदीप डांगे

प्रतिसाद पटला. तुमची भूमिका नीट समजली. मनापासून धन्यवाद!

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Jan 2016 - 7:42 pm | अनिरुद्ध.वैद्य

साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक वातावरण उत्पन्न करायला पॉर्न आवश्यक नाही
>>

मलातरी वाटतय की खरेसर असाधारण परिस्थितीतच पॉर्न बघायला सजेस्ट करत आहेत.

बाकी चर्चा आवडली.

मारवा's picture

26 Jan 2016 - 9:05 pm | मारवा

मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात. (संपादित)
तुमच्या वरील विधानाला काही आधार विदा आहे का ?
सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच
असा विचार करत असाल तर ठीकच आहे

पैसा's picture

26 Jan 2016 - 10:44 pm | पैसा

ती लग्न झालेली मुले बाळे असलेली बाई आहे. तिच्याबद्दल असे बोलणे योग्य वाटले नाही. किंबहुना कोणाचाही उल्लेख अशा चर्चेत असा यावा हेच दुर्दैवी वाटत्ले.

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 11:05 pm | टवाळ कार्टा

+१११११११११

खटपट्या's picture

27 Jan 2016 - 2:40 am | खटपट्या

+१११११ सहमत.

फक्त एकच अ‍ॅडीशन - तीला अजुन मुले झालेली नाहीत. :)

नाखु's picture

27 Jan 2016 - 8:36 am | नाखु

अणि टक्याच्या पुनरागमनाला १११११

लक्ष्य असू द्या बाबाजी !!!!!!!!!!!!!!!

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 11:25 pm | संदीप डांगे

मारवाजी,

आपला बहुतेक गैरसमज झाला किंवा डॉक्टरांचा लेख आपण नीट वाचला नसावा.

असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.
वरील वाक्य डॉक्टरांच्या लेखात आहे, त्यांनी ते ज्या संदर्भाने-अनुषंगाने वापरले त्याच अनुषंगाने सनी लियोनचा मी इथे उल्लेख केलाय. तो मूळ लेखात चुकला असे तर कुणी म्हटले नाही पण मी इथे वापरला तर त्याचे संदर्भ कसे बदलले? इथे व्यक्तिगर सनी लियोनला मी वेश्या म्हटले आहे असा अर्थ कुठल्या आधारे काढला? डॉक्टरांनी सनी लियोन म्हणजे तिच्यासारखी मादक फिगर असणारी स्त्री असा जर अर्थ धरला आहे आणि तोच मीही माझ्या प्रतिसादात वापरला आहे.

मी इथे सरळ म्हटले आहे की "तिथे सनी लियोन नसतात" व पुढे म्हटले की "सनी लियोनसाठी किंमत चुकवणे सामान्यांना शक्य नसते." म्हणजे तशी फिगर असणार्‍या, संभोगाची उत्कृष्ट दर्जाची सेवा देणार्‍या वेश्या सामान्य कुंटणखाण्यांमधे नसतात व ज्या आहेत त्या सामान्यांना परवडत नाहीत. एवढा सरळ अर्थ न समजून घेता "पॉर्न कलाकार आहे म्हणजे वेश्याही आहे असे नाही" हे दिव्य ज्ञानामृत मला पाजण्याची वृथा घाई का बरे झाली असावी असा प्रश्न पडलाय.

धन्यवाद!

सुबोध खरे's picture

26 Jan 2016 - 11:05 pm | सुबोध खरे

लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने, आहारनियंत्रण वैगेरे कष्ट पडणार्‍या गोष्टी नको असतात. त्यांना एखादी गोळी, औषध, शस्त्रक्रिया हवी असते. परंतु आता ह्या लेखात आपण उलटी बाजू मांडली आहे असे वाटले.
संभोगाचा आनंद लुटायलाही थोडे कष्ट आवश्यक आहेतच, पण सामान्य जनतेस इन्स्टंट रेमेडी हवी असते. त्यांना ते हवे म्हणून तेच द्यावे अशी मानसिकता वैद्यकिय क्षेत्रात आहे याबद्दल आश्चर्य वाटले.
डांगे साहेब
यात आपली गल्लत झाली आहे.
मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते …… .अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात.
या विशिष्ट वेळेत(२४ तासात ) स्त्रीबीज आणि पुरुष बीज यात संबंध होणे आवश्यक आहे. अशा वेळेस रुग्णांना स्त्री पुरुष संबंध आणि त्यासाठी लागणारी एकरूपता किंवा अनुरूपता कशी आणायची याचे प्रवचन देऊन उपयोग नसतो . मुळात तो रुग्ण लैंगिक समस्या घेऊन आलेलाच नसतो तो वंध्यत्व हि समस्या घेऊन आलेला असतो.
आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढण्यात आपण पटाईत आहात हे वेगळे परंतु अर्थाचा अनर्थ करणे फारच झाले. मी फक्त काही विविक्षित परिस्थितीत पॉर्नचा आधार घ्यावा लागतो असे सांगितले तर तुम्ही इन्स्टंट रेमेडी देतो असा अर्थ काढलात ?
डॉक्टरसाहेब, या विशिष्ट विषयाबाबत आपल्या दोघांच्या विचारपद्धतीत मूलभूत फरक आहे. संभोगापासून चिरंतन सुख मिळवण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान भारतीय समाजात फारच दुर्मिळ असल्याने प्रस्तुत समस्या उद्भवतात. तुम्ही सुचवताय ते उपाय वरवरचे, तात्पुरते, लगेच परिणाम देणारे आहेत. माझे वा ठाकूरांचे उपाय चिरंतन सुख देणारे आहेत.
मान्य आहे.मग आपण संभोग आणि चिरंतन सुख यावर लेखमाला लिहा.
मी जे लिहिले आहे ते माझ्या मर्यादित अनुभवावर आधारित लिहित आहे आणि जे काही लिहिले आहे ते स्वयंभू ज्ञान नसून पुस्तकात दिलेले आहे आणि त्याला आधुनिक वैद्यकशास्त्राचा आधार आहे.
१९९१ते १९९७ या काळात मी रोज वंध्यत्वाचे सरासरी ३० रुग्ण पाहत असे वर्षात ३०० दिवस काम केले गृहीत धरले ( रविवारी पण काम होत असे )तर एका वर्षात ९००० म्हणजे ७ वर्षात ६३००० आणि त्यानंतरच्या १८ वर्षात दर वर्षी सरासरी ३००० रुग्ण ओहिले हे गृहीत धरले तर मी साधारण १,२५,००० इतके रुग्ण पहिले आहेत . माझ्या एवढ्या मर्यादित अनुभव आणि वाचनावर आधारित माझी मते आहेत. ती एकांगी हि असतील आणि चूकही असतील. परंतु ती चूक मला पुरावा किंवा दुवा दाखवा म्हणजे मी चुका सुधारून घेईन.
आपण आपले पॉर्न अ‍ॅडिक्शन चे अनुभव जरूर लिहा त्यातून कुणाचा फायदा होईल तर चांगलेच. आमच्याही अनुभवात भर पडेल.

बाकी आपले काथ्याकुट चालू द्या.

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 11:44 pm | संदीप डांगे

डॉक्टरसाहेब,

परत गैरसमज होतोय बरं का. तुम्ही रुग्णांबद्दल व विशिष्ट परिस्थितीबद्दल बोलत आहात तर मी सामान्य लोकांबद्दल बोलत आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्यच आहात, त्याबद्दल मी काही विरोधी बोललो असे वाटत नाही. माझे म्हणणे एवढेच की गल्लत तुमच्याकडून झाली आहे. 'सामान्य परिस्थितीत पोर्नची आवश्यकता नाही' ह्या विधानाचा प्रतिवाद करतांना आपण असामान्य परिस्थितीची उदाहरणे पॉर्नची वैद्यकिय बाजू धरुन दिली आहेत. दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपणांस मान्य आहे की नाही एवढाच प्रश्न आहे.

तुम्ही 'असामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व व उपयोग' ह्यावर लेख लिहिला आहे ते सर्व बिनशर्त मान्य आहे, त्यास खोडायचे नसल्याने पुरावे वा विदाचा प्रश्नच येत नाही. 'सामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व' या ह्या खर्‍या विषयावर (जे ह्या लेखाचे खरे प्रयोजन होते) आपला लेख काही सांगत नाही एवढाच माझा मुद्दा होता.

(ह्या विषयावर मागे एका धाग्यावर प्रगो, तुम्ही, मी यांची प्रदिर्घ चर्चा झालेली. तो संदर्भ डोक्यात आहे म्हणून मागचे सगळे परत लिहिले नाही. आशा आहे की आपणांस ते आठवत असेल.)

धन्यवाद! कुठल्याही बाबतीत गैरसमज नसावे.

सुबोध खरे's picture

27 Jan 2016 - 1:07 pm | सुबोध खरे

तुम्ही 'असामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व व उपयोग' ह्यावर लेख लिहिला आहे
मूळ गृहीतच चुकीचे आहे.
धाग्याचा विषय "पॉर्नची गरज आहे का?" हा आहे
सामान्य किंवा असामान्य स्थिती हा प्रश्न मी उपस्थित केलेला नाहीच.
'सामान्य परिस्थितीत पोर्नची आवश्यकता नाही' ह्याच काय कोणत्याच विधानाचा प्रतिवाद मी करीत नाही. तो वाचकांनी आपआपल्या मनोवृत्ती प्रमाणे ठरवायचा आहे.
तेंव्हा "सामान्य परिस्थितीत पॉर्नचे महत्त्व' या ह्या खर्‍या विषयावर" आपल्याला पाहिजे असेल तर आपण धागा काढावा.
माझ्या मनात गैर समज/ गोंधळ नाहीच.

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 2:03 pm | संदीप डांगे

ओके. गॉट इट. मला वाटले होते विवेक ठाकूरांच्या भूमिकेबद्दल आपले मत मांडण्यासाठी धागा काढला आहे.

असो. जास्त गोंधळ घालण्यात काय पॉइण्ट नाही. इथेच थांबूया.

अनन्न्या's picture

25 Jan 2016 - 5:54 pm | अनन्न्या

खूप माहितीपूर्ण लेख

हेमंत लाटकर's picture

25 Jan 2016 - 6:28 pm | हेमंत लाटकर

पाेर्न विना प्रणय उत्कृट होऊ शकतो. पाेर्न मध्ये दाखविले जाणारे मुखमैथून बघून किळस वाटते. पाॅर्न जास्त पाहिल्याने तेही पाहणे नकोसे वाटते.

बघा काकांनि कंटाळा येइस्तोवर पॉर्न पाहिलेत तरि आता त्यांना पाहणे नकोसे झालेय.
वरते कोण बोलत होत कि ह्याचा अ‍ॅडिक्शन लागत म्हणुन? नाहि लागत हे काकांच्या प्रतिसादातुन कळतय.

हेमंत लाटकर's picture

25 Jan 2016 - 6:44 pm | हेमंत लाटकर

मी पाहत नाही फक्त सांगतोय. अति तिथे माती.

होबासराव's picture

25 Jan 2016 - 6:47 pm | होबासराव

पाॅर्न जास्त पाहिल्याने तेही पाहणे नकोसे वाटते.

माय फॉल्ट :( राँग इंटरप्रिटेसन हुइ गवा. माफि देइल बा !

डॉक, या विषयावर आलेले आपले लेखन आवडले.
आजच्या पिढी मधे "ताण" हा सर्वसाधारण त्रास सहन करावा लागतो... यामुळे येणार्‍या समस्यांचे प्रमाणही अर्थातच अधिक असावे. मग अशा पिढीतल्या लोकांसाठी काय मार्गदर्शन होउ शकते ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

प्रभाकर पेठकर's picture

25 Jan 2016 - 7:15 pm | प्रभाकर पेठकर

दोघांसाठीही संभोग आणि संभोगापासून मिळणार्‍या आनंदाची सुरुवात मनांतील भावभावनांमध्ये असते. एकमेकांच्या भावना एकमेकांप्रती प्रेमाच्या, सौहार्दाच्या नसतील (किंवा दोघांमधील एकाला जरी अशी कांही संवेदनाच नसेल) तर तो संभोग फक्त शारीरिक होतो. त्यातून कदाचित मुले होऊ शकतील पण वाढत्या वयाबरोबर गहन समस्या निर्माण होऊ शकतात. पोर्न पाहून शरीरसंबंध ठेवणे हा तात्पुरता उपाय होऊ शकतो. पण आपल्या संवेदना जागवणं हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो.
रोजच्या जीवनातील रटाळपणा, रुटीन निरस दिनक्रमातून बाहेर पडून एखाद्या पर्यटनस्थळी मनमोकळे वातावरण, प्रसन्नता अनुभवत आणि तिथे कोणी 'आपले' नसल्याने आपला पती किंवा पत्नी प्रती जास्त जवळीक निर्माण होऊन संभोगाप्रती योग्य ती वातावरण निर्मिती होऊ शकते.

सांजसंध्या's picture

25 Jan 2016 - 7:21 pm | सांजसंध्या

माहितीपूर्ण लेख आहे. धन्यवाद.

मदनबाण's picture

25 Jan 2016 - 7:38 pm | मदनबाण

कुठलीही लेटेस्ट व्हिडीयो / फोटोग्राफी यांचा आणि पॉर्नोग्राफीचा घनिष्ट संबंध आपल्याला लगेच लक्षात येइल... पॉर्न इंडस्ट्री ही इनोव्हेशन्सना जन्म देखील देते तसेच पॉर्न इंडस्त्रीकडुन मोठ्या प्रमाणात वापरली गेलेली टेक्नॉलॉजी / डिजीटल फॉरमॅट हे देखील लवकरच मान्यताप्राप्त आणि प्रसिद्ध होतात... अगदी गुगलच्याही हे लक्षात आले जेव्हा गुगल गॉगलने पॉर्नशूटचा {जाहिरात करणारा}व्हिडीयो रिलीज झाला. गुगलने गुगलग्लासवर पॉर्न बॅन केले आहे... व्हिएचएस टेप्स पासुन एचडी अल्ट्राएचडी असा प्रवास पॉर्न इंड्र्स्ट्रीचा प्रवास झालेला दिसेल.यात ३डी पॉर्न आणि व्हरच्युअल रिअ‍ॅलिटी पॉर्न देखील आहे.
मी Demolition Man या माझ्या आवडत्या सायन्स फिक्शन्स चित्रपटात मी पहिल्यांदाच व्हरच्युअल सेक्सचा कॉन्सेप्ट पाहिला.

पॉर्न इंडस्ट्री नेहमी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन राहिली आहे...आणि राहील.आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे... अनेक मेसेजिंगचे अ‍ॅप्लीकेशन्स देखील आहे... असेच एक स्नॅप चॅट. हे सेक्सटेक्स्टींग आणि पाठवलेली इमेज / फोटो काही क्षणातच सेल्फ डिस्ट्रक्टीव होणे...ज्याचा आधावर या अ‍ॅपचे निर्माण झाले आहे. एकमेकांना सेक्सी फोटो पाठवण्याच्या मानसिकतेवर हा पर्याय {अ‍ॅप} निर्माण झाला.
पॉर्न इंडस्ट्रीच्या या बाजुवर फार कमी लोकांचे लक्ष जाते... बहुधा या इंडस्ट्रीच्या दुसर्‍या बाजुला कटु सत्य सुद्धा असल्यामुळे..

जाता जाता :- मागच्या वेळी झालेल्या इकॉनॉमिक क्रायसिस नंतर अमेरिकेच्या पॉर्न इंडस्ट्रीने देखील बेल आउट पॅकेज मागितले होते हे तुम्हाला माहिती आहे का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

मदन बाण
चर्चेला एक चांगला पैलु दिला. माहीतीपुर्ण प्रतिसाद आवडला
आय डी नाव सार्थ केलतं
प्रत्यक्ष मदनाने बाण मारल्यावर मग काय विचारता ?
छान प्रतिसाद !

जव्हेरगंज's picture

25 Jan 2016 - 7:57 pm | जव्हेरगंज

लेख आवडला!

मुक्त विहारि's picture

25 Jan 2016 - 8:12 pm | मुक्त विहारि

विषय आवडला.

वाखूसा.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2016 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचे जालमित्र संक्षिसेठ यांच्या 'पॉर्न आणि फँटसीज कसे निरर्थक आहेत' या मुद्याच्या विवेचनासाठी डॉक्टर साहेब आपण केलेले माहितीपूर्ण लेखन आवडले. चर्चेतून पट्णा-या, न पटणा-या मतातून मिपावर असेच सर्व समावेशक लेखन येत राहावे, माहितीचे आदान प्रदान होत राहावे. आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

अभिजीत अवलिया's picture

25 Jan 2016 - 9:43 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला. ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा देखील साधक बाधक होत आहे हे महत्वाचे.

भंकस बाबा's picture

25 Jan 2016 - 10:05 pm | भंकस बाबा

डॉक्टर रॉक्स!

चतुरंग's picture

25 Jan 2016 - 10:08 pm | चतुरंग

'विषय' महत्त्वाचा असूनही अजूनही बर्‍याच प्रमाणावर भारतात दुर्लक्षिला जातो आणि त्याचे परिणाम बरीच जनता आयुष्यभर भोगत राहते याचे वाईट वाटते! :(

प्रतिसादांमधूनही विषय न भरकटता चर्चा होत राहील अशी आशा आहे.

बोका-ए-आझम's picture

25 Jan 2016 - 11:41 pm | बोका-ए-आझम

अर्थशास्त्रातला महत्वाचा - मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत पोर्नोग्राफीलाही लागू पडतो. मुळात पोर्नची निर्मिती ही मागणी-पुरवठा तत्वाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. जर माणसाला गरज नसती तर पोर्नची निर्मिती झालीच नसती. जेव्हा तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा लोक मस्तराम किंवा हैदोस सारखी पुस्तकं आणि मासिकं बघत असत, आत्ताही बघतात. माझ्या काॅलेजच्या दिवसांत ब्लू फिल्म्सच्या व्हिडिओ कॅसेट्स बघणं हा एक पर्याय होता. त्याला भक्त प्रल्हाद असा शब्दपण होता. नंतर त्याची जागा सीडीने घेतली. आता इंटरनेटमुळे अजून पर्याय आहेत. Animated Porn आणि Porn Cartoons उदाहरणार्थ सविता भाभी, वेलम्मा वगैरे पाहणारा वर्ग आहे. या सगळ्याचा एकच अर्थ आहे - मागणी आहे म्हणून पुरवठा आहे. मी स्वतः पोर्न पाहतो आणि मला त्यात काही वावगं वाटत नाही. पाहून फार मोठी मर्दुमकी केली असंही वाटत नाही आणि न पाहणारे धर्मपरायण वगैरे असंही वाटत नाही.
एका धार्मिक वगैरे मित्राने वेगळाच मुद्दा मांडला होता. या चित्रपटांत काम करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाला आपण हातभार लावतोय असं तुला वाटत नाही का? माझं उत्तर म्हणजे प्रतिप्रश्न होते - शोषण फक्त स्त्रियांचंच होतं हे कशावरून? अशा चित्रपटांत काम करणाऱ्या पुरुषांचंही शोषण होत असेलच की.
अजून एक प्रश्न म्हणजे शोषण नाही कुठे? आपण आपल्या घरी मरमर काम करणाऱ्या स्त्रियांना किती पगार देतो? रजा देतो? आपण स्वतः जेवढं काम करतो तेवढा पगार आपल्याला हक्क म्हणून हवा असतो पण या अशा स्त्रियांना आपण तसा पगार देतो का? ते सोडा. घरात काम करणाऱ्या आणि खस्ता काढणाऱ्या गृहिणीला काय मिळतं? शोषण तिथेही आहेच. लैंगिक संदर्भ आले की शोषण होतं असं थोडंच आहे? आणि जर हे एवढं सगळं शोषण आपण चालवून घेतो, तर मग पोर्नोग्राफिक फिल्म्समधलं सो काॅल्ड शोषणही आपल्याला चाललं पाहिजे. अत्यंत उदात्त ' वहिनीच्या बांगड्या ' टाईप चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रीचं काय शोषण होत नसेल? पण ते आपण चालवून घेतो की नाही? असा selective आणि दांभिक दृष्टीकोन हा आपल्या विचारसरणीचा स्थायीभाव आहे.
पोर्नच्या बाबतीत असा दांभिकपणा खूप आहे. त्यामुळे हा सर्व्हे आणि हा धागा एकदम आवडले मला. जे काही आहे ते सरळ आहे. फक्त अदितीताईंनी भाग घेणाऱ्यांची नावं जाहीर होणार नाहीत, गुप्त ठेवली जातील असं म्हटलंय, ते मला आवडलं नाही. अर्थात त्यांच्या या निर्णयामागे कारण आहे आणि त्याचा आदरही आहे पण नाव जाहीर न केल्यामुळे मुख्य मुद्द्याचाच पराभव होतो असं मला वैयक्तिकरीत्या वाटतं. जर लोक पोर्न पाहतात तर ते इतरांना का कळू नये? त्याने काय होणार आहे? ते काही पाप वगैरे तर नाहीये. असो.
डाॅक्टर खरे तर अशा मुद्द्यांच्या सगळ्या बाजू जवळून पाहणारे. त्यामुळे त्यांच्याकडून असा लेख येणं हे संयुक्तिक आहेच. ते स्वतःचं आडनाव seriously घेतात हे माझं त्यांच्याविषयीचं मत या लेखानंतर कायम झालेलं आहे.

चलत मुसाफिर's picture

26 Jan 2016 - 8:13 am | चलत मुसाफिर

माझ्या मते, पॉर्न हा दुर्भिक्ष्यजनित प्रकार आहे. समजा जर मानवी समाज अन्य प्राण्यांसारखा विवस्त्र रहात असता आणि संभोग ही केवळ एक नैसर्गिक गरज समजली जात असती तर पॉर्नचा जन्मच झाला नसता. लिंगभावनेवर समाजाने जी बंधने घातली आहेत (काही योग्य, काही अयोग्य) आणि ज्याप्रकारे संभोगाची नाळ शोषणाशी जोडून टाकली आहे, त्यातून एका बाजूला पॉर्न जन्मते तर दुसऱ्या बाजूला बलात्कार होतात.

कुतूहल म्हणून विचारतो: कुत्रे-मांजरे यांना पॉर्न दाखवल्यास त्यांची काय प्रतिक्रिया होते, याचा अभ्यास झालेला आहे काय?

सुबोध खरे's picture

26 Jan 2016 - 8:08 pm | सुबोध खरे

चलत मुसाफिर साहेब
मानवापेक्षा कमी उत्क्रांत अशा बहुसंख्य प्राण्यांमध्ये संभोग हा केवळ पुनरुत्पादनासाठी केला जातो. आणि त्यातील मार्जार कुळातील काही प्राण्यांमध्ये तो अतिशय वेदनादायक असतो उदा . मांजर चित्ता बिबळ्या आणि वाघ . यापैकी मांजर आणि चित्ता या मध्ये तर नर मादीला संभोगासाठी स्थानबद्ध केल्यासारखे करतात आणि जोवर मादी संभोगासाठी तयार होत नाही तोवर तिची पाठ सोडत नाहीत. या प्राण्यांचे लिंग काटेरी असते आणि त्यातून मादीला वेदना होतात पण या वेदनेतूनच स्त्रीबीज पक्व होते (ovulation) यास्तव मांजर आणि बोका आपल्याला "मोठ्या आवाजात भांडताना" दिसतात. जोवर मांजरी संभोगास तयार होत नाही तोवर बोका तिची पाठ सोडत नाही.
कुत्रा लांडगा किंवा श्वान कुळातील प्राण्यांमध्ये स्त्रीच्या योनीतून होणार्या स्त्रावाच्या "वासा"ने नर मादीकडे आकर्षित होतो. यासाठी कुत्रे कायम "वास" काढत फिरत असतात.
या बहुतांश प्राण्यांमध्ये नराचे काम फक्त शुक्राणू दान करणे एवढेच असते. पिल्लांच्या संगोपनात नराचा काहीही वाट नसतो. या सर्व प्राण्यात पिल्लांना उपजत बुद्धी असते ज्याने ते आईचे दुध पिणे थांबवल्यावर स्वतः चे अन्न वासाने शोधू आणि खाऊ शकतात.
मानव प्राण्यात बालकाचे बालपण जवळ जवळ १६ वर्षे असते आणि या काळात बालक स्वतःचे पोषण करू शकत नाही. एवढा लांब कालावधीत मुलाची काळजी आईने घेणे हे फार कठीण आहे. यास्तव निसर्गाने संभोग हा अतिशय सुखकारक अनुभव केला आहे. मानवात जर स्त्रीसुख हे इतके सुखदायी नसते तर बहुसंख्य पुरुषांनी लग्नच केले नसते. god has linked procreation with recreation otherwise most men would not have married.
मानवात संभोग हा केवळ पुनरुत्पादनासाठी च नव्हे तर बहुतांशी सुखासाठी केला जातो.
समाजाने लग्न संस्था निर्माण केली आहे कारण पुरुषाला सम्भोगसुख हे सहज आणि सुलभतेने उपलब्ध होते आणि स्त्रीला आणि बालकांना एक सुरक्षित घर आणि आसरा उपलब्ध होतो. जर संततीच्या औरस पणा बद्दल शंका असेल तर पुरुष मुलाच्या वाढीत सहभागी होणार नाही. यास्तव पातिव्रत्य या सारख्या कल्पना आल्या. आपण जर एक गोष्टीचा विचार केला कि जगात एकमेकांशी 'काहीही" संबंध नसलेया मानवी गटात सर्वत्र(UNIVERSAL) लग्नसंस्था उपलब्ध आहे.
असो
कुत्र्याला दुसर्या कुत्र्यांचा संभोग दाखवला तर त्याला काहीच फरक पडणार नाही कारण कुत्र्याचे उद्दीपन वर म्हटल्याप्रमाणे "वासा"वर असते. दृष्टीवर नसते. म्हणूनच रस्त्यावर कुत्र्यांचा संभोग होत असताना इतर नर त्या "वासा"मुळे आशाळभूत पणे घुटमळताना दिसतात पण माद्या दिसत नाहीत. हीच परिस्थिती इतर प्राण्यांची आहे

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 9:17 pm | संदीप डांगे

बाकी सर्व ठिक आहे.

पण..
समाजाने लग्न संस्था निर्माण केली आहे कारण पुरुषाला सम्भोगसुख हे सहज आणि सुलभतेने उपलब्ध होते आणि स्त्रीला आणि बालकांना एक सुरक्षित घर आणि आसरा उपलब्ध होतो. जर संततीच्या औरस पणा बद्दल शंका असेल तर पुरुष मुलाच्या वाढीत सहभागी होणार नाही. यास्तव पातिव्रत्य या सारख्या कल्पना आल्या. आपण जर एक गोष्टीचा विचार केला कि जगात एकमेकांशी 'काहीही" संबंध नसलेया मानवी गटात सर्वत्र(UNIVERSAL) लग्नसंस्था उपलब्ध आहे.

ह्याबद्दल आपण दिलेली कारणमिमांसा योग्य नाही. लग्नसंस्था व पातिव्रत्य ह्याचा आपण संभोगसुखाशी लावलेला संबंध पुरेसा वाटत नाही. निसर्गाने दिलेल्या देणग्या आणि समाजाने लग्नसंस्था निर्माण करून त्याची लावलेली वाट ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नसंस्था आणि संभोगसुख ह्याचा संबंध नाही. तर संपत्तीचा वारस व लग्नसंस्था याचा सरळ संबंध आहे.

मादी मिळवण्याच्या इतर प्राण्यांमधे व मनुष्यामधे असलेल्या पद्धतीतला फरक बघता एक गोष्ट लक्षात येते ती ही की इतर प्राण्यांमधे सक्षम नरालाच मादी मिळते, मनुष्यात 'सक्षम नर' ही संज्ञाच स्पष्ट नाही. मादी मिळवण्यासाठी इतर नरांशी युद्ध, स्वतःचे शरिर अधिक सुंदर करणे, उत्कृष्ट घर बांधणे इत्यादी प्रकार नाहीत. (मादीच्या मागे मागे फिरणे हे असले तरी ते खात्रीलायकरित्या मादी मिळण्यातच यशस्वी होईल असे नाही. एखादेवेळा मादी फसून संभोग होईलही पण लग्नास लायक असा तो नर नसेल तर कायम सुख अशक्य असते.) लायक नर नैसर्गिकरित्या निवडल्या जाणे व मादिने त्यास पसंती देऊन संग करणे हे होत नाही. हे का होत असावे बरे...?

माझ्या मते मनुष्य समाज दुर्बलांनाही संधी मिळावी ह्या विचारावर चालतो. कळपात एखाद्या नराचीच चलती असते. त्याला सर्व माद्या उपलब्ध असतात. त्याची मोनोपोली तोडायची असेल तर इतर नरांस त्याच्याशी द्वंद्व करावे लागते अथवा आपला वेगळा कळप तयार करावा लागतो. मनुष्याच्या कळपातही आधी असेच असावे, पण जास्त अक्कल व कमी बळ असल्याने त्यावर त्याने सर्वांना संधीची समान उपलब्धता या नावाखाली लग्नप्रकार शोधून् काढला असावा. मादींसाठीच्या भांडणात आपल्याच कळपाची शक्ती कमी होते हेही लक्षात आले असेल. कारण इतर प्राण्यांसारखी मनुष्याची लैंगिक वासना विशिष्ट काळाशी संबंधित नाही. ती २४बाय७ तयारच असते. (ह्यालाही नैसर्गिक कारण आहेच) पुढे स्थिरस्थावर झाल्यावर स्थावर मालमत्ता जमवण्यास सुरुवात झाली. मालमत्तेत सर्वाधिक जीव गुंतलेल्या मनुष्याने आपल्याच वारसाकडे ही मालमत्ता जावी म्हणून आपल्या स्त्रियांना इतर पुरुषांशी समागमास मज्जाव केला, त्यातून पातिव्रत्य जन्मास आले. एकाच पतीशी एकनिष्ठ राहणार्‍या स्त्रीस प्रतिष्ठा मिळू लागली. अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणार्‍या पुरुषास प्रतिष्ठा होती.

काही आदिवासी जमातींमधे, 'गोटूल' प्रथेत लग्न हा प्रकार होण्याआधी अनेक पुरुषांशी संग करण्यास स्त्रीला मोकळीक असते. काही आदिवासींमधे स्त्रीची गर्भधारणा करण्यास जो यशस्वी होईल त्यास पती होण्याची संधी मिळते. काहींमधे लग्न तर मुलांना मुले होईपर्यंतही टाळली जातात. ज्या समाजाचा स्थावर संपत्ती जमवण्यावर भर आहे अशाच समाजात लग्नसंस्था घट्ट व पातिव्रत्य परमपवित्र मानले जाते असं निरिक्षण आहे. आदिवासींमधे अशी स्थावर स्वामित्वाची भावना नसल्याने व कबिला म्हणजेच एक कुटूंब असे मानत असल्याने त्यांच्या पद्धती आधुनिक म्हण्वल्या जाणार्‍या समाजापेक्षा वेगळ्या आहेत.

तसेच लग्न झाले म्हणजे स्त्री वा पुरुष एकाच जोडीदाराशी कायम लॉयल राहिलच याची कोणतीही खात्री लग्नसंस्था देत नाही. लग्नसंस्था ही फक्त खोटी स्वप्ने दाखवून समाजातल्या मुक्त नैसर्गिकपणाला आवर घालून समाजनियंत्रणात ठेवण्यास जन्माला आली आहे. लग्नसंस्था ही समाजातल्या बहुसंख्य असलेल्या दुर्बळांनी संख्येने कमी असलेल्या बलाढ्यांना सामाजिक नियम रुढींच्या नावाखाली निष्प्रभ करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. उत्तरोत्तर दुर्बळांची संख्या वाढत गेल्याने दुर्बळांची ही व्यवस्थाच नैसर्गिक आहे असे बलाढ्यांनाही वाटायला लागले.

असो. या विषयावरही वेगळा धागा काढून लिहिणे गरजेचे आहे. म्हणून म्हटले की आपण घेतलेला विषय समाजाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारा आहे.

सनी लियोनी ची एक मुलाखत वाचलेली होती त्यात तिने तेथील पॉर्न इंडस्ट्री कीती व्यावसायिकतेने मॉडेल्स ना वागणुक पेमेंट इ. देते त्या संदर्भात तिने सांगितलेल होत. ते सर्व अगदी व्यावसायिक प्रोफेशनल म्हणता येईल या रीतीने होत. आता त्यातही तिथेही असेल काही शोषण माहीत नाही मात्र तुम्ही म्हणता तसा आर्थिक भाग असेल. मात्र याला त्या स्त्रीच शोषणच होत असेल अस समजुन शिक्का मारण जरा अतिरेकी विधानच वाटत.
ओपन सर्व्हे च्या मताला दणकुन पाठींबा अस लपुन छपुन मी नाही त्यातला कोंडा लावा आतला प्रकार योग्य नाही.
अजुन एक जाता जाता तुम्ही तुमच आयडी आडनाव खरें सारख कृपया सीरीयसली घेउ नका नाहीतर तुमची म्हस शोधता शोधता मिपाकरांना खस्ता खाव्या लागतील

माहितगार's picture

26 Jan 2016 - 5:33 pm | माहितगार

बोकोबा आम्ही उपरोक्त मांडणीतील एका परिच्छेदा बाबत साशंकता शोषण नाही कोठें ? (इथे अवांतर टाळण्याच्या दृष्टीने) स्वतंत्र धागा लेखातून व्यक्त केली आहे.

सुबोध खरे's picture

26 Jan 2016 - 12:59 am | सुबोध खरे

पॉर्न चे आपले दुष्परिणामही आहेत.
एक म्हणजे त्यात पुरुषाचे शिश्न हे फार मोठे आणि सरळ दाखवलेले असते. बहुसंख्य वेळेस त्यात इम्प्लांट वापरलेला असतो. त्यामुळे चार पाच वेळेस संभोग करूनही ते ताठर च असते. प्रत्यक्षात लिंग हे सरळ नसतेच तर थोडे पाठीमागे आणि डावीकडे वाकलेले असते.यामुळे ते पाहणारे बरेच तरुण स्वतःच्या लिंगाच्या आकारा आणि मापाकडे पाहून निराश होतात.मग हे तरुण हिमालयातील जडीबुटी इ द्नार्या वैदूंच्या जाळ्यात सापडतात किंवा हि गोष्ट मनातच ठेवून देतात. आणि आपल्या लिंगाच्या लहान मापामुळे न्यूनगंड बाळगून असतात. लैंगिक विकार तज्ञाकडे अशा शेकड्यांनी केसेस येतात. लग्न झालेले तरुण सुद्धा आपण एका रात्रीत तीन चार वेळेस संभोग करू शकत नाही म्हणून न्युनगन्डाचे शिकार झालेले आढळतात.
पॉर्न पाहून स्त्रीयानासुद्धा आपले शरीर कमनीय नाही किंवा स्तन सुडौल आणि भरदार नाही हा "साक्षात्कार", होतो. त्यामुळे त्या कामक्रीडेसाठी आवश्यक असे उद्दीपन करण्यात कांकू करतात आणि अत्युच्च अशा सुखाला मुकतात. शिवाय न्यूनगंड येतो तो वेगळाच.
बहुसंख्य पुरुष आणि स्त्रिया हे विसरतात कि पॉर्न मध्ये काम करणारे स्त्रीपुरुष यांना भरपूर पैसा मिळतो तेन्व्हा तो उद्योग भरदार आणि देखणे असेच तरुण आणि सुंदर आणि भरगच्च अशाच तरुणी निवडतात शिवाय याची वये पण कमी असतात त्यामुळे तारुण्याने मुसमुसलेली शरीरेच तुम्ही पाहत असता. आपण त्या शेर्नितले नसतो हा विचार न केल्याने हा न्यून गंड येतो.
बाकी सवडीने.

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 9:23 pm | संदीप डांगे

सहमत. हाही प्रतिसाद आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jan 2016 - 2:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वेगळा धागा काढलात हे उत्तमच.

नवीन मुद्दे लिहिणार असलात तर नवा भाग काढा ही विनंती. विशेषतः प्रतिसादांमध्ये काही मुद्दे आलेले असतात तेही एकत्र करून लिहा. (काही प्रतिसादी-कुस्तीमध्ये चांगल्या प्रतिसादांमधल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं.)

गवि's picture

26 Jan 2016 - 8:44 am | गवि

धाग्यातले विचार आणि प्रतिसादांतली चर्चा, विशेषतः संक्षींचे प्रतिवादातले विचार आवडले. धन्यवाद.

विवेक ठाकूर's picture

26 Jan 2016 - 11:03 am | विवेक ठाकूर

त्यातून `अ‍ॅवरेज' म्हणजे सर्वांना निरुपयोगी निष्कर्ष काढण्यापेक्षा, इथे समोरासमोर झालेला फैसला सगळ्यांना उपयोगी होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Jan 2016 - 8:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वक्षणांमधून फक्त सरासरी काढतात इतपत ज्यांचं सांख्यिकी ज्ञान आहे त्यांच्या बोलण्याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार?

अर्धवटराव's picture

27 Jan 2016 - 8:38 am | अर्धवटराव

+१

माझ्या आवडत्या लेखिका इरावती कर्वे बाई त्यांच्या काळातील पिवळ्या कव्हर च्या पुस्तकांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या कि वाचून किंवा चित्रे बघून माणसाला मिळणारे सुख जास्त हवे हवे वाटते …कारण त्यात शारीरिक मेहनत नसते …. मनात विचार आले कि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करायला लागते … जोडीदार,त्याचा मूड, जागा, वेळ आणि स्वतःची इच्छा सगळ्यांची जुळवाजुळव करताना बऱ्याचदा इच्छेची तीव्रता कमी होते आणि त्यानंतरदेखील प्रत्यक्षात अनुभव घेताना; जागेची योग्यता, त्या वेळेची आल्हादकारकता, संपूर्ण वातावरणाचा परिणाम, जोडीदाराचा मुखश्वासगंध, आणि होणारे शारीरिक श्रम यामुळे अनुभव कल्पनेच्या तोडीस तोड असेल याची खात्री नसते…
याउलट जेंव्हा शरीरभोगांची वर्णने पुस्तकात येतात, चित्रात दिसतात किंवा चित्रपटात पाहायला मिळतात तेंव्हा हे जागेचे, वेळेचे, वातावरणाचे, घामाचे, गंधाचे आणि श्रमाचे परिणाम भोगावे लागत नाही आणि मेंदूला मात्र सर्व समाधान मिळते …. संपूर्ण शरीरा ऐवजी केवळ डोळे आणि मेंदू हे दोनच अवयव बाकी सर्व अवयवांचे काम करतात …. गंध आणि स्पर्श देखील केवळ कल्पनेने अनुभवला जातो …. म्हणून पिवळी पुस्तके आणि कामुक चित्रपट बहुतेकांना खासगीत तरी आवडतातच ….
ज्या गोष्टींमुळे मेंदूला श्रमाशिवाय मिळणारी गम्मत हवी हवीशी वाटते त्याच गोष्टींच्या अभावाने मग मेंदूला मिळणारे दृष्टीसुख कमी वाटू लागते …. मिळणाऱ्या झिणझिण्या कमी होऊ लागतात, अनुभवांची तीव्रता जाणवेनाशी होते … मग सुरु होते केवळ शब्दातून किंवा चित्रातून किंवा कलाकारांकडून मेंदूला पटकन उद्दीपित करू शकेल बोथटलेल्या जाणीवांना धक्का देऊ शकेल, अश्या कलाकृतीची अपेक्षा …मग कला कुठे संपते आणि क्रौर्य कुठे सुरु होते हे कळण्याचा मार्ग नसतो …
सभ्य समाजात समाजघटकांना होणाऱ्या सर्वच नाही तरी शक्य तितक्या भावनांचे विरेचन होणे आवश्यक असते. यात एक विरोधाभासी गम्मत अशी कि विरेचनाची साधने नसल्यामुळे किंवा मुबलक प्रमाणात असल्यामुळे दोन्ही वेळेस समाजात बुभूक्षितपणाच वाढीला लागतो …
म्हणून सरकारचे आणि नागरिकांचे काम केवळ साधनांच्या नियंत्रणाचे नसून समाजाला जाणवणाऱ्या भावना आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीशी सांधून घ्यायला शिकवणे हे देखील असते … त्यामुळेच आपल्या भावनांबद्दल अपराधी वाटण्या ऐवजी किंवा त्यासाठी नैतिक-अनैतिक किंवा कायदेशीर - बेकायदेशीर मार्ग चोखाळण्याऐवजी समाज अधिक जबाबदार होऊ शकेल …
नाहीतर खजुराहो आणि वात्स्यायनांची भूमी, राधा कृष्णाच्या बिन लग्नाच्या प्रेमाची मंदिर बांधणारी भूमी खोट्या नैतिकतेखाली कुंभ मेळ्यात आणि नवरात्रोत्सवात कंडोमच्या होणाऱ्या वाढत्या खपाबद्दल आश्चर्य व्यक्त करत बसेल …

चौकटराजा's picture

26 Jan 2016 - 5:42 pm | चौकटराजा

आपण यात जे मुद्दे पर्यायी सम्भोग सुखाच्या लालसे संबंधी तपशीलवार मांडले आहेत ते खरेच इरावती बाईनी मांडलेले असतील तर माझा त्याना सलाम.वासना व परस्पर प्रेम या गोष्टी अगदी भिन्न आहेत असे माझे अगदी स्पष्ट मत आहे.उत्तम समागमासाठी प्रेम हे बोनस सारखे आहे ते आवश्यक मात्र नाही.मुळात प्रेम ही मानसिक अवस्था द्वेष भाव ने सारखीच आहे.

काही मुद्दे त्यांचे तर बरेच माझे आहेत. त्यांनी १९६९ मध्ये एक आठ पानी लेख लिहिला होता "व्यक्तिस्वातंत्र्य आणि बंधमुक्तता या नावाने. देशमुख कंपनी ने त्यांच्या गंगाजल या पुस्तकात प्रकाशित केला आहे. सध्या इरावती बाईंची पुस्तके बाजारात पुन्हा मिळू लागली आहेत. शक्य झाल्यास नक्की वाचा. मला विचार करताना त्यांचा खूप फायदा होतो अजूनही. …. आणि तुम्ही म्हणता ते मला पटते. प्रेम हे क्षणिक आणि मानसिक भावना आहे तर वासना ही शारीरिक गरज आहे. त्यांची अशी अविभाज्य सांगड घातल्यानेच आपण बऱ्याच ठिकाणी गोंधळात पडलेले आणि स्वतःलाच दोषी मानणारे झालो आहोत.

मोहनराव's picture

26 Jan 2016 - 2:46 pm | मोहनराव

लेख आवडला.

नया है वह's picture

26 Jan 2016 - 3:07 pm | नया है वह

+१

नगरीनिरंजन's picture

26 Jan 2016 - 6:10 pm | नगरीनिरंजन

उत्तम लेख !

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 6:28 pm | टवाळ कार्टा

पोर्नऐवजी समर्थ पर्याय उपलब्ध होईपर्यंत पोर्न हवेच

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 6:30 pm | टवाळ कार्टा

लेख उत्तम असल्याची पावती कायप्पावर आधीच पोचवली आहे*

*हा प्रतिसाद माझा वरचा प्रतिसाद वाचल्यावर ज्यांना झिणझिण्या येतील त्यांच्यासाठी

Anand More's picture

26 Jan 2016 - 6:40 pm | Anand More

टवाळा आवडे पोर्न

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 6:47 pm | टवाळ कार्टा

i like erotic porn...so? what's your point?

Anand More's picture

26 Jan 2016 - 6:57 pm | Anand More

no point … समर्थ रामदास आज असते तर काय म्हणाले असते तेव्हढंच मी म्हटलं … आणि हो, खऱ्या नावाने इथे आणि सगळीकडे असल्याने माझी आवड साधी असूनही सगळ्यांसमोर मांडायला मी थोडा लाजतो…

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 7:02 pm | टवाळ कार्टा

चील :)

सुबोध खरे's picture

26 Jan 2016 - 8:30 pm | सुबोध खरे

काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे कोणती गोष्ट शृंगारीक आहे आणी कोणती पॉर्न आहे यातील रेषा धूसर आहे.
पूर्ण कपडे घालून एखादी नटी बीभत्स हालचाल करीत असेल किंवा तिची भाषा अशी तर ते एखाद्या सुंदर पण कमी कपडे असलेल्या स्त्रीपेक्षा जास्त भडक / उत्तेजक असू शकते. हा मादक आणी मोहक यातील फरक आहे.
तसेच शान्त्तपणे पॉर्न पाहणारा माणूस आणी एखाद्या पूर्ण वस्त्रे नेसलेल्या स्त्रीकडे अतिशय हीन पातळीवर वासनायुक्त वखवखलेल्या नजरेने पाहणारा माणूस यात असाच फरक आहे. बहुतांश स्त्रियांनी अशा नतद्रष्ट माणसांचा अनुभव घेतलेला असतो. ( स्त्रियांना अशा माणसासमोरआपण कपडे घातलेलेच नाहीत असे वाटू लागते.)

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 9:23 pm | संदीप डांगे

सहमत. प्रतिसाद आवडला.

उदात्त सात्विक अगरबत्ती प्रणय वाले एक बाब लक्षात घेत नाहीत ती अशी की
पॉर्न एक साधन आहे व लैंगिक जीवनाची प्रत त्याच्या कुशल वापराने सुधारता येऊ शकते.
जरी प्रणयासाठी एक नर व एक मादी व दोन नर वा दोन मादी इतकेच पुरेसे असले हे सत्य असले तरी अर्धसत्य आहे.
त्यानंतर पलंग बंद खोली सुंगंध फुले मंद संगीत इ.इ. साधनांची आवश्यकताच नाही का ? प्रत्येक वस्तु साधन हे त्या प्रणयाला उत्कट बनवण्यासाठी मदत करते. त्या यादीत पॉर्न एक आहे. त्याचा मर्यादीत वापर ( अ‍ॅडिक्शन चे टोक टाळुन ) जर केला तर प्रणयाची प्रत निश्चीतच सुधारायला मदत होते. त्यातील एखादी नाविन्यपुर्ण कल्पना ( अ‍ॅन आयडीया कॅन चेंज युवर लाइफ ) होऊ शकते. एखादी रेसीपी असते नेहमीचा पदार्थ निराळ्या शैलीत बनवण्याची, एखादी रीत असते कपडे नविन पद्धतीने घालण्याची अस नाविन्य बदल वेगळेपणा नविन रंग ही माणसाची सहज प्रकृती गरज आहे. आयुष्य एकसुरी एकरंगी व्यतीत करण्यापेक्षा यात एक आनंद असतो. रटाळपणा तोचतो पणा टाळण्यासाठी एक अत्यंत सकारात्मक संयमी दृष्टीकोण ठेऊन पॉर्न चा वापर एक साधन म्हणुन करण्यात गैर आणि इतका आक्षेप घेण्यासारख काय आहे. आमच्या बालपणी एक खडुस नातलग होता तो नेहमी नविन काही रीतीने जेवण बनवल तर करवादायचा की काय हे काय हे शेवटी काय अन्नच आहे पोटातच जाणार ना काय फरक पडतो. त्याला काय उत्तर द्य्वाव तेव्हा सुचत नसे आज सुचल अरे बाबा पोटातच जायचय तर मग नुसत गहु च खाउन का घेत नाहीस डायरेक्ट का तो सगळा उपद्व्याप आटा करो रोटी बनाओ फिर खाओ. शेवटी पोटातच जायचय मग का इतक्या ढीगाने रेसीपीज हव्यात का इतके कपड्यांना रंग हवे का इतके संस्थळ हवेत. अहो शॅलो पीपल डिमांड व्हरायटी या ठीकाणी लागु नाही होत.
अगरबत्ती प्रणय वाले म्हणतात जणु साधनांचा काही रोलच नाही. आता ही एक जीवनदृष्टी आहे तुम्ही तुमच घर सजवता
आनंद कसा घ्यावा एक कला आहे आर्ट ऑफ लीव्हींग आहे. त्यात रसिकतेने तुमच्या लैंगिक जीवनाला फुलवायला निरनिराळ्या साधनांची मदत होत असेल तर त्यातले धोके टाळुन मर्यादा सांभाळुन त्या साधनांचा वापर करण्यात काय हरकत आहे. हनिमुन ला का जातात मग ? कारण एक वातावरण निर्मीती हवी असते.
शेवटी प्रश्न कीती समरसुन रसिकतेने तुम्ही तुमच्या जीवनाकडे लैंगिकतेकडे बघतात किती प्रयोगशील उत्साही तुम्ही आहात ?

संदीप डांगे's picture

26 Jan 2016 - 9:45 pm | संदीप डांगे

चांगला मुद्दा दिलात मारवाजी, धन्यवाद!

पोट भरण्यासाठी अन्नपदार्थांची गरज आहे, नुसते फोटो बघून पोट भरते का? इथे मिसळपाववर वेगवेगळ्या पाककृती दिग्गज आचारी लोक टाकत असतात की तोंडाला पाणी सुटते. पण समजा माझी बायको सुगरण नसेल तर तीने करपवून टाकलेली भेंडीची भाजी मी इथल्या भरल्या भेंडीच्या फोटो व रेसीपीच्या इमॅजिनेशनमध्ये खाऊ शकतो का? काहीही झाले तरी मला ती रेसिपी तशीच खायची असेल तर बायकोला तशीच सुगरण बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बायकोला ते पटत नसेल तर भांडण होणे आणि उपाशी राहणेच नशिबी येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2016 - 2:33 am | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रतिसाद !

"उदात्त सात्विक अगरबत्ती प्रणय वाले" हे वर्गिकरण भन्नाट आहे ! :)

हनिमुन ला का जातात मग ? कारण एक वातावरण निर्मीती हवी असते. हा कळीचा प्रश्न आहे ! "मला अमुक आवडते, तमुक नाही" हे ठीक आहे. पण जेव्हा "मला अमुक अमुक आवडते आणि तेच सर्वोत्तम आहे. ते सोडून इतर काही आवडणारे सगळे तद्दन बिचारे व अज्ञानी आहेत" असा विचार ठाम होतो तेव्हा स्वमतांध अतिरेकाकडे वाटचाल सुरू होते.

"जगातली सगळी माणसे एकाच साच्यातून बनवली जात नाहीत आणि एकाच साच्यात बसवताही येत नाहीत." हे पायभूत सत्य नीट न समजल्यानेच या जगातले बहुतेक गैरसमज जन्माला येतात.

आडून प्रतिसाद देऊन उपयोग नाही. तरी देखिल `उदात्त सात्विक अगरबत्ती प्रणयवाले' या आपल्याला आवडलेल्या आणि `स्वमतांध' या स्वघोषित, पण लोकप्रिय गैरसमजांकडे लक्ष वेधू इच्छितो.

प्रश्न साधारण परिस्थितीत, आपापसात अनुबंध असणार्‍या जोडप्याला, उत्तेजनासाठी पॉर्न किंवा फँटसीची गरज आहे का? असा आहे. याचा अर्थ, ज्याला मारवा `सात्विक प्रणयवाले' म्हणतात ते शृंगार खुलवण्यासाठी काहीही करत नाहीत इतका टोकाचा काढणं, ही स्वमतांधता आहे. सामान्य प्रणयी युगुलाला एकमेकांचा सहवास प्रिय असतो त्यामुळे त्यांना फँटसीची गरज नसते कारण प्रिय व्यक्ती सन्निध असते. काल्पनिक व्यक्तीशी प्रणय करत असल्याचा फँटसी हा स्वतःलाच फसवणारा उपाय त्यांना करावा लागत नाही. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी प्रियकर गजरा आणेल, प्रेयसी स्वतः सजेल, त्याच्या प्रत्येक सादेला प्रतिसाद देऊन प्रणय रंग खुलवेल, त्याच्या आग्रहाखातर, तिच्या आवडीचं, तिला जमेल तसं एखादं गाणं म्हणेल, त्याच्यासाठी मदिरेचा चषक भरेल, दिवसा त्याच्यासाठी आवडीचं भोजन बनवेल, तो तिच्या कामात तिला मदत करेल.... अर्थात माझ्या दृष्टीनं हे स्वाभाविक आहे पण ज्यांना असा अनुभवच नाही त्यांना ते सात्विक, स्वमतांध किंवा त्या ही पुढे जाऊन `व्यक्तिगत आणि सीमित' वाटणं गैर नाही.

असो, आपण ही सूज्ञ आहात, तस्मात `आउटलायर्स' ही स्वमतांधता सोडली तर मुद्दा आपल्यालाही कळू शकेल की सामान्य प्रणयीजन पॉर्न पाहाणारच नाहीत असं नाही पण पॉर्न हा केवळ स्टार्ट-अप आहे, एकमेकांप्रती प्रेम नसेल तर प्रणयाराधन दीर्घकाल होऊ शकणारच नाही, तो केवळ उत्सर्जनाचा उपाय असेल.

अजिबात दांभिकता नसणारा मारवांचा प्रतिसाद आवडला.

तर्राट जोकर's picture

27 Jan 2016 - 12:24 am | तर्राट जोकर

हा हा हा! मस्त धागा!

अहंकाराचे फटाके, मीपणाची जुगलबंदी, हो ला हो करणारे नंदीबैल, बंदूक हातात म्हणून अम्दाधुंद गोळीबार.

चलुद्या!

चौकटराजा's picture

27 Jan 2016 - 8:52 am | चौकटराजा

हा हाहा हीहीही.....अगदी सहमत
आ चौरा ट जोकर

हा श्री. अरविंद कोल्हटकर यांचा वरील विषयाशी संबंधित लैंगिकतेकडे एकुण् जीवनाकडे रसिकतेने बघण्याचा प्राचीन भारतीयांचा दृष्टीकोण दाखवणारा सुंदर लेख अवश्य वाचावा मज सारख्या इतर सामान्य जनांना हा लेख आवडेल असे वाटते. पुर्ण लेख इथे आहे.
http://www.aisiakshare.com/node/4507

यशोधर असे सांगतो की ज्या शय्येवर नागरक आपल्या पत्नीबरोबर शृंगार करतो त्या वापरलेल्या शय्येवर न झोपणे हा शिष्टाचार. ह्यासाठी दोन शय्यांची ही सोय. गणिकेबरोबरचा शृंगार झोपण्याच्याच शय्येवेर केलेला चालत असे. शय्येच्या मागे नागरकाच्या देवांच्या मूर्ति आणि रात्री वापरून उरलेला चंदनलेप, फुलांच्या माळा, मेण ठेवण्याचा करंडा, घामाचा वास येऊ नये म्हणून वापरायची सुगन्धी द्रव्ये, तमालपत्रे, तोंडाला वास येऊ नये ह्यासाठी मातुलुंग ह्या लिंबाच्या जातीच्या फळाची साले आणि खाण्यासाठी ताम्बूल - पानांचे विडे - ठेवण्यासाठी जडावाचे लहान मेज असावे. जमिनीवर मुखरस सोडण्यासाठी तस्त - पतत्ग्रह - असावे. भिंतीवर हत्तीच्या दाताच्या खुंटीवर - नागदन्त - गवसणीमध्ये घातलेली वीणा, चित्र काढण्याचा फलक, रंगांच्या कांडयांची गुंडाळी, एखादे पुस्तक आणि कुरण्टकाच्या फुलांच्या (Amaranth) माळा असाव्यात. कुरण्टकाची फुले शय्येवर वापरण्याचे कारण यशोधर देतो ते असे की ही फुले लवकर कोमेजत नाहीत. शय्येपासून फार दूर नाही असे अस्तरण जमिनीवर असावे आणि तेथे डोके टेकायला तक्के असावेत. फाशांनी खेळायचे आणि सोंगट्यांनी खेळायचे फलक असावेत. एका बाजूस विणण्याची आणि लाकडावर कोरीव काम करण्याची उपकरणे असावीत. बाहेरच्या बाजूस पोपट-मैना-सारिका अशा क्रीडापक्ष्यांचे पिंजरे असावेत. वृक्षवाटिकेमध्ये दाट सावलीच्या जागी अस्तरण घातलेला झोपाळा असावा.

तेथून परतल्यावर ताम्बूलसेवन करावे, चन्दनाची उटी एकमेकांस लावावी आणि काही अल्पोपहार करावा. त्यामध्ये फळांचा रस, तळलेले पदार्थ, आंबवलेली तांदुळाची कांजी, मांसाच्या तुकडयांसह सूप, सुके मांस, साखरेसह संत्र्यासारखी फळे, इत्यादींचा समावेश असावा. नायकाने सहचरीसह सौधावर बसून चन्द्रप्रकाशाचा आनंद घ्यावा आणि ध्रुव, अरुन्धती, सप्तर्षि इत्यादि तारे ओळखावेत.

उगा काहितरीच's picture

27 Jan 2016 - 11:40 am | उगा काहितरीच

पॉर्न सारख्या इतक्या "सोवळ्या" विषयावर वर पण इतक्या प्रौढपणे , समंजसपणे, पायरी न सोडता चर्चा केल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. धागाकर्त्याचेही आभार. एक सामान्य मिपाकर म्हणून मिपाचा अभिमान वाटतो ते अशाच गोष्टींमुळे .

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 12:06 pm | संदीप डांगे

@संपादक मंडळ,

आपण माझे जे विधान संपादित केले आहे त्याचा संदर्भ मी दुसर्‍या प्रतिसादात दिला आहे. तो लक्षात न घेता आपण जे संपादन केले आहे त्यामुळे वाचकांचा माझ्या विधानाबाबत गैरसमज होण्याची शक्यता वाढत आहे.

ह्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती.

विधानाचा संदर्भ देऊनही आक्षेप घेणार्‍यांनी काही प्रतिसाद दिलेला दिसत नाही. हा प्रकार विधानात अभिप्रेत नसलेला अर्थ प्रचलित करण्याचा प्रयत्न आहे असे वाटते.

धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

27 Jan 2016 - 1:26 pm | मृत्युन्जय

माझ्या मते तरी वेश्या म्हणजे prostitute.

prostitute या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला असता खालील संदर्भ मिळाले

noun
1.
a person, typically a woman, who engages in sexual activity for payment.

verb
1.
offer (someone, typically a woman) for sexual activity in exchange for payment.

सनी लियोन "वेश्या" आहे की नाही ते वरील व्याख्येवरुनच ठरवावे लागेल. याबद्दल मला जास्त माहिती नसल्याने मी याबाबत फार भाष्य करु शकत नाही. परंतु एकुणात आक्षेप विधानाच्या सत्यतेबद्दल नसून औचित्याबद्दल आहे असे मला वाटते. मला तरी वाटते ते वाक्य उडाले ते बरे झाले. यावर याहुन जास्त उहापोह करण्यात काही हशील नाही,

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 2:09 pm | संदीप डांगे

परत तेच होतंय हो. सनी लियोन म्हणजे सनी लियोनसारखी 'मादक फिगर असणारी स्त्री' हा जो अर्थ डॉक्टरांनी वापरला आहे तोच मी माझ्या विधानात वापरला. जर डॉक्टरांनी वापरलेला अर्थ चुकीचा नाही तर मी वापरलेला कसा हाच प्रश्न पडला आहे.

इथे 'सनी लियोन' ह्या व्यक्तिबद्दल वैयक्तिक कुठलीही टिप्पणी नाही हे स्पष्ट असतांनाही असे वाद घालण्यात काय हशील आहे तेही मला कळत नाही. ह्या ठिकाणी मेनका, रंभा, उर्वशी असा कुठला संदर्भ डॉक्टरांनी वापरला असता तर तो मीही माझ्या विधानात वापरला असता.

आशा आहे, वाचकांना मुद्दा कळत असेल. एखादा शब्द धरून पिंगा घालणे आता तरी सोडून द्यावे असे कळकळीने वाटते.

असो. धन्यवाद!

सुबोधजींनी लेखात म्हटलंय :

ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका"
असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो.

आणि पुढे प्रतिसादात लिहीलंय :

अतिपरिचयात अवज्ञा या नात्याने आपली सुंदर बायको सुद्धा साधारण वाटू लागते. यासाठी थोड्या थोड्या काळाने आपापल्या रुटीन मधून वेगळे काही तरी करावे. यातून काही जोडपी पॉर्न बघतात आणि त्यातील विविधता आपल्या नात्यात आणण्याचा प्रयत्न करतात. अर्थात काही काळाने त्याचा हि कंटाळा येतो. असेही बर्याच जोडप्यांकडून ऐकले आहे. बरेच लोक पर्यटन करतात याचे कारणही हेच आहे कि रोजच्या कटकटीतून मुक्तता मिळाली कि आपणहून संबंधाला एक वेगळा आयाम येतो.

थोडक्यात, त्यांच्या अनुभवातून नॉर्मल कपल्सही, अतीपरिचयामुळे येणारा बोअरडम दूर करण्यासाठी, पॉर्न आणि फँटसी हा पर्याय वापरतात.

संदीप डांग्यांनी म्हटलंय :

सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर ही परिस्थितीही मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखी आहे

या प्रश्नाला मी उत्तर दिलंय पण संदीपश्रींच्या मते तो `व्यक्तीगत आणि सीमित अनुभव' आणि `अहंकारी ज्ञान प्रदर्शन' आहे. सुहासजींनी माझ्या एकूण अप्रोचवर `आउटलायर्स ' म्हणून प्रश्न निकालात काढला आहे.

संदीपजींकडे या सार्वजनिक (किंवा वैश्विक) प्रश्नाचं उत्तर आहे जे त्यांनी गेल्या दोन दशकात केलेल्या वाचन आणि सामुपदेशनातून सापडल्याचा त्यांचा दावा आहे. तस्मात, जगाला ज्ञानसंपन्न न करता पण जेवढे आवश्यक, जनहितार्थ व चर्चेस आवश्यक तेवढेच सांगून त्यांनी प्रश्न सोडवावा.

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 2:12 pm | संदीप डांगे

प्रश्न सांगा, सोडवण्याचा प्रयत्न जरूर करू... हाय काय नाय काय.

विवेक ठाकूर's picture

27 Jan 2016 - 2:42 pm | विवेक ठाकूर

प्रतिसाद न वाचताच उत्तर देण्याची घाई !

विवेक ठाकूर's picture

27 Jan 2016 - 2:46 pm | विवेक ठाकूर

सतत एकच जोडीदाराशी संग करून कंटाळा येत असेल तर त्यावर उपाय काय ?

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 3:08 pm | संदीप डांगे

सरजी, ह्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे, अजून काय पाहिजे? तुमच्या उत्तराला आमचे अनुमोदन होते, आहे व राहणारच.

तुम्हाला आयुष्यभर पुरेल अशी `मेख' वगैरे काहीही सापडलेली नाही आणि कहर म्हणजे तुम्ही स्वतःचे प्रतिसाद सुद्धा वाचत नाही. कारण माझ्या उत्तरावर तुम्ही लिहीलंय :

खास तुमच्यासाठी सांगतो, आम्हाला आमची मेख सापडली आहे, ती आयुष्यभर पुरणारी आहेच हे कदाचित माझ्या प्रतिसादांमधून आपणास कळले नसावे. अन्यथा न मागता या पद्धतीने सल्ला आपण दिला नसता. मला तुमचे विचार आवडतात, पटतात, एकच खटकते ते हे की दुसर्‍याला अज्ञानी समजून, स्वत:ला सर्वज्ञानी समजून 'अंधकार दूर करण्याच्या' थाटात अहंकारी सल्ले, उपदेश देणे. तेवढे आपल्याजवळच ठेवावे अशी विनंती. जालावर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणे आमच्या स्वभावात नाही, म्हणजे आम्ही ज्ञानी नाही असा कुणाचा समज असेल तर त्याच्याबद्दल किव वाटेल. बाकी आपण सुज्ञ आहात. स्पष्टपणे बोललो, राग मानू नये.

आणि आता म्हणतायं :

सरजी, ह्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे, अजून काय पाहिजे? तुमच्या उत्तराला आमचे अनुमोदन होते, आहे व राहणारच

पश्चात का होईना दिलेल्या अनुमोदनाबद्दल धन्यवाद. तरीही तुमच्या या शेरेबाजीचचं आश्चर्य आहेच :

प्रत्येक बाबतीत स्वतःच्या मर्यादित व्यक्तिगत अनुभवानुसार जगाला ज्ञानसंपन्न करत सुटणे माझा पिंड नाही. जेवढे आवश्यक, जनहितार्थ व चर्चेस आवश्यक तेवढेच मी चर्चेत मांडतो. म्हणून मलाच काही समस्या आहेत असे कुणी समजत असेल तर धन्य आहे.

थोडक्यात, तुम्हाला समस्या आहेत किंवा नाहीत हा तुमचा प्रश्न आहे पण एक नक्की की तुम्हाला प्रश्नच कळलेला नाही आणि दुसरा व्यक्तीगत अनुभवावर आणि सीमित ज्ञानावर लिहीतो अशी पोकळ शेरेबाजी करण्यापलिकडे तुमच्या प्रतिसादाला काहीही अर्थ नाही .

संदीप डांगे's picture

27 Jan 2016 - 4:03 pm | संदीप डांगे

ओके. धन्यवाद! अति होतंय. सांभाळा स्वतःला. गेट वेल सून.

चैतन्य ईन्या's picture

27 Jan 2016 - 4:19 pm | चैतन्य ईन्या

बाप रे किती ते शब्दछल. तुम्हाला बाकीच्यांचेच बरोबर असूच शकत नाही आणि आपण म्हणतो तेच खरे आहे असे वाटते असा माझा समज झाला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येकाची गरज वेगळी आहे हे मान्य करणे इतका का अवघड वाटते? ह्यातुन सध्या काय होतंय हे कळत नाहीये. उलट प्रतिसाद वाचून उलट विषय उगाचच ताण्यलासारखा वातातोय. तुम्हाला वाटत असलेले अगदी बरोबर आहे पण हे फार आयडियल आहे. किंवा तुमच्या जवळ खरच जुळवून घेणे किंवा आहे त्या परिस्थितीला बरोबर सामावून घेवून आनंद शोधणे आणि आनंदी राहणे हि फार मोठी देण आहे. पण दुर्दैवाने असे विचार किंवा इतके ठाम विचार बहुतांश लोकांचे नसतात. ते असायला पाहिजेल पण ते होत नाही. इतके मान्य करण्यात तुम्हाला का त्रास होतो हे जरा मला समजायला कठीण जातंय. असो.

म्हणजे कमाल आहे. त्यावर पुन्हा :

तुम्हाला बाकीच्यांचेच बरोबर असूच शकत नाही आणि आपण म्हणतो तेच खरे आहे असे वाटते असा माझा समज झाला आहे

हा निष्कर्श कुठून काढला? मी फक्त त्यांना उत्तर दिलंय.

आणि तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो, विषय ताणण्यात मला अजिबात रस नाही. प्रतिसादात उपस्थित केलेला प्रश्न, वैवाहिक जीवनातला खरोखर केंद्रिय मुद्दा आहे.

नया है वह's picture

27 Jan 2016 - 4:57 pm | नया है वह

तुम्ही तर निष्कर्श काढयाच्या आधीच त्याला निरुपयोगी ठरवुन टाकले आहे.

त्याबद्द्ल काहिच म्हणत नाही आपण?

चैतन्य ईन्या's picture

27 Jan 2016 - 5:25 pm | चैतन्य ईन्या

तिसादात उपस्थित केलेला प्रश्न, वैवाहिक जीवनातला खरोखर केंद्रिय मुद्दा आहे.>> ह्याच मुद्यावर मी पण म्हणतो आहे. प्रत्येकाला आपल्याला मिळालेला जोडीदार आहे तसा स्वीकारून आनंदात राहता यायला पाहिजेल हे तुमचे मान्य आहे. फक्त प्रत्यक्ष जीवनात तसे घडत नाही. इतकेच मान्य करणे तुम्हाला अवघड जातंय असे तुमच्या प्रतिसादावरून वाटते आहे. म्हणून निष्कर्ष तुमच्या प्रतिसादावरून वाटतोय असे म्हटले आहे हो. जरा समजून घ्या. तुमचे बरोबर आहे असेच म्हणत आहे पण तेच बरोबर आहे असा तुमचा आग्रह आहे हे जाणवत राहते. त्यातून बाकीची वेगळी बाजू असू शकते हे तुम्हाला मान्य होताना दिसत नाहीये.

होबासराव's picture

27 Jan 2016 - 3:17 pm | होबासराव

जयकांत शिक्रे तुम्हे मै नहि तुम्हारा अहंकार हि मारेगा :))

अस्वस्थामा's picture

27 Jan 2016 - 5:01 pm | अस्वस्थामा

सरांचे नेहमीप्रमाणेच सुंदर प्रतिसाद परत एकदा पाहून आमचे ड्वाल्ले पाणावले.

(फीलींग नॉस्टॅल्जिक्क)

टवाळ कार्टा's picture

27 Jan 2016 - 9:09 pm | टवाळ कार्टा

भेंडी...जे लोक म्हणतात पोर्न वैट्ट नै....त्यांनी पुरावे द्यावे चांग्ल्या पोर्नचे :D

लोकांना बाकीची पण कामं आहेत, तुला वैट्ट म्हणजे वईट्ट वाटत असेल तर बघू नकोस. =))

टवाळ कार्टा's picture

27 Jan 2016 - 9:21 pm | टवाळ कार्टा

तू गप्रांव
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊउ