शान्तिप्रिय यांचेकडून त्यांच्या लोनाड (जानवल) ची बौद्ध कालीन लेणी आणि शिवमंदिर . या लेखातून स्फूर्ती घेऊन लोनाडला भेट दिली.त्या धाग्यात फोटो बरेच होतील म्हणून लोनाड लेणी आणि शिवमंदिरचे मोबाइल ने काढलेले फोटो या वेगळ्या धाग्यात इथे देत आहे.
लेखामध्ये फोटो त्या वेळी tinypic_dot_com siteवरून टाकले होते. ती साइट सेप्टेंबर २०१९ ला बंद झाली. ( फोटोबकेटने घेतली. ) त्या अगोदर फोटो डाउनलोड न केल्याने बाद झाले. आता (२०२० जुलै ) गूगलवरून काही मोजके देत आहे.
फोटो १)
उजवीकडचे एक मोठे शिल्प.
फोटो २)
दालन
फोटो ३)
गणेश ,आताची मूर्ती आहे.
फोटो ४)
खांब.
फोटो ५)
शिवमंदिर ,जानवल. पुढचा गोल भाग नाट्यमंडप सुचवतो.
फोटो ६)
शिवमंदिर ( जानवल). तलावासाठी नुतनीकरण आराखडा.
फोटो ७)
शिवमंदिर ( जानवल).
वीरगळाचा उंबरठा केला आहे असे वाटेल. पण तसे नाही. कारण तिसरे छोटे शिल्प 'लज्जागौरी'चे आहे. संतती होण्यासाठी शंकराची लिंगपूजा >> उपवास आणि नवस करणारा भाविक >> लज्जागौरी . याची पूजा इथे होत असावी. तो मंडप वेगळा आहे.
जावे कसे?
१) मु्ंबई -ठाणे -नाशिककडे जाणाय्रा भिवंडी बाइपास रोडने - पांजरापोळ - उजवीकडे - लोनाड टेकडी.
२) कल्याणपर्यंत रेल्वे - पडघा/आमणे बसने - सावद फाटा(१० किमी) - डावीकडे -दोन किमीवर ओटो रिक्षाने लोनाड टेकडी. कल्याण-पडघा बस दर वीस मिनीटांनी असतात.
रस्ते उत्तम आहेत.
पडघा येथे चंद्रपूरची वीज येते.रविवारी बाजार असतो.मे महिन्यातले शेवटचे रविवार मोठे बाजार असतात.सुकट,भात लावणीची डोरली वगैरे गावकरी खरेदी करतात.खडवली रे स्टेशनपासून चार किलोमीटर आहे.सकाळी खडवली-नदीकाठचा स्वामीमठ-पडघा-लोनाड -कल्याण असे करता येईल.
प्रतिक्रिया
24 Jan 2016 - 9:28 pm | यशोधरा
सुरेख आहेत फोटो.
पाव वगैरे टाकून खराब केलेले कुंड पाहताना वाईट वाटले.
24 Jan 2016 - 9:44 pm | पैसा
सुरेख फोटो! वीरगळाचा तुकडा मूळ उंबरठ्यावर नुसताच ठेवलाय. त्यावर कोरलेल्या शिवलिंगावर आपण पाय ठेवून आत जातो असे गावकर्यांच्या लक्षात आले नाही आश्चर्य आहे!
24 Jan 2016 - 10:48 pm | मदनबाण
फोटो कंप्रेस करुन टाकल्यास धागा उघडल्यावर फोटो लोड होण्यास बराच वेळ घेणार नाही....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big World
24 Jan 2016 - 11:26 pm | प्रचेतस
ओह्ह फ्याण्टास्टीक.
दरवाजात असलेली पायरी वीरगळाची नाही. माझ्या मते तो द्वारपट्टीकेवरील भाग असावा. उजव्या बाजूला चक्क लज्जागौरी आहे.
बाकी लोनाड/जानवलच्या जवळ विहरोली नावाचे गाव आहे का? अपरादित्याच्या शिलालेखात वेहरोली ग्रामानामाचा उल्लेख आला आहे. जो सरळ सरळ 'विहार' ह्याचा अपभ्रंश आहे. जो लोनाडच्या बौद्ध लेणीतला विहार असावा.
कार्ला लेणीच्या पायथ्याला असंच विहिरगाव नामे गाव आहे जे इथल्या लेणीतल्या बौद्धविहाराचे अपभ्रष्ट स्वरुप आहे.
25 Jan 2016 - 6:44 am | कंजूस
#फोटो कंप्रेस --केविलवाणे होतात.वेबसाइटवरचे फोटो दोन एमबीचे आहेत.इथे तिनशे केबी.धाग्यातले फोटो पंधराच्या वर गेले की लवकर उघडत नाही.अशा वेळेस तोतो सेव करून नंतर इमेजिझ बंद करून पुन्हा उघडतो व प्रतिसाद देतो.
#दरवाजात असलेली पायरी वीरगळाची नाही. माझ्या मते तो द्वारपट्टीकेवरील भाग असावा. उजव्या बाजूला चक्क लज्जागौरी आहे."-----
- पटलं.वीरगळाचचा दगड तुटला तरी इतका कापीव तुटणार नाही.त्यावेळचा राजा शिवपुजा करत आहे असं शिल्प असावं."उजवीकडची लज्जागौरी आहे"-यानंतर कुठेही गेलो की सर्वच शिल्पांचे फोटो घेत जाईन.एखादं शिल्प बराच पुरावा देऊ शकतं.पंढरपुरच्या मंदिराच्या नामदेव पायरीच्या आजुबाजूची जोत्यावरची शिल्पपट्टी ते अगोदर शिवमंदिर होते हे दर्शवते.
25 Jan 2016 - 6:45 am | कंजूस

25 Jan 2016 - 9:10 am | शान्तिप्रिय
मस्त फोटो. अतिशय अभ्यासू माहिति. कन्जूस आणि प्रचेतस.
मनापासुन धन्यवाद .