लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in काथ्याकूट
11 Jan 2016 - 12:41 pm
गाभा: 

21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....

बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.

सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.

बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.

संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.

पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.

अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.

इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.

उपाययोजना:

कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.

मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.

स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.

जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.

तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.

थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 12:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.

हे समजले नाही, काय केले नेमके सोशल नेटवर्किंग ने?

लग्नं टिकले नाही तर इतका काय फरक पडतो ?
न पटणारी ओझी कशाला वाहत बसायचे?

सत्याचे प्रयोग's picture

11 Jan 2016 - 2:32 pm | सत्याचे प्रयोग

नाही पटले तरी रिकामी ओझी वाहावी लागतात हो. एका जबाबदारीतून दुसर्‍या जबाबदार्‍या वाढलेल्या असतात. भावनिक रित्या अडकून पडतो माणुस उदा. मुले त्यांचे शिक्षण, संगोपन.

असंका's picture

11 Jan 2016 - 3:30 pm | असंका

+१

लग्न का टिकायला हवं याबद्दल लेखात काहीच लिहिलेलं नाही.

अजून एक सल्ला - स्वानुभवावरून.
नवरा-बायकोच्या भांडणात शक्यतो तिसर्‍याला घेऊ नये. वाद चिघळतात.

-असो.

ब़जरबट्टू's picture

11 Jan 2016 - 1:13 pm | ब़जरबट्टू

यावर मूवी यांचा ऐतिहासिक हजारी धागा झालेला आहे.. आता परत नको... :)
आभार ...

बाकी कुठलेही घटक कसेही असले तरी त्यांनी काही फरक पडत नाही.

alokhande's picture

11 Jan 2016 - 3:27 pm | alokhande

आपल्या मराठीतील तु ही रे ह्या सिनेमात सई ताम्हणकरच एक वाक्य आहे त्यात ति असे म्हणते की , "नवरा हा प्रसादाच्या शिरा सारखा असतो त्यात तुप किती आहे बेदाणे किती आहेत तो गोड असतो का नाही हे विचारायच नसते जसा आहे तसा खायचा " आपल्या आई वडिलांनी ही संसार केलाच की होता आणि टिकवून ही दाखवला . माझ्या मते नात्यांची खरी मजा ही त्यांना उलगडण्यात आहे

लाटकर काकांनी मिपाची वैचारिक पातळी उंचावण्याचा आणि प्रबोधन करण्याचा निर्धारच केलेला दिसतोय.
काय भारी भारी विषय काढताहेत चर्चेसाठी.

तुमच्या प्रयत्नात सुयश लाभो.

होबासराव's picture

11 Jan 2016 - 4:22 pm | होबासराव

हेला काकानां किति विषयात गती आहे नाही !!
अगदी अथ पासुन इति पर्यंत्....आपली तर मती कुंठित होते बॉ.
कॉलिंग णिसो सर....

नाखु's picture

11 Jan 2016 - 5:08 pm | नाखु

बरोबर अकु आले तर धाग्याला उंचीच काय खोलीही प्राप्त होईल...

चावडी प्रेक्षक+मती गुंग नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 5:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

गाववाले तुम्ही "हेला" "हेला" करू नोका राजेहो लैच हसं येते गळ्या!!

हां तुम्हाले समजल बाकी कोनाले नका सांगु :)

प्रसाद१९७१'s picture

11 Jan 2016 - 6:18 pm | प्रसाद१९७१

असं कोणाच्या नावाला हसणे बरोबर नाही बाप्पु

होबासराव's picture

11 Jan 2016 - 6:33 pm | होबासराव

बाप्पु कोणाच्याच नावाला नाहि हसत आहेत....आता ते कशाला हसत आहेत हे उलगडुन नाहि सांगता येणार :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 6:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ तुम्ही नका टेंशन घेऊ, तितके मला नक्कीच समजते :)

_____/\_____

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 6:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

कॉमेंट प्रसाद१९७१ साहेब ह्यांच्यासाठी होती हेवेसांन

होबासराव's picture

11 Jan 2016 - 6:53 pm | होबासराव

राजा बाप्पु तुमच्या समजदारीवर न्हाय हो शक करत्...तो परति-साद तर राजा परसाद भौ ले होता ना

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Jan 2016 - 6:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे हाव! तुमाले थोड़ीच काही म्हणू राहलो देवा ! ,त्याइलेच म्हणले टेंशन नका घेऊ

एका शब्दावर जर सात उपप्रतिसाद होत असतील तर अर्थ कळायला हवा, निदान व्यनित तरी!! ;)

प्रसाद१९७१'s picture

13 Jan 2016 - 4:52 pm | प्रसाद१९७१

सोन्याबाप्पु - मी गमतीत लिहीले होते. पण सुड साहेब म्हणतात त्याप्रमाणे अर्थ सांगायला पाहिजे. हेला काकांना पण कळेल ना त्यांच्या नावाचा अर्थ.

सतिश गावडे's picture

11 Jan 2016 - 10:53 pm | सतिश गावडे

=))

हेमंत लाटकर's picture

13 Jan 2016 - 9:28 am | हेमंत लाटकर

गाववाले तुम्ही "हेला" "हेला" करू नोका

बालीश विनोद. येथे हेला म्हणजे हेमंत लाटकर. तुम्हाला काय म्हणायचे ते मला कळले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jan 2016 - 11:54 am | कैलासवासी सोन्याबापु

असो! विनोद होता इतके समजून घेतलेत ते खुप झाले काका! माफ़ी मागतो तुमची! जरा अस्थानी पण परिस्थितीजन्य विनोद केल्या बद्दल !!

There are three stages of Marriage namely

MAD for each other /
MADE for each other /
MAD because of each other.
-------

आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. काही वेळेला वाद विवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन.

"Argument is bad but Discussion is good,
Because Argument is to find out WHO is right.. &
Discussion is to find out WHAT is right.."
----------
नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम - खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. बघा विचार करून.
------------
खऱ्या प्रेमात त्याग करायची तयारी असावी लागते.
----------
चांगुलपणा बरोबर unpredictable पणा जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात .
------------
ज्या वेळी महिलांना बरोबरीचा दर्जा खऱ्या अर्थाने प्राप्त होईल, त्या वेळी जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज भासणार नाही
--------------------
नवरा - बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या.
-------------------
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती - कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे.

बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.

सुखी वैवाहिक जीवनासाठी त्याग करायची तयारी आहे का ? असल्यास किती ह्याची सीमा रेषा आखा आणि त्याग करण्याची सवय अंगी बाणवा. त्यानंतरच लग्नाचा विचार करा.

प्रत्येक प्रेम विवाह यशस्वी होत नाही कारण निर्णय बरेच वेळा फक्त चांगल्या बाजूचा विचार करून, बेनिफिट ऑफ doubt देऊन घेतलेला असतो. प्रेम जरी आंधळे असले तरी लग्नाचा निर्णय घेताना बुद्धी आंधळी होणार नाही ह्याची काळजी जरूर घ्या.

जोडीदाराला गुण आणि दोषांसकट स्वीकारले तरच वैवाहिक आयुष्य सुखाचे जाते. अर्थात काही दोष स्वीकारण्याच्या पलीकडचे असतात हे मान्य करावेच लागेल.

विवेक ठाकूर's picture

11 Jan 2016 - 4:40 pm | विवेक ठाकूर

हे असलं की मग स्वीकार अस्वीकार असे प्रश्नच उरत नाहीत.

A women you love is a part of you, she is not separate. So it is impossible to say that I accept this in her & reject that of her. Her company is a magic your life & your company is romance for her.

विवेक ठाकूर's picture

11 Jan 2016 - 4:44 pm | विवेक ठाकूर

your company is romance for her.

जिन्क्स's picture

11 Jan 2016 - 5:47 pm | जिन्क्स

हे फारचं पुस्तकी झालं हो.

विवेक ठाकूर's picture

11 Jan 2016 - 6:00 pm | विवेक ठाकूर

मी स्वतःचा अनुभव शब्दबद्घ केला आहे .

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 4:30 pm | पिलीयन रायडर

त्यापेक्षा लग्नच न केलेलं किती सोप्पं.. आधी लग्नालायक माणुस मिळवा.. त्यालाही आपण लग्नालायक वाटलो पाहिजे असं बघा.. मग हे घरच्यांनाही पटलं पाहिजे, ते जमवा.. मग भरपुर पैसे खर्च करुन लग्न करा.. आणि मग तडजोडी करत ते टिकवा..

त्यापेक्षा लग्नच करु नका..

माझ्या माहितीत हा निर्णय वेळेतच घेतलेले दोन हुषार तरुण आहेत.. खुपच आनंदात दिसतात ते..!

असंका's picture

11 Jan 2016 - 4:34 pm | असंका

+१..
अगदी बरोबर!! लग्न होतं हेच प्रमुख कारण असलं पाहिजे लग्न न टिकण्याचं!! लग्नच झालं नाही, तर न टिकण्याचा प्रश्नच नाही!!

त्यापेक्षा लग्नच न केलेलं किती सोप्पं.. आधी लग्नालायक माणुस मिळवा.. त्यालाही आपण लग्नालायक वाटलो पाहिजे असं बघा.. मग हे घरच्यांनाही पटलं पाहिजे, ते जमवा.. मग भरपुर पैसे खर्च करुन लग्न करा.. आणि मग तडजोडी करत ते टिकवा..

अगदी हेच लिहायला आलो होतो, पण म्हटलं जाऊ देत.

चैतन्य ईन्या's picture

11 Jan 2016 - 5:05 pm | चैतन्य ईन्या

बहुदा अजून १०-१२ वर्षात हीच परिस्थिती येणार आहे. फुकटच्या गोष्टी कशाला अडकून ठेवा. आपण तर पोरांना सरळ सांगणार आहोत. अजिबात लग्नाच्या भानगडीत पडू नका. काही बिघडत नाही. जन्मभर वैताग करण्यापेक्षा सरळ सोपे वेगळे राहिलेले बरे. नाहीतरी लई जनता आहे कि जी पोरे जन्माला घालतेच त्यामुळे उलट लोकसंख्या कमी झाली तर जरा जीवन सुसह्य होइल

जिन्क्स's picture

11 Jan 2016 - 5:49 pm | जिन्क्स

मला वाटतं तै नी ते उपरोधाने लिहिले आहे. Sarcasm you see

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 5:53 pm | पिलीयन रायडर

अजिबात नाही..
अगदी सरळ स्वच्छ आणि निर्मळ मनाने लिहीले आहे..

लग्न हे नसत्या कटकटींना आमंत्रण असते हे माझे अगदी ठाम मत आहे.

खरय. मला तरी सर्क्यासटीक टोन वाटला नाही. खूप कमी जोडपी असतात जी मेड फॉर असतात. बाकी सगळे ओझ्याची बैलच असतात. आणि आपली संस्कृति नावाची गोष्ट प्रचंड दांभिक आहे. खरे बोलायची चोरी आहे आणि सतत बाकीचे काय म्हणतील ह्या नावाखाली भरपूर जबरदस्ती होती. मला सगळ्यात गम्मत आई- बापांची वाटते. आपले पोरगा/पोरगी ह्यांना लग्न ह्या वर ते काहीही सांगत नाहीत. फारच कमी लोक सांगतात असा माझा तरी अनुभव आहे. फुकट आह्मी असे सहन केले अहामी कसे adjust झालो वगैर ऐकवत राहायचे. त्याने कोणाच फायदा होतो काय माहिती. त्यापेक्षा आपल्या चुका नक्की कोठे आपण आणि आपली बायको/नवरा कमी पडलो हे सांगायला धजावत नाही. असो.

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 6:09 pm | पिलीयन रायडर

जोडपी नुसती मेड फॉर / मॅड फॉर किंवा मोल्ड फॉर.. एच अदर.. असुन काही फायदा नाही. आख्खेच्या आख्खे खानदान एकमेकांसाठी मेड फॉर असेल तर कदाचित लग्न फार आनंददायी गोष्ट असु शकेल..

मी आणि माझा नवरा अगदी मेड फॉर आहोत.. तरीही लग्न का केलं असा प्रश्न आम्हाला पडतोच. लग्न.. संसार.. नातेवाईक.. त्यामुळे येणारे (थोडेसे) चांगले (बरेचसे) वाईट प्रसंग.. छळवाद असतो नुसता..

कसं असतं की नुसए दोघं एकमेकांच्या प्रेमात असतात तोवर ठिके.. बाकीच्यांची जशी एंट्री होते तशी गाडी घसरायला लागते. मुळात भारतात लोक दुसर्‍याच्या संसारात फारच लुडबुड करतात म्हणुन हा सगळा वैताग आहे. आपण बरं आपलं काम बरं असा विचार लोकांनी केला तर कदाचित इतका त्रास होणार नाही..

आता मुळात एखाद्याला पार्टनरच भिकार मिळाला तर मात्र आयुष्य फार फार वैतागवाडी होऊ शकतं..

स्मिता चौगुले's picture

13 Jan 2016 - 11:43 am | स्मिता चौगुले

पिराताई.. तुझा हा प्रतिसाद म्हणजे प्रत्येक विवाहित(मेड फोर एअच अदर इ.) जोड्प्याची सध्य परिस्थिती दर्शवतो..

प्रसाद१९७१'s picture

13 Jan 2016 - 4:54 pm | प्रसाद१९७१

पिराताई - मेड फॉर इच अदर जोडप्यांची ही परिस्थिती तर तसे नसलेल्यांचे काय हाल होत असतील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2016 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

>>>>बाकीच्यांची जशी एंट्री होते तशी गाडी घसरायला लागते. मुळात भारतात लोक दुसर्‍याच्या संसारात फारच लुडबुड करतात म्हणुन हा सगळा वैताग आहे.

अगदी खरं आहे.

-दिलीप

माझ्या माहितीत हा निर्णय वेळेतच घेतलेले दोन हुषार तरुण आहेत.. खुपच आनंदात दिसतात ते..!

हाय भारतात परवानगी नव्हती ना ! तरिहि बराय

पिलीयन रायडर's picture

11 Jan 2016 - 10:50 pm | पिलीयन रायडर

Ha ha ha..

Don vegvegale tarun ho!

सुधीर वैद्य's picture

11 Jan 2016 - 4:40 pm | सुधीर वैद्य

स्त्रियांनी खालील वाक्याचा मनापासून विचार करावा हि विनंती .

A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when she’s happy and laughs when she’s afraid. Her love is unconditional!! There’s only one thing wrong with her, she sometimes forgets what she is worth….

फार महत्त्वाचा घटक आहे .

लैंगिकता हा मध्यवर्ती घटक आही विवाहसंस्थेचा.
लगिकता टाळुन हा विषय कसा पुढे जाऊ शकतो.
अर्थात इतर ही घटक आहेतच मला वाटत एक जे सर्वाधिक महत्वाच कारण असत
ते एकाच व्यक्तीला सोर्स सर्व गरजांचा सोर्स बनवंण वा शेअरींग चा सोर्स बनवण म्हणजे सुख दु:ख आनंद सेक्स आवड निवड छंद करीयर शिक्षण सर्व सर्व महत्वाचे घटक एकाच ठीकाणी शेअर वापर करण्याची सक्ती कालांतराने बोअरडम निर्माण करत असावी. म्हणजे जे काय आता आहे ते हा कींवा ही यांजकडेच मागा दया शेअर करा. समवेत भोगा. मग माणुस मुळात अस होत की ठीक आहे माझा नवरा आहे पण आता याच्याबरोबर माझ उदा. गाणं आहे समजा एक उदा. काय शेअर करणार तो समजा त्यात शुन्य आहे किंवा रस नाही म्हणा त्याला काही इतर बाबीत असेल तर नाही आता सक्ती आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तोच तो तेच ते तेच ते एक कविता नाही का ?
शॅलो पिपल डिमांड्स व्हरायटी असा आक्षेप चुकीचा होतो.
एक यांत्रिकता नात्या मध्ये येते. ही यांत्रिकता भयावह असते कधी जाणवली तर. निरीक्षण करुन बघितल तर लक्षात येत. जोडप्य्यांची रोमँटीक होण्याची ठराविक ठिकाणी ठराविक संवाद मग तोच क्रम सर्व म्हणजे जोडपी एकमेकांचा इतका जबरदस्त सराव होतो. इतका प्रेडीक्टेबल नवरा वा बायको होऊन जातात मग एक यांत्रिकतेमुळे तेच ते तेच ते मुळे बोअरडम निर्माण होतच. मग स्पाइस अप करण्याचे प्रयत्न होतात पुन्हा जव़ळीक काही का़ळाने स्पाइस अप पण प्रेडीक्टेबल होऊन जात. त्यात पण यांत्रिकता. लग्न केवळ ओढल फरफटत नेतात लोक वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष
मध्ये काहीतरी मुल समाज नोकरी सेक्स छंद रुटीन काहीतरी टाकुन दोन गडी मध्ये काहीतरी रुमाल टाकुन वर्षानुवर्ष खेळ सांभा़ळुन ठेवतात सो कॉल्ड विवाह सुरुच राहतो
प्रत्येक मनुष्याची उर्मी संवेदना वेग़ळी शिवाय ती सतत बदलत राहते त्यात अशी सक्ती
विवाहसंस्था एक जोक आहे
असो

चैतन्य ईन्या's picture

11 Jan 2016 - 11:10 pm | चैतन्य ईन्या

वा एकदम योग्य विश्लेषण. इथेच आपले लोक मार खातात. फुकाच्या चांगुलपणा आणि उगाचच एक पती/पत्नीव्रता वगैरे गोष्टी डोक्यात ठासून भारावेलेल्या आहे. अर्थात त्यात मुलांचा फायदा असतो. कारण त्यांना दोघांची गरज असते आणि मग होतो तो सगळा मुलांसाठीचा खेळ. ते लोढणे ओढत राहणे हेच जीवन बनून राहते.

वैवाहिक प्रणय हा नुसता शरीर संबंध नाही. कदाचित तुम्हाला सार्थक प्रणयाची कल्पना दिसत नाही.

सार्थक प्रणयाचे तीन पैलू आहेत. एक, पारस्पारिक अनुबंध, दोन, अपराध शून्य चित्तदशा आणि तीन, समय शून्यता. हे तीन पैलू एकत्र येणं हा अत्यंत दुर्लभ योग आहे आणि तो केवळ वैवाहिक संबंधातच येणं शक्य आहे.

एकमेकात बेतहाशा प्रेम असेल तर प्रणायात घेण्याऐवजी देण्याची कृतार्थता येते आणि ती प्रणयाची खरी खुमारी आहे. अपराधशून्य चित्तदशा केवळ वैवाहिक प्रणयातच असू शकते ही उघड गोष्ट आहे. आणि समयशून्यता म्हणजे दोघांच्याही मनावर वेळेचं कुठलंही दडपण नको. या तीन गोष्टी सिद्ध झाल्या तर आणि तरच.... प्रथम स्त्री तृप्त होते आणि मग पुरुष तृप्त होतो. या तृप्तीचं नांव सार्थक प्रणय आहे.

अशा सार्थक प्रणयानंतर स्त्रीला पहिल्यांदा आपल्या स्त्री देहाचा अभिमान वाटू लागतो, ती परी होते. आणि पुरुषाला पत्नीबद्दल कृतज्ञता वाटू लागते. ते एकरुप होतात. आणि मग प्रत्येक प्रणय हा वेगळा रंग होतो, त्यात कधीच तोचतोपणा येत नाही. या एकरुपतेतून मग वैवाहिक जीवन खुलत जातं. किरकोळ मतभेद, भिन्न आवडीनिवडी, एवढच काय पण पराकोटीला गेलेले कलह सुद्धा मग एकमेकांना दुरावू शकत नाही.

लिहायला फार सुंदर आहे हे!!

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 9:14 am | सुबोध खरे

सूड राव
ते ठाकूर साहेब फार सुंदर भाषेत लिहितात. तशी भाषा मला येत नाही पण त्यांनी जे काही लिहिले आहे ते सत्य आहे.
साधे तुम्ही जर एक पेटी आणि एक तबला घेऊन गायला बसलात आणि तुमचे सूर जुळले तर मैफिलीत स्वर्ग उभा करू शकता. तेच एक जण बेसूर असेल तरी मैफिलीचा बेरंग होतो.
तुमचा साथीदार अल्लारखा किंवा गोविंदराव पटवर्धन नसतो पण त्याची गरज नसते. आपल्याला येणारे रागच किंवा तालच वाजवायचे असतात आणि मैफिलीचा आनंद लुटायचा असतो.

चतुरंग's picture

12 Jan 2016 - 6:19 pm | चतुरंग

एकदम बरोबर! :)

(लग्गीतला जाकिटहुसेन्)रंगा

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2016 - 10:59 am | पिलीयन रायडर

लग्ना करुन ठेवलेले शाररिक संबंधच फक्त नैतिक दॄष्ट्या योग्य आहेत, आणि म्हणुन त्याच संबंधात "अपराधभाव" नसतो हे चुक आहे. तुमची नीतीमत्ता तसं सांगते म्हणुन तुमच्या मेंदुपुरतं ते योग्य आहे. पण मुळात ज्यांना हे मान्य नाही ते लग्ना बाहेरही तुम्ही म्हणताय तसा प्रणय अनुभवु शकतात.

सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी काही नाही..

हेमंत लाटकर's picture

12 Jan 2016 - 11:20 am | हेमंत लाटकर

सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी काही नाही..

लग्न न करता पार्टनरकडून जे मिळते त्यात समाधान नसते. त्यात एकमेकाकडून फक्त सुख घेणेच असते. त्या सनीबाईंना विचारा ती जे करत होती त्यातून खरेच सुख मिळत होते का? तर मग तिने लग्न का केले.

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2016 - 11:22 am | पिलीयन रायडर

काका.. सनीबाइ जे करत होत्या तो त्यांचा "व्यवसाय" होता.. जीवनशैली नाही..

गंमतीचा भाग म्हणजे सनीबाईंनी ज्याच्यासोबत अधिक "व्यवसाय" केला त्याच्याशीच लग्न केलं.

सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी काही नाही..

लाख वेळा सहमत. अर्थात विवाह म्हणजे "पवित्र बंधन" असं मत असणार्‍यांना ते पटणार नाही.

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 12:11 pm | सुबोध खरे

पि रा ताई
सगळा मेंदूचाच खेळ आहे.
भरपूर पैसे खाऊनहि लोक उजळ माथ्याने आणी निलाजरेपणाने वावरतातच कि. त्यांना त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही असं थोडीच आहे?
मुलं जन्माला येतातच, औरसत्व महत्त्वाचं असतं. एकदा तेच अमान्य केलं कि प्रश्नच मिटला.
रांगेत उभा राहून तिकीट घेतलं काय कि मागच्या बाजूने खिडकीतून एक नोट सरकवून घेतलं काय? सिनेमा तोच असतो.

मुलं जन्माला येतातच, औरसत्व महत्त्वाचं असतं. एकदा तेच अमान्य केलं कि प्रश्नच मिटला.

मुलांचं औरसत्व ठरून आपली संपत्ती आपल्याच अपत्याकडे जावी म्हणून तर विवाहसंस्था स्विकारली गेली. अर्थात ती फुलप्रुफ नाहीच. ;)

एका इंग्रजी पुस्तकात वाचलं व्हतं,
You can enjoy sex without love, but you can't enjoy love without sex!

संदीप डांगे's picture

19 Jan 2016 - 10:45 pm | संदीप डांगे

त्या इंग्रजी पुस्तकवाल्याला लव, सेक्स अन् एन्जॉयमेंट ह्या तिन्हीबद्दल पुरेशी अनुभूती नाही असे दिसते...

DEADPOOL's picture

19 Jan 2016 - 11:23 pm | DEADPOOL

माझ्या मते आपल्यापैकी त्यालाच जास्त अनुभूति असेल!

काही लग्न बिग्न नको. पार्टनर बरा नसेल तर नात्यातून बाहेर पडणे चांगले पण एकूणच एक जोडपे, एक संसार करायचा असे साधे सरळ गणित कुठे असते? संसाराचा भरपूर पसारा असतो. तो मांडायचा, चालू ठेवायचा व वृद्धत्व आलेतरी चालूच ठेवायचा. आपल्याबरोबर संसार संपतो. ज्या महिलांना/पुरुषांना काही कारणाने एकट्याला गाडा ओढावा लागतो त्यांची दमछाक होतेच पण अगदी एकोप्यानं संसार करणार्‍यांचीही होते. लग्न केलं म्हणून घर घ्या/ रेंट करा मग मुलेबाळे, त्यांच्या शाळा, आपल्या नोकर्‍या, म्हातारपणाची सोय. वाहने, कपडे, फर्निचर, स्वयंपाकघराचे सामान, हौसमौज, अपेक्षा/ अपेक्षाभंग, आजारपणे यासगळ्यात भोवंडून गेला नाही असा संसार नसेल. थोडे कमीजास्त असेल तेवढेच! मी पुढीलजन्मी माझ्याच नवर्‍याबरोबर लिव्ह इन रिलेशिपमध्ये मुलाबरोबर राहणार. ;)

सस्नेह's picture

12 Jan 2016 - 12:33 pm | सस्नेह

मुलेबाळे, त्यांच्या शाळा, आपल्या नोकर्‍या, म्हातारपणाची सोय. वाहने, कपडे, फर्निचर, स्वयंपाकघराचे सामान, हौसमौज, अपेक्षा/ अपेक्षाभंग, आजारपणे

रेवाक्का, लिव्ह इन रिलेशिपमध्ये हे सगळं नसतं ? म्हातारपणाची सोय ऑपॉप होते की काय ?

सांगायचा उद्देश हा की ह्योच नवरा आणि मुलगा पायजे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2016 - 7:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सांगायचा उद्देश हा की ह्योच नवरा आणि मुलगा पायजे.

=)) =)) =))

अता चिंग्याच्या किंवा तत्सम टिनेजांच्या मस्तीच्या तक्रारी करणार नै म्हणजे तुम्ही? =))
चिंग्याला नक्की दाखवा हा प्रतिसाद. =)) =)) =))

विवेक ठाकूर's picture

13 Jan 2016 - 7:25 am | विवेक ठाकूर

सांगायचा उद्देश हा की ह्योच नवरा आणि मुलगा पायजे.

अशा लिव-इनलाच लग्न म्हणतात !

असं कसं चिमणेश! तक्रारी करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. टीनएजरांच्या तक्रारींचं काही सांगू नकोस. लग्गेच सुरु करीन पण हा धाग्याचा विषय नै ना!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2016 - 9:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

असं कसं? काढाचं ओ तुम्ही धागा. किंवा लट्टुकाकांना सांगु हाँ आपण काढायला. टिनेजरांच्या वैट्टं सवयी आणि देशहित वगैरे वगैरे. सखोल अभ्यास आहे त्यांचा ते टिनेजर असल्यापासुन.

राजेश घासकडवी's picture

12 Jan 2016 - 5:37 am | राजेश घासकडवी

आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.

पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.

पूर्वी कित्ती कित्ती छान होतं नै, मुली शिक्षितच नव्हत्या, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीच नव्हत्या. त्यामुळे नवऱ्याने कसंही वागवलं तरी झक मारत त्यांना लग्न टिकवून ठेवावंच लागायचं. न ठेवून सांगतात कुणाला? त्यामुळे खरं तर मुली शिकल्या आणि नवऱ्याची एकाधिकारशाही संपली ही खरी जाचणारी कारणं दिसताहेत...

एके काळी मिपावर ज्या पाशवी शक्ती होत्या त्यांनी या वाक्यांबद्दल फाडून खाल्लं असतं... गेले ते दिवस.

आणि हो, लग्न ही टिकवून ठेवण्याजोगी गोष्ट का आहे हे सांगितलेलंच नाही. एक अमेरिकन म्हण आहे - डोंट व्हॉट एयंट ब्रोकन. कदाचित पूर्वीच्या काळी चुकीच्या कारणांसाठी लग्नं टिकून राहायची. आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्यामुळे कोणी त्याबद्दल बोलायचंही नाही. आता तो प्रश्न सुटून कदाचित चांगली परिस्थिती आली आहे. मग जे सुधारलंय ते का बदला?

हेमंत लाटकर's picture

12 Jan 2016 - 7:52 am | हेमंत लाटकर

भारतात अमेरिकन संस्कृती येत आहे. नवरा/बायको नको फक्त पार्टनर पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नानंतर येणार्या जबाबदार्या टाळून मृगजळाच्या मागे धावणे. तरूणपणी हे सर्व चांगले वाटते परंतू वयाच्या एका टप्प्यावर याचाही कंटाळा येतोच. जे लग्न करत नाहीत ते सुखी आहेत हे कसे काय कळते. सुखी सदरा ही कथा सर्वांना माहितच असेल.

चतुरंग's picture

12 Jan 2016 - 6:26 pm | चतुरंग

मुळात "अमेरिकन संस्कृती" भारतात येत आहे हाच गैरसमज आहे. अमेरिकेत काही सगळे जिकडेतिकडे लिव इन मध्ये असतात असा तुमचा समज आहे की काय? अहो हेलाकाका, व्यवस्थित २०-२०, २५-२५ वर्षे संसारी लोक सगळीकडेच असतात. मुलं बाळं, नातवंडं, त्यांची अंगडी टोपडी सगळं सगळं "भारतीय संस्कृतीप्रमाणे" करणारे लोक इथे ढिगाने आहेत.
मुळात कोणत्याही मनुष्याला नैसर्गिकरीत्या काही स्थैर्य आवश्यक असतेच, अगदीच भटकणारे असतात परंतु ते अपवादच, त्यासाठी संसाराची जबाबदारी तुम्हाला अँकर करते.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jan 2016 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा

लट्टू काका , तुम्ही टनाटन संघटनेत जा! एकंदरीत छान जमेल तुमच तिथे. एष धर्म: टन्ना टन्न: टनाटन फ्राय!

वास्तविक लिव्ह इन रिलेशन हे फक्त लिट्मस टेस्ट म्हनु शकता तुम्हि तुम्हाला योग्य वाटतो त्या जोडिदारा बरोबर लिव्ह इन रिलेशन रहा काहि दिवसांनि तुम्हालाच समजेल कि आपले ह्याच्याबरोबर मानसिक, लैंगिक, सांसारिक जुळु शकते कि नाहि, मग जर जुळत असेल तर पुढे लग्न कराव नाहितर सरळ वेगळे होउन दुसरा जोडिदर बघावा. पण लग्न हे केलेच पहिजे लिव्ह इन मध्ये पुर्ण आयुष्य निघत नाहि आणि ते कढु हि नये.

काय दादा कसे आहात? फार वेळ लावलात यायला?

यमगर्निकर's picture

16 Jan 2016 - 3:07 pm | यमगर्निकर

:-)

नाखु's picture

18 Jan 2016 - 10:29 am | नाखु

संपायला आल्याव्र ईंट्री घेतलीत ???? का नाराज आहात मिपावर...

यमगर्नीकर यांच्या लेखाच्या प्रतिक्षेत असलेला

मिपाकर नाखु

असंका's picture

18 Jan 2016 - 11:36 am | असंका

+१

लिहा हो दादा...लय दिसांपासून वाट बघतोय...

सुधीर वैद्य's picture

12 Jan 2016 - 8:39 am | सुधीर वैद्य

भांडण नेमके का होते ?

नवरा - बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या. अधिक माहितीसाठी माझा लेख ' लग्न पूर्वतयारी' वाचा. लिंक http://www.spandane.com/Event%20Management/Marriage/Marriage_Expectation...

एका मर्यादे पर्यंत पुरुषांना बायकांची भावनिक गुंतवणूक आवडते. पण त्याचा अतिरेक होता कामा नये. कुठे - कधी - कसे थांबावे (व्यापक अर्थ अपेक्षित) हे जर स्त्रीला कळले, तर वैवाहिक जीवनात प्रश्नच निर्माण होणार नाहीत.

नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम - खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. बघा विचार करून.

दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय अनेक लोकांना असते, कारण त्यांना मी आणि माझे ह्यात जास्त रस असतो. इतर सर्व लोक हे केवळ आपल्याला सेवा देण्यासाठी आहेत असा त्यांचा ग्रह असतो. मी गृहीत धरतो म्हणजे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा युक्तिवादही केला जातो. जेव्हा आपल्याला दुसऱ्याकडून गृहीत धरले जाते, तेव्हा आपण नेमके कसे वागतो ? असा विचार केला पाहिजे. असे झाले तर परिस्थितीत नक्की सुधारणा होईल.

नाते आणि पैसा दोन्हीही आपापल्या जागी योग्यच. पण नात्यात पैसा आला किवा पैशात नाते लुडबुड करायला लागले कि प्रश्न निर्माण होतो.

संवाद करायला माणूस २ वर्षांचा असताना शिकतो. पण काय बोलावे , कसे बोलावे, काय बोलू नये वगैरे शिकायला कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो.

आपण जेव्हडे दुसऱ्यावर अवलंबून राहतो (प्रेमाचा बुरखा पांघरून) तेव्हडे आपण स्वत:चे नुकसान करत असतो. मी माझ्या संपर्कात येणाया लोकांना ' मानसिक दृष्ट्या ' स्वावलंबी' होण्यास प्रवृत करतो. मी स्वत: कोणाच्यात गुंतत नाही आणि कोणाला माझ्यात गुंतू देत नाही.

We are very good Lawyers for our mistakes & Very good Judges for other’s mistakes……….!!
Generally there are fights between two rights, rather than right & wrong. The only precaution one has to take is that your Right should not be at the cost of my RIGHT. With this basic understanding, the dispute can always be resolved.
It is also necessary to understand as to why conflict takes place between the persons. Friends may read my article. Link: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/68-conflict.pdf

सुधीर वैद्य's picture

12 Jan 2016 - 8:40 am | सुधीर वैद्य

भांडणाचे शास्त्र :

भांडणामुळे नवरा - बायकोचे नाते ताजे राहते. भांडणाचे सुद्धा एक शास्त्र आहे.

आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. काही वेळेला वादविवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन.

"Argument is bad but Discussion is good,
Because Argument is to find out WHO is right.. &
Discussion is to find out WHAT is right.."

दुसऱ्याच्या चुका सांगताना, आपणही चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे आपणाकडे असतात, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

जेव्हा नम्रता हि तुमची कमजोरी आहे, असा चुकीचा पवित्रा समोरच्या कडून घेतला जातो आणि तुम्ही गप्प बसता, तेव्हा नम्रता हा दोष ठरतो असे मला वाटते.

दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे.
भांडण न होण्यासाठी - किंवा टाळण्यासाठी खालील गोष्टींचा विचार व्हावा, असे मला वाटते.

काही प्रसंगात उलटा - दुसऱ्या बाजूने विचार करून प्रश्न सुटू शकतात. उलट्या बाजूने विचार सुरु केला तर कदाचित समोरच्या माणसाची बाजूपण समजून घ्यायला मदत होते.....

बायकांनी सुद्धा नोकरी करत नसल्यास, स्वत:चे विश्व निर्माण केले पाहिजे. छंद निर्माण केले पाहिजेत. वाचनासारखा चांगला मित्र नाही. वाचाल तर वाचाल. !!!!! दोघांनी एकमेकाना space देणे आवश्यक आहे.

दुसऱ्याला प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात. पण मला वाटते कि दुसऱ्याला डोक्याने सुद्धा जिंकता येते, कारण डोक्याच्या वापरात हृदयाचा विचार घेतला जातोच असे माझे मत आहे.

वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर ते प्रश्न विसरून जायचे असतात म्हणजे मनाला त्रास होत नाही. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.

आपल्या समोरील समस्येच्या बाजूला दुसऱ्या माणसाच्या मोठ्या समस्येची रेषा आखली कि आपली समस्या हि समस्याच नसून देवाने आपल्याला परीक्षा देण्यासाठी संधी दिली आहे असा भास होतो. बघा विचार करून ….

चूक कबूल करायला धैर्य लागते. चूक कबूल करताना आपल्या मनाला ज्या वेदना होतात, तीच आपली कालांतराने शक्ती बनते आणि आपण नवीन चुका करण्यापासून परावृत्त होतो.

मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात.

मन मारून काहीही करू नये. जे करायचे ते मनापासून आणि मनाचा कौल जाणून. जे आपल्या मनाला पटते तेच करावे, पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे .

चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि मनाच्या शांती साठी जिभेवर नियंत्रण हवे.

एकटेपणा हा काही वेळा माणसाचा भोग असतो . कधी तो परिस्थितीने लादला जातो. तर काही वेळा मनुष्याच्या स्वभावामुळे तो एकटा पडतो. एकटेपणा काही वेळा थोड्या काळापुरता असतो तर काही वेळा अधिक काळासाठी. मनाशी संवाद साधून ह्या एकटेपणातून मार्ग काढता येतो.

कित्येक वेळा परिस्थिती माणसाला मासिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते. पण कोणीही हे करू शकतो. ह्याची सुरवात लहान लहान सुखे नाकारून करता येते. मनाची शक्ती आपोआप वाढते. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करणे हा दुसरा उपाय. जेव्हा तुम्ही फार कमी गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता, तेव्हा तुमची बरीच tension साहजिकपणे कमी होतात.

सुखी होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले कोणावाचून अडता कामा नये. हा नियम मी माझ्या ४० वर्षांच्या career मध्ये पाळला आणि घरात सुद्धा पाळतो. आपण दुसऱ्याची मदत जरूर घ्यावी पण अवलंबून राहू नये. हि विचार धारा एकदा समोरच्याला कळली की तुम्हाला कोणीच त्रास देत नाही.

नात्यांचे गणित सोडविणे हे बरेच वेळा अवघड असते.
काही वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.
चांगुलपणा बरोबर unpredictable पणा जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात .
संसाराच्या चक्रात अडकले तरी संसारात गुंतता कामा नये. कारण शेवटी संसार हा असार आहे.
आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण त्याची वेळ माहित नसते, काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ' प्रतिक्रिया ' (Reaction ) देत असतो . त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. अर्थात ह्या साठी त्या घटनेवर आधी विचार करावा लागतो.

माझ्या मते, कोणी विचारल्यानंतरच आपले मत द्यावे . अश्यावेळी आपण जर ' श्रेयस्कर मत ' (समोरच्यासाठी श्रेयस्कर - पण त्याला ऐकायला कदाचित आवडणार नाही ) देणार असो तर फारसा प्रश्न पडत नाही . पण लोकांना ' प्रिय मत' आवडते . प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा Your Right is at the cost of My Right ' अशी परिस्थिती येते तेव्हा संघर्ष अटळ असतो.

माझ्या मते चांगले वागणे आणि वाईट वागणे हे समोरचा माणूस कसा आहे हे बघूनच ठरवावे लागते. जास्त चांगुलपणा हा तुमची कमजोरी असे समजले जाते. आपण वाईट वागू शकतो हा आभास समोरच्याला मनात असणे आवश्यक असत.

समोरच्यासाठी श्रेयस्कर वागणे आणि समोरच्यासाठी प्रिय वागणे ह्याची सीमा रेषा ठरवावी लागतेच.

आपण काय बोलतो हे आपल्याला कळणे जास्त महत्वाचे असते . इतरांचा विचार करू नये.
जर आपल्या वागणुकीचा त्रास दुसर्यांना होत नसेल, तर आपल्या मनाप्रमाणे वागायला हरकत नाही . लोगोका काम है कहेना !!!

आपले अस्तित्वच ह्या जगात शाश्‍वत नाही, तेथे शाश्‍वत आधार मिळणे दुरापास्तच आहे.
एखादा माणूस आपल्याला का आवडतो ह्याचे विश्लेषण करता आले पाहिजे. खरेतर असे मत एका ठराविक काळानंतरच देता येते कारण आपली समोरच्या माणसाबद्दलची मते काळानुसार, अनुभवावरून बदलत असतात. आपले पहिले मत हे बरेच वेळा 'व्यक्तीचे दिसणे' यापुरते मर्यादित असते. जसा सहवास वाढतो तेव्हा आपण मत बनवू लागतो. आपण स्वत:च नकळतपणे आपली एक प्रतिमा बनवत असतो. समोरच्या व्यक्तीने जर त्या प्रतिमेला धक्का दिला नाही तर ती व्यक्ती आपल्याला आवडू लागते. पण जर आपल्या प्रतिमेला धक्का लागला आणि विचारांती त्याचे वागणे बरोबर आहे असे आपण मनोमन कबुल केले, तर ती व्यक्ती आपल्याला आणखीन जवळची वाटू लागते.

इथे शाश्वत असे काहीच नाही....!! हे जितक्या लवकर मनात रुजेल तो तुमच्या भाग्याचा दिवस असे समजावे. सुखाचा रस्ता ह्याच दिशेला जातो.
एखाद्या गोष्टीबाबत सगळ अगदी जमून आलंय असं कधी होतंच नाही.....काहीतरी राहूनच जात, नकळत......!! कदाचित ह्यामुळेच आपल्या जगण्याला संजीवनी मिळत असेल.

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती - कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे. बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.

आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे .
समस्येवर उपाय शोधत असाल तर प्रथम त्या समस्येचा मनापासून स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही समस्येचा स्वीकार कराल, त्या क्षणी त्या समस्येचा तुमच्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी तुम्ही यशस्वी प्रयत्न करू शकाल.

आपले आयुष्य म्हणजे जन्मापासून - मृत्यू पर्यंत येणाऱ्या अनेक क्षणांचे एक जाळे असते. हे क्षण आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे, समाधानाचे, यशाचे, अपयशाचे, इच्छापूर्तीचे, अपेक्षापूर्तीचे, समस्येचे, काळजीचे, हुरहुरीचे, प्रेमाचे, रागाचे, अहंकाराचे, वेदनेचे …. ……असतात . (हि यादी कितीही लांबू शकेल…………………… )

काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण वेळ माहित नसते. आपण ह्या क्षणाना - घटनांना कसे सामोरे जातो ह्या गोष्टीवर आपल्या आयुष्याचा डोलारा उभारलेला असतो प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ' प्रतिक्रिया ' ( Reaction ) देत असतो. त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. मित्रानो, बघा विचार करून.

No & Yes R 2 short words, which need a long thought. Most of the things we miss in life R due to saying No 2 soon or Yes 2 late.
Relationship doesn’t shine by just shaking hands at best time. But it blossoms by holding firmly in times of critical need.

Life is all about d little decisions u make everyday. U can’t change d decisions of the past, but every new day offers opportunity 2 make ‘Right’ decisions.

Good relationships are like Trees. They demand attention & care in the beginning but once they blossom, they provide u shade in all situations of life.

Silence & Smile are two powerful tools. Smile is the way to solve many problems & Silence is the way to avoid many problems.

Life means missing expected things & facing unexpected things. When U R right, No1 remembers, But when U R wrong. No1 4gets.

Expect more from yourself than from others because expectation from others hurts a lot, while expectation from you inspires a lot.

The sign of Maturity is not when U start saying Big things but actually it is when U start Understanding Small Things.

“Changing the face” can change nothing. But “facing the change” can change everything. Don’t complain about others. Change yourself if you want peace.

Lovely thing to learn from Water! “Adjust yourself in every situation”. But most importantly, always find out your “own way to flow” &take everything within it which come with it.

''Waves are inspiring, Not because they Rise & Fall, But because they Never Fail to Rise Again''

NiluMP's picture

12 Jan 2016 - 6:54 pm | NiluMP

+१००००००...

सुधीर वैद्य's picture

12 Jan 2016 - 8:41 am | सुधीर वैद्य

मोलाचा सल्ला:

लग्नानंतर नवरा - बायकोत प्रेमाचे संबंध प्रस्थापित व्हावेत हि अपेक्षा बरोबर आहे. पण असे लगेच घडतेच असे नाही. परंतु ह्या काळात नाते कसे पारदर्शी आणि व्यावसाईक तत्वावर कसे ठेवता येईल, यासंदर्भात काही Tips संकलित केल्या आहेत. लिंक खाली देत आहे.

http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/83-Behaviour_Therapy_...

http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/84-Behaviour_Therapy_...

तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी माझ्या best wishes आणि न भांडता संसार कराल हि अपेक्षा.

सुधीर वैद्य
२४-१०-२०१४

Time Permitting, Follow me on .....

http://spandane.wordpress.com/
www.spandane.com

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Jan 2016 - 9:43 am | श्रीकृष्ण सामंत

भारतात अमेरिकन संस्कृती येत आहे. नवरा/बायको नको फक्त पार्टनर पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नानंतर येणार्या जबाबदार्या टाळून मृगजळाच्या मागे धावणे. तरूणपणी हे सर्व चांगले वाटते.

अहो,भारतात ही संस्कृती येत आहे पण ती अमेरिकन संस्कृती अमेरिकेत evolve झालेली आहे.आणि भारतात त्या संस्कृतीत आपण भारतीय मधेच involve व्ह्यायला पहात आहोत.लिहित गेलो तर एक मोठा लेख होईल.

सर्वच अमेरिकनांबद्दल मला म्हणायचं नाही पण "By and large"विचार केला तर,

१-- अमेरिकेतली लग्न संस्था मोडकळीस आलेली आहे.कित्येक वर्षं evovle होता होता.
२--कोणाची कोण आई आणि कोणाचे कोण बाबा हे मुलांना फ्क्त माहित असतं.बायालॉजीकल आई आणि बाबा,सावत्र आई आणि सावत्र बाबा हे पण माहित असतं.आणि अठरा वर्षाचं झाल्यावर आई नको आणि बाबा नको.स्वतंत्र रहायला मोकळीक सहजच मिळते.आणि आई,बाबांनी केलं त्याचं अनुकरण स्वाभाविक होतं.आणि असंच हे निरंतर चालू रहातं.कोण कोणाचं गॉसिपींग करीत नाही.समाजही गॉसिपींग करीत नाही.

त्यामुळे,
"नवरा/बायको नको फक्त पार्टनर पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नानंतर येणार्या जबाबदार्या टाळून मृगजळाच्या मागे धावणे."
अगदी ह्याच स्टेजला सध्याची भारतातली पिढी involve होत आहे.
म्हणूनच,
"तरूणपणी हे सर्व चांगले वाटते." सध्या.
पुढे,
"ढेंगलां वर झाली मग सगळां आठवांक लागतांला"
म्हणजे अंथरूणावर आडवं पडावं लागल्यावर.
बायको नसेल तर नवर्‍याला आणि नवरा नसेल तर बायकोला आठवावं लागणार.लग्न केलं असतं तर? हक्काने आपलं माणूस असतं.हे भरतात बरं का!

कारण अमेरिकेत ही स्टेज-अंथरूणावर आडवं पडण्याची- केव्हांच येऊन गेलेली आहे.आणि त्याच्यावर त्यांनी उपाय पण योजलेले आहेत.

"सोशल सेक्युरीटी,मेडीकेअर,मेडीकेड,नर्सिंग होम्स,सिनीयर सिटीझन फॅसेलिटी वगैर वगैरे"आपआपल्या आर्थीक कुवती प्रमाणे.अगदी म्हागड्या सोयी पासून ते फुक्कट सोयी पर्यंत एकटं रहाता येतं.

तरूण असे प्रर्यंत ठीक आहे.पण उतार वयात,एकट्याला किंवा एकटीला समाजात "वावरणं" महाकठीण होतं.मी काय म्हणतो ते समजलं असेलच.
अमेरिकेत nobody cares

तेव्हा संसार करून भागलेल्या माझ्या म्हातार्‍याचो नविचारलेलो सल्लो,
"शक्य असल्यास लगीन करा,संसार करा,जमल्यास तडजोड करा आणि भारतीयासारखे रहा.अमेरिकन संस्कृतीच्या नादाक लागू नका. अमेरिकन फारच पुढे गेले आहेत.आणि काही पस्तावत पण असावेत.असं मला वाटतं."

सुधीर वैद्य's picture

12 Jan 2016 - 9:47 am | सुधीर वैद्य

योग्य सल्ला - On spot

लग्नाला विरोध करणारे किंवा अनिवार्यता समजणारे बहुदा तो आनंददायी विकल्प आहे हे विसरतात.

माझ्या मते, एकमेकातला अनुबंध हे सर्व वैवाहिक आणि एकूणच जीवनातल्या खुमारीचं रहस्य आहे. एकदा लग्न केलं की तुम्हाला हरेक प्रसंगात साथ देणारी सहेली मिळते. अपत्य जन्मानंतर तर संगोपन हा इतका लोभस आयाम आहे की तुम्ही तुमचं बालपणच पुन्हा एकदा एंजॉय करता. आपल्या आई-वडीलांचा सांभाळ करतांना आणि तिच्याही आई-वडीलांची देखभाल करतांना नात्यांना नवा अर्थ प्राप्त होतो. मेव्हण्या, मेव्हणे, साडू, तिचे काका-काकू, तुमचे नातेवाईक म्हणजे तीचे दीर, नणंदा वगैरे... सुरेख नेटवर्क तयार होतं.

फक्त एक आणि एकच गोष्ट दोघात असायला पाहिजे ती म्हणजे पूर्णतृप्त स्त्री. मग पतीला त्या एकाच नात्यात तिच्याकडूनच आईची ऊब, तीची काळजी घेतांना कन्येचा जिव्हाळा आणि तीच्याशी बेधुंद होतांना मैत्रिणीचा संग उपभोगायला मिळतो.

पैसा, मतभेद, कलह, या इतक्या किरकोळ गोष्टी आहेत की तुमच्या पारस्पारिक प्रेमापुढे त्या फार टिकाव धरत नाहीत. कारण एकमेकांची ओढ इतकी असते की माघार कुणी घ्यायची हा प्रश्नच नसतो. एखादे वेळी काही वेळ दुरावा निर्माण झाला तरी कुणी एकानं हात पुढे केला की दुसर्‍याकडनं तो हातात घेतलाच जातो...आणि मग पुन्हा धमाल सुरु !

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2016 - 11:08 am | पिलीयन रायडर

विठाकाका...

तुम्ही जितके समंजस आहात तसं सगळं जगच नसतं हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. "सुरेख नेटवर्क" बीबीसी सारखं काम करुन तुमच्या घरातल्या बारिकशा गोष्टींची सुद्धा चवीने चर्चा करत बसायला बनवलेलं असतं. हेच नेटवर्क चांगल्या लोकांचं असेल तर त्याहुन सुंदर दुसरी गोष्ट नाही.. पण साधारणपणे तसं नसतं..

बाकी जोडीदाराने मित्र / मैत्रिण म्हणुन रहायला.. मुल जन्माला घालायला.. लग्न कशाला करायला हवं? उलट खरंच प्रेम असेल तर लोक लग्नाशिवायही आयुष्यभर एकत्र रहातील, एकमेकांची काळजी घेतील.. एकमेकांच्या परिवारातही सामिल होतील.. मुल जन्माला घालुन अपत्य सुख मिळवतील..

हे सगळं करायला "लग्न" नावाच्या विधीची काय आवश्यकता? हजार लोकांना जेवण घालुन जाहीर केलं की "आम्ही आता जन्मभर एकत्र रहाणार बरं का!" तरंच हे नातं टिकणार का? आणि खरंच टिकतं का?

"बंधनात" अडकवलं की मग माणसं तोडताना विचार करतील.. नातं बंधनाशिवाय "स्वैर" होईल... इ इ अनेक कारणं लग्नाच्या बाजुने आणि "लिव्ह इन" च्या विरोधात दिली जातात..

पण बंधन घालुन टिकवावं लागेल ते नातं कसलं? आणि अस्सल असेल तर बंधनाची गरजच काय?

लग्न न करता एकत्र राहुन जर सर्व काही विवाहीत लोकांसारखेच करायचे असेल तर मग लिव्ह इन मध्ये रहाण्यात तरी काय पॉईंट आहे? जन्माला आलेली मुले वार्‍यावर सोडुन तर जाता येणार नाही. वैतागवाडी नातेवाइकांचा त्रास लिव्ह इन मध्ये पण असेलच, किंबहुना कणभर जास्तच.

सर्वात जास्त लिव्ह इन जनता अमेरीकेत रहाते. तीथे तर अशा लग्न न करता / लिव्ह इन मध्ये असलेल्या जोडप्याना कायदेशीर रीत्या विवाहीत जोडप्यांचेच हक्क व जबाबदार्‍या मिळतात (common law marriage). तीथे तर असे त्रासदायक नातेवाईका भारताइतके जास्त नसावेत.

तेव्हा नातेवाइकांच्या त्रासापासुन वाचण्यासाठी लिव्ह इन चा मार्ग काही पटत नाही.

विठाकाका, हेलाकाका, मोगा मौसि
अरे ये क्या चल क्या रहा हय ;))

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 12:27 pm | सुबोध खरे

आमची एक लांबची आत्या स्त्री मुक्ती चळवळीत मोठी कार्यकर्ती होती. आमच्या वडिलांनी तिच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस विचारले कि तू एवढी स्त्री मुक्ती वाली मग मुलीचे लग्न कसे करते आहेस ? त्यावर ती म्हणाली कि कायद्याने मुलांना मिळणारे संरक्षण का सोडायचे?
लग्न का करायचं? आणि अस्सल असेल तर बंधनाची गरजच काय?
पंतप्रधान, मंत्री, राष्ट्रपती यांना पण शपथ का दिली जाते?
न्यायालयात गीतेवर कुरणावर किंवा बायबलवर हात ठेवून शपथ का घ्यावी लागते?
शेवटी मानवी मन हे असेच आहे. बंधन नसेल तर उच्छृंखल होते. मनाची नसेल तर जनाची लाज बाळगून पुरुष बाहेरख्याली होत नाहीत हा यात फायदाच आहे. केवळ संभोग हाच हेतू असेल तर लग्नाची गरज नाही. पण मुले जन्माला घालायची असतील आणी त्यांना सुजाण नागरिक बनवायचे असेल तर त्यात बांधिलकी/ जबाबदारी आवश्यक आहे.
आज जोडपे आनंदाने राहत आहे. उद्या मुल जन्माला घालायचे ठरवले. गरोदर पणात स्त्रीच्या सौंदर्याचा आलेख खाली येतो. प्रसुतीच्या पहिल्या तीन महिन्यात स्त्रीचे रूप पुरुषाला अनाकर्षक वाटते. सहा ते आठ महिने संभोग शक्य नसतो. अशा वेळेस पुरुष दुसर्या स्त्रीकडे आकर्षित झाला( हे बर्याच वेळेस प्रत्यक्षात होते) आणी हिला सोडून गेला तर स्त्रीने मुल सांभाळत बसायचे कि मेनके सारखे मुल पुरुषाच्या गळ्यात घालून बाहेर जायचे?
God has linked procreation with recreation.
Otherwise no man will get married.
प्रेम हे आकर्षणातून निर्माण होते आणि सहवासातून वाढते हे म्हणणे वावगे नाही.स्त्रिया जितक्या भावनात्मक असतात तितके पुरुष नसतात हि पण एक वस्तुस्थिति आहे. विचार करून पहा.

मनीषा's picture

12 Jan 2016 - 12:35 pm | मनीषा

शादी .. लड्डु है मोतीचुरका ,
जो खाए पछताए, जो न खाए पछताय |

लग्न हा केव्हाही दोन्ही पक्षी फायदेशीर आणि सन्माननीय पर्याय आहे यात वादच नाही.
पण म्हणून जर काही असहनीय अडचण असेल तर तडजोड केलीच पाहिजे असे कुठे आहे ?

पिलीयन रायडर's picture

12 Jan 2016 - 2:08 pm | पिलीयन रायडर

थोडासा गैरसमज होतोय.. आणि खरं तर मी सुद्धा पहिल्यांदाच ह्या बाजुने विचार करत असल्याने माझाही पुष्कळ वैचारिक गोंधळ झालेला आहे. मला कुणाला माझा कोणताही मुद्दा पटवायचा नसुन केवळ चर्चा करुन माझ्या विचारांना निश्चित दिशा द्यायची आहे. तेव्हा माझ्या प्रतिसादात जरा गडबड वाटली तर समजुन घ्या. ;)

लग्नाचे कायदे आणि फायदे मला मान्य आहेतच. ते उपयुक्त आहेत हे ही मला मान्य आहे. पण माझा मुळ आक्षेप हा एकंदरीतच लग्नाला जे अवास्तव महत्व दिलं जातं त्याला आहे. इतकं अति महत्व, की कसंही करुन लग्न झालंच पाहिजे हा कायमचा आग्रह सर्वत्र दिसतो.. आणि मग झालं की ते टिकवलंच पाहिजे हा पुढचा आग्रह. ज्यांनी लग्न करायचं नाही असं ठरवलय अशांची चिंता, की ह्यांच कसं होणार? लग्न न होताही लोक आनंदात राहु शकतातच की. फक्त बाकीच्यांनी त्यांची चिंता वाहणे सोडले पाहिजे.

ज्याच्या सोबत बंधनात काय किंवा लिव्ह इन मध्ये काय, राहण्यात आनंद आहे.. जिथे प्रेम आहे (मुल झाल्यावर बाईचे शरीर बदलले म्हणुन कमी झाले तसे प्रेम नव्हे..) जिथे न सांगताही आयुष्यभर निभावण्याची खात्री आहे, तिथे लग्न तसेही निरुपयोगी नाही का? मला कळतय की मी बरंच "हायपोथेटीकल" बोलतेय. पण मुद्दा इतकाच आहे की जिथे प्रेम आहे (आकर्षण नाही..) तिथे लग्न हा सामाजिक संस्कार म्हणुन तरी का करायचं?

शरीराचे आकर्षण लग्नातही संपु शकतेच.. ५० वर्ष एकाच शरीराचे तसेही आकर्षण वाटणार नाहीच. वर्षानु वर्ष एकत्र राहुन प्रेम असेलच ह्याची खात्री लग्न सुद्धा देऊ शकत नाही. गीता / कुराणावर शपथ घेऊन कुणी मुकरणार नाही असं थोडीच आहे. पण केवळ पायात लग्नाची बेडी असल्याने दुसर्‍याला निव्वळ वार्‍यावर सोडता येत नाही इतकेच. कायदा तुम्हाला मदत करु शकेल (कदाचित..).. अशा वेळेस कोणतीही बेडी नसलेले लिव्ह इन काय वाईट? तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक भाग एका माणसाशी जोडता. पण बाकी तुमचे निर्णय, व्यवहार स्वतंत्र असु शकतात. जिथे समजतं की हा माणुस योग्य जोडीदार नाही, तिथे तुम्ही मोकळे असता. जिथे वाटतं की हाच माणुस योग्य आहे, तिथे तुम्ही मुल इ. गोष्टींचा विचार करु शकता. अर्थात मला त्यातुन होणार्‍या संततीला मिळणार्‍या कायदेशीर अधिकारां विषयी माहिती नाही.

लिव्ह इन मध्ये गुंतागुंत असते.. लग्नातही असतेच.. फक्त सध्या लग्नाला कायदेशीर मान्यता असल्याने कोर्ट निर्णय देऊ शकते. उद्या कदाचित लिव्ह इन साठी काही कायदे येतील.. तेव्हा तुम्ही म्हणता तसे मुलाचे औरसत्व किंवा नाते संपल्यावर मुलांची जबाबदारी इ गोष्टींसाठी कायदा असेल.

पण जिथे सामाजिक गरज म्हणुन घडवुन आणले आहे, तिथे तडजोडी करत जगताना "लग्न" नक्की आपली कशी आणि कोणती मदत करतं?

चैतन्य ईन्या's picture

12 Jan 2016 - 2:57 pm | चैतन्य ईन्या

तुम्हाला अनुमोदन. मुळात हे इतके विचार करायची गरज ढगालेखाकाला वाटत नाही. मग काय होता कि ह्यांचे कसे होणार ह्याचीच बाकीच्यांना चिंता. काय होईल? एकतर आनंदात राहतील किंवा दुखात राहतील. तुम्हाला काय फरक पडतो? पण अजूनही संस्कृति नावाचा दांभिकपणा आड येतो आणि सगळी गडबड होते. शेवटी जे बाहेर चालले आहे तेच आपल्याकडे येणार आहे कारण सध्याच्या सिस्टम मध्ये आता फार फायदा राहिला नाहीये. ते सगळे हळूहळू इवोल्व होणारच

पद्मावति's picture

12 Jan 2016 - 3:34 pm | पद्मावति

पिरा, उत्तम प्रतिसाद.
विशेष करून दुसर्या परिच्छेदात अगदी नेमकं लिहिलं आहेस.

अगदी नेमकं लिहीलंत. लग्न करा लग्न करा म्हणून टुमणं लावणारे हेच लोक नंतर काही कमी-जास्त असेल तर हात वर करतात.


This
should help!!

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 6:33 pm | सुबोध खरे

पिरा ताई
लिव्ह इन मध्ये तुझं माझं पटलं नाही तर वेगळे होऊ हे मुळातच ठरलेलं आहे. तेंव्हा त्यात बांधिलकी मुळातच नाही. मग नंतर ती राहील हि शक्यता कमीच आहे. मुळात गुण या सदरात पुरुषाचा पैसा आणि स्त्रीचं रूप हे पहिल्या क्रमांकाचे गुण धरले जातात.
पण यात स्त्रीचे रूप याचा भाव उतरणारा आहे आणि पुरुषाचा पैसा याचा भाव चढत जाणारा आहे यामुळे काही काळाने कंटाळा आला आणि वेगळे झाले तर स्त्रीला दुसर्या नात्यात जाणे हे जास्त जिकीरीचे जाते पण तेच पुरुषाला पैशाच्या जोरावर जास्त तरुण स्त्री मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे.
लग्नात मूळ तो माणूस बांधिलकीला तयार झालेला असतो त्यामुळे तडजोड करायला लागेल हे मुळात गृहीत असतं.लिव्ह इन मध्ये मुळात आपले पटले नाही तर? इथूनच सुरुवात होते
एखादा माणूस जेंव्हा चार चौघात एखाद्या कार्याला देणगी देईन हे कबुल करतो तेंव्हा सामाजिक दबावाने का होईना तो ते पैसे देण्याची शक्यता जास्त असते. हेच त्याने खाजगीत पैसे देतो म्हणाला तर नंतर परिस्थिती बदलली तर त्याला पैसे न देणे हे जास्त सोयीचे असते.
मुळात कोणताही व्यवहार हा कागदोपत्री का होतो तर त्याला एक वैधता प्राप्त व्हावी. मग एकाने आपल्या मित्राला पैसे दिले आणि दुसर्याने घेतले. दोघात गाढ विश्वास आहे तर त्यात कागदपत्र/ करारपत्र कशाला असे आपण म्हणाल काय?
हा दोन जीवांचा व्यवहार आहे आणि त्यात बांधिलकी यावी यासाठी लग्नाला औरस स्वरूप (legitimacy) दिले गेले आहे.
मुळात लग्न संस्था परिपूर्ण नाही. पण त्याला सशक्त असा पर्याय अजून उपलब्ध होत नाही.
राहिली गोष्ट ज्याला लग्न करायचे नाही त्याची. ज्याची/ जिची विचाराची बैठक पक्की आहे त्याच्या साठी हे ठीक आहे. त्याला समाज आता स्वीकार करायला लागला आहे.
परंतु अशी बरीच माणसे दिसतात कि तरुणपणात भावनेच्या भरात एकटे राहण्याचा निर्णय घेतात आणि जशी चाळीशी पार व्हायला लागते तसे ते जास्त जास्त एकटे पडू लागतात आणि मग आपण चूक केली असे लक्षात येते तेंव्हा बराच उशीर झालेला असतो. कारण या वेळेस लग्न करायचे ठरवले तर बरीच तडजोड करावी लागते आणि ती वय निबर झाल्याने करणे कठीण जाते. बरेच लोक ते सहज मान्य करीत नाहीत हा भाग वेगळा. आपल्याला म्हातारपणी कोण विचारेल हि काळजी त्यांना खात असते. ( मुले बाळे असलेल्या किती लोकांना मुले विचारतात हा भाग अलाहिदा आहे. पण म्हातारपणी आपली मुले आपल्याला विचारतील या विश्वासाने तरी त्यांचे मानसिक आयुष्य जास्त स्थिर असते.) तुम्ही जेंव्हा चाळीशी पार कराल तेंव्हा या गीष्टी तुम्हाला जास्त प्रकर्षाने जाणवतील.
मृत्यू सुद्धा तरुण पणी एक सुंदर काव्य असतं
मध्य वयानंतर ते एक रुक्ष गद्य होऊन जातं.

विवेक ठाकूर's picture

12 Jan 2016 - 7:02 pm | विवेक ठाकूर

स्त्रीचे रूप याचा भाव उतरणारा आहे आणि पुरुषाचा पैसा याचा भाव चढत जाणारा आहे यामुळे काही काळाने कंटाळा आला आणि वेगळे झाले तर स्त्रीला दुसर्या नात्यात जाणे हे जास्त जिकीरीचे जाते पण तेच पुरुषाला पैशाच्या जोरावर जास्त तरुण स्त्री मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे.

एकदम सही !

मुळात लग्न संस्था परिपूर्ण नाही. पण त्याला सशक्त असा पर्याय अजून उपलब्ध होत नाही.

नम्र दुमत. विवाह आणि भारतीय विचार असा सविस्तर प्रतिसाद दिला आहे.

राहिली गोष्ट ज्याला लग्न करायचे नाही त्याची....

एकदम मान्य पण तो लेखाचा विषय नाही.

विवेक ठाकूर's picture

12 Jan 2016 - 7:05 pm | विवेक ठाकूर

मृत्यू सुद्धा तरुण पणी एक सुंदर काव्य असतं
मध्य वयानंतर ते एक रुक्ष गद्य होऊन जातं.

मृत्यू फार थोर चिज आहे डॉक्टर, त्यावर पुन्हा कधी लिहीन.

यमगर्निकर's picture

16 Jan 2016 - 3:21 pm | यमगर्निकर

१००% सहमत

मृत्युन्जय's picture

13 Jan 2016 - 1:18 pm | मृत्युन्जय

पण जिथे सामाजिक गरज म्हणुन घडवुन आणले आहे, तिथे तडजोडी करत जगताना "लग्न" नक्की आपली कशी आणि कोणती मदत करतं?

नक्की नाही सांगता येणार. पटवुन तर नक्कीच नाही देता येणार. पण लग्नातली तडजोड ही थोडी इतर आयुष्यासारखीच असते.

बॉसशी वैचारिक मतभेद आहेत म्हणुन नौकरी सोडणारे दुसरी नौकरी देखील त्याच कारणाने सोडतात. ३ -४ जॉब बदलल्यावर बॉस सगळीकडे एकसारखेच हे कळते. बायकोचेही तसेच आहे (नवर्‍याचेही). दोन माणसे आयुष्यभर एकत्र रहायला येतात तेव्हा कुरबुरी या होणारच. तुमचा जोडीदार हिंसक, विकृत किंवा प्रचंड मानसिक छ्ळ करणारा असेल तर गोष्ट वेगळी. पण एखाद्या माणसाशी पटत नाही म्हणून त्याला सोडायचे आणि दुसरा निवडायचा तर दुसरा तरी अगदी तुमच्या मनासारखाच असेल याची काही ग्यारंटी नाही. नविन माणसाबरोबर नव्याने जुळवुन घेउन, नंतर नव्याने कुरबुरी करत बसण्यापेक्षा पहिल्याशीच थोडे जुळवुन घेउन जुन्याच अवगुणांना सुधारण्याचा प्रयत्न करणे जास्त सोप्पे असते (अवगुन सुधारण्याच्या भानगडीत न पडणे जास्त सोप्पे असते खरे सांगायचे तर. अवगुण तुमच्यासाठी अथवा समाजासाठी किंवा तुमच्या जोडीदारासाठी घातक असतील तर गोष्ट वेगळी).

याबाबत एक जुना जोक वाचला होता:

एरवी नवर्‍याला शिव्या घालणार्‍या बायका वटपौर्णिमेला एकच नवरा सात जन्मी मिळो अशी प्रार्थना का करतात?

हा जन्मा या नवर्‍याला वळण घालवण्यात गेला. पुढच्या जन्मी नविन नवर्‍याला सुधारण्याची कटकट कोण करत बसणार?

त्यामुळे मला तरी थोड्या तडजोडी करणेच योग्य वाटते.

तुषार काळभोर's picture

14 Jan 2016 - 10:28 am | तुषार काळभोर

व्यावहारिक प्रतिसाद आवडला

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2016 - 2:54 pm | अप्पा जोगळेकर

इथली चर्चा वाचूनच बहुधा पाचपन्नास घटस्फोट होतील.
बाकी १००० + नक्की.

जिन्क्स's picture

12 Jan 2016 - 4:36 pm | जिन्क्स

खिक +++++++++१

लाटकरांच्या लाट्या !

मिपाकर बसतायत पापड लाटत!

चैतन्य ईन्या's picture

12 Jan 2016 - 5:11 pm | चैतन्य ईन्या

काही म्हणा. त्यांना बरोबर नस सापडली आहे लोकांचे प्रतिसाद घेण्याची.

नाखु's picture

12 Jan 2016 - 6:07 pm | नाखु

कुठं जरा पीठ जमू लागलं तर आले हे पापड मोडायला जरा वाळू भाजू तरी द्या !!!!!!

आमच्या इथे लाट्यांचे पापड तसेच पापडाच्याही लाट्या मिळतील.

हेला-गेला आणि कंपनी

होबासराव's picture

12 Jan 2016 - 6:19 pm | होबासराव

काका स्वारी बर का पण हे हेला-गेला यमक मत जोडो पलीज
हेला काका कस एकदम भारदस्त वाटत बघा !!
आस्कींग सोन्याबापु "बापु म्या एकदम बराबर बोल्लो का नाही"

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jan 2016 - 7:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

एकदम बरोबर गाववाले!!!!

नाखु's picture

13 Jan 2016 - 8:36 am | नाखु

होबासरावांचे आणि बाप्पुंचे शब्दाबाहेर नाही.

कंपनीचे नव बदलत नाही.

अंमल्बजावणी नाखु

पैसा's picture

12 Jan 2016 - 6:11 pm | पैसा

निष्कर्ष सांगा.

जिन्क्स's picture

12 Jan 2016 - 6:29 pm | जिन्क्स

तुम्ही तुमच्या लग्नावर खूश आहात का?
- असा एक नवा पोल काढा रे

ज्यांना लग्न करायची इच्छा नसेल त्यांनी लग्न करूच नये .
लग्न केल्यावर थोड्या फार तडजोडी कराव्याच लागतात दोघांनाही त्यामुळे ज्यांची अजिबात तडजोड करण्याची तयारी नसेल त्यांनी लग्नाच्या फंदात पडूच नये
आणि एकदा लग्न केलं की जोपर्यंत आपल जन्मभर पटेल अशी खात्री होत नाही तोपर्यंत मुल जन्माला घालू नये ,
पण एकदा का मुल जन्माला आल कि मात्र शक्यतो घटस्फोट घेऊ नये , लग्नात काही समस्या उदभवली तरी त्यावर सामंजस्याने मार्ग काढून लग्न टिकवण्याचाच प्रयत्न करावा (कारण अगदीच गंभीर असेल तरच घटस्फोट घ्यावा )
कारण मुल झाल्यानंतर जर घटस्फोट झाला तर त्या मुलाची फार फरफट होते , कारण मुलांना आई आणि वडील दोघही हवे असतात

सुबोध खरे's picture

12 Jan 2016 - 6:48 pm | सुबोध खरे

+ १

चतुरंग's picture

12 Jan 2016 - 6:48 pm | चतुरंग

रस्त्यावरुन न घसरता सुरळीत चालायला हवी असेल तर तिची चाके आणि रस्ता यात काही किमान घर्षण आवश्यक असते, लग्नसंबंधातल्या दोन व्यक्तींबाबतही हे खरे आहे, तिथे जी काही योग्य तडजोड असते ती लग्नाची गाडी संसाराच्या रस्त्यावर व्यवस्थित चालवायला मदतच करते. घर्षण जास्त झाले तर टायर्स जळून धूर निघतो, कमी झाले तर गाडी घसरु शकते!
शिवाय काही वर्षांनी नवीन टायर्स टाकावी लागतातच!! :)

(गाडी सलामत तो टायर्स पचास)रंगा

विवेक ठाकूर's picture

12 Jan 2016 - 6:52 pm | विवेक ठाकूर

पहिली गोष्ट, निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वतःच्या पुनरावृत्तीसाठी केली आहे त्यामुळे जोपर्यंत अपत्य जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीला पूर्णत्त्वाचं समाधान मिळत नाही. निपुत्रिक स्त्री दु:खी दिसते याचं कारण ती देहाची सार्थकता निभावू शकत नाही. पुरुषाला अपत्य जन्म हवाच असं काही नाही, तो निमित्तमात्र असतो. तस्मात, अपत्य जन्म ही निसर्गतःच स्त्रीची अभिलाषा आहे.

दुसरी गोष्ट, मानवी मूल स्वावलंबी होण्यासाठी सर्व सजीवात सर्वाधिक वेळ लागतो. आणि मानवानं निर्माण केलेल्या अर्थप्रधान व्यवस्थेत तर तो साधारण पंचवीस वर्षापर्यंत असू शकतो. तस्मात, मानवी मुलाला संगोपनाची आणि पर्यायानं त्याची काळजी वाहू शकणार्‍या व्यवस्थेची नितांत गरज असते. या प्राथमिक विचारातून कुटुंबसंस्था अस्तित्त्वात आली. कारण एकटी स्त्री अर्थार्जन, आपत्य संगोपन आणि सांसारिक जवाबदारी अपवादानंच निभावू शकेल.

तिसरी गोष्ट, विवाहामागे भारतीय विचारसरणीत संपूर्ण आयुष्याचा समग्र विचार केला आहे. म्हणजे तारुण्य सरल्यावर आणि शारीरिक क्षमता क्षीण होऊ लागल्यावर, मानवाला सुखाच्या मृत्यूसाठी पुन्हा कुटुंबाची गरज निर्माण होते.

अशाप्रकारे मानवी जन्म, संगोपन, तरुणाईतील उपभोग, वार्धक्य आणि मृत्यू या सर्व पैलूंचा विचार करून विवाह ही संकल्पना निर्माण झाली आणि त्यावर भारतीय समाज व्यवस्था उभी राहिली. तस्मात, विवाह हा अत्यंत थोर विचार आहे. मानवाचं कौशल्य तो विवाह आणि संसार कसा सुखाचा करतो यावर आहे.

________________________

सर्व मानवी नाती मान्यता आहेत कारण विवाह या मूळ मान्यतेतून ती निर्माण होतात. तस्मात, पती-पत्नी ही जशी केवळ मान्यता आहे तशीच, ज्यानं मानवी भावविश्वाचा फार मोठा भाग व्यापलेला आहे, ती आई सुद्धा वास्तविकात मानवी कल्पनाच आहे. थोडक्यात, विवाहच काय कोणतंही नातं ही मानवी कल्पना आहे.

पाश्चात्य विचारसरणीत व्यक्तीस्वातंत्र्य केंद्रस्थानी ठेवून मर्यादित विचार केला गेला आहे. लिव्ह-इन हा विवाहाला शह देणारा विचार मांडला गेला पण त्यात संगोपनाचं नियोजन शून्य आहे, फक्त संभोगावर फोकस आहे. वार्धक्याचा विचार करण्याची गरज त्यांना नाही कारण तिथे सरकार काळजी घेईल. मृत्यू ही जीवनातली महत्तम घटना आहे पण पाश्चात्य विचारसरणीला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही.

थोडक्यात, पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे.

चैतन्य ईन्या's picture

12 Jan 2016 - 7:03 pm | चैतन्य ईन्या

बाप रे तुमचे ते क्षमताच नाही, मर्यादित विचार वगैरे पाहून प्रतिवाद करण्याची इछाच गेली. इतके ठाम विचार आहे. एकाच प्रश्न आपण बाहेर राहिला आहात काय? म्हणजे फिरून वगैरे नाही. चांगले ४-५ वर्ष? कुठल्याही प्रदेशाचे आकलन एक वर्षात किंवा १५ दिवसांच्या ट्रीप मध्ये होत नाही. खूप बारीक सारीक गोष्टी कळायला बराच वेळ जातो. म्हणून विचारले.

चतुरंग's picture

12 Jan 2016 - 7:07 pm | चतुरंग

क्षमताच नाही .... वगैरे फारच टोकाचे आणि चुकीचे आहे.
बाहेरचे जग पुरेसे न बघितलेलेच लोक अशी टोकाची मते मांडतात असा अनुभव आहे...

(दर भारतवारीला "काय मग, तिकडे वीकेंडला मस्त पार्ट्याच असतात ना?" या प्रश्नाचा एकदा तरी सामना करावा लागलेला) - रंगा

मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही.

तुम्हाला मृत्यूबद्दल भारतीय आध्यात्मात काय विचार केला आहे याची कल्पना आहे का?

निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वतःच्या पुनरावृत्तीसाठी केली आहे त्यामुळे जोपर्यंत अपत्य जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीला पूर्णत्त्वाचं समाधान मिळत नाही

हे तुम्ही कुठे वाचले आहे?

निसर्गानं स्त्री देहाची निर्मिती स्वतःच्या पुनरावृत्तीसाठी केली आहे

इतपत माहिती तुम्हाला असायला हरकत नाही.

त्यामुळे जोपर्यंत अपत्य जन्म होत नाही तोपर्यंत स्त्रीला पूर्णत्त्वाचं समाधान मिळत नाही

याच्या पुढे त्या मागची कारण मिमांसा दिली आहे :

निपुत्रिक स्त्री दु:खी दिसते याचं कारण ती देहाची सार्थकता निभावू शकत नाही. पुरुषाला अपत्य जन्म हवाच असं काही नाही, तो निमित्तमात्र असतो. तस्मात, अपत्य जन्म ही निसर्गतःच स्त्रीची अभिलाषा आहे.

दवणे आणि वपु यांचा आशीर्वाद आहे तुमच्या लिखाणाला!! किती धीरगंभीर लिहीता, कसं जमतं हो?

निपुत्रिक स्त्री दु:खी दिसते याचं कारण ती देहाची सार्थकता निभावू शकत नाही. पुरुषाला अपत्य जन्म हवाच असं काही नाही, तो निमित्तमात्र असतो. तस्मात, अपत्य जन्म ही निसर्गतःच स्त्रीची अभिलाषा आहे.

इतके ठाम सरसकटीकरण आणि प्रतिसादाची ष्टाईल वाचून डोळे पाणावले.

बाकी.. तुमचे प्रतिसाद वाचताना सारखी आमच्या सरांची आठवण येते.

चालूद्या...

पैसा's picture

12 Jan 2016 - 8:39 pm | पैसा

तुला अजून शंका आहे का काय? =))

मोदक's picture

12 Jan 2016 - 8:49 pm | मोदक

:))

तुम्हाला मृत्यूबद्दल भारतीय आध्यात्मात काय विचार केला आहे याची कल्पना आहे का?

अहाहा आता खरे नीरुपण सुरु होतय्..
हेला काका कमवलत बघा तुम्हि हा धागा काढुन नशिब कमवलत.

सात्विक आणि निराकार चेहरा करुन रसग्रहणाला तय्यार असलेला
होबासराव

याॅर्कर's picture

12 Jan 2016 - 7:21 pm | याॅर्कर

हे हल्लीचं प्रेम म्हणजे फक्त लैंगिक आकर्षण+पैश्याची हाव+मुलांना लुबाडणे असं सगळं हाय बघा,
आणि,च्यामारी वर्जिन पोरी कश्या शोधायच्या आमच्यासारख्या वर्जिनांनी.
.
.
.मला एका मुलीनं प्रपोज केलं,मी तिला म्हणालो माझ्याजवळ एक कवडी सुद्धा नाही तुझ्यावर उधळायला,
तर चक्क ती तोंड विचित्र करून निघून गेली.
गेली तर गेली, कोणी तरी मॅरेज मटेरियल असणार कि माझ्या नशीबात.
.
.
.
||श्री कामदेव प्रसन्न||

विवेक ठाकूर's picture

12 Jan 2016 - 8:09 pm | विवेक ठाकूर

त्यापूर्वी काय लिहीलंय ते समजायला हवं आणि त्याही आधी लिहीलेलं नीट वाचता यायला हवं.

मी लिहीलंय :

पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे.

लिव-इन मधे संपूर्ण जीवनाचा आणि त्यातही मृत्यूचा काय विचार केला आहे हे दोन्ही प्रतिसादकांपैकी कुणी सांगू शकेल काय?

आणि त्या आधी लिहीलंय :

मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही.

याचा `आपण बाहेर राहिला आहात काय?' याच्याशी काय संबंध आहे. बाहेर फिरून मृत्यूविषयी काय माहिती मिळते याचा उलगडा करु शकाल काय?

चतुरंग's picture

12 Jan 2016 - 8:37 pm | चतुरंग

"मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही" या विधानाला होता.
केवळ भारतीय तत्त्वज्ञानात्/अध्यात्मात असा विचार आहे हे आपल्याला वाटत असतं कारण आपण त्या मुशीत घडलेलो असतो.
बाहेरच्या जगातही असेच विचार वेगळ्या पद्धतीने सांगितलेले असतात. लोकांच्या उपयोगी पडा, सर्विस ओरिएंटेड लाइफ, आयुष्याचा पूर्ण उपयोग करा हे विचार किंवा तत्त्वज्ञान काय आहेत?
बाबा आमटेंसारख्या महायोग्यानं काय केलं? केवळ लोकांची सेवा करुन, त्यांची आयुष्य उभारुन ते चिरंजीव झाले इतकेच नव्हे तर पुढल्या तीन पिढ्यांना मार्गदर्शन करुन गेले, केवळ आणि केवळ सेवाभावाने..
पहिल्या हिवाळ्यात बर्फ साफ करत असताना माझ्याकडे योग्य उपकरणे नव्हती तेव्हा शेजारी येऊन दोन मिंटात बर्फ साफ करुन "हॅव अ गुड डे" म्हणून गेला देखील! हे काय आहे?
कर्करोगाने आजारी असलेल्या धाकट्या भावाची सहा वर्षे सेवा करुन तो शेवटी गेला तेव्हा सुटला म्हणून पाणावल्या डोळ्यांनी माझ्याजवळ बोलणारी साठीतली स्त्री मी इथेच बघतो. मी तिच्या भावाची आपुलकीने चौकशी केल्यापासून ती एकही दिवस मला गुडमॉर्निंग म्हटल्याखेरीज जात नाही, हे का?
आपल्या मुलीचा बॉयफ्रेंड, एक अतिशय चांगला मुलगा, ज्याला त्याच्या घरातून जवळपास हाकलून दिले आहे त्याचा सांभाळ आपलंच तिसरं मूल म्हणून स्वतःच्या घरात आपुलकीने करणे किती जण करू शकतील? हा माणूस माझ्या रोजच्या बघण्यात आहे!
यासाठी जीवनाकडे बघण्याची विशाल दृष्टी हवी, हृदय मोठं हवं.
आणि हे सगळं तिथं अनेक वर्षे राहून समाजात मिसळून, जवळून त्यांचं जगणं जाणून घेऊनच समजू शकतं.
अन्यथा "त्यांची क्षमताच नाही...." वगैरे ताशेरे सहज ओढतो आपण!

सूड's picture

12 Jan 2016 - 8:41 pm | सूड

बिंगो!!

चैतन्य ईन्या's picture

12 Jan 2016 - 9:08 pm | चैतन्य ईन्या

हे असले मी ह्यांना अजिबात सांगायला गेलो नसतो कारण ह्यांच्या दृष्टीने भारत आणि अध्यात्म हे एकच आणि एकमेव दिसतंय. तर त्यांना त्यांच्या आनंदात राहू द्या. म्हणून विचारले होते आपण स्वतः बाहेर ४-५ वर्ष राहिला आहात काय? १५ दिवसात किंवा १ वर्षात फारच त्रोटक अनुभव असतात आणि विशेतः लोकांना एकाच दिसते तेच सांगत सुटतात. त्यावरून बाकीच्यांनी विचारच केला नाहीये वगैरे बाहेर येते. ह्या अध्य्त्मापेक्षा daniel kahneman मला जास्त भावतो. एका मर्यादेनंतर पैसा कामाला येत नाही आणि आपण आनंदी असतो जेंव्हा आपल्याला आवडणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. इतके सरळ स्वच्छ न सानागता उगाचच देव आणि दानव आणि काय काय आणि काय मध्ये येते. फुकटची फिलोसोफी काहीही कामाची नाही. त्याने काहीही होत नाही. लग्न पण तसेच आहे. आवडत असेल समोरचा वा समोरची तर ते सहज कटकट सहन करून सहजीवनाचा आनंद घेवू शकतात तेच होत नसेल तर मग उगाचच संस्कृति आणि आई/बाप झालो म्हणून मुलांकरता एकत्र झक मारत राहणे ह्याला काहीही अर्थ नाही. असो. मुळातच आपले विश्व सीमित असते आणि तेच आणि तेवढेच ग्रेट आहे असे मनात असलेल्यांना बाहेर काढू नाहीये. आपण बरे आणि ते बरे. कारण चर्चा करून फक्त वाद होतात आणि आपल्या आधीच असलेल्या समजुती अजून जास्त पक्क्या होतात कारण इगो दुखावतो.

चतुरंग's picture

12 Jan 2016 - 9:15 pm | चतुरंग

परंतु ही उदाहरणे एवढ्याकरताच दिली की सीमित विश्व असल्याने गैरसमज होतात ते वेळीच दूर व्हावेत अन्यथा काळ सोकावतो!

माझे स्वतःचेही असे बदल झालेत - लहान गावातून मोठ्या गावात, मग परराज्यात, मग परदेशात मग अनेक देशात, क्षितिज विस्तारत जाते, विचार बदलत जातात, आधीच्या गोष्टीतल्या चुका/त्रुटी दिसत जातात, माणसं नव्याने उमगत जातात..
अर्थात तुम्हाला तसे हवे असले तर अन्यथा इथेही फक्त आपल्याच अस्मिता घट्ट कवटाळून (श्लेष अभिप्रेत नाही! ;) ) बसणारे बघतोच! असो, न संपणारा विषय...

चैतन्य ईन्या's picture

12 Jan 2016 - 9:20 pm | चैतन्य ईन्या

अगदी अगदी. when facts change i change my mind असा कियीन्स म्हणून गेलाय पण अनुभव असल्याशिवाय ते होत नाही आणि मुळातच बदलायची तयारी असेल तरच होते. उलट आपल्याच पुराण म्हणून येण्यार्या कथातला विरोधाभास जाणवतो आणि तसाच पश्त्यांच्या पण कथातला जाणवतो. कधी कधी प्रचंड साम्य असते. असो खरे आहे विषय न संपणारा आहे.

लिव-इन मधे संपूर्ण जीवनाचा आणि त्यातही मृत्यूचा विचार. मला वाटते तुम्ही खूप विचार करताय. इथे रोजचे जिणे जर का अवघड झाले असेल तर कसला मृत्यू आणि सगळे जीवन? आपल्याच आजूबाजूला बघा, विशेतः आपल्या समाजातल्या स्त्रियांची अवस्था. जर का एक संस्कृतीचा पगडा सोडला तर त्या पण म्हणतील असला दादला नको. फक्त निभवायचे आहे म्हणून व्रत घेतल्या सारखे जगणारेच जास्त आहेत. त्यामुळे मुळात उद्धेश जर का म्हातारपणी काय होणार असा असेल तर कठीण काम आहे. त्यापेक्षा चांगले मित्र जमावाने हे खूप सोयीस्कर आहे.

याचा ताळमेळ बसवता येत नाही.

मुद्दा असा आहे की लिव-इन रिलेशनशीप हा कुटुंबसंस्थेविरुद्ध पर्याय आहे. आपले आप्त जवळ असतांना मृत्यूसमयी निर्माण होऊ शकणारी परिस्थिती आणि कुटुंबच अस्तित्त्वात नसतांना मृत्यूसमयी होऊ शकणारी (बहुदा शोचनीय) परिस्थिती यात कमालीची तफावत आहे.

`मृत्यू मानवी जीवनाला मोक्षाप्रत नेऊ शकतो इतका विचार करण्याची त्यांची क्षमताच नाही'

हे वाक्य वरच्या काँटेक्स्टमधे वाचलं तर पुढे असं लिहीलंय :

थोडक्यात, पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे.

सरळ मुद्दा आहे आपल्या घरात, आपले आप्त आजूबाजूला असतांना येणारा मृत्यू आणि कुटुंब अस्तित्त्वातच नसतांना आलेला एकाकी मृत्यू यात उघड फरक आहे.

प्रसाद१९७१'s picture

13 Jan 2016 - 5:00 pm | प्रसाद१९७१

विठाकाका - तुमचा मिपावरचा हा पुनर्जन्म आहे का?

होबासराव's picture

12 Jan 2016 - 8:19 pm | होबासराव

मृत्यू ही जीवनातली महत्तम घटना आहे पण पाश्चात्य विचारसरणीला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही.
थोडक्यात, पाश्चात्य विचारसरणी हा फार मर्यादित विचार आहे आणि विवाह ही भारतीय संकल्पना मानवी जीवनाचा, जन्म ते मृत्यू असा समग्र विचार आहे.

सर्व मानवी नाती मान्यता आहेत कारण विवाह या मूळ मान्यतेतून ती निर्माण होतात. तस्मात, पती-पत्नी ही जशी केवळ मान्यता आहे तशीच, ज्यानं मानवी भावविश्वाचा फार मोठा भाग व्यापलेला आहे, ती आई सुद्धा वास्तविकात मानवी कल्पनाच आहे. थोडक्यात, विवाहच काय कोणतंही नातं ही मानवी कल्पना आहे.

फुकट फुकट आयुष्य वाया घालवलस होबासराव तु होबासक्या करुन करुन, वाच वरते व्यक्त केलेले विचार वाच जरा..

भारतात जन्म ते मृत्यू असा समग्र विचार करतात कि नाहि हे माहित नसलेला आणि इथे सामान्य जीवंत माणसाला किड्या मुंगि इतकी हि किंमत नाहि असे ठाम मत असलेला
निराकार होबासराव

होबासराव's picture

12 Jan 2016 - 8:23 pm | होबासराव

सामान्य जीवंत माणुस = Forget how much he earns पण जेव्ह्ढे कमावतो ते स्वष्टार्जित असतात, आणि ज्याच्या पाठिमागे कुठेलिहि राजकिय शक्ति नसते तरिपण कर्तव्य म्हणुन दर पाच वर्षाने मतदान करुन भविष्या साठि आशावादि राहणारा.

समजा लग्नपद्धती बंद झाली तर जनता काही वर्षांनी(तपांनी/पिढ्यांनी/शतकांनी) 'वेगळे काहीतरी" म्हणून परत सुरु करेलच!

_मनश्री_'s picture

12 Jan 2016 - 10:49 pm | _मनश्री_

लग्न पण तसेच आहे. आवडत असेल समोरचा वा समोरची तर ते सहज कटकट सहन करून सहजीवनाचा आनंद घेवू शकतात तेच होत नसेल तर मग उगाचच संस्कृति आणि आई/बाप झालो म्हणून मुलांकरता एकत्र झक मारत राहणे ह्याला काहीही अर्थ नाही. असो. मुळातच आपले विश्व सीमित असते आणि तेच आणि तेवढेच ग्रेट आहे असे मनात असलेल्यांना बाहेर काढू नाहीये. आपण बरे आणि ते बरे. कारण चर्चा करून फक्त वाद होतात आणि आपल्या आधीच असलेल्या समजुती अजून जास्त पक्क्या होतात कारण इगो दुखावतो.

एकदा तुम्ही आई - बाप झालात की मुलांना सुरक्षित वातावरण देणे हे तुमच कर्तव्यच असतं
त्यामुळे एकदा मुल जन्माला घातलं कि सगळ्यात आधी तुम्ही आई बाप असता स्वतःचा विचार नंतर आधी मुलाचं भविष्य
मुलाला जन्म देण्याचा निर्णय तुमचा असतो ,मुलाने सांगितलेलं नसत तुम्हाला कि मला जन्माला घाला ,त्यामुळे त्याला कुटुंबाची ऊब देण हे तुमच प्रथम कर्तव्य असलं पाहिजे
त्यामुळे मुल झाल्यानंतर आपापसात पटत नाही ,इगो प्रॉब्लेम्स या किंवा इतर काही कारण कधीच घटस्फोट घेऊ नये , काही समस्या उदभवली तरी त्यावर सामंजस्याने मार्ग काढून लग्न टिकवण्याचाच प्रयत्न करावा (कारण अगदीच गंभीर असेल तरच घटस्फोट घ्यावा )

तुमच्या चुकांची शिक्षा मुलांनी का भोगायची ? का त्यांनी स्वतःची फरफट करून घ्यायची ,आई बापांना तडजोड करायला जमल नाही म्हणून मुलांनी आयुष्यभर तडजोड करायची ,कुठलीही चुक नसताना शिक्षा भोगत रहायची
त्यापेक्षा मुल जन्माला घालू नका आणि आई वडील व्हायची हौस असेलच तर त्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःचे इगो प्रॉब्लेम्स बाजूला ठेवा ,आणि प्रपंच टिकवा , घटस्फोटानंतर मुलाच्या आर्थिक भविष्याची तरतूद शकते कायद्याच्या मदतीने , पण मानसिक घुसमट होते त्याच काय ?

(संपादित) खरच अगदी गंभीर कारण नसेल तर घटस्फोट घेण्याचा विचारही करू नये

_मनश्री_'s picture

12 Jan 2016 - 10:55 pm | _मनश्री_

वरील प्रतिसादात कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही तरीही कुणी दुखावल गेल असल्यास क्षमा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2016 - 11:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, लग्न न टीकण्याचं कारण एक वाट्सअ‍ॅप आहे का ?

-दिलीप बिरुटे

हेमंत लाटकर's picture

13 Jan 2016 - 9:55 am | हेमंत लाटकर

बाय द वे, लग्न न टीकण्याचं कारण एक वाट्सअॅप आहे का ?

असू शकते. समजा नवरा-बायको नौकरीहून घरी आल्यावर जर फेसबुक व्हाॅटस्अॅप स्टॅटस, चॅटींग करत बसले तर वाद होईलच ना.

तसं नै म्हणायचं ओ त्यांना....
जाउदे- तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे!

तुषार काळभोर's picture

13 Jan 2016 - 12:23 pm | तुषार काळभोर

किंवा इथं जिलब्या पाडत असतील तर सुसंवाद होईल की विसंवाद होईल की नुसताच वाद होईल?

उद्या जर कोणी घटस्फोटाच्या अर्जात 'माझा जोडीदारा हापिसातनं घरी आल्यावर मिपावर जिलब्या पाडत बसतो' असं कारण दिलं तर?

कविता१९७८'s picture

15 Jan 2016 - 2:18 pm | कविता१९७८

असू शकते. समजा नवरा-बायको नौकरीहून घरी आल्यावर जर फेसबुक व्हाॅटस्अॅप स्टॅटस, चॅटींग करत बसले तर वाद होईलच ना.

दोघंही व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक आणि चॅटींग करत बसले तर कसे वाद होतील, दोघे बिझीच असतील ना? दोघांपैकी एखादा फेसबुक , व्हॉटसअ‍ॅप आणि चॅटींग करत बसला आणि दुसर्‍याला वेळ देत नसेल किंवा घरकामात मदत करत नसेल तरच वाद होउ शकतात.

अर्धवटराव's picture

13 Jan 2016 - 1:06 am | अर्धवटराव

म्हणुनच समर्थ पळुन गेले बोहल्यावरुन ;)

मागे काय झालं ते राहु दे. सध्याच्या वैवाहीक समस्या इतर महत्वाच्या समस्यांसारख्याच आहेत.

साधारण आयुष्य कसं असतं माणसाचं??
घोकंपट्टी करत शिक्षण घेणं, इतरांनी सांगीतलं म्हणुन आर्थीक स्थैर्याकरता मिळेल तो जॉब करणं, मग त्याच रॅट रेसमधे आयुष्यभर दौडत राहाणं, कौटुंबीक जबाबदार्‍या पार पाडता पाडता राजकारण ते क्रिकेट अशा सर्व विषयांवर चर्चा करणं, थोडंफार पर्यटन वगैरे करुन जीवाला विरंगुळा देणं, आणि शेवटी कुठल्याश्या थेअरीने भारावुन जावुन (किंवा टाईमपास म्हणुन) आध्यात्म/छंद वगैरे बाबतीत जीवनाची इतीश्री करणं.
याच रुटीनने वैवाहीक आयुष्य गेलं तर त्यात साचलेपणाची जाणिव येऊन ते निरर्थक वाटायला लागलं तर आश्चर्य नाहि.

पण जर शिक्षण आपल्या मनाला/बुद्धीला तृप्त आणि सुदृढ करणारं अन्न असेल तर ? आपला जॉब कर्तुत्व गाजवण्याची संधी असेल तर? जीवनाचा अर्थ समजुन सांगणारं अध्यात्म असेल तर? तसच एकुणच आयुष्याचा/मनाचा विकास साधणारं वैवाहीक आयुष्य असेल तर? काहि प्रश्नच उरत नाहि मग. पण त्या करता सर्वप्रथम आपण इतरांचं वैचारीक ओझं वाहणारं मन न होता आपण आपलं स्वतः जगता येण्याची गरज असते. शिक्षण घेताना, करिअर निवडताना, आपलं बस्तान नीट बसवताना जर आपल्याला आपले ओळख नीट पटली तर वैवाहीक आयुष्यदेखील येकदम टकाटक बनतं. स्वतःचे/सासुरवडीचे नातेवाईक वगैरे मंडळींना कुठे/किती महत्व द्यायचं, किती फाट्यावर मारायचं याचा फॉर्मुला सेट झाला कि त्यांचाहि गेम घेण्याची मजा घेता येते, कुणी परेशान करु शकत नाहि. बाकी मृत्यु वगैरे बाबतीत आपण विचार केलेला नाहि अजुन... पण मृत्यु शांतपणे एकांतात व्हावा अशी सध्यातरी इच्छा आहे.

हेमंत लाटकर's picture

13 Jan 2016 - 10:12 am | हेमंत लाटकर

म्हणुनच समर्थ पळुन गेले बोहल्यावरुन ;)

यात हसण्यासारखे काय आहे. समर्थांना संसारात पडायचे नव्हते त्यांना समाज उद्धार करायचा होता. बालसुलभ बुद्धीनुसार आईने सांगितल्याप्रमाणे केले. सावधान हा शब्द ऐकल्यावर मंडपातून पलायन केले. हे तुमच्यासारख्या अर्धवटांना काय कळणार.

अर्धवटराव's picture

13 Jan 2016 - 12:01 pm | अर्धवटराव

असले दिडशहाणे धागे भविष्यात निघणार आहेत हे समर्थांनी ओळखलं होतं अगोदरच... म्हणुन असल्या मुर्खलक्षणांपासुन दूर गेले समर्थ.

हेमंत लाटकर's picture

13 Jan 2016 - 10:13 am | हेमंत लाटकर

म्हणुनच समर्थ पळुन गेले बोहल्यावरुन ;)

यात हसण्यासारखे काय आहे. समर्थांना संसारात पडायचे नव्हते त्यांना समाज उद्धार करायचा होता. बालसुलभ बुद्धीनुसार आईने सांगितल्याप्रमाणे केले. सावधान हा शब्द ऐकल्यावर मंडपातून पलायन केले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jan 2016 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मटा ला सदरकारांसाठी ओपनिंग्स आहेत. अमुक तमुकांचा सल्ला छाप.

लग्नं, संसार वगैरे सब मोह माया है प्यारे (आयडी नव्हे). जिसने जान लिया उसने सुख पा लिया.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jan 2016 - 8:01 am | कैलासवासी सोन्याबापु

ओवरडोज़ झाला !!