साहित्य :- मैदा १.५ कप, साधी साखर (पिठीसाखर नको) १ कप, बेकिंग पावडर २ टी स्पून, मीठ २/३ टी स्पून, लोणी ७ टेबल स्पून, दूध २/३ कप, व्हॅनिला इसेन्स १ टी स्पून, अंडी २.
बेकिंग पॅन, हँड मिक्सर.
कृती : - एका भांड्यात मापाचे कक्ष तापमानाचे (रुम टेंपरेचर) लोणी व साखर चमच्याने एकजीव करुन घ्यावे. दुसर्या भांड्यात अंडी फोडून चमच्याने फेसून घ्यावीत. पहिल्या भांड्यातील लोणी साखरेचे मिश्रण फेसलेल्या अंड्यात मिसळावे. चमच्याने हलवून घ्यावे. आता मापाचा मैदा घेऊन त्यावर मीठ व बेकिंग पावडर घालावी. हळूहळू मैदा भांड्यातल्या मिश्रणात टाकावा आणि चमच्याने हलवून सारखे करावे. हँड मिक्सरने अर्धा मिनिट फेटून घ्यावे. त्यात दूध घालावे पुन्हा फेटावे. मिनिटभरानंतर व्हॅनिला इसेन्स घालून आणखीन मिनिटभर फेटावे. चमच्याने मिश्रणाची साधारण धार पडेल इतपत ते पातळसर असावे. वाटल्यास किंचित दूध घालावे.
अवन ३५० अंश फॅ. तपमानाला प्रीहीटिंगला १० मिनिटे लावावा.
बेकिंग पॅनला लोणी (असल्यास शॉर्टनिंग जास्त चांगले) लावून मैद्याने डस्ट करावे. आता मिश्रण पॅनमधे ओतावे.
केक बेक करावा. केकचा रंग साधारण बिस्किटाइतपत तपकिरी झाल्यावर विणायची सुई अथवा टूथपिक खुपसून बाहेर काढावे. पीठ चिकटलेले असल्यास केक झालेला नाही. सुई/टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक लगेच बाहेर काढून तारेच्या रॅकवर अथवा स्टीलच्या चाळणीवर पॅन उलटून काढून ठेवावा. गार होऊ द्यावा.
गार केक मोठ्या सुरीने जमिनीला समांतर आडवा कापावा (केकच्या दोन तबकड्या होतील). अननस किसणीवर किसून घ्यावा (टीनमधील तयार क्रश्ड अननस वापरला तरी चालेल. किंवा इतरही फळे आवडीप्रमाणे वापरावीत). अननसाचा रस पिळून वाटीत काढावा व पिठीसाखर घालून ढवळावा. हे मिश्रण चमच्याने केकच्या दोन्ही तबकड्यांच्या आतल्या (पांढर्या) बाजूस सगळीकडे पसरावे ते शोषले जाईल. आता व्हिप क्रीममधे अननसाचा चोथा घालून एकत्र करावे व केकच्या दोन तबकड्यांपैकी खालच्या तबकडीवर ते मिश्रण साधारण १/४ (पाव) इंच जाडीचे होईल असे पसरावे. त्यावर केकचा वरचा भाग (तबकडी) ठेवावी.
फ्रॉस्टिंग बनवण्याची कृती :-कक्ष तापमानाच्या १० टेबलस्पून लोण्यामध्ये आवडीप्रमाणे पिठीसाखर मिसळा हँडमिक्सरने घोटावे. आवडत असल्यास त्यात वॅनिला इसेन्स घालावा. सुरीने संपूर्ण केकला साधारण १/८ इंच जाडीचे कोटिंग करावे. उरलेल्या फ्रॉस्टिंगमधे आवडते रंग मिसळून केकवर आयसिंग करावे.
रेवती
प्रतिक्रिया
31 Dec 2008 - 12:32 pm | वल्लरी
पायनॅपल-वॅनिला केक! चे presentation खुप छान आहे....
नवीन वर्षाच्या गोड शुभेच्छा....
:)
---वल्लरी
31 Dec 2008 - 1:50 pm | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो...
बिपिन कार्यकर्ते
31 Dec 2008 - 9:29 pm | चित्रा
असेच! केक खूपच छान दिसतो आहे.
31 Dec 2008 - 1:34 pm | विसोबा खेचर
रेवतीकाकू,
केक आणि फोटू, दोन्हीही मस्त!
उद्या १ जानेवारीच्या मुहूर्तावर आजच्या खादाडीत टाकतो..! :)
तात्या.
31 Dec 2008 - 8:35 pm | रेवती
धन्यवाद तात्या!
रेवती
31 Dec 2008 - 1:51 pm | मदनबाण
व्वा.. नविन वर्षाच्या आगमनाच्या वेळीच मस्त केक..:)
(केक प्रेमी)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
31 Dec 2008 - 2:54 pm | स्मिता श्रीपाद
कसला भारी दिसतोय हा केक...
तोंडाला पाणी सुटले....एक तुकडा कापुन तोंडात टाकावासा वाटत आहे...
खुप खुप आभार या पाकॄ बद्दल...
-स्मिता
31 Dec 2008 - 5:03 pm | शाल्मली
मस्तच दिसतोय केक.. आणि कृती पण छान आहे.
लवकरच करून बघते आणि कळवते तुला..
--शाल्मली.
31 Dec 2008 - 5:18 pm | मनस्वी
छानच झालाय केक!
31 Dec 2008 - 7:08 pm | लिखाळ
केक मस्त दिसतोय :)
याने काय फायदा होतो?
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
31 Dec 2008 - 8:43 pm | रेवती
कुठलाही केक अव्हनमधेच कूलींगला ठेवू नये, वरचा भाग कडक होत जातो.
केक जर साधाच ठेवायचा असेल तर थंड झाल्यावर कापून डब्यात भरून, झाकून ठेवावा म्हणजे मऊच राहतो.
याशिवाय बेकिंगनंतर आपल्याला त्यावर फ्रॉस्टींग लावायचे आहे, जे साखर मिसळून बटरचे केलेले आहे.
केक पूर्ण गार होण्याआधी जर फ्रॉस्टींग केले तर वितळून जाईल.
रेवती
2 Jan 2009 - 9:31 pm | लिखाळ
बर. माहितीसाठी आभार.
पुढील केक बनवताना हे लक्षात ठेवीन.
(माझ्या या वाक्यात दोन कर्ते आहेत हे सूज्ञांस लगेच उमगेल :) केक बनवणारा एक आणि वरील सूचना ऐनवेळी देऊन भाव खाणारा दुसरा).
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
31 Dec 2008 - 7:16 pm | शितल
रेवती,
तुझ्या केकच्या पाककृतीची वाट पहातच होते.
केक तर तु़झ्या हातचा खाल्लाच आहे, केवळ अप्रतिम.:)
केक आता नक्की करणार आहे.
फोटो ही सुंदर काढला आहेस. :)
31 Dec 2008 - 8:13 pm | प्राजु
केक खाल्लाच आहे तुझ्या हातचा. आता ही जीवघेणी रेसिपी.
पुन्हा एकदा कर गं केक. आणि मुख्य म्हणजे आम्हाला बोलव तेव्हा खायला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Dec 2008 - 8:45 pm | रेवती
जरूर करीन, लवकरच.:)
रेवती
31 Dec 2008 - 8:17 pm | स्वाती राजेश
डेकोरेट पण छान केलेला आहेस,
पाहू, कधी योग आहे ते केक खायचा, तू केलेला...
प्राजुने अगोदरच चान्स मारला आहे...:)
31 Dec 2008 - 8:22 pm | प्राजु
प्राजुने अगोदरच चान्स मारला आहे...
अगं.. आमच्या कट्ट्याला तिने हाच केक केला होता गं..
स्वातीताई, खूप दिवसांनी मिपावर बघून खूप बरं वाटलं गं. ही केकची पाकृ. आहेच. आता तुझ्याही खास पाकृ येऊदेत गं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Jan 2009 - 8:10 pm | रेवती
प्रतिसाद दिलेल्या न दिलेल्या सर्वांचे आभार.
रेवती
2 Jan 2009 - 9:41 pm | लिखाळ
वूव ! मस्तच दिसतोय केक !
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
2 Jan 2009 - 10:00 pm | वल्लरी
असेच म्हणते...
---वल्लरी
2 Jan 2009 - 11:24 pm | विसोबा खेचर
जबरा फोटू..! :)
3 Jan 2009 - 12:31 am | बिपिन कार्यकर्ते
अतिशय टेम्प्टिंग फोटू. छान जळवताय. तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या लागणार असं वाटतंय. ;)
बिपिन कार्यकर्ते
2 Jan 2009 - 11:18 pm | मीनल
मला एक प्रश्न नेहमी पडतो. --
बेक करताना कुठच पॅन वापरायचा?
मेटल चा वापरला तर बेक व्हायला वेळ लागतो.
ऍल्युमिनिअम डिस्पोझेबल वापरला तर कमी वेळ लागतो.
कुठचा चांगला? जास्त वेळ हळू बेक करणारा की फास्टवाला?
मीनल.
3 Jan 2009 - 12:11 am | रेवती
मी नेहमी टेफलॉन कोटेड पॅन वापरते. टारगेट्मधून आणलाय असं वाटतय, आता नक्की आठवत नाहीये.
कपकेक्ससाठी वॉलमार्टमधे जो कुठला मिळाला तो आणलाय. डिस्पोझेबलमध्ये केक बेक करताना
त्याला आतल्याबाजूने फॉइल लावावी (मैत्रिणीची युक्ती). मेटलचा पॅन वापरणे जास्त योग्य असे मला वाटते.
मेटलच्या किंवा कुठल्याही पॅनमध्ये तळाला लावलेले बटर लवकर वितळते व केक चवीला करपट लागतो, म्हणून शॉर्टनींग वापरावे,
म्हणजे केक करपत नाही (हा फरक केक दोन्ही पद्धतीने करून बघीतल्यावर कळतो.)
अजून मीही शिकतेच आहे त्यामुळे प्रयोग चालू असतात व प्रत्येक वेळेस मनात थोडी भीती असतेच.;)
शुभेच्छा!
रेवती