सोंदर्य प्रसाधने आणि अपाय

हेमंत लाटकर's picture
हेमंत लाटकर in काथ्याकूट
3 Jan 2016 - 6:52 pm
गाभा: 

सौंदर्य उजळविण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याएेवजी सहज उपलब्ध होणारी मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग केल्यास पैशाची बचत हाईल. तसेच बाजारातील स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता असते.

खालील प्रसाधने नेहमी वापरली जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.
1. हेअर डाईज :
आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारे बरेच जण असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरले जाते. बऱ्याच जणांना कलप वापरल्याने चेहेरा सुजणं, लाल होणं, तसेच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सूरू होतात. तसेच त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत.
2. शांपू :
अनेक सुगंधी शांपूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसेच शांपूमुळे केसांची चमकही नाहीशी होते आणि केस गळायला लागतात.
3. साबण :
बहुतेक साबणांमध्ये कॉस्टिक सोडा व जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.
4. केसांचे सुगंधी तेल :
सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असल्यांनी अशी तेलं वापरल्याने डोक जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात.
5. टिकली :
निरनिरळ्या रंगाची कुमकुम बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेणं आणि कोडसुद्धा होऊ शकतं.
6. मस्कारा व आग शॅडोज :
या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळे त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.
7. लिपस्टिक :
लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ आकर्षक दिसत असले तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.
8. फेस पावडर क्रीम :
फेस पावडर क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारं पुरळ उमटतं तर कित्येकदा चेहऱ्यावर चट्टेही पडतात.
9. जीवनसत्त्वांचा वापर :
आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.
10. ब्लिचिंग एजंटस :
आपल्या त्वचेच्या काळ्या, सावळ्या रंगावर नाराज होऊन बऱ्याच स्त्रिया ‘ब्लिचिंग’ करून गोरे बनण्याचा अट्टाहास करतात. या ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळं त्वचेला अपायच होत असतो.
11. नेल पॉलिश :
सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये "फॉर्मलडिहाईड लिकर" या द्र्वाचा वापर केलेला असतो. त्यामुळं पैरानोसिया म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो.

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Jan 2016 - 7:02 pm | रेवती

चांगली माहिती.

सुबोध खरे's picture

3 Jan 2016 - 7:48 pm | सुबोध खरे

केवळ ऍलर्जी आहे म्हण्यापलीकडे आपल्या म्हणण्याला शास्त्राधार काय आहे ?

ऍलर्जी कोणत्याही गोष्टीची असू शकते.
माझ्या मुलाला डाळीच्या पिठाची ऍलर्जी होती. लहानपणी मुलीला साय हळद आणि डाळीचे पीठ लावून अंघोळ घालत होतो. मुलाला तसे केल्यावर त्याचे अंगावर लाल पुरळ उठत असे. त्यामुळे त्याला डाळीचे पीठ किंवा खोब्रेल्च काय कोणतेही तेल लावता आले नाही.

कोणतीही गोष्ट हर्बल किंवा जडी बुटीची( वनस्पती जन्य) आहे म्हणून सुरक्षित आहे हा गैरसमज आहे. हर्बल मध्ये तंबाखू, चरस, गांजा बिब्बा सुद्धा येतात.

हेअर डाईज :--…. तसेच त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत. तुटलेल्या दातानेही तोंडाचा कर्करोग होतो. तेंव्हा एक दोन उदाहरणे देऊन मुद्दा सिद्ध होत नाही.
अस्वच्छ मुलतानी माती मुळे चेहऱ्यावर जंतू संसर्ग झालेली भरपूर उदाहरणे मी त्वचा रोग विभागात पाहिलेली आहेत.
सरसकटी करण टाळलयास बरे.
सध्या इतकेच

हेमंत लाटकर's picture

4 Jan 2016 - 6:03 pm | हेमंत लाटकर

कोणतीही गोष्ट हर्बल किंवा जडी बुटीची (वनस्पती जन्य) आहे म्हणून सुरक्षित आहे हा गैरसमज आहे.

मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती.

डाॅ. खरे मी वर लिहलेल्या गाेष्टी मध्ये हर्बल पाॅडक्ट नसून घरातील (आजीबाईच्या बटव्यातील) गोष्टी आहेत.

अजया's picture

3 Jan 2016 - 8:51 pm | अजया

डाॅ खरेंशी सहमत.
अप्रमाणित आणि अपरिक्षित हर्बल प्राॅडक्ट्समध्ये काय असते तेच जाणे. केवळ ते हर्बल म्हणून चांगले हे सरसकटीकरण चुकीचे आहे.
हर्बल टूथपेस्टचा सल्लाही याचकारणाने मी देत नाही.

हेमंत लाटकर's picture

3 Jan 2016 - 9:03 pm | हेमंत लाटकर

येथे सरसगटीकरण नाही. प्रत्येकाच्या स्किनची संवेदन क्षमता वेगळी असते, शरीराची प्रतिकार शक्ती वेगळी असते, घरातील गोष्टीची अॅलर्जी असू शकते, तरी बाजारात मिळणार्या सोंदर्य प्रसाधनात असलेल्या केमीकल मुळे काही जणाच्या स्किनला त्वरीत तर काही जणांना बरीच वर्ष वापरल्यानंतर अपाय होऊ शकतो. तसेच विविध आजार होऊ शकतात. पण घरातील गोष्टीचा वापर केल्यास सगळ्यांना अपाय न होता ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनाच अपाय होईल. साध्या पाण्याने चेहरा धुतला तरी चेहरा स्वच्छ टवटवीत होईल. बाजारात गोरे होण्याच्या क्रिम मिळतात पण खरेच आपण त्यामुळे गोरे होतो का?

बाजारातील सोंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा केस व्यवस्थित कट करणे, चेहरा-डोळे सकाळ/संध्याकाळ स्वच्छ पाण्याने धुणे, रोज आंघोळ करणे, नखे कापणे, स्वात्विक जेवण, नियमीत व्यायाम, स्वच्छ कपडे घातले तरी स्किन टवटवीत, प्रसन्न व्यक्तीमत्व व प्रकृती निकोप होऊ शकते.

अन्नू's picture

3 Jan 2016 - 9:18 pm | अन्नू

म्हण्जी 'फिरुन लावली' (फेअर अ‍ॅण्ड लवली) लावली तर चाल्येल न्हवं? ;)

लिओ's picture

3 Jan 2016 - 9:56 pm | लिओ

पण एखादयाला जर काहि वस्तुची ऍलर्जी असेल तर ( येथे हर्बल प्राॅडक्ट्स ) असेल तर त्यास व्यक्तिची राहणीमान , वातावरण , पर्‍दुषन, उत्पाद्न तयार करण्याची प्रक्रिया या गोष्टी ऍलर्जीस कारणीभुत असतात असे माझे मत आहे.

भारतात सरकार फक्त अलोपथी औषधासाटी मानके तयार करण्यात धण्यता मानते. Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy (AYUSH) मध्ये Ayurveda, Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy औषधासाटी मानके तयार करण्यात पाउले जर उचललि तर फार छान होइल कारण हि जबाबदारि सरकारची आहे

संदीप डांगे's picture

4 Jan 2016 - 2:44 pm | संदीप डांगे

खरे आणि अजया यांच्याशी सहमत.

सौंदर्यप्रसाधने जसे प्रत्येका रुग्णाला डॉक्टर योग्य ते औषध देतात, तसेच असले तर चांगले मग ते हर्बल असो वा केमिकल.

कलंत्री's picture

4 Jan 2016 - 4:59 pm | कलंत्री

हा लेख मला पार्श्वभूमी म्हणून ठिक वाटतो. मुख्य म्हणजे घरातील गोष्टींचा कसा वापर करायला हवा हे सांगितले तर बरे होईल, उदा. रात्री तेल लावुन झोपणे, काकडीचा किस चेहर्‍याला लावणे, कोरफडाचा गर लावणे इत्यादी इत्यादी.

लेखाशी थोडंफार सहमत, पूर्णपणे नाही.
आजकाल पेस्टिसाइड फळांवर, भाज्यांवर इतके मारले जातात की त्यांचा रस चेहृयावर लावणे तेव्हडेच हानीकारक. तसंच डाळी, तेल, हळद यातही भेसळ असते, मेंदीतही आजकाल कृत्रिम कलर टाकतात. त्यामुळे या गोष्टीपण शरीरावर, केसांवर लावणे फार चांगलं नाहीच. बाकी ब्लीचिंग, सुगंधी तेल सहमत. पण लिपस्टिक, आय शॅडो चांगल्या ब्रँडची आणि कधीमधी वापरल्यास फार काही अपाय होत नाही.

कविता१९७८'s picture

5 Jan 2016 - 6:34 am | कविता१९७८

आशा करते की तुमच्या घरातील सर्व बायका तुम्ही वर लिहीलेली प्रसाधने वापरत नसतीलच, अगदि टीकली आणि पावडरही वापरत 'नसतील.

हेमंत लाटकर's picture

5 Jan 2016 - 8:09 am | हेमंत लाटकर

आपल्या शरीरातील मेलोनिन संप्रेरकावर त्वचेचा रंग व डोळ्याचा रंग अवलंबून असतो. फेअरनेस क्रिम मधील स्टेराॅईडसमुळे चेहरा पांढरा होतो गोरा नाही. फेअरनेस क्रिममध्ये पारा व लिपस्टिकमध्ये कॅन्सर होण्यास कारणीभूत असणारे क्रोमियम आढळते. त्यापेक्षा रोज नियमितपणे सकाळ-संध्याकाळ स्वच्छ पाण्याने चेहरा धुतला तर कपाळ व नाकावर साचणारे स्त्राव स्वच्छ होऊन पिंपल्स होणार नाहीत व चेहरा टवटवीत होईल.

कविता१९७८'s picture

5 Jan 2016 - 8:05 pm | कविता१९७८

आशा करते की तुमच्या घरातील सर्व बायका तुम्ही वर लिहीलेली प्रसाधने वापरत नसतीलच, अगदि टीकली आणि पावडरही वापरत 'नसतील.

सुबोध खरे's picture

7 Jan 2016 - 1:37 pm | सुबोध खरे

फेअरनेस क्रिम मधील स्टेराॅईडसमुळे चेहरा पांढरा होतो गोरा नाही.
लिपस्टिकमध्ये कॅन्सर होण्यास कारणीभूत असणारे क्रोमियम आढळते

या तुमच्या विधानाला आधार काय? या विधानाला कोणताही शास्त्राधार नाही. असेल तर दाखवून द्या.
चेहरा पांढरा होतो गोरा नाही म्हणजे नक्की काय?

अमुक वाइट आहे हे ठीक आहे .
"हा लेख मला पार्श्वभूमी म्हणून ठिक वाटतो. मुख्य म्हणजे घरातील गोष्टींचा कसा वापर करायला हवा हे सांगितले तर बरे होईल, उदा. रात्री तेल लावुन झोपणे, काकडीचा किस चेहर्याला लावणे, कोरफडाचा गर लावणे इत्यादी इत्यादी."+1
तुमची दोन तीन पद्धत लिहा.सगळेच आमचं औषध/लेप/वटी/मलम यावर गुणकारी असा दावा करतातच.बघू प्रयोग करून.आम्हीही सांगू एक दोन.

प्रसाद१९७१'s picture

5 Jan 2016 - 5:36 pm | प्रसाद१९७१

हेलाकाका - तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नका वापरू ना.

तुमचे असले लेख वाचुन तुमची "कुठल्याही गोष्टीत खोड काढण्याची सवय असलेला खडुस म्हातारा" अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. ही गोष्ट तुम्ही जास्त काळजी करण्यासारखी आहे.

हेमंत लाटकर's picture

6 Jan 2016 - 9:55 am | हेमंत लाटकर

"कुठल्याही गोष्टीत खोड काढण्याची सवय असलेला खडुस म्हातारा"

"

खडुस म्हातारेच असतात असे नाही तर खडुस तरूणही असतात.
(माझा जन्म 1969 चा आहे)

बाजारातील सौंदर्य प्रसाधने वापरून अपाय करून घेण्यापेक्षा घरगुती गोष्टी वापरणे चांगले.

दारू व सिगारेटवर लिहलेले असते "आरोग्यास अपायकारक" तरी बरेच दारू पितातच व सिगारेट आेढताच.ड

होबासराव's picture

6 Jan 2016 - 5:22 pm | होबासराव

चान चान म्हायीती ;)

हेला काका आपल्याला बाकि खरेच किति विषयात गति आहे !

एक थक्क झालेला
होबासराव

सुबोध खरे's picture

7 Jan 2016 - 1:52 pm | सुबोध खरे

आपली
९ (जीवनसत्त्वांचा सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.) हि जीवन सत्त्वे कशी वापरली जातात यावर काही सांगू शकाल का?
१०(ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा) पारा वापरणे १९९० पासून बंद झालेले आहे. आता २५ वर्षांनी अजून तो वापरला जातो हे एकतर पुराव्याने दाखवा किंवा विधान मागे घ्या.

हि विधाने अतिशयोक्तीपूर्ण आहेत. याला शास्त्राधार असेल तर त्याचा विदा / दुवा द्या.
अन्यथा आम्ही एड्स पासून कर्करोगापर्यंत सर्व रोग बरे करतो म्हत्ल्यासारखे आहे.

डॉ. साहेब काय म्हणतात त्यावर उत्तर द्या. चोवीस तास होउन गेले आता त्यांनी विचारून. आपल्या लिखाणाची / शब्दाची विश्वासार्हता पणाला लागल्याचे आपल्या लक्षात आलेले नाही का?

संदीप डांगे's picture

8 Jan 2016 - 4:17 pm | संदीप डांगे

दैनिक संध्यानंद फार मनाला लावून घेताय बॉ तुम्ही... आषं नाय ना कलायचं.....

प्रसाद१९७१'s picture

8 Jan 2016 - 3:12 pm | प्रसाद१९७१

लिखाणाची / शब्दाची विश्वासार्हता

हेलाकाकांच्या बाबतीत अशी गोष्ट अस्तीत्वात आहे?