दहशतवाद म्हणजे नक्की काय ?

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in काथ्याकूट
17 Dec 2015 - 2:44 pm
गाभा: 

ढोबळ मानाने आपण दहशतवादाची व्याख्या कशी करतो ? म्हणजे कुठे अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केला किंवा हल्ला केला. साधारणत: आपण त्यास दहशतवाद म्हणतो. परंतु एक लक्षात घेत नाही कि ती दहशतवादाची १० वी स्टेप असते. १ ते ९ मध्ये जे काही घडते त्यास आपण दहशतवाद म्हणत नाही. उदाहरणार्थ भाषिक बहुसंख्य भाषिक अल्प संख्याकास धमकावतात ते काय असते ? व्होट बँकेच्या जोरावर धार्मिक अल्पसंख्य मोर्चा काढतात आणि एका शहीद स्मारकाची विटंबना करतात तेव्हा तो बहुसंख्य आणि अल्पसंख्य लोकांचा दहशतवाद असतो. आपण हे मान्य करतो का ? उदाहरणार्थ जेव्हा काही शाकाहारी लोक म्हणतात कि आम्ही मांसाहार करत नाही म्हणून आमच्या शेजारी मांसाहारी लोक नकोत तो हि एक प्रकारचा दहशतवादच असतो हे आपणास मान्य आहे का ? इथेही दहशत पसरवली जातेच भले तिचे स्वरूप सौम्य असेल पण मुद्दा उरतोच कि दहशत आहेच.

काही मुलतत्ववादी आपली मते रुजविण्यासाठी दहशतवादाचा सहारा घेतात. जे चूक आहे. लोकशाही मार्गाने ते त्यांच्या मागण्या लोकांपुढे /सत्तेपुढे / जगापुढे मांडू शकतात. परंतु ते तसे न करता दहशतीचा मार्ग अवलंबतात. पाकिस्तानातील लोक / क्रिकेट पटू इथे येवू नयेत हा माझा मुद्दा आहे पण तो मान्य करावयास लावण्यासाठी काळे फासणे हे कशात बसते ? आम्ही खळ खट्याक करू हे काय आहे ? हैदराबादमध्ये एक माथेफिरू म्हणतो १५ मिनिटे पोलीसांना रजा द्या मग बघा आम्ही काय करतो ? हे सगळे दहशतीचे प्रकार आहेत पण ह्यांची उतरंड १ ते ९ आकड्यात बसते संभवत: आम्ही त्यास दहशतवाद मानत नाही . एका विशिष्ठ धर्मियांनी किंवा आपण मुलतत्ववाद्यांनी केलेल्या हिंसाचारास दहशत माणू लागलो आहोत कि नाही ?

शेवटी दशतवाद दहशत पसरविण्यासाठी केला जातो. मग आम्ही गटाने मोठे आहोत म्हणून तुम्हास ह्या ट्रेन मध्ये चढू देणार नाही. आम्ही हे विशिष्ठ मांस खात नाही म्हणून तुम्ही खावू नका. किंवा तुम्हास खावू देणार नाही. तुम्ही आम्हास कोण सांगणारे हेल्मेट घालू नका. ह्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय झुगारून लोक बेदरकार वाहने चालवतात तेही हेल्मेट न घालता. आम्ही शाकाहारी आहोत म्हणून तुम्ही मासाहार सोडा. आम्ही विशिष्ठ भाषा बोलतो मग तुम्ही हि ती बोललीच पाहिजेल. आमचे सणवार / संस्कृती (प्राचीन ? ) पाळण्यासाठी आम्ही रस्ते अडवू. ढोले ताशे D J चा घणघणाट करत मिरवणूक काढू . तुम्ही आम्हास आडवणारे कोण ? असे म्हणणे . आम्ही रस्त्यावर बसून नमाज पढू . कर्णे लावून लोकांची झोपमोड करु. . हे सगळे प्रकार दहशतीत बसतात.

मग जे बोंब स्फोट करतात . हल्ले होतात त्यासच फक्त दहशतवाद किंवा हल्ले कसे म्हणायचे ? भारतीय संविधानाने केलेले कायदे पायदळीस मिळवुन आपलाच हेका सुरु ठेवणे हाही दहशतवादच झाला .

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

17 Dec 2015 - 4:40 pm | उगा काहितरीच

१००...२००...३००...कितीही !
-प्रतिक्षेत !

जातवेद's picture

18 Dec 2015 - 11:45 am | जातवेद

वाचने तरी २०० झाली आहेत, प्रतिसादांचं माहीत नाही. पण प्रस्तुत लेख हा दहशतवादावर असल्यामुळे आणि मिपाच्या देशात नुकतेच असे बरेच हल्ले झाल्यामुळे धाग्याचं काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही.
कोण पहिला जेनुविन प्रतिसाद देतो हे पाहणे रोचक ठरेल :)

दहशतवादावर आधारित मिपाकरनी भावनाकल्लोळ यांचा लेख वाचावा अशी विनंती.
त्यांनी दहशतवादाचा 'मुळा'पासुन समाचार घेतला आहे..

जेपी's picture

17 Dec 2015 - 5:11 pm | जेपी

लिंक बद्दल धन्यवाद.
आता लोकांना दहशतवादाच कुळ आणी मुळा कळेल..

पालीचा खंडोबा १'s picture

17 Dec 2015 - 5:27 pm | पालीचा खंडोबा १

असंवेदनशीलता वाढलेली नि मने गोठलेली असली कि असेच होते, कुठल्याही गोष्टीची सुरुवात लहान गोष्टी पासूनच होते. दहशतवादाचे हि असेच झाले आहे.
१ पसून वाढून १० पर्यंत गेला आहे पण पातळी गाठल्यावर तो जाणवू लागला.

खंडुबा राया ,म्या काय मंतो,आज सणांच रोडगा आणी भरीत खावु, अन बाकीची चर्चा उद्या करु..कसं

आदिजोशी's picture

17 Dec 2015 - 6:08 pm | आदिजोशी

असले लेख टाकणं हा सुद्धा एक प्रकारचा दशतवादच आहे. आणि असल्या प्रतिक्रिया सुद्धा.

कट्टापा's picture

4 Jan 2016 - 1:01 am | कट्टापा

इस्लाम म्हणजे दहशतवाद...
विषय संपला.!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2016 - 4:49 am | अत्रुप्त आत्मा

एक काडी, २०० प्रतिसाद.. ;) विषय खलास!

प्रचेतस's picture

4 Jan 2016 - 9:04 am | प्रचेतस

भल्या पहाटे?

हुप्प्या's picture

4 Jan 2016 - 7:16 am | हुप्प्या

एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या ज्या समाजात (वा समूहात रहाते) त्या समाजाने केलेल्या खर्याखोट्या दुष्कृत्याला उत्तर म्हणून त्या व्यक्तीला ठार मारले जाते वा त्या व्यक्तीची मालमत्ता हडप केली जाते वा अन्य प्रकारे त्याचे नुकसान केले जाते त्याला दहशतवाद म्हणता येईल.
९/११ वा २६/११ चा हल्ला हा ह्यातला प्रकार म्हणता येईल. अमेरिकेने दुष्कृत्याचा सूड म्हणून त्या कृत्याशी थेट संबंध नसलेल्या ३००० लोकांना ठार मारणे हा दहशतवाद आहे. कुण्या एका क्ष धर्मीयाने य धर्माचा (खरा वा खोटा) अपमान केला म्हणून पूर्ण तयारीनिशी आलेल्या य धर्मीय गटाने तमाम क्ष धर्मीय लोकांना मारत सुटणे हा दहशतवाद आहे.

मांसाहार करत असाल तर आमच्या सोसायटीत निवासिका (फ्लॅट) घेऊ नका म्हणणे हा दहशतवाद म्हणवत नाही. मुसलमान नसाल तर मक्का मदीना ह्या गावांमधे प्रवेश नाही हा दहशतवाद आहे का? नाही. हा भेदभाव आहे.

दहशतवादामधे बळी पडणार्‍या लोकांपुढे काहीही पर्याय नसतो. त्या अत्याचाराला सामोरे जाणे हीच अपरिहार्यता असते.
मला वाटते अशी हतबलता बळीच्या माथी मारली जाणे हे दहशतवादाचे लक्षण आहे. बाकी प्रकारांना त्यामुळे दहशतवाद म्हणावे असे वाटत नाही.