माझ्यामते आपण शेपूट घालत नाही...
आपले नाकर्ते राज्यकर्ते शेपूट घालतात.
इस्त्रायलने हमासच्या आतंकवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केलेली कारवाई मी योग्य उत्तर समजतो....
आतंकवादाला अशा १०० पटीने अधिक पटीने उत्तर मिळाले की परत अतिरेक्यांची अशा समाजविघातक कारवाया करण्याची हिंमतच होणार नाही...
असे राजनितीक शौर्य आपले नेभळट नेते कधी दाखवणार?
(आतंकवाद समूळ उखडण्यासाठीतरी अशा हिंसेचे समर्थन करणारा) सागर

बर्याचदा आपण भारताचा आणि इस्त्रायलचा प्रश्न हा एकाच मापाने मोजतो. ते करताना समोरच्या शस्त्रूचा केवळ धर्म समान आहे हा भाग नसतो तर त्या धर्माचा शत्रू या दोनही देशातील बहुसंख्यांकांना त्यांच्या धर्मामुळे विरोधक/काफिर वगैरे वगैरे समजतो हे देखील आहे. मात्र दोन्ही देशातील प्रश्न हे वाटतात तितके समान नाहीत किंबहूना त्याच्यातील साम्यापेक्षा भेदच अधिक आहेत असे नीट विचार केल्यास समजते.
सर्वप्रथम भारताचा विचार केल्यास काय दिसते तर धर्माच्या आधारावर फाळणी मान्य केली, पण मूळ भारत हा सर्वधर्मसमभाव मानणारे राष्ट्रच झाला. नंतर झालेल्या बांग्लादेशमुक्ती युद्धानंतरही त्या भूभागास आपल्यात न सामावता त्याला आपण वेगळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली (त्यात बरोबर काय आणि चूक काय हा वेगळा मुद्दा झाला). मात्र तरी देखील आपल्या विरुद्ध - "हसके लिया पाकीस्तान", "लढके लेंगे हिंदूस्थान, काश्मीर वीना पाकीस्तान अधुरा है", वगैरे घोषणा झाल्या. थोडक्यात द्वेष हा संपला नाही तर तो उत्तरोत्तर फोफावतच गेला. त्याचा परीपाक हा अतिरेकी कारवायात झाला. तो थांबवण्यासाठीची राजकीय आणि वैयक्तिक धैर्य कदाचीत केवळ झालेल्या पंतप्रधानांमधे लाल बहाद्दूर शास्त्री, मोरारजी देसाई आणि अर्थातच इंदीरा गांधीच दाखवू शकेल्/ल्या असते/त्या असे वाटते. वाजपेयींकडे कदाचीत ते राजकीय धैर्य जर भाजपचीच सत्ता असती तर असते तरी देखील ज्या पद्धतीचे निर्णय घेतले गेले त्यामधे असे विधान करणे हे "जर-तर" प्रकारातच मोडते. असो.
या उलट इस्त्रायलला जेंव्हा १९४८ साली स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा त्यांनी ते ज्युंचे राष्ट्र म्हणून तयार केले. ते करण्यामागे त्यांचे जसे २००० वर्षे जगभर (एक भारतातील स्वागत सोडल्यास) वणवण भटकणे होते तसेच तत्कालीन हिटलरच्या अत्याचारात समजून आलेले कटू सत्य देखील होते की स्वतःची भूमी असण्याशिवाय पर्याय नाही. आणि ती भूमी बाकी कुठली नसून जी काही पॅलेस्टाईन झाली आहे, तीच होणे महत्वाचे होते. असे होत असताना १४०० वर्षांचे युद्ध उफाळून आले. आणि त्याच भूभागात नेटीव्ह असलेल्या माणसांना धर्माच्या आधारावर परत आश्रीत/रेफ्युजी व्हावे लागले. या वेळेस ते फक्त ज्यूंच्या ऐवजी मुसलमान होते. त्यात अरब आणि इतर मुस्लीम राष्ट्रांचा गोड गैरसमज झाला की या चिमुरड्या राष्ट्राला चिरडणे सोपे आहे. अर्थात परीणाम स्थानीक मुसलमानांचे हाल होण्यात झाला ज्यातून कडवा दहशतवाद तयार झाला (जो धर्माधारीत असण्यापेक्षा स्थानीक राजकीय आणि जमिनीच्या हक्कांसंबंधी जास्त आहे - जे भारताच्या बाबतीत होत आहे त्याच्या बरोबर विरुध्द आहे).
आता इस्त्रायलने जे गेले ६० वर्षे धोरण पाळले त्याची खरेच त्यांना खर्या अर्थाने चांगली फळे मिळाली आहेत का? अर्थातच तसे किमान दिसत नाही. दहशतवाद अजूनही आहे. आत्ताचा हल्ला जरी हमासवर योग्य कारणाने केला असला तरी त्यात सामान्यांना पण प्याद्याचे मरण येत आहे, ज्यातून दहशतवादाची पुढची पिढी तयार होत आहे. त्यातून इस्त्रायली सामान्यांचे हाल होत आहेत. थोडक्यात हे नष्टचक्र होत आहे. पंतप्रधान इझॅक रॅबिन नी ते क्लिंटनच्या मध्यस्थीने तोडायचा प्रयत्न केला, पण त्यात स्वतःच्याच लोकांकडून प्राण गमावून बसावे लागले आणि पहीले पाढे पंच्चावन्न अशी अवस्था झाली.
तरी देखील इस्त्रायलचे धोरण संपूर्ण चुकते आहे का? अर्थातच नाही. ठोश्यासप्रतिठोसा द्यावाच लागतो, तो दिला नाही तरी समस्या कमी होणार नसते. इस्रायलच्या बाबतीत तर तसे नक्कीच होणार नाही. तरी देखील सध्याचे उत्तर त्यांना इप्सित नजीकच्या काळात देईल असा त्यांच्या राजकारण्यांचा आणि सैन्यदलप्रमुखांचा पण विश्वास असेल असे वाटत नाही.
मग भारत शेपूट घालतो आहे का याचे उत्तर काय?
होय घालतो. अर्थात याचा अर्थ युद्ध चालू करावे असा नाही होत तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि समाजस्वास्थ्य बळकट करावे, इतके की असले हल्ले जेंव्हा होतील तेंव्हा आपण ते तीन दिवसात नाही तर तीन तासात परतवू लागू. पण त्याही आधी तसे होण्याआधीच ते थांबवू शकू - गुप्तहेर खात्याच्या मदतीने... असा समाज हवा की जो देश आणि देशच पहीला, धर्म दुसरा (आणि वैयक्तिक) म्हणेल, जात राजकारणात (आणि इतरत्रही) आणणार नाही (मनात देखील).
आज दहशतवादी हल्ले कुणालाच चुकलेले नाहीत असे विशेष करून ब्रिटन, आणि अमेरिकेचे उदाहरण बघताना वाटते. तरी देखील तेथील जनता आणि एकंदरीत धोरणकर्त्यांचे दृष्टीकोन पाहीले तर समजते की ते हल्ले करून प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणून तो सोडवत आहे. (इराकवरील हल्ला हा ९/११ झाले नसते तरी झालाच असता असे मला वाटते. सद्दाममुळे ग्लोबल वार्मिंग होत आहे म्हणून देखील बूशने ते केले असते :-) असो.)
१. बर्याचदा आपण भारताचा आणि इस्त्रायलचा प्रश्न हा एकाच मापाने मोजतो. ते करताना समोरच्या शस्त्रूचा केवळ धर्म समान आहे हा भाग नसतो तर त्या धर्माचा शत्रू या दोनही देशातील बहुसंख्यांकांना त्यांच्या धर्मामुळे विरोधक/काफिर वगैरे वगैरे समजतो हे देखील आहे. मात्र दोन्ही देशातील प्रश्न हे वाटतात तितके समान नाहीत किंबहूना त्याच्यातील साम्यापेक्षा भेदच अधिक आहेत असे नीट विचार केल्यास समजते.
१००% सहमत.
हे केवळ इस्रायलबाबतच नव्हे, तर अमेरेकेबाबतही सत्य आहे. बुशने क्रुसेडची भाषा केली खरी पण खरे म्हणजे आखाती देशांतील तेलसंपन्न राष्ट्रे इस्लामधर्मिय आहेत, हा केवळ योगायोग. तेथे कोणी इतर धर्मिय असते, तर अमेरिकेचे त्यांच्याबरोबरही बिनसले असते. आपल्याप्रमाणे "१००० वर्षांच्या गुलामगिरीचे" ओझे ते बाळगून नाहीत.
२. नंतर झालेल्या बांग्लादेशमुक्ती युद्धानंतरही त्या भूभागास आपल्यात न सामावता त्याला आपण वेगळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली
दुसरा कोणता उपाय होता? भारतात सामील व्हावे ही त्यांचीदेखिल मागणी नव्हती. त्यांना फक्त जुलमी पश्चिम पाकिस्तानी राज्यकर्त्यांपासून मुक्तता हवी होती.
अवांतर १ - बांगलादेश मुक्तीनंतर इंदिरा गांधी यांनी "धर्माधारीत द्विराष्ट्र वाद" मोडीत निघाला असे वक्तव्य केले. पण ते खरे होते काय? बांगलादेश आणि प. बंगाल एकत्र येऊन एक नवे राष्ट्र बनले असते तर ते खरे मानण्यास जागा होती. पण तसे काहीच घडले नाही. प. बंगाल हा मनानेदेखिल भारताताच भाग राहिला.
अवांतर २ - बांगलादेश मुक्ती ही जगातील एकमेव ससेशनीस्ट चळवळ की ज्यात बहुसंख्यांनी (५५%) अल्पसंख्यांकापासून (४५%) मुक्ती मिळवली!
३. आणि त्याच भूभागात नेटीव्ह असलेल्या माणसांना धर्माच्या आधारावर परत आश्रीत/रेफ्युजी व्हावे लागले.
हाच तो रूट कॉज. ह्यावर समाधानकारक तोडगा निघाल्याशिवाय हा प्रश्न सुटणे कदापी शक्य नाही.
४. आता इस्त्रायलने जे गेले ६० वर्षे धोरण पाळले त्याची खरेच त्यांना खर्या अर्थाने चांगली फळे मिळाली आहेत का? अर्थातच तसे किमान दिसत नाही. दहशतवाद अजूनही आहे.
इस्रायलने दहशतवादाचा यशस्वी मुकाबला / बंदोबस्त केला, असा गैरसमज भारतात बर्याच लोकांचा आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवते? इस्रायलचे २ सैनिक पळवले म्हणून त्याने लेबेनॉनवर हल्ला केला. अनेक निरपराध्यांची हत्या आणि प्रचंड वित्तहानीनंतर, वाटाघाटी झाल्या. इस्रायलचे ते पळवलेले सैनिक तीन वर्षांनंतर परत आले - शवपेट्यांतून!
५. तरी देखील इस्त्रायलचे धोरण संपूर्ण चुकते आहे का? अर्थातच नाही. ठोश्यासप्रतिठोसा द्यावाच लागतो, तो दिला नाही तरी समस्या कमी होणार नसते. इस्रायलच्या बाबतीत तर तसे नक्कीच होणार नाही. तरी देखील सध्याचे उत्तर त्यांना इप्सित नजीकच्या काळात देईल असा त्यांच्या राजकारण्यांचा आणि सैन्यदलप्रमुखांचा पण विश्वास असेल असे वाटत नाही.
१००% सहमत.
हेच भारताबाबतही लागू व्हावे.
६. मग भारत शेपूट घालतो आहे का याचे उत्तर काय? होय घालतो.
हे कसे ते समजले नाही. पुढील सर्व विवेचन हे भारताने आपली अंतर्गत सुरक्षा व्य्वस्था मजबूत करायला हवी, याबाबत आहे. त्यावर वाद नाही पण त्याचा अर्थ शेपूट घालतो ते कसे, समजले नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
१. पाक ची आर्मी पॉवर आपल्यापेक्षा खूप कमी आहे. युद्ध चालू झाल्यवर काही दिवसात हा रंग स्पष्ट होवुन, त्यान्च्या वर न्यूक्लियर वेपन वपरन्यासाठि अंतर्गत दबाव येइल. एकदा जर न्यूक्लियर वेपन्स वापरली गेली तर मग पाक समुळ नष्ट झाला तरी भारताचे ही प्रचन्ड नुकसान होइल. याशिवाय बाकिचे मुस्लिम देश आपल्यविरुद्ध जिहाद जाहिर कारतील.
२. आत्ता पाक ची राजकीय आणि आर्थिक परिस्थिति खूप नाज़ुक आहे. आपण जर युद्ध पुकारला तर त्यांची एकमेव ताकद - आर्मी - ती सुद्धा डळमळित होइल. एक लक्षात घ्या की पाक हा आपल्या आणि तालिबान मध्ये एक बफर स्टेट आहे. जर का तिकड़े अराजकता माजली तर तो देश कोसळेल आनी मग तालिबान थेट आपल्या सीमेवार येउन धड़केल. मग रोज़च हज़ारो कसाब पैदा हाउन आपल्या कानाकोपरयतून आत शिरतिल. अराजकता माजलेला देश काबूत आणणे एव्हढे सोप्पे नाहिये. अमेरिकेची इराक़ मध्ये कशी फे फे उडतिये ते बघतोच आहोत. शिवाय न्यूक्लियर वेपन्स तालिबान च्या हातात पड्तील ते वेगळच.
"आता इस्त्रायलने जे गेले ६० वर्षे धोरण पाळले त्याची खरेच त्यांना खर्या अर्थाने चांगली फळे मिळाली आहेत का? अर्थातच तसे किमान दिसत नाही. दहशतवाद अजूनही आहे.
इस्रायलने दहशतवादाचा यशस्वी मुकाबला / बंदोबस्त केला, असा गैरसमज भारतात बर्याच लोकांचा आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवते? इस्रायलचे २ सैनिक पळवले म्हणून त्याने लेबेनॉनवर हल्ला केला. अनेक निरपराध्यांची हत्या आणि प्रचंड वित्तहानीनंतर, वाटाघाटी झाल्या. इस्रायलचे ते पळवलेले सैनिक तीन वर्षांनंतर परत आले - शवपेट्यांतून"
१०० टक्के सहमत. इस्रायलला आणि भारताला हा प्रश्न भेडसावतो कारण शत्रू तुमच्यासारखाच दिसतो. पटकन ओळखू येत नाही.
अमेरिकेतही ११ सप्टेम्बर नंतर १०-१२ हल्ले झाले आहेत. त्यापैकी काही गोर्या अतिरेक्यांकडून झाले. (ख्रिश्चन कडव्या लोकांकडून जैवतन्त्रज्ञानात संशोधन करणार्या शास्त्रज्ञांवर वगैरे). यातही तोच प्रश्न येत असावा.
"अर्थात याचा अर्थ युद्ध चालू करावे असा नाही"
आपले मध्यमवर्गीय असे गृहीत धरून चालतात की आपण पाकिस्तानला चुटकीसरशी पराभूत करू. ते खरे आहे का ते ही पहायला हवे. कारगिल युद्धाच्या वेळी घुसखोरांना हाकलायला जेवढा वेळ लागला तो आठवला तर हा आत्मविश्वास अनाठायी वाटतो. म्हणूनच बहुधा "आर या पार की लडाई" ची भाषा बोलणार्या बाजपेयींनाही प्रत्यक्ष युद्ध करता आले नसावे.
म्हणून सहमत.
घुसव त्या झरदारीच्या पोटात :-)
sorry Jokes apart पण USA देखिल याला खुपसं जबाबदार आहे ! असे नाही का कुणाला वाट्त ??
पण काही ही म्हणा जेव्हा श्रीमंतांना दु:ख होते तर ते मोठे अन आम्ही च्या दु:खांचे काय ?? ईथे गरीबांना वाली नाही.
उनका खुन, खुन और हमारा खुन पानी ??
~ वाहीदा
प्रिय रामपूरी,
आपण मटा चा दुवा दिला त्याबद्दल प्रथम आपले आभार ! पण या लेखाच्या अनुषंगाने आपण काही प्रास्ताविक केले असते, आपले मत व्यक्त केले असते,तर या काथ्याकुटाला एक वजन आले असते. वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी मतं असतात तेव्हा सदरील लेखाबद्दल काहीएक विश्लेषन आवडले असते, आपण कोणताही मजकुर न लिहिता कोथळा काढल्यासारखे वाटले :)
असो, मटाचा लेख सुंदरच आहे, (शेवटून तिसरा, दुसरा,पॅरा तर लैच भारी ) दुव्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स !!!
संसदेवर हल्ला, त्यानंतर विविध शहरात झालेले बाँबस्फोट, अलिकडचा मुंबईवरील हल्ला, दरवर्षी काही ना काही घटना घडतच आहेत! पण आम्ही आहोत सहिष्णूतावादी. चर्चेने, आंतरराष्ट्रीय समुदायाचे वगैरे दडपण आणून आम्ही हा प्रश्न गेली अनेक वर्ष सोडवू पाहात आहोत परंतु त्याचा काहीही फायदा नाही!
पाक मात्र दुनियेला फाट्यावर मारून भारताच्या नाकावर टिच्चून भारतात जोरदार दहशतवादी कारवाया करतच आहे!
असो..
आपला,
(सहिष्णूतावादी, आणि एक नंबरचा गांडू) तात्या.
साली हल्ला झाला. आज आपण २००९ उजाडून देखिल अफज़ल गुरु भारतीय करदात्यांच्या पैशातून सरकारी पाहुणचार झोडतो आहे. २००८ साली पकडलेला कसाब असाच मजा मारेल. जिथे आपले सरकार आणि प्रशासन पकडलेल्या अतिरेक्यांसमोर शेपुट घालते तिथे बाहेरच्या देशाबद्दल काय बोलावे?
यूद्ध हा पर्याय असु शकतो...... पण पण माकडाच्या हातात कोलित म्हणतात तसे काहिसे आहे...... पाककडिल अण्वस्त्रे कोणच्या कन्ट्रोल मध्ये आहेत ते माहित नसल्यामुळे घाबरत असावेत.....जर का त्यावर अतिरेक्यान्चा कन्ट्रोल असेल तर..... अस मला वाटत....... बाकि जाणत्या माणसाने सान्गावे.....
बाहेरील आक्रमण झाल्यानंतर शेपूट घालण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही.
आपल्या देशावर अनेक शतके उपर्र्यानी राज्य केले आहे. जसे त्यावेळी कोणताही
प्रतिकार झाला नाही तसाच यावेळीही होणार नाही हे नक्की.
या शेपूट घालुपणाचा पाया प्रथम मुफ्ती महमद सैद यानी रचीला .
वाजपेयी नी कंदहार प्रकरणाने त्याच्या भिन्ती रचल्या
जिन्नांची स्तुतीसुमने गाऊन अडवानीनी त्यावर कळस रचला.
आक्रमक असणे ही इस्राईलची गरज आहे
अर्थात त्यामुळे गाझा पट्ट्यातल्या गरीब लोकांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो.
एक पाकिस्तानी राजवट कोसळवली पाकिस्तान पादाक्रान्त केला तरी त्यातल्या सर्व सामान्य लोकांचे काय करणार?
अमेरीकेपासून इराक शेकडो मैल दूर आहे. तेथला सामान्य इराकी अमेरीकेला त्रास देउ शकत नाही म्हणून अमेरीकेने इराक विरुद्ध युद्ध पुकारले. अमेरीकेला अजूनही शेजारच्या एका छोट्याशा क्युबावर काहीही कारवाई करता आलेली नाहिय्ये
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
प्रतिक्रिया
30 Dec 2008 - 10:45 pm | सागर
माझ्यामते आपण शेपूट घालत नाही...
आपले नाकर्ते राज्यकर्ते शेपूट घालतात.
इस्त्रायलने हमासच्या आतंकवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केलेली कारवाई मी योग्य उत्तर समजतो....
आतंकवादाला अशा १०० पटीने अधिक पटीने उत्तर मिळाले की परत अतिरेक्यांची अशा समाजविघातक कारवाया करण्याची हिंमतच होणार नाही...
असे राजनितीक शौर्य आपले नेभळट नेते कधी दाखवणार?
(आतंकवाद समूळ उखडण्यासाठीतरी अशा हिंसेचे समर्थन करणारा) सागर
31 Dec 2008 - 12:16 am | सखाराम_गटणे™
सहमत,
४ इस्त्रायली मेले तर, ते बॉम्ब टाकण्यासाठी विमानाला बेसची परवानगी मागत आहेत. आणि किती ही माणसे मेली तरी फक्त 'कडक निषेध' ह्या पलीकडे काहीच करत नाही.
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
31 Dec 2008 - 7:26 am | विकास
इस्त्रायलने हमासच्या आतंकवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केलेली कारवाई मी योग्य उत्तर समजतो....
होय घालतो. अर्थात याचा अर्थ युद्ध चालू करावे असा नाही होत तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि समाजस्वास्थ्य बळकट करावे, इतके की असले हल्ले जेंव्हा होतील तेंव्हा आपण ते तीन दिवसात नाही तर तीन तासात परतवू लागू. पण त्याही आधी तसे होण्याआधीच ते थांबवू शकू - गुप्तहेर खात्याच्या मदतीने... असा समाज हवा की जो देश आणि देशच पहीला, धर्म दुसरा (आणि वैयक्तिक) म्हणेल, जात राजकारणात (आणि इतरत्रही) आणणार नाही (मनात देखील).
आज दहशतवादी हल्ले कुणालाच चुकलेले नाहीत असे विशेष करून ब्रिटन, आणि अमेरिकेचे उदाहरण बघताना वाटते. तरी देखील तेथील जनता आणि एकंदरीत धोरणकर्त्यांचे दृष्टीकोन पाहीले तर समजते की ते हल्ले करून प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणून तो सोडवत आहे. (इराकवरील हल्ला हा ९/११ झाले नसते तरी झालाच असता असे मला वाटते. सद्दाममुळे ग्लोबल वार्मिंग होत आहे म्हणून देखील बूशने ते केले असते :-) असो.)
31 Dec 2008 - 8:32 am | सुनील
१. बर्याचदा आपण भारताचा आणि इस्त्रायलचा प्रश्न हा एकाच मापाने मोजतो. ते करताना समोरच्या शस्त्रूचा केवळ धर्म समान आहे हा भाग नसतो तर त्या धर्माचा शत्रू या दोनही देशातील बहुसंख्यांकांना त्यांच्या धर्मामुळे विरोधक/काफिर वगैरे वगैरे समजतो हे देखील आहे. मात्र दोन्ही देशातील प्रश्न हे वाटतात तितके समान नाहीत किंबहूना त्याच्यातील साम्यापेक्षा भेदच अधिक आहेत असे नीट विचार केल्यास समजते.
१००% सहमत.
हे केवळ इस्रायलबाबतच नव्हे, तर अमेरेकेबाबतही सत्य आहे. बुशने क्रुसेडची भाषा केली खरी पण खरे म्हणजे आखाती देशांतील तेलसंपन्न राष्ट्रे इस्लामधर्मिय आहेत, हा केवळ योगायोग. तेथे कोणी इतर धर्मिय असते, तर अमेरिकेचे त्यांच्याबरोबरही बिनसले असते. आपल्याप्रमाणे "१००० वर्षांच्या गुलामगिरीचे" ओझे ते बाळगून नाहीत.
२. नंतर झालेल्या बांग्लादेशमुक्ती युद्धानंतरही त्या भूभागास आपल्यात न सामावता त्याला आपण वेगळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली
दुसरा कोणता उपाय होता? भारतात सामील व्हावे ही त्यांचीदेखिल मागणी नव्हती. त्यांना फक्त जुलमी पश्चिम पाकिस्तानी राज्यकर्त्यांपासून मुक्तता हवी होती.
अवांतर १ - बांगलादेश मुक्तीनंतर इंदिरा गांधी यांनी "धर्माधारीत द्विराष्ट्र वाद" मोडीत निघाला असे वक्तव्य केले. पण ते खरे होते काय? बांगलादेश आणि प. बंगाल एकत्र येऊन एक नवे राष्ट्र बनले असते तर ते खरे मानण्यास जागा होती. पण तसे काहीच घडले नाही. प. बंगाल हा मनानेदेखिल भारताताच भाग राहिला.
अवांतर २ - बांगलादेश मुक्ती ही जगातील एकमेव ससेशनीस्ट चळवळ की ज्यात बहुसंख्यांनी (५५%) अल्पसंख्यांकापासून (४५%) मुक्ती मिळवली!
३. आणि त्याच भूभागात नेटीव्ह असलेल्या माणसांना धर्माच्या आधारावर परत आश्रीत/रेफ्युजी व्हावे लागले.
हाच तो रूट कॉज. ह्यावर समाधानकारक तोडगा निघाल्याशिवाय हा प्रश्न सुटणे कदापी शक्य नाही.
४. आता इस्त्रायलने जे गेले ६० वर्षे धोरण पाळले त्याची खरेच त्यांना खर्या अर्थाने चांगली फळे मिळाली आहेत का? अर्थातच तसे किमान दिसत नाही. दहशतवाद अजूनही आहे.
इस्रायलने दहशतवादाचा यशस्वी मुकाबला / बंदोबस्त केला, असा गैरसमज भारतात बर्याच लोकांचा आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवते? इस्रायलचे २ सैनिक पळवले म्हणून त्याने लेबेनॉनवर हल्ला केला. अनेक निरपराध्यांची हत्या आणि प्रचंड वित्तहानीनंतर, वाटाघाटी झाल्या. इस्रायलचे ते पळवलेले सैनिक तीन वर्षांनंतर परत आले - शवपेट्यांतून!
५. तरी देखील इस्त्रायलचे धोरण संपूर्ण चुकते आहे का? अर्थातच नाही. ठोश्यासप्रतिठोसा द्यावाच लागतो, तो दिला नाही तरी समस्या कमी होणार नसते. इस्रायलच्या बाबतीत तर तसे नक्कीच होणार नाही. तरी देखील सध्याचे उत्तर त्यांना इप्सित नजीकच्या काळात देईल असा त्यांच्या राजकारण्यांचा आणि सैन्यदलप्रमुखांचा पण विश्वास असेल असे वाटत नाही.
१००% सहमत.
हेच भारताबाबतही लागू व्हावे.
६. मग भारत शेपूट घालतो आहे का याचे उत्तर काय? होय घालतो.
हे कसे ते समजले नाही. पुढील सर्व विवेचन हे भारताने आपली अंतर्गत सुरक्षा व्य्वस्था मजबूत करायला हवी, याबाबत आहे. त्यावर वाद नाही पण त्याचा अर्थ शेपूट घालतो ते कसे, समजले नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 Dec 2008 - 9:03 pm | सखाराम_गटणे™
>>सद्दाममुळे ग्लोबल वार्मिंग होत आहे म्हणून देखील बूशने ते केले असते
सहमत
पण बुश मस्तच आहे हा, आपल्याला आवडला.
काय बिनधास्त मारामार्या केल्या !!!!
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
30 Dec 2008 - 11:28 pm | गोगोल
पाक बरोबर युद्ध करणे चुकिचे आहे कारण की,
१. पाक ची आर्मी पॉवर आपल्यापेक्षा खूप कमी आहे. युद्ध चालू झाल्यवर काही दिवसात हा रंग स्पष्ट होवुन, त्यान्च्या वर न्यूक्लियर वेपन वपरन्यासाठि अंतर्गत दबाव येइल. एकदा जर न्यूक्लियर वेपन्स वापरली गेली तर मग पाक समुळ नष्ट झाला तरी भारताचे ही प्रचन्ड नुकसान होइल. याशिवाय बाकिचे मुस्लिम देश आपल्यविरुद्ध जिहाद जाहिर कारतील.
२. आत्ता पाक ची राजकीय आणि आर्थिक परिस्थिति खूप नाज़ुक आहे. आपण जर युद्ध पुकारला तर त्यांची एकमेव ताकद - आर्मी - ती सुद्धा डळमळित होइल. एक लक्षात घ्या की पाक हा आपल्या आणि तालिबान मध्ये एक बफर स्टेट आहे. जर का तिकड़े अराजकता माजली तर तो देश कोसळेल आनी मग तालिबान थेट आपल्या सीमेवार येउन धड़केल. मग रोज़च हज़ारो कसाब पैदा हाउन आपल्या कानाकोपरयतून आत शिरतिल. अराजकता माजलेला देश काबूत आणणे एव्हढे सोप्पे नाहिये. अमेरिकेची इराक़ मध्ये कशी फे फे उडतिये ते बघतोच आहोत. शिवाय न्यूक्लियर वेपन्स तालिबान च्या हातात पड्तील ते वेगळच.
31 Dec 2008 - 5:48 pm | हरकाम्या
नाटाळाचे माथि हाणु काटि हे वचन आपण पार विसर्लोत
2 Jan 2009 - 4:20 pm | आविनाश जाधव
कारण भारतात भगवा, निला, हिरवा, सपेत रन्गाचे रक्त भरपुर आहे. पण लाल रन्गाचे नाहि हि शोकान्तिका आहे
31 Dec 2008 - 5:49 pm | नितिन थत्ते
"आता इस्त्रायलने जे गेले ६० वर्षे धोरण पाळले त्याची खरेच त्यांना खर्या अर्थाने चांगली फळे मिळाली आहेत का? अर्थातच तसे किमान दिसत नाही. दहशतवाद अजूनही आहे.
इस्रायलने दहशतवादाचा यशस्वी मुकाबला / बंदोबस्त केला, असा गैरसमज भारतात बर्याच लोकांचा आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवते? इस्रायलचे २ सैनिक पळवले म्हणून त्याने लेबेनॉनवर हल्ला केला. अनेक निरपराध्यांची हत्या आणि प्रचंड वित्तहानीनंतर, वाटाघाटी झाल्या. इस्रायलचे ते पळवलेले सैनिक तीन वर्षांनंतर परत आले - शवपेट्यांतून"
१०० टक्के सहमत. इस्रायलला आणि भारताला हा प्रश्न भेडसावतो कारण शत्रू तुमच्यासारखाच दिसतो. पटकन ओळखू येत नाही.
अमेरिकेतही ११ सप्टेम्बर नंतर १०-१२ हल्ले झाले आहेत. त्यापैकी काही गोर्या अतिरेक्यांकडून झाले. (ख्रिश्चन कडव्या लोकांकडून जैवतन्त्रज्ञानात संशोधन करणार्या शास्त्रज्ञांवर वगैरे). यातही तोच प्रश्न येत असावा.
"अर्थात याचा अर्थ युद्ध चालू करावे असा नाही"
आपले मध्यमवर्गीय असे गृहीत धरून चालतात की आपण पाकिस्तानला चुटकीसरशी पराभूत करू. ते खरे आहे का ते ही पहायला हवे. कारगिल युद्धाच्या वेळी घुसखोरांना हाकलायला जेवढा वेळ लागला तो आठवला तर हा आत्मविश्वास अनाठायी वाटतो. म्हणूनच बहुधा "आर या पार की लडाई" ची भाषा बोलणार्या बाजपेयींनाही प्रत्यक्ष युद्ध करता आले नसावे.
म्हणून सहमत.
31 Dec 2008 - 5:57 pm | वाहीदा
घुसव त्या झरदारीच्या पोटात :-)
sorry Jokes apart पण USA देखिल याला खुपसं जबाबदार आहे ! असे नाही का कुणाला वाट्त ??
पण काही ही म्हणा जेव्हा श्रीमंतांना दु:ख होते तर ते मोठे अन आम्ही च्या दु:खांचे काय ?? ईथे गरीबांना वाली नाही.
उनका खुन, खुन और हमारा खुन पानी ??
~ वाहीदा
31 Dec 2008 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रिय रामपूरी,
आपण मटा चा दुवा दिला त्याबद्दल प्रथम आपले आभार ! पण या लेखाच्या अनुषंगाने आपण काही प्रास्ताविक केले असते, आपले मत व्यक्त केले असते,तर या काथ्याकुटाला एक वजन आले असते. वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी मतं असतात तेव्हा सदरील लेखाबद्दल काहीएक विश्लेषन आवडले असते, आपण कोणताही मजकुर न लिहिता कोथळा काढल्यासारखे वाटले :)
असो, मटाचा लेख सुंदरच आहे, (शेवटून तिसरा, दुसरा,पॅरा तर लैच भारी ) दुव्याबद्दल पुन्हा एकदा थँक्स !!!
-दिलीप बिरुटे
(आपला, खटक्याचा रामपूरी)
31 Dec 2008 - 6:55 pm | विसोबा खेचर
संसदेवर हल्ला, त्यानंतर विविध शहरात झालेले बाँबस्फोट, अलिकडचा मुंबईवरील हल्ला, दरवर्षी काही ना काही घटना घडतच आहेत! पण आम्ही आहोत सहिष्णूतावादी. चर्चेने, आंतरराष्ट्रीय समुदायाचे वगैरे दडपण आणून आम्ही हा प्रश्न गेली अनेक वर्ष सोडवू पाहात आहोत परंतु त्याचा काहीही फायदा नाही!
पाक मात्र दुनियेला फाट्यावर मारून भारताच्या नाकावर टिच्चून भारतात जोरदार दहशतवादी कारवाया करतच आहे!
असो..
आपला,
(सहिष्णूतावादी, आणि एक नंबरचा गांडू) तात्या.
1 Jan 2009 - 10:50 am | अर्चिस
साली हल्ला झाला. आज आपण २००९ उजाडून देखिल अफज़ल गुरु भारतीय करदात्यांच्या पैशातून सरकारी पाहुणचार झोडतो आहे. २००८ साली पकडलेला कसाब असाच मजा मारेल. जिथे आपले सरकार आणि प्रशासन पकडलेल्या अतिरेक्यांसमोर शेपुट घालते तिथे बाहेरच्या देशाबद्दल काय बोलावे?
आर्चिस
1 Jan 2009 - 1:23 pm | चौकट राजा
यूद्ध हा पर्याय असु शकतो...... पण पण माकडाच्या हातात कोलित म्हणतात तसे काहिसे आहे...... पाककडिल अण्वस्त्रे कोणच्या कन्ट्रोल मध्ये आहेत ते माहित नसल्यामुळे घाबरत असावेत.....जर का त्यावर अतिरेक्यान्चा कन्ट्रोल असेल तर..... अस मला वाटत....... बाकि जाणत्या माणसाने सान्गावे.....
1 Jan 2009 - 4:22 pm | बकासुर
बाहेरील आक्रमण झाल्यानंतर शेपूट घालण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही.
आपल्या देशावर अनेक शतके उपर्र्यानी राज्य केले आहे. जसे त्यावेळी कोणताही
प्रतिकार झाला नाही तसाच यावेळीही होणार नाही हे नक्की.
2 Jan 2009 - 1:10 pm | विजुभाऊ
या शेपूट घालुपणाचा पाया प्रथम मुफ्ती महमद सैद यानी रचीला .
वाजपेयी नी कंदहार प्रकरणाने त्याच्या भिन्ती रचल्या
जिन्नांची स्तुतीसुमने गाऊन अडवानीनी त्यावर कळस रचला.
आक्रमक असणे ही इस्राईलची गरज आहे
अर्थात त्यामुळे गाझा पट्ट्यातल्या गरीब लोकांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो.
एक पाकिस्तानी राजवट कोसळवली पाकिस्तान पादाक्रान्त केला तरी त्यातल्या सर्व सामान्य लोकांचे काय करणार?
अमेरीकेपासून इराक शेकडो मैल दूर आहे. तेथला सामान्य इराकी अमेरीकेला त्रास देउ शकत नाही म्हणून अमेरीकेने इराक विरुद्ध युद्ध पुकारले. अमेरीकेला अजूनही शेजारच्या एका छोट्याशा क्युबावर काहीही कारवाई करता आलेली नाहिय्ये
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
2 Jan 2009 - 6:39 pm | विकास
या शेपूट घालुपणाचा पाया प्रथम मुफ्ती महमद सैद यानी रचीला .
वास्तवीक त्यावेळेस शेपूट घातले ते व्हि.पि.सिंग यांनी पंतप्रधान म्हणून. मुफ्तीमहंमदनी स्वतःस त्यातून (कॉन्फ्लीक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून) बाहेर ठेवले होते.
3 Jan 2009 - 5:46 pm | नितिन थत्ते
वॉर डझ नॉट डिसाइड हू इज राइट..... इट डिसाइड्स हू इज लेफ्ट.
युद्धाने कोण बरोबर याचा निर्णय होत नाही ..... कोण उरले त्याचा निर्णय होतो.
4 Jan 2009 - 1:52 pm | पर्नल नेने मराठे
मला एकदा एक इस्राइल चि बाइ भेत्लि होति......ति म्हनालि युध्धामुले मी देश सोड्ला.....
अशा वेलि वात्ते युध्ध नको..
चुचु