पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
18 Nov 2015 - 5:09 pm
गाभा: 

पिंगा.

येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.

मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.

बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.

गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.

भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.

या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.

मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.

पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट

प्रतिक्रिया

काशीबाईंना मस्तानीबरोबर नाचताना दाखवलय हि चूकच आहे,गोकुळअष्टमी च्या एका महिला स्पेशल कार्यक्रमात मस्तानी ने नृत्य केले होते आणि त्या कार्यक्रमाला काशीबाई उपस्थित होत्या असे पत्र उपलब्ध आहे. त्यावरूनच भन्साळी नी हा पिंगा चा उद्योग केला असेल.

आणि हो मस्तानी दरबारात नाचणारी नर्तकी नव्हती , ती दरबारात नाचायची याचा कोणताही उल्लेख उपलब्ध नाही.

तुडतुडी's picture

2 Dec 2015 - 11:48 am | तुडतुडी

नाचणारनीच्या सौंदर्यावर भाळून बिचार्या काशी बाईशी व्याभिछार करणारा बाजीराव लफडेबाज होता ह्यात दुमतच नाही . भलेही लढाया जिंकणारा असेल , पण पत्नीचं मन जिंकू शकला नाही .

वेल्लाभट's picture

2 Dec 2015 - 12:08 pm | वेल्लाभट

तुम्हाला खरंच असं वाटतं?

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 12:11 pm | संदीप डांगे

त्यांना जे वाटतं तोच इतिहास असतो हे अजून तुम्हांस कळले न्हाय का ओकसाहेब...

वेल्लाभट's picture

2 Dec 2015 - 12:24 pm | वेल्लाभट

हाहाहाहा ! कळले आहे हो डांगेसाहेब ! पण त्यांचा हा प्रतिसाद त्यांचं खरंच वाटणं होतं की फक्त धाग्याला एक्सलेटर देण्याचा प्रयत्न होता ते पडताळून बघत होतो.
खरंच असेल तर कठीण आहे.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 12:38 pm | संदीप डांगे

काय कठीण आहे त्यात. 'बायकोचे मन जिंका, भले जग जिंकले नाही तरी चालेल' असा महान संदेश आहे की. फुकट सिकंदरापासून चोलापर्यंत, समुद्रगुप्तापासून बाजीरावापर्यंत लोक जगभर लढाया करत राहीले. खरी लढाई ती घरात, ती जि़ंकली की सगळे जग जिंकले. आपण तर बुवा घरात मोठी फ्रेम करून ठेवणार आहोत हा संदेश.

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2015 - 12:50 pm | टवाळ कार्टा

थोडक्यात काय तर बाजीराव होण्यापेक्षा बायकोच्या ताटाखालचे मांजर व्हा =))

कपिलमुनी's picture

2 Dec 2015 - 2:21 pm | कपिलमुनी

तुझी लायकी काय ?
बोलता किती ?

नाव आडनाव's picture

2 Dec 2015 - 2:31 pm | नाव आडनाव

त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करा. मी आधीच केली आहे पण देव काय एकत नाही.

हर्मायनी's picture

2 Dec 2015 - 12:47 pm | हर्मायनी

त्यांनी दाखवलेले नृत्य आणि एकंदरीत सगळाच चीड आणणारं नक्कीच आहे.. पण मला वाटतं मूवी मध्ये हा मस्तानीचा ड्रीम सिक्वेन्स असावा.. ज्यात तिला असा वाटत असेल कि पेशव्यांच्या स्त्रियांनी तिला आपल्यात घेतलं आहे. I think that is the only explanation Bhansali can come up with ! Else no one is going to buy this nonsense !

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2015 - 12:51 pm | टवाळ कार्टा

त्याला explanation द्यायचे असेल तर तो देईल की....तुम्ही का सुचवताय

इस्पिक राजा's picture

2 Dec 2015 - 12:55 pm | इस्पिक राजा

आधी काशिबाई मस्तानीचा डांस. आता बाजीरावाचा. या चित्रपटाचे नाव बदलुन सरळ एबीसीडी - ३ का नाही करत?

रमेश आठवले's picture

11 Dec 2015 - 10:17 pm | रमेश आठवले

काशीबाई आणि बाजीराव यांच्यावरील गीत
http://erosnow.com/#!/music/watch/1038704/bajirao-mastani/6636779/exclus...

गाणं आवडलं. १०० टक्के पटलं नाही पण छान आहे.

पद्मावति's picture

11 Dec 2015 - 10:32 pm | पद्मावति

प्रियंका दृष्टं लागावी इतकी सुंदर दिसतेय. गाण्याचं चित्रीकरण छान आहे.

सायकलस्वार's picture

11 Dec 2015 - 10:37 pm | सायकलस्वार

काशीबाई नावाचे इतिहासात कुणी पात्रही होते हे इथे 'पिंगा' घालणार्‍या किती जणांना याआधी माहीत होते याचा एक सर्व्हे करावा काय?

किसन शिंदे's picture

21 Dec 2015 - 2:07 am | किसन शिंदे

खिक्क!

पिलीयन रायडर's picture

21 Dec 2015 - 10:10 am | पिलीयन रायडर

आम्हाला माहिती होते. आता आम्ही पिंगावर आक्षेप घेतला तर चालेल का? नाही म्हणजे काशीबाईंचे संपुर्ण चरित्रच तोंडपाठ नाहीये, पण तत्कालीन मराठी बायकांचा पेहराव, वागण्या बोलण्याची पद्धत, मंगळागौरीला केला जाणारा पिंगा, सवत ह्या नात्याबद्दल बायकांचे "प्रेम" इ. तुटपुंज्या माहितीवर आम्हीपण विरोध केला तर चालेल का हो? नाही म्हणजे कॉमन सेन्स पण एक चीझ असते.. असो...

मोगा's picture

21 Dec 2015 - 9:33 am | मोगा

आवडला. मस्तच आहे.

इतिहासात मुसुलमान क्रूर रंगवले गेले आहेत. पण पैसा वारस जायदाद या सगळ्यासाठी घरभेद करण्यात हिंदूही कमी नव्हते , हे रंगवल्यामुळे या चित्रपटाला पुण्यातून विरोध असावा , असे वाटते.

बाजीराव नाचला यात वाइट अजिबात वाटत नाही. तसे तर षिनिमाच्या इतिहासात अकबर , अशोक , इंद्र , कृष्ण , गणपती शंकर , रावण ... सगळेच नाचले आहेत. संगीतही सुंदर आहे... पूर्ण शास्त्रीय संगीत. कान तृप्त झाले.

आज बाजीराव शिनेमाबाबत इतिहासाची मोडतोड म्हणून थयथयाट करणारे नथुराम नाटकातील खोट्या संवादांवर टाळ्या पिटत होते.

संवाद अगदी सुंदर आहेत

अरे ये तो दर्गा और दुर्गा मे फर्क नही जानती.

ये तो सच है की हर धर्म ने किसी ना किसी रंग को चुन लिया है. किसीने भगवा किसीने हरा... लेकिन दुर्गापूजा में दुर्गा को हरी साडी अर्पण करते है और दर्गा मे भगवी चादर अर्पण करते है , तब धर्म का रंग किधर जाता है ?

भाऊबंदकी व धर्मजातीचे कट्टरपण यातून पेशव्यांचा ब्राह्मण वंश ( बहुदा ) संपला व आज हिंदू बाजीरावाचा फक्त मुसलमान वंशच शिल्लक आहे , हा इतिहास पहायला तरी जावेच .

बाकी , बाजीराव व शाहूराजे यापेक्षा आमच्या डोळ्याना निजाम अधिक भारदस्त वाटला... रझा मुराद आहे का तो ?

छोटा समशेरबहाद्दूर मस्त आहे

बाजीराव नाचला यात वाइट अजिबात वाटत नाही

तो नाचला यात काही वाद नाही पण पेशवा चक्क बॉलीवूड स्टाईल नाच कसा करेल हो ??

संगीतही सुंदर आहे... पूर्ण शास्त्रीय संगीत. कान तृप्त झाले.

परत एकदा निट ऐका संगीत, चित्रपटाचे संगीत ऐकताना उगाच बाकीच्या चित्रपटांचे संगीत चोरलेले वाटते, काही ठिकाणी उष काल होता होता, नटरंग, चुरा लिया ही तुमने जो दिल को या मधलं संगीत आठवण करून देत.

मोगा's picture

21 Dec 2015 - 9:44 am | मोगा

पिंगा गाणेही मस्त आहे.

घरगुती सण मंगळागौर वगैरे कार्यक्रमात नाचतात तितपतच त्याचे गांभीर्य आहे.

आणि तसेही पेशवे सुलतान राजे यांच्या दरबारात आम जनतेच्या बायका एकेकाळी खरोखर नाचत होत्या.

आज त्यांच्या बायका सिनेमात आम जनतेसमोर नाचल्या तर इतका गहजब कशाला ?

या सिनेमावर बंदी असावी असे वाटणार्‍यानी पलीकडच्या देशात जावे. तिथे या सिनिमावर बंदी आहे असे ऐकले.

या सिनेमावर बंदी असावी असे वाटणार्‍यानी पलीकडच्या देशात जावे. तिथे या सिनिमावर बंदी आहे असे ऐकले.

इंटरेस्टिंग!!!!

या सिनेमावर बंदी असावी असे वाटणार्‍यानी पलीकडच्या देशात जावे. तिथे या सिनिमावर बंदी आहे असे ऐकले.

इंटरेस्टिंग!!!!

पिलीयन रायडर's picture

21 Dec 2015 - 10:06 am | पिलीयन रायडर

चित्रपटाबद्दल अशा प्रतिक्रिया ऐकल्या की तसा चांगला आहे. पण जर चुका काढायच्या म्हणल्या तर त्रास होईल. निव्वळ कथा म्हणुन पहायचा असेल आणि इतिहासाशी तुलना न करता बघणे जमणार असेल तर पहावा.

मस्तानी जी नजरकैदेत होती तिला साखळदंडाने बांधणे, तिच्या तोंडावर पाणी फेकणे, पेशव्यांचा आदेश जाळणे इ चुका ऐकीवात आहेत. पिंगा आणि विक्टरी डॅन्स तर आहेतच.

मी पेशव्यांच्या भुमिकेत त्या टिनपाटाला पाहु शकत नाही म्हणुन अजुनही चित्रपट पहावा असं वाटत नाहीये.

कुणी पाहिला का?

याॅर्कर's picture

21 Dec 2015 - 11:45 am | याॅर्कर

मी पेशव्यांच्या भुमिकेत त्या टिनपाटाला पाहु शकत नाही म्हणुन अजुनही चित्रपट पहावा असं वाटत नाहीये.

पुण्याच्या आहात असे न राहवून वाटत आहे.
तुम्ही लोक एवढे दुराभीमानी कसे असू शकता?सर्वच जण जे विरोधी मते मांडत आहेत त्यातून जातीय दुराभीमानाचा दर्प येत आहे.हे कदाचित सूज्ञ लोकांना समजलं असेल.

कपिलमुनी's picture

21 Dec 2015 - 12:19 pm | कपिलमुनी

उद्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्ही सलमान खानला पाहू शकता आणि एंजॉय पण कराल , आणि त्याला विरोध केला की जातीय , धर्मिय, दुराभिमानाच्या कंड्या पिकवाल .

याॅर्कर's picture

21 Dec 2015 - 2:26 pm | याॅर्कर

मला शंका होतीच येथे शिवाजी महाराजांचा विषय येणार.
.
.
सलमान चालेल शिवाय संजय दत्तही छान दिसेल, आणि चालेल ही, नाक बाणेदार आहे त्याचं.
.
.
.
आणि विरोधाचं म्हणाल तर सिनेमागृहे पेटवतील हे लोक,त्यांना मी शिव्या घालतोच रोज.इतिहासाचं काडीचं ज्ञान नसतानाही जय शिवाजी म्हणून धुडगूस घालणारे आहेतच 'हे' मान्य.
मग तुम्ही सद्धा 'ते' मान्य करा कि राव!

पिलीयन रायडर's picture

21 Dec 2015 - 12:29 pm | पिलीयन रायडर

मी पुण्यात रहाते पण पुणेकर म्हणुन जी एक टिपीकल प्रजात आहे त्यात मोडत नाही.

आता आपण जरा मनाचे दरवाजे उघडुन माझ्या वाक्याकडे पाहुया. तो रणबीर का रणवीर टिनपाट आहे हे माझे त्याचा पहिला लुक पाहिला होता बॉलीवुड मधला तेव्हा पासुनचे मत आहे. ह्यात खरं खरं सांगा की "दुराभिमान" आणि "जातीयता" कुठे आहे?

दुसरं असं काका.. माझ्या मते तो रणबीर का रणवीर अत्यंत छपरी दिसतो.. अशा माणसाला मी "पेशवा" म्हणुन कसे बरे सहन करावे? का करावे? म्हणुन मी पिक्चर पहाणार नाही असे माझ्यापुरते लिहीले आहे.

तुम्ही खरंच सलमान खानला छत्रपतींच्या भुमिकेत पहा, एन्जॉय करा. माझं काहिही म्हणणं नसेल. तुम्ही सुद्धा माझ्या प्रतिक्रियांकडे पाहुन डायरेक्ट मला दुराभिमानी आणि त्यातुन जातीय तर अजिबात म्हणु नका. कारण तो तुमच्याच चष्म्याचा दोष असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे.

तुमच्या माहितीसाठी स्पष्टपणे सांगते, मी जातीय नाही. पुन्हा मला जातीय म्हणु नका. खपवुन घेतले जाणार नाही.

जिन्क्स's picture

21 Dec 2015 - 1:10 pm | जिन्क्स

पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती.

पिराताई, वरील वाक्य ही तुमच्याच एका प्रतिसादातील आहेत. तुम्हाला अस> म्हणायचं आहे का की त्या आजींनी जशी साडी नेसवली तशीच प्रियंका/दीपिका नी घालायला हवी होती? त्या स्रुजाताईना बाजीरावांचे डोळे घारे दाखवले नाहीत म्हणून आक्षेप आहे. ह्या वरून आम्हा पामरांनी काय बोध घ्यायचा?

चित्रपट पाहिला. एल कलाकृती म्हणून सरस वाटला.

जिन्क्स's picture

21 Dec 2015 - 1:10 pm | जिन्क्स

पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती.

पिराताई, वरील वाक्य ही तुमच्याच एका प्रतिसादातील आहेत. तुम्हाला अस> म्हणायचं आहे का की त्या आजींनी जशी साडी नेसवली तशीच प्रियंका/दीपिका नी घालायला हवी होती? त्या स्रुजाताईना बाजीरावांचे डोळे घारे दाखवले नाहीत म्हणून आक्षेप आहे. ह्या वरून आम्हा पामरांनी काय बोध घ्यायचा?

चित्रपट पाहिला. एल कलाकृती म्हणून सरस वाटला.

पिलीयन रायडर's picture

21 Dec 2015 - 1:30 pm | पिलीयन रायडर

कमाल आहे.

अहो दादा, नऊवार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत. खरंच.. त्यात पेशवाई / ब्राह्मणी ही सुद्धा एक पद्धत आहे ज्यात काठपदराची ही स्टाईल असते. ह्यात कुठेही पोट अथवा पोटर्‍या दिसत नाहीत. तुम्ही पिंगा गाणे पाहिले आहे का? त्यात त्या दोघींची नऊवार कशी आहे ते पाहिले आहे का? तशी नऊवार ही लावणीसाठीच नेसलेली मी पाहिली आहे. एकवेळ पोट थोडेसे दिसणे सुद्धा समजु शकते, सहावार मध्येही ते दिसतेच. पण पार बेंबी पर्यंत? शक्यच नाही हो. आपल्या आज्या पणज्या घालु शकत नाहीत तर आपण पेशव्यांबद्दल बोलतोय.

स्रुजा म्हणतेय तो मुद्दा असाय की पेशवे चित्पावन ब्राहमण होते. साधारणपणे त्यांचे डोळे घारे असतात. हा लोक लेन्स लावुनही सहज जपता आला असता.

इथे लोक फारच गैरसमज करुन घेत आहेत म्हणुन एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते. पेशव्यांचे चरित्र सांगताना ते ब्राहमण होते हे लक्षात घ्यावेच लागेल. तुम्ही आज जात मानता की नाही ह्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. पेशवेकालीन महाराष्ट्रात जात मानत होते. जातीवरुनच चालणे-बोलणे, वागणे, पेहराव ठरत होते. मग ते तसे चित्रपटात दाखवायला नको? हा प्रश्न जातीचा नाहीये.. उद्या एखाद्या गावाकडच्या गरं राखणार्‍या अथवा शेती करणार्‍या माणसावर चित्रपट बनवताना त्याला मलमलचा कुर्ता आणि सदाशिवपेठी अनुनासिक बोलणे दाखवले तर चालेल का?

तरीही तुम्हा लोकांना प्रतिसाद जातीय वाटत असतील तर तुम्ही खरंच तुमचे चष्मे तपासा. पेशव्यांना केवळ "ब्राहमण" म्हणुन आम्ही तरी बघत नाही. पिंगा गाण्यात "आमच्या बायका कशा काय नाचवल्या" असल्या कोत्या विचाराने आम्ही तरी विरोध करत नाही. आम्ही नक्की कशाला विरोध करतोय किमान हे तरी समजुन घ्या. जात मानत नसणार्‍यांना जातीय म्हणल्याने खरंच त्रास होतो. प्लिज.. जरा समजुन बोला.

याॅर्कर's picture

21 Dec 2015 - 2:42 pm | याॅर्कर

पिंगा गाण्यात "आमच्या बायका कशा काय नाचवल्या" असल्या कोत्या विचाराने आम्ही तरी विरोध करत नाही.

हे झालं तुमचं मत.

एकवेळ पोट थोडेसे दिसणे सुद्धा समजु शकते, सहावार मध्येही ते दिसतेच. पण पार बेंबी पर्यंत? शक्यच नाही हो. आपल्या आज्या पणज्या घालु शकत नाहीत तर आपण पेशव्यांबद्दल बोलतोय.

सिनेमाआहे हो,डाॅक्युमेंटरी नाही.
आणि एवढा जाज्वल्य अभिमान बरा नव्हे.

तुमच्या माहितीसाठी स्पष्टपणे सांगते, मी जातीय नाही. पुन्हा मला जातीय म्हणु नका. खपवुन घेतले जाणार नाही.

मी बॅचलर असतानाही मला काका म्हमल्याले खपवून घेतले जाईल

पिलीयन रायडर's picture

21 Dec 2015 - 2:49 pm | पिलीयन रायडर

काका हे संबोधन वयाशी संबंधित नसुन..... बरं जौ दे.. तसंही तुम्हाला पिराब्लेम नाही ना.. गुड!

आणि तुम्हाला पहायचाय ना शिनुमामा.. पहा की..
आम्हाला पिसं काढायचीत.. आम्ही काढु..

प्रसाद१९७१'s picture

21 Dec 2015 - 4:28 pm | प्रसाद१९७१

मी पुण्यात रहाते पण पुणेकर म्हणुन जी एक टिपीकल प्रजात आहे त्यात मोडत नाही.

पिराताई - ही गद्दारी बरोबर नाही. पुणेरी आहे ही अभिमानानी सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि टीपीकल पुणेरी असणे तर फारच. पण तुम्ही इथे एकदम डीफेंसिव्ह झाला आहात. अजिबात बरोबर नाही.

पिलीयन रायडर's picture

21 Dec 2015 - 5:03 pm | पिलीयन रायडर

छे छे... माझी तेवढी कुवतच नाही. पुणेकरांची अनेक व्यवच्छेदक लक्षणं आहेत, माझ्यात ती अजिबात नाहीत.

मी तर म्हणेन जसा मृणाल कुलकर्णीने जसा रमा माधव काढला तसा एखादा बाजीराव पेशव्यांवर पण मराठीत सिनेमा काढण्यात यावा :D रमा माधव मध्ये पेशव्यांची श्रीमंती उत्कृष्ट दाखवली आहे..
पेशव्यांची पण series दाखवली तर बरं होईल... म्हणजे थेट पहिला बाजीराव पेशवा ते दुसरा बाजीराव पर्यंत... अगदी दुसर्या बाजीरावचा दत्तक मुलगा नानासाहेब पेशवे (जो १८५७ च्या बंडानंतर नेपाल मध्ये पळून गेला) दाखवला तर तो देखील आवडेल... :P

मी तर म्हणेन जसा मृणाल कुलकर्णीने जसा रमा माधव काढला तसा एखादा बाजीराव पेशव्यांवर पण मराठीत सिनेमा काढण्यात यावा :D रमा माधव मध्ये पेशव्यांची श्रीमंती उत्कृष्ट दाखवली आहे..
पेशव्यांची पण series दाखवली तर बरं होईल... म्हणजे थेट पहिला बाजीराव पेशवा ते दुसरा बाजीराव पर्यंत... अगदी दुसर्या बाजीरावचा दत्तक मुलगा नानासाहेब पेशवे (जो १८५७ च्या बंडानंतर नेपाल मध्ये पळून गेला) दाखवला तर तो देखील आवडेल... :P

मोगा's picture

21 Dec 2015 - 10:32 pm | मोगा

हाय्ला , गीत रामायणात अख्खे इक्ष्वाकू खानदान गाणी म्हणते.

एक बाजीराव नाचला तर किती गोंधळ

रमेश आठवले's picture

22 Dec 2015 - 2:25 am | रमेश आठवले

गीत रामायणात रामायण कथा गीत स्वरूपातच मांडायला हवी होती . त्याच्याशी दृक श्राव्य माध्यमातील सिनेमाची तुलना कशी करता येईल ?

मोगा's picture

21 Dec 2015 - 10:36 pm | मोगा

हाय्ला , गीत रामायणात अख्खे इक्ष्वाकू खानदान गाणी म्हणते.

एक बाजीराव नाचला तर किती गोंधळ

वेल्लाभट's picture

22 Dec 2015 - 6:45 am | वेल्लाभट
शब्दबम्बाळ's picture

22 Dec 2015 - 7:46 am | शब्दबम्बाळ

तुम्हाला असे वाटत नाही का कि त्या अर्धवट माणसाच्या अर्धवट ज्ञानावर असलेल्या त्या लेखाला तुम्ही उगीच प्रसिद्धी देत आहात?
अशा लेखांना आणि लेखकांना काडीची किंमत दिली नाही तर ते आपोआप लोप पावतील...

शब्दबम्बाळ's picture

22 Dec 2015 - 7:46 am | शब्दबम्बाळ

तुम्हाला असे वाटत नाही का कि त्या अर्धवट माणसाच्या अर्धवट ज्ञानावर असलेल्या त्या लेखाला तुम्ही उगीच प्रसिद्धी देत आहात?
अशा लेखांना आणि लेखकांना काडीची किंमत दिली नाही तर ते आपोआप लोप पावतील...