मीठाचा वापर

कुसुमिता१'s picture
कुसुमिता१ in काथ्याकूट
17 Dec 2015 - 5:25 pm
गाभा: 

रॉक सॉल्ट अर्थात शेंदेलोण आणि टेबल सॉल्ट अर्थात नेहमीचे आयोडीनयुक्त मीठ यापैकी स्वयंपाकात कोणते मीठ वापरावे..शेंदेलोण मीठावर कोणतीही प्रक्रीया न झाल्याने त्यातील पोटॅशिअम्,मॅग्नेशिअम हे घटक शाबूत राहतात, त्यामुळे ब्लड्प्रेशर काबुत ठेवायला मदत होते पण टेबल सॉल्ट मधे आयोडीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे आयोडीनच्या अभावामुळे होणारे रोग टाळता येतात अशी माहीती नेटवर वाचली पण नेमक कोणत मीठ खाव हे कळत नाहीये..गरोदर पणात तसेच ईतर वेळी कोणत्या मीठाचा वापर योग्य राहील? आहारतज्ञांनी/ जाणकारांनी प्लीज प्रकाश टाका..

प्रतिक्रिया

क्या आपके टुथपेस्ट में नमक है??
-लारा दत्ता.

कुसुमिता१'s picture

17 Dec 2015 - 7:06 pm | कुसुमिता१

हा काय आगावूपणा आहे?

जातवेद's picture

18 Dec 2015 - 11:51 am | जातवेद

जेपीभौ आज काल प्रियु असते त्यात.

रुस्तम's picture

17 Dec 2015 - 6:43 pm | रुस्तम

शेंदेलोण & पादेलोण मध्ये फरक काय?

कुसुमिता१'s picture

17 Dec 2015 - 7:16 pm | कुसुमिता१

माहीत नाही

मार्मिक गोडसे's picture

17 Dec 2015 - 7:26 pm | मार्मिक गोडसे

सैंधव आणि काळं मीठ

शेंदेलोण (सैंधव) व पादेलोण (काळं मीठ) ही खनिज मिठं आहेत. मिठाचे खडक फोडून, चूर्ण करून ती बनवलेली असतात. त्यामध्ये सोडिअम क्लोराईडशिवाय अत्यंत अल्प प्रमाणात मॅग्नेशिअम व कॅल्शिअम यांची संयुगं असतात. पादेलोणात गंधकाची संयुगं असतात, म्हणून उग्र वास येतो. या दोन्ही मिठात औषधी गुणधर्म असतात, असं मानलं जातं.

रुस्तम's picture

18 Dec 2015 - 12:01 pm | रुस्तम

तुमच्याकडे दोन्हीचे फोटो असल्यास कृपया इथे द्या. गुलाबी रंगाचे असते ते कोणते मीठ?

प्रसाद१९७१'s picture

18 Dec 2015 - 1:41 pm | प्रसाद१९७१

गुलाबी असते ते पादेलोण

रुस्तम's picture

19 Dec 2015 - 12:27 am | रुस्तम

धन्यवाद

प्रभाकर पेठकर's picture

17 Dec 2015 - 7:13 pm | प्रभाकर पेठकर

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कानडाऊ योगेशु's picture

18 Dec 2015 - 12:49 pm | कानडाऊ योगेशु

+१
इथे मिपावर प्ण डॉक्टर आहेतच की.

रच्यानके ह्यानिमित्तने डॉ.खरेसाहेबांकडुन मीठासंबंधित नेवी मध्ये घडलेला एखादा किस्सा ऐकायलाही आवडेल. :)

भुजंग पाटील's picture

18 Dec 2015 - 12:49 pm | भुजंग पाटील

गलगंड (Hypothyroidism) टाळण्यासाठी आयोडिन युक्त मिठाला पर्याय नाही.

बाकी पोटॅशिअम्, मॅग्नेशिअम वगैरे साठी डाळी, पालेभाज्या पुरेस्या असतात.

पण हे सगळे आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी बोलून ठरवलेलेच उत्तम.

पादेलोणातल्या अल्प मॅगनेशम कार्बोनेटमुळे पोटात गॅस धरत नाही/सुटतो.यालाच गुजराथी सञ्चळ म्हणतात.
आयोडिन ( पोटॅशमच्या संयुग रूपात )फक्त समुद्री मीठ/जलचर/वनस्पतींमध्ये असतं.शेंदेलोण,पादेलोण गुजरातच्या खाणींत मिळतं त्यात आयोडिन नसतं.टाटा नमक मध्ये मुद्दामहून अमुक एक प्रमाणात आयोडिन नंतर घालून विकतात.
मिठाचा अतिरेक मूत्राशयास वाइट असतो.सोडिअम इतर प्रकारेही शरीरात जातं ( अजिनोमोटोचा अतिरेक) जो जाडेपणा ,ब्लडप्रेशर आणू शकतो.

उगा काहितरीच's picture

18 Dec 2015 - 6:50 pm | उगा काहितरीच

शेंदेलोण,पादेलोण गुजरातच्या खाणींत मिळतं

हे माहीत नव्हतं , धन्यवाद !
रच्याकने खडीसाखर(प्रसादात वापरतात ती) ही खाणीत मिळते का कारखान्यात तयार होते ? "उमरावती" नावाची एक साखर असते . ती कशा प्रकारे तयार करतात ? (ही साखर मुख्यतः डिंकाचे पौष्टिक लाडू बनवताना वापरतात.)

सिरुसेरि's picture

22 Dec 2015 - 3:25 pm | सिरुसेरि

जयसिंगपुरजवळ नांदणी या गावी "खांडसाखरेचा" कारखाना आहे . खांडसाखर हा बहुतेक खडीसाखर शब्दाशी संबधीत असावा .

कुसुमिता१'s picture

18 Dec 2015 - 1:44 pm | कुसुमिता१

धन्यवाद मंडळी..

प्रसाद१९७१'s picture

18 Dec 2015 - 2:05 pm | प्रसाद१९७१

धन्यवाद देण्यासारखे काय झाले? उगाचच काहीतरी...

कुसुमिता१'s picture

18 Dec 2015 - 5:54 pm | कुसुमिता१

तुम्ही कशाला चोंबडेपणा करताय मधे?

जव्हेरगंज's picture

18 Dec 2015 - 7:20 pm | जव्हेरगंज

छान लिखान!
आजची संध्याकाळ सार्थकी लागली!

ट्रेड मार्क's picture

18 Dec 2015 - 7:38 pm | ट्रेड मार्क

आम्ही स्वयंपाक करताना समुद्री मीठ वापरतो आणि वरून घ्यायला लागलं तर सैंधव वापरतो.

सर्वसाधारणपणे असं म्हणतात की दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबरोबर (दही, ताक ई) समुद्री मीठ खाऊ नये. अश्या वेळेला सैंधव वापरावे.

मस्त रेसिपी..सांच्याला करुन पाहिन ..
बायदवे फोटु दिसत नाहित.

डोक्यावर मीठ वाटून घ्यायचंय वाट्टं!

कुसुमिता१'s picture

18 Dec 2015 - 11:08 pm | कुसुमिता१

डोक्यावर पडले आहात का?

अतिशय उत्तम आणि माहीतीपूर्ण धागा. सुरूवात तर चांगली झाली आहे. पैलतीरावर धागा नेण्यास मिपाकर समर्थ आहेतच. थोडक्यात काय तर मजा येणार. :) :)

चांदणे संदीप's picture

18 Dec 2015 - 10:11 pm | चांदणे संदीप

कळेना काही! इल्ले!

कुसुमिता१'s picture

18 Dec 2015 - 11:15 pm | कुसुमिता१

एक अत्यंत साधा,आरोग्याशी संबंधीत प्रश्न विचारला होता की कोणत्या प्रकारचे मीठ वापरावे? पण काही लोकांना फालतूपणा करायची घाणेरडी सवयच असते म्हणून १/२ बालीश प्रतीसाद आले आहेत.

टेबलसॉल्टच्या तुलनेत शेंदेलोण पादेलोणाचा खारटपणा जास्त असतो. त्यामुळे ते वापरताना जरा जपून.

वॉटर रीटेन्शन टाळण्यासाठी सैंधव चांगले असते असे ऐकले आहे.

आयोडिनयुक्त मीठ वगैरे आता माहिती झाले या अगोदर जवळपास मिळणारे मीठच खाल्ले जात होते आणि त्यांच्यावर सर्वांवरच काहीतरी भयानक परिणाम दिसलेले नाहीत.सुदूर हिमालयातील काही जणांचे गळे फुगीर झाले ते आयोडिन नसलेल्या मिठामुळे इत्यादी तुरळक उदाहरणे आहेत.टिव्हीवरच्या जाहिरातीही बय्राच दिशाभूल करणाय्रा असतात.त्यापैकी एक मिठावरचीच-
१) मुलगी आयोडिनवाले मीठ खाते अन आइएएस होते
इतर जाहिराती-
२) काँम्पलान खाल्लं की उंची वाढते.

प्रभाकर पेठकर's picture

19 Dec 2015 - 11:21 am | प्रभाकर पेठकर

अतिशयोक्ती हा जाहिरातीचा प्राण असतो.

संदीप डांगे's picture

20 Dec 2015 - 12:58 pm | संदीप डांगे

ह्या आयोडीनवाल्या नमकच्या (आणी असल्याच वैज्ञानिक भंकसगिरीच्या) विरोधात कधी वैज्ञानिक विचारसरणीवाले पेटून उठतांना दिसत नाहीत. ते फक्त लाडू खावा की नको ह्यावर बाष्कळ चर्चा करतांना दिसतात.

सुबोध खरे's picture

20 Dec 2015 - 8:29 pm | सुबोध खरे

सैंधव हे खनिज मीठ आहे सिंधू नदीच्या खोर्यात सापडणारे म्हणून त्याला सैंधव असे नाव आहे असे वाचल्याचे आठवते. हे पाकिस्तानातील खेवडा या पंजाब प्रांतातील ठिकाणच्या खाणीतून काढले जाते. हिमाचल प्रदेशात मंडी येथेही हे सापडते पण त्या खाणी सध्या बंद आहेत. त्या सुरु होण्याच्या मार्गावर आहेत असे वाचले .
सध्या समुद्री मिठापेक्षा यात पोट्याशियम, कॅल्शियम आणि मैग्नेशियमचे क्लोराईड आणी सल्फेट हे क्षार असतात. याला गुलाबी सर असा रंग त्यात असलेल्या आयर्न ऑक्साईड मुळे येतो.https://en.wikipedia.org/wiki/Himalayan_salt ( LACTO CALAMINE) यात हि याच आयर्न ऑक्साईड मुळे गुलाबी रंग येतो.
खनिज मीठामध्ये असलेल्या मैग्नेशियमचे क्षार हे सारक असतात त्यामुळे बद्धकोष्ठ असलेल्या लोकांना त्याचा थोडा फायदा होतो.
पादेलोण किंवा काळे मीठ (काला नमक) हे सैंधव वर प्रक्रिया करून त्यातील पोट्याशियम, कॅल्शियम आणि मैग्नेशियमचे सल्फेट चे सल्फाईड आणी हायड्रोजन सल्फाईड मध्ये रुपांतर करतात. या सल्फाईड मुळे त्याला काळा रंग आणी सडक्या अंड्या सारखा वास येतो. आपण हे मीठ जास्त प्रमाणात खाल्ले असता आपल्या "सुटणाऱ्या वाता"ला पण तसाच वास येतो. गुजराती लोक खात असलेल्या मुखवास किंवा कायम चूर्ण किंवा हवाबाण हरडे हे जस्त खाल्ल्याने हाच परिणाम दिसून येतो.
राहिली गोष्ट हि आपण खात असलेल्या मीठा बद्दल-- खनिज मीठ हे आपण खात असलेल्या मिठापेक्षा खूप जास्त चांगले आहे हे समजण्यास कोणताही सबळ पुरावा नाही. विशेषतः जी किंमत आपण सैंधव किंवा पादेलोण साठी मोजतो ती गृहीत धरता
पहा http://www.organicskinherbsonline.com/himalayan-bath-salts-health-benefits/
गरोदर स्त्रियांनीआयोडीन युक्त मिठा ऐवजी सैंधव किंवा पादेलोण खाल्याने फायदा होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही उलट आयोडीन हे विकसित होणार्या गर्भाच्या मेंदूला अतिशय आवश्यक असे रसायन आहे आणी त्याच्या कमतरतेमुळे क्रेटीनिझम हा मतीमंद करणारा आजार होतो हे सिद्ध झालेले आहे. असे होऊ नये यासाठीच सध्या मिठामध्ये आयोडीन घालावे हि जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे. याबद्दलच्या वादात मी पडू इच्छित नाही.
http://www.who.int/elena/titles/salt_iodization/en/

कपिलमुनी's picture

22 Dec 2015 - 10:26 am | कपिलमुनी

आरारा !!
कोण खाणार आता हे मीठ !

सुबोध खरे's picture

20 Dec 2015 - 8:30 pm | सुबोध खरे

सैंधव हे खनिज मीठ आहे सिंधू नदीच्या खोर्यात सापडणारे म्हणून त्याला सैंधव असे नाव आहे असे वाचल्याचे आठवते. हे पाकिस्तानातील खेवडा या पंजाब प्रांतातील ठिकाणच्या खाणीतून काढले जाते. हिमाचल प्रदेशात मंडी येथेही हे सापडते पण त्या खाणी सध्या बंद आहेत. त्या सुरु होण्याच्या मार्गावर आहेत असे वाचले .
सध्या समुद्री मिठापेक्षा यात पोट्याशियम, कॅल्शियम आणि मैग्नेशियमचे क्लोराईड आणी सल्फेट हे क्षार असतात. याला गुलाबी सर असा रंग त्यात असलेल्या आयर्न ऑक्साईड मुळे येतो.https://en.wikipedia.org/wiki/Himalayan_salt ( LACTO CALAMINE) यात हि याच आयर्न ऑक्साईड मुळे गुलाबी रंग येतो.
खनिज मीठामध्ये असलेल्या मैग्नेशियमचे क्षार हे सारक असतात त्यामुळे बद्धकोष्ठ असलेल्या लोकांना त्याचा थोडा फायदा होतो.
पादेलोण किंवा काळे मीठ (काला नमक) हे सैंधव वर प्रक्रिया करून त्यातील पोट्याशियम, कॅल्शियम आणि मैग्नेशियमचे सल्फेट चे सल्फाईड आणी हायड्रोजन सल्फाईड मध्ये रुपांतर करतात. या सल्फाईड मुळे त्याला काळा रंग आणी सडक्या अंड्या सारखा वास येतो. आपण हे मीठ जास्त प्रमाणात खाल्ले असता आपल्या "सुटणाऱ्या वाता"ला पण तसाच वास येतो. गुजराती लोक खात असलेल्या मुखवास किंवा कायम चूर्ण किंवा हवाबाण हरडे हे जस्त खाल्ल्याने हाच परिणाम दिसून येतो.
राहिली गोष्ट हि आपण खात असलेल्या मीठा बद्दल-- खनिज मीठ हे आपण खात असलेल्या मिठापेक्षा खूप जास्त चांगले आहे हे समजण्यास कोणताही सबळ पुरावा नाही. विशेषतः जी किंमत आपण सैंधव किंवा पादेलोण साठी मोजतो ती गृहीत धरता
पहा http://www.organicskinherbsonline.com/himalayan-bath-salts-health-benefits/
गरोदर स्त्रियांनीआयोडीन युक्त मिठा ऐवजी सैंधव किंवा पादेलोण खाल्याने फायदा होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही उलट आयोडीन हे विकसित होणार्या गर्भाच्या मेंदूला अतिशय आवश्यक असे रसायन आहे आणी त्याच्या कमतरतेमुळे क्रेटीनिझम हा मतीमंद करणारा आजार होतो हे सिद्ध झालेले आहे. असे होऊ नये यासाठीच सध्या मिठामध्ये आयोडीन घालावे हि जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे. याबद्दलच्या वादात मी पडू इच्छित नाही.
http://www.who.int/elena/titles/salt_iodization/en/

कुसुमिता१'s picture

21 Dec 2015 - 9:57 am | कुसुमिता१

अत्यंत अभ्यासपूर्ण माहितीसाठी धन्यवाद!!

कुसुमिता१'s picture

21 Dec 2015 - 9:58 am | कुसुमिता१

अत्यंत अभ्यासपूर्ण माहितीसाठी धन्यवाद!!

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Dec 2015 - 4:06 pm | अनिरुद्ध.वैद्य

मीठ आणि रक्तदाब यांचा काही संबंध असतो का? मी पदार्थ तयार झाल्यावर वरून थोडेसे घेतो तेव्हा काही लोक्स बोलले की बीपी बघून घ्या. आधी बिनमिठाचही चालून जात होत.

प्रभाकर पेठकर's picture

22 Dec 2015 - 1:28 am | प्रभाकर पेठकर

पदार्थ शिजवताना घातलेले (अर्थात प्रमाणात) मीठ घातक नसते. बिन शिजवलेले, म्हणजेच 'वरून' घेतलेले, मीठ उच्च रक्तदाबासाठी जास्त घातक असते असे म्हणतात. कोणी आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर योग्य तो प्रकाश टाकू शकेल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Dec 2015 - 1:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

धन्यवाद काका.

कुसुमिता१'s picture

21 Dec 2015 - 10:02 am | कुसुमिता१

माहितीपूर्ण प्रतिसाद दिलेल्या सर्वांचेच आभार!!

रुस्तम's picture

21 Dec 2015 - 2:40 pm | रुस्तम

http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=२१३

- डॉ. वर्षा जोशी

रक्तदाब सुरू झाल्यावर मीठ फार वापरणे त्रासदायक असलेतरी मिठाने रक्तदाब हा रोग होत नाही.अतिपौष्टिक खाल्लेलं शरिरात जिरलं नाही तर आंतरिक स्थूलपणा वाढत जाऊन रक्तदाब ,रह्रुदयरोग होतात.शहरातील ९९टक्के स्त्रियांचे बाळंतपण ( सिझेअरिअन! ) आणि लेहलडाखमधल्यांचे यात इतका फरक होण्याचे कारण हेच असावे.

सुबोध खरे's picture

22 Dec 2015 - 9:36 am | सुबोध खरे

hypertension onset is strongly associated with salt consumption: there is a close relationship between average sodium salt intake and the incidence of hypertension, and restriction of sodium intake substantially decreases blood pressure.
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3324327/
मीठ शिजवताना किंवा नंतर घातले तरी त्याचा परिणाम सारखाच होतो. जास्त मीठ खाल्ल्याने अति रक्तदाबाचा विकार होतो. तेंव्हा मीठ हे चीविपुर्तेच घ्यावे आणि लोणची पापड इ भरपूर मीठ असलेले पदार्थ कमी खावे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Dec 2015 - 1:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

हे लक्षात ठेवील सर :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2015 - 2:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रकारचे मीठ हे मुख्यत: मीठच (NaCl, सोडीयम क्लोराईड) असते. फक्त ते कोणत्या स्त्रोतापासून मिळवले आहे त्याप्रमाणे त्याच्या काही कमी जास्त प्रमाणात इतर पदार्थांची (आयोडिन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, इ) भेसळ झालेली/केलेली असते.

शिजवण्याच्या क्रियेत मीठ नष्ट होत नाही. त्यामुळे, ते जेवण शिजविताना टाका अथवा नंतर, काही फरक नाही... शरीरशास्त्राच्या दृष्टीने त्याची दिवसाभरात खाल्लेली एकूण मात्रा महत्वाची असते. पाकशास्त्राच्या दृष्टीने (चवीत) फरक पडत असल्यास पदार्थ बनवताना अथवा नंतर त्यात योग्य तेव्हा मीठ टाकावे.

"पदार्थ खाताना वर मीठ टाकू नये" हा सल्ला मुख्यतः पाश्चिमात्य देशांतून आला आहे. तेथे बर्‍याच पदार्थांवर जेवताना मीठ टाकून खातात. त्या सवयीमुळे काहीजणांत सर्वच पदार्थांवर (मीठ टाकून शिजवलेल्या पदार्थांवरही) मीठ टाकून खाण्याची प्रवृत्ती आहे. यामुळे, अनावश्यक जास्त मीठ शरीरात जावून रक्तदाब, इ आजार होऊ शकतात.

याशिवाय, मिठाच्या चवीने मेंदूच्या आनंददायी केंद्रात स्त्रवणार्‍या रसायनांमुळे सुखद भावना निर्माण होते. त्यामुळे जास्त मीठ खाणे, अधिकाधिक मात्रेत मीठ असलेले/टाकलेले पदार्थ खाण्याच्या अनिर्बंध सवयीत बदलू शकते. याला आपण मीठाचे व्यसन (तंबाकू / दारूच्या व्यसनाप्रमाणे) असे म्हणू शकतो.

(Research shows that consuming salt triggers the release of dopamine, the neurotransmitter associated with the brain's pleasure center, making salty foods as addictive as nicotine and alcohol. Therefore, as with any addiction, eating salty foods makes you crave more.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Dec 2015 - 2:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

मीठाबद्दल अजून काही माहिती,
मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन
या धाग्यात मिळेल

विवेकपटाईत's picture

22 Dec 2015 - 5:46 pm | विवेकपटाईत

आपण बुआ खाण्यात tata (स्वदेशी) आणि चाट इत्यादीवर स्वादासाठी गुलाबी रंगाचे मीठ वापरतो. शेवटी स्वाद महत्वपूर्ण.

मिठाच्या वापराने चटकदारपणा वाढतो,आणखी खाऊ हे वाढते आणि परिणामी वजन ,रक्तदाब वाढतो हे जास्ती संयुक्तिक वाटते.परंतू मीठ हे बय्राच कारणांपैकी एक मोठे म्हणता येईल.बय्राच साधू ,मठाधिष्टांस रक्तदाब असण्याचे कारण मात्र वेगळे आहे.