कालच्या २४ तासातल्या ९०० किमीच्या गुजरात मोहिमेबद्दल थोडक्यात.
१. काल सहा वाजता विचारणा झाली. कुठे जायचे सांगितले नाही. सांगितलेले ठिकाण अजिबात ओळखीचे, स्मरणातले नाही.
२. दहा हजार भरले की कुणीतरी बँक अधिकारी मुद्रालोन अंतर्गत दहा लाखाचे कर्ज मंजूर करून देतो. अशा अधिकार्याला सुरतमध्ये भेटायला जायचे आहे. दहा हजार द्यायची तयारी असेल तर चला.
३. प्रवास सुरु केल्यावर कळले की कुठल्या तरी मंदिरात दर्शनाला जायचे आहे.
४. रात्रभर गुजरात मॉडेलच्या नावाने बोटे मोडत, पाय मोडत अॅक्स्लिटर-ब्रेक-क्लचवर डान्स केला.
५. महिंद्रा स्कॉर्पिओ ही अजिबात ऑफरोड वेहिकल नाही हे सिद्ध करण्यात गुजरात पीडब्लूडीने चंग बांधलेला.
६. नर्मदेच्या प्रचंड वाळवंटात मी आणी माझी स्कॉर्पियो, सहातासाचा खडतर प्रवास, चित्रविचित्र दृश्यांची मालिका.
७. गुजरातमध्ये एका हायवेवर ओळीने सुमारे शंभर दुकाने फक्त 'चहा' विकत होती. संशयखोर आत्म्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता कळले एक धक्कादायक सत्य. अंगावर येणारे.
८. महिंद्रा स्कॉर्पियो ही एक बंडल गाडी आहे हे माझे 'नवे' मत तयार झाले.
९. चोविसाव्या तासाच्या शेवटच्या मिनिटाला घरी असणे 'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज' ची आठवण देऊन गेले.
१०. तो सरकारी अधिकारी, ते मंदिर आणि त्या दहा हजाराचे गौडबंगाल.
२४ तासाच्या थराराचा खंग्री अणुभव. इच्छुकांनी आगावू नोंदणी करावी. प्रकाशन होणार २१ डिसेंबर २०१५.
(कृपया यातल्या काही गोष्टी माहित असतील तर प्रतिसाद देऊन नव्या वाचकांच्या उत्सुकतेस अगरबत्ती लावू नये अशी जाण'त्या वाचकांना पेष्यल इनंती..)
प्रतिक्रिया
11 Dec 2015 - 9:56 pm | मितान
ट्रेलर वगैरे प्रकार झेपणेबल नाही !
11 Dec 2015 - 10:03 pm | पैसा
९०० किमि एका दिवसात?
11 Dec 2015 - 10:14 pm | चलत मुसाफिर
एकदा मी सकाळी सहा ते रात्री बारा असे ड्रायव्हिंग करून ८४० किमी कापले होते, तेही साध्या सांत्रोमधून.
11 Dec 2015 - 10:37 pm | पैसा
खरेच मुसाफिर तुम्ही! १८ तास म्हणजे दोन जेवणे, चहा यासाठीचे २ तास विश्रांती धरली तर १६ तास ड्रायव्हिंग केलेत. कंटाळा आला असेल जाम.
16 Jan 2016 - 1:35 pm | आप्पा
मी ३ वेळा ठाणे ते सोलापुर सकाळी ६ ते संध्याकाळी ६ एम ८० वरुन प्रवास केला आहे
12 Dec 2015 - 9:17 pm | आनंदी गोपाळ
९०० मिलि असू शकतील नै? ;)
12 Dec 2015 - 9:18 pm | पैसा
ते पण जास्तच ना! =))
13 Dec 2015 - 7:10 am | वेल्लाभट
आम्ही सकाळी ६ लनागपूर्वहून निघून रात्री १२ ला (१८ तास) ठाणेंस आलेलो आहोत
13 Dec 2015 - 9:59 pm | पैसा
पॉसिबल आहेच. धंदेवाईक ड्रायव्हर लोक एका दिवसात मुंबई गोवा आणि परत एवढी १२०० किमि पण गाडी चालवतात. मला आश्चर्य वाटलं ते आपल्यासारखे कोणी लोक एवढा वेळ गाडी न कंटाळता चालवतात म्हणून!
14 Dec 2015 - 3:06 am | कंजूस
खरं आहे.एक घडलेलं उदाहरण सांगू शकतो.ग्राहकांची 'कमी पैशात जास्तीतजास्त मिळवण्याची भूक' वाढत चालली आहे आणि सेवा देणारे आता चलती आहे तोपर्यंत कमवून घेऊ असं करत आहेत.मग रस्त्यातच चाकामागे डुलकी लागते.
14 Dec 2015 - 3:53 am | ट्रेड मार्क
१२ तासात मी ७२५ मैल (११५० किमी) चालवली आहे, मी एकटाच ड्रायवर.
पण अमेरिकेत आणि भारतात गाडी चालवणे पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे तुलना करायचा उद्देश नाही.
11 Dec 2015 - 10:50 pm | अक्षया
___/\___
11 Dec 2015 - 10:55 pm | म्हसोबा
हे काय आहे? एखाद्या आगामी पुस्तकाची जाहिरात आहे का?
11 Dec 2015 - 11:08 pm | ईश्वरसर्वसाक्षी
असलेच काहि तरि ह्यापुर्वि सुद्धा आले होते.
गुजरातमध्ये एका हायवेवर ओळीने सुमारे शंभर दुकाने फक्त 'चहा' विकत होती. संशयखोर आत्म्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता कळले एक धक्कादायक सत्य. अंगावर येणारे.
हे येग्झॅटली काय हाय...क्या राज है !
मला तरी ह्यात फक्त आणि फक्त मोदि द्वेष दिसतोय...
12 Dec 2015 - 11:16 am | अनिरुद्ध.वैद्य
दारू विकत असतील हो ... टेन्शन नका घेऊ.
12 Dec 2015 - 3:17 pm | मार्मिक गोडसे
अरे हो ह्या मिड ब्रेन अॅक्टीव्हेशनवर मागे लेखकाचा धागा आला होता. लेखक त्यावर शास्त्रिय पद्धतीने अभ्यास करणार होते. पुढे काय झाले त्याचे अपडेट आले नाहीत अजून. असो.
दोन महिन्यांपुर्वी माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या १२ वर्षाच्या मुलाने हा कोर्से केला होता. डोळे बंद करून वाचू लागला, चित्रं ओळखू लागला. खात्री करण्यासाठी मी जाऊन भेटून आलो. खरोखरच तो ह्या सर्व करामती करत होता. मी त्याचे डोळे माझ्या रूमालाने व्यवस्थीत बांधले व माझ्याकडील एका भाजीचे चित्र असलेले कार्ड त्याला दिले. त्याने ते मनगटावर, डोक्यावर बराच वेळ घासले,बंद डोळ्यासमोर चिकटवले त्याला कार्ड ओळखायला वेळ लागू लागला, शेवटी त्याने ते कार्ड नाकाने हुंगले व त्वरीत कारल्याचे चित्र आहे असे म्हणाला, प्रत्यक्षात ते भेंडीचे चित्र होते. त्या कार्डाला मी कारल्याचा रस लावला होता. तो मुलगा फक्त त्याच्याकडील कार्डे ओळखत होता. जी त्या कोर्सवाल्यांनी दिली होती, ज्यावर त्या त्या फळाचा किंवा फुलाचा गंध मारला होता. डोळ्याला बांधलेल्या पट्टीखालून दिसते हे घरातल्या सर्वांना माहीत आहे हे त्यामुलाने लगेच कबूल केले तेव्हा त्याच्या पालकांची तोंडं बघण्यासारखी झाली होती. मुलाचे आईवडील उच्चशिक्षीत, आजी आजोबा निवृत्त शिक्षक असूनही असल्या थोतांडाला बळी पडले. हजारो रुपये अक्कलखाती गेले. आता त्या कॅसेट ऐकणे,हुंगणे,डोळे बंद करून वाचणे हे सर्व त्यादिवसपासून बंद झाले.
12 Dec 2015 - 12:14 am | हवालदार
मोदी महिंद्रा स्कॉर्पियो पण बनवायला लागले की काय?
12 Dec 2015 - 4:45 am | अभिदेश
हे तुमचे मत आत्ता तयार झालेले पाहुन आश्चर्य वाट्ले.... आमचे हे मत आधिपासून होते. टाटा सफारीला (जुन्या) पर्याय नाही..
12 Dec 2015 - 7:11 am | सौन्दर्य
उत्सुकता बर्यापैकी ताणली गेलीय. अजून दहा दिवस आहेत.
12 Dec 2015 - 8:30 am | खटपट्या
मोदींनी राजीनामा दीला पायजेलाय !!!
12 Dec 2015 - 8:35 am | पिंगू
मला दुसर्या मुद्द्याबद्दल अधिक माहिती करुन घ्यायची आहे. बाकी मॅरेथॉन ड्रायव्हिंग वगैरे गोष्टी बद्दल सुद्धा वाचायला उत्सुक.
12 Dec 2015 - 8:52 am | नाखु
खतरा तो पिक्चर कैसा होगा ???
आमच्या सात शीटा अगदी पिटातल्या ( बाल्कनीतून शिट्ट्या मारता येत नाहीत म्हणून)
12 Dec 2015 - 9:56 am | कंजूस
मला कारबद्दल प्रत्यष माहीत नाही परंतू दुसय्रा एका लेखाची लिंक देऊ शकतो.प्रथम लेखतर टाका.२१ तारखेचं आणि रुमाल टाकून ठेवण्याचं प्रयोजन कळलं नाही.
तांत्रिक बाबतीत बोलायचं तर कार/वाहन यांचं किती किमी गुणिले किती वजन गुणिले वेग यांचं उत्तर एका एंजिनात एकच असते.एक वाढवले की दुसरे आपोआपच तितक्या प्रमाणात कमी होणारच.वाहन कशासाठी वापरावं हे अगोदरच ठरलेलं असतं त्याऐवजी भलतीच अपेक्षा ठेवायची नसते.
आक्षेप फक्त तांत्रिक आहे संदीप.
12 Dec 2015 - 10:10 am | सुबोध खरे
कंजूस साहेब
ते गुजरातच्या रस्त्याबद्दल बोलत आहेत गाडीबद्दल नाही. महिंद्रा स्कॉर्पिओ ही अजिबात ऑफरोड वेहिकल नाही हे सांगण्यात गुजरातचे रस्ते( एकंदरच गुजरात आणि गुजरात मॉडेल) अतिशय खराब आहेत हे अध्यारुथ आहे. (अध्यारुथ- हा शब्द बरोबर आहे काय?)
असो अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नाही. पूर्ण लेख आल्यावर त्यावर बोलणे बरोबर असेल
12 Dec 2015 - 10:50 am | बोका-ए-आझम
असा शब्द आहे.
12 Dec 2015 - 11:09 am | सुबोध खरे
धन्यवाद
12 Dec 2015 - 12:38 pm | कंजूस
खरं आहे.गाडी थोडी अगोदरच घसरली.यात तीन धागे दडलेत लक्षातच नाही आलं.पॅापकॅार्न नको फाफडा जलेबीचा कट्टा होऊ द्या वापी/सापुतारा ला.
12 Dec 2015 - 10:55 am | बोका-ए-आझम
२१ डिसेंबर ऐवजी २२ डिसेंबरला जाहीर करा. तसाही तो वर्षातला सर्वात छोटा दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते.
12 Dec 2015 - 11:20 am | अनिरुद्ध.वैद्य
कुठ जाऊन आले? अम्दावादमा रस्ता सारू छे ...
बाकी कल्लास टोले आणि चिमटे!! लेखाच्या प्रतीक्षेत!
12 Dec 2015 - 12:26 pm | होबासराव
आजच मंडईत जाउन १ टण मक्याच्या कणसांची ऑर्डर देतो :) हा मंग ह्यावेळेस मी बी पॉपकॉर्न चा स्टॉल लावणार बघा. प्रचंड पोटेन्शीयल आहे ह्या धाग्यात... ट्रेलर मध्येच इतकी खद-खद आहे तर मग पिच्चर कसा असेल... राईट फ्रॉम गुजरात मॉडेल, गुजरात पीडब्लूडी, चहा ची ति १०० दुकाने, 'तो' सरकारी अधिकारी आणि दहा हजार भरुन दहा लाखाचे कर्ज मंजूर करुन घेणारे 'होतकरु' व्यावसाईक...
12 Dec 2015 - 1:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
काय प्रकार आहे रे हा संदिपा? स्कॉर्पियोची खराब म्हणजे मिपाकरांना रिनो ड्स्टर्,निसान टेरॅनो सुचवू पाहतो आहे का? असा ह्यांना संशय.
. की गुजरात पर्यटन विकासाची जाहिरात?
12 Dec 2015 - 1:05 pm | मृत्युन्जय
एक स्कॉर्पियो आणि सहा जण...
धाग्याचा कंटेंट आणि धाग्याचे शीर्षक यांचा संबंध म्हणजे भक्त प्रल्हाद बघायला जावा आणि ब्ल्यु फिल्म बघायला लागावी असे झाले.
लोक उगा ताकाला जाउन भांडे का लपवतात तेच कळत नाही.
12 Dec 2015 - 1:09 pm | होबासराव
ब्ल्यु फिल्म बघायला जावा आणि भक्त प्रल्हाद बघायला लागावा असे झाले :))
मला वाटले होते कि संदिप भौ नी प्रवास वर्णन वगैरे टंकले असेल पण... असो.
12 Dec 2015 - 2:47 pm | अद्द्या
अच्छा म्हणजे गुजरात रस्ते आणि छुपी / बेकायदेशीर दारूची दुकाने आणि स्कोर्पियो यांच्यावर टीका करणारा लेख आहे तर . चालुद्या चालुद्या . .
मला वाटलं प्रवास वर्णन असेल
12 Dec 2015 - 4:34 pm | कंजूस
गुजरात आताचा चांगला आहे मोदींनी खूप चांगलं काम केलंय असे आमचे दोनतीन शेजारीही मागच्या निवडणुकीअगोदरपासून सांगताहेत याचा अर्थ पुर्वी फारच वाईट परिस्थिती असणार संदीप. आपल्याकडे चांगले रस्ते करण्याची सुरूवात बहुतेक कराड/कऱ्हाडमधून यशवंतराव चव्हाणांनी केली.त्याचा इतका उदोउदो झाला की दिल्लीचं सिंहासन हलू लागलं.पुढं काय झालं ते सर्वांनाच ठावूक आहे.
12 Dec 2015 - 8:49 pm | असंका
2 नंबरने कोड्यात टाकलंय. दहा हजार भरून खातं उघडून घेत असतील असं वाटतंय. पण सुरत चा मॅनेजर नाशिकला कसा कर्ज देतो ते बघण्याची जबर उत्सुकता आहे.(या यस्य रुची:...)
12 Dec 2015 - 9:08 pm | इरसाल
रस्त्यांबाबत असहमत.
बाकीचे डिटेल आले की बोलु.
12 Dec 2015 - 9:09 pm | सुबोध खरे
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नाही. पूर्ण लेख आल्यावर त्यावर बोलणे बरोबर असेल
12 Dec 2015 - 9:10 pm | कंजूस
थोडे दिवसांपुर्वी एक लेख होता ना सातबारावर नाव नसले तरी गुजरातमध्ये ते पैसे घेऊन मिळवून देतात त्यातलाच किस्सा ( खरा) असणार.मेघालयमधून नाही का पीएचड्या मिळाल्या युनि चं तोंड न पाहता?
12 Dec 2015 - 9:19 pm | जेपी
सातबारा वर नाव नसेल तर आपल्याकडे पण लावुन मिळत,,ते पण पयशे न खर्चता..
13 Dec 2015 - 8:57 pm | चांदणे संदीप
कटाप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाइतकाच गूढ आहे.
दोन्ही ठिकाणी वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.
वाट बघणारा :)
Sandy
13 Dec 2015 - 9:09 pm | जव्हेरगंज
जे काय वाचलं ते जबरी!!!!
13 Dec 2015 - 9:16 pm | कंजूस
सहाजणांपैकी चारजणांनी आलटून पालटून गाडी चालवली आणी दोघांनी टायर बदलले.
14 Dec 2015 - 1:29 am | सुज्ञ
मुद्दा क्र ४ ५ व ७ यावर पिकचर मध्ये भर दिल्यास लेखकाची बालबुद्धी उघड होऊ शकते व जुनेच शो परत दाखवले जाऊ शकतात .. कंटाळ आला
14 Dec 2015 - 3:16 pm | मार्मिक गोडसे
Why Mahindra Scorpio is Modi's favourite car ?
22 Dec 2015 - 7:53 pm | होबासराव
????
22 Dec 2015 - 7:54 pm | चांदणे संदीप
+1
22 Dec 2015 - 8:05 pm | सतिश गावडे
२१ डिसेंबर गेला की आण्णा.
26 Dec 2015 - 5:11 pm | संजय पाटिल
हेच म्हणायला आलो होतो...
22 Dec 2015 - 8:08 pm | संदीप डांगे
क्षमा असावी.
कार्यबाहुल्यामुळे प्रसिद्धीची तारिख पुढे ढकलली गेली आहे.
लक्षात ठेवून प्रतिसाद देणार्या सदस्यांना अनेक धन्यवाद! ;-)
22 Dec 2015 - 9:00 pm | कंजूस
पुंगी वाजवून झाली टोपलीचे झाकण उघडा लवकर.अॅनकोन्डा /कोब्रा/काय ते कळू दे लवकर.
25 Dec 2015 - 6:17 pm | शलभ
ह्या लेखकाची बोलबच्चन असते बर्याचदा असा अनुभव आहे.
26 Dec 2015 - 12:10 am | संदीप डांगे
जसे की.....?
26 Dec 2015 - 11:28 am | शलभ
वरती एक उदाहरण दिलेच आहे मार्मिक गोडसे यांनी.
अजून हाच धागा आहे. तुम्ही पाहीजे तेव्हा पूर्ण लेख टाकू शकला असता, पण ट्रेलर टाकून, रिलीज ची तारीख तारीख टांग मारता.
अजून शोधावे लागतील. ;)
26 Dec 2015 - 11:43 am | संदीप डांगे
ट्रेलर टाकायचे कारण आहे, पिच्चर रिलीज झाला की कळेल.. थांबाल ना?
तुमची टिका सकारात्मक घेतली आहे. धन्यवाद!
26 Dec 2015 - 6:14 pm | शलभ
टिका सकारात्मक घेण्यासाठी धन्यवाद. :)
25 Dec 2015 - 8:12 pm | drsunilahirrao
___/\___
26 Dec 2015 - 5:53 am | कंजूस
कधी येणार तारीख?
लेख कशाबद्दल -महिन्द्रा /गुजरात रस्ते/ड्राइविंग/ललित लेखन?
26 Dec 2015 - 10:58 am | संदीप डांगे
काका, लेख भटकंतीवरच आहे. पण सध्या तुफान भटकंतीचाच कार्यक्रम सुरु असल्याने लेखन पूर्ण करायला वेळ मिळत नाहीये...
27 Dec 2015 - 12:50 pm | भिकापाटील
लेख मुददेसूद लिहा. उगाच फापटपसारा नको.
27 Dec 2015 - 4:02 pm | कंजूस
ट्रेकला यस्टीची ( = प्रियदर्शिनी ) वाट पहातो तसे लेखाची वाट पहात आहे.लवकर टायर बदली करा पण पोहोचवा.तसं आमच्याकडेही शहापुर यस्टी आगाराचे अनुभव गाठीशी आहेत.