कांद्याच्या पातीची सोप्पी कोशिंबीर

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
28 Dec 2008 - 10:05 pm

कांद्याच्या पातीची ही कोशिंबीर करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी आहे.

साहित्य- घरात सहजी उपलब्ध असणारेच-

कांद्याची पात - १ जुडी
दाण्याचं कूट - २ - ३ चमचे
कच्चं तेल - १ चमचा
गोडा मसाला - १ छोटा चमचा
तिखट - १ छोटा चमचा
लिंबाचा रस - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
साखर - २ चिमूट

कृती - कांद्याची पात स्वच्छ पुसून चिरून घ्यावी. त्यात वरील सर्व जिन्नस - दाण्याचं कूट, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालावे.
घरच्या सर्वांना 'चला जेवायला' अशी हाक मारून, सगळे येईपर्यंत ही कोशिंबीर ढवळून ठेवावी. :)

करायला एकदम सोप्पी आणि फोडणी वगैरेची भानगड नसल्याने पटकन होणारी.. आणि चवीलाही अतिशय छान लागते.

--शाल्मली.

प्रतिक्रिया

रेवती's picture

28 Dec 2008 - 10:25 pm | रेवती

शाल्मली,
काय सही पाकृ ची आठवण करून दिलीयेस.
अनेक वर्षात ही सोप्पी कोशिंबीर मी विसरलेच होते.
तुला अनेक धन्यवाद, आठवण करून दिल्याबद्दल.
फोटू असा आलय ना की लगेच करावीशी वाटतीये.
आता भाजीच्या लिस्ट्मध्ये कांदापात लिहीते.
कोशिंबीर केल्यावर कळवते गं.:)

रेवती

चकली's picture

28 Dec 2008 - 10:38 pm | चकली

>>घरच्या सर्वांना 'चला जेवायला' अशी हाक मारून, सगळे येईपर्यंत ही कोशिंबीर ढवळून ठेवावी. <<

हे आवडले. बहुतेक मिपा वरची सगळ्यात लहान आणि सोपी रेसिपी असावी :) .

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

28 Dec 2008 - 11:28 pm | प्राजु

इतकी सोपी कोशिंबीर! सह्हीच. झाली की तुला कळवते नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Dec 2008 - 12:01 am | बिपिन कार्यकर्ते

साला हे तर आपल्याला पण जमेल की !!! फक्त फ्रीज मधे किती दिवस टिकेल ते पण सांगा. :)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

29 Dec 2008 - 12:17 am | अवलिया

हेच म्हणतो

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

शाल्मली's picture

29 Dec 2008 - 12:18 am | शाल्मली

एखादा दिवस टिकेल. पण तशीही ती चोरटीच होते (एका जुडीची आकाराने कमी होते).
किती टिकेल याची नक्की कल्पना नाही कारण कधी उरलीच नाही. :)
फ्रिजला कांद्याचा वास लागेल तर काळजी घ्या.
--शाल्मली.

विसोबा खेचर's picture

29 Dec 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

शाल्मलीभाभी,

कोशिंबीर छानच केली आहेस, फोटूही छान..

येऊ द्यात प्लीज अजूनही पाकृ..

तात्या.

सहज's picture

29 Dec 2008 - 7:03 am | सहज

खूप सोपी आहे. करुन पाहीली पाहीजे.

शाल्मली's picture

29 Dec 2008 - 5:23 pm | शाल्मली

आपल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
रेवती, प्राजु, सहजराव - नक्की करून पहा आणि सांगा कशी झाली ते! :)

-- (आभारी) शाल्मली.

सारंग's picture

6 Jan 2009 - 11:41 am | सारंग

खायला आवडेल बघ आम्हाला. 8}

मनस्वी's picture

6 Jan 2009 - 5:20 pm | मनस्वी

> नक्की करून पहा आणि सांगा कशी झाली ते! :)
सुंदरच झालेली.

शशिधर केळकर's picture

6 Jan 2009 - 11:02 pm | शशिधर केळकर

कोशिंबीर मस्तच झाली आहे. फारच उपयुक्त पदार्थ दिसतो आहे एकूण दर्शनावरून. चवीची ही कल्पना येते आहे! लौकरात लौकर करून पाहीन आणि बहुतेक नेहेमीच्या वापरात आणता येईल! धन्यवाद!
अशाच सोप्या लौकर तयार होणार्‍या अनेक पाकृ च्या प्रतीक्षेत!

प्रभाकर पेठकर's picture

6 Jan 2009 - 11:18 pm | प्रभाकर पेठकर

मस्त आहे पाककृती. खानदेशी 'खुडा'च्या जवळ जाणारी.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

प्राजु's picture

6 Jan 2009 - 11:59 pm | प्राजु

पेठकर काका, त्याची रेसिपीही द्या ना इथे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

18 Jan 2009 - 11:42 pm | रेवती

आजच केली होती कोशिंबीर.
बर्‍याच वर्षांनी ही कोशिंबीर खाऊन धन्य झाले.
दोन मिनिटात होते, चव भारीच.

रेवती