प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.
स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण:
१) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे.
२) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ?
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ?
४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिक्रिया
2 Dec 2015 - 5:27 pm | यशोधरा
तत्वाचे ज्ञान राहिले!
2 Dec 2015 - 5:29 pm | नाखु
उद्देश तुम्ही कुणास "मानता" हा आहे "स"नंतर चिकटलाय किंवा मुद्राराक्षस विनोद असू शक्तो.!!
त्यानंतरच्या सुच्वण्या या निव्वळ उपसंपादकीय डुलक्या आहेत हो !!
दोन्ही तोफखान्यांनी हलके घ्यावे.
अमृत मासीक वाच्क
2 Dec 2015 - 5:31 pm | नीलमोहर
धागा विषय काहीही असू द्या हो, तो नेहमीप्रमाणे फिरवून फिरवून हव्या त्या चौकात नेऊन
सोडण्यात आला आहे.
आता फक्त धागा वामा होऊ नये एवढीच ज्या कोणाला मानत असाल त्या चरणी प्रार्थना करा.
:)
2 Dec 2015 - 5:36 pm | अजया
विनोदबुध्दी कुठे गेली आता बॅटमॅना?!
2 Dec 2015 - 5:51 pm | बॅटमॅन
ती नेहमीच शाबूत असते हो. फक्त हा प्रश्न सोयीनुसार विचारणार्यांच्या सोयीस्कर सवडीशास्त्राचे अपार कौतुक वाटते इतकेच. :)
2 Dec 2015 - 5:33 pm | पुष्करिणी
वासुदेवानंद सरस्वतींनी 'गुरूचरित्र बायकांनी वाचू नये' असं म्हटलेलं आहे, का तर त्यांच्या म्हणण्यानुसारजनरली स्त्रीया ऐहिक कामना करतात - नवरा दे/ सात जन्म दे/ नवर्याला भरपूर आयुष्य दे/ मुलं दे /मुलांचं कल्याण कर इ. इ.
बायका जनरली अध्यात्मिक कामना ( मोक्ष वगैरे ) करत नाहीत, दत्तगुरू ही विरागी देवता आहे. ऐहिक कामना करण्यासाठी इतर देवेता आहेत.
सरसकटीकरण इतर लोकांनी केलं असावं. माझ्या घरात आई गुरूचरित्र वाचते, शनिच्या / मारूतीच्या दर्शनाला जाते, तिथे अगदी गाभार्यात आत जाउन समया वगैरे लावते (सातारा / पुणे).
रजस्वला असताना / सोयर-सुतक असताना देवळात जाउ नये / पूजा करू नये इ. गोष्टी मला 'चायनीज व्हिस्पर' वाटतात; म्हण्जे ते अॅक्चुअली 'रजस्वला असताना ( तब्येतीच्या कारणामुळे ) / सोयर-सुतक असताना (इतर गडबडीमुळे) रोजची देवाची पूजा केली नाही तरी चालेल / देवळात गेलं नाही तरी चालेल' असं असावं आणि ते इतक्या काळानंतर 'केलं नाही तरी चालेल' च 'करू नये' असं कंव्हर्ट झालं असावं.
2 Dec 2015 - 5:50 pm | संदीप डांगे
अगदी हेच!
2 Dec 2015 - 6:24 pm | प्रचेतस
एकवस्त्रा अधोनीवी रोदमाना रजस्वला |
सभामागम्य पाञ्चाली श्वशुरस्याग्रतोऽभवत् ||
रजस्वला वा भव याज्ञसेनि; एकाम्बरा वाप्यथ वा विवस्त्रा |
द्यूते जिता चासि कृतासि दासी; दासीषु कामश्च यथोपजोषम् ||
इदं त्वनार्यं कुरुवीरमध्ये; रजस्वलां यत्परिकर्षसे माम् |
न चापि कश्चित्कुरुतेऽत्र पूजां; ध्रुवं तवेदं मतमन्वपद्यन् ||
महाभारतातील हे श्लोक आठवले.
2 Dec 2015 - 7:36 pm | संदीप डांगे
सर, नो संस्कृत.. ओन्ल्यी मराठी. संस्कृत नै आता. मराठीमे बोलो..
2 Dec 2015 - 8:05 pm | प्रचेतस
(हे प्रतिकामी, तू द्रौपदिकडे जा व तिला सांग) पांचाली रजस्वला व एकवस्त्रा आहेस तरी तू आहेस त्याच स्थितीत रडत रडत या सभेत येऊन तुझ्या सासऱ्यापुढे जाऊन उभी रहा.
(दु:शासन म्हणतो) हे पांचाली, तू रजस्वला, एकवस्त्रा अथवा विवस्त्र जरी असलीस तरी आम्ही तुला द्युतामध्ये जिंकले आहे, तुला आमची दासी केले आहे यास्तव तुला आता आमच्या इच्छेनुसार दासीप्रमाणेच वागले पाहिजे.
(द्रौपदी म्हणते) हे अनार्या, रजस्वला असलेल्या मला ह्या कुरुवीरांच्या सभेमध्ये तू ओढून आणत आहेस हे मोठे अकृत्य होत आहे, या सभेतील कुणीही तुझी निंदा करीत नाही यावरून सर्वांना तुझे हे मत संमत आहेसे दिसते.
2 Dec 2015 - 8:20 pm | संदीप डांगे
समजले! शतशः धन्यवाद!
3 Dec 2015 - 3:08 pm | बिपिन कार्यकर्ते
आमच्या ओळखीचे एक कुटुंब अत्यंत सनातनी धार्मिक आहे. त्यांच्या घरात कायमच कुळाचार, विविध नवरात्रं, चातुर्मास, येता जाता कसल्या न कसल्या पूजा असं काही बाही चालूच असतात. आजही त्या घरात बायकांचा कायम पिट्टाच पडताना दिसतो. तर अशा घरातील बायकांच्या काही गप्पा कधी मधी कानावर येतात. त्यात, ’बरं तर बरं महिन्याचे चार दिवस तरी हक्काची विश्रांती मिळते.’ असाच सूर असतो. आजच्या जमान्यात हे क्वचितच दिसते. शेपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत तर हे १००% ब्राह्मण घरात असावे. आणि समाजातील धार्मिक मान्यतांचे अग्रणी ब्राह्मणच होते (आणि आहेतही). पुष्करिणीच्या प्रतिसादावरून हे आठवले.
2 Dec 2015 - 5:52 pm | संदीप डांगे
http://abpmajha.abplive.in/videos/bai-mansachi-gosht-special-report-on-w...
2 Dec 2015 - 9:21 pm | कंजूस
सध्या कलाबाईंनाही ( शिरीच्या सासुबै आणि नौवीन सुनेच्याही) कुलाचाराचा अचानक पुळका आला आहे.
2 Dec 2015 - 9:25 pm | कंजूस
"दोन्ही तोफखान्यांनी हलके घ्यावे."-नाखु.
हलकेच घेत आहेत म्हणून एवढाच स्कोर झालाय.
"परोपकारी गोपाळ" चांदोबावाचक कंजूस.
3 Dec 2015 - 11:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय ठरलं ?
-दिलीप बिरुटे
3 Dec 2015 - 3:19 pm | इरसाल
सगळ्यांच झालं असेल असं समजुन, आता कोणी सांगेल काय की काय ठरलं मग ?
जास्त वाचॅलिसीस मन पॅरॅलिसीस.
3 Dec 2015 - 5:48 pm | मी-सौरभ
एवढे सगले प्रतिसाद चाळुन झाल्यावर सुद्धा काहीच निश्पन्न नाही.
ईकडे तत्वज्ञान आणि तिकडे हिन्दू हे असले विषय कुटण्यापेक्षा जरा काही चांगल्या गोष्टी, किस्से, प्रवासवर्णन असे काही लिहा की राव.
दोन घटका करमणूक होईल अश्या शिम्पल ऊद्देश्याने ईथे येणार्या सदस्यांचाही विचार करा की जरा.
3 Dec 2015 - 6:19 pm | माहितगार
धाग्याचा उद्देश करमणूक नसला तरीही इथे करमणूक आणि मनोरंजन दोन्ही केले गेले. बाकी आपल्या सारख्यांसाठी वेगवेगळी इतर दालने आहेत तेथे भरपूर मजकुर आहेच त्या शिवाय दिवाळी अंकही उपलब्ध आहे.
काथ्याकुटाचा उद्देश्यच काथ्या कुटणे आहे, इतरांनी दिलेले प्रतिसाद विशेष न वाटल्यास समाधान न झाल्यास आपला वेगळा दृष्टीकोण अधिकच महत्वाचा होतो असे आम्हाला वाटते. धाग्याला भेट देण्यासाठी आभार
3 Dec 2015 - 7:40 pm | मी-सौरभ
_/\_
7 Dec 2015 - 4:39 pm | तुडतुडी
जावू द्या हो . कुठं भांडत बसता . पुरुषसुलभ स्त्रीद्वेषातून आलेलं वाक्य आहे ते .
गुरुचरित्राचे लेखक सायंदेवांच्या कुळातले गंगाधर आणि चंपा साखरे ह्या दाम्पत्याचे पुत्र नामधारणी आहेत . दत्त महात्म्याचे लेखक टेंबे स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराज आहेत . त्यांचा ह्या विषयातला अभ्यास काय हे जाणून घेण्यासाठी टेंबे स्वामींच चरित्र वाचावं. त्यांना कलियुगातील भगवान दत्तात्रेयांचा चौथा अंशावतार मानलं जातं .
गजानन महाराजांच्या पोथी मध्ये एक अध्याय आहे . त्यात रजस्वला स्त्री च्या हातू झालेल्या चुकीमुळे तिला घरातून बाहेर घालवलं जातं . तिचा सासरा गजानन महाराजांचा भक्त असतो . ते त्याची कशी कान उघडणी करतात आणि रजस्वला स्त्री देवपूजेसाठी निषिद्ध असली तरी तिने केवळ तिच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी देव्हार्यात प्रवेश केल्यामुळे तीचा त्यात काहीच अपराध नाही हे त्या माणसाला पटवून देतात .
ह्या परंपरांमध्ये सत्य आहे . संयुक्तिक लॉजिक आहे . तेव्हा त्या चुकीच्या नाहीत .
काही विशिष्ट समाजाने आणि पुरुषांनी स्वताच्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या चुकीच्या प्रथांचा निषेध करायला हवा .ह्याचा अर्थ असा नव्हे कि हिंदू धर्मातली प्रत्येक प्रथा चुकीची आहे किवा हिंदू धर्म वाईट आहे .
इतर स्त्रीवर्ग, मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांना सत्व , रज आणि तमोगुण माहित असतात का ? वैद्यकशास्त्र फार फार तर तुमच्या लिवर ला त्रास होईल म्हणून दारू पिवू नका असं सांगतील . अपेयपान तामसिक आहे म्हणून पिवू नका असं सांगणार नाहीत .वैद्यकशास्त्र शरीराला प्रोटीन मिळावेत म्हणून मांसाहार करा म्हणून सांगतील . पण दुसर्याला वेदना देणं, हिंसा करणं तामसवृत्ती आहे . ती करू नका असं सांगत नाहीत .
श्राध्स्थान जवळ असतंच कि हो . पण फक्त शरीराच्या जवळ असून काय उपयोग ? मनाच्या जवळ असलं पाहिजे .
संदीप डांगे म्हन्तायेत ते विवक्षित ठिकाणी जावू नये , विहिरीवर जावू नये बरोबर आहे . पण देवाच्या जवळ जाण्याशी त्याचा संबंध नाही . आणि ईश्वरी कृपेच संरक्षण कवच प्राप्त असलं कि घाबरण्याच कारण नाही .
@अजया . जर तुम्ही तो दगड आहे असं मनात असाल तर तसाही त्याच्या जवळ जायची काहीच गरज नाही . तुम्ही खुशाल कशाला काही माना हो. नुसत्या तुमच्या मानण्यावर काय आहे ? आणि असंच जर तुमच म्हणणं असेल तर तुम्ही खुशाल मासिक पाळीच्या काळामध्ये देवपूजा करा . मंदिरात जावून मूर्तीला स्पर्श करा . मंत्र जप करा . आणि काय अनुभव येतात ते बघा .
7 Dec 2015 - 4:45 pm | तुडतुडी
विषयाला धरून प्रतिसाद द्या हो . उगीच अवांतराचा फाफात्पासारा कशाला ?
मशिदीत सुधागाभार्यापर्यंत स्त्रियांना जावून देत नाही . आणि मासिक पाळीच्या काळात मशिदीतच प्रवेश नसतो . ह्यामागे काय कारण आहे ?
बिपिन कार्यकर्ते - अगदी बरोबर बोललात . माझी एक मैत्रीण ब्राह्मण आहे . किती खंडीभर कर्मकांड चाललेली असतात त्यांच्या घरी . आणि बरीचशी इतकी अर्थहीन असतात कि कीव येते त्यांच्या बुद्धीची