प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.
स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण:
१) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे.
२) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ?
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ?
४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिक्रिया
1 Dec 2015 - 12:59 pm | बॅटमॅन
कुणाला कशाचं नि प्यारेला टंचनिकेचं. चालूद्यात. =))
1 Dec 2015 - 1:10 pm | pacificready
आपणास मुद्दा समजलेला नाही.
डांगे साहेबांचे मेगाबाइटी प्रतिसाद हा आनंदाचा विषय नाही का बरे वाटत तुजला? त्यासाठी लागणारं विचारांचं पककं अधिष्ठान, शब्दाची अचूक निवड आणि तत्पर इंटरनेट सेवा याचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळत आहे.
मान गये!
1 Dec 2015 - 1:56 pm | संदीप डांगे
स्त्रिया काही बोलत नाहीत म्हणून काढलेल्या धाग्यावरही स्त्रिया काही बोलत नाहीत, असे का?
1 Dec 2015 - 2:00 pm | पिलीयन रायडर
मितान बोल्लीये ना वर..
शिवाय तुम्ही सगळे मान्यवर आहातच.. चालु द्या.. मस्त चाल्लीये चर्चा!
1 Dec 2015 - 2:23 pm | नीलमोहर
हो ना,
शिवाय विद्वान मंड्ळींना मेगाबायटी चर्चा करण्यास एनर्जी मिळावी म्हणून त्यांची पोटा-पाण्याची सोय, स्वयंपाकपाणी, घरकाम, मुलांचे संगोपन, राहिलेल्या वेळेत ऑफिस इ. फुटकळ कामे करण्यात वेळ घालवतात
हो या स्त्रिया..
त्यांची बुध्दी तेवढीच शेवटी.
1 Dec 2015 - 2:41 pm | संदीप डांगे
आपल्या प्रतिसादातून ते अधिक स्पष्ट झालं, धन्यवाद!
1 Dec 2015 - 3:41 pm | नीलमोहर
डिस्ट्रक्ट केलं का मी,
अजून पुष्कळ महत्वाचे प्रतिसाद राहिले असतील नाही .. ?
सॉरी हं, प्लीज कॅरी ऑन हं.
.
1 Dec 2015 - 3:58 pm | संदीप डांगे
आपण आपले कर्तव्य अचूक बजावत आहात. त्यामुळे तुम्हीही कॅरी ऑनच करा...
(रच्याकने, मेगाबायटी प्रतिसाद आपल्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे समजून घेऊन त्यावर टिप्पणी करावी इतकी माफक अपेक्षा जगङ्व्याळ कामात बिझ्झी असलेल्यांकडून करणे अंमळ जास्त आहे, त्यामुळे तो प्रयत्न सोडून दिला)
1 Dec 2015 - 4:45 pm | नीलमोहर
आमच्या बाजूने किंवा विरोधात मेगाबायटी प्रतिसाद देण्यासाठी व्होटींग पोल आम्ही काढला नव्हताच मुळी.
आमच्या बाजूने किंवा विरोधात कितीही मेगाबायटी प्रतिसाद आले तरी त्याने काय फरक पडणार आहे .. ?
मुळात स्त्रियांना कमी लेखणे बंद झाल्याशिवाय समाजात सुधारणा होणे अवघड आहे हे कोणा कोणाला सांगणार
आणि सांगून समजणार का हा मोठा प्रश्न आहे.
असो. धन्यवाद.
1 Dec 2015 - 5:02 pm | मितान
अगं तसं नाही नीमो
मुळात आपल्याला तत्त्वज्ञान कळत नाही, त्यात एवढ्या विद्वानांच्या समोर काही बोलायचं म्हणजे....
जाऊ दे बाई,
मालक येतील मजुरीवरून. भाकरी थापायला घेते नाहीतर जोडे पडतील ;)
1 Dec 2015 - 5:07 pm | पिलीयन रायडर
बेक्कार गं तू.. बेक्कार!!
=))
1 Dec 2015 - 5:42 pm | अजया
=))=))=)))))))))
1 Dec 2015 - 5:29 pm | नीलमोहर
मार्मिक प्रतिसाद.
1 Dec 2015 - 5:35 pm | माहितगार
=)) (ह.घ्या.) भाकरीला पीठ कंच वापरता जात्यावरच ? गीरणीचं का ब्र्यांडेड ?
1 Dec 2015 - 5:56 pm | मितान
काहीतर्री क्काय ! सासूने ऐकलं तर खेटराने बडवेल ! रोज ताजं पीठ ! पहाटे जात्यावर दळते :))
1 Dec 2015 - 6:31 pm | गवि
जाते ओढताना ओव्या गाऊन संस्कृती जपता की नाही?
1 Dec 2015 - 6:39 pm | अभ्या..
ओव्या गाऊन???
ह्या गाऊनवर ओव्या जिर्याचे डिझाइन असते का? बारीक बारीक?
1 Dec 2015 - 7:51 pm | बॅटमॅन
दू दू दू अभ्या =))
1 Dec 2015 - 7:55 pm | संदीप डांगे
मागचे ऑर्डरचे टी-शर्ट झाले नैत अजून अन् गाऊन डीझाइनचं प्रॉडक्शन सुरू करताय काय...? नै लै बारिक बारिक चवकशी चालू आहे म्हणून विचारलं ब्वॉ...
1 Dec 2015 - 6:52 pm | pacificready
आपण पीठ दळता हे वाचून भरुन आलं, ड्वाले पाणावले
1 Dec 2015 - 2:01 pm | पगला गजोधर
या शनिवारी, माहितीगार यांचा, तेलाची वाटी आणि वडाच्या पानांचा हार घालून सत्कार करण्यात येत आहे हो.
1 Dec 2015 - 5:37 pm | माहितगार
:) धन्यवाद ! जो जे वांच्चील तो ते लाहो , तथास्तु !!!
1 Dec 2015 - 7:14 pm | पगला गजोधर
150 प्रतिसादानिम्मित्त आपला शनिमाहात्म्यची 7.5 प्रती देवून सत्कार करण्यात येत आहे.
2 Dec 2015 - 2:08 pm | पगला गजोधर
+
2 Dec 2015 - 2:08 pm | पगला गजोधर
२०० निम्मित धागालेखकास 'शनि महिमा ची सी डी', व शिर्डी ते शिंगणापूर जीपडी चे भाडे म्हणून रोख ५१ रु., व छायाचित्रातील शनिदेवा बरोबर सेल्फी ची संधी देवून, सत्कार या ठिकाणी कलेला आहे.
2 Dec 2015 - 2:41 pm | माहितगार
शनिदेवास आमचा प्रणाम
3 Dec 2015 - 2:21 pm | पगला गजोधर
आपणास प्रसिद्ध देवस्थानातील बसाल्ट जातीच्या दगडाचा छोटा तुकडा (स्नानाच्या वेळी अंग घासतात तो), शेन्दुर न फासता व टोपी टॉवेल देवून सत्कार करण्यात येत आहे.
1 Dec 2015 - 2:09 pm | तुडतुडी
शनि हि उग्र देवता आहे. शनीला रजस्वला स्त्रीच काय पण स्त्रीची सावलीही चालत नाही हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे कोणी सांगेल का ? . स्त्री म्हणू तिचा दुस्वास करायचा ह्या गालीछ गोष्टी सामान्य माणसांकडून घडतात. देवाकडून नव्हे . असं असतं तर देवाने स्त्री निर्माणच केली नसती . शनिमहाराज हि कर्माची देवता आहे . आणि ती ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देत असते . स्त्री आहे कि पुरुष हे बघून नव्हे . समस्त स्त्रिया शनि महाराजांना आपल्या मात्या पित्याच्या स्वरुपात बघत असतील तर लेकराला आईजवळ जाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण ? केवळ ४०० वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही . ह्या परंपरा पुरुषांनी स्वताच्या स्वार्थासाठी निर्माण केल्या आहेत . त्या मुलीने तेल वाहिल्याने काही फरक पडला का ? आभाळ कोसळलं का ? तिलाही काही फरक पडला नाही कि शानिलाही नाही . बाकीच्याच लोकांची च्याव च्याव चाललीये . स्त्रियांना आणि समाजातल्या काही लोकांना दुय्यम स्थान देण्यासाठी उच्चवर्णीयांनी ह्या वांझोट्या प्रथा निर्माण केल्या आहेत .त्या बंद झाल्याच पाहिजेत . महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांनी मिळून शनीच्या चौथर्यावर जावून अभिषेक करावा . बघू प्रलय बिलय येतोय का . महाराष्ट्राबाहेर स्त्रिया सर्रास मूर्तीला स्पर्श करून शनीची पूजा करतात . आणि मुख्य म्हणजे शनिमंदिर हि आपली personal property असल्यासारखं शनिशिन्ग्नापुरचे लोक बोलत आहेत .
देवीच्या गाभार्यात पुरुष पुजारी असतात . परपुरुशांनी देवीला स्नान घातलेलं, तिचे कपडे बदललेले , तिचा साजश्रुंगार केलेला चालतो का ? खरं तर हि प्रथा बंद करून सर्व देवी मंदिरांमध्ये स्त्री पुजारी ठेवायला हव्यात .
गोकर्ण महाबळेश्वरलाही ही पद्धत आहे. पण सरसकट प्रवेशबंदी नाहीये.
ऑ. गोकर्ण महाबळेश्वरला गेल्या वर्षीच जावून आलो आम्ही . मी आणि माझ्या बहिणीने अगदी शिवपिंडीला स्पर्श करून दर्शन घेतलंय. तिथे अशी काही प्रथा नाहीये .
रजस्वला असलेली महिला कधीही मंदिरात तर जात नाहीच पण घरात देव्हार्याजवळ सुधा जात नाहीत . तेवढी अक्कल असते स्त्रियांना . ४ दिवस नियम पाळण वेगळं आणि आजन्म केवळ स्त्री आहे म्हणून चुकीचे नियम पाळण वेगळं.
1 Dec 2015 - 2:17 pm | पगला गजोधर
यग्क्झाटली… दुधाने शनीचे शुद्धीकरण करणारे, मंदिर विश्वस्त आणि गावकरीच, याविषयी माहिती देवू शकतील.
करेक्ट
पण
हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे तुम्ही सांगाल का ? शिवाय जरी तुम्ही सांगू शकलात, तरी तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे 'xxx वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .'
1 Dec 2015 - 2:20 pm | तुडतुडी
नुकतीच दक्षिण भारताची सहल करू आलो . रामेश्वर आणि कन्याकुमारीला मंदिरात जायला , देवाचं दर्शन घ्यायला तिकीट आहे ५० रुपये . अरे हरामखोरांनो देव काय तुमच्या बापाची मालमत्ता आहे का ? देव सगळ्यांचा आहे . बाकीच्या पूजा बिज्या करायच्या असतील तर तिकीट लावणं समजू शकतं. पण नुसता देवाच्या मूर्तीकडे बघायला पैसे ? मग गरिबांनी दर्शना घ्यायचाच नाही का ?
होय बरोबर आहे . पण ह्याचा अर्थ हनुमंत उठसुठ प्रत्येक स्त्रीला गर्भवती करतात असा अर्थ होतो कि काय ? साधा कॉम्मन सेन्स आहे . तसा असतं तर उच्छवासाने स्त्रीला गर्भवती करण्याची शक्ती असतानाही मैनावतीला त्यांच्यापासून पुत्रापाप्तीसाठी एवढी घोर तपस्चर्या करावी लागली नसती . अर्धवट लोकं कशातून काय अर्थ काढतील काही सांगता येत नाही .
1 Dec 2015 - 2:27 pm | संदीप डांगे
नोबडी वॉन्ट्स टू टेक अ चान्स...
1 Dec 2015 - 2:39 pm | पगला गजोधर
मारुतीराया शिक्षा देईल
2 Dec 2015 - 3:56 pm | कंजूस
कन्याकुमारीला तिकिट?
1 Dec 2015 - 2:20 pm | यशोधरा
ते सर्वांभूती परमेश्वर वगैरेंच काय झालं कोणास ठाऊक!
1 Dec 2015 - 2:50 pm | pacificready
आधी भूत व्हा!
1 Dec 2015 - 3:04 pm | यशोधरा
आहेत तेवढी पुरेत की! थैमान घालतातच आहेत की. बास नै का?
1 Dec 2015 - 3:43 pm | pacificready
ते खरंय मात्र हडळींची लक्षणीय वाढ चिंतनीय आहे.
चर्चा नेहमीप्रमाणे 'चकवा' लागून भरकटली आहे.
1 Dec 2015 - 3:47 pm | यशोधरा
अरेरे.
1 Dec 2015 - 4:29 pm | वेल्लाभट
माझं स्पष्ट मत आहे. भक्ती ही कंडिशनल असूच शकत नाही आणि तशी असेल तर ती भक्ती भक्ती नव्हे आणि तो देव देव नव्हे. दॅट्स ऑल.
1 Dec 2015 - 5:42 pm | जेपी
1 Dec 2015 - 5:48 pm | इरसाल
स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड का जातो ?
कारण त्यांच्या तत्त्वात ज्ञान बसत नाही
1 Dec 2015 - 8:19 pm | टवाळ कार्टा
लोजीक म्हंतेत त्येला
(डब्बल काडी) ;)
1 Dec 2015 - 8:18 pm | माहितगार
१५०+ प्रतिसादांसाठी धन्यवाद. धागा लेखातील बहुतांश मुद्दे अद्याप चर्चेत येण्याचे बाकी वाटते आहे. शिवाय काही जणांनी द्वैत मताचा पुरस्कारही केलेला दिसतो आहे, अद्वैतींच बहुमत असूनही द्वैत सिद्धांताचा अद्याप फारसा प्रतिवाद दिसत नाहीए.
गापैंच्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक २ बद्द्ल मंडळींच काय म्हणण आहे, कुणाला काही वेगळी बाजू मांडावयाची आहे का ?
1 Dec 2015 - 8:30 pm | याॅर्कर
म्हणजे मुळात निसर्गानेच शारिरीक भेदभाव केला? असे म्हणावयाचे .
1 Dec 2015 - 10:01 pm | कंजूस
तुमच्यासारख्या ( =समोरच्याला ) तत्वज्ञान समजणार नाही याची खात्री असल्याने स्त्रिया बय्राचदा याविषयी बोलत नसतील आणि यांना हा विषय अवघड आहे ही समोरच्या व्यक्तीची समजूत होते.
आता तत्वज्ञानची व्याख्या =बिनकामाची/नसती चर्चा करत बसणे.जे स्त्रियांना करायचे नसते.
1 Dec 2015 - 10:04 pm | पैसा
:)
1 Dec 2015 - 10:47 pm | माहितगार
:) बाकी ठिक. पण हि चर्चा स्त्रीयांसाठी बिन-उपयोगाची आहे या बद्दल खात्री नक्की आहे का ?
2 Dec 2015 - 12:43 am | बॅटमॅन
आयला, म्हणजे ती उणीदुणी काढत बसणे हे कामाचे असते की काय =))
2 Dec 2015 - 1:21 am | टवाळ कार्टा
त्येला बैकांचे जन्रल णाआलेज णालेज म्हंतेत
2 Dec 2015 - 8:19 am | अजया
हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष समानतेच्या युगात पुरुषही हे काम करण्यात कुठे मागे दिसत नाहीत हे वारंवार सर्व धाग्यांवर मिपावरदेखील दिसतेच आहे ;)
बाकी बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने त्या संस्थळावर बाष्कळ बडबड करुन स्वतःच्या तत्त्वज्ञानाचे प्रदर्शन मांडत नसाव्यात!
2 Dec 2015 - 8:42 am | अत्रुप्त आत्मा
2 Dec 2015 - 10:01 am | टवाळ कार्टा
+११११११११११११२२२२
2 Dec 2015 - 10:20 am | अजया
बालिश आणि बाष्कळ वर्तनाचे प्रदर्शन कोणत्या तत्त्वज्ञानात येतं? ते कोळून प्यायलेले महाभाग सर्वत्र सांडताना दिसतात हे तत्त्वज्ञान!
2 Dec 2015 - 12:37 pm | टवाळ कार्टा
हे गुर्जींना की मला?
2 Dec 2015 - 10:44 am | माहितगार
@ अजया तै धागा लेखाच्या संदर्भाने एक गंभीर प्रश्न, पुरुषकेंद्रीत धर्मसंस्थेच्या तत्वज्ञानांशी स्त्रीया त्यांना ते तत्वज्ञान समानतेचे नसतानाही कुटूंबसंस्थेसाठी प्रॅक्टिकल आहे म्हणून जुळवून घेत असतात का ?
बाकी हा धागा उद्देश केवळ संस्थळांवरील स्त्री सहभाग एवढा मर्यादीत नाही. धर्मसंस्थांच्या स्थापनेपासून आजतागायत स्त्री सहभागाबद्दल प्रश्न उपस्तीत करून स्त्री समानतेचेच्या प्रतिपादनार्थ अजून काय करू शकेल ? असाही आहे.
बाकीची इतर चर्चा चालुद्यात.
2 Dec 2015 - 12:57 pm | अजया
आज खूप कामात आहे.पण लिहिल्याशिवाय राहवत नाही. म्हणून धागा वाचून डोक्यात आलेले विचार म्हणून हा प्रतिसाद वाचावा.विस्कळीत असू शकेल.
तत्त्वज्ञान शब्द आलाय म्हणून.तत्त्वज्ञान माझ्यासाठी काय आहे एक व्यक्ती म्हणून? ते कदाचित जगण्याचे शास्त्र म्हणता येईल.मग जी गोष्ट मला तार्किक सुसंगतता दाखवते,जिला विज्ञानाची जोड आहे ती गोष्ट माझे तत्त्वज्ञान होऊ शकते.म्हणजे तत्त्वज्ञान ही वैयक्तिक गोष्ट आहे.जी माझ्या वाचनाने,विचार करण्याने,जडणघडणीतून बनत आलेली असू शकते.त्यामुळे अर्थातच सर्व स्त्रियांना मंदिर प्रवेश इ बाबत का खटकले नाही.मला एक स्त्री म्हणून या अशा धार्मिक नियमांचा त्रास होतो का ,हे माझ्या तत्त्वज्ञानात बसते का? मग स्त्रिया याबाबत बोलत का नाहीत असे आपले तार्किक वाटले.
मी वर उल्लेख केलाय प्रॅक्टिकल आहे म्हणून मी असमानता चालवून घेते का तर नाही.पण एखाद्या उथळ कृतीचे मी केवळ स्त्रीवादाकरीता समर्थन करु इच्छित नाही.कारण मला हे असे ग्रह तारे देवच मान्य नाहीत.तसेच देवाची भिती दाखवून केले जाणारे धार्मिक भांडवल जिथे आहे तिथे देवच नसतो हे माझे ठाम मत आहे.त्यामुळे मुळात मी अशा कोणत्याही ठिकाणी निव्वळ उत्सुकता म्हणूनही जात नाही.ज्या देवापुढे सर्व मनुष्य प्राणी समान असावेत तो असे नियम बनवणार नाही.केवळ स्त्रीला दबावात ठेवण्याकरीता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तयार झालेले हे नियम मोडणे नाहीतर त्यांच्या अस्तित्वाची दखलही न घेता स्त्रीने आपला धर्म पाळणे हे तिचे तत्वज्ञान असावे. पण
विचार करणे ही पुरषाची मक्तेदारी स्त्रीने केवळ पुरुषाच्या अधिपत्याखाली रहावे अशा विचारसरणीत वाढलेल्या अनेक स्त्रीया असतात. त्या देवाधर्माची भिती,धार्मिक कौटुंबिक दबाव यासर्वात येऊन त्यांना ही असमानता पण बरोबर वाटू शकते.इथे तत्त्वज्ञान तिला कळणे हा इश्यू नसून ते कळण्याच्या परिस्थिती पर्यंत तिचे न पोचणे किंवा तिश्रा न पोचवणे आहे.
यात पण मग काहीतरी चुकीचे आहे वाटणारा स्त्री वर्ग असतो.तो आपसात निषेध करेल.पण या गोष्टीवरून टोकाला जाणारे कौटुंबिक वाद स्त्री जाऊ दे ना नंतर कटकट नको म्हणून टाळू पाहील तर ती त्या त्या परिस्थितीत कदाचित बरोबर असू शकेल.
बर्याचदा स्त्रीवर सर्व कुटुंबाची करिअरची जबाबदारी असते. तिथे दर क्षणाला एक प्रॅक्टिकल इश्यू तिच्यासमोर जर उभा असेल तर ती शनि देवा पेक्षा कामवालीचा आधी धावा करेल अशा स्थितीत असते.याला मी तिला तत्त्वज्ञान कळत नाही नाही म्हणू शकणार.आपली मतं किती धारदार आहेत या विषयावर त्याचप्रमाणात ती व्यक्त होईल.आणि हे व्यक्ती सापेक्ष असेल.म्हणूनच स्त्रीला तत्त्वज्ञान विषय अवघड जातो नाही म्हणू शकणार मी.परंतु तिच्या जीवनानुभवाने आलेल्या तत्त्वज्ञानाला ती शरण जाते म्हणू शकते!
2 Dec 2015 - 1:00 pm | बॅटमॅन
प्रतिसाद आवडला! सहमत हेवेसांनल.
2 Dec 2015 - 1:17 pm | टवाळ कार्टा
अग्दी अग्दी....जोर्दार अणूमोदन
2 Dec 2015 - 1:26 pm | अभ्या..
स्वतःच्या आयुष्याचे तत्वज्ञान सांगणे म्हणजे फेसबुक प्रोफाईल क्रिऐशन झालेय आजकाल.
2 Dec 2015 - 1:30 pm | अजया
व्यक्तीसापेक्ष गोष्टीबद्दल खुलासा हा स्वतःचे तत्त्वज्ञान सांगुनच करतात.दुसर्याचे ऐकून नाही.किंबहुना दुसर्याचे सांगण्यावरून स्वतःचे मत बनविणारे मूर्ख असतात असेही आमचे एक फेसबुकी तत्त्वज्ञान आहे.
2 Dec 2015 - 1:41 pm | अभ्या..
ह्याप्रमाणेच त्या फेसबुकी तत्वज्ञानाची पण अवस्था असेल तर लखलाभ.
लेखनसीमा.
2 Dec 2015 - 1:29 pm | माहितगार
वाचतोय , इतरांची अजून काही ओपीनीयन्स ?
2 Dec 2015 - 1:41 pm | कविता१९७८
छान प्रतिसाद
2 Dec 2015 - 12:13 pm | बॅटमॅन
पण काही विशिष्ट कंपूबाज स्त्रियांची बरोबरी या बाबतीत कोणीच करू शकत नाही. =))
बरोबर, अलीकडे नवीन गाभारा झाल्यापासून ते प्रदर्शन इतरांना दिसत नाही इतकेच. नाहीतर अगोदर पाहिलेलेच आहे सर्वांनी "प्रॅक्टिकल बाष्कळ प्रदर्शन" =))
2 Dec 2015 - 3:58 pm | प्रमोद देर्देकर
@ स्त्रीपुरूष समानतेच्या युगात
खी s क
मग ही स्त्री पुरुष समानता इथे मिपावरच का बरे नको.
चला टाकली काडी.
पम्या कळ(ला)वेकर.
जल्ल सगला काय नावातच हाय.
2 Dec 2015 - 4:03 pm | प्रमोद देर्देकर
@ स्त्रीपुरूष समानतेच्या युगात
खी s क
मग ही स्त्री पुरुष समानता इथे मिपावरच का बरे नको.
चला टाकली काडी.
पम्या कळ(ला)वेकर.
जल्ल सगला काय नावातच हाय.
2 Dec 2015 - 8:54 am | अजया
तुम्हाला फार हसू येतंय का गुरुजी? कारण कळु द्या.
2 Dec 2015 - 9:01 am | अत्रुप्त आत्मा
नसतातही प्रॅक्टीकल.......... हे त्या विधानात येत नाही..
2 Dec 2015 - 9:26 am | अजया
मग हे विधान बरोबर होईल ना? का स्त्रीविषयकबाष्कळदांभिककंपूवर्धकपाचकळविधान संघटनेत तुम्हीही सहभागी झाले आहात?
2 Dec 2015 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा
ओ...मी कुठच्याही संघटनेत सामील नस्तो.
2 Dec 2015 - 8:58 am | अभिजितमोहोळकर
हा एक महत्वाचा मुद्दा असावा असं मला वाटतं. म्हणजे आपण कुठेही (फक्त देवळातच असं नाही) अनेक चुकीच्या गोष्टी बघतो. शक्य असेल तिथे आपण वैयक्तीक बदल घडवून आणतो आणि सामुहीक स्तरावर आपलं मत नोंदवायचा प्रयत्न करतो.बरेचदा प्रवाह पतित होऊन अथवा आपल्या हातात फार काही अथवा काहीच नाही ही वस्तुस्थिती जाणवून आपण तटस्थ रहातो आणि वस्तुस्थिती स्वीकारतो.व्यक्तीनुसार त्याची संवेदनाशीलता ही वेगवेगळ्या मुद्यांबाबत वेगवेगळ्या तीव्रतेची असते.
व्यक्तीशः मला अस वाटतं की देवाचे भक्त असतात त्यातल्या अनेकांना सुद्धा हे पटत नसेल, पण त्यांच्या मनात देवाचं अणि परंपरांचं पारड जड असतं, त्यामुळे त्यांच्याकडून कृती होत नाही. ह्यात रूढीप्रिय लोक आणि देवाला शरण गेलेले लोक असावेत असा माझा अंदाज आहे. ह्यांच्या मनात देवाबद्दल कसलीही शंका नाही.त्यामुळे जे आहे ते चालू ह्या भावनेने ते वागतात. ते स्वतः ह्यात भरडले जाणारे असले तरी त्यांनी ते स्वीकारलेलं आहे.
दुसरा वर्ग म्हणजे "माझं भलं व्हावं" ह्या एकाच भावनेने देवाचा भक्त झालेला वर्ग. हा वर्ग नियमीत देवळात येतो पण त्याला बाकीच्या गोष्टींशी देणं घेणं असतच असं नाही. बरेचदा नसतच!!! हा वर्ग म्हणजे "आपल्याला काय कराय्चंय" ही भावना बाळगणारा वर्ग.
तिसरा वर्ग, जो देवाला मानतो पण त्याला हे भेदभाव सहन होत नाहीत म्हणून देवळात जाणं टाळतो. तो डोळस भक्त असतो.
चौथा वर्ग जो कायम भडकून असतो आणि मूळ भावना चांगली असली तरी ईतका टोकाची भूमिका घेतो की बाकीचे मुद्दा बरोबर असला तरी ह्या थय्थयाटाला कंटाळून वेगळे होतात आणि हा वर्ग एकटा पडतो.
शेवटी जसे भक्त तसाच देव!!! माझ्या अनुभवात मला ह्या गोष्टी जाणवल्या.
2 Dec 2015 - 9:54 am | पैसा
प्रतिसाद आवडला. प्रवाहपतित म्हणून चार लोक करतात ते बरावाईट विचार न करता चालू ठेवणारा एक मोठा वर्ग सगळीकडे असतोच.
2 Dec 2015 - 9:39 am | कंजूस
बाकी बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने ;;
नसतातही प्रॅक्टीकल.......... हे त्या विधानात येत नाही..
आयुष्यात एकदा जाम ढीगभर प्रॅक्टिकल होतात याची आयुष्यभर प्रचिती ---------ढीगभर तत्वज्ञानात रूपांतर करण्याची नामी संधी!!!!
TMC चे सभासदत्व घेतलेला -आपला नम्र वगैरे कंजूस.
( TMC : ताटाखालचे मांजर क्लब )
2 Dec 2015 - 9:43 am | अजया
:)
2 Dec 2015 - 10:25 am | इरसाल
इत्ता बडा बडा परतिसाद कैसे टाइपते रे तुम लोगां ?
2 Dec 2015 - 10:31 am | संदीप डांगे
आमच्या बायका तिकडे पोरं सांभाळता, भाकरी थापता, कामावर जाता, पैसे कमावता, कपडे धुता, आम्हाला बसल्याजागी ताट आणून देता, आम्ही कीबोर्ड बडवत असतो म्हणून त्यांच्या हाताने तोंडात घास भरवता. इतकी सगळी सोय असतांना मोठे मोठे प्रतिसाद द्यायला आणखी काय पायजेल? मोठे प्रतिसाद द्यायला अक्कल थोडीच लागते, वेळ आणि आराम असला की बास... अबी सम्ज्या...?
2 Dec 2015 - 11:56 am | तुडतुडी
@ डांगे - समाजासाठी , धर्मासाठी , देशासाठी काही करणं हि आपलीही जबाबदारी असते . आपण समाजाकडून , देशाकडून , धर्माकडून अपेक्षा करतो तेव्हा आपण त्यासाठी काय दिलं हा प्रश्न स्वताला विचारून बघा .समाजात , देशात , धर्मात सुधारणा करण्यासाठी , सुसह्य करण्यासाठी आपलं किती योगदान आहे ? फुकटात तुमचं दुख दूर करायला , तुम्हाला मान सन्मान द्यायला , तुम्हाला जवळ करायला कोणी तुमचं नोकर नसतं. कधी कधी मन विषन्न करणाऱ्या घटना घडतात म्हणून लगेच देशाला , धर्माला लाथ बीथ मारणं हा करंटेपणा आहे .
असो. लेखाच्या content चा आणि लेखाच्या शीर्षकाचा काय संबंध आहे कोणी सांगेल का ? कोण म्हंत आणि कशावरून म्हणतंय 'स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो' म्हणून ?
2 Dec 2015 - 12:03 pm | संदीप डांगे
तुडतुडी,
विषय भलतीकडे नेऊ नका. सर्व चर्चा वाचून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती
2 Dec 2015 - 12:07 pm | अभ्या..
ते . ते माहीतगार साहेब म्हणतेत. ह्या गल्लीत लास्टचे डाव्या हाताचे घर. घरावर तुकड्यातुकड्याची पृथ्वी आहे बघा. तेच. त्यांना भांडा जाऊन.
2 Dec 2015 - 12:16 pm | तुडतुडी
हे मी गुरुचरित्र , दत्त महात्म्य ह्या ग्रंथांमध्ये वाचलं आहे . गजानन महाराजांनी सुधा एके ठिकाणी असं म्हणलं आहे . आणि ह्यामागच कारण वाचण्यात आलं ते असं -
ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या शरीरात खूप हार्मोनल चेंजेस होतात . ह्या दिवसांमध्ये स्त्री शरीरामध्ये पूर्णता : रजोगुण असतो . देवाच्या जवळ जाण्यासाठी सात्विक भावाची गरज असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये देवाच्या जवळ येवू नये . मला हे कारण पटल आणि फक्त ४ दिवसांचा तर प्रश्न आहे म्हणून मी ते पाळते .पण ज्यांना पटत नाही त्यांनी पाळाव असा माझा मुळीच आग्रह नाही . इथे दुसरा प्रश्न असा आहे कि दारुडे , व्यभिचारी , संतापी , विश्वासघातकी म्हणजे तमोगुणी पुरुष मात्र देवाच्या जवळ जातात हे मात्र चालतं. अर्थात अर्धवट लोकांनी निर्माण केलेल्या प्रथा परंपरा काहीही असल्या तरी 'कर्म तशी फलं' हेच सत्य आहे .
2 Dec 2015 - 12:33 pm | पगला गजोधर
लेखक कोण ? त्यांचा विषयातला अभ्यास काय ?
संदर्भ ?
करेक्ट, गुरुचरित्र , दत्त महात्म्य च्या परंपरा सुद्धा …
2 Dec 2015 - 1:22 pm | माहितगार
क्षमा असावी हे मला माहित असू शकत नाही. 'त्या चार दिवसात हार्मोनल चेंजेसमुळे स्त्रीयांमध्ये सात्विक भावाचा अभाव असतो' याच समर्थन/दुजोरा इतर स्त्रीवर्ग, मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र करतात का ?
2 Dec 2015 - 1:27 pm | माहितगार
अजून एक (तत्वज्ञान) प्रश्न तुडतुडी म्हणतात तसे तो वेळ त्यांच्यासाठी कठीण असेल त्यावेळी त्यांचे श्रद्धास्थान अधीक जवळ असावयास आणि त्या श्रद्धेतून त्यानां फुल न फुलाची पाकळी साहाय्य व्हावयास नको का ?
2 Dec 2015 - 1:38 pm | संदीप डांगे
रजस्वला स्त्रीने धार्मिक कार्यात, म्हणजे देवाच्या जवळ जाऊ नये याचे कारण तांत्रिक विद्येत आहे. आता आठवत नाही. बघून सांगतो. तिथून ही मान्यता सगळीकडे पसरली आहे. काही विहिरींवर रजस्वला स्त्रीने पाणी आणण्यास जाऊ नये अन्यथा तिला बाधा होते असे अनुभव ऐकले आहेत. काही वाईट घटनांच्या पार्श्वभूमीवर रजस्वला स्त्रीने विवक्षित ठिकाणी वावरू नये अशा मान्यता आहेत. विटाळ होणे, गालबोट लागणे, इत्यादी वाकप्रचार रुढ आहेत. त्याबद्दल सविस्तर नंतर टंकतो. (लक्षात घ्या, ह्या समाजमान्यता आहेत, वैज्ञानिक मान्यता नाहीत.)
2 Dec 2015 - 1:47 pm | अजया
नाहीयासाठी देवाजवळ न जाणे इ शुध्द भंपकपणा आहे.
रजोगुण तमोगुण हे स्वभाव विकार आहेत.त्याबद्दल देव काय करु शकणार आहे ? दगडाला तसेही काय कळते समोर बाई आली का बुवा,तिची पाळी सुरु आहे की नाही.
यात काही तथ्य असेल तर या नाजूक काळात देव तिच्या सोबत हवा की दूर?
जी एक सरळ स्वाभाविक शारीरिक स्थिती आहे,तिची देवाचे नाव मध्ये टाकून गूढ भिती तयार करणे आहे हे.
2 Dec 2015 - 2:12 pm | इस्पिक राजा
दगडाला तसेही काय कळते समोर बाई आली का बुवा,तिची पाळी सुरु आहे की नाही.
एक मिनिट. हाच जर विचार असेल तर मग त्या दगडाची पूजा कशाला करायची? त्याच्या जवळ जायचेच कशाला? आणि मग जायचेच नसेल तर मग ही फुकाची चर्चा कशाला?
त्या पाच दिवसात बाईने देवासमोर जाउच नये असे माझे काही म्हणणे नाही. पण ते पाच दिवस काय आणि इतर दिवस काय या भावनेने जाणार असतील तर गोष्ट वेगळी. जर देव किंवा मुर्तीतला देव या संकल्पनेवरच विश्वास नसेल तर मग उगाच शोबाजी कशाला?
2 Dec 2015 - 2:22 pm | संदीप डांगे
:-)
2 Dec 2015 - 2:30 pm | माहितगार
माझ्याकडून उपस्थीत प्रश्न तत्वज्ञानाच्या अंगाने आहे. माझा संत एकनाथांचा दृष्टीकोण विषयक धागा आठवला. व्यक्तीलक्ष्य तर्कदोषचा अभ्यास वाढावयास हवा.
2 Dec 2015 - 2:38 pm | अजया
नकोच शोबाजी.हेच तर म्हणणे आहे !
2 Dec 2015 - 12:28 pm | संदीप डांगे
ह्याबद्दल काही पुरावा द्याल का?
2 Dec 2015 - 2:14 pm | प्रसाद गोडबोले
५०० करायचे ठरलेत का ?
2 Dec 2015 - 2:22 pm | माहितगार
धागालेखाचा पूर्ण आवाका कव्हर करावयाचा झाल्यास जास्तच व्हावयास हवेत, पण धागा लेखाच्या पुर्ण आवाक्याकडे अद्याप म्हणावे तसे लक्ष जात नसावे. उदाहरणार्थ हा धागा केवळ हिंदू धर्मासाठी मर्यादीत नाही, तसेच धार्मीक संस्थांच्या ट्रस्टीमंडळीत स्त्रीयांचा सहभाग वगैरे असे मुद्दे उपस्थीत करताना अद्याप तरी फारसे कुणी दिसत नाही.
2 Dec 2015 - 3:26 pm | प्रसाद गोडबोले
माहीतगार आपला धागे काढण्याचा उद्देश नेहमीच पुर्वग्रह विरहित असतो हे आम्हाला फार अवडते :)
इतर धर्मांविषयी बोलायची कोणाची टाप नाही हो इथे ! कारण इतर धर्मांवर टीका करणे चणे खाण्याइतके सोप्पे नाही !
माझा ह्या विषयाव्रर जास्त अभ्यास नाही , पण समर्थ संप्रदायात कायमच स्त्रीयांना अधिकार होते , समर्थांच्या नंतर गडाचा कारभार अक्का स्वामी ( की वेणु स्वामी ?) पहात होत्या कित्येक वर्षे ! त्यांना किर्तनाचाही अधिकार होता ! ३०० वर्षांपुर्वी बालविधवांना अधिकराचे इतके स्थान क्वचितच अन्यत्र कोठे मिळाले असावे ! आजही संस्थानच्या ट्रस्टींमधे कोणीतरी महिला आहेतच ( नाव आठवत नाही , शोधुन पहावे लागेल.)
2 Dec 2015 - 3:35 pm | बॅटमॅन
हो, पण रामदासी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय नाहीये हिंदू धर्मात. हजारो संप्रदाय आहेत. पैकी मुख्यमुख्य संप्रदायांची यादी करून पाहिले पाहिजे. शिवाय रामदासी संप्रदायाचीच सध्याची स्थिती काय आहे या बाबतीत तेही पाहिले पाहिजे.
2 Dec 2015 - 3:42 pm | प्रसाद गोडबोले
हो ना म्हणुन तर म्हणले की माझा ह्या विषयाव्रर जास्त अभ्यास नाही.
बाकी कोणत्याही अध्यात्मिक संस्थानच्या कमीटीवर किमान ३३% स्त्रीया असाव्यात हे आमचे वैयक्तिक मत आहे , बायकांचे इन जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट पुरुषांपेक्षा जास्त चांगले असते असा आमचा अपला एक पुर्वग्रह आहे !
तर ते असो .
अवांतर : आमच्या आवडत्या राधे मा बरेच दिवस न्युज मधे नसल्याने आमचा जीव वर खाली होत आहे
2 Dec 2015 - 3:56 pm | पगला गजोधर
2 Dec 2015 - 4:04 pm | टवाळ कार्टा
खिक्क...तुम्ही खास भक्त झालात तर कडेवर उचलून नाचायलापण मिळेल :)
2 Dec 2015 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले
हाय ... क्युं जले पे नमक छिडकते हो गजोधर भैय्या ....
2 Dec 2015 - 4:09 pm | टवाळ कार्टा
आम्ही तर सन्नीबै कधी अध्यात्म जॉईन करतात त्याची वाट बघ्तोय :)
2 Dec 2015 - 4:14 pm | बॅटमॅन
आमचे मते तर त्या अध्यात्मिकच आहेत- महाभारतातला धर्मव्याध अठवावा. त्याजपेक्षा सन्नीताई आजिबात कमी नाहीत. आपले काम इमानेइतबारे करतात.
2 Dec 2015 - 4:15 pm | प्रसाद गोडबोले
अगदी हेच म्हणायला आलो होतो !
2 Dec 2015 - 4:21 pm | माहितगार
@ट.का. ह्रुदयातून उपाशी आहात ? त्यान्ले ह्रुदयात ठेवा आणि कुठे शोधीसी हे आध्यात्मिक गीत गा म्हणजे सन्नीबैंनी अध्यात्म (प्रत्यक्षात) जॉइन नै केले तरीही तसा सा़क्षात्कार तुम्हाला (तुमच्या ह्रुदयास) होऊ शकतो :), पहा प्रयत्न करून !
2 Dec 2015 - 4:47 pm | पगला गजोधर
2 Dec 2015 - 4:49 pm | टवाळ कार्टा
हे अध्यात्माचे मुक्तीधाम ;)
2 Dec 2015 - 5:25 pm | पगला गजोधर
जेव्हा तुम्ही तुमच्या, इच्छा/आकांक्षा/भावन/वासना रुपी लंगोट-आदी वस्त्रे त्याग करून, तुमच्या मनरुपी पोपटाला
स्वैरपणे, भूमीरुपी आत्मा व सागररुपी परमात्मा चे जिथे मिलन होते अश्या, बीच(समुद्रकिनारा) रुपी धामात बागडू देतात, तेव्हा आलेल्या उत्कट अनुभूतीलाच मुक्ती म्हणतात. म्हनुन ''अध्यात्माचे मुक्तीधाम''
2 Dec 2015 - 7:35 pm | टवाळ कार्टा
खिक्क
2 Dec 2015 - 4:11 pm | माहितगार
राधेमा (सु.कौर पंजाब) वरच्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भाने असलेल्या आक्षेपां संदर्भात सुयोग्य भूमिका निश्चित घेतली जावयास हवी.
अर्थात त्यांच्या पाश्चात्य पोषाखाला हायलाइट करण्यातला पॉईंट तार्कीक उणीवेचा नाहीना याची साशंकता वाटते.
2 Dec 2015 - 2:32 pm | नाखु
हे वाक्य वापरण्याची परवानगी द्यावी ही विनंती..
2 Dec 2015 - 2:58 pm | अजया
:)
2 Dec 2015 - 3:18 pm | त्रिवेणी
कालपासुन सगळ्या चर्चा वाचून काढल्या. मुळात शनि काय मारुती काय आणि स्त्रिया आणि त्तत्वdnyan हा विषय zeplach नाही.
फ़क्त एक सांगावेसे वाटते प्रत्येक वेळी अनाहिता आणि मीपा असा वाद घातलाच पाहिजे का?आपण सर्व एकच आहोत ना.
जसे घरात आपण वागतो तसे नाही का वागू शकत. घरात असताना ही आपण नेहमीच सगल्या गोष्टी घरातील प्रत्येक सदस्य बरोबर नाही शेयर करत. आई-मुलगी, सासु-सुन, नवरा-बायको असे वेगवेगळे नाती असतात आणि त्यातील शेयरिंग ही वेगळे असते. तसेच थोड्याफार प्रमाणात इथे ही झालेय म्हणून अनाहिता वेगळे आहे असे नाही. सो आपण नको असे एकमेकना बोलायला. सगळे लोक्स् मस्त राहू या ना.
कोणी हे वाचून दुखावल्यास क्षमा असावी.
2 Dec 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा
मग जर घरात अनाहितांचा गाभारा असण्याला आम्ची ना नाही तर मग पुरुषांसाठी वेगळी गच्ची असण्याला अनाहितांकडूनच विरोध का होतो?
2 Dec 2015 - 3:54 pm | माहितगार
ट.का. त्यांनी सामोपचार दाखवलायना, धाग्यावरचं आवांतर आणखी किती ताणणार ? :)
2 Dec 2015 - 3:58 pm | टवाळ कार्टा
तुम्हाला गच्ची नक्कोय का?
असोच्च
2 Dec 2015 - 3:58 pm | टवाळ कार्टा
तुम्हाला गच्ची नक्कोय का?
असोच्च
2 Dec 2015 - 3:57 pm | बॅटमॅन
पॉइंट बरोबरच आहे. त्याला खिजवण्याच्या सुरात असे उत्तर देण्यात आले होते की तुम्हीही करा नीलकांतला रिक्वेस्ट वगैरे. सूर होता की जणू पुरुषांनी असे कै करणे म्ह. अब्रह्मण्यम् आहे.
2 Dec 2015 - 4:01 pm | टवाळ कार्टा
आपण प्रॅक्टिकल नस्तो रे ;)
2 Dec 2015 - 4:12 pm | बॅटमॅन
हो ना. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा अल्टिमेट प्रॅक्टिकलपणा अन्य कुठे सापडणार? तो नै जमत ही खरीच शरमेची गोष्ट म्हणायची. =))
2 Dec 2015 - 4:13 pm | पिलीयन रायडर
एक मिनिट हं...
कुठलाही एक प्रतिसाद दाखवा जिथे कोणत्याही स्त्री सदस्याने पुरुषांच्या विभागाबद्दल कोणतेही मतप्रदर्शन केले आहे. माझ्या आठवणी प्रमाणे "पुरुषांच्या विभागा बद्दल अनाहिताचे कोणतेही मतच नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नीलकांतशी बोला." असाच नेहमी प्रतिसाद दिसला आहे.
आता हे एक नॉर्मल वाक्य आहे. ह्यात सुर तुम्हीच शोधु जाणे. पुरुषांचा विभाग असणे ही गोष्ट अब्रह्मण्यम् आहे असा जो नसलेला सुर तुम्ही पकडलाय, तो बाय द वे फार हास्यास्पद आहे. ह्यात "अब्रह्मण्यम्" नक्की काय आहे ह्याचा बराच विचार केला. काही सुचले नाही.
असा बंदिस्त विभाग पुरुषांचा नसावा असं मत कुठेही अनाहितातल्या कुणी मांडले असेल तर नक्की दाखवा. माहितीत भर पडेल.
बाकी मुळ धागा.. मस्त चर्चा... चालु द्या!
2 Dec 2015 - 4:18 pm | टवाळ कार्टा
जेपीला बोल्वा रे कुणीतरी....खफवर एकदिवसीय आंदोलन झालेले....जेपी, पम्या, माप, खटपट्या, ब्यॅट्यॅ, मी असे सगळे होतो....त्यादिवशी जवळपास प्रत्येक अनाहिता..."आंदोलन कर्ताहेत...करूदे...वेगळा विभाग मिळ्णारै थोडीच" अश्या टैपच्या खौचट्ट कमेंटी करत होत्या
2 Dec 2015 - 4:25 pm | पिलीयन रायडर
अच्छा.. ख.फ.. सॉरी.. मी तिकडे फारशी नसते. पण तरीही कुणी काही बोललं तर प्रत्येकाचं इंटरप्रिटिशन वेगळं असु शकतंच. साधी वाक्य तुम्हाला खवचट आणि अजुन काय काय वाटतात.
नीलकांत शिवाय इतर कुणीही हा विभाग असु शकतो की नाही ह्यावर निर्णय घेऊ शकत नाही. असे असताना इतर कुणीही "विभाग मिळणार नाहीच" असं कशाला म्हणेल? आता खरंच कुणी ह्याच शब्दात बोललं की तुम्ही रिडींग बिट्वीन दी लाईन्स करुन तसा अर्थ लावलात हे परमेश्वर जाणे..
पुरुषांच्या विभागाविषयी अनाहितांचे विरोधी मत असण्याचे कारण नाही असा माझा समज आहे. तुम्ही सुद्धा ह्या मुद्द्यावर गैरसमज पसरवले नाहीत तर बरं राहील. तुम्ही तशी मागणी केलीत आणि त्यावर कुणी अधिकृत आक्षेप नोंदवला तर बोलता येईल. ख.फ वरच्या चेष्टेतल्या गप्पांना कृपया एका संपुर्ण गटाचे मत समजु नये.
बाकी ह्या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद, संपादक मंडळ अस्तित्वात नसताना हमखास वाद होतील अशा विषयांवर चर्चा टाळलेल्या बर्या.
धन्यवाद!
2 Dec 2015 - 4:29 pm | टवाळ कार्टा
ठिकै...जे खफवर अस्तात त्यांना येउदे प्रतिवाद करायला...माझा प्रतिसादसुध्धा तुम्च्यासाठी नव्ह्ताच.... :)
2 Dec 2015 - 4:36 pm | बॅटमॅन
हेच इतरांनी म्हटलं की लगेच कंपू घेऊन तुटून पडतात लोक्स.
बाकी अधिकृत, अनधिकृत वगैरे शब्द वापरलेले पाहून हहपुवा झाली. इतकं सीरियसलि घ्यायचं असतं का त्या कोनाड्याला? =))
2 Dec 2015 - 9:50 pm | सायकलस्वार
हेच इतरांनी म्हटलं की लगेच कंपू घेऊन तुटून पडतात लोक्स.>>>
बायकांचं ते नैरागस्य आणि पुरुषांचा तो खवचटपणा.
मी एक वाक्य गंमतीत काय लिहिलं आणि ताईसमाज माझं मर्तिक काढायला निघाला. तेव्हा कुठे गेला होता राधे तुझा सैल अंबाडा!
(काहीतरी चुकलं वाटतं)
2 Dec 2015 - 4:28 pm | प्रमोद देर्देकर
हो बरोबर आहे टक्या आणि ते सुध्दा चारोळ्यांची बरसात करुन सांगत होत्या. तिकडे कोण तो सु.खो. की तो चं.गो. त्याला उचक्या लागल्या असणार.
2 Dec 2015 - 4:33 pm | टवाळ कार्टा
तर तर....चिरडले गेले आंदोलन, जेपी भूमिगत झालेला नंतर :)
2 Dec 2015 - 4:28 pm | पिलीयन रायडर
अनाहिता हे एका संपुर्ण गटाचे नाव आहे आणि अनाहितातर्फे असा आक्षेप कधीही घेण्यात आलेला नाही.
इथल्या सर्व स्त्री सदस्या आधी मिपाकर आहेत आणि मग (त्यातला काहीच) अनाहिता. त्यामुळे कुणी एकीने मत दिले तर ते संपुर्ण अनाहिताचे मत होत नाही.
धन्यवाद!
2 Dec 2015 - 4:31 pm | टवाळ कार्टा
तुम्ची गल्ली चुक्ली....पॉलिटिक्स मध्ये नाव काढाल =))
2 Dec 2015 - 4:33 pm | प्रसाद१९७१
वेगळी गच्ची वगैरे नको हो. स्त्रीया नसतील तर आयुष्याला काय अर्थ आहे हो, अगदी जालावरच्या आभासी सुद्धा!
2 Dec 2015 - 4:34 pm | टवाळ कार्टा
संन्यास नै घ्यायचाय ओ :)
2 Dec 2015 - 4:40 pm | बॅटमॅन
ते सगळं ठीके पण विनोदबुद्धी आणि खेळकरपणा व मॅच्युरिटी यांना दडपून संसदीय शब्दांआड आपला पूर्वग्रह झाकणार्या कंपूबाजांपासून एखादा कोनाडा असावा वाटणे यात कै चूक वाटत नाय बा मला तरी.
2 Dec 2015 - 5:06 pm | प्रसाद१९७१
ठ्ठो...
एकाच वाक्यात काय स्फोटक मिश्रण भरले आहे.
2 Dec 2015 - 3:59 pm | त्रिवेणी
पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले असेल तर मला तरी खरच कल्पना नाही.
2 Dec 2015 - 4:02 pm | टवाळ कार्टा
फारच सालस बुआ तुम्ही :)
प्यारी यु २
2 Dec 2015 - 7:42 pm | त्रिवेणी
नाही मी सालस् नाहीय.पण उगाच एकमेकना कमी लेखणाऱ्या चर्चा नकोत आणि खरच माहित नव्हते म्हणून लिहिले.
2 Dec 2015 - 7:44 pm | टवाळ कार्टा
मी वैयक्तीक कधीच लिहित नाही...तस्मात हकूना मटाटा :)
2 Dec 2015 - 4:00 pm | त्रिवेणी
पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले असेल तर मला तरी खरच कल्पना नाही.
2 Dec 2015 - 4:01 pm | त्रिवेणी
पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले असेल तर मला तरी खरच कल्पना नाही.
2 Dec 2015 - 4:03 pm | कंजूस
स्त्रिया आणि तत्वज्ञान या दोन विकेटमध्ये बोलिंग चालू ठेवा.
आपलं गल्ली क्रिकेट एकटप्पी कॅच आउट,पलिकडच्या कंपाउंडमध्ये सिक्सर मिळणार नाही हे नियम लावून दुसरीकडे खेळूया टकाटका.
2 Dec 2015 - 4:05 pm | टवाळ कार्टा
खिक्क....TKM क्लब असे ल्हिआयचे ह्रैले कै :)
2 Dec 2015 - 4:30 pm | माहितगार
प्रगोंनी एक चांगला प्रतिसाद वर दिला पण त्यांच्याच तळटिपेने अंशतः अवांतर (विषयांतर नव्हे:)) झाले म्हणून त्यांच्या प्रतिसादाचा धागालेखास उल्लेखनीय भाग पुन्हा उधृत करत आहोत.
2 Dec 2015 - 4:33 pm | टवाळ कार्टा
+१११११११
2 Dec 2015 - 4:35 pm | नाखु
बाडीस
भवसागर तरत असलेला..
2 Dec 2015 - 5:41 pm | प्रसाद गोडबोले
येस .
टीम ए: ३३% अॅग्रेसीव्ह मार्केटींग आणि सेल्स अर्थात अध्यात्माचा , संप्रदायाचा प्रचार करणारी फळी
टीम बी: ३३% प्रॉडक्ट डिलीव्हरी अर्थात संप्रदायाचे प्रोडक्ट अर्थात अध्यात्मिक ज्ञान , साहित्यप्रकाशन करणारी फळी
टीम सी: ३३% जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट अथात संप्रदाय कसा चालु राहिल ह्याची काळजी घेणारी फळी !
स्त्रीयांनी बहुतांश करुन टीम ए आणि टीम सी मधे जागा घ्यावी .
आता उदाहरणार्थ पाहु : जर शनीमंदिराच्या कमीटीवर टीम सी मध्ये सस्टेनस्न प्लॅनिंग मध्ये कोणी स्त्री असती तर तिने नक्कीच हा इश्शु इतका मोठ्ठा होवु दिला नसता , कारण ह्या विषयाने संप्रदायाच्या अस्तित्वालाच धक्का बसु शकतो .
दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या रामदेव बाबांचे संस्थान : तुर्त्आस फक्त बाबा आणि त्यांचा एक शिष्य हे दोघेच तिन्ही टीम सांभाळत आहेत , पण ह्यामुळे बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट च्या नावाने बोंब आहे , उद्या रामदेव बाबांच्या नंतर संस्थान कसे चालु रहाणार ? महाराष्ट्रातील स्वाध्याय संप्रदाय म्हणा किंव्वा वामनराव पैंचा संप्रदाय म्हणा , किंव्वा आमच्या आवडत्या ओशोचा संप्रदाय म्हणा मुख्य नेत्याच्या निधनानंतर जवळपास नामशेषच झालेले दिसतात ( असे आमचे वैयक्तिक मत आहे ) . हेच जर स्त्रीयांना कमीटीवर स्थान दिले असते तर त्यांनी नक्कीच काहीतरी सस्टेनन्स प्लॅनिंग केले असते ! आज गेली ६००-७०० वर्ष वारकरी संप्रदाय टिकुन आहे कारण त्यात बॅकएन्ड्ला टीम सी मधे नक्कीच स्त्रीयांना मोठ्ठे स्थान आहे ! डोक्यावर तुळशीचे रोप घेवुन पंढरीला जाणारी स्त्री , किंव्वा वेळप्रसंगी वारकर्यांना कांदा भाकरी थापुन देणारी स्त्री ही हातात टाळ म्रूदुंग घेवुन किर्तन करणार्या बुवां इतकीच संप्रदायाच्या टिकुन रहाण्याला आधारभुत आहे :)
2 Dec 2015 - 7:35 pm | टवाळ कार्टा
सहमत
2 Dec 2015 - 4:36 pm | प्रमोद देर्देकर
आजपर्यंतचा माहितगारांचा पहिलाच द्विशतकी / की पंचशतकी धागा.
2 Dec 2015 - 4:40 pm | माहितगार
त्यातल अर्धशतकं मिपा गाभारा व्हर्सेस गच्ची चर्चेत गेलंना पण म्हणुन पंचशतकीची आवश्यकता आहे. :)
2 Dec 2015 - 5:00 pm | अजया
गच्ची गच्ची वाचून बटाट्याची चाळ आठवते आहे.टका बॅट्या गच्चीसह झालीच पाहिजे म्हणून मेंढे पाटलांकडे धरणे धरायला निघाले आहेत ;)
2 Dec 2015 - 5:05 pm | बॅटमॅन
आक्रंदून, स्फुंदून मिपाचे माजघर करू पाहणार्यांनी इतरांच्या धरणे धरण्याच्या गोष्टी कराव्या हे बाकी रोचक आहे.
2 Dec 2015 - 5:09 pm | माहितगार
ब्याटमनराव हा धागा स्त्रीसमानते बाबत आहे हो ! पुरुष समानतेसाठी वेगळा धागा लेख आता लिवाच !!
2 Dec 2015 - 5:19 pm | सस्नेह
पयले तुम अपना धागा का विषय नक्की करो बाबा !
स्त्री-समानता, पुरुष-समानता का स्त्री-परुष समानता ?