एक चायनीज अमेरिकन तरुण ऑनलाईन मराठी शिकून किती छान मराठी बोलू शकतो ते पहा या यूट्यूब व्हिडिओ मध्ये.
Matthew - a Chinese American- speaks Marathi Fluently : Success story of Learn Marathi
माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून त्याला मराठी शिकवण्यात मी मदत करू शकलो याचा मला आनंद आहे.
व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास जरूर शेअर करा. जेणेकरून इतरांना हे जाणवेल की कुठल्याही प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय ऑनलाईन मराठी शिकणं थोडं कठीण वाटलं तरी अशक्य नक्की नाही. आणि या मुलापेक्षा महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला , भारतात इतरत्र राहणाऱ्या व्यक्तीला , भारतीय वंशाच्या अनिवासी व्यक्तीला तर बऱ्याच जास्त संधी आहेत - मराठी वाचायच्या/लिहायच्या/सराव करायच्या. त्यामुळे त्यांना मराठी शिकणं अजून सोपं आहे .
या चायनीज अमेरिकन तरूणाचा माझ्या ब्लॉगबद्दलचा अभिप्राय इथे वाचू शकता.
Detailed Testimonial from Matthew Chang
अजून बऱ्याच जणांना माझा ब्लॉग आणि यूट्यूब व्हिडिओज मराठी शिकण्यासाठी उपयुक्त वाटले. आशांचे काही अभिप्राय इथे वाचू शकता
Success stories of learning Marathi ... Testimonials
प्रतिक्रिया
28 Nov 2015 - 4:54 pm | ज्ञानोबाचे पैजार
मॅथ्यु आणि तुम्ही दोघांचेही अभिनंदन
पैजारबुवा,
28 Nov 2015 - 9:25 pm | कौशिक लेले
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर.
30 Nov 2015 - 4:52 pm | सूड
सुंदर, मराठी शिकवायला काही मदत हवी असल्यास जरुर कळवा.
28 Nov 2015 - 4:58 pm | कविता१९७८
कौतुकास्पद
28 Nov 2015 - 9:25 pm | कौशिक लेले
हो. त्याचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत.
28 Nov 2015 - 5:00 pm | पद्माक्षी
अभिनंदन !!
28 Nov 2015 - 9:26 pm | कौशिक लेले
धन्यवाद ! तुमचे अभिनंदन कळवतो माथ्युला
28 Nov 2015 - 5:50 pm | पद्मावति
मस्तं!
मॅथ्युचं प्रचंड कौतुक. मराठी आणि हिंदीसुद्धा बोलतोय हा मुलगा.
तुमचं मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. खूप छान काम करताय.
28 Nov 2015 - 9:27 pm | कौशिक लेले
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर.
28 Nov 2015 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
मॅथ्यु आणि तुमचे हार्दीक अभिनंदन !
तुमचे काम अत्यंत स्पृहणिय आहे यात संशय नाही !
28 Nov 2015 - 9:27 pm | कौशिक लेले
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर / तुमच्या मित्रपरिवारात.
28 Nov 2015 - 7:03 pm | यशोधरा
दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
28 Nov 2015 - 9:27 pm | कौशिक लेले
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर / तुमच्या मित्रपरिवारात.
28 Nov 2015 - 7:25 pm | मांत्रिक
अभिनंदन तुम्हा दोघांचे!
28 Nov 2015 - 10:40 pm | कौशिक लेले
खूप आभार !! आपल्या सर्वांचं कौतुक मी त्याच्या पर्यंत पोचवीन
28 Nov 2015 - 8:06 pm | रेवती
कौशिक लेले, आपले अभिनंदन.
मॅथ्यूचेही अभिनंदन. त्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
28 Nov 2015 - 10:41 pm | कौशिक लेले
खूप आभार !! आपल्या सर्वांचं कौतुक मी त्याच्या पर्यंत पोचवीन
28 Nov 2015 - 8:08 pm | बोका-ए-आझम
मॅथ्यूचं आणि तुमचं अभिनंदन. त्याचं मराठी डोळे मिटून ऐकलं तर कुणी परदेशी बोलतोय असं वाटतच नाहीये! मस्तच!
28 Nov 2015 - 9:30 pm | कौशिक लेले
अगदी बरोबर. खूप आभारी आहे.
28 Nov 2015 - 8:27 pm | मास्टरमाईन्ड
अभिनंदन.
मॅथ्यूचं तर आहेच पण तुमचं १०००००००००++ जास्त.
तुमची शिकवण्याची पद्धत खरंच ग्रेट आहे. तुमच्या विद्यार्थ्याच्या बोलण्यातून जाणवतंय.
कौतुकास्पद.
_/\_
28 Nov 2015 - 10:39 pm | कौशिक लेले
धन्यवाद. शिष्याचे प्रयत्न, सातत्य आणि व्याकरणाचा बारकाईने अभ्यासाला मनापासून दाद.
28 Nov 2015 - 8:42 pm | चतुरंग
इतर भाषिकांना मराठी शिकवणे हा मराठीच्या प्रसाराचा आणि जतनाचा फारच उत्तम मार्ग आहे.
तुमचे आणि मॅथ्यूचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत! :)
28 Nov 2015 - 10:38 pm | कौशिक लेले
खूप खूप आभार ..तुमची कोणी अमराठी मित्रमंडळी असतील तर त्यांना सांगा ब्लॉगबद्दल
28 Nov 2015 - 9:02 pm | अजया
मान गये उस्ताद! आपको और शिष्यको भी!
28 Nov 2015 - 9:29 pm | कौशिक लेले
धन्यवाद. हो शिष्याचे प्रयत्न, सातत्य आणि व्याकरणाचा बारकाईने अभ्यासाला मनापासून दाद.
28 Nov 2015 - 10:08 pm | पिंगू
लेले, एक नंबर.
28 Nov 2015 - 10:38 pm | कौशिक लेले
धन्यवाद !!
28 Nov 2015 - 10:13 pm | बॅटमॅन
नमस्कार लेले सर,
एक नंबर भारी वाटलं राव वाचून. आपला ब्लॉग असाच उत्तरोत्तर अनेक लोकांपर्यंत पोहोचावा ही शुभेच्छा.
28 Nov 2015 - 10:37 pm | कौशिक लेले
खूप खूप आभार ..तुमची कोणी अमराठी मित्रमंडळी असतील तर त्यांना सांगा ब्लॉगबद्दल
28 Nov 2015 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते
आईशप्पथ!
त्याला इथे मिपावर आणता येईल का?
28 Nov 2015 - 10:38 pm | कौशिक लेले
मिपा त्याच्यासाठी अजूनही खूप कठीण पडेल. पण मी त्याला सांगेन मिपा ला भेट द्यायला
28 Nov 2015 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते
हरकत नाही. आम्ही घेऊ सांभाळून. पण प्लीज आणाच त्याला.
29 Nov 2015 - 3:37 am | अरुण मनोहर
कौशिक,
तुम्ही एक अभिमानाचे काम करत आहात!
खूप अभिनंदन! असे आणखी लोक मराठी शिकायला पुढे आले तर मराठी सगळीकडे ऐकायला येईल.
इथे सिंगापूरला मी देखील एका चायनीज तरुणाला गेले एक वर्ष मराठी शिकवत आहे.
29 Nov 2015 - 10:40 am | कौशिक लेले
ग्रेट !! तुम्ही आणि तुमचा विद्यार्थी "Learn Marathi" या फेसबुक ग्रूप वर याल का ? तुमची शिकवण्याची पद्धत त्याची सरावाची पद्धत या बद्दल इतरांना सांगा. इतर नवशिक्यांना याचा फायदा होईल.
त्याचं बघून बाकीच्यांनाही अजून प्रेरणा मिळेल. तुम्ही शिकणार्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन अनेकांना मदत करू शकता.
जरूर दोघं या
https://www.facebook.com/groups/learnmarathi.wid.bk
- कौशिक
30 Nov 2015 - 1:30 pm | दिपक.कुवेत
जय मराठी....जय शीवाजी!!
30 Nov 2015 - 2:15 pm | कौशिक लेले
कुवेतमध्ये कोणी अनिवासी भारतीय किंवा त्यांचे परिचित मराठी/गुजराती शिकू इच्छित असतील तर माझ्या ब्लॉगबद्दल त्यांना सांगाल का !
30 Nov 2015 - 4:43 pm | प्रसाद१९७१
त्या आधी त्याची कातडी गेंड्याची करायला विसरू नका. :-)
9 Jan 2016 - 4:17 pm | वैभव पंडित
Matthew me ghetleli mehnat kharokharich kautukaspad aahe. Matthew aani Kaushik: Tumha doghanche abhinandan.