सुप्रिया आणि नाडी ग्रंथांविषयी उत्सुकता असणाऱ्यांसाठी,
आपण नाड़ीभविष्य पाहिलेत आणि विषय काढलात म्हणून या बाबत लिहितो.
आपल्याला सारख्या अनेकांना संशय येतो की आपणाकडून माहिती काढून तीच आपणाला प्राचीन ताडपट्टीतून सांगत असल्याचा बहाणा करण्यात येतो. हा आक्षेप नेहमीच घेतला जातो. त्यावर उत्तरही अनेकदा दिले गेले आहे. तरीही पुन्हा देतो. या आक्षेपामधेच त्याचे उत्तर लपलेले आहे. ते असे की -
आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच माहिती नाडी शास्त्री आपणाला सांगतो. याचा अर्थ आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन तेच भविष्य म्हणून तो आपल्याला सांगतो.
जेंव्हा आपण म्हणतो की तीच माहिती तो परत सांगतो.
म्हणजे ती माहिती तो परत उगाळतो.
मग सत्यता काय आहे?
सत्यतेत तो ती नाडी ग्रंथांच्या ताडपट्टीतील मजकूर वाचून दाखवत असतो. जेंव्हा आपणांस तो पट्टी वाचून त्या पट्टीच्या अनुशंगाने विचारतो की तुला दोन भाऊ व एक बहीण आहेत का? आपण हो किंवा नाही म्हणतो. त्यामुळे आपणाला असे वाटते की आपल्याला प्रश्न विचारून उत्तरे मिळवली जात आहेत. वस्तुतः त्याची विचारणा अशी असते की आत्ता माझ्या हातात असलेल्या पट्टीतील वर्णनाच्या व्यक्तीला दोन भाऊ व एक बहीण आहे तसे तुमचे आहे का? असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा.
नाही म्हणाला तर ती पट्टी खाली ढकलून पुढची वाचून त्या पट्टीतील मजकुराच्या अनुशंगाने प्रश्न विचारले जातात. त्यावेळी तो कधी भावाबहिणांचा उल्लेख सोडून अन्य विचारणा करतो. असे करत करत एका पट्टीतील मजकूर तो इतका तंतोतंत येतो पण प्रथम पहाणाऱ्याला त्याचा अर्थ तो त्या विवक्षित नाडीपट्टीत पहाण्याचे सोंगकरून आपणाकडून काढलेली माहिती परत आपणांस सांगतो असे वाटत राहते.
आपणांस हे मान्य होईल की त्याने सांगितलेली माहिती मौखिक असल्याने ती सांगता क्षणी हवेत विरुन जाईल. म्हणजेच त्याची शहानिशा करता येईल असा पुरावा राहणार नाही. पण जर ती माहिती नाडी ग्रंथाच्या पट्टीतून सांगितली नव्हे वाचली जात असेल तर तो लेखी पडताळा येईल असा पुरावा म्हणून मिळवता येईल. तो पुन्हा-पुन्हा तपासायला येणे ही शक्य आहे. त्यामुळे ज्या एका नाडीवाचकाने प्रश्न विचारून त्या विवक्षित नाडी पट्टीचा शोध घेतला त्याच्या ऐवजी तीच नाडी पट्टी जर एका अशा अन्य वाचकाने वाचली की ज्याचा आधीच्या नाडीवाचकाने मिळवलेल्या माहितीशी अजिबात संपर्क नव्हता तर त्या नाडीवाचकाला त्यातून एक तर काहीच मजकूर वाचता येऊ नये कारण नाडीपट्टीत काहीच मजकूर नसतो असा काहींचा दावा असतो. किंवा मजकूर वाचता आला तरी त्याने ग्राहकाला प्रश्न विचारून काढलेली माहितीशी संपर्क नसल्याने त्याला तीच माहिती सांगता येणे कदापिही शक्य नाही. तसेच एकाच नाडी पट्टीचे वाचन दोन किंवा अनेक त्याच किंवा वेगवेगळ्या नाडी केंद्रातील नाडीवाचकांनी केले तर ते एकदम वेगवेगळे यायला हवे. पण ते तसे होत नाही. ते एकच येते!
याचा प्रत्यय असाही घेता येतो की मोठया नाडी केंद्रातून कामाच्या वाटणीमुळे नाडी पट्टीचा शोध एक नाडीवाचक घेतो तर दुसरा त्याच ताडपट्टीतील मजकूर ४० पानी वहीत लिहून काढतो. तर तिसरा वहीतील मजकूर वाचून त्याचे भाषांतर टेपकरून कॅसेटमधे रुपांतर करायला बसतो.
त्यामुळे अशा प्रकारची चाचणी आपण ठरवून न मागताच, आपूसूक होताना आपणांस प्रत्यक्ष डोळ्यानी पहायला मिळते. नाडी केंद्राच्या प्रथेप्रमाणे ग्राहकाने त्याच्या माहितीशी तंतोतंत जुळत असल्याचे मान्य केल्यावर नाडी शास्त्रीं त्या विवक्षित नाडपट्टीतील कूट तमिळ मधील मजकूर ग्राहकाला जरी तमिळ येत नसेल तरी सध्याच्या तमिळभाषेतून एका ४० पानी वहीत लिहून दिला जातो. त्याशिवाय त्याला ४० पानी वहीतील मजकूर वाचून त्याचे त्याला हव्या त्या भाषेत रुपांतर करून त्याच्या भविष्याची कॅसेट- टेप व काही केंद्रांतून सीडी त्याच्या सुपुर्त करतात हे आपण अनुभवले असेल.
आता असे पहा की जर आपल्याकडून विचारुन काढलेली माहिती जर त्याच पट्टीचे दुसऱ्या नाडीवाचका कडून वाचून घेतली आणि जर तीच माहिती त्याने त्यापट्टीतून वाचून दाखवली तर या आक्षेपातील हवा निघून जाते. त्यामुळे शेवटी ज्या पट्टीत आपण हो-हो म्हणून सांगितलेला मजकूर खरोखरचा कोरलेला असतो का? हे तपासणे अत्यंत महत्वाचे होते. अशी तपासणी सामान्यांना, विशेषतः तमिळेतरांना सहज शक्य होत नाही म्हणून आपल्या सारख्या मराठी लोकांचा संशय आधिक बळावतो.
नाडी ग्रंथ विरोधात प्रचार करणाऱ्या लोकांनी नाडी पट्यातील तमिळ मजकुराची तशी तपासणी करावी व त्यांचा पुरावा लोकांपुढे ठेवावा.
आम्ही तशी पट्टयातील मजकुराची तपासणी करणार नाही कारण तशी करण्याची गरज आम्हाला नाही, कारण आम्ही फक्त तर्कानेच नाडी भविष्य थोतांड मानतो असे म्हणणाऱ्यांशी चर्चा करून काय उपयोग.
मी असे शोध कार्य स्वतंत्ररित्या केलेले आहे. नाडीपट्ट्यांचे फोटो काढून, स्कॅनिग करून त्यांचा अभ्यास नाडी केंद्रांशी संबंध नसलेल्या व तमिळभाषातज्ञ व्यक्तींकडून वेळोवेळी करून घेऊन मग माझी खात्री झाल्यावर की त्या ताडपट्ट्यात खरोखरच भविष्यकथनाचा मजकूर असतो. मी माझे मत मांडत आलो आहे. याच ठिकाणी मी त्याचा पुरावा म्हणून दोन वेगवेगळ्या नाडी ग्रंथाच्या पट्यातील एका विवक्षित नावाचा पुरावा सादरही केला आहे. तो अध्यापही कोणा तमिळेतर किंवा तमिळतज्ञांनी खोडून काढलेला नाही.
आपण ही असा पुरावा गोळा करु शकता व आपले मत स्वतंत्रपणे मांडू शकता.
वर म्हटल्या प्रमाणे या आक्षेपातच त्याचे उत्तर लपलेले आहे. नाडी शास्त्री भविष्य सांगत नसून ताडपट्टीतील मजकूर वाचून दाखवत असतो. तो इतका तंतोतंत जुळणारा असतो की त्यामुळे आपला संशय बळावतो इतकेच.
शिवाय जर एखाद्याला फसवायचे असेल तर तो ग्राहकाच्या हातात असा कुठलाच पुरावा हाती लागू देणार नाही की त्यामुळे तो पकडला जाईल. पण नाडी ग्रंथांच्या बाबत नेमके उलटे आहे. आपणांस वहीच्या रुपाने पुरावा आपल्याला टेपसकट आवर्जू्न दिला जातो.
त्याची शहानिशा करणे आपल्या हातात आहे.
त्य़ामुळे हा मजकूर जर खोटारडेपणा न करता खरोखरच नाडी ग्रंथातून येत असेल तर त्याची उत्पत्ती मानवी बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरील असली पाहिजे असे म्हणणे प्राप्त होते. पर्यायाने अतींद्रिय शक्तींतून ती माहिती झाली असली पाहिजे असे नाइलाजाने मान्य करावे लागते.
बुद्धिवाद्यांचा मग "वैचारिक पायाच कोसळतो" म्हणून त्यांना ते तत्वतः मान्य करणे शक्य होत नाही. मग त्यांना काहीना काही सबबीसांगून नाडी पट्टयांची शहानिशा करण्याचे टाळावे लागते.
अशा फक्त गणिताने वा तर्काने नाडी ग्रंथांना थोतांड सिध्द करु पहाणाऱ्यांशी चर्चा करून उपयोग नाही.
प्रतिक्रिया
22 Dec 2008 - 1:16 am | टारझन
झबरा लिहीलंय !! वरिल कोट आवडली !! आपल्या चिकाटीला येथे एकच व्यक्ती आहे जो आव्हाण देतोय !!
जोडे पडणार हे माहीत असून लिहीत रहाणार्या दोण्ही व्यक्तींना मुजरा !!!
- डॉ.टारझन णाडकर्णी (फैमिली डौक्टर)
(आम्ही आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच्यावरून रोगाचे निदान सांगतो, याचा अर्थ आपण सांगितलेली सर्व माहीती लक्षात ठेऊन तेच निदाण म्हणून मी आपल्याला सांगतो, जेंव्हा आपण म्हणाल की तेच निदाण मी परत सांगतो , म्हणजेच ते निदाण मी पुण्हा निदाणाद देतो आणि चुर्ण उगळतो)
22 Dec 2008 - 3:13 am | अघळ पघळ
काही अपरीहार्य कारणास्तव आमचे रॉकीपंत सध्या मिपावर नाहीत. ते परत आल्यास तुमच्या नाडीचा योग्य तो समाचार घेतील.
22 Dec 2008 - 5:45 am | प्राजु
ओक साहेब.. छान चाललं आहे.
तसंही... एकूणच भविष्य सांगणारे.. मग ते नाडीवाले असोत.. पट्टीवाले असोत ..ग्रहतारे वाले असोत किंवा पोपट वाले असोत.. या सर्वांशी माझं जमतच नाही. कारण माझा यांपैकी कशावरच विश्वास नाही..
तुमचं चाललंय ते चालूदे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Dec 2008 - 9:42 am | मृगनयनी
नमस्कार शशिकान्त जी....
नाडी ज्योतिषावर माझा पूर्ण विश्वास आहे.
त्यामुळेच "नाडी ज्योतिषा"बद्दल तुम्हाला वाटणार्या आत्मीयतेबद्दल आणि त्याची सत्यता जनमानसापर्यंत पोचवण्याच्या तळमळीबद्दल, मला खरोखरच आदर वाटतो.
शिवाय जर एखाद्याला फसवायचे असेल तर तो ग्राहकाच्या हातात असा कुठलाच पुरावा हाती लागू देणार नाही की त्यामुळे तो पकडला जाईल. पण नाडी ग्रंथांच्या बाबत नेमके उलटे आहे. आपणांस वहीच्या रुपाने पुरावा आपल्याला टेपसकट आवर्जू्न दिला जातो.
त्याची शहानिशा करणे आपल्या हातात आहे.
नाडीज्योतिषाच्या सत्यतेबाबत पहिला पुरावा...
:)
त्य़ामुळे हा मजकूर जर खोटारडेपणा न करता खरोखरच नाडी ग्रंथातून येत असेल तर त्याची उत्पत्ती मानवी बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरील असली पाहिजे असे म्हणणे प्राप्त होते. पर्यायाने अतींद्रिय शक्तींतून ती माहिती झाली असली पाहिजे असे नाइलाजाने मान्य करावे लागते.
शशिकांत जी, याला एक्झॅटली, "अतीन्द्रिय शक्ती " नाही म्हणु शकत....कारण भृगु, अगस्ति-कौशिक, अत्रि.. इ. ऋषींनी ग्रह-गोलांचा अत्यंत सखोल अभ्यास करून, त्यानुसार अनुमान काढुन, सिद्धांतादाखल "पट्ट्या" लिहिल्या गेल्या... त्यात "अतींद्रिय शक्ती" पेक्षा मूलभूत ज्ञानाचा, अथक प्रयत्नांचा अधिक वाटा आहे.
५००० वर्षांपूर्वी, केलेल्या या सत्कार्याला "दैवी" म्हटलं, तर अधिक गौरवास्पद वाटेल.
:)
बुद्धिवाद्यांचा मग "वैचारिक पायाच कोसळतो" म्हणून त्यांना ते तत्वतः मान्य करणे शक्य होत नाही. मग त्यांना काहीना काही सबबीसांगून नाडी पट्टयांची शहानिशा करण्याचे टाळावे लागते.
पूर्णतः सहमत!
:)
23 Dec 2008 - 1:11 am | एडिसन
माझाही पूर्ण विश्वास आहे नाडी ज्योतिषावर..मी तसेच माझ्या परिचयाच्या ६ जणांना ह्या पद्धतीचा पुरेपूर अनुभव आलेला आहे. चेष्टा करणार्यांना एकच मनापासून सांगावेसे वाटते, एकदा अनुभव घ्या आणि मग वाटेल तितकी रेवडी उडवा. ओकसाहेब, आपल्या व्यासंगाचे आणि चिकाटीचे फार कौतुक वाटते.
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
22 Dec 2008 - 9:51 am | सहज
ओकसाहेबांच्या चिकाटीची दाद देतो.
ज्योतीष, नाडी, इ इ भविष्य, भुत वाचनाच्या प्रयत्नांबद्दल इतकेच विचारु इच्छीतो की जर का ह्या धंद्याना कायदे लागु केले तर चालेल का? किंवा का करु नयेत? तसेच हा धंदा नसल्यास व कायदे नको असल्यास पुढील १०० वर्षे हे प्रकार केवळ विनामुल्य ठेवले गेले तर ह्या प्रकारांना भवितव्य असेल का?
या ज्ञानाचा उपयोग करुन नक्की कुठल्या समस्या समजता / सोडवता येतात की ज्या अन्यथा सुटूच शकत नाहीत? आपल्याला मिळालेल्या वहीत नेमके काय होते? भविष्यकाल लिहला आहे का?
मिपासदस्यांच्यासाठी ही सेवा विनामुल्य उपलब्ध करुन देउ शकाल का? वह्या, पेन पुरवले जाईल. एकदा ही तपासणी होईल मग चर्चा पुढे सुरु होइल. तोवर आमच्या प्रतिसादांना तर्कदुष्ट म्हणून बोळावले जाईल.
22 Dec 2008 - 11:00 am | मदनबाण
ओकसाहेबांच्या चिकाटीची दाद देतो.
अगदी असेच म्हणतो...
अवांतर:-- बाकी नाडी,,नाडी,,,नाडी हे वाचुन आमच्या टाळक्यात वेगळेच गाण आल !!
हे :-- http://www.youtube.com/watch?v=Lfcwqb3QFDQ
प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--
(या गाण्याच्या चालीवर नाडी भविष्य टेप करुन मिळेल का ?) :?
(ताडी,माडी,नाडी या वस्तुंपासुन लांब असणारा)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
23 Dec 2008 - 12:43 am | कुशंका
चालूद्या. कमवा. काही फुकट खात नाही.
लोकांना शेंडि लावण्यासाठी बुद्धि लागते आणि मनोरंजन करण्यासाठि अंगात कला असावी लागते
बुवाबाजिचे विविध प्रकार म्हणजे बुद्धि आणि कलेचा संगम आहे
चालूद्या
23 Dec 2008 - 12:46 am | कुशंका
वरिल प्रतिक्रिया 'जनरल ' आहे. कुणा एका व्यक्तिसाठि नाही
23 Dec 2008 - 1:02 am | इनोबा म्हणे
लोकांना शेंडि लावण्यासाठी बुद्धि लागते आणि मनोरंजन करण्यासाठि अंगात कला असावी लागते
बुवाबाजिचे विविध प्रकार म्हणजे बुद्धि आणि कलेचा संगम आहे
अगदी खरे आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
23 Dec 2008 - 1:05 am | विसोबा खेचर
ओक साहेब,
बर्याच दिवसांनी आपल्याला मिपावर पाहून संतोष जाहला.
आपल्या विषयात आम्हाला गती नाही.. चालू द्या..!
आपला,
(पब्लिकला विश्वरूप दर्शन घडू नये म्हणून चट्टेरीपट्टरी चड्डीची नाडी आवळून बांधणारा) तात्या.
26 Dec 2008 - 11:14 am | राघव
पब्लिकला विश्वरूप दर्शन घडू नये म्हणून चट्टेरीपट्टरी चड्डीची नाडी आवळून बांधणारा
हाहाहा...
24 Dec 2008 - 11:00 am | धम्मकलाडू
या चर्चेत दादांच्या नाडीविषयक कामगिरीचा गौरव करण्यात आला होता. आपण या विषयातले तज्ज्ञ आहात. दादांच्या नाडीशास्त्राबद्दल अधिक माहिती द्याल का? धन्यवाद.
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
24 Dec 2008 - 3:35 am | रामपुरी
हा प्रश्न पूर्वी बर्याच वेळा विचारलेला आहे पण अजूनही अनुत्तरित...
या नाडीवाल्यानी ६ अब्ज (सध्याची लोकसंख्या)+ पुर्वीची लोकसंख्या + आगामी लोकसंख्या एवढ्या नाड्या नक्की कुठं ठेवल्या आहेत? जाहीर उत्तर द्यायला खूप अडचणीचा प्रश्न असेल तर तसे जाहीर करून टाका म्हणजे परत परत विचारायचा त्रास वाचेल.
26 Dec 2008 - 8:55 pm | धनंजय
या बाबतीतला मी जाणकार नाही, पण हा गणिती हिशोब.
जगातील सर्व मनुष्यांच्या पट्ट्या लिहिल्या असण्याची गरज नाही. फक्त जे लोक पट्टी वाचून घ्यायला येतील, ते जाणून, त्या तेवढ्याच लोकांच्या पट्ट्या दूरदर्शी लेखकांनी लिहिल्या तर पुरे असते.
यामुळे अर्थातच काही प्रमाणात गणित पुढे चालवता येते - सर्व मिळून जास्तीतजास्त किती लोक पुरातन पट्ट्या वाचणार आहेत, याचा अंदाज लावता येतो (नाडी केंद्रात पट्ट्या सुव्यवस्थित रचल्या असतील, तर उपलब्ध पट्ट्यांचा आकडा ग्रंथालय-अधिकार्याकडून सहज मिळू शकेल.)
शिवाय नाडीच्या पट्ट्या लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणाला ठाऊक झाले, तर याच पद्धतीने दरवर्षी मर्यादित संखेत पट्ट्या लिहीत राहाता येतील. अशा प्रकारेसुद्धा ही आकड्यांची समस्या सोडवली जाऊ शकते. "नवीन पट्ट्या सापडून केंद्राच्या ग्रंथालयात हरती होत आहेत का?" या प्रश्नाचे उत्तरही केंद्राच्या ग्रंथालय-अधिकार्याकडून सहज मिळू शकेल.
बाकी चालू द्या. तंत्राबाबत तपशीलवार उत्तर श्री. ओक किंवा अन्य माहीतगार देऊ शकतील.
26 Dec 2008 - 9:35 pm | रामपुरी
जगातील सर्व मनुष्यांच्या पट्ट्या लिहिल्या असण्याची गरज नाही. फक्त जे लोक पट्टी वाचून घ्यायला येतील, ते जाणून, त्या तेवढ्याच लोकांच्या पट्ट्या दूरदर्शी लेखकांनी लिहिल्या तर पुरे असते.
अरेच्या हा मुद्दा डोक्यातच आला नाही. ज्यानी एवढ्या लोकांच्या नाड्या लिहून ठेवल्या त्याना हे नक्कीच माहीत असणार की कोण पट्टी वाचून घ्यायला येतील आणि कोण नाही.
अवांतर किडा: मग हे नाडीवाले त्या पट्ट्या सरळ घरीच का पाठवून देत नाहीत? त्यांच्या केंद्रात बोलावून पैसे गोळा करायचा धंदा का उघडला आहे? हो आणखी एक, हे लबाड लोक काहीतरी संकट असल्याचे भासवून त्यावर हजारो रूपयांचे उपाय सुद्धा सुचवतात.
नाडीच्या पट्ट्या लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणाला ठाऊक झाले, तर याच पद्धतीने दरवर्षी मर्यादित संखेत पट्ट्या लिहीत राहाता येतील
लिहिण्याचे माहीत नाही पण त्याच त्याच पट्ट्या वाचण्याचे आणि भोळ्या लोकाना लुबाडण्याचे तंत्रज्ञान त्याना नक्की ठाऊक झाले आहे.
तंत्राबाबत तपशीलवार उत्तर श्री. ओक किंवा अन्य माहीतगार देऊ शकतील.
अजूनतरी अशी माहीती माहीतगारानी दिलेली नाही म्हणजे समजून घ्या काय ते.
(हे सर्व सांगोवागीचे नाही. मी प्रत्यक्ष जाऊन बघितले आहे यांचा कारभार कसा चालतो ते. हे लोक जी कॅसेट आणि वही वगैरे देतात त्यातले भविष्य म्हणजे थोतांड असते. उदा. वयाच्या २५-३० च्या दरम्यान तुम्हाला अपत्यप्राप्ती होईल (जी जगातील ६०-७०% जनतेला या वयात नाडी न बघता सुद्धा होतेच)).
असो.
माहीतगारांच्या उत्तराच्या अपेक्षेत
रामपुरी
25 Dec 2008 - 6:26 pm | तिमा
आपणाकडून विविध मार्गांनी माहिती काढून तीच माहिती नाडी शास्त्री आपणाला सांगतो. याचा अर्थ आपण सांगितलेली सर्व माहिती लक्षात ठेऊन तेच भविष्य म्हणून तो आपल्याला सांगतो.
जेंव्हा आपण म्हणतो की तीच माहिती तो परत सांगतो.
म्हणजे ती माहिती तो परत उगाळतो.
लई भारी, म्हन्जी कसं की 'तुला कापूसकोन्ड्याची गोष्ट ऐकायची का?' तसं वाटताय राव! लोकंनो, आपापल्या नाड्या संबाळा, दादांसारख्या लोंबत्या ठ्येऊ नका.
2 Jan 2009 - 8:20 pm | रेझर रेमॉन
ओक साहेबांचा लेख वाचला.
आपला एक मित्र संपूर्ण नास्तिक होता. तो डोंबिवलीला नाडी परीक्षा करून त्यांची काढायला गेला. पण त्याला जबराट आनुभव आला आणि तो कॅसेट ऍकून काही काळ तरी आस्तिक झाला! हा चमत्कार मी स्वतः अनुभवलाय! त्यांची नाडी सोडायला गेला आणि स्वत:ची तुट्ली. पण काही काळा नंतर हा आस्तिक पुन्हा नास्तिक झाला! असे चमत्कार होतच असतात! नॉस्ट्रॅडेमस वाचून आपण काही काळ भारावतोच ना! नेपोलिअन, साई प्रश्नावली पण खर्या ठरतात. कोणाची हीम्मत आहे काय नाही म्हणायची? पोपटवाल्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलाय. तो पण खरा ठरला होता, एका मंद मुलाच्या बाबतीत! बापू, भाऊ, महाराजांची कथने ही खरीच ठरतात! नाही कोण बोलतोय तो? आम्ही स्वतः अनुभव घेतलाय! हो म्हणायला काय घ्याल? मंदबुद्धी!
17 Jan 2009 - 9:29 pm | अनंत छंदी
18 Jan 2009 - 12:05 am | llपुण्याचे पेशवेll
अहो पण हे आहे कुठे? काही दिसतच नाहीये.
पुण्याचे पेशवे
Since 1984