मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

राजेश कुलकर्णी's picture
राजेश कुलकर्णी in काथ्याकूट
20 Nov 2015 - 3:40 pm
गाभा: 

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

इतर धर्मातील (उदा. बौद्ध, जैन, ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई, पारशी) लोकांना त्यांच्या धर्माशी संबंधीत वरील प्रश्नाचे उत्तर देण्यात फार अडचण यायला नको. किंबहुना काही धर्मात थोडीफार तशी परिस्थिती असली तरी त्याचा येथे संबंध लावायला नको.

हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही. मी आतापर्यंत अनेकांना याबाबत विचारलेले आहे. त्यात १) काय फरक पडतो, २) मी द्वैतवाद वा अद्वैतवाद मानतो, ३) मी भगवद्गीता या ग्रंथाचा पूजक, ४) फार तर भगवद्गीतेबरोबर रामायण हाही माझा धर्मग्रंथ, ५) या भूमीत रुजलेला आणि वाढलेला सनातन धर्म, ६) हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही यातच त्याचे महानपण-वेगळेपण वगैरे आहे, ७) मी सर्वांना समान मानतो, ८) हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे अशी विविध उत्तरे मिळतात. अशा मोघम उत्तरांमुळे कोणाही जिज्ञासू व्यक्तीचे समाधान होणे शक्य नाही. उलट असे प्रश्न विचारून धार्मिक बाबतीतील तज्ज्ञ म्हणवणा-या सदर व्यक्ती त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले म्हणून नंतर फटकून वागतात किंवा भेटायचे टाळतात.

अशा परिस्थितीत येणा-या पिढ्यांना हिंदुत्वाबद्दल अनास्था वाटेल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही का?

वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते.

पुढचा प्रश्न: हिंदू धर्माचे प्रतिनिधी नक्की कोण?

शंकराचार्य म्हणावेत तर अतिशय कर्मठ अशी त्यांची प्रतिमा, सामान्य जनतेशी संपर्क शून्य, त्यातही अनेक पीठे आणि श्रेष्ठत्वावरून त्यांच्यामध्येच मधूनमधून होणारे वाद. हे प्रतिनिधी हिंदू समाजातील कोणत्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात? त्यांच्यात दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक जण तरी आहे का? की आरक्षण लागू नसल्यामुळे तेथेही फक्त उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे? आणि त्यामुळे समाजातील हे अनेक मोठे घटक या धर्मात सामावलेलेच नाही?

कोणाला प्रश्न पडेल निश्चितपणे कोण प्रतिनिधी आहे हे सामान्य हिंदू व्यक्तीला माहीत नसले तर काय फरक पडतो? तर फरक पडतो. हे आजवर कोणाच्या लक्षात आले नाही का? की विविध कारणांनी ‘जैसे थे’ परिस्थिती लादली गेली? जातीपातीमुळे संपूर्ण हिंदू समाज मुळात यांचे प्रतिनिधित्व नाकारतो हे कारण आहे का? धर्माचा इतक्या सहस्त्रकांचा डोलारा केवळ त्याच्या जडत्वामुळे (inertia) चालू आहे का अशी शंका यामुळे वाटते.

फरक का पडतो?

१) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते. प्रसंगी ते विविध अवतार अहेत म्हणून कमकुवत मनाच्या लोकांना आपल्या कच्छपी लावतात. हा प्रकार कल्पनेच्याही बाहेर बोकाळलेला आहे.

२) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते.

३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात. परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते.

४) तेहेतीस कोटी देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे असे अनेकदा ऐकतो. कित्येकदा कृष्णाच्या राधा वा गोपींबरोबरच्या शृंगाराचे वर्णन तिखटमीठ लावून सांगितले जाते तर तसे काही नव्हतेच असेही म्हटले जाते. कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात.

५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात. त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते. त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो.

६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही. त्यामुळे त्यांना मोठाच राजकीय विरोध होत असल्यामुळे धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही, परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, किंबहुना धर्मासाठी ते धोक्याचे आहे.

७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे.

८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील.

९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही. हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही.

१०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही.

११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल.

१२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही.

१३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल.

१४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही. पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल.

आणखी शोधल्यास अशी अनेक कारणे आढळतील.

असे झाले तर धर्माचे प्रतिनिधी एक प्रकारचा माफिया निर्माण करतील अथवा आचार-विचार स्वातंत्र्यावर गदा येईल असा समज करून घेण्याचे कारण नाही, कारण देशाची घटना, कायदे यांना यापासून धोका पोहोचणारच नाही.

कोणाला या बाबी गांभिर्याने घेणे गरजेचे आहे असे वाटत असेल तर त्यांनी यात जरूर भाग घ्यावा. फक्त त्यात जातीय/धार्मिक आवेश नको. कारण त्यामुळे चांगली चर्चा होऊ शकणार नाही आणि त्याला भलतेच वळण लागेल. शिवाय ज्यांना यातली तळमळ दिसते त्यांनी त्यांच्या परीने विविध पातळींवर या विषय न्यायलादेखील माझी काहीच हरकत नाही.

मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे? एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही. कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत.

ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही. गांभिर्याने चर्चा करण्याची इच्छा असलेल्यांचे स्वागत व आगाऊ धन्यवाद.

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

20 Nov 2015 - 3:47 pm | आदूबाळ

ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही.

आता पुढचा प्रतिसाद वाचू नका.

मागच्या धाग्यावरचा मोदकरावांचा सल्ला मनावर घेणेचे करावे.

उत्तर देण्याची तसदी घेतली नाहीत तरी चालेल. धन्यवाद.

प्रसाद१९७१'s picture

20 Nov 2015 - 3:53 pm | प्रसाद१९७१

हे लेखक महाशय कुठला तरी विचारजंती अजेंडा घेउन मिपा वर आले आहेत. त्यांच्या लेखांकडे दुर्लक्ष करणेच चांगले.

तात्या's picture

20 Nov 2015 - 3:48 pm | तात्या

हा नेमाडेंचा डु आयडी आहे काय ?

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 4:35 pm | राजेश कुलकर्णी

आपण पोस्टमधील कशावरच लिहिण्याची तसदी घेतलेली नाहीत.
नेमाडे ही अतिशय विद्वान व्यक्ती आहे. कमीत कमी त्यांचा तरी उद्धार करू नका ही विनंती.

तात्या's picture

20 Nov 2015 - 4:42 pm | तात्या

तुम्ही मिपाचा नेमाडे करत आहात तेवढा पुरे आहे.
बाकी पोस्टमधे जे लिहलय त्याबद्दल नेमाडेंचा हिंदू वाचा !
टेम्पो बोलवा रे !

टेम्पो कशासाठी बोलवायचा हो तात्या. तेवढे सांगा ना क्ृपया.

मी हिंदू आहे म्हणजे माणूस आहे
आणि मी हिंदू नसते उदा.बौद्ध,जैन,ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई,पारशी कोणीही असते तरी माणूसच असणार होते
इतकचं पुरेस आहे

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2015 - 4:02 pm | टवाळ कार्टा

meme

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 5:43 pm | संदीप डांगे

इकडे पॉपकॉर्न घेऊन बसण्याइतकं मट्रेल नै टका, च्यामारी कुठल्यातरी सत्यशोधक समाज वा तत्सम सभेच्या मैदानात भोंग्याशेजारी बसल्यासारखं वाटतंय मला... तु आपला मल्टीप्लेक्स मधे बसल्यासारखा बसलायस...

चल जाऊ, चनावाल्याकडं.

(एकेरीसाठी क्षमस्व, त्याशिवाय विधानात मजा नै)

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2015 - 7:43 pm | टवाळ कार्टा

खि खि खि...
बाकी एकेरीतच चालूद्या....ते काही आयडींसारखे उग्गीच्च सीलेक्टीव्ह शिष्ट्पणा जम्णार नै मला

उगा काहितरीच's picture

20 Nov 2015 - 5:45 pm | उगा काहितरीच

थोडे शेअर करणार का ?

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2015 - 7:43 pm | टवाळ कार्टा

करू की :)

आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

अहो.. सर्वोच्च न्यायालय म्हणते की "हिंदू हा धर्म नसून एक जीवन पद्धती आहे"

पहिलेच वाक्य चूक आहे. पुढचा लेख का वाचावा आणि काय चर्चा करावी?

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 5:51 pm | राजेश कुलकर्णी

हरकत नाही. मग त्या जीवन पद्धतीमुळे जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर चर्चा नको करायला?

तेव्हा शब्दश; अर्थ घेऊ नये. 'फरक का पडतो' याखाली अनेक गोष्टी नोंदवल्या आहेत त्या त्यासाठीच.

धन्यवाद.

मोदक's picture

20 Nov 2015 - 5:58 pm | मोदक

हरकत नाही.

हरकत आहे. हिंदू धर्मच नाहीये; जीवनपद्धती आहे. मग प्रत्येकाने स्वत:ची जीवनपद्धती सुधारावी. धर्म आपोआप सुधारेल.

मग त्या जीवन पद्धतीमुळे जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर चर्चा नको करायला?

नुसते चर्चा करून काय होणार? तुम्ही काही बदल घडवले आहेत का तर बोला. चुकीच्या गृहीतकावर चर्चा करण्यासाठी ही जागा वाया घालवायला नको.

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 6:17 pm | राजेश कुलकर्णी

चर्चेतूनच जमत बनते ब बदल घडतात हे आपल्याला मान्य आहे का?

कोणत्या त्रुटी आहेत, त्यामुळे काय फरक पडतो आहे हे तर मी दाखवलेलेच आहे. आपण आणखी काही कारणांचा विचार करू शकता का?

चर्चेतूनच जमत बनते ब बदल घडतात हे आपल्याला मान्य आहे का?

नाही. चर्चेतून जमत बनायला लै वेळ लागतो. आजच्या युगात अभ्यासाने खूप लवकर सामाजिक बदल घडू शकतात.

उदा - डॉ. अभय बंगांनी केलेला किमान मजुरीच्या दराचा बदल,
आमटे कुटुंबियांच्या तिसर्‍या पिढीने केलेला कुष्टरोगी मदत योजनेच्या दराचा बदल.

चर्चेतून किमान एक वर्षांमध्ये बदल घडलेली उदाहरणे द्या.

तुम्ही दिलेली बदलांची मूर्त उदाहरणे उत्तम आहेत. त्यालाही काही वर्षे काही काळ तर लागला असेलच.
शिवाय मी व्यक्त केलेल्या मुद्द्याची व्यापती (मी म्हणतौ म्हणून नव्हे) खरोखरच खूप मोठी आहे. मात्र बदल व्हायला हवा असे वाटत असेल तर काही चर्चा तर व्हायला हवी.
चर्चा न करता काही बदल घडवायचा म्हणजे हुकूमशहाच हवा. त्यालाही तसे करताना अडचणी येणार.
काही बदलांना मोठा काळ जावा लागतो. काही बदल तेव्हाच्या परिस्थितीनुरूप लगेच होतात. प्रत्येक बदलामागे चर्चा असतेच.

डॉ बंग किंवा आमटे परिवार यांनी केलेल बदल चर्चा न करता केले. मग हुकूमशाहीचा काय संबंध आला येथे?

मोदकराव त्यांना चर्चा करायचीय, तुम्ही कंडका पाडायला निघालात. कसे व्हायचे?
एकदाचा मिपायक्ष हा किताब देऊन टाका. ;)
मोकळे सगळेच.

अर्रर्र.. असे आहे होय? स्वारी हा अभ्याजी.. माझी चूक झाली. ;)

कुलकर्णी सर.. ब्रह्मा, विष्णू हे देवगण हिंदू होते का? यावर तुमचे काय विचार आहेत यावर कृपया (याच धाग्यावर!) चर्चा करा.

महेश साठी वेगळा धागा काढला तरी चालेल. ;)

संपत's picture

21 Nov 2015 - 4:42 pm | संपत

उलट डॉ. बंग ह्यांनी मिळवलेल्या माहिती आधारे तत्कालीन मंत्र्यांशी चर्चा केली आणि मंत्र्यांनी बदल केले. डॉ. बंग ह्यांनी नाही.

बरं.. आता एक सांगा, तुम्ही दिलेला प्रतिसाद तुम्ही लिहिला की तुमच्या संगणकाने? :)

तुम्हाला जनमत म्हणायचे आहे का?

मला माहीत नाही मी कोण आहे. माझे आइ वडील हींदू आहेत. पण मी लहानपणापासून देवळात जाणे वगैरे काही केले नाही. पूजा करत नाही. देवाला नमस्कार करत नाही.

मी हींदू आहे का? नसेन तर हींदू होण्यासाठी मी काय करावे?

सर्वप्रथम "हिंदू" असे लीहायला शीका. तूमच्यासारख्या लोकांमूळे धर्म बूडायला लागला आहे.

कीती वेळा लीवू गुरुजी हिंदू ?

बाकी ते धर्म का काय ते आधी सांगा,,,

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2015 - 7:50 pm | टवाळ कार्टा

ओ...असे नै करायचे....वर तुम्हीच लिव्लेत ना...हिंदू ही जीवनपध्धती आहे म्हणून....या तो जीवनपध्धती बोलो या तो धर्म बोलो :)

खटपट्या's picture

20 Nov 2015 - 8:06 pm | खटपट्या

काय ते सांगा आधी म्हणजे मी ठरवतो मी कोण ते.

पगला गजोधर's picture

20 Nov 2015 - 7:14 pm | पगला गजोधर

जीवनपद्धती म्हणजे काय ?
मला वाटायचे की उदा. शाकाहार हि जीवन् पद्धत, म्हणजे ती पद्धत अवलंब करणाऱ्यांनी शाक म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ खाऊन जीवन व्यतीत करणे.
मग हिंदू जीवनपद्धती म्हणजे काय ? कोणी काय खावे, कसे कपडे घालावे, कोणी काय शिकावे / शिकू नये, बोलावे / बोलू नये, लिहावे / लिहू नये , धागा काढावा / काढू नये इ प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणे, असा आहे का ?

यनावाला's picture

22 Nov 2015 - 9:36 pm | यनावाला

श्री.मोदक लिहितात,"

"हिंदू हा धर्म नसून एक जीवन पद्धती आहे"
पहिलेच वाक्य चूक आहे. पुढचा लेख का वाचावा आणि काय चर्चा करावी?"

एखाद्या फॉर्म मध्ये आपली माहिती भरताना "धर्म:--" या सदरात तुम्ही काय लिहिता? याचे प्रामाणिकपणे स्वत:शीच उत्तर द्या. भारतातील ८५% लोक तिथे "हिंदू" हाच शब्द लिहितात. जगातील प्रमुख धर्मांत हिंदुधर्माची गणना होते. ख्रिश्चन, इस्लाम,बौद्ध, हिंदू, ज्यू, जैन इ.सर्व धर्मच आहेत. हिंदू हा एक धर्म आहे हे आज जगन्माम्य आहे. श्री.राजेश कुलकर्णी यांचा लेख तुम्ही वाचा अथवा वाचू नका, पण "हिंदू हा धर्मच नव्हे. लेखातील पहिलेच वाक्य चुकले. लेख का वाचावा." असे म्हणणे अज्ञानमूलक आणि अशोभनीय आहे.
* वस्तुत: श्री. कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. सखोल विचार करून लिहिला आहे. त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे हिंदुधर्माच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. कृपया थोडे गांभीर्य धारण करावे. लेखातील विचार समजून घ्यावे.

तुम्ही पण झक्कास सर्टिफिकेट देता की. आम्हाला वाटले होते आमचे एक सर होते तेच एकमेव.

आता कंटाळा आला आहे त्यामुळे सध्या इतकेच. नंतर इच्छा झाली तर प्रतिसाद देईन.

अज्ञानमूलक - मोदक

मराठी_माणूस's picture

20 Nov 2015 - 5:31 pm | मराठी_माणूस

पु.लं. नी संस्कृती वर काय सुरेख भाष्य केले आहे ते पहा

https://www.facebook.com/116170530788/photos/a.132880410788.105988.11617...

हींदू म्हणजे सुध्दा अनेक गोष्टींचा समुदाय आहे त्याला एखाद्या चौकटीत बसवणे कठीण आहे.

बॅटमॅन's picture

20 Nov 2015 - 6:15 pm | बॅटमॅन

असा सगळा प्रकार झाला तर, फार वाईट झाले.

नाखु's picture

21 Nov 2015 - 9:39 am | नाखु

असा प्रकार आहे तर ! विलक्षण मौज आहे वगैरे वगैरे !!!

नाखोक मिपागावकर

मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?

मग काय ठरवलं.

जयन्त बा शिम्पि's picture

20 Nov 2015 - 6:31 pm | जयन्त बा शिम्पि

माझ्या वाचनानुसार, काथ्याकूट करण्याजोगा हा विषय असला , तरीही सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास , पुढील श्लोक वाचावा.

स्मृती भिन्न: श्रुतयो विभिन्ना
नैको ॠषिर्यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्थाः ॥

अर्थः- स्मृती भिन्न आहेत, श्रुती भिन्न आहेत, ( म्हणजे त्यांच्यातील तत्वज्ञानाचा एक्मेकांशी काही संबंध नाही ) कोणत्याही एकाच ॠषीचे मत प्रमाण म्हणून स्वीकारले जात नाही. खरं म्हटलं तर धर्माचे तत्व , अज्ञात गुहेत दडवून ठेवण्यात आलेले आहे. ( त्यामुळे ते शोधण्याचा कोणीही प्रयत्न करू नये , असे सुचविण्यात आले आहे). मग जीवनाचा म्हणा अगर सत्याचा मार्ग कोणता ? तर आपल्या अगोदर जे महा जन म्हणजे ज्ञानी , मुनी, मोठे लोक , ज्या मार्गाने गेले , त्याच मार्गाने आपण जावे हेच खरे. ! !
अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी.

http://sanskritdocuments.org/doc_z_misc_vaakyasangraha/vaakyaexamples.ht...

यनावाला's picture

23 Nov 2015 - 2:11 pm | यनावाला

संस्कृत श्लोकातील पहिली पंक्ती अशी हवी:
"तर्कोsप्रतिष्ठ: श्रुतयो विभिन्ना: ।
तसेच १." ॠषिर्यस्य..." हे "ऋषिर्यस्य...." असे हवे. (म्हणजे ऋ ह्रस्व हवा. दीर्घ[ॠ] नको.)२."तत्त्व" असा असा शब्द हवा.तो "तत्व" असा पडला आहे. अन्य सर्व शब्द व्याकरणशुद्ध आहेत. संस्कृत लेखनात व्याकरणदोष क्षम्य नाहीत म्हणून लिहिले.राग नसावा.

मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?

नका म्हणवून घेऊ, हाकानाका. इथे कोणी दगड मारून जीव थोडीच घेणारे तुमचा?

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 6:46 pm | राजेश कुलकर्णी

बॅटमॅन, मी जर आज तसे म्हणवून घेण्याचा प्रयत्न केला तर अापली व्यवस्था सामाजिक व कायद्याच्या पातळीवर ते चालवून घेईल असे खरंच वाटते तुम्हाला?

मी जर आज तसे म्हणवून घेण्याचा प्रयत्न केला तर अापली व्यवस्था सामाजिक व कायद्याच्या पातळीवर ते चालवून घेईल असे खरंच वाटते तुम्हाला?

न घ्यायला काय झाले? बरोब्बर १०० वर्षांपूर्वी असा एक प्रयोग झाला होता "अजात" नावाचा. त्याची माहिती शोधा. बरीच उत्तरे मिळतील.

जी उत्तरे मिळणार नाहीत त्यावर प्लीज येथेच लिहा. नवीन धागा काढू नका.

इकडे बघा.

https://en.wikipedia.org/wiki/Irreligion_in_India#Legal_status.2C_rights...

तूर्तास तरी जन्मतानाचा धर्म कन्सिडर केला जातो, मात्र अपॉस्टसी- अर्थात मी कुठलाही देवबीव मानत नै असे सांगणे- अलाउड आहे.

हे झाले कायद्याचे. बाकी लोकही जरा बोलतील पण तेवढ्याकरिता कोणी जीव घेणार नाही.

आता लगेच दाभोळकर वगैरेंचे मर्डर इ. आयसोलेटेड केसेस तोंडावर फेकणार असाल तर त्याला कै अर्थ नाही. अनेक नास्तिक लोक परिचयाचे आहेत आणि आस्तिक लोक कायम त्यांना त्रास देतात असे कै पाहिलेले नाही. प्रत्यही आस्तिकांवर टीका करून तुच्छतेने बोलणे हीच जर तुमची नास्तिकता असेल तर गोष्ट वेगळी, पण शांतपणे आणि ठामपणे जर फक्त "मी नास्तिक आहे" इतकेच सांगितले तर लोक फार तसदी घेत नाहीत असा अनुभव आहे.

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 7:11 pm | राजेश कुलकर्णी

धर्माचा व आस्तिक-नास्तिकतेचा तसा संबंध नाही. तो विषय वेगळा.
मी कोणताही धर्म मानत नाही असे सांगणे कि्वा देव मानत नाही हे वेगळे. पण उद्या एखाद्या 'धार्मिक' उत्सवामुळे मला जर उपद्रव होत असेल, पण केवळ लोकांना मूर्ख बनवणा-या आयोजकांमुळेच नव्हे तर भलत्याच धार्मिक कल्पना असणा-या जनसामान्यांमुळे मला नक्कीच विरोध होईल. मुळात अशा धर्माचा गैरवापर करणा-या राजकारण्यांचा आधारच असे जनसामान्य असतात. त्यामुळे धार्मिक भावना भडकणे असे जे दावे केले जातात ते त्यांच्या जीवावरच केले जातात. तुम्ही दाभोळकरांचा संदर्भ नको म्हणालात. ते तर मोठेच वास्तव आहे. पण तुम्हाला कोणी मारणार नाही असे जे म्हणालात तेही अशा उदाहरणावरून तितकेसे खरे नाही.
तुम्ही कायद्याच्या द्ृष्टीने जे अथिस्ट किांवा अपोस्टसी याबद्दल मला कल्पना आहे. पण व्यावहारिक बाबतीत तुम्ही म्हणता तसा जन्माचा धर्म वा नंतर बदललेला असेल तर तो धरला जातो हे वास्तव आहे. पण तो विषय वेगळा.

बॅटमॅन's picture

20 Nov 2015 - 8:12 pm | बॅटमॅन

मग काय म्हणायचे आहे नक्की? स्पीकरवरून तक्रार केली तर पोलीस येऊन बंद करायला लावतातच की. भले सगळीकडे आणि सर्व काळी ही यंत्रणा काम करत नसेल मनासारखे म्हणून काही होतच नाही असे आहे का ?
मुद्दा इतकाच की दाभोळकरांसारखी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी उदाहरणे देऊन आपला सिलेक्शन बायस उघडा पडतो.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2015 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

नका म्हणवून घेऊ, हाकानाका. इथे कोणी दगड मारून जीव थोडीच घेणारे तुमचा?

+१ रे

सध्या धर्म आणि देश सोडायला परवानगी लागत नाही. फायदा घ्या.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Nov 2015 - 6:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विचार करण्यासारखे प्रश्न आहेत रे राजेश.नेमके उत्तर सापडत नसल्याने 'हिंदू धर्म नसून विचारशैली,जीवनपद्धती..'असली वेळ मारून नेणारी उत्तरे देण्यात येतात असे वाटते.

तात्या's picture

20 Nov 2015 - 6:45 pm | तात्या

माई,
बेअरींग सुटतय !!
राजेशा किंवा राजा म्हणा ! आणि तुमची इकडची स्वारी निजधामास गेली काय ?

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 7:14 pm | राजेश कुलकर्णी

धन्यवाद.

खरोखर तशी परिस्थिती आहे. उत्तरे शोधण्यापेक्षा त्यातील अाव्हानांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जातो. पण जितके दाबले जाईल किंवा दुर्लक्ष केले जाईल तेवढे ते उफाळून येईल व सा-यांनाच त्याचा त्रास/उपद्रव होईल असे वाटते.

आनन्दा's picture

22 Nov 2015 - 4:12 pm | आनन्दा

प्रश्न असा आहे की तुम्ही नुसते हिंदू या शब्दाभोवती अडकून पडला आहात. मुळात मुसलमान आक्रमक भारतात येण्यापूर्वी हिंदू हा शब्द तरी अस्तित्वात होता का असा प्रश्न आहे. त्यामुळे मुळात "हिंदू" आणि "धर्म" या शब्दांच्या व्याख्याच सुस्पष्ट नाहीत. तुम्हाला धर्म या शब्दाचा नेमका कोणता अर्थ अपेक्षित आहे ते बघणे रोचक ठरेल. धर्म म्हणजे रिलिजन की गीतेमध्ये श्रेयां स्वधर्मो मध्ये सांगितलेला धर्म? रिलिजन म्हणजे खरेतर भारतीय भाषेत पंथ, पण त्यालाच आपण धर्म समजून बसायची चूक करतो आणि मग पुढे त्याच्यावर लेखात साअंगितल्याप्रमाणे इमले चढवतो.
एव्हढेच म्हणायचे की पाया कच्चा आहे. असो.

राजेश कुलकर्णी's picture

22 Nov 2015 - 7:09 pm | राजेश कुलकर्णी

आनन्दा,
इतिहासात काय झाले त्यापेक्षा अाज हिंदू धर्म म्हणून जे आपल्यासमोर अाहे त्याबद्दल मी बोलत आहे. त्यामुळे धर्म की रिलिजन यात गल्लत नको कि्वा त्यामुळे आणखी गोंधळ वाढायला नको. आपण सरकारी कागदपत्रांमध्ये जो लिहितो तो हिंदू धर्म. वर म्हटल्याप्रमाणे तीन भाग अाहेत १) मी हिंदू अाहे म्हणजे काय अाहे, २) माझ्या धर्माचे प्रतिनिधी कोण (सुसुत्रता येण्यासाठी/आणण्यासाठी) आणि ३) यागोष्टी नसल्यामुळे होत असलेले दुष्परिणाम व ते करण्याची गरज. क्र. ३ चे तपशील 'फरक का पडतो' याखाली दिलेले आहेत.

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 6:42 pm | राजेश कुलकर्णी

जयंत बा शिम्पि, धन्यवाद.
तुमचे म्हणणे व दिलेले संदर्भ बहुधा मागच्या शतकाखेरपर्यंत ठीक होते. या कालावधीचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे त्यानंतर त्याआधी निद्रिस्तावस्थेत असलेला समाज जागरूक झालेला आहे. अापण सोयीस्करपणे म्हणतो की आता चातुर्वर्ण कालबाह्य झालेला आहे., मात्र त्या पद्धतीने होरपळलेला समाज ते विसरायला तयार नाही. अशी अनेक आव्हाने मी मला सुचली तशी 'फरक का पडतो' याखाली दिली आहेत. त्यामुळे आताच्या परिस्थितीतही आपण पूर्वीच्याच मार्गाने जावे म्हटले तर ती एक प्रकारची आत्मवंचना ठरेल. त्यामुळे हिंदू समाजावर व देशावर होणारे विपरित परिणाम वेगळेच. त्याचाही उल्लेख मी केलेला अाहे.

तात्या's picture

20 Nov 2015 - 6:46 pm | तात्या

मजी तुमाला ईक णम्र विणण्त्ती आहै.
टूमी तुमछा अ‍ॅक बोलोग लिहा

राजेश कुलकर्णी's picture

21 Nov 2015 - 11:44 pm | राजेश कुलकर्णी

कोठे? येथेच मिसळपाववर?

मला वाटतं ते आपल्या ब्लॉग चा कचरा इथे टाकताहेत. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काही खरं नाही आपलं.:)

राजेश कुलकर्णी's picture

22 Nov 2015 - 7:22 pm | राजेश कुलकर्णी

तुम्हाला तसे वाटत असेल तर पुन्हापुन्हा येथे का येत अाहात? पुन्हा तसदी घेतली नाही तरी चालेल
नमस्कार. या नमस्काराचा अर्थ कळला असेल असे समजतो.

तुम्ही पण येताच आहात की बोर करायला.

अभ्या..'s picture

22 Nov 2015 - 10:21 pm | अभ्या..

बोर ते बोर, वर शिरजोर. ;)
एन्ट्रीलाच म्या संगितले होते नवीन विभाग काढून द्या. एकले नाहीत. आता निस्तरा. ;)

इरसाल's picture

22 Nov 2015 - 10:32 pm | इरसाल

तुम्ही बोल्या, आता निस्तरा,
वो निकालेंगे खिसेसे वस्तरा,
मेन पानावर लागणार नाय तुमच्या लेखाची वर्णी,
मिपावर आयलेत राजेस कुलकर्णी....!!!

शलभ's picture

23 Nov 2015 - 11:26 am | शलभ

बोर ते बोर, वर शिरजोर

परफेक्ट लागू पडतय..;)

महासंग्राम's picture

23 Nov 2015 - 5:05 pm | महासंग्राम

ख्खिक …. चला या निमित्ताने मराठीला नवीन म्हण मिळाली ….

जयन्त बा शिम्पि's picture

21 Nov 2015 - 1:58 am | जयन्त बा शिम्पि

माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नाही. पुर्वीच्याच मार्गाने जा असे नाही अपेक्षित. त्या त्या काळातील , ' महाजन ' अशा व्यक्तींनी जसे आचरण केले तसे करावे. म्हणजेच येथे तारतम्य वापरावे, असे सुचवावयाचे आहे.उदाहरणार्थ :- पेहराव कसा असावा ? मी जर पुर्वीच्या लोकांसारखे धोतर, बंडी, पगडी अगर मुंडासे घालून , बगलेत लांब दांड्याची छत्री घेवून ,लोकल्ने प्रवास करण्याचा प्रयत्न केला , तर लोक मला मूर्खात काढतील. दुसरे उदाहरण अरब लोक जसा पायघोळ अंगरखा घालतात , तसा घालून , मी जर चेन्नई सारख्या शहरात , भर उन्हाळ्यात फिरू लागलो तर घामाने न्हावून निघेन.
( चेन्नई कशाला, येथे महाराष्ट्रात, भर उन्हाळ्यात , लग्नात , केवळ शिवला आहे म्हणून, थ्री पीस सूट घालुन , येणारे पाहूणे पाहिले आहेत ! ) आता साधी गोष्ट आहे. जेथे थंडीचे प्रमाण जास्त आहे , तेथेच थ्री पीस सूट नेकटाय इ. , घालणे योग्य , नाही कां ? जसे हे पेहरावाच्या बाबतीत,
तसेच पूजा, प्रार्थना, जप, संस्कार, विद्या , याबाबतीत म्हणता येईल.

एकच गोष्ट धरून न ठेवता, बदल करीत रहाणे , हेच जीवंतपणाचे लक्षण आहे. सर्वसमावेशक असणे म्हणजे आपल्या धर्म , पंथ अगर संप्रदायात , जे तारतम्याने योग्य वाटते ते स्वीकारणे. तसेच इतरही धर्मात, पंथात, अगर संप्रदायात जे काही योग्य वाटेल , ते स्वीकारणे. त्याप्रमाणे आचरण करणे. उदाहरणार्थ ' गरबा ' खेळणे ही काही महाराष्ट्राची परंपरा वा संस्क्रुतीचा भाग नव्हे, पण तरीही आम्ही त्याचा आनंद घेतोच ना ! ! मला या बाबतीत एक ' शेर ' आठवतो .

" झुकता वो ही है, जिनमें जान होती है ! वरना अकडे रहना तो , मुर्देकी पहचान होती है ! ! "

भाऊंचे भाऊ's picture

20 Nov 2015 - 6:50 pm | भाऊंचे भाऊ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही.

जस्ट फॉर द रेकॉर्ड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची कोणीतीही संघटना ( अधिकृत कागदोपत्री) अस्तित्वात नाही. परीणामी कोणी याला देणगी देउ शकत नाही आणी अर्थातच बॅनही करता येउ शकत नाही कारण जे मुळात अधिकृत अस्तित्वातच नाही ते बॅन कसे करणार.

सुबोध खरे's picture

20 Nov 2015 - 7:12 pm | सुबोध खरे

आश्चर्य आहे.
मी तर ऐकले होते कि रा स्व संघावर दोन तीन वेळा बंदी आली होती( माझ्या आठवणीत एकदा आणीबाणीत नक्की). मग आपण म्हणता ते खरे कि खोटे. आणि असे हि ऐकले आहे कि हि जगातील सर्वात मोठी बिनसरकारी संघटना (NGO) आहे.
क्या सच है? क्या झूट है?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Nov 2015 - 7:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ते भाऊंचे भाउ आहेत तसे रा स्व संघ म्हणजे राजकीय पक्षांचा राजकीय पक्ष आहे.

सुबोध खरे's picture

20 Nov 2015 - 7:19 pm | सुबोध खरे

पहा विकीपेडिया
The RSS has been banned in India thrice, during periods in which the government of the time posed that they were a threat to the state: in 1948 after Mahatma Gandhi's assassination, during the Emergency (1975–77), and after the 1992 Babri Masjid demolition. The bans were subsequently lifted, in 1949 after the RSS was absolved of charges in the Gandhi murder case, in 1977 as a result of the Emergency being revoked, and in 1993 when no evidence of any unlawful activities was found against it by the tribunal constituted under the Unlawful Activities (Prevention) Act.

हम्म मग माझ्या माहितीमधे काहीतरी गफलत आहे
कारण ऑन रेकॉर्ड आरेसेस नाही असाच माझा समज होता.

अरुण मनोहर's picture

20 Nov 2015 - 7:04 pm | अरुण मनोहर

हिंदू धर्मा विषयी आणि नंतरचा असभ्य भाषेतील प्रतीसादावरचा , असे दोन्ही धागे वाचले. मी मिपाच्या जन्मापासूनचा सभासद आहे. मी स्वत: देखील या मनोवृत्तीच्या दंडेली मधून गेलो आहे.
हे दंगे सोडले तर मिपा हे एक बरे स्थळ आहे. पण कोणी तरी तुमच्या धाग्यात म्हटले, तसे, तुम्ही त्या हिंदू धाग्यामध्ये खरच, गल्ली चुकला आहात. मिपा हे असले खोल आणि निरुत्तर करणारे प्रश्न सोडवायची जागा नाहीय. टीचर जेव्हा अतिशय कठीण प्रश्न देतात , तेव्हा वर्गात दंगा व्हायचाच . आणि त्यात असभ्य कार्टी हात धुवून घेणारच.

तास पाहिलं तर हिंदू म्हणविणारे आपण सगळेच ह्या उत्तरांच्या शोधात आहोत. आणि माझ्या मते ह्यांची सर्वमान्य अशी उत्तरे देखील नाहीत !

आणि, कठीण प्रश्न देखील मिपावर चर्चिले गेले आहेत, नाही असे नाही. पण तुमच्या धाग्यात काय गोची झाली बघा- म्हणजे माझे अनुमान १) तुम्ही प्रश्नाच्या अगदी सगळ्या अथ पासून इती पर्यंत फैरी झाडल्या. त्यामुळे लिहिण्यासारखे काही विशेष उरलेच नाही. कधी कधी मुद्दामच लूज ends किंवा कमजोर जागा दोडून इतराना देखील त्यात value add करायला स्कोप सोडावा लागतो. २) आणि इतका खोलवर विचारणा करणारा धागा, एका अगदी नवीन विद्यार्थ्याकडून मिपावर येणे? मिपावर काही "gangsters " नवीन बालकांचे ragging करायला देखील सज्ज असतात.

Any way , मिपावर स्वागत आणि पु.ले.शु.

तात्या's picture

20 Nov 2015 - 7:11 pm | तात्या

एका अगदी नवीन विद्यार्थ्याकडून मिपावर

हा विद्यार्थी जुना आहे फक्त गणवेश नवीन आहे

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 7:31 pm | राजेश कुलकर्णी

हा हा. तुमच्या प्रतिक्रियेमुळे फार आश्वस्त वाटले.

पहिल्या अनुक्रमांकाचा तुमचा मुद्दा अगदी चपखल. मी माझ्या परीने यादी केली आहे. शिवाय कोणाला आणखी काही सुचत असेल तर त्याचेही स्वागत केले आहे. पण ज्यांनी टवाळकी केली त्यांची या चर्चेत भाग घेण्याची इच्छा दिसली नाही. असो. नवीन व्यक्तीला सहभागी करून घेताना हे घर्षण व्हायचेच. किंवा तुम्ही म्हणता तसे हा रॅगिंगचाही प्रकार असावा. मी फेबुकवर गेल्या सहाएक महिन्यापासून लिहितो. लिहिण्याच्या बाबतीत तेवढ्याने काही सुधारणा झाली असावी.

तात्या, तुम्ही याआधीही कमेंट केलीत. तुम्ही मला आधीच्यापैकी कोण समजलात माहित नाही, पण मी खरोखरच प्रथमच आलो आहे. तुम्हीदेखिल थोटेफार रॅगिंग केलेतच. ते मोदकही तसे करताहेत की काय असा मला संशय आहे. हे गंमतीने. मी स्मायली वापरत नाही.

येथली नवीन पोस्ट टाकण्याची पद्धत म्हणावी तितकी सुलभ नाही. सुरूवातीला रजिस्टर केल्यावर ते कळल्यामुळे मधला वेळ गेला. तुम्ही मला कोणाचा नवीन अवतार समजलात हे सांगितलेत तर मी त्या व्यक्तीच्या पोस्ट्स पाहू शकेन.

धन्यवाद.

मी खरोखरच प्रथमच आलो आहे. तुम्हीदेखिल थोटेफार रॅगिंग केलेतच. ते मोदकही तसे करताहेत की काय असा मला संशय आहे.

ओके, म्हणून माझ्या प्रतिसादांना उत्तरे देत नाही आहात का?

राजेश कुलकर्णी's picture

21 Nov 2015 - 11:45 pm | राजेश कुलकर्णी

हा हा, तसे काही नाही.

पगला गजोधर's picture

20 Nov 2015 - 7:38 pm | पगला गजोधर

खरंतर हिंदू हे चूक,
आपला धर्म आहे सिंधू. सिंधू तीरावरी ...वै.

काय म्हणता सिंधू पाकिस्तानात आहे ?
स्वारी मंग चालू ठीवा हिंदू हिंदू म्हणून...
नैतर कट्टर लोक्काना सिंधूस्नान करावे लागेल, गंगास्नान मग दुय्यम ठरेल.

विवेकपटाईत's picture

20 Nov 2015 - 7:42 pm | विवेकपटाईत

स्वत:ला आणि ईश्वराला जाणून घेण्याची स्वतंत्रता ज्या धर्मात आहे, तो हिंदू धर्म. याच मुळे धार्मिक सहिष्णुता टिकलेली आहे. धर्म हि संकल्पना 'विशिष्ट पूजा पद्धतीवर' आधारित नाही आहे म्हणून काही लोकांना भ्रम होतो. 'विशिष्ट पूजा' पद्धती वर आधारित धर्म आपलीच पूजा पद्धती श्रेष्ठ आणि सर्वांची त्याचे पालन करावे हि अपेक्षा करतात. या वरून अत्यंत हिंसक असे संघर्ष होतात.

सुज्ञ's picture

21 Nov 2015 - 12:14 am | सुज्ञ

माननीय श्री राजेश कुलकर्णी . आपल्याला या धाग्यात्तून नक्की काय सुचवायचे आहे अथवा प्रश्न आहेत ते आकडे टाकून लिहा . चर्चा करु.
लेख टाकून लोक तुमच्या लेखाची टरच उडवणार हे धोरण का स्वीकारले ?

राजेश कुलकर्णी's picture

21 Nov 2015 - 11:50 pm | राजेश कुलकर्णी

प्रश्न स्पष्टपणे विचारलेलेच आहेत.
पहिला भाग: मी हिंदू आहे म्हणजे काय आहे?
दुसरा भाग: हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण> मला यात भगवे घालणारेच प्रतिनिधी असावेत हे अध्याह्ृत नाही.
तिसरा भाग: वरील प्रश्नांची नीट उकल करणे का आवश्यक आहे? तसे न केल्यामुळे काय फरक पडू शकतो, कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात.
लेख टाकून सारेच टर उडवतील असे मला वाटत नाही. तशी अपेक्षाही नाही.

अरुण मनोहर's picture

21 Nov 2015 - 3:08 am | अरुण मनोहर

राकु,
एक सल्ला http://www.misalpav.com/node/33755

कालचा हा लेख जरूर वाचा. असे वाटते आहे, की तुम्हाला तुमची अपेक्षित उत्तरे मिळतील.

मोदक's picture

21 Nov 2015 - 8:07 am | मोदक

हं, काय ठरलं मग?

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2015 - 10:29 am | प्रकाश घाटपांडे

कुठल्याही प्रश्नाला एकच एक उत्तर असते किंवा असले पाहिजे असा आग्रह सोडल्यास प्रश्नाच्या गाभ्याचे आकलन होण्यास मदत होते.कृष्ण धवल द्वैतात अडकलात की लुप मधे गेलाच म्हणून समजा. असो. मिपाच्या सुरवातीच्या काळात यावर अनुषंगिक बरच यावर लिहिल असल्याने आता कंटाळा येतो. नवनवीन आयडी येत राहतात किती वेळा तेच तेच लिहिणार.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 10:34 am | संदीप डांगे

नवीन आयडी, जुन्याच चर्चा यावर काहीतरी नक्की करता येईल.

म्हणजे होत काय की नवीन आयडी पण जुन्याच मुद्द्यांना इथे मांडत राहिले तर रस राहणार नाही. तेव्हा जुन्या चर्चा-धाग्यांमधे त्यांनी पूर्ण वाचन करून नवे मुद्दे मांडले तर मजा येईल. किंवा आपण विचार करतो ते मुद्दे आधीच मांडलेत हे पाहुन नवा आयडी कदाचित तेच ते लिहिणार नाही.

काहीतरी विधायक मार्ग काढायला पाहिजे.

अरुण मनोहर's picture

21 Nov 2015 - 10:39 am | अरुण मनोहर

लिंक द्या ना सर!

मृत्युन्जय's picture

21 Nov 2015 - 10:43 am | मृत्युन्जय

आता डी डी एल जे चा सिक्वेल येतो आहे म्हणे. म्हातारा शाहरुख आणि कजोल बघायाला मजा नाही यायची.

स्पेक्ट्रे मध्ये मोनिका बेलुच्ची आहे. ५१ वर्षाची. काय सुंदर दिसते अजुन. वयाचा विचार न करता भूमिकेचा विचार करुन अभिनेत्रींना चित्रपटात स्थान देणार्‍या हॉलीवूडला मानाचा मुजरा.

पाकिस्तानात मुजरे जोरात चालतात म्हणे. पण मुजरा या मूळ शालीन नृत्यप्रकाराची त्यांनी सध्या विटंबना चालवली आहे. तमाशा चालू आहे नुसता.

तमाशावरुन आठवले. मिपावर तरी वेगळे काय होते म्हणा आजकाल? नाव बदलुन चौफुलाव.कॉम का करु नये म्हणतो मी?

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2015 - 11:59 am | टवाळ कार्टा

याला नक्की पंख लागतील ;)

सतिश गावडे's picture

21 Nov 2015 - 4:46 pm | सतिश गावडे

तू कुठल्या पंचागात पाहून सांगितले हे?

टवाळ कार्टा's picture

22 Nov 2015 - 11:37 am | टवाळ कार्टा

पंचांग नाही ...सग्ळेच अंग बघितले आहे त्यामुळे वाटले ;)

हेमंत लाटकर's picture

21 Nov 2015 - 11:12 pm | हेमंत लाटकर

आधीच सर्व प्रकारचे टेन्शन अजून धाग्याचे टेन्शन कशाला देता राजेश सर.

मयुरMK's picture

22 Nov 2015 - 11:24 am | मयुरMK

या जगात एकच जात आहे - माणुस !
आणि धर्मही एकच - माणुसकी !

भाऊंचे भाऊ's picture

22 Nov 2015 - 7:52 pm | भाऊंचे भाऊ

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे ?

या प्रश्नाचे उत्तर कोणी सहज देऊन जाइल असे वाटत नाही कारण बहुतांश लोकांना मी हिंदु आहे म्हणजे अमुक जातीचा आहे यापलीकडे काहीच विषेश जाण नसते. अन ज्यांना ती असते ते याला अध्यात्मीक बाब ठरवतात धार्मीक नाही. म्हणजे ती जाणीव/ज्ञान फक्त हिंदुत्वापुरती मर्यादीत ते मानत नाहीत.

आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

जिवंत की मृत ?

याॅर्कर's picture

22 Nov 2015 - 8:49 pm | याॅर्कर

● "हिंदू" या नावाबद्दल दोन प्रकारची मते आहेत.
1)सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे(फारश्यांना 'स'च्या
जागी'ह' करायची सवय आहे.)
2)फारसी काय अरबी ते माहित नाही,पण त्यांच्या
शब्दकोशात म्हणे हिंदू शब्दाचा अर्थ दास/तुच्छ/ चोर/गुलाम/काफिर असा काहितरी आहे.

● मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे.इतर धर्मीयांच्या दृष्टीने तुम्ही 'हिंदू' नामक कंपूतील एक व्यक्ती आहात.तुमच्या दृष्टीने तुम्ही कोण आहात? याचे उत्तर तुम्हीच देऊ शकाल.

● आपल्या हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण?
1) एक प्रतिनिधी असतो असं काही नाहीये मुळी.
ज्याची विचारधारा पटते किंवा लोक ज्याच्याकडे
आकर्षिले जातात किंवा ज्याची आदरयुक्त भिती
वाटते अश्या व्यक्ती इतरांना पूज्य असतात.
2) बुवा/महाराज, भोंदू फोफावले आहेत हे खरे
आहे,त्यामुळे आपणच स्वतःचे प्रतिनिधी आहोत
(तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार)

● माझ्या अल्प ज्ञानानुसार सत्य हे आहे कि आपण म्हणजे हा देह नाही मी म्हणजे 'आत्मा' आहे
आणि या आत्म्याचे ध्येय एकच आहे ते म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणे किंवा त्याला जाणणे.आणि हा परमात्मा म्हणजेच सर्वशक्तिमान ईश्वर.तो निराकार आहे,ब्रह्मा विष्णु महेश या कल्पना आहेत.किंवा ही थोर माणसे असतील कदाचित,राम कृष्णाचेही तेच.ही थोर माणसे होऊन गेली ज्यांना परमात्म्याची अनुभूती होती.
.
.
.
.
आज एवढेच आणखी माहिती हवी असेल तर पुढच्या प्रतिक्रियेत.

मोगा's picture

22 Nov 2015 - 9:42 pm | मोगा

त्रयो वेदश्च कर्तारो धूर्त भंड निशाचरो.

( चौथा वेद का सोडला ?

राजेश कुलकर्णी,

तुमच्या प्रश्नांची यथामती उत्तरं देतो. या उत्तरांनी माझं समाधान होतं. ही मीच स्वत:साठी शोधली आहेत. माझी उत्तरं ज्याला रुचणार नाहीत त्यांनी कृपया स्वत:ची स्वत:च शोधावीत असा माझा आग्रह आहे. कारण प्रत्यक्ष उत्तरांपेक्षा शोधप्रक्रिया जास्त महत्त्वाची आणि रंजक आहे.

१.
>> मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे?

माझ्या मते मी हिंदू आहे कारण मी वैदिक परंपरा मानतो. वैदिक परंपरेत अनेक विधाने व महावाक्ये आहेत. त्यातले मला सर्वात अभिनव वाटणारे वाक्य म्हणजे 'एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति'. अर्थ उघड आहे. सत्य एकंच असून त्याची रूपं मात्र अनेक असतात. जे हिंदू मानतात त्यांची या एकसत्यवचनावर निष्ठा असते.

२.
>> आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रतिनिधी मी स्वत:च आहे.

असो.

आता तुमच्या शंकांवर यथामती भाष्य करतो.

१.
>> १) प्रतिनिधित्वाची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे विविध बाबा-बुवा-महाराज यांचे फावते.

इंग्लंडमध्ये (जिथे मी राहतो) ख्रिस्ती प्रतिनिधित्वाची भूमिका सुस्पष्ट असूनही सायकिक बुवाबाजी भरपूर चालते. बुवाबाजीचा धार्मिक वा सांप्रदायिक प्रतिनिधीत्वाशी काडीमात्र संबंध नाही. मात्र असं प्रतिनिधित्व निश्चित झालेलं बरं असतं.

२.
>> २) हिंदू धर्मात अनेक पंथ असल्यामुळे विस्कळीतपणा आणखी वाढतो. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे.
>> तर आम्हाला हिंदू धर्मातून वगळा ही या समाजातील काहींची मागणी मधूनमधून वृत्तपत्रात दिसते.

इस्लाम व ख्रिस्ती धर्मात अनेक पंथ असल्याने त्यांतही विस्कळीतपणा आहे.

३.
>> ३) शीख, बौद्ध धर्मीय हेदेखील हिंदूधर्मीयच आहेत असे हिंदू त्या धर्मांच्या पोटच्या जिव्हाळ्यामुळे म्हणतात.
>> परंतु या धर्मांची याबाबतची प्रत्यक्ष भूमिका वेगळी असते.

असं असलं वा नसलं तरीही हे पंथ वेदप्रामाण्य आणि कर्मसिद्धांत मानणारे आहेत.

४.
>> ४) .... कोणतीच सुसुत्रता नसल्यामुळे धर्म बदनाम होतो, चुकीच्या संकल्पना बोकाळतात.

संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीतले प्रक्षेप दूर करून मूळ प्रत सिद्ध केली. धर्माच्या शुद्धीचे कार्य अखंड चालू आहे. गोपींचा शृंगार मूळ महाभारतात नाही. पण कोणाला तो कल्पून काव्ये लिहावीशी वाटली तर बंदी नाही.

५.
>> ५) हिंदूह्रदयसम्राट अथवा हिंदू या शब्दाचा समावेश असलेली तत्सम बिरूदे लावून घेऊन काही स्वयंघोषित
>> नेते लोकांचा मानसिक गोंधळ वाढवतात.

लोकांचा गोंधळ का वाढतो ते माहीत नाही. माझा मात्र गोंधळ कधीच झाला नाही.

५.२
>> त्यांचे वा त्याच्या संघटनेचे अनेकदा होत असलेले धर्मविरोधी, झुंडशाहीचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन पाहून
>> हाच तो हिंदू धर्म का असा काहींचा समज होतो आणि हिंदू धर्माची त्यामुळे बदनामी होते.

सहमत. आज स्वत:ला कट्टर हिंदू म्हणवून घेणाऱ्यांना हिंदू धर्माची म्हणजे वैदिक परंपरेची मूलभूत माहितीदेखील नसते.

५.३
>> त्यात काही राजकीय लोकदेखील सामील असल्यामुळे अर्थातच राजकीय कारणांसाठी त्याचा वापर केला जातो.

सहमत.

६.
>> ६) .... धर्माच्या पातळीवर हिंदू समाज विभागला जातो. विभिन्न राजकीय विचारसारणी असण्यात काहीच गैर नाही,
>> परंतु त्यामुळे एकाच धर्मातील लोकांचे धृवीकरण होणे योग्य नाही, ....

हिंदूंचं ध्रुवीकरण होतंय की विभाजन?

७.
>> ७) भगव्या रंगाचा ध्वज वापरून काही राजकीय संघटना/पक्ष लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात.
>> भगव्या रंगाचे कपडे घातलेले काही जण वारंवार वादग्रस्त विधाने करतात, त्यामुळे देशातील धार्मिक तेढ वाढते
>> आणि देशाची प्रगती खुंटते.हे लोक खरोखरच हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का हे त्यामुळे शोधणे आवश्यक आहे.

बरोबर आहे.

८.
>> ८) अगदी अलीकडेच चालू झालेल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीला धार्मिक स्वरूप देऊन त्याचेही शास्त्र निर्माण
>> करण्यात येते आणि त्यामुळे भोंदूपणा वाढतो. अशा कितीतरी गोष्टी दाखवता येतील.

रामायणकाळापासून गुढी उभारण्याचा प्रघात आहे. तो अलीकडेच सुरू झालेला नाही. शिवाय गुढी उभारल्याने भोंदूपणा वाढल्याचा पुरावा नाही.

९.
>> ९) हिंदू धर्मियांमध्येच एकमेकांचा जातीय आणि जातीच्या आधारावरील तुच्छतेने सतत केला जाणारा उल्लेख एके
>> दिवशी कोणते रूद्र रूप धारण करेल याचा नेम नाही. याबाबतील कितीही कायदे केले तरी धार्मिक आणि सामाजिक
>> पातळीवर लोकांची मानसिकता बदलेपर्यंत हा बदल होणे शक्यच नाही.

ब्रिगेडी संघटना असं करतात. म्हणून त्यांना चाप लावायला हवा.

९.२
>> हा धोका असताना दुसरीकडे मात्र धार्मिक पातळीवर याची जबाबदारी कोण घेणार हेच निश्चित करता येत नाही.

धार्मिक पातळीवर याची जबाबदारी मी घेतली आहे. मी धर्मानुसार आचरण करून ब्रिगेड्यांचा विरोध करायचं ठरवलं आहे. या बाबतीत माझा आदर्श विवेकानंद आहेत.

१०.
>> १०) कोणतीच सुसुत्रता नसलयामुळे आपापल्या जातीपुरत्या संघटना निर्माण केल्या जाऊन धर्म सोयिस्करपणे
>> वा-यावर सोडला जातो. यात जातीय कट्टरपणा वाढीला लागतो हे वेगळे सांगायची गरज नाही.

सहमत.

११.
>> ११) मी वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजातील विविध घटकांना या प्रतिनिधींमध्ये समाविष्ट केलेच गेलेले नसेल
>> तर आगामी काळात धर्मालाच त्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकेल.

संभव आहे. मात्र हे प्रतिनिधी कसले ते कृपया स्पष्ट करावे.

१२.
>> १२) कोणी हिंदू धर्मातील प्रथांना विरोध करायला गेले तर ते काय सांगतात – का सांगतात, याकडे लक्ष देण्याऐवजी
>> त्यांना इतर धर्मातील विसंगती दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का असे म्हणून त्यांच्या भुमिकेवर धर्मविरोधी असा
>> ठप्पा मारण्यात येतो. धार्मिक पातळीवर या गोष्टींचा योग्य त्या प्रतिनिधीकडून या बाबतीत काही निर्णय घेता आले
>> तर कितीतरी गोष्टी संघर्षाच्या थराला जाणारच नाहीत. यामुळे समाजातील सौहार्द्रता वाढेल हे सांगायची गरज नाही.

सहमत. मात्र अनाठायी प्रथांना विरोध करणाऱ्यांनी त्यांचं उद्दिष्ट सरळपणे मांडावं. उगीच पर्यावरण वा स्त्रीपुरुष समानता वगैरे मुद्दे मध्ये आणू नयेत.

१३.
>> १३) धर्माच्या प्रतिनिधित्वाबाबत काहीत निश्चित नसल्यामुळे विविध जातींमधील विविध पातळीवरील राजकीय
>> नेतेच या जातींचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतात. अलीकडे
>> जातींच्या आधारावर मागितली जाणारी आरछणे त्यांपैकीच एक. धर्माच्या प्रतिनिधित्वाची संकल्पना निश्चित झाली
>> तर अशा संधीसाधूंना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सतत गढूळ होणा-या सामाजिक वातावणाला पायबंद बसेल.

सहमत. म्हणूनच शंकराचार्य हे संबोधन वाट्टेल त्याला मिळू नये. आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांच्या पीठाधीशांनाच केवळ शंकराचार्य म्हणण्यात यावं.

१४.
>> १४) आज देशातील मोठी लोकसंख्या धार्मिक जाणीवेच्या बाबतीत खरे तर निद्रिस्त आहे. मग ते सुशिक्षित वा
>> अशिक्षित असोत वा गरीब असो. कारण रोजच्या जीवनसंघर्षातून त्यांना या गोष्टींचा विचार करायला वेळ नाही.
>> पण यातील काही टक्के लोक तरी या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागले तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल.

असहमत. डोळसपणे विचार केल्यावर कठीण परिस्थिती उद्भवायला नको.

------------------------------------

असो. तुमच्या विचारांवर जसे जमेल तसे भाष्य केले आहे. काही त्रुटी असल्यास कृपया निदर्शनास आणाव्यात.

आ.न.,
-गा.पै.

अर्धवटराव's picture

23 Nov 2015 - 12:38 am | अर्धवटराव

मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे?

अस्तित्वाप्रति जिज्ञासेवर आधारीत एका पुरातन जीवनपद्धतीचे फॉलोवर असणे म्हणजे हिंदु असणे.

आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?

तसं पाहिलं प्रत्येक व्यक्ती प्रतिनिधीच आहे. एरवी ज्यांचं म्हणणं पटतं असा कुणीही प्रतिनीधी बनतो.बर्‍याचशा इन्स्टीट्युट्स आपापली गटबाजी चालवतात.

हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही.

हे खरं आहे. आणि त्यामुळी काहि फायदा-नुकसान होतं का हा काहि लोकांसाठी संशोधनाचा विषय आहे.

वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते.

जातिव्यवस्थेचं मूळ "डिव्हीजन ऑफ लेबर" मधे आहे. मध्ययुगाची सांगता होता होता मानवी जीवनाची जवळपास प्रत्येक बाब धर्मव्यवस्थेच्या आवरणात आलि. सद्य:स्थितीत जातीव्यवस्थेला सत्ताकारण जास्त इन्फ्लुएन्स करतय.

१४ मुद्दे आवडले. एकदाका धर्माला व्यवस्थेचं रूप दिलं कि त्यात कुठल्याही इतर व्यवस्थेप्रमाणे अनेक डायनॅमिक्स येतात. ते टाळाता येत नाहि, व टाळणं योग्य पण नाहि.

मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?

'हिंदु' नामक आयडेण्टीटी तुम्हाला कुठे वापरायची आहे ? सकाळी उठुन उगाच स्वतःला हिंदु म्हणुन घ्यायची हौस असेल तर त्याला कुणी आडकाठी करणार नाहि. काहि साधना वगैरे करायची असेल तर त्याचे अनेक पर्याय आहेत. कुठल्या कागदपत्रात धर्म नमुद करायचा असेल तर तिथे कुणी सर्टीफिकेट मागत नाहि. इतर कुणाला तुमचं हिंदुत्वं सिद्ध करायचं असेल तर ते तसंही सरळ तुमच्या छातडात गोळ्या घालतात.

एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही.कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत.

दुर्दैवाने हि समस्या उग्र होऊ शकते. पण त्यामागे माणासाची रक्तपिपासा आहे, हव्यास आहे. धर्माच्या परिभाषा कितीही दृढ करा, जे प्रॉब्लेम यायचे ते येणारच आहेत. कारण मूळ समस्या धर्माच्या मोघमपणाची नाहि तर माणासाच्या हावरटपणाची आहे. असो.

सतिश पाटील's picture

23 Nov 2015 - 12:23 pm | सतिश पाटील

मायला हे राकू नक्कीच मंगळ ग्रहावर जलम्लाय

हे तिथनं पडलंय खाली,

पिके ची अवलाद आरके ( राकू )