पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
18 Nov 2015 - 5:09 pm
गाभा: 

पिंगा.

येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू.

मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता.

बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो.

गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच.

भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला?
मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा!
तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा!
असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका)
तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही.
पिंगा नेमका कधी घालतात?
या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही.

या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे.

मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो.

पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला
वेल्ला भट

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 5:12 pm | मांत्रिक

सहमत!
अगदी दुर्दैवी प्रकार आहे!
इतिहासाची धडधडीत चेष्टा करणारा हीन आणि हिणकस सिनेमा..

नया है वह's picture

18 Nov 2015 - 5:26 pm | नया है वह

बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे.

भंसाळींच्याच देवदासमधलं गाणं चाललं, म्हणून तसंच इथेही करायचंय त्यांना. इतिहास काय आपण दाखवतोय काय, काही लॉजिकंच नाही. फक्त पैसा मिळाला पाहिजे, मग तो कसाही मिळाला तरी चालेल असं दिसतंय. नॉर्थ इंडियन लोकांना शाळेत (सीबीएसई) मराठी इतिहास कमी असतो, म्हणजे आधीच कमी माहिती त्यात अजून बाजीराव बघून असा नाच इतिहासात झालेला आहे हे एक आणि असे लावलेले अजून काही शोध हा असाच इतिहास आहे असंच वाटेल त्यांना. पेशव्यांच्या वंशजांना जेंव्हा पार्टिला बोलावलं होतं तेंव्हा (आणि आत्ता पण) ह्यात काहीच चूक वाटलं नाही का?

१- चित्रपटातील गाण्यात दाखवल तशी टोपी ती खरच घालत असे का ?
२- ती त्यात दाखवलं तशी मॅन्डोलीन वाजवत असे का ?
३- त्यांच्या कडे तसा शीश महल वास्तवात होता का ?
४- दोन्ही स्त्रीयांमध्ये मैत्रीपुर्ण स्पर्धा दाखवलेली दिसते तशी खरोखर च होती का ?
५- लास्ट बट नॉट द लीस्ट मस्तानी ने खालेल्ला पान गळ्यातुन आरपार ते दिसत असे ते खर होत का ?
आणि ते खर होतंच तर ती काही भयानक रोगग्रस्त वा अगदी आतल्या वाहीन्या दिसाव्या इतकी कृश होती का ?
आणि असं शरीर असणं यात सौंदर्य कुणाला काय आढळल असावं.
की हे आपलं नाजुकी उनके लब की क्या कहीए एक पंखुडी गुलाब की सी है
इन पॉवो को जमीन पर ना रखना मैले हो जाएंगे
की ते बोसा हमने लिया था ख्वाब मे आरीज उनके नीले पड गये
टाइप शायरीइश कविकल्पनाच आहे ?
बाकी बाजीराव बाजीराव सारखाच वाटतो दिसतो यात दुमत नसावे.

पिलीयन रायडर's picture

18 Nov 2015 - 5:47 pm | पिलीयन रायडर

पिंगा ह्या गाण्यानी माझंही डोकं फार फिरवलं आहे आणि चेपुवर करायची ती चिडचिड करुन झालेली आहे.

नऊवार नेसण्याचेही प्रकार असतात. पैकी मला आठवतय की मी जेव्हा पहिल्यांदा कॉलेजमध्ये असताना एका आजींकडुन साडी नेसुन घेतली होती तेव्हा त्यांनी "पेशवाई" की "ब्राह्मणी" अशा प्रकारची समोरुन काठ परत कमरेला खोचायचा असतो अशी नऊवार नेसवली होती. अर्थात पदर दोन्ही खांद्यावर होता आणि पोट सोडा, पोटरी सुद्धा मागुन दिसत नव्हती.

आता इथे साक्षात काशीबाई आपल्या सवतीच्या कौतुकाची गाणी गात, तिच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पहात.. "मंगळागौरीची" गाणी गात लावणीच करत आहेत! क्या बात है!! लगे हाथो आयटम नंबर पण होऊन गेला पेशवाई साम्राज्यात. जिथे बायकांना दरबारी सुद्धा एका विशिष्ट दालनात, पडद्यामागे वगैरे बसण्याची पद्धत होती (ही माझी ऐकीव माहिती बर का) तिथे डायरेक्ट राणीच दणादणा नाचतेय.. मराठमोळा, जुन्या पद्धतीचा पदरेला कंबर खोचुन केलेला पिंगा नाही तर उघडी कंबर कचाकच हलवत आणि लावणीचे हावभाव करत!!! आहात कुठे..??

एका गटाचे असेही म्हणणे आहे की कसा का होईना, तुमच्या मराठी लोकांचा इतिहास तर जगभर पोहचवला ना...

खरंय.. आम्ही दळभद्री लोक, तुमचे उपकार मानायचे सोडुन चिकित्सा करत बसलोय.. जोड्यानं दोन हाणा गालात, पण पिक्चर काढा आमच्या इतिहासावर.. तसंही तुम्ही काहिही दाखवलं तरी गल्ला भरणारच आहात. आम्ही पण मग "पिंगा"च्या रिमिक्स व्हर्जनवर गणपतीत नाचु.. हाकानाका..

वेल्लाभट's picture

18 Nov 2015 - 5:50 pm | वेल्लाभट

सणसणीत.

स्रुजा's picture

18 Nov 2015 - 7:28 pm | स्रुजा

अगदी १०० % सहमत. बुकलुन काढणार आहे मी त्या भन्साळ्याला !! काय त्रास आहे यार ! एक तर त्याने लावणी आणि पिंगा या दोन नाच प्रकारात जाम गोंधळ घातला आहे. लावणी ही मुख्यतः पुरुषांनी भरलेल्या रंगमंदिराला भुलवण्यासाठी म्हणुन केली जाते त्यामुळे ती नृत्यशैली पण थोडी प्रोव्होकेटिव आहे. पिंगा मंगळागौरी चा असतो, मुली मुली एकत्र येऊन जे खेळ खेळतात ते पिंगा !! इतके सुंदर खेळ असतात ते, आणि त्यात देखील मजा असते. जिची मंगळागौर असते तिला मध्यवर्ती ठेवुन अनेक लाडीक, खोडकर गाणी म्हणली जातात , आणि एंजॉय करतात. यात एक तर काशीबाई आणि मस्तानी लावणी स्टेप्स करतायेत. त्यात त्यांचा शेला गायब आहे. तू म्हणते आहेस तसं नौवारी नेसायची पद्धत अगदीच गंडली आहे. ९ वारी स्टाईल मध्ये घागरा चोळी वाटते आहे.

मुळात वर वेल्लाभट म्हणतात तसं ती काही एक चीप प्रेमकथा नाही, तो काही कुणी छंदी फंदी माणुस नव्हता. एवढ्या मोठ्या राज्याची जबाबदारी उचलणारा, मनस्वी नायक होता. त्याला परिवार पण हवा होता आणि तो मस्तानी मध्ये पण गुंतला होता. काशीबाई देखील या दोन्ही मध्ये खुप भरडल्या गेल्या असणार. एवढा कर्तबगार नवरा , त्याची २ तितकीच हुशार मुलं पदरात; असं असताना प्रेम आणि त्यांचं स्वत्व यात सतत युद्ध चालू असणार. मी कल्पना देखील करु शकत नाही की त्या मस्तानी बरोबर लावणी म्हणतायेत , ते ही पिंगा पिंगा करत !! देवदास सिनेमामध्ये ही लिबर्टी चालून गेली कारण बोलुन चालुन तो एक कल्पनाविलास होता. इथे प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासामध्ये हा माणुस काय विचार करुन स्वत :ची भर घालतोय देव जाणे.

त्यात ही , मुळात तो इतिहास आहे तसाच अत्यंत नाट्यपूर्ण आणि विस्मयचकीत करवणारा आहे. त्यात शौर्य आहे, प्रेम आहे, राजकारण आहे, कारुण्य आहे आणि सगळं अगदी ठासुन भरलं आहे. त्याला आणखीन ड्रामेबाज करायची गरज च का पडावी? दिपीका कितीही सुंदर असली तरी "मस्तानी" नक्कीच दिसत नाही. चिमाजी अप्पांच्या भुमिकेत वैभव तत्ववादी आहे ते योग्य पण बाजीराव म्हणुन रणवीर !!! पेशवे चित्पाव्॑नी गोरे नव्हते, युद्धाने रापले होते हे जरी मान्य केलं तरी घारे डोळे??? ते पण काळे झाले का? जरा देखील सत्याच्या जवळ जाणारं कास्टिंग नाहीये.

हे असा भेसळ केलेला इतिहास लोकांसमोर येऊन काय उपयोग? बॉलिवुडी डान्स आणि शीश महल आणि बाकी चकाचौन गोष्टींशिवाय देखील मराठी इतिहास अत्यंत भव्य दिव्य होता कारण ती भव्यता कपड्यांवर आणि आजुबाजुच्या गोष्टींवर च फक्त अवलंबुन नव्हती. "लार्जर दॅन लाईफ" आयुष्य जगलेली माणसं तेंव्हा अस्तित्वात होती आणि खरं तर त्या मुळेच इतिहास घडला.

साला, पिच्चरच्या निमित्ताने पेशव्यांना तेवढीच प्रसिद्धी मिळेल म्हणून मी याची वकिलीच करत होतो आजवर...पण हे गाणे पाहून भ्रमनिरास झाला फुल्लच. देवदास काय सुटत नाय भन्साळीचा. दोन बायका पटकथेत आहेत म्हणून पारो आणि चंद्रमुखीच असाव्यात? अडाण** साले. हाड तेच्यायला.

मारवा's picture

18 Nov 2015 - 6:00 pm | मारवा

बॅटमॅन जी
बाजीराव एक उत्कृष्ठ योद्धा होता. व मस्तानी प्रकरणाकडेच त्याचा उल्लेख वळवला जात असतो.
तुम्ही एकदा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावचं युद्ध लढाया आदी बाबतीतलं कर्तुत्वाची
ओळख करुन द्यावी.
आम्हाला ते ३९ लढाया एकही न हरता इतकीच एका ओळीची माहीती असते.
आपण आपल्या इतिहासाच्या ज्ञानाने आम्हाला बाजीरावाच्या अ‍ॅज अ वॉरीयर ओळख करुन द्यावी.
ही विनंती

रमेश आठवले's picture

18 Nov 2015 - 9:44 pm | रमेश आठवले

दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटीश जनरल मोन्टगोमरी यांनी त्यांच्या The Concise History of Warfare या पुस्तकात बाजीराव पेशव्यांनी घोड दळा चा चपळतेने व सुरेख वापर करून नाशिक जवळ पालखेड येथे १७२८ साली निजामावर मिळवलेल्या विजयाची तारिफ केली आहे .
फक्त वीस वर्षाच्या कारकिर्दीत बाजीरावांनी ३९ लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्या.

काकासाहेब केंजळे's picture

18 Nov 2015 - 10:36 pm | काकासाहेब केंजळे

पालखेडच्या लढाईचे मॉडेल अमेरीकन सैनिकाना शिकवले जाते असे निनाद बेडेकरांच्या एका व्याख्यानात ऐकले होते ,गल्फ वॉर १ व २ मध्ये या तंत्राचा वापर झाला होता हे हि त्यांनी सांगितलेले आठवते.

राजाभाऊ's picture

18 Nov 2015 - 11:12 pm | राजाभाऊ

पालखेड लढाई आणि अमेरिकन मिलिटरी स्कुल्स याचा संबंध शोधायचा प्रयत्न केला, हाती काहिहि लागलं नाहि. लाॅंग रेंज मिसायल्स, ड्रोनच्या (बी२ बाॅंबर तर दुर) जमान्यात हे थोडं फारफेच्ड वाटतंय...

वाचण्यात आलंय कि हे बेडेकर साहेब, बाजीराव मस्तानी प्रोजेक्टवर भंसाळीचे ॲडवायजर होते. "पिंगा" गाण्यात प्रदर्शित केलेलं इतिहासाचं विक्रुतीकरण त्याना खटकलं नाहि?

पालखेड लढाई आणि अमेरिकन मिलिटरी स्कुल्स याचा संबंध शोधायचा प्रयत्न केला, हाती काहिहि लागलं नाहि.

युनायटेड स्टेट्स मिलिटरी अकादमी,वेस्टपॉइंट,न्यूयॉर्क...हि माहिती डॉ. स्टुअर्ट गॉर्डन (मराठा इतिहासकार) यांनी एका भाषणात दिली आहे.

दुर्दैवाने निनाद बेडेकरांचे ६ महिन्यापूर्वी निधन झाले.

तसेच ॲडवायजर ने कितीही सल्ले दिले तरी, दिग्दर्शक व निर्माते त्यांना काय करायचं ते करतातच. उदा. इंटरस्टेलर साठी कीप थोर्न ॲडवायजर म्हणून होते. तरीदेखील चित्रपटात भौतिकशास्त्राशी निगडीत चुका आहेतच.

बेडेकर गेल्याचं माहित नव्हतं. ते हयात असते तर त्यांनी नक्किच निषेध नोंदवला असता; तो कुठे दिसला नाहि म्हणुनच वरची शंका बोलुन दाखवली.

बाकि सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात, इंटरस्टेलर या चित्रपटाच्या दरम्यान झालेली किप थोर्न, क्रिस नोलन ची मुलाखत बरंच काहि सांगुन जाते...

बॅटमॅन's picture

19 Nov 2015 - 10:20 am | बॅटमॅन

पालखेडच्या लढाईचा उल्लेख माँटगोमेरीच्या पुस्तकात आहे. तो स्वतः निनाद बेडेकरांकडूनच अस्सल पुस्तकात पाहण्याचे भाग्य लाभले आहे.

मात्र मिलिटरी स्कूलमध्ये शिकवले जाणे इ. ला काही पुरावा आहे असे दिसत नाही.

बॅटमॅन राव
थोडंस निनाद बेडेकरांची या लढाई संदर्भातील वक्तव्ये मते
आपल्या बरोबर झालेला संवाद थोडा आमच्याही वाट्याला येऊ द्या ना.
अस तुम्ही सांगितल नाही तर दुसरी बाजु उजळ बाजु कशी समोर येणार मग ?
अप्रचलित झाकलेला भाग समोर येणं हे कधीही सर्वात जास्त महत्वाचं नसत का ?
१०० तील १०० स बाजीराव म्हटला की मस्तानी माहीती असते मात्र पालखेडची लढाई कदाचित
१०० तील १ स च माहीत असते.

बॅटमॅन's picture

19 Nov 2015 - 12:51 pm | बॅटमॅन

विशेष चर्चा झाली नव्हती. माँटगोमेरीचा उल्लेख त्यांनी केला तेव्हा आम्ही पुरावा विचारला, लगेच हातासरशी त्यांनी काढूनही दाखवला. तेवढीच त्यासंदर्भात झालेली चर्चा.

मालोजीराव's picture

19 Nov 2015 - 1:19 pm | मालोजीराव

The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao [I] out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility -British General Field Marshall Bernard Montgomery

येस्सार, हेच ते वाक्य त्यांनी त्यांच्याकडच्या हार्ड कॉपीतले काढून दाखवले होते.

मित्रहो's picture

18 Nov 2015 - 6:51 pm | मित्रहो

एखादी भव्य दिव्य लढाई दाखविली असती तरी प्रेक्षक मिळाला असता हे भिकार गाणे करायची गरज नव्हती.

पिच्चर आंतरजालावर येण्याच्या प्रतीक्षेत:)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Nov 2015 - 8:14 pm | बिपिन कार्यकर्ते

"हाड तेच्यायला."

+१

हे वाक्य बॅट्या जेवढ्या त्वेषाने बोललाय तेवढ्याच त्वेषाने बोलतो.... हाड तेच्यायला.

सर्वसाक्षी's picture

18 Nov 2015 - 5:52 pm | सर्वसाक्षी

सहिष्णु वृत्तिने लोक चित्रपट पाहतील, भरपूर गल्ला जमेल. लोक चित्रपट गृहात शिट्या मारतील, बाहेर पडताना आजुबाला दिसणार्‍या मुलींकडे पाहुन 'ए मस्तानी' अशा हाका मारतील. नामवंत लोक 'या निमित्ताने आमचे बाजीराव पेशवे सार्‍या देशाला दिसले' असे भरभरून कौतुक करतील. झालच तर काशीबाई मस्तानी हे दोन धर्माच्या ऐक्याचे प्रतिक आहे असे म्हणत निर्मात्याला एखादं राष्ट्रिय एकात्मका पारितोषिक मिळावं अशी शिपफारसही करतील.

मुळात चित्रपट पाहायला जाणारे दिपीका आणि प्रियांका पाहायला जातील, त्यांना बाजीरावाचा इतिहास कितपत माहित असेल कोण जाणे. अर्थात त्यांना त्याच्याशी सोयरसुतक नसेल. तीन तास टाईमपास धमालमस्ती. मध्यंतरात पॉपकॉर्न.

तुम्हा आम्हा सारखे बाजीरावाचे प्रेम असलेले चित्रपट पाहायला जातील की नाही शंकाच आहे पण त्याने निर्मात्याला फरक पडणार नाही, जसा मूठभर सुशिक्षित लोकांनी मत न दिल्याने उमेदवारांना पडत नाही.

सुहास झेले's picture

18 Nov 2015 - 6:12 pm | सुहास झेले

सहमत...

अभिजीत अवलिया's picture

19 Nov 2015 - 9:52 am | अभिजीत अवलिया

सहमत ...

प्रसाद१९७१'s picture

18 Nov 2015 - 6:02 pm | प्रसाद१९७१

अहो हे गाणे सिनेमात मधे नाहीये. सिनेमा संपल्यावर श्रेय-नामावली दाखवताना बाजूला हे गाणे दाखवणार आहेत.

हल्ली तशी स्टाईल आहे ना. अश्या गाण्यांचा सिनेमाच्या कथेशी संबंध नसतो. पब्लिसीटी साठी अशी गाणी तयार करतात पण ती तशीच सिनेमात घालत नाहीत. हे पण तश्याच गाण्यांपैकी आहे.

त्यामुळे कावून जाऊ नका.

कपिलमुनी's picture

18 Nov 2015 - 6:21 pm | कपिलमुनी

गाणे सिनेमात मधे नाहीये. ?
मग त्याने काय फरक पडतो ?
पात्रे तर तीच आहेत ना ?

बाकी रीलीजच्या अगोदरच तुम्हाला असलेली माहिती बघून तुम्ही सेन्सॉरमध्ये असता काय असा प्रश्न पडलाय

प्रसाद१९७१'s picture

20 Nov 2015 - 10:07 am | प्रसाद१९७१

गाणे सिनेमात मधे नाहीये. ?

नाही, सिनेमात नाही. प्रसिद्धी साठीचे गिमिक आहे.

बाकी रीलीजच्या अगोदरच तुम्हाला असलेली माहिती बघून तुम्ही सेन्सॉरमध्ये असता काय असा प्रश्न पडलाय

असते कोणाला आतली बातमी माहीती.

पैसा's picture

18 Nov 2015 - 6:18 pm | पैसा

मी त्या गाण्याच्या ऑफिशियल व्हिडिओ यूट्यूबच्या पानावर शिव्या घालून आलेय. १३०० प्रतिक्रियांमधे शिव्या देणारी मी एकटीच असावी बहुधा.

नुकताच लावणी-तमाशाचा इतिहास वाचला, http://digitalkatta.com/2015/11/01/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95%... त्यानुसार तमाशात बायका नाचण्याच्या प्रकार पेशवाई संपून नंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाला. बाजीरावाच्या काळात शाहिरी तमाशात नाचे पोरे असत. अशा परिस्थितीत बाजीरावाच्या दोन बायका लावणीचे हावभाव करत नाचतात तेही नऊवारी साडीच्या नावावर चिंध्या पांघरून हे सहन करण्यापलिकडचे आहे. नऊवारी साडी नेसून लावणी कशी सादर करतात हे बघायचे असेल तर सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर वगैरेंचा कोणताही प्रोग्राम बघावा.

बरे ज्याला पिंगा म्हटलंय तो पिंगाही नाहीच. मंगळागौरीला "दिंडा" नावाचा खेळ खेळतात. त्याच्या जवळपास जाणारे काही हातवारे आहेत खरे. या "फिल्मी स्वातंत्र्याच्या" नावाखाली जे काय दाखवले आहे त्याचा त्रिवार धिक्कार. शिरीष कणेकरांनी म्हटल्याप्रमाणे बाजीराव आणि निजाम "इमली का बुटा" म्हणत नाचतात का एवढेच बघायचे राहिले आहे.

येस्स! पिंगा हा कमरेत वाकून गोल फिरण्याचा प्रकार आहे. त्यात पाय न हलवता तसे घुमणे बरेच कठीण असते. त्या दोघी ज्याप्रकारे नाचल्यात तो पिंगा नव्हे.

वेल्लाभट's picture

20 Nov 2015 - 10:30 am | वेल्लाभट

बेस्ट. मीही केलं ते.

मारवा's picture

18 Nov 2015 - 6:22 pm | मारवा

दिंडा खेळावर कृपया विस्तार करावा.

पैसा's picture

18 Nov 2015 - 6:32 pm | पैसा

या व्हिडिओमधे ०.५० ते १.० हात कोपरावर आपटून फट फट असा आवाज काढत जो खेळ आहे त्याला दिंडा मोडणे असे म्हणतात. या व्हिडिओमधे हे गाणे कोळी नृत्यासारखे बसवले आहे. पण त्यातला हाच भाग दिंड्याचा आहे.

पगला गजोधर's picture

18 Nov 2015 - 6:24 pm | पगला गजोधर

शिवाजीमहाराज व थोरला बाजीराव, हे जात धर्म यांच्या पलीकडे पाहणारे संघटक, सहकाऱ्यात भावंड भावना जोपासणारे नेतृत्व, आणि उत्कृस्थ योद्धे होते. ( बारकाईने पहा त्यांचा जीवाला जीव देण्यार्यात दुसर्या जात धर्माचे होते, व त्यांच्या मार्गात काटे पसरवणारे त्यांच्याच जाती/ धर्माचे होते )
अश्या रण धुरांदाराच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करून, केवळ प्रणयजिवना विषयी लफडेबाजी म्हणून राळ उडवण्याचा करंटेपणा करणाऱ्यांची कीव येते.

शब्दबम्बाळ's picture

18 Nov 2015 - 6:32 pm | शब्दबम्बाळ

अहो मस्तानी तर त्यांची बायको होती!(बरोबर आहे ना?) मग कोणाला काय कारण लफडेबाजी वगैरे म्हणायचं?
आणि तरीही म्हणत असतील तर ती त्यांची चुकी आहे...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Nov 2015 - 6:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

हिंदी चित्रपटवाल्यांनी तर्क्,ईतिहास वगैरे वापरून चित्रपट बनववेत अशी अपेक्षा म्हणजे एखाद्या कट्टर मौलवीने घरी सत्यनारायण केल्यासारखे..चित्रपट फक्त चालला पाहिजे हेच व अगदी हेच ध्येय असते त्यांचे. असो.
चित्रपटाकडे फक्त मनोरंजन म्हणून बघावे असे ह्यांचे मत.

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 6:54 pm | मांत्रिक

माई, बरेच दिवसांनी दिसलात.

मोगा's picture

21 Dec 2015 - 9:33 pm | मोगा

अगो ते मौलवी , सत्यनारायणवाले , राजे अन पेशवे सगळे आपापला व्यवसाय फायदेशीर कसा होइइल हेच बघायचे ना ? कधी युद्ध काय , कधी तह काय , कधी कुणाला मुलगी देणं काय आणि मुलगी घेणं काय , स्वतःचं सैन्य न वापरता दुसर्‍याच्या वानरसेकडुन सेतू बांधुन घेणं काय ... आपापला व्यवसाय किफायतशीर करण्याचेच हे सगळे प्रयत्न होते !

अन हेच सगळं भन्साळीनं त्याच्या व्यवसायात केलं तर तो मात्र वैट्ट !

गामा पैलवान's picture

21 Dec 2015 - 10:23 pm | गामा पैलवान

काहीही हं मोगा. तुम्ही म्हणता तसे शिवाजी महाराज नव्हते बरंका.
आ.न.,
-गा.पै.

मोगा's picture

22 Dec 2015 - 12:43 am | मोगा

मग त्याना सन्माननीय अपवाद असे माना.

काळा पहाड's picture

22 Dec 2015 - 12:14 am | काळा पहाड

तुम्ही अजून मोकळेच आहात? 'आत' घातलं नाही वाटतं!

उगा काहितरीच's picture

18 Nov 2015 - 6:32 pm | उगा काहितरीच

अरेरे! असं आहे तर एकंदरीत ! मला वाटलं होतं की बाजीराव या काहीशा दुर्लक्षीत योद्ध्याच्या जीवनावर आधारित , मोठमोठे युद्धप्रसंग असलेला भव्य चित्रपट पाहायला मिळेल . आता केवळ बाजीरावांची बदनामी होऊ नये इतकीच माफक अपेक्षा ...

मुक्त विहारि's picture

18 Nov 2015 - 6:35 pm | मुक्त विहारि

पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवणे, कधी पण उत्तम....

आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे.

मारवा's picture

18 Nov 2015 - 6:56 pm | मारवा

खाणावळीत मित्राच्या खाणावळीत कधीमधी फिस्ट असली
तरी तुम्ही जात नाही का ?
म्हणजे स्पेशल आयटम असला तर अस म्हणतो.
शेवटचे खानावळी कधी गेलेला ?

मुक्त विहारि's picture

18 Nov 2015 - 11:03 pm | मुक्त विहारि

एका महान खानावळीत शेवटचे गेलो.

सध्या तरी पंचतारांकित जेवण मिळत असल्याने आणि ते आता आयुष्यभर परवडत असल्याने, मुद्दाम वेडी-वाकडी वाट करून खानावळीत कशाला जाईन?

राहता राहिला प्रश्र्न स्पेशल आयटम बाबत.... स्पेशल आयटम देखील आजकाल कुठले बुरखे आणि कुठली कुठली ठिगळे लावलेली वस्त्रे नेसून येईल ते काही सांगता येत नाही....

भाऊंचे भाऊ's picture

20 Nov 2015 - 7:02 pm | भाऊंचे भाऊ

आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे.

ब्रॅड् पिटच्या ट्रॉयमधेही ही सिनेमॅटीक लिबर्टी बरीच घेतलेली आहे.

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2015 - 7:55 pm | टवाळ कार्टा

आग्गाग्गा....कुठे तो ट्रॉय पिच्चर आणि कुठे बालिवूडातला पिच्चर

अभ्या..'s picture

20 Nov 2015 - 8:37 pm | अभ्या..

आता ते ससा आणि गंडस्थळ न आण्ल्याबद्दल धन्यवाद.
.
वासुकी आणी गांडूळ
पाल आणि डैनासॉर
किरडू आणि शेषनाग
नेक्ष्ट टैम ह्या उपमा वापरल्या तरी चालेल.

मोगा's picture

21 Dec 2015 - 8:17 pm | मोगा

हिमालय व मुतखडा

पण त्या गाण्यावरून पिक्चरचे नाव बदलून सवत माझी लाडकी हे ठेवले जाणार आहे असे ऐकले बुवा ;)

ते ह्याचे नव्हे, 'जय मल्हार' चे ठेवणार आहेत.

म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली.

अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे. तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!!

काल हापिसात यावर चर्चा चाललेली असताना एका मराठी महाभागाने विचारलेला प्रश्न ऐकून मी गारच पडलो. "काशीबाई ही बाजीरावाची बायको 'असते' का?"

तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!!

ह्याचा काय संबंध आहे? असला प्रश्न सूडकडून अपेक्षित नव्हता.

अरे , म्हणजे त्यातल्या फारेनच्या पेशवीणी असतील तर त्यांना काय माहीत असणार अशा अर्थानं म्हणतोय मी.

अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे.

सूड अरे त्यांची पिढी जाऊदे, इथे हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे… 'बल्लाड' म्हणे :))

baji

सूड's picture

20 Nov 2015 - 3:25 pm | सूड

कहर!! =))

आदिजोशी's picture

20 Nov 2015 - 6:08 pm | आदिजोशी

Ballad शब्दाचा अर्थ एखादी कथा सादर करणारे काव्य. आपल्याकडे पोवाडा असतो तसाच काहीसा इंग्रजांचा पोवाडा म्हणजे Ballad. ह्याच शब्दाचा अजून एक थोड अप्रचलीत अर्थ म्हणजे रोमँटीक काव्य.
त्या अर्थाने शब्द बरोबर आहे. आडनाव म्हणून वापरलाय असं वाटत नाही.

बॅटमॅन's picture

20 Nov 2015 - 6:18 pm | बॅटमॅन

=)) =))

ते एक असोच, पण बाजीरावाचे नाव पूर्ण लिहितोय असे वाटतेय. उत्तर भारतीय लोक्स ळ चे ड करतात त्यातलाच हा प्रकार आहे.

आदिजोशी's picture

20 Nov 2015 - 6:25 pm | आदिजोशी

काहीही हां बॅ :)

बॅटमॅनचा तर्क बरोबर वाटतोय. ळ चा ड करतात ते लोक्स...

अमरावती विदर्भातले पण करतेत.
सकाडी सकाडी तड्याकडे पडायला जातो ना. ;)
बरेच मुस्लीम पण असेच करताना एकलेय.

_मनश्री_'s picture

18 Nov 2015 - 6:52 pm | _मनश्री_

ह्या पेशवीणबाई आहेत का तमासगीरीण बाई ?
आणि काशीबाई सवतीकडे इतक्या प्रेमाने का बघताहेत ?

1
2

पिच्चर चे नाव - सवत माझी लाडकी २

सवत माझी लाडकी (ऐतिहासिक)

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 6:57 pm | मांत्रिक

अगदी हीन चित्रीकरण आहे...

दागिने घालण्याचाही क्रम असतो. वरील चित्रात हातातील दागिने, म्हणजे तोडे हे सगळ्यात शेवटी घालायचे असतात, ज्यायोगे ते सगळ्यात पहिले दिसतात. आधी पाटली मग गोठ, नंतर दोन (किंवा तीन.......हव्या तितक्या) हिरव्या बांगड्या, एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या, पुन्हा एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या व शेवटी तोडा घालावा म्हणजे तो सगळ्यात पुढे दिसतो. ही जुनी पद्धत आहे. आजकाल जसे हवे तसे घालतात ही गोष्ट वेगळी.

स्रुजा's picture

18 Nov 2015 - 8:20 pm | स्रुजा

परफेक्ट .. एक तर साड्या च धन्यवाद आहेत एकदम ! काठ पदर कुठे गेले त्या साड्यांवरचे? तू म्हणतेस तसं ही साडी मराठी नाहीच आहे. रमा माधव पण एकदम सॉरी सिनेमा होता पण त्यातल्या साड्या आणि बाकी सगळं नेपथ्य १०० % मराठी होतं

कालच कट्यार च्या धाग्यावर म्हणले कि - चित्रपट हे उथळ माध्यम आणि मसाला हे त्याच्या यशाचे गमक. पण बाजीरावाच्या स्टोरीत एवढा मसाला (पराक्रम & प्रणय दोन्ही) असताना हा नको तो मसाला घालायची काय गरज.
अति मसाला झाला तर आम्लपित्त होणारच!

आणि या नको त्या भानगडींमध्ये बाजीरावाची रणनीती (हि शस्त्र कलेहून वेगळी) गाळणार.

तू नळी वर पाहिले. वादाचा मुद्दा सोडला तर प्रियांका आणि दिपीका दोघीहि कातील दिसत आहेत नउवारी मधे. कंबर पण काय लचकवतायत. वा!! जी खुष हो गया. पण बाकी कोरस च्या नऊवारी बघता ह्या दोघींच्या रेडीमेड वाटत आहेत. शीवाय काठ मधेच खोचलेला वाटतोय. तो साईडला हवा (वर पिरा म्हणते त्या प्रमाने ती पेशवाई किंवा ब्राम्हणी असेल तर!!) बाकी चालू द्या....

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2015 - 7:04 pm | स्वाती दिनेश

पराचे फे बु वर सात्विकसंतापाचे बोल वाचले म्हणून तू नळीवर हे गाणे पाहिले, स्क्रिन फोडावासा वाटला. शेवटी कपाळाला हात लावून बसले.
स्वाती

_मनश्री_'s picture

18 Nov 2015 - 7:20 pm | _मनश्री_

खरय
गाण पाहून लॅपटॉप आणि त्या भन्साळीच थोबाड दोन्ही फोडावस वाटलं

1
2

माननीय श्री. विनोदजी,

नुकतेच फेसबूक वर श्री संजय लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले.

ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे.

जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजय लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत.

आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही.

देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल?

तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही.
क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली.

महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे.

आपला,
आदित्य जोशी

_मनश्री_'s picture

18 Nov 2015 - 7:37 pm | _मनश्री_

@ आदित्य जोशी
तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगलं केलं
पण ह्या पत्राने खरच काही फायदा होणार आहे का ?
मला नाही वाटत ह्याने काही होईल

म्हणून पत्र पाठवू नये का?

पत्र पाठवू नये अस अजिबात नाही
मी वरच्या प्रतिसादातही म्हटलं आहे की तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगल केलं

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2015 - 7:45 pm | स्वाती दिनेश

अ‍ॅडी, पत्र लिहिलेस ते उत्तमच केलेस. काहीतरी चांगली अ‍ॅक्शन घेतली जावी ऑथोरिटीजकडून अशी अपेक्षा करू या.
स्वाती

शब्दबम्बाळ's picture

18 Nov 2015 - 7:51 pm | शब्दबम्बाळ

विनयशील आणि संयतपणे केलेला विरोध... आपले अभिनंदन आणि आभार...

वगिश's picture

18 Nov 2015 - 8:20 pm | वगिश

इथे मिपा वर काथा कुटत बसण्यापेक्षा तुम्ही कृती केलीत हे उत्तम.

मंदार कात्रे's picture

18 Nov 2015 - 7:29 pm | मंदार कात्रे

माननीय श्री. विनोद तावडे जी,
सांस्कृतिक कार्यमंत्री , महाराष्ट्र राज्य
नुकतेच फेसबूक व यूट्युब वर श्री संजल लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले.
ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजल लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत.
आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की बैठकीची लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही.
देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल?
तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही.
क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली.
महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे.
आपला नम्र
एक "भन्साळीपीडित" मराठी माणूस ...

आदिजोशी's picture

18 Nov 2015 - 7:34 pm | आदिजोशी

हे पत्र सुद्धा लेखकाचे नाव गाळून?

कमाल आहे :)

मंदार कात्रे's picture

19 Nov 2015 - 9:09 am | मंदार कात्रे

दुसर्या एका व्हट्सॅप ग्रुप वरुन आले , तो ग्रुप आमच्या गावातिल मुलान्चा आहे

सागरकदम's picture

18 Nov 2015 - 7:32 pm | सागरकदम

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या भन्साळी विरोधाची दखल चॅनेल्सनी देखील घेतलेली आहे. आताच TV9, जय महाराष्ट्र आणि प्राईम ह्या चॅनेल्सनी खास फोन करून ह्या संदर्भात माझी मुलाखत घेतली.
आज उद्या मध्ये हे चित्रीकरण सगळीकडे दिसेलच. हे खरेतर तुमच्या सगळ्यांच्या पाठींब्याचे यश आहे.
तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद __/\__

प्रसाद ताम्हणकर

हा प्रतिसाद सारक्यास्टिक आहे का?

संदीप डांगे's picture

18 Nov 2015 - 8:08 pm | संदीप डांगे

आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात चर्चा झालेली. तेव्हाच मी याप्रकाराबद्दल शंका नोंदवली होती. अजून काय बोलावे..? बाजीरावासारख्या विस्मरणात टाकलेल्या महान इतिहास पुरूषाबद्दल आधीच योग्य असा चित्रपट/कादंबरी/नाटक निघाला नाही आणि जो काय निघाला तो तोही असा हे बघून कोणत्या मराठी माणसाची तळपायाची मस्तकात जाणारी नाही?

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 10:54 pm | टवाळ कार्टा

पण म्हणून डायरेक्ट तालिबान टैप प्रतिक्रिया???

संदीप डांगे's picture

19 Nov 2015 - 11:39 am | संदीप डांगे

हे हे, तालिबान? नेहमी तालिबानच बरे आठवते बॉ तुम्हाला नेहमी. खाप, विहिंप, सनातन, बजरंग दल, श्रीरामसेने इत्यादी नै आठवत कंदी...

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2015 - 1:21 pm | टवाळ कार्टा

हे सगळे सुध्धा हिंदू तालिबान टैप किडे करत अस्तातच (फक्त कधी कधी...आणि उघडपणे नाही)...दूमत नाही

विवेकपटाईत's picture

19 Nov 2015 - 7:35 pm | विवेकपटाईत

या पैकी कुठलीही संस्था युद्धाची तालीम देत नाही किंवा असे युद्ध पुकारण्याची क्षमता कुठल्याही संस्थेत नाही. जास्तीस्जास्त थोड्या प्रमाणात थोड्या खुरापती करू शकतात.

हैला! चर्चा मिसली होती. फारच तणतण केली मी हे गाणं पाहून! भन्साळीला घातलेल्या शिवांचे कलेक्षन खरडफळ्यावर आहेच. तेथील प्रतिसाद हिकडे चिकटवते.
आताच्या काळात आमची आजीबाई मला नृत्याचा क्लासात घालायला राजी नव्हती तर त्या काळात काशीबाईंना नाचायला कोठून परवानगी असणार? नाचवायचच होतं तर मंगळागौरीच्या गाण्यावर जरा जुन्या पद्धतीच्या स्टेप्स घेऊ द्यायच्या. पण हिकडे फुल्ल दंगा! मस्तानी ही सवत्/मिस्ट्रेस किंवा कोणीही असली तरी त्या काळी मुसलमान लोकही अदबशीर, खानदानी बाजाचे कपडे घालत असत. महाराष्ट्रीय महिला कंबरपट्टा घालून साडी चापून चोपून अंग झाकेल अशी नेसत असत. त्या गाण्यात खटकलेल्या गोष्टीच जास्त आहेत. पुरेश्या अभ्यासाआभावी नाचवलं, तेही दोघी सवतींना एकत्र, नऊवारी साडी ब्राह्मणी घरात ज्यापद्धतीने नेसतात तशी नेसवलेली नाही. एका शॉटमध्ये प्रियंकाने जराशी तशी साडी नेसल्यागत दिसते की पुन्हा जैसे थे! नको तिथे (किंवा हवं तिथे) अंगप्रदर्शन! हे गाणं कोणत्यातरी सणाच्या निमित्तानं केलं असल्यास आपल्याकडे जरीच्या साड्याच नेसत असत. अगदी काठापदराच्या. चांदीची जर वगैरे असल्याशिवाय माझी आजी साडी नेसायची नाही तर पेशविणबाईंची कथा काय सांगायची! वेलवेटची ब्लाऊजे आणि त्यावर जी कारागिरी आहे त्याला जर्दोसी काम म्हणतात. तेही शक्यतो मुसलमानी क्यार्‍याक्टरे पूर्वी त्यांच्या कपड्यांवर करत असत. नाचणार्‍या बायकाही अंग झाकतेल असे कपडे करत असत. पेशवाईत नऊवारी साडी नेसल्यावर त्यावर शेला असणे जरूरीचे असे. महिलांच्या कार्यक्रमातही राजेरजवाड्यांकडील महिला नाचत नसत. त्या हे कार्यक्रम बघून मनोरंजन करून घेत असत. अगदी आग्रह केला तर फुगडी घालत असत. इतिहास विषयात शून्य गती असलेल्या मला नेहमीच्या बघण्यातून जर इतपत माहित असेल तर त्या भन्साळ्याला इतके पैसे इनव्हेस्ट करताना एखादा तज्ञ हायर करता येऊ नये? हा शिनेमा बघण्याचे माझ्या फार मनात होते. थेट्रात जाऊन पेशव्यांचा शिनेमा पहावा, अगदी पर्फेक्ट नसणार हे गृहित धरले होते पण जरा महाराष्ट्रीय काही येऊ घातलेय म्हणून बरे वाटले होते. या गाण्याचे हिरमोड केलाय अगदी! काय मेलं डोकं त्या मनुष्याचं..........

विवेकपटाईत's picture

18 Nov 2015 - 8:11 pm | विवेकपटाईत

हि काल्पनिक कथा आहे, खर्या ऐतिहासिक घटनांशी या कथेचा काहीच संबंध नाही असे टायटल मध्ये दाखविले जाईल. आता हिंदीत सिया के राम येतात आहे, भव्य रामायण काळ बघायला मिळेल. अस्तित्वात नसलेल्या कथा पाहायला मिळतील. असो.

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 8:15 pm | भाऊंचे भाऊ

मिपावर रामायण महाभरताच्या प्रक्षीप्त कथा चवीने चघळणारे अशा चित्रपटांवर किती ताठर भुमीका घेतात नै.

काळा पहाड's picture

18 Nov 2015 - 8:17 pm | काळा पहाड

देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि राज ठाकरे यांचा इमेल कुणाला माहिती आहे का?

माझीही शॅम्पेन's picture

18 Nov 2015 - 8:21 pm | माझीही शॅम्पेन

तो भन्साळि राहुद्या महारष्ट्रातच मुळात पेशवे-पेशवाई हा किती आणि कोणासाठी अभिमनाचा विषय आहे ?
त्यातून पेशवे केवळ ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या इतिहासकडे मुद्दामुहून दुर्लक्ष केले जाते
असो आपण कितीही कळफलक बडवुन काय फायदा ?

श्रीरंग_जोशी's picture

18 Nov 2015 - 8:34 pm | श्रीरंग_जोशी

मंडळी आपले आक्षेप अधिकृत व्हिडिओवर प्रतिक्रियेच्या स्वरुपात लिहा. आतापर्यंत आलेल्या सतराशेहून अधिक प्रतिक्रियांमध्ये आक्षेप फारसे दिसत नाहीयेत.

तसेच डिसलाइक्सही केवळ दोन हजारहून थोडे अधिक आहेत अन लाइक्स लौकरच १५ हजार होतील.

वेल्लाभट's picture

19 Nov 2015 - 11:55 am | वेल्लाभट

कृती झालेली आहे.

श्रीरंग_जोशी's picture

18 Nov 2015 - 8:36 pm | श्रीरंग_जोशी

या चित्रपटाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या होमपेजवर खाली 'कॉन्टॅक्ट अस' फॉर्म आहे. तिथेही आपले आक्षेप जरूर पाठवा.

चांदणे संदीप's picture

19 Nov 2015 - 12:23 pm | चांदणे संदीप

तिथे तर अस लिहून आहे...

This is not an Official website of Bajirao Mastani Film. We do not represent the official team of Bajirao Mastani or any part of it. We are just providing you the information about Bajirao Mastani movie. The content is strictly copyrighted and may not create again without permission .

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2015 - 9:25 pm | श्रीरंग_जोशी

चित्रपटाच्या नावाने वेबसाइट असल्याने मला ती अधिकृत वाटली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तरी निर्मात्यांनी प्रत्यक्ष नाव वापरून अनधिकृत वेबसाइटबाबत तक्रार करायला हवी.

चुकीची माहिती इथे दिल्याबद्दल मी दिलगीर आहे.

हेमंत लाटकर's picture

18 Nov 2015 - 10:08 pm | हेमंत लाटकर

पराक्रमी बाजीराव पेशव्यावर असा विकृत पिक्चर काढणे म्हणजे बाजीराव पेशव्याचा अपमान आहे.

सागरकदम's picture

18 Nov 2015 - 10:29 pm | सागरकदम

http://www.dnaindia.com/entertainment/report-pinga-controversy-bajirao-s...२१४६६२३

Pinga Controversy: Bajirao's descendant hits out at Sanjay Leela Bhansali

स्वाती दिनेश's picture

19 Nov 2015 - 12:23 am | स्वाती दिनेश

प्रसादराव पेशवे यांचे मुख्यमंत्र्यांना अत्यंत संयत भाषेत लिहिलेले ह्यासंदर्भातील पत्र पहा.
.
स्वाती

वेल्लाभट's picture

19 Nov 2015 - 12:46 am | वेल्लाभट

शासन काहीही करो, थोडाफार राडा नक्की होणार अशी शक्यता दिसते एकंदर

दिपाली पाटिल's picture

19 Nov 2015 - 12:51 am | दिपाली पाटिल

भंसाली बुवांना फार फरक पडणार नाहीच बहुधा, आजच एक अनुभव आला.. मी माझ्या एका नातेवाइकाकडे गेले होते, तिथे ३-४ बायका पोरी हे गाणं बघून खुपच चेकाळलेल्या किती मस्तंय मस्तंय करत आणि पुढ्च्या दिवाळीत याच गाण्यावर नाचायचं म्हणून...
हे लोक १००% मराठी आहेत, मराठी माध्यमातून शिकलेले आहेत...

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 11:40 am | भाऊंचे भाऊ

गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी.

वेल्लाभट's picture

19 Nov 2015 - 11:54 am | वेल्लाभट

कीव येते !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Nov 2015 - 2:47 am | निनाद मुक्काम प...

आपल्याकडे खुद्द महाराष्ट्रात आणी उर्वरीत भारतात बाजीराव म्हटले की मस्तानी एवढेच लोकांना ठाऊक आहे त्यात आता पिंगा गाण्यामुळे सोशल मिडीयावर जी राळ उडाली त्याने खेदाने नमूद करावेसे वाटते की त्याचा ह्या सिनेमाला आयती नकारात्मक प्रसिद्धी मिळाली , आजकाल नकारात्मक प्रसिद्धी ही सिनेमाच्या पहिल्या ३ दिवसात गल्ला भरायला कामी येते.

भारतात मला एखाद्या सिनेमाच्या आधी त्याचे ट्रेलर किंवा परीक्षण पाहून त्या सिनेमाच्या लायकीची कल्पना येउन सुद्धा लोक्स सिनेमाला पहिल्या आठवड्यात हजेरी लावतात. अनेक जण सिनेम पाहतोय असे चेपू वरून जगाला सांगतात.
मग दुसर्या दिवशी चेपू वरील भिंती वर, समूहात त्या सिनेमाची चिरफाड करणारे परीक्षण खरडतात. तेव्हा त्यात सिनेमाची बिनपाण्याने करतांना हा सिनेमा आपण पैसे देऊन थेटरात पहिला , ह्याचे त्यांना सोयरसुतक नसते.

वाईट सिनेमा पाहिला कि असह्य तगमग होते तर मग १ आठवडा कळ काढून थांबावे , सोशल मिडिया वर व आप्त स्वकीयांच्या कडून सिनेमाच्या वद्दल खात्री करून मग तो पहावा.
पण अनेक परीक्षणसम्राट हे केवळ जनतेने वाईट शिनेमा पाहून पैसा खर्ची करू नये म्हणू अडीच तासाचे हलाहल स्वतः नेत्राने प्राशन करतात.
येथे पोटतिडकीने प्रतिसाद देणारे कितीतरीजण थेटरात जाऊन काय नक्की भन्साळी ने गोंधळ घातला आहे हे स्वःताच्या
डोळ्यांनी थेटरात जाऊन येतील आणि बाहेर येतांना खेटर खाल्या सारखा चेहरा करून बाहेर येतील.
आणि मग तावातावाने सिनेमाला नावे ठेवतील
पुढे असे सिनेमे १०० कोटीच्या वर गल्ला कसा जमवतात ह्या बद्दल सखेद आश्यर्य व्यक्त करतील.
बाजीरावांच्या कर्तुत्वावर प्रेम व श्रद्धा असेल तर
आज सगळ्यांनी पण करूया हा सिनेमा थेटरात जाउन पाहायचा नाही,
पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
आहे.

बरोबर आहे तुमचं. आणि आजकाल तर १०० कोटी हा आकडा १० रुपयाचं चॉकोलेट खाल्लं इतक्या सहजतेने उच्चारतात. एक तर बर्‍याचशा उत्तर भारतीय जनतेला अशा ओव्हर द टॉप चित्रीकरणाचं आकर्षण आहे आणि त्याहीपेक्षा जास्त बाहेरील देशांत. हल्ली बड्या बॅनरचे सिनेमे मध्य पूर्वेत, उत्तर अमेरिकेत, कधी कधी काही युरोपियन देशांत एकत्र रीलीज होतात. मल्टीप्लेक्स चं तिकीट बघता आणि निव्वळ चकाचौन वाल्या बॉलिवुड सिनेमांचं बाहेर असलेलं आकर्षण बघता १०० कोटी कितीही रद्दी सिनेमा असला तरी गोळा होतातच. त्यात अजुनही काही मार्केटिंग गिमिक्स असतील. धुम ३ आणि प्रेम रतन नी जर २-३०० चा गल्ला गोळा केला तर मग बाकीबद्दल काही बोलायलाच नको. सिनेमाचा दर्जा आणि मिळणारा पैसा यांचा आपापसात सुतराम संबंध नाही.

आतादेखील काही अ-मराठी भारतीयांच्या अगदी भारावुन गेलेल्या प्रतिक्रिया आहेत. आपण उगाच सात्विक संताप करत बसण्यात काही पॉईंट नाही. ते गाणं, तो सिनेमा बरेच पुरस्कार देखील घेऊन जाणार आहे . उद्या कदाचित करण जोहर भन्साळीला त्याच्या शो मधे बोलावुन या "काँट्रोव्हर्सी" बद्दल विचारेल , भन्साळी काहीतरी तद्दन दिखाऊ उत्तरं देऊन मराठी जनतेलाच मुर्ख ठरवेल. त्यामुळे गेला उडत तो भन्साळी आणि खड्ड्यात जाऊ दे तो सिनेमा !

वेल्लाभट's picture

19 Nov 2015 - 11:53 am | वेल्लाभट

संबंधच येत नाही बघायचा. फुकटातही नाही. मी दुसरा.

नगरीनिरंजन's picture

19 Nov 2015 - 5:25 am | नगरीनिरंजन

भन्साळीकडून काय अपेक्षा होती? या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हाच कळले होते की काय होणार आहे.
बाकी एक-दीड टक्के लोकसंख्येने पिच्चर पाहिला तरी १०० कोटी जमा होत असल्याने त्या आकड्यांना काहीही महत्त्व नाही. भन्साळीसारख्या येडपटांना आधीच जागा दाखवायला पाहिजे होती. त्याचा हम दिल दे चुके सनम हा पिच्चरच इतका इरिटेटिंग होता की पुढचे त्याला काढू दिले हेच आश्चर्य आहे.

पॉइंट ब्लँक's picture

19 Nov 2015 - 9:33 am | पॉइंट ब्लँक

आयला, मिपावर कोणी उदारमतवादी धर्मनिरपेक्ष मंडळी जिवंत नाहित का? त्यांच्याकडून खालील प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
१. मराठी माणसाचा कट्टरवाद फार वाढला आहे. भारतातील "Intolerance" वाडवण्यासाठी मिपावरचे असे लेख हातभार लावतात
२. मिपावरील हा लेख म्हणजे कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांची उघड उघड गळचेपी आहे.
३. नऊ वारी साडी नेसून पोट दाखवले म्हणून आरडाओरडा हे बुरसटलेल्या मनोवृत्त्तीचे लक्षण आहे. कुणी काय दाखवावे हा ज्याचा त्याचा "my chioce" आहे.
४. वरील लेख आणि त्याला आलेले प्रतिसाद पाहता काही सहिष्णु मंडळी मिपावरील सनातनी विचाररसणीमुळे दुखावले गेले आहे. असे सर्व लेखक, छायाचित्रकार आणि शास्त्रज्ञ (ह्यांचा काय संबंध हा प्रश्न विचारू नये) दिवाळी अंकातून आपले लेख मागे घेण्याच्या विचारात आहेत. मिपातर्फे शनिवार वाड्यावर जंगी पुरस्कारवापसी सोहळा आयोजित केला जावा !

एक सामान्य मानव's picture

19 Nov 2015 - 11:34 am | एक सामान्य मानव

आणि त्या सोहळ्यात ह्या गाण्यावर सोनाली कुलकर्णी (ज्यु.) व अम्रुता खानविलकर यांचा या गाण्यावर नाच असावा (मधेच "लघुगुरु" बाजीराव म्हणुन स्पेशल अ‍ॅपिअरन्स)

बॅटमॅन's picture

19 Nov 2015 - 12:51 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!!!!!

विवेकपटाईत's picture

19 Nov 2015 - 7:39 pm | विवेकपटाईत

अरे बाबा हा सिनेमा पुरोगामी लोकांनी बनविला असता तर मिपावर असे आक्षेप निश्चित आले असते. नयनतारा यांना सा.अ. पुरस्कार मिळाला आहे, अधिकांश लोकांना वापसी नंतर कळले.

फोटोग्राफर243's picture

19 Nov 2015 - 9:39 am | फोटोग्राफर243

नमस्कार, या गाण्यावर वाद याचमुळे आहे, की हे गाणे काशी बाई आणी मस्तानी वर एकत्रित चित्रित झाले आहे, मुद्दा असा पण वाचण्यात आलाय की मूळ सिनेमा मधे हे गाणे नाही, तर शेवटी दाखवले जाईल, अर्थात त्याने वाद समाप्त होत नाहीच... काशी बाई या पायाने अधू होत्या, त्यामुळे त्यांना नाचता येणे शक्य नाही, मुळात काशी बाई आणि मस्तानी बरोबर का नाचव्यात... ही सरळ सरळ इतिहासाची दिशाभूल आहे...एक मात्र खरं, या मुळे slb ची प्रसिद्धी नक्की होणार

एक सामान्य मानव's picture

19 Nov 2015 - 11:29 am | एक सामान्य मानव

"माळव्यातली हिरवीगार शेते..बाजीराव घोड्यावरून...मस्तानी पुढे फेर धरून नाचत जातीये...बाजीराव उतरतात मस्तानीचा हात धरुन गोल फिरवतात (शारुख स्टाईल)...पुढच्या सीनमधे मस्तानीच्या जागी काशीबाई...मागे शिंदे..होळकर वगैरे खासे हातात तलवारी घेऊन उधे गं अम्बे उदे स्टाईलने नाचतायत...बरोबर नऊवारीमधील बाया (झी मराठी पुरस्कार स्टाईल)...मग प्रत्येक कडव्याला मस्तानी व काशीबाई आलटुन पालटुन येतात"
अशी ज्याची प्रतिभा त्या संजयने फक्त "पिंगा" वर भागवले ह्याबद्द्ल आपण खरंतर संजयचे जाहीर आभार मानायला हवेत व पुढिल वर्षीचा "महाराष्ट्र भूषण" त्यालाच मिळायला हवा व औस्कर मधील मानांकन सुदधा...
आणि इथे मराठी लोक्स नऊवारी ब्राम्हणी की साधी रितीभाती वगैरे चर्चा करत बसलेत.
"मस्तं पिक्चर बघा आणि थंड बसा" (आ. बाळासाहेबांना स्मरुन...)

ता. क. कदाचित असं एखादं गाणं असेलही. मला माहीत नाही. असल्यास वरील लिखाण सपशेल मागे घेतले जाईल...

सहमत. बर्‍याच लोकांचा आक्षेप काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचण्यावर आहे. बाकी त्या कोणत्या पद्धतीने नऊवारी नेसल्या आहेत, बाजीरावांचे डोळे घारे दाखवले आहेत की काळे हे सगळं "poetic leverage" म्हणून माफ करता येईल.
अजून चित्रपट रिलीज पण नाही झाला तरी त्याच्यावर एवढी आगपाखड. समजा, भंसाळी नी इतिहासाशी जास्त प्रतारणा न करता, पालखेड- भोपाळ च्या लढाईची सुंदर दृश्ये (ट्रोय स्टाइल) दाखवली, बाजीरावांची रणनीतीचं नाही पण युद्धनीती पण सुंदर रित्या लोकांसमोर आणली आणि हे जे गाणं आहे ते शेवटच्या एंडिंग ला पाट्या पडतानी दाखवले तर त्याच्या ह्या बारीक सारीक चुका कट्टर मराठी माणूस नक्कीच माफ करेल.
तस्मात, चित्रपटाची वाट बघा आणि चुकीचं काही दाखवले असेल तर वाट लावा.

कपिलमुनी's picture

19 Nov 2015 - 12:25 pm | कपिलमुनी

कित्ती भाबडी असतात लोका

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2015 - 1:25 pm | टवाळ कार्टा

खिक्क

किमान महाराष्ट्रात तरी ह्या सिनेमावर बंदी यायला हवी. भन्साळी असहिष्णु असहिष्णु म्हणून बोंबलत बसु दे.

पद्माक्षी's picture

19 Nov 2015 - 1:00 pm | पद्माक्षी

cinematic liberty च्या नावाखाली काय वाटेल तो फालतूपणा दाखवला तर लोकं धुणार, नंतर रडून काय उपयोग.

"भाऊंचे भाऊ - Thu, 19/11/2015 - 11:40
गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी. "

-- सहमत . +१
संजय लीला भंसालीचा "खामोशी - द म्युझीकल" सिनेमा खुप सुंदर , अर्थपुर्ण होता. पण नंतरचे सिनेमे जास्तच व्यावसायिक होते .
असे वाटते कि , जर आशुतोष गोवारिकरने "बाजीराव" सिनेमा बनवला असता , तर तो जास्त चांगला झाला असता .

संदीप डांगे's picture

19 Nov 2015 - 3:00 pm | संदीप डांगे

+१ (तरी 'चोथा नखभर' बघून थोडी भीती वाटतेच)

चलत मुसाफिर's picture

19 Nov 2015 - 3:56 pm | चलत मुसाफिर

मुळात भारतातले लोक रोज बागेत जाऊन एक गाणे म्हणतात अशातला भाग नाही. त्यामुळे कुठलेच चित्रपटगीत वास्तववादी असू शकत नाही. मानापमानात रुक्मिणीने का कोणीतरी गाणी म्हटली ती कशी चालली?

बाजीराव असला तरी त्याने चोवीस तास तलवार घेऊन युद्धच करायला पाहिजे की काय?

काशीबाई या आयुष्यात कधीही नाचल्या नाहीत किंवा नाचणे या शब्दाची त्यांना चीड होती असा पुरावा उपलब्ध आहे काय? नसेल तर मग काय बिघडलं त्या घटकाभर नाचल्या म्हणून?

भगतसिंह आणि त्याचे जिच्याशी लग्न ठरले होते ती मुलगी (बायको नव्हे) हेही प्रत्येक हिंदी सिनेमात गाणी म्हणताना दाखवले आहेत. लोकांना काही तो खरा इतिहास वगैरे वाटला नाही.

आबा's picture

19 Nov 2015 - 3:57 pm | आबा

नाच फारतर काल्पनीक आहे असं म्हणता येईल, विकृत कसा काय ?

वेल्लाभट's picture

19 Nov 2015 - 4:03 pm | वेल्लाभट

विकृत कसा 'नाही'?

आबा's picture

19 Nov 2015 - 4:20 pm | आबा

कमरेला झाडू आणि गळ्यात मडके, वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता, डान्समध्ये काय वि़कृती आहे ?

वेल्लाभट's picture

19 Nov 2015 - 4:23 pm | वेल्लाभट

कठीण आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Dec 2015 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

कमरेला झाडू... वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता

आता तुमच्यावर दिल्लीत एक निषेधाची प्रेस कॉन्फरन्स होणार बघा ! ;)

काशीबाईला पायाचे दुखणे होते म्हणतात. शिवाय सवतीबरोबर असा डान्स, तोही अगदी बिनघरंदाज थाटाच्या बेंबीदर्शन साड्या नेसून केलेला दाखवणे हे चूकच. हेत्वारोप करावा की नाही हे ज्याचं त्यानं आपापलं ठरवावं, परंतु असे काही दाखवणे पाहून हेत्वारोप करावासा वाटणे यात काही चूक नाही असे वाटते. वैसेभी पेशवा म्हणजे सन ऑफ अ लेसर गॉड, त्यांच्या नावाला इतके उपद्रवमूल्यही नाही. त्यामुळे तितका परिणाम होणार नाही.

आबा's picture

19 Nov 2015 - 10:40 pm | आबा

१) काशीबाईंना असलेले पायाचे दुखणे विचारात न घेणे
२) सवतीसोबत नाचताना दाखवणे
३) तात्कालीन पद्धतीचे पोषाख न दाखवणे
या सरळ सरळ फॅक्चुअल चूका आहेत, यात ईतिहासाचे विकृतीकरण काही नाही

मग त्या हिशेबाने ते गळ्यात मडके वगैरे दाखवणे हेही फॅक्च्युअल चूक असेच म्हणता येईल की.

आबा's picture

20 Nov 2015 - 3:31 pm | आबा

हो तुमचं बरोबर आहे,, फॅक्ट्च्युअली चूकच आणि विकृतही म्हणता येईल,

मुख्य मुद्दा म्हणजे,
आर्टिस्टीक लिबर्टी घेऊन इतिहासाचं इंटरप्रिटेशन यापूर्वीसुद्धा झालेलं आहे (ऊदा. - राऊ, राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, मृत्युंजय, मी नथुराम गोडसे बोलतोय, वगैरे). असं इंटरप्रिटेशन चांगलं/वाईट्/विकृत कसंही असू शकतं. आपल्या अहंगंडांना सुखावणारं इंटरप्रिटेशन तेवढं लालित्यपूर्ण, आणि थोडं वेगळं असलं की विकृत; ही मांडणी तात्विक नाही. त्या डान्स मध्ये काय व्हल्गर/विकृत आहे, ते त्यांनाच माहीत. असो.

पेशव्यांनी चालवलेला थयथयाट, थोडा जरी ऐतिहासिक कन्सिस्ट्न्सी साठी असता; तरी मी अहंगंड वगैरे शब्द वापरले नसते, परंतू तो तसा नाहीय याची मला बर्‍याच अंशी खात्री आहे. मोअरओव्हर, काशीबाईंच्या ऐवजी मस्तानीला नाचताना दाखविले असते तरी त्यांनी पत्र लिहिण्याचे कष्ट घेतलेच नसते (ते असं मान्य करायचे नाहीत, हेही मला माहीत आहे). आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे.

तुमचा स्वतःचा विरोध फक्त अ‍ॅक्युरसी साठी आहे, तरीही तुम्ही विकृत का म्हणंत आहात ते मला कळंत नाहीये.

आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे.

मुळात काशीबाईस पायाचे दुखणे असतानाही ती नाचली असे दाखवणे हे विकृत वाटते. हे चेष्टा केल्यासारखे वाटते.

शिवाय तत्कालीन समजानुसार खालच्या दर्जाचे मानले गेलेले गुणविशेष दाखवणे हेही खटकतेच. यात माज कसला आला?

ते आणि तत्सम गुणविशेष खालच्या दर्जाचे आहेत, असे अजूनही मानणे (आणि तेच पत्राचे कारणही असणे) हा माज

नाखु's picture

20 Nov 2015 - 3:56 pm | नाखु

हे इतीहास-विकृत प्रदर्शनाचे समर्थन करणार्या अस्सल विचारवंताना प्र्शन करतो की तुमच्या घराण्याच्या इतीहासावर एखादा माहीती पट बनविला आणि त्यात तुमच्या आज्जीला खालील गाण्याप्रमाणे दाखविले तर तुम्ही तुमच्या आप्तेष्टासहीत मिटक्या मारत पहाल काय ? असेच समर्थन कराल काय? चला त्या निमित्ताने तुमच्या घराण्याची माहीत+जाहीरात तरी झाली सगळ्या जगाला असे ऊर बडवून सांगाल काय ? का त्यांचे खरेच काही कर्तुत्व होते ते दाखविण्याचा आग्रह धराल ?

इथे उत्तरे द्या किंवा देऊ नकाच, फक्त घरी गेल्यावर आपल्या आईसमोर आणि कन्येसमोर उत्तरे द्या आणि त्यांचीच उत्तरे इथे टंका.

नाखुकाका, ही तुलना गंडलेली आहे. पेशव्यांबद्दल आदर- प्रेम जरूर असावा, मात्र जिथे तिथे हे तुमच्या घराण्याबद्दल बोलले तर काय वगैरे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. याने साध्य काहीच होत नाही.

नाखु's picture

20 Nov 2015 - 4:11 pm | नाखु

बॅटमण त्यांनी पेशवे यांनी लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांना आक्षेप घेतला आणि शिवाय त्यांच्या घरंदाजपणाबद्दल अनावश्यक टिप्पण्णी केली.

मी त्यांच्या पत्र लिहिण्याच्या आणि मुद्द्याच्य समर्थान ही तुलना केली आहे उदाहरण दिले आहे.

जर तू आणि मी ज्यांचा दूरान्वयेही पेशव्यांशी संबध नाही अश्यांना हे सारे अत्यंत आक्षेपार्ह वाटते तर त्यांच्या खर्या खुर्या वारसांना काहीच वाटत नसेल का?

तरी तुला राग आला असेल तर आधीक उणे क्षमा..

तडजोडी नाखुस

बॅटमॅन's picture

20 Nov 2015 - 4:20 pm | बॅटमॅन

जर तू आणि मी ज्यांचा दूरान्वयेही पेशव्यांशी संबध नाही अश्यांना हे सारे अत्यंत आक्षेपार्ह वाटते तर त्यांच्या खर्या खुर्या वारसांना काहीच वाटत नसेल का?

त्यांना काय वाटेल याची चिंता आपण कशाला करावी? आपल्याला त्यांच्या पूर्वजांविषयी त्यांच्या पराक्रमामुळे प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या खानदानात जन्माला येणे हा फक्त एक जैविक अ‍ॅक्सिडेंट आहे. त्यात त्यांचे काहीसुद्धा कर्तृत्व नाही. त्याचे इतके कौतुक कशाला? वंशजांना काय वाटेल त्याची चिंता वंशजांनी करावी. आपल्याला जे खटकतं त्याला विरोध केला ना, तेवढं बास आहे.

एक मिनिट, फालतू कांगावा करू नका, मी कोठे त्यांच्या घरंदाजपणा बद्दल टिपण्णी केली?
मी त्यांच्या पोकळ अभिमाना विषयी बोललो,
जे त्यांच्या फेसबूक वरील इतर कमेंट्स वाचल्या तरी सहज समजेल (सध्या अकांऊंट डीअ‍ॅक्टीव्हेट केलेले आहे ). कलाकारांच्या दिसण्या विषयी केलेलविषयी केलेल्या कमेंट्स तर सरळ रेसीस्ट आहेत
आणि, त्यांच्या घरंदाज पणा बद्दल मला काही घेणे देणे नाही, असो.

आता तुमच्या आधीच्या प्रश्नाविषयी- माझं सोडा, माझ्या आजीला सुद्धा अश्या डान्सचा फरक पडला नसता
यापेक्शा सुद्धा पॉईटेड प्रश्न असा विचारता आला असता, की "माझ्या आजीने असा डान्स केला असता, तर मला चालला असता का?" ज्याचे उत्तर असे आहे की, माझ्या आजीला स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे अस मी मानतो..
हाच तुमच्या आणि माझ्या मधला फरक आहे..

आता मुख्य प्रश्न, पिंगा गाण्यामध्ये व्ह्ल्गर्/विकृत काय आहे ?

असं करा, प्रतिसाद देण्यात वेळ न घालवता एकदा वरची चर्चा वाचुन तरी या. त्यात यातल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि रेसिस्ट???? कहर आहे.

मी बरेच नाही, एकच प्रश्न विचारला आहे
की पिंगा गाण्यात विकॄत किंवा व्हल्गर काय आहे?
त्याचं उत्तर वरती नाहीय, वरती इतकंच सांगितल आहे की ते गाणं ऐतिहासिक नाही

पिंगा घालण्यात विकृत असे काही नाहीये. पिंगा गाण्यात जो आहे त्याला दिंडा म्हणतात. ही सगळी चर्चा व त्या गाण्यातील चुका यांची सांगोपांग चर्चा याच धाग्यात झालेली आहे.

स्रुजा's picture

21 Nov 2015 - 12:58 am | स्रुजा

पिंगा गाण्यात त्यांच्या साड्या कशा नेसवल्यात ते बघा. त्या दोघी लावणीच्या स्टेप्स करतायेत. या स्टेप्स् मुळीच मंगळागौरीच्या खेळाच्या नाहीत. बाकी कल्चरल सेन्सिटिविटी बद्दल मी आधीच लिहिलं आहे http://misalpav.com/comment/772589#comment-772589, ते सगळं नाहीये तस्मात चुकीचं आहे, शिवाय त्या काळी पेशव्यांची पत्नी लावणी च्या स्टेप्स करतीये हे विकृतीकरण च आहे. लावणीच्या स्टेप्स सोज्वळ नसतात. त्याकाळच्या समाजमान्यतांना, घरंदाजपणाच्या मानदंडाला सरळ सरळ धाब्यावर बसवलंय . आणि इतिहास बदलायची गरज नाही, तो फिक्शन नाही.

आबा's picture

21 Nov 2015 - 1:05 am | आबा

ठिक आहे मेक अप आणि कॉश्च्युम्स सुद्धा चुकवलेत, पण विकृत?

१) तुम्हाला पिंगा कधी खेळतात/घालतात, कशासंदर्भात असतो माहीतीये?
२) तुम्हाला लावणीचा संदर्भ माहीतीये?
३) 'पिंगा- द सेन्शेशनल लावणी नंबर' अशी पब्लिसिटी केलेली माहीतीये?
४) दोन्हीची सरमिसळ तुम्हाला पटत्ये?

येवढं सगळं माहीत असूनही तुम्हाला जे काय दाखवलंय योग्य वाटत असेल तर पुढे प्रतिसाद देण्यात काही पॉईंट आहे असं मला तरी वाटत नाही.

या सर्व प्रश्नांची माझी उत्तरे हो अशी आहेत

सेन्सेशलायझेशन चा उद्देश पैसा कमावणे असा आहे, जो जगातल्या प्रत्येक व्यवसायाचा असतो

पिंगा गाण्याने
इतिहास "विकॄत" कसा होतो ते मात्र कोणी सांगत नाही
असो