गीतेतील १९ २० २१ अध्याय

अनुपम कुलकर्णी's picture
अनुपम कुलकर्णी in काथ्याकूट
16 Nov 2015 - 1:49 pm
गाभा: 

श्रीमद् भगवद्गीता मधे सर्वश्रुत 18 अध्याय आहेत..
परंतु मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .
त्या मधे कृष्णा ने विरक्तिकडे जाण्या विषयी मार्गदर्शन केले आहे.
व् सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .
जाणकरांकडे
या बद्दल काही माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

त्या येड्याला मी ३६ अध्याय सांगितले होते.
पण त्याच्या डोक्यात एवढेच बसले.
बाकीचे विसरला तो आणि मी पण.

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2015 - 2:01 pm | टवाळ कार्टा

_/|\_

माहितगार's picture

16 Nov 2015 - 2:01 pm | माहितगार

:)

आदूबाळ's picture

16 Nov 2015 - 4:43 pm | आदूबाळ

पैजारबुवांच्या पहिल्या प्रतिसादांचा मी फॅण आहे. त्या आईवरच्या कवितेवरही असाच पहिला प्रतिसाद होता...

प्रसाद गोडबोले's picture

16 Nov 2015 - 2:04 pm | प्रसाद गोडबोले

काहीही हां अकुं =))

गीतेतील पहिले ५ अध्याय सोडले तर उर्वरीत बरेचसे नंतर घालण्यात आलेले आहेत हे सरळ सरळ लक्षात येते , १८ अध्याय तर अगदीच स्पष्ट पणे नंतर घातला आहे हे जाणवते ... अर्थात तेही सारे एक से बढकर एक क्लासिक असल्याने चालुन गेले ! १५ वा अध्याय तर एक स्वतंत्र उपनिषदच आहे !!

तसेच १९-२०-२१ आपण घालणार असाल तरी आमची काही हरकत नाही फक्त "तेणे अमृताचे ताटी । जाण नरोटी ठेवली॥ "असे झाले नाही की मिळवले ;)

अवांतर : बाकी आपण अकुं ह्या नावाला साजेसाच लेख (?) टाकला आहे ;)

माहितगार's picture

16 Nov 2015 - 2:15 pm | माहितगार

तसेच १९-२०-२१ आपण घालणार असाल तरी आमची काही हरकत नाही

अगदी अगदी :)

त्या ज्येष्ठ हस्तींना विचारा की त्या अध्यायांमध्ये कुठले श्लोक आहेत ते सांगा म्हणून. जर कंटेंट माहिती असेल तर श्लोक माहिती असलेच पाहिजेत. नसेल तर उगा फशीवगंडीव करू नका म्हणावं.

माहितगार's picture

16 Nov 2015 - 2:20 pm | माहितगार

श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .

त्यांचा प्रश्न 'ऐशी श्टोरी किसीने सुनी क्या ? ऐशीश्टोरी का कोई जाणकार है क्या ?' स्वरुपाचा आहे का? जे स्वतः कृष्णाने लुप्त केले म्हणतात ते आता कुठून येतील पण वर प्रगो म्हणतात तसे कधी कधी ग्रंथ वाढीता वाढीता वाढवत जावा म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी वाढवून ग्रंथांमधील शब्दप्रामाण्याचे वजन जरा कमी करण्यास अप्रत्यक्ष वाव मिळत असावा.

ते जे हस्ती असा दावा करताहेत त्यांनाच विचारा असे माझे सांगणे आहे. उद्या मीही रामायणात उत्तरोत्तरकांड नामक नवीन कांड घालीन, काय खाऊ आहे का? =))

माहितगार's picture

16 Nov 2015 - 4:41 pm | माहितगार

उद्या मीही रामायणात उत्तरोत्तरकांड नामक नवीन कांड घालीन,

घाला की बिनधास्त तुम्हीच का म्हणून मागे रहावयाचे ?:) सध्या मी सम्राट अशोक म्हणून सिरीयल पहातो नावे सोडून कथानक पूर्ण नवे आहे, पॉलीटीकली करेक्ट राहून केले म्हणजे कुणी मनावर घेत नसावे नाहीतर वाढता वाढता वाढे आता पर्यंत बर्‍याच ग्रंथांच्या बातीत झाले नसते.

माहितगार's picture

16 Nov 2015 - 2:09 pm | माहितगार

@अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट सांगीतली संदर्भ तेथल्या तेथे मागीतलेला चांगला. जी गोष्ट अस्तीत्वातच नाही त्याबद्दल कुणीही काहीही सांगू शकतो हे म्हणजे 'अंधार्‍या खोलीत नसलेली मांजर शोधण्यासारखे आहे' असो.

बाकी ज्यांचा गीतेवर अभ्यास होता अशा पैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक त्यांचे भाष्य म्हणजे गीतारहस्य, गीतारहस्याचे सध्या मराठी विकिस्रोत प्रकल्पात युनिकोड टंकन चालू आहे त्या टंकनात अथवा मुद्रीत शोधनात सहभागी होता आलेतर पहावे गीते व्या आवृत्त्यांबद्दल वगैरे काही माहिती मिळाली तर पहावे. किमान कुणीही उठले काहीही फेकले असे होण्याचा संभव जरा कमी होईल.

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2015 - 2:13 pm | टवाळ कार्टा

मांजरींना कै बोलियाचे नै...तो मक्ता फक्त बॅट्यॅकडे आहे =))

माहितगार's picture

16 Nov 2015 - 2:21 pm | माहितगार

=))

बॅटमॅन's picture

16 Nov 2015 - 3:56 pm | बॅटमॅन

सही बोला =))

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2015 - 6:02 pm | टवाळ कार्टा

अब्बा...आज तू मेरेकू बो लानेकू बोलरेला...परसूकूं बैंगन लाने बोल्ना...ऐसां कैसा यारों

प्रस्तावना व प्रथम प्रकरणात बरीचशी माहिती मिळून जाईल.

अनुपम कुलकर्णी's picture

16 Nov 2015 - 11:54 pm | अनुपम कुलकर्णी

मला वाटले की येथे माझे काम होईल।
मला गीते मधे हे अध्याय आहेत की नाही ते समजेल।
पण तसे झाले नाही।
येथे टवाळखोरीच चाललेली दिसते।
असो...
धन्यवाद..

अद्द्या's picture

17 Nov 2015 - 12:04 am | अद्द्या

१९व्या अध्यायाचं हेच तर सूत्र तर आहे .

उगा आपलं हे होतं ते होतं करत बसू नका. .

जे आहे ते नीट समजून घ्या . इथले तिथले फोरवर्ड न सत्य मानू नका . डोळे उघडे ठेवा . अभ्यास करा आणि आपापलं काम करून रात्री एक "नीट " मारून गप झोपी जा .

विशेष सूचना : इथे कुठल्याही विषयावर चेष्टा करून मिळेल

नाखु's picture

17 Nov 2015 - 4:51 pm | नाखु

विशेष सूचना : इथे कुठल्याही विषयावर चेष्टा करून मिळेल

विषयावर चेष्टा नीट झाली नाही तर पुन्हा करून मिळेल (कसल्याही सबबीवर पैशे परत मिळनार नाहीत)

मला या निमित्ताने अजून काही प्रश्न पडले आहेत.. गीता अर्जुनाच्या डोक्यावर हात ठेवून गुप्त कशी होईल? तिकडे महर्षी व्यास आणि सन्जय पण ऐकत आहेत ना? त्यांच्या डोक्यावर पण हात ठेवायला हवा ना?

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 2:53 pm | भाऊंचे भाऊ

मुळात गीता अर्जुनाच्या डोक्यावर हात का ठेवते हे जरा स्पश्ट कराल काय ?

अद्द्या's picture

18 Nov 2015 - 4:16 pm | अद्द्या

नेट्वर्किंग साहेब . . नेट्वर्किंग .

एकदा मूळ फ़ाइल सर्वर मधला डेटा उडाला कि इतर नोड्स वर map केलेले फ़ाइल्स उडतात न ,

तसं आहे ते . .

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 12:27 am | टवाळ कार्टा

सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .

असे असेल तर मुळात बाकीच्यांना याचा पत्ता लाग्लाच कस्सा?

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2015 - 12:38 am | प्रसाद गोडबोले

अहो ते पेन्ड्राईव्ह फॉर्मॅट खंप्लीट करायच्या आधी उचकटुन काढले असेल मग राहिला असेल थोडा उरला सुरला डेटा =))))

बॅटमॅन's picture

18 Nov 2015 - 12:48 am | बॅटमॅन

१८ अध्याय कॉपी करून करून अर्जुनाचा सीपीयू गरम झालेला. तस्मात नवीन डेटा अधिकाधिक स्लो ट्रान्स्फर होत होता. त्यात परत युद्धासाठी सगळे लोक "कस्सा राव थांबू" म्हणत होते. त्यामुळे कृष्णालाही शेवटी बोअर झाले आणि त्याने पेन्ड्राईव्ह उचकटून काढला.

नाखु's picture

18 Nov 2015 - 10:28 am | नाखु

त्यात परत युद्धासाठी सगळे लोक "कस्सा राव थांबू" म्हणत होते.

असे लिहून आपण अप्रत्यक्षपणे "प्रचेतस" यांस धागाबोलावणे धाडत आहात असे आम्हाला वाटते.

गीताबाली ते संगीता चित्रपटांचा प्रेक्षक
नाखु

अद्द्या's picture

18 Nov 2015 - 11:02 am | अद्द्या

म्हणजे "Safely remove USB Device" ला फाट्यावर मारणे द्वापार युगापासूनच चालू आहे .

सांगितलं होता न मी . . आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती पहिला पासून म्हणून .

आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती पहिला पासून

होतीच मग! या ब्रिटिशांनी सगळं चोरलं बघा.

अद्द्या's picture

18 Nov 2015 - 12:10 pm | अद्द्या

मग काय .

हे ब्रिटीश म्हणजे न . . अग्द्दी हे होते . .

असे मैंचे हे पण म्हणतात

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 10:43 am | भाऊंचे भाऊ

आपल्या शंकराचार्यांना गिता तत्वज्ञान मान्य नसल्याने मीसुधा गिता ज्ञानेश्वारी फार मनावर घेतली नाही. अर्थात शंकाराचार्यही फार मनावर घेतले आहेत असेही अजिबात नाही. :)

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2015 - 4:30 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या शंकराचार्यांना गिता तत्वज्ञान मान्य नसल्याने

हा नवीन शोध कुठे बरे लागला ??

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 4:32 pm | भाऊंचे भाऊ

तुम्हाला हे माहीत नाही काय ? शंकराचार्यांनी काय म्हटले आहे ते ?

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2015 - 4:34 pm | प्रसाद गोडबोले

खरेच माहीत नाही , तुम्ही सांगा ना गडे ...

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 4:37 pm | भाऊंचे भाऊ

ठीक आहे शंकराचार्यांनी पुनर्जन्माबाबत काय विचार्/विवेचन्/भाष्य केले आहे ते अभ्यासा/वाचा म्हणजे आपणास आपोआपच समजुन जाइल ना गडे.

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2015 - 4:39 pm | प्रसाद गोडबोले

कुठे वाचु ? काहीतरी संदर्भ द्या ना गडे !

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 4:39 pm | भाऊंचे भाऊ

थोडक्यात सांगायचे तर शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत कारण हा कर्म सिध्दांत मानवाचा प्रथम जन्म व त्यात त्याच्या कर्माचे स्पष्टीकरण देत नाही. असो विष्य मोठा आहे, आपण अभ्यासु आहात. नक्किच समजुन घ्याल.

हे सगळं नक्की कुठं दिलेलं आहे ते सांगावे अशी विनंती. कुठल्या भाष्यात? की अजून कुठे?

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 6:19 pm | भाऊंचे भाऊ

वेदान्त म्हणून रेफरन्स दिला आहेच. त्यामुळे जर अभ्यास करायचा आहे तर त्यात समग्रता राखा. नुसतीच माहिती हवी असेल तर गुगल आहे. अन माझ्याच अभ्यासात/ विधानात/ समजुन घेण्यात काही चुक झाली असेल तर इथे मिपा आहे. कधी कोणाशी प्रत्यक्ष भेट झाली तर मोकळेपणाने व नेमक्या संदर्भासहीत चर्चा करता येउही शकते पण अंजावर फार खोलात जायची भाउंना सवय नाही ;)

बॅटमॅन's picture

18 Nov 2015 - 6:22 pm | बॅटमॅन

वेदान्तात कुठे आहे?

बाकी प्रश्न तुम्हांला विचारला आहे त्यामुळे उत्तर तुम्ही देणे अपेक्षित आहे. गूगल आहे असे म्हणून उद्या कसलीही जबाबदारी झटकता येते. तुम्हांला प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल तर तसे सांगा. बाकी आचार्यांनी काय सांगितलंय यावरून मला फरक काही पडत नाही हेवेसांनल.

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 6:31 pm | भाऊंचे भाऊ

जबाबदारी झटकायला मला गुगलची आवश्यक्ता नाही. आणी वेदान्त काय मानतो काय नाही ते आपण प्रत्यक्ष वाचुन ठरवा.

प्रश्नाचे नेमके उत्तर देणार नसल्यास तसे सांगा. गूगल आहे वगैरे वाक्य तोंडावर फेकायचा चान्स मलाही हजारोवेळेस होता पण तसे कधी केले नाही. असो.

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 6:50 pm | भाऊंचे भाऊ

शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत परिणामी त्यांना गिताही मान्य नाही या माझ्या विधानावर मी ठाम आहे. तुम्हला ते पटत नसल्यास माझी सक्ती नाही. इथे प्रत्येकाला सगळे तोंडापाशी आणुन द्यावे लागते अन एव्हडे करुनही ते त्यांची मते बदलतात असे नाही.

नेमके उत्तर द्यायला मी समर्थ आहे पण बांधील नाही. आणी म्हणून जर तुम्हाला माझे विधान मान्य नसेल तर माझी काहीही हरकत नाही कारण जे शंकराचार्य म्हणतात ते शंकराचार्य म्हणतात त्यात किंतु नाही अथवा माझे वैयक्तीक इंट्रप्रिटेशन नाही.

किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना वाटेल असेच तत्वज्ञान रचले(?) आहे हे सुध्दा वास्तव आहे पण पुन्हा बुध्दीजम अभ्यासायचा घाट नको म्हणून इतकेच म्हणेन चर्चा दोन अभ्यासु लोकांत नक्किच होउ शकते म्हणून सुत्रे वाचताना वा समजुन घेताना आपल्याला जर काही खरोखर अडचण आली तर अवश्य विचारा आपले शंकासमाधान होइ पर्यंत इथेच सामजावुन सांगीतल्या जाइल.

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2015 - 8:13 pm | प्रसाद गोडबोले

शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना वाटेल असेच तत्वज्ञान रचले

आता मात्र फार झाले , भाऊ , आपण उगाचच कैच्याकै हवेत बाण सोडत आहात . मराठीत एक रोखठोक म्हण आहे - बाप दाखव नाही तर श्राध्द घाल ! आपण जे काही दावे करीत आहात त्याच्या समर्थनार्थ दुवा द्यावा .

हे घ्या इथे शंकराचार्यांचे संपुर्ण साहित्य उपलब्ध आहे :

https://archive.org/details/CompleteWorksOfSriSankaracharyaIn20Volumes19...

आपण कोणत्या भाष्यातील कोणत्या वाक्याचा सन्दर्भ घेवुन वरील अनुमाने काढताहेत ते दाखवा , त्या निमित्ताने आमचाही पुनरेकवार अभ्यास होईल !

होवुन जाऊ दे एकदा हा सुर्य आणि हा जयद्रथ .

आपल्या लिंकंवरती ब्रम्हसुत्रे आहेतच. लिंक उपयोगी आहे.

तरीही शंकराचार्यांनी माया म्हणजे काय हे विषद करताना बुध्दाच्या जवळ जाइल असेच विधान केलेले आहे.

विकी वर शंकर के मायावाद पर महायान बौद्ध चिन्तन का प्रभाव माना जाता है। इसी आधार पर उन्हें प्रछन्न बुद्ध कहा गया है असे सुध्दा लिहले आहे.

शंकराचार्यांचे कोणते मत बुध्द तत्वज्ञानाशी साम्य दाखवते यावर चर्चा करायची आहे काय ?

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2015 - 8:31 pm | प्रसाद गोडबोले

सुत्राचा क्रमांक द्यावा बस्स इतकीच विनंती आहे , बाकी पुढील आपले विधान किती योग्य आहे ते आपण मग पडताळुन पाहु :)

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 10:23 pm | भाऊंचे भाऊ

शंकराचार्य कर्म सिध्दांत व त्यानुशंगाने पुनर्जन्म मान्य करत नाहीत कारण त्यांचे मायेचे अस्तित्व यावर विवेच अतिशय वेगळे आहे. परिणामी त्यांना गिताही मान्य नाही या माझ्या विधानावर मी ठाम आहे. किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना भासेल असेच तत्वज्ञान मायेसंदर्भात (परमात्म्याच्या न्हवे) स्पश्टीकरण देताना रचले आहे हे सुध्दा वास्तव आहे. आणी हे म्हणजे संपुर्ण त्यांनी बौध्द मत मान्य केले आहे असे अजिबात न्हवे( उलट ते उघड उघड खंडन केले आहेच), परंतु मायेच्या अनुशंगाने केलेले बरेच विवेचन बुध्दाप्रमाणे आहे. निव्वळ एक दोन सुत्रे वाचुन माझे हे मत बनलेले नाहीए आणी आपणही नुसती सुत्रे वाचुन ते बनवावे असे मी म्हणत नाही. प्रत्यक्ष भेट झाली तर एकुणच यावर अवश्य दिर्घ चर्चा करु. इथे लिखाणाचे विस्तारभय अतिअप्रचंड आहे.

माझे वरील मत कोणी मान्य करावे हा माझा अजिबात अट्ठास नाही, पण यानुशंगाने विचार घडू शकतो ही कल्पना जरी कोणाच्या मनात आली आणी त्याने त्याचा पडताळा घेण्यास स्व-प्रव्रुत्त व्हावे इतकेच मी अभिप्रेत करतो. प्रत्यक्ष भेटुन अवश्य बोलु.

अवांतरः- निव्वळ चर्चा करुन काही सिध्द-असिध्द करायचे असेल तर मला कोणाचेही (अगदी आद्य आचार्यांसकट कोणाचेही) मत सप्रमाण खोडून काढने अजिबात क्लिश्ट वाटत नाही पण माझ्या या धाग्यावरील प्रतीसादांचा मुळ उद्देश तो नाही.

बॅटमॅन's picture

18 Nov 2015 - 8:42 pm | बॅटमॅन

मी मगाशीच सांगितलेय की शंकराचार्य काय म्हणतात , त्यांचे मत बौद्धमताशी जास्ती सिमिलर आहे की वेदान्ताशी याने मला फरक पडत नाही. मी फक्त आधार विचारला आहे. मते बदलणे वगैरे लै दूरची गोष्ट झाली. एक संदर्भ विचारला तर इतके आकांडतांडव कशाला? असो.

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 9:45 pm | भाऊंचे भाऊ

कोणतेही आकांड तांडव केलेले नाही. आपण वेदान्ताचे जर व्यवस्थीत अध्ययन केले तर माझे म्हणने अवश्य पटेल. हे करताना केवळ एका ओवी/सुत्राचा वापर अधिष्ठान म्हणून अभिप्रेत नसुन काही सुत्रांचे संदर्भ सोबतीला शंकराचार्यांचे (अर्थातच अद्वैत परम्परेचे गुरु) गौडपादरचीत माण्डूक्यकारिका उपनिशदातील विवेचन ध्यानात घेउन या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात. आचार्यांचे हे अद्वैत विवेच अत्यंत व्यापक आहे. नुसते विकीपिडीया अथवा इतर साहित्य घोकुन हा विषय आकलनात येत नसतो हे सुज्ञास कसे सांगावे बरे ?

म्हणून मी पुन्हा सांगतो की जर प्रत्यक्ष भेट झाली तर नक्किच हा विषय अवश्य बोलता येइल कारण जर नुसतं बोलतानाच किमान २-३ तास जाणार असतील तर एकुणच विषय टंकायला किती वेळ जाउ शकतो ? याउपरही मी माझे विधान मान्य करावे असा कोणताही जोर कोणावरही केलेला नसताना व लेखी चर्चेपेक्षा भेटुन हे जास्त व्यवस्थीत बोलता येइल हे स्पश्ट केले असताना पुन्हा पुन्हा मला त्याच आशयाचे प्रतिसाद लिहण्यास उद्युक्त का केले जात आहे ?

बॅटमॅन's picture

18 Nov 2015 - 10:27 pm | बॅटमॅन

हे करताना केवळ एका ओवी/सुत्राचा वापर अधिष्ठान म्हणून अभिप्रेत नसुन काही सुत्रांचे संदर्भ सोबतीला शंकराचार्यांचे (अर्थातच अद्वैत परम्परेचे गुरु) गौडपादरचीत माण्डूक्यकारिका उपनिशदातील विवेचन ध्यानात घेउन या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात.

मग ग्रंथातला साधारण च्याप्टर क्रमांक सांगितला तरी बास आहे. तेवढे सांगा इतकेच फक्त सरळ सांगूनही पुन्हा पुन्हा मेगाबायटी बिनकामी प्रतिसाद कशाला लिहिले जात आहेत?

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 11:06 pm | भाऊंचे भाऊ

ठीक आहे त्यातली जी हवी ती ओळ वाच मी म्हणतो ते सिध्द होइल. नाहीच समजले तर मी इथे आहेच. हाउस आहे ना चर्चा करायची... गिगाबाइट्स कमी पडल्या तरी हरकत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2015 - 3:10 pm | प्रसाद गोडबोले

थोडक्यात " आम्ही रीतसर संदर्भ देणार नाही फक्त हवेतल्या हवेत बाण सोडत रहाणार " असे म्हणा ना तुम्ही!

:)

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 3:31 pm | भाऊंचे भाऊ

ठीक आहे शंकराचार्यांचे अद्वैतमतानुसार मायेच्याबाबत जे काही विवेचन आपणास माहीत आहे त्याचा कोणताही रितसर संदर्भ आपण द्यावा. मी त्याच्या समकक्ष बुध्दतत्वज्ञाचा संदर्भ देतो.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2015 - 6:45 pm | प्रसाद गोडबोले

=)) =)) =))

हसुन हसुन खुर्चीतुन पडलो राव .

एकतर मुळ विवादास्पद विधान तुम्ही स्वतः करता , आम्ही तुमच्या विधानाला आधार काय म्हणुन विचारले तर आम्हालाच सांगता होय आधार शोधायला !

काय खत्रुड लॉजिक आहे राव... हे म्हणजे चार महान अत्मसत्यांच्याही वरचढ झाले =))))

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 6:52 pm | भाऊंचे भाऊ

४ महान आत्मसत्ये आपण वाचली आहेत म्हणजे शंकराचार्यांचे माये विषयीचे काही विचार जे बुध्द तत्वज्ञानाशी सांगड घालतात हे आपणास माहित आहे असे होत नाही. मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट केली आहेत. ते विवादास्पद आपण ठरवत आहात. असो. उठुन बसा पडला असाल तर.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2015 - 7:03 pm | प्रसाद गोडबोले

मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट केली आहेत.

फक्त कोणत्याही रेफरन्स न देता इतकेच =))

भाऊंचे भाऊ's picture

19 Nov 2015 - 7:11 pm | भाऊंचे भाऊ

प्रेम रतन धन पायो हा चित्रपट अजय देवगणच्या दिवाने चित्रपटावरुन उचलला आहे.

चला बघु बरे प्रेम रतन पायोचा सिन टु सिन रेफरंस दिवानेच्या फ्रेम टू फ्रेमशी म्याच होतो का ते ? नाही ना.. मग... आम्ही म्हणत न्हवतो आमचे आचार्यच कसे ग्रेट ते. असो. आपण एव्हाना नक्किच उठुन बसला असाल अशी आशा आहे.

सत्य धर्म's picture

18 Nov 2015 - 4:43 pm | सत्य धर्म

चांगल्या विषयावर सर्वांनी खूपच टंगळ टवाळी केली ..........

अतिशय चुकीचा आहे ...........

सुबोध खरे's picture

18 Nov 2015 - 6:19 pm | सुबोध खरे

मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .
अध्याय लुप्त आहेत कि त्या ज्येष्ठ व्यक्ती लुप्त आहेत?

म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांनाच विचारा कि
आणी त्याच नसतील तर अडतच नाही तर पोहर्यात कुठून येणार म्हणून विसरून जा

टवाळ कार्टा's picture

18 Nov 2015 - 6:55 pm | टवाळ कार्टा

खिक्क

श्रीरंग_जोशी's picture

18 Nov 2015 - 9:21 pm | श्रीरंग_जोशी

अठराव्या अध्यायानंतरच्या अध्यायांचे बॅकप घेताना फाटेल एर्रोर आले की काय?

बॅटमॅन's picture

19 Nov 2015 - 1:08 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

बाकी ते एर्रोर वाचून युरो ट्रिप नामक अजरामर पिच्चरमधील स्युडोरोबोट व्हर्सेस हीरो या फायटीचा प्रसंग अठवला. योग्य जागी मार बसल्यावर तो "एर्रोर...एर्रोर..." करत खाली कोसळतो. =))

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2015 - 7:10 pm | श्रीरंग_जोशी

युरो ट्रीप - बस नाम ही खापी हैं ;-) .

संदीप डांगे's picture

19 Nov 2015 - 3:19 pm | संदीप डांगे

रंगाण्णा कदितरी एकच मारतात बट सॉल्लीड मार्तात... =)) =))