नेहमीप्रमाणे मुंबईमधील एक नावाजलेली शाळा. कार्यक्रम जवळ जवळ दोन तास चालला.
मुलांनी बरेच प्रष्न विचारले(अडचणीचे). त्यांचे समाधान करु शकलो देवाच्या दयेने. कार्यक्रम संपल्यावर मुख्याध्यापकांच्या केबिन मधे काही शिक्षक भेटायला आले. मला लगेच निघायाचे होते परत ठाण्याला. पण शिक्षकांच्या विनंतीला अव्हेरणे जमले नाही. त्यांना पण काही प्रष्न विचारायचे होते. सगळे एक रिकाम्या वर्गात जमले. १ ला वार सायन्स च्या शिक्षिकेने काढला.
सर, तुमचे ८६ अमेंड्मेंट बद्द्ल काय मत आहे.
मी: हा काय प्रकार आहे ते मला माहित नाही. मी प्रामणिक पणे उत्तर दिले.
माझ्या अज्ञानाबद्द्ल किंव त्या बाईंच्या चेहेर्-यावर स्पष्ट दिसली.
१४ वर्षापर्यंत किंवा आठवी पर्यंत मुलांना शिक्षण अनिवार्य करण्याचा कायदा होणार आहे. त्यामुळे परिक्षेत मुले नापास करताच येणार नाही. फक्त ग्रेड्स द्यायच्या आणि प्रमोट करायचे.
असे काहीतरी घाटते आहे हे मला माहित होते.
मग प्रॉब्लेम काय? -मी
बाईंनी लगेच बॅगेतुन कागद काढला. माझ्याकडे दिला.
त्यात एक गीताचे विडंबन होते. सेंडॉफ ला दहावी च्या एका मुलाने सर्व वर्गासमोर तो कागद पिवळ्या साडीतल्या मुलीला दिला होता.
हिरवी हिरवी गडद साजिरी
भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तु ग
सांगे तो चौघडा -------------------------------------ह्या गाण्याचे विडंबन.
विडंबन खालील प्रमाणे
पिवळी पिवळी गडद हा**
भरला सगळा घडा
वधु पादरी झालीस तु ग
सांगे तो चौघडा
मी हसलो.
बाई वैतागल्या. " अहो सर हा मुलगा मेरीट मधे येउ शकतो" मुलीच्या पालकांना समजावताना ना़की नउ आले.
ह्या क्लु वर संस्कृत च्या शिक्षकाने एक पेपर काढला.
त्यात एका संस्कृत श्लोकाचे भाषांतर होते.
मुळ श्लोक असा.
आशानाम मनुष्याणाम
काचिद आष्चर्य श्रुंखला
यया बद्धा प्रधावन्ति
मुक्ता: तिष्ट्ती पंगुवत
त्याचे मराठी भाषांतर असे.
आशा नावाची डेंजर आयट्म असते. हीने धरला की लय धावपळ होते. मुक्ता पांगळ्यासारखी नुसतीच बघत बसते.
संस्कृत कच्चे असेल मुलाचे. त्याला जमेल तसा अर्थ लिहीला त्याने.--मी
संस्कुत मधे १०० पैकी १०० मिळवेल अशी आशा आहे आम्हाला त्याच्याकडुन सर- शिक्षक
असे का करतात हो ही मुले ? -मुख्याध्यापक
हॉल टीकीट मिळाल्यानंतर तुमचा धाक जातो. ही नांदी असते बंडाची. साठलेल्या क्षोभाची.-मी (आणि उद्याच्या वादळाची-मनातल्या मनात)
बोललो आणि मी चुकलो हे माझ्या लक्षात आले.
मराठी शिक्षकाने लगेच मुद्दा मांडला.
सर, असे असेल तर परिक्षेत नापास होणारच नाही असे मुलांना कळेल तर शिक्षक म्हणुन आमची काय पत्रास ठेवतील ही मुले. ट्रॉमाच्या भितीने शिक्षा करता येत नाही. शिक्षेच्या अभावी बेधुंद मुलावर नियंत्रण ठेवायचे कसे? आमची गांडूळे होणार.
माझ्याकडे उत्तर नव्हते.असे काहीतरी बील पटावर आहे. त्याचे इंप्लीमेंटेशन नेमके कसे होणार ते अजुन नीट माहित नाही. शिक्षक मंडळी आधीच धास्तावलेली आहेत.
जाता जाता: ह्या दोन्ही पोरांना भेटायला पाहीजे. माझी ११वी आठवली.
आनंदी आनंद गडे
गाभा:
प्रतिक्रिया
22 Dec 2008 - 6:22 pm | अवलिया
ह्या दोन्ही पोरांना भेटायला पाहीजे.
एका अवलियाला भेटाल तर सगळे नमुने पहायला मिळतील.
आता भेटीबद्दल बोलाल तर..... सब्र तो कर मेरे यार
जाता जाता - ज्यांना रघुपती राघव.... आणि घालीन लोटांगणचे विडंबन हवे असेल तर व्य नी करा
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 8:59 pm | अघळ पघळ
'नमस्ते सदा वत्सले' ह्याचे विडंबन हवे असल्यास व्यनी केला तर चालेल का?
22 Dec 2008 - 10:56 pm | विनायक पाचलग
मला कर जगासमोर उघडा करतो तुला
24 Dec 2008 - 7:54 am | बगाराम
कोल्हापुरी दादा,
वरती ज्यांनी रघुपती राघव राजाराम आणि घालिन लोटांगणचे विडंबन ऑफर केले आहे त्यांना जगासमोर उघडे करायची धमकी दिली नाहीत ते? संघाचीच प्रार्थना फक्त वंदनीय आहे का? विडंबनच करायचेच आहे तर सगळ्याचेच होऊ जाऊ द्या की. बघा पटतय का..
-बगाराम
24 Dec 2008 - 8:08 pm | विनायक पाचलग
पटतय पण ते कोणी केले ते मला माहित नाही आणि त्यानी त्याची जाहीर प्रसिद्धी चालवलेली नाही
म्हणून याला घेतला थोड्या दीवसाने इतर सापडले तर त्याना पण कोल्हापुरी इंगा दाखवायला कमी करणार नाही.
अस्सो जास्तच कडक बोलतोय
25 Dec 2008 - 9:59 am | वेताळ
आपल्या अशा वर्तणुकीने कोल्हापुरचे नाव बदनाम होते आहे. इंगा दाखवायला हा कुस्तीचा आखाडा नाही आहे. इथे सर्वजण आपले विचार मांडु शकतात.बाकीची कृती करायला संपादक मंडळी आहेत.
वेताळ
22 Dec 2008 - 6:38 pm | बिपिन कार्यकर्ते
मास्तर अपुर्या माहितीवर बोलतोय पण त्या मुलांपेक्षा शिक्षकांनाच समुपदेशनाची जास्त गरज आहे असे वाटते. जे काही प्रसंग लिहिले आहेत ते माझ्यामते तरी सर्वसाधारण आहेत. त्या शिक्षकांना संमोहनाद्वारे त्यांचे ह्याच वयातील वागणे आठवायला लावा किंवा 'शाळा' वाचायला द्या, लगेच गुण येईल आणि आराम पडेल.
जाता जाता: मला माझी १०वी आठवली.
बिपिन कार्यकर्ते
22 Dec 2008 - 6:40 pm | अवलिया
त्या शिक्षकांना संमोहनाद्वारे त्यांचे ह्याच वयातील वागणे आठवायला लावा
किंवा शिक्षिका आजु बाजुला नसतांना आपापसातले बोलणे आठवायला लावा
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 6:41 pm | लिखाळ
माझ्यावर झालेल्या संस्कारांवर शाळेतल्या शिक्षकांचा वाटा किती यावर विचार करतो आहे.
मुले वाया जातील याची भीति आहे की आमची डाळ शिजणार नाही याची? शांतपणे मुलांना समजावायला जास्त मानसिक उर्जा खर्ची पडते आणि थोबाडित मारले की आपले काम लवकर साधते असा अनेकांचा स्वभाव असतो.
तारतम्याने शिक्षा, धाक-धपटशा हवाच याबद्दल दुमत नाही.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
22 Dec 2008 - 7:15 pm | ब्रिटिश
पोरान्ला भेटून क करनार र दादुस
सविस्तर लीव न
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
22 Dec 2008 - 7:17 pm | अवलिया
पोरान्ला भेटून क करनार र दादुस
म्हंजी क म्हंतो रं
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 7:34 pm | विनायक प्रभू
त्या पोरांना मिपाचे सदस्य बनवणार.
22 Dec 2008 - 11:01 pm | विनायक पाचलग
ते करा अगर करु नका
पण लेख विचार करायला लावणार आहे
आणि हो कदाचीत यासाठी तोंडी परिक्षा काढल्या असतील
आणि हो इतर वेळी दहावीच्या वर्षात पोरगा वर्गात दीसायचा नाही
आणि आता दररोज येतो
का?नाहितर तोंडी परिक्षेचे मार्क मिळणार नाहित ना
आता बोला
आणि हो शिक्ष्कांचा आदर केलाच पाहिजे .
हे जे माझे समवयस्क आहेत त्याना माज आलाय माज
कोणीतरी तो उतरवलाच पाहिजे
23 Dec 2008 - 9:08 am | पिवळा डांबिस
आणि हो शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे .
खरंय! पण हे त्याच शिक्षकांच्या बाबतीत की जे गुरू म्हणवून घ्यायच्या पदवीला योग्य आहेत.....
आम्ही असे काही शिक्षक पाहिले आहेत (हो!! त्याकाळातही ते होते आणि आजही आहेत!!!) जे आयुष्यात इतर काही करता न आल्यामुळे शिक्षक झाले आणि त्याचं फ्रस्ट्रेशन ते कोवळ्या, निरपराध आणि प्रतिकार करण्यास अक्षम अशा मुलांवर काढताहेत....
अशा शिक्षकांनी जर तुमच्या मुलांवर फ्रस्ट्रेशन काढलं तर त्यांना पालकांनी फटकावलेच पाहिजेत....
"तुका म्हणे ऐशा नरा (आणि महिला!!!)
मोजून माजाव्या पैजारा ||"
तिथे नसता संकोच आणि पोकळ आदरभाव बाळगण्यात अर्थ नाही. नाहीतर तुमच्या पाल्याचं जन्माचं नुकसान व्हायचं!!!!!
आपण पालक प्रथम आहोत आणि शिक्षकांचे कैवारी नंतर.....
तुम्हाला काय वाटतं दादा?
22 Dec 2008 - 11:10 pm | मुक्तसुनीत
लेख वाचला. मुलांचा टारगटपणा ही बाब आजची नाही. नवी बाब आहे , ती म्हणजे , या आणि अशा असभ्य वर्तनाला आळा घालण्याकरता असणारी शक्ती/अधिकार/अस्त्रे गमावण्याच्या भीतीबद्दल. जर "१४ वर्षापर्यंत किंवा आठवी पर्यंत मुलांना शिक्षण अनिवार्य करण्याचा कायदा होणार आहे. त्यामुळे परिक्षेत मुले नापास करताच येणार नाही. फक्त ग्रेड्स द्यायच्या आणि प्रमोट करायचे." हा नियम अस्तित्वात आला , तर त्या गोष्टीचा आणि शिस्तीचा , असभ्य वर्तनाला आळा घालण्याचा नक्की काय संबंध हे मला नीटसे समजले नाही. मुलांना पास-नापास केले जायला हवे ते त्यांच्या त्या त्या विषयातील मार्कांवर - म्हणजेच त्यांनी दाखवलेल्या शैक्षणिक पात्रतेवर. मुलांना पास-नापास करण्याचा अधिकार शिक्षकांना आहे तो काही त्यांच्या वर्तणुकीवर अवलंबून नाही.
मुलांचे वर्तन असभ्य/गैरशिस्तीचे वाटले , तर त्यावर साम-दाम-दंड-भेद आहेतच. (आता यात "दाम" वगैरे आणण्याची गरज नाही.) पाल्य/पालक/शिक्षक यांच्यातील संवाद आणि समुपदेशन-वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा-गुन्ह्याच्या गांभीर्यावर आधारित शाळेतून हकालपट्टी हे सारे उपाय पास-नापास या पद्धतीत आहेत आणि पास-नापास पद्धत नसतानाही लागतीलच. एखादे मूल गैरशिस्त वागले किंवा/आणि त्याने एखाद्या शिक्षकाचा अपमान केला , तर त्याला नापास करणे माझ्या मते बेकायदा आहे.
23 Dec 2008 - 9:21 am | रामदास
मला वाटतं मुलं या वयात हे प्रयोग करणारच. करू द्या .या प्रकाराची दखल घेऊन फारसा बाऊ करण्यात काही अर्थ नाही.त्यांना मिपावर आणण्याचा प्रस्ताव स्वागतार्ह आहे.मोठेपणी चांगले विडंबनकार होतील
आता राहता राहीला धाकाचा प्रश्न.आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याचा निर्णय घातक आहे.पालकांनी विरोध केला पाहीजे.आठवीपर्यंत परीक्षा न घेता अभ्यासक्रम प्रोजेक्ट ओरीएंटेड केला तर जास्त बरं.
आमची गांडूळे होणार.
गांडुळे असतील तर ती गांडुळंच राहतील.
23 Dec 2008 - 11:48 am | विनायक प्रभू
मी वर सांगितलेले प्रयोग साधारण होते. असाधारण लिहु शकलो नाही. एकंदरीत सर्व प्रयोगाने आधीच कमी होत गेलेले शिक्षकांचे नियंत्रण आता काहीच रहाणार नाही अशी भिती त्याना वाटत आहे.
प्रोजेक्ट ओरीएंटेड अभ्यासक्रम ही चांगली कल्पना राबवायला आधी शिक्षकांचे अपग्रेडेशेन करावे लागेल.
23 Dec 2008 - 10:49 am | स्नेहश्री
परिक्षा तर हव्यातच पण त्या चांगल्या वातावरणात होणे गरजेचे आहे. बरचेसे शिक्षक सुद्धा फेवरिझम च्या कडे झुकलेले असतात. त्यमुळे अनेक विद्यार्थ्याचे यात नुकसान तर होतेच पण शिक्षकांविषयी जो आदर असण्याची गरज आहे तोही नसतो.आधी शिक्षकाना पण खरच समुपदॅशनाची गरज आहे.
काहीही करता येत नाही अथवा करण्याची इच्छा नाही म्हणुन शिक्षकी पेशात येणार्या शिक्षकाची संख्या झपाट्याने वाढत आहे.माझ्या स्वता:च्या शाळेत सुद्धा अतिशय वाईट शिक्षक आले आहेत ज्याना खरच गुरु म्हणावेसे वाटत नाही.हुशार विद्यार्थ्याकडुन उत्तरपत्रिका तपासुन घेणे, अथवा त्यानी लिहीलेल्या उत्तराना प्रमाण धरणे हे प्रकारतर सध्या सर्रास शाळांमधुन दिसुन येतात.
माझ्या स्वता:च्या भावाने दुसरीमध्ये असताना "दगड" चे अनेकवचन काय असा प्रश्न होता तेव्हा त्याने "एक दगड आणि अनेक दगड" अस लिहिल्यावर आदरणीय बाईनी त्याला चुक असे दिले का तर दगड चे अनेक वचन "दगडी" हे उत्तर बरोबर आहे. त्याच बाईनी मसाल्याचे पदार्थ"जीरे" अस लिहील्यावर चुक दिल का तर जिर फोडणीसाठी वापरतात मसाल्यात नाही.
आणि आता वरील उदाहरणावरुन वाटेल का द्यावी परिक्षा?
अवांतरःमाझ्या पहाण्यात असे अनेक विद्यार्थी आहेत की ते शाळेत कधीच कोणाचे लाडके नव्हते पण शाळेत मिळावलेल्या अनुभवाने अथवा स्वकर्तुत्वावर मिळवलेल्या शिक्षणाने ते आज उत्तम ठिकणी पोहोचलेले आहेत, आणि आता शाळा त्यांच्याकडुन मदतीची अपेक्षा ठेवत आहे.असे विदयार्थी करतील का मदत शाळेला ?
माझ्यामते आधी शिक्षक सुधरण्याची गरज आहे. मग विद्यार्थी आपोआप सुधरतीलच.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
25 Dec 2008 - 9:15 pm | आबा
आम्हालाही एक, कदम बाई हिंदी शिकवायच्या......
त्यांचे आपकू, मेरकू, तेरकू, हमरेकू अश्या धाटणीचे हिंदी आठवते..
23 Dec 2008 - 5:10 pm | सामान्य श्रिमन्त
लै भरि
24 Dec 2008 - 10:27 am | मन्जिरि
मास्तर,आधितर जाम हसले ,मग त्या मुला॑ना शाब्बास म्हतले,हिम्म्तेचे,विचार शक्तिचे कोउतुक वातले
24 Dec 2008 - 3:30 pm | विसुनाना
आशा नावाची डेंजर आयट्म असते. हीने धरला की लय धावपळ होते. मुक्ता पांगळ्यासारखी नुसतीच बघत बसते.
एकदम पर्फेक्ट अर्थ आहे. फक्त शुद्ध मराठीत लिहिला आहे एवढेच!
विडंबनही वयाला साजेसे आहे. या वयात मुलांना 'मानवी विष्ठा' हा विनोदाचा विषय वाटतो.
पोरांचे कौतुक वाटले.
जे शिक्षक धाक दपटशा दाखवून आपल्या शिकवण्यातली वैगुण्ये झाकण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच या कायदेबदलाची भीती आहे.
परीक्षा हा काही आदर निर्माण करण्याचा मार्ग नव्हे.
24 Dec 2008 - 8:23 pm | चतुरंग
वात्रटपणा करतात. कधीकधी मात्र ते प्रकार आचरटपणाकडे झुकतात. दहावीतल्या पिवळ्या साडीतल्या मुलीला असे विडंबन देताना त्या मुलाला काही वाटले नसेलही पण त्या वयातल्या मुलींना मात्र चारचौघात लाज गेल्यासारखी वाटू शकते. अशा प्रकारची चेष्टा ही कोणाला वैयक्तिक दुखावणारी ठरू नये ही समज त्या मुलाला इथे देणे जरुरीचे ठरते.
संस्कृत भाषांतर टारगट आहे. मुलांची बुद्धी अशी काहीतरी विचित्रपणा करतच असते त्याला वाट दाखवणे गरजेचे ठरते.
जरा चाकोरीबाहेरचे काही करणारे विद्यार्थी हे डोईजड वाटणे, त्यांना 'वठणीवर' आणावेसे वाटणे, शिक्षा हे एकमेव हत्यार उपसून मुलं सरळ होतात अशी कल्पना मनात असणे, 'परीक्षेत नापास करु' अशा भीतीचा हत्यारासारखा वापर करणे ही सगळी व्यवस्था ढासळत असल्याची लक्षणे आहेत.
अर्थात सगळा दोष शिक्षकांना देऊनही चालणार नाही. पालकही तेवढेच जबाबदार आहेत. शाळेत मुले सोडली की आपली जबाबदारी संपली आपण कसेही वागायला मोकळे अशी सोयिस्कर समजूत करुन सगळे खापर शिक्षकांच्या माथी फोडण्यात लोक धन्यता मानतात. "काय म्हणतोय तुझा मास्तर?" किंवा "काय म्हणतेय तुमची नवीन मास्तरीण? काही शिकवते का नुसतेच नटते?" असले अनादराचे उल्लेख पालकंच मुलांसमोर करताना मी शाळेत असल्यापासून ऐकले आहे. आपल्या बोलण्याचा मुलांवर परिणाम होतो, शिक्षक ही आदरणीय व्यक्ती नसून येताजाता चेष्टा केली तरी चालेल अशी व्यक्ती आहे असा समज कळत/नकळत वाढतो आणि पुढे बहुसंख्येने तसे शिक्षक समोर आले तर वाढीला लागतो/पक्का होतो.
शाळेत ठराविक काळाने (उदा.दर तीन महिन्यात एकदा) पालकसभा असावी असे वाटते. शिक्षक/पालक/विद्यार्थी/समुपदेशक अशी चौकडी एकत्र येणे गरजेचे वाटते. बोलल्याने अनेकदा मनातल्या गोष्टींचा निचरा होतो, कल्पना आणि वास्तव ह्यातली दरी थोडीफार तरीसमजेल असे वाटते.
चतुरंग