फार पूर्वी रेडिओ सिलोन 'बिनाका गीतमाला' हा एक लोकप्रिय कार्यक्रम सादर करीत असे. त्यामध्ये लोकांच्या पसंतीची गाणी त्यांना मिळालेल्या गुणपसंतीने क्रमवार वाजवीत असत आणि त्यात एक गाणे सरताज गीत म्हणून शेवटी वाजवले जात असे. त्याची वार्षिक मानांकन पद्धतही होतीच.
आमचा स्वतःचा असा काही रेडिओ नाही आणि तसेही आम्ही स्वतःच एक रेडीओ झालो आहोत. नाही नाही, बातम्या माहिती पुरवतो म्हणून नाही, तर जळी-स्थळी, घरी-दारी (पक्षी नोकरीत) आम्हाला कुणी ना कुणीतरी (खेळात राज्य आल्यासारखे) "रेडी का?" असे विचारत असते आणि आम्हीही मुकाट्याने "ओ" देत असतो, म्हणून रेडीओ!
नमोंनी मन की बात आणली, मग मिपा कसे अपवाद ठरेल? म्हणून आम्हीही कंबर कसली (अर्थात आमचीच) आणि कामाला लागलो. सगळ्या जगाच्या मनात काय चाललेय याच्यावर खल करणारे 'मुक्ताफळे-धुराळी' धागे पाहिले. पण मिपा वाचकांच्या (काही खरोखरच वाचनमात्र आहेत बिचारे!!) मनात नक्की काय आहे, याचा कुणी मागोवा घेईना. मग कमी तिथे आम्ही.. आम्हीच हे शिवधनुष्य पेलण्याचे अवघड कार्य (लेखात एखादा तरी बोजड शब्द असावा, म्हणून.. बाकी काही नाही) शिरी घ्यायचे ठरवले.
त्याच धर्तीवर आम्ही मिपाकरांचे मनात मिपाजगाबद्दल, मिपाबाह्य जगाबद्दल काय आहे याचा धांडोळा घ्यावा, म्हणून गाण्यामध्ये आपले मत व्यक्त करा असे आवाहन केले. आपल्याला कुणासाठी काय गाणे लावावे असे वाटते ते नि:संकोचपणे सांगा, सुचवा असे सांगितले. आणि आमच्या अखिल जगातील प्रतिनिधींनी त्याची दखल माहिती घेऊन आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
मिपावर हिरिरीने आपचा किल्ला लढविणार्या आप्टार्ड (शब्दश्रेय - ट्रुमन साहेब) लोकांसाठी खास हे गाणे.
आपवर दिलेल्या गाण्याने भाजपेयी आणि सेनावादींनी हुरळून जायचे कारण नाही. त्यांचेसाठीही आमच्या जिल्हास्तरीय प्रतिनिधींनी खास गाणे पाठविले आहेच.
सेना भाजपाचा उल्ल्ल उल्लेख झाला आणि पप्पूला कसे विसरून चालेल हे गाणे मिपाकरांकडून खास युवराज युवराज राहुल बाबांसाठी.
अध्यात्म का विज्ञान असा टोकाचा वाद घालून मिपाचा बराच भाग (अर्थात मिपाकरांचाही वेळ) खालेल्या, हुकमी खेळ करणार्या महान विचारवंतांसाठी खास हे गाणे. (त्यांची हमरीतुमरी + दावे-प्रतिदावे पाहून असेच वाटते.)
खास उनकच्या सभासदांसाठी लोकाग्रहास्तव हे गाणे
आधी (बायको माहेरी गेल्याच्या) हर्षोल्हासातील
आणि नंतर बॅचलर ज्वर ओसरल्यानंतरचे
सरकार दरबारी असो की लग्नाच्या बाजारात असो, एकमेव गाणे वाजते.. देवा मान्य करा, करू नका.
आणि हे एकला चलो रे धाग्यावाल्या आमच्या हौशी गुणी मिपा साहित्यिकांसाठी. तुमच्या धाग्याला प्रतिसाद कमी आले, तरी तुमचे लिखाण थांबवू नका.
मिपावर ज्येष्ठ असलेल्या (वयाचे माहीत नाही) आणि त्यांनी केलेल्या गमती-जमती आणि मस्तीसाठी खास हे गाणे.
(रा.रा. केशव सुमार, धमाल भौ, डॉन राव्, परा, पुण्याचे पेशवे, टींग्या शेठ इ. प्रभृती) खास यांच्यासाठी हे गाणे -
मिपावर जरा चाकोरीबाह्य विषय, मत-मतांतरे मांडली की अस्मिता गळवे ठणकणार्या मंडळींसाठी (ही गळवे बरोबर काही धाग्यांवरच प्रकट होतात, इतर वेळी अवतारी बाबांसारखी (मुवी बाबा नव्हे) गुहेत गुप्त असतात. यात प्रत्येक आरोप हा आपल्या साहित्यावर, साहित्यमूल्यावर आहे हे पुरेपूर माहीत असूनही आपल्या जमातीवरच हल्ला असल्यासारखा गाव गोळा करून कांगावा करणे ही खासियत.(@@@म खतरेंमे अशी बांग देणारे आणि ही मंडळी एकाच प्रकारची.)
आता या गाण्यात संध्याबाईंनी हलवलेली मान जितकी जोरात आहे, त्यापेक्षाही तावातावात स्वघोषित प्रतिनिधी वाद-विवाद करतात. करू देत बापडे.
'मिपा पूर्वीसारखं राहिलं नाही' असा राग आळवणार्यांसाठी खास हे गाणे. नवीन मिपा वाचक सहभागींना सतत पूर्वी कसे भारी बहारदार होते आणि आत्ता काहीच नाही असे समजणार्यांसाठी खास हे गाणे.
मिपा फक्त टवाळांचा अड्डा आहे असे सगळीकडे सांगत फिरणार्या विद्याविभूषीत महाभागांनाही आपली कौले फोडायला मिपावरच यावे लागते, याचा विसर पडणार्यांसाठी खास हे गाणे, कारण मिपा आहे हे असे आहे आणि राहीलही.
आणि हे आमच्या साहित्य संपादकांसाठी (आधीही मित्र होतेच, आताही आहेतच.)
त्यांच्या कामासाठी (एकाच वेळी प्रोत्साहन आणि शिस्त लावणे या दोन्ही जबाबदारी) हे गाणे आहे.
या गाण्यातील जॉनीभाईच्या चेहर्यावरील भाव पाहा आणि सा.सं.नी मजा घ्यावी ही विनंती.
(क्योंकी सासं भी कभी बहू थी) सास = साहित्य संपादक. बहू= बर्यापैकी हुल्ल्डबाज
आणि हे शेवट्चे गीत खास तमाम जगभर विखुरलेल्या मिपाकरांसाठी (नव्या घरात वास्तव्यास जाणार्या, नव्या बाळाच्या पहिल्या दिवाळीसाठी, लग्न ठरलेल्या मिपाकरांसाठी आणि दिवाळीसाठी गावी-मायदेशी आलेल्या मिपाकरांसाठीही)
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 8:05 am | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या ह्या ह्या...भारिच
10 Nov 2015 - 8:26 am | सतिश गावडे
यात "माझी चादर कोणी चोरीयली" हे गाणं नाही. :)
10 Nov 2015 - 10:18 am | टवाळ कार्टा
कदाचित मिपावर कोणी चादरचोर नसेल =))
10 Nov 2015 - 9:08 am | बोका-ए-आझम
सास बहू तुफान! फुटलो!
- (९९.९ मिपा एफ एम) बोका
10 Nov 2015 - 10:17 am | टवाळ कार्टा
कंबर कसणे या वाक्प्रचाराला तुम्ही एक नवा अर्थ प्राप्त करून दिलात आज =))
बाकी काही गाणी हातची राखून ठेवली आहेत हे लेख वाच्ताना वाक्यावाक्याला जाणवले ;)
10 Nov 2015 - 10:42 am | मित्रहो
हे जबरदस्त होत. फार विचार करन गाणी सुचवलीत.
मस्त
10 Nov 2015 - 4:06 pm | मी-सौरभ
आवडले
11 Nov 2015 - 1:15 am | शशिकांत ओक
दिवाळीच्या फराळाच्या चवीनुसार...
11 Nov 2015 - 7:59 am | मांत्रिक
धमाल धागा!!!
पेश्शल नाखुकाका स्टैलमधे...
11 Nov 2015 - 9:13 am | खेडूत
:)
शुभेच्छा !!
11 Nov 2015 - 9:16 am | विशाल कुलकर्णी
लैच भारी...
12 Nov 2015 - 3:02 pm | पैसा
:)
12 Nov 2015 - 4:55 pm | यशोधरा
:)
12 Nov 2015 - 10:57 pm | एक एकटा एकटाच
मस्तच
लयभारी
झक्कास
कल्पकतेला सलाम
12 Nov 2015 - 11:08 pm | श्रीरंग_जोशी
काय एकाहून एक चिमटे काढले आहेत. मानले तुम्हाला.
हे एक गीत खास तुमच्यासाठी.
12 Nov 2015 - 11:12 pm | एक एकटा एकटाच
जश्यास तसे
हा हा हा
12 Nov 2015 - 11:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
पेश्शल नाखु इस्टाईल मध्ये ये मारा गेंद स्टेडियमके बाहर !
12 Nov 2015 - 11:47 pm | संदीप डांगे
मजा आ गया..
13 Nov 2015 - 6:16 am | मनीषा
फर्माइषी गीतांचा कार्यक्रम आवडला.
सर्व गाणी एकदम चपखल.
13 Nov 2015 - 11:51 am | पद्मावति
मस्तं!
14 Nov 2015 - 1:55 am | प्रभाकर पेठकर
एव्हढे सगळे प्रकार आहेत मिपा सदस्यांमध्ये? बापरे.....
14 Nov 2015 - 9:52 pm | सस्नेह
=)) फर्माइशी फराळ लैच्च..!!!
14 Nov 2015 - 9:59 pm | रातराणी
खी खी खी ! खासचं! सास बहू भारी :)
15 Nov 2015 - 12:04 pm | मुक्त विहारि
मस्त....
19 Nov 2015 - 3:07 pm | नाखु
सर्व आस्वादकांचे प्रतिसादकांचे धन्यवाद आणि ( केशव सुमार, धमाल भौ, डॉन राव्, परा, पुण्याचे पेशवे, टींग्या शेठ इ. प्रभृती) व साहीत्य संपादकांनी ने मोठ्या मनाने ही गंमत खिलाडूपणे घेतल्याबद्द्ल जाहीर आभार.
हा माझा दिवाळी अंकातील पहिला वहिला लेख असल्याने, लोकांना कितपत आवडेल याबद्द्ल साशंक होतो.
आप्ल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद
नाखु (नव मिपाकर)
19 Nov 2015 - 7:18 pm | सुबोध खरे
झक्कास