१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील.
२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली.
औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे.
आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे
भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे.
२०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले.
वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली.
थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली.
ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.
मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे.
थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे.
जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे.
प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे.
५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता.
त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती.
मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला.
काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला.
येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती.
मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे.
गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे.
मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता.
जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत.
ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला.
मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye".
याच लेखात पुढील वाक्ये आहेत.
Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing.
चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत.
२ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.
२००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे.
"संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे.
मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे.
कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे.
देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे.
"भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल.
महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय.
दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल.
नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते.
नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते.
मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल.
एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे.
राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते.
काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती.
मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे.
एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे.
"सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही.
लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित.
महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत.
एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे.
विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण.
_________________________________________________________________________________
मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे.
मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते.
_________________________________________________________________________________
एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण.
_________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की!
_________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो.
वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन.
जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल.
Now shoot
_________________________________________________________________________________
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 9:40 pm | प्यारे१
ओये बापुसाब, का कर रहा ससुरा? काहे अपने गुरुजनोंसे जबान लडा रहाहो?
कह दिया ना उत्पाद कम है तो है. बातही खतम.
हमार गांव मा घर का पडोस मे बडा ब्यापारी है. इत्ता बडा गोदाम है उसका. राजमा, मूंगफली, दाल ना जाने का का भर के रखता है. किसानोंसे खरीद खरीद कर रख देता है और पता नहि कब अचानक से बडा बडा गाडी लाकर भेज देता है.... लेकीन गुरुजी ने कहा ना उपज कम है तो है बुडबत.
16 Oct 2015 - 9:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
पहले कहा गायब थे भैबा!ससुरे पहिले बताइबे करते तो हम पहले ही माफ़ी मांग कर कन्नी न काट लेते रे!
16 Oct 2015 - 9:51 pm | प्यारे१
:)
17 Oct 2015 - 6:13 am | dadadarekar
सुप्रीम कोर्ट तसेच देशातील २४ हायकोर्टांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने संमत केलेला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा शुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने घटनाबाह्य ठरविला. त्यामुळे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी २२ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली कॉलेजियम पद्धत पुनर्स्थापित झाली आहे
25 Oct 2015 - 3:10 pm | सव्यसाची
भाजपला दणका?
दोन्ही सभागृहात भाजपचे २/३ बहुमत आणि २० राज्यात भाजपची सरकारे??
17 Oct 2015 - 7:08 pm | अभिजित - १
तूर डाळ पिक कमी येणार हे सरकारला आधीच माहित होते. मग आयात का केली नाही वेळेत ? आणि आत्ता तरी कुठे करतायत ? पाच हजार टन आयात . फक्त इतकीच ? हे म्हणजे दर्या मी खसखस आहे. बहुतेक आयात न करण्या मागे काही तरी ठोस विचार असलाच पाहिजे. जसा - निवडणूक फंड ची परस्पर परतफेड .. जनतेच्या खिशातून ..
17 Oct 2015 - 11:26 pm | श्रीगुरुजी
India set to import tur dal from Africa amid high domestic prices
http://articles.economictimes.indiatimes.com/2015-08-19/news/65592393_1_...
23 Oct 2015 - 3:03 pm | कपिलमुनी
महाराष्ट्रात २३,००० ट्न डाळ सापडली.
17 Oct 2015 - 7:18 pm | dadadarekar
लेबल
------------------------------------------------------------------------------
मेक इन इंडियाचं स्वप्न केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या उद्योजकांना दाखवणा-या नरेंद्र मोदींच्या लाडक्या म्हणजे जगातल्या सगळ्यात उंच ठरणा-या १८२ मीटरच्या सरदार पटेलांच्या पुतळ्याचे काम चिनी फाउंड्रीला देण्यात आल्याचे आउटलूक मॅगेझिनने म्हटले आ
17 Oct 2015 - 7:18 pm | अभिजित - १
Govt inaction, commodity trading behind spiraling prices of pulses
Prajakta Kunal Rane, Hindustan Times, Mumbai |
Updated: Oct 17, 2015 00:23 IST
http://www.hindustantimes.com/mumbai/govt-inaction-commodity-trading-beh...
17 Oct 2015 - 11:44 pm | श्रीगुरुजी
वरील प्रतिसाद व त्यात दिलेली लिंक वाचून आआपभक्त नांदेडिअन यांची आठवण आली. ते अशाच लिंक्स न वाचता फक्त शीर्षक वाचून देतात आणि आतल्या लेखात नेमकं त्यांच्या अपेक्षेविरूद्ध लिहिलेलं असायचं.
या लेखात खालील परिच्छेद आहेत.
People reeling under the skyrocketing prices of essential commodities can blame the state government. The reason: its failure to extend the stock limit validity. Prices of tur dal and urad dal, two of the most commonly consumed pulses, have significantly increased.
Experts blamed this on commodity trading and the state government’s failure to revive the stock limit.
The state government failed to revive the stock limit for pulses even after receiving three circulars from the Union government in June and July.
In the first circular dated June 17, Surendra Singh, deputy secretary to the government of India, asked the state chief secretary to revive stock limits and take effective steps against hoarding under Essential Commodities Act, 1955 with respect to pulses, edible oil and oil seeds. Hindustan Times was the first to report about these circulars and the state government’s inaction.
अर्थ उघड आहे.
19 Oct 2015 - 8:47 pm | अभिजित - १
घाईत असल्याने पेज पूर्ण वाचले नव्हते. तरी हि खालील भाग जो गुरुजीनीच लेखातून टाकला आहे तो सरकारची अकार्यक्षमता दाखवायला पुरेसा आहे. commodity trading हे केंद्राच्या अखत्यारीत येते. आणि देवेंद्र किवा नरेंद्र हे शेवटी एकच पक्षाचा भाग आहेत. त्या मुले देवेंद्र ची चूक असली तरी तुम्ही सुटू शकत नाही. कि तुमची सुपारी फक्त नमो करताच आहे ?
आणि हो अजून एक. हे वेब पेज आता गायब आहे. मानले गुरुजी तुम्हाला .. गुरुजी के हात बहोत लंबे है !!
" Experts blamed this on commodity trading and the state government’s failure to revive the stock limit.
The state government failed to revive the stock limit ..."
19 Oct 2015 - 9:50 pm | तर्राट जोकर
दुवा इथे आहे.
19 Oct 2015 - 9:55 pm | अभिजित - १
ठीक आहे. पण राज्य सरकारचा दोष / कमोडीटी ट्रेडिंग हे मुद्दे टाकून पळ काढू नका.
19 Oct 2015 - 10:17 pm | तर्राट जोकर
आपणांस असे का वाटले कुणास ठावूक... तुमचा दुवा गंडला नाही हेच सांगायला आलो होतो राव... जिसका करो भला वो कहता माझंच खरा...
(तर्राट तर हम है पण दुनिया क्युं झूम रही है रे मौला.....)
20 Oct 2015 - 11:45 am | अभिजित - १
ते तुम्हाला नव्हते. राज्य सरकारचा दोष असे सांगून गुरुजी तिथून पळ काढतायत . त्यांना आहे ते.
त्यांनी हाय लाईट केलेय वरच्य प्रतिसादात - "the state government’s failure to revive the stock limit."
बहुतेक गुरुजीची सुपारी नमो आणि केंद्र सरकार इतकीच आहे. भाजप राज्य सरकारशी त्यांना काही देणेघेणे नाही.
20 Oct 2015 - 11:58 am | गामा पैलवान
अभिजित - १,
मोदींचा पाठीराखा असणे आणि भाजपचा पाठीराखा असणे या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. मी मोदींचा चाहता आहे भाजपचा नाही. तसेच श्रीगुरुजी असावेत. १९७७ च्या निवडणुकींत मतदान करणारे लोकं इंदिरा गांधींचे चाहते असतीलही, पण ते इंदिरा काँग्रेसचे चाहते नव्हते.
आ.न.,
-गा.पै.
20 Oct 2015 - 12:28 pm | अभिजित - १
ते त्यांनाच सांगू दे ना .. आणि राज्य सरकारचा म्हणजे राज्य भाजप चे पाप आहे डाळी चे भाव वाढण्यात हे कबूल करू दे. पण मी आत्ताच सांगतो, ते वेगवेगळे शब्दच्छल करून या सगळ्या तून पळ काढणार ..
बाकी मन मोहन पण खूप ज्ञानी आणि स्वच्छ होतेच नाही का ?
बाकी तुम्ही कधी शिवसैनिक / कधी भाजप वाले असताच नाही का ( नाही तर मग इथे समर्थन कशाला करता भाजपचे ) ? टोपी फिरवावी तर ती अशी ..
आणि हो .. मी नेहमीच भाजप ला मत देत आलो आहे. लोकल आणि राज्य पातळी वर नेहमीच भाजप ला मत देणार हे नक्की.
20 Oct 2015 - 12:38 pm | श्रीगुरुजी
मी कोठेही पळून जात नसतो. मिपावरचा एकतरी धागा दाखवा जिथून प्रतिसाद न देता मी पळून गेलो आहे. बाकी भागाबद्दल म्हणजे डाळीचे भाव वाढण्यात राज्य सरकारची जबाबदारी यावर मी आधीच्या प्रतिसादात उत्तर दिले आहेच.
20 Oct 2015 - 12:17 pm | तर्राट जोकर
वोक्के सा'र... गाट यीट...
20 Oct 2015 - 12:36 pm | श्रीगुरुजी
मी पळ बिळ काढत नसतो. राज्य सरकारचा दोष हे मी म्हणत नसून तुम्ही दिलेल्या बातमीतच हे ३-४ ठिकाणी लिहिलेले आहे. बातमी न वाचताच तुम्ही बातमीची लिंक इथे दिली हा माझा दोष आहे का? असणार बहुतेक, कारण माझे हात बहोत लंबे है असं तुम्हीच वर लिहिलं आहे.
आधीच्या प्रतिसादात यावर स्पष्टीकरण दिलेले आहे.
20 Oct 2015 - 12:31 pm | श्रीगुरुजी
ते मला माहितच होतं. इथे काहीजण इतके कट्टर मोदी/भाजप विरोधक आहेत की ते कोणत्यातरी बातमीचे नुसते शीर्षक वाचतात आणि आत काय लिहिलं आहे ते न बघताच घाईघाईत इथे येऊन ती लिंक देतात. माध्यमे बातम्यांचा मथळा कसा फसवा देतात हे यांच्या का लक्षात येत नाही ते समजत नाही.
उदा. एखाद्या बातमीचा मथळा असा असतो. "प्रथमदर्शनी मोदींचा भ्रष्टाचारात हात असल्याचे दिसते : न्यायालय". लगेच ही मंडळी बातमी न वाचतात "मोदींचा भ्रष्टाचारात सहभाग सिद्ध झाला" अशी प्रतिक्रिया देऊन इथे लिंक देतात. प्रत्यक्षात आतील बातमी ही ललित मोदी संदर्भात असते. असो.
आणि हो अजून एक. हे वेब पेज आता गायब आहे. मानले गुरुजी तुम्हाला .. गुरुजी के हात बहोत लंबे है !!
बापरे! हे अति होतंय. तुम्ही दिलेल्या लिंकवरील वेब पेज गायब झाले तर तुमच्या म्हणण्यानुसार ते मीच केले कारण माझे हात खूप लंबे आहेत म्हणून!!!!!
काय बोलायचं आता.
20 Oct 2015 - 12:33 pm | श्रीगुरुजी
वरचा प्रतिसाद जरासा गंडला. मधला भाग असा हवा होता.
भारतात महाराष्ट्र हे एकच राज्य आहे का? आणि तूरडाळीची भाववाढ फक्त महाराष्ट्रातच झाली आहे का?
अवांतर - मी कोणाची सुपारी बिपारी घेतलेली नाही आणि घेणार नाही..
17 Oct 2015 - 7:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
नाही नाही निसर्गच् आहे! :D
17 Oct 2015 - 7:56 pm | अभिजित - १
एकदा का गुरुजी नि ठरवलं म्हणजे ठरवलं च .. मग ते कोणालाही मूर्ख ठरवायला मागे पुढे बघत नाहीत .. आता या हिंदुस्तान times ला कसे ते चुकीचे ठरवतील ते बघण्या सारखे असेल !!
17 Oct 2015 - 8:13 pm | कैलासवासी सोन्याबापु
तरी कपिलमुनी अन प्यारे बोलले होते राव! आमचेच हात दाखवून अवलक्षण!
17 Oct 2015 - 8:15 pm | dadadarekar
चतुर गुरुजी मोड ऑन ...
मनुष्य हाही निसर्गाचाच भाग आहे.
गुर्जी मोड ऑफ !
19 Oct 2015 - 12:36 am | तर्राट जोकर
क्या रे ये घोडा-चतुर, घोडा-चतुर बोला,
एक पे रहना या घोडा बोलो या चतुर बोलो... गाओ
शब्दार्थः घोडा=निसर्ग, चतुर = व्यापारी
19 Oct 2015 - 8:37 pm | तर्राट जोकर
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));
29 Oct 2015 - 3:50 pm | नंदन
कुठला पिच्चर आहे म्हणे हा? :)
29 Oct 2015 - 4:22 pm | तर्राट जोकर
बहुतेक 'तेजस्विनी', विजयाशान्तीचा.
29 Oct 2015 - 4:54 pm | नंदन
'तेजस्विनी'च आहे.
29 Oct 2015 - 3:54 pm | प्यारे१
सनी देओल पायजे होता. राष्ट्रीय पुरस्कार नक्की होता.
19 Oct 2015 - 8:51 pm | अभिजित - १
सरकार आता जागे झाले. घाऊक बाजारात भाव १६ हजार वरून ११५०० पर्यंत आला.
http://www.loksatta.com/maharashtra-news/major-fall-in-prices-of-all-pul...
केंद्र आणि राज्य सरकारकडून साठेबाजांवर कडक कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे या डाळींचे भाव वेगाने उतरले.
तूरडाळीच्या भावात सोमवारी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांची घट झाली. शनिवारीही या डाळीचे भाव अडीच हजारांनी उतरले होते. काही दिवसांपूर्वी तूरडाळीचा भाव प्रतिक्विंटल १६००० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. तो आता ४५०० रुपयांनी घटल्यामुळे ११५०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन पोहोचला आहे.
कृत्रिम कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या भावात वेगाने वाढ होत होती.
22 Oct 2015 - 4:35 pm | तर्राट जोकर
इंधनाच्या भावामागचे गौडबंगाल....
ऑगस्ट २०१४ मध्ये क्रुडचे भाव ११०-१२० डॉलरच्या मधे होते. तेव्हा पेट्रोल ७८-८० रुपये लिटर होते.
आता क्रूडचे भाव ४५ डॉलर झालेत. पेट्रोल फक्त १० रुपयांनी कमी झाले. ही लूट कोणाच्या घशात जात आहे? इथेही पेट्रोलकंपन्या चतुर म्हणून गणल्या जाव्या का?
22 Oct 2015 - 10:48 pm | श्रीगुरुजी
यात नवीन काय आहे? अनेक वृत्तपत्रांमधून अनेक वेळा या विषयावर लिहिलं गेलं आहे.
भारत सरकार पेट्रोल व डिझेलवर अनेक वर्षे अनुदान देत होते. त्यासाठी सरकारला मोठी किंमत मोजावी लागत होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ओएनजीसी ने ५६,३८४ कोटी रूपयांचे अनुदान दिले होते. २०१४ पासून जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सरकारने आपल्यावर अनुदानामुळे येणारा भार कमी करण्यासाठी डिझेलवरील अनुदान कमी केले. जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात भाव कमी झाले आहेत त्या प्रमाणात भारताने स्थानिक बाजारपेठेत भाव कमी केलेले नाहीत त्यामागे २-३ कारणे आहेत.
(१) जागतिक बाजारपेठेतील तेलाचे भाव डॉलरमध्ये असतात. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जागतिक बाजारपेठेत भाव बर्याच प्रमाणात कमी झाले असले तरी भारतात डॉलर किमान १०% महाग झाल्याने खर्या अर्थाने ते भाव वाटतात त्यापेक्षा काहीश्या कमी प्रमाणात उतरलेले आहेत.
(२) सरकार स्थानिक बाजारपेठेत भाव थोडे जास्त ठेवून आजपर्यंत दिलेल्या अनुदानाची व अंदाजपत्रकातील तुटीची काही प्रमाणात वसुली करीत आहे. अनेक वेळा निवडणुक जवळ आली की मते जाऊ नयेत यासाठी सरकार जबरदस्तीने भाव वाढू देत नाही. त्यामुळे तोटा संचित होत रहातो. त्यामुळे जागतिक भाव उतरले की त्या प्रमाणात सरकार भाव कमी करीत नाही कारण हा तोटा भरून काढायचा असतो.
(३) तिसरे कारण म्हणजे, भविष्यकाळात जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा भाव वाढले तर त्या प्रमाणात स्थानिक बाजारपेठेत भाव वाढवायला लागू नयेत यासाठी आतापासूनच थोडे कुशन ठेवले आहे. स्थानिक भाव थोडेसे जास्त ठेवल्याने सरकारला जो महसूल मिळणार आहे तो नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी व उत्पादनासाठी वापरला जाईल. स्थानिक उत्पादन हे जागतिक बाजारपेठेतून आयात करण्यापेक्षा खूपच स्वस्त पडते. त्यामुळे स्थानिक उत्पादनावरच जास्तीत जास्त भर देण्याची गरज आहे. यासाठी येणारा खर्च हा वाढीव किंमतीतून मिळणार आहे.
(४) भारतात इंधनावर असंख्य कर आहेत. अबकारी कर, केंद्राचे कर, वेगवेगळ्या राज्यांचे कर, जकात असे अनेक कर लावल्यामुळे पेट्रोल/डिझेल मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट किंमतीला मिळते. यातील काही कर मूळ किंमतीवर अवलंबून नसून प्रति लिटर एक ठराविक रक्कम कर म्हणून लावली जाते. त्या करात भाव कमीजास्त झाले तरी बदल होत नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात इंधनाचे मूळ भाव वाढतात किंवा कमी होतात त्या प्रमाणात कर कमीजास्त होत नाहीत.
अशा अनेक कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात इंधनाचे भाव कमी झाले आहेत, तितक्या प्रमाणात भारतातील स्थानिक बाजारपेठेत भाव कमी झालेले नाहीत.
23 Oct 2015 - 2:34 pm | शलभ
१० पैकी ८ गुण..;)
23 Oct 2015 - 2:48 pm | तर्राट जोकर
फक्त ही कारणे काँग्रेसचे राज्य होते तेव्हा सापडत नव्हती इतकेच.... बाकी काही नाही.
23 Oct 2015 - 9:02 pm | श्रीगुरुजी
काँग्रेसच्या राज्यात बहुसंख्य काळ भाव चढेच होते, त्यामुळे भाव कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. निवडणुक जवळ आली की काँग्रेस मतांसाठी कृत्रिमरित्या भाव कमी करायचे आणि निवडणुक संपल्यावर वाढवायचे.
23 Oct 2015 - 2:55 pm | कपिलमुनी
ऑगस्ट २०१४ मध्ये क्रुडचे भाव ११०-१२० डॉलरच्या मधे होते. तेव्हा पेट्रोल ७८-८० रुपये लिटर होते.
आता क्रूडचे भाव ४५ डॉलर झालेत. पेट्रोल फक्त १० रुपयांनी कमी झाले. ही लूट कोणाच्या घशात जात आहे? इथेही पेट्रोलकंपन्या चतुर म्हणून गणल्या जाव्या का?
हिशोबासाठी आपण
क्रुड ऑईल ११०$ * ६० = (६६००) धरू आणि पेत्रोल ७८ ! आणी सध्या
क्रुड ऑईल ४५$ * ६५= (२९२५) धरू आणि पेत्रोल ६८!
दुपटीहूनही किमती कमी होउन सरकार त्याच्या फायदा जनतेला देत नाहिये .
१.डॉलर रेट
Oct 01, 201३ 62.522598
Jan 01, 2014 : 62.685
Jan 01, 2015 62.020
Oct 01, 2015 64.955
( दुवा)
यात कुठेही १०% वाढ नाहिये.
२. अनेक वेळा निवडणुक जवळ आली की मते जाऊ नयेत यासाठी सरकार जबरदस्तीने भाव वाढू देत नाही. त्यामुळे तोटा संचित होत रहातो.
ही शुद्ध फसवाफसवी किंवा मतांसाठी केलेला हलकटपणा आहे. जो की मुक्त अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहे (आता मागच्या सरकारने ६० वर्षे तेच केला तेव्हा भाजपालाही तसाच्च वागण्याचा अधिकार आहेच)
३. तिसरे कारण म्हणजे, भविष्यकाळात जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा भाव वाढले तर ??
डिझेल आणि पेट्रोलचे भाव नियंत्रणमुक्त केलेले आहेत त्यामुळे कुशनचा प्रश्नच येत नाही. हे म्हणजे तुमच्या पोराची इंजिनीरींगची फी जास्त आहे म्हणून आतापासूनच जास्त फी भरायची सवय ठेवा . सध्या स्वस्त तर स्वस्त द्या आणि जेव्हा महाग होइल तेव्हा महाग ! तसेही डिझेल आणि पेट्रोलचे भाव नियंत्रणमुक्त केलेले आहेतच
४) भारतात इंधनावर असंख्य कर आहेत. हे कर पूर्वीही होतेच आणि आताही आहेतच. त्यामुळे दुप्पट दराने इंधन विकणे जस्टीफाय होत नाही.
राहिला प्रश्न अनुदानाची तूट भरून काढण्याचा , तर पूर्वी ती तूट करदात्यांच्या पैशातूनच भरली जायची. त्यामुळे आता स्वस्त पेट्रोल डिझेल मिळणा आमचा हक्कच आहे.
बाकी किती तूट भरली गेली आणि कुठे भरली गेली ??
23 Oct 2015 - 8:59 pm | श्रीगुरुजी
वर पुरेसे सविस्तर उत्तर दिलेले आहे. जागतिक बाजारपेठेत ज्या प्रमाणात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आहेत त्या प्रमाणात भारतात भाव उतरलेले नाहीत त्याची ४ मुख्य कारणे वर दिली आहेत. तरीसुद्धा वरील मुद्दा क्र. (१) का आला आहे ते समजले नाही.
भाजप सरकार मे २०१४ मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर लोकसभेची निवडणुक झालेली नाही. काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. परंतु केंद्र सरकारने निवडणुक आहे किंवा नाही याचा विचार न करता इंधनाच्या भावात हस्तक्षेप करायचे टाळले आहे. सध्या बिहार विधानसभेची निवडणुक सुरू आहे. मतांवर डोळा ठेवून सरकारला इंधनाची भाववाढ रोखून धरता आली असती. परंतु १५ ऑक्टोबरला डिझेलचे भाव कंपन्यांनी १ रू. ९० पै. ने वाढविले. भाजप कॉंग्रेससारखे वागत नाही हे स्पष्ट आहे.
२००९ ची लोकसभा निवडणुक जवळ आली होती तेव्हा प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते. एप्रिल-मे २००९ मध्ये निवडणुक होती. डिसेंबर २००८ मध्ये पेट्रोल प्रति लिटर ५८ रू. होते. जानेवारीत अचानक पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ५ रू. ने कमी केले गेले. नंतर २८ फेब्रु च्या अंदाजपत्रकात अजून ५ रू. ने भाव घटवून प्रति लिटर ४८ रू. हा भाव केला गेला. निव्वळ मतांवर डोळा ठेवून भाव कृत्रिमरित्या घटविले होते. नंतर २९ मे पर्यंत (निकाल १६ मे ला लागला) हा भाव स्थिर ठेवला गेला आणि ३० मे ला भाव पुन्हा एकदा ५ रू. ने वाढविले. नंतर भाव वाढत जाऊन एकवेळ ८४ रू. पेक्षा जास्त भाव गेला होता. त्यावेळी मतांसाठी केंद्र सरकारने ५ महिने तोटा करून घेतला व नंतर त्याची भरपाई केली.
ही शुद्ध फसवाफसवी किंवा मतांसाठी केलेला हलकटपणा फक्त काँग्रेसने केला आहे.
तुमच्या पोराची इंजिनीरींगची फी जास्त आहे म्हणून आतापासूनच नियमित बचत करायला शिका म्हणजे त्यावेळी एकदम भार येणार नाही हे त्यामागचे लॉजिक आहे. भाव एकदम वाढले तर तो भार एकदम ग्राहकांवर टाकण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने टाकावा हा हेतू आहे.
अंदाजपत्रकीय तूट ही अनेक वर्षांपासूनच आहे. ही तूट काही प्रमाणात नवीन चलन छापून कमी केली जायची, परंतु त्यामुळे चलनफुगवटीचा धोका होऊ शकत असल्याने या उपायावर मर्यादा आहेत. सरकारला आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी करांच्याच माध्यमातून महसूल गोळा करता येतो. निर्यात, पर्यटन व्यवसाय इ. अजून काही माध्यमे आहेत, परंतु कर हेच सर्वात जास्त महसूल मिळवून देतात. त्यामुळे निव्वळ इंधन नव्हे, तर जवळपास सर्व वस्तूंवर आणि सेवांवर कर असणारच.
24 Oct 2015 - 5:33 am | मोगा
असे आहे तर मग काँग्रेसच्या काळात कर वाढवले तर भाजपा विरोध का करत होती ?
23 Oct 2015 - 2:37 pm | कपिलमुनी
एखाद्या ठिकाणी कोणीतरी कुत्र्याला दगड मारल्यास सरकारला जबाबदार धरता येणार नाही.
याची सर्व कुत्र्यांनी नोंद घ्यावी.
23 Oct 2015 - 3:02 pm | नाव आडनाव
.
24 Oct 2015 - 7:16 am | मोगा
25 Oct 2015 - 6:27 am | मोगा
मोदी सर्कार अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देणार आहे म्हणे.
हेच काँगेसन केले असते तर किती थयथयाट झाला असता.
पाकिस्तानचे नागरिक असाल तर इथे गाणी गाउ नयेत.
आधी भार्तीय नागरिक. व्हा व मग गाणी म्हणा !
26 Oct 2015 - 10:24 am | अभिजित - १
http://economictimes.indiatimes.com/industry/transportation/railways/et-...
ET Edit: Why railways shouldn't take debt of Rs 1 lakh crore for bullet train
26 Oct 2015 - 11:31 am | नाना स्कॉच
मसणात घाला ती बुलेट ट्रेन म्हणे मी! पेंडिंग प्रोजेक्ट्स वर पैसा लावा म्हणे फ़क्त मी आधी! इलेक्ट्रिफिकेशन साठी प्रायोरिटी द्या!
(सात्विक संतापी) नाना
26 Oct 2015 - 12:45 pm | गामा पैलवान
नाना, तुमच्याशी सहमत आहे. भारतीय रेल्वेने अतिद्रुत गाडीवर पैसे खर्च करू नयेत. त्याऐवजी खाजगी आस्थापन उभारावे.
आ.न.,
-गा.पै.
27 Oct 2015 - 4:58 pm | मार्मिक गोडसे
हे तुम्हीच म्हणताय ना ? मग हे अनुदान कसं ठरतं. माझ्याच एका लेखावरील माझाच हा प्रतिसाद वाचा.
.
काय म्हणता? खरोखरंच असं करण्याचा सरकारचा मानस आहे की तुमचा अंदाज आहे. नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी खाजगी कंपन्यांनापण हा महसूल मिळणार आहे की फक्त सरकारी कंपन्यांना? फक्त सरकारी कंपन्यांना मिळणार असेल तर ह्या कंपन्यांकडून मिळणारा घसघशीत लाभांश ह्या सरकारने न घेता तो पैसा नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी कंपन्यांना वापरायला द्यावा. नफ्यात असणार्या ह्या कंपन्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे का?
.
excise सोडल्यास असे दुसरे कोणते specific tax इंधनावर लावले जातात? बाकीचे सगळे कर हे ad valorem प्रकारचे असतात.ह्या करांमुळे ज्या प्रमाणात इंधनाचे मूळ भाव कमी होतात किंवा वाढतात त्या प्रमाणात सरकारचा महसूल कमी किंवा जास्त होतो. परंतू वर्तमान सरकारने एका वर्षात इंधनावरील exciseचे दर ४ वेळा वाढविले, तुम्ही म्हण्ता त्याप्रमाणे हे दर स्थिर नव्हते व एक वर्षात ह्या वाढीव दरामुळे केंद्र सरकारला ३०००० कोटीचा महसूल मिळाला. हा अप्रत्यक्षरीत्या वर्तमान सरकारचा इंधनाच्या दरांवर नियंत्रन ठेवण्याचाच प्रकार आहे.
इंधनांच्या मूळ किंमतीत होणार्या बदलामूळे राज्य सरकारांच्या ad valorem प्रकारच्या करांमूळे महसूलावर परिणाम होऊ नये म्हणून मागील सरकारने २०१३ साली सर्व राज्यांना इंधनावर ad valorem ऐवजी specific tax लावावा असे आवाहन केले होते. सगळ्या राज्यांनी हे मान्य केले असते तर आज जनतेला जागतीक बाजारातील कमी झालेल्या इंधनाच्या दराचा संपूर्ण लाभ मिळाला असता.
इंधन दरवाढीचे समर्थन करताना तुम्ही ह्यापुर्वीच्या सरकारच्या इंधन धोरणाचे समर्थन करत आहात. मागील सरकारने राज्यांना इंधनावर ad valorem कर लावावेत असे आवाहन केले होते त्याचा पाठपुरावा ह्या सरकारने करावा.
27 Oct 2015 - 5:20 pm | कपिलमुनी
उत्तराच्या प्रतीक्षेत !
27 Oct 2015 - 11:08 pm | श्रीगुरुजी
अनुदान दिल्या जाणार्या पेट्रोलियम पदार्थांमध्ये रॉकेल व स्वयंपाकाच्या गॅसचा सुद्धा समावेश होतो. अनुदानाबद्दल खालील लेख वाचा.
http://www.livemint.com/Politics/OQaYOOKMJcCNNliEV6SWTJ/India-to-spend-3...
खालील लेखात २०११-१२ पर्यंत दिलेल्या अनुदानाच्या रकमेचे आकडे आहेत. डाटा काहीसा जुना असला तरी त्यातून दरवर्षी किती अनुदान दिले जाते याचा अंदाज येतो.
https://data.gov.in/catalog/subsidy-provided-government-and-oil-companie...
भारतातील पेट्रोलियम पदार्थ क्षेत्रे संशोधन व उत्खनन यातील अंडररिकव्हरी चा डाटा
https://data.gov.in/catalog/likely-under-recoveries-petroleum-products
पेट्रोलियम पदार्थावरील अनुदान या विषयावर बिझनेस टुडे मधील एक लेख
http://www.businesstoday.in/magazine/focus/why-oil-subsidy-bill-still-re...
खालील लेखात तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळतील.
https://www.iea.org/publications/freepublications/publication/petroleum_...
याच लेखातील काही परिच्छेद -
The Cost of ‘Effective’ Subsidies: Under-recoveries to Oil Marketing Companies
The effect of significantly lower product prices than input prices – a large „effective subsidy‟ – has been the increasing accumulation of "under-recoveries‟ by OMCs. Under-recoveries
are a notional measure representing the difference between the trade-parity cost of refined
product paid by OMCs and their realised sale price.
The key fact is that Indian domestic product prices have not risen in line with the sharp increase
in international crude prices that has occurred until recently since 2004-2005, and, as such, have placed a significant subsidy burden on OMCs.
under-recoveries have escalated alarmingly in recent years, from approximately
US$10 billion in 2006-2007 to an expected total of over US$40 billion in 2008-2009. International crude prices of over US$100/barrel between April-September 2008 were particularly damaging, leaving, according to OMCs, a significant under-recovery overhang into 2009, despite steeply falling international prices since mid-2008. The mounting burden of under-recoveries has seriously affected the operational functioning and financial health of OMCs. Between April and December 2008, India‟s three key OMCs lost between 43 per cent and 25 per cent of their total net worth – a period in which they also collectively lost over US$2.7billion.
28 Oct 2015 - 12:11 pm | मार्मिक गोडसे
रॉकेल व स्वयंपाकाच्या गॅसवर सरकार कुठलेच कर लावत नाहीत का ?
.माझ्याच एका लेखावरील माझाच हा प्रतिसाद वाचला असता तर तुम्ही ह्या लेखाची लिंक दिली नसती.
गुरुजी प्रथम तुम्ही खालील गोष्टिंचा अभ्यास करा.
१) कच्च्या तेलाच्या आयातीपासून रिटेल विक्री पर्यंत इंधनावर कोणकोणते व किती प्रमाणात कर लावले जातात आणि सरकार इंधनावर अनुदान किती देते. (महसूल व अनुदानाचे प्रमाण)
२) इंपोर्ट पॅरीटी.
३) रिफायनरी मार्जीन
४) नोशनल लॉस.
५) ऑइल बाँड व राज्य सरकारांचे इंधनावरील कर.
६) तेल उत्पादक कंपन्या व OMC तोट्यात असतील तर लाभांश का देतात व केंद्र सरकार तो का घेतो? जर ह्या कंपन्या नफ्यात असतील तर हा नफा कोठून येतो?
तुम्ही जर ह्या इंधन दरवाढीचे समर्थन करत असाल तर मागील सरकारचे इंधन दरवाढीबाबतचे धोरण योग्य होते असे समजायचे का?
ह्याबाबत तुमचे काय मत आहे?
28 Oct 2015 - 1:26 pm | श्रीगुरुजी
रा़ज्याने valorem कर लावायचा का नाही हा निर्णय राज्याचा असतो. केंद्र फक्त आवाहन करू शकते, बळजबरी करू शकत नाही. valorem कर राज्यांनी लावल्याने फार फरक पडणार नाही. त्यामुळे जी तूट येईल ती तूट केंद्र किंवा राज्य इतर करांचे प्रमाण वाढवून भरून काढू शकेल.
या सरकारने केलेली (किंवा झालेली) इंधन दरवाढ आणि मागील सरकारने केलेली दरवाढ यात खूप फरक आहे. मागील सरकार निवडणुक जवळ आली की तोटा होत असताना सुद्धा किंमत दरवाढ अनेक महिने रोखून धरायचे. त्यामुळे संचित तोटा वाढत जायचा. तो तोटा भरून काढण्यासाठी नंतर ते दरवाढ करायचे. या सरकारच्या काळात तसे झालेले नाही. तस्मात मागील सरकारचे इंधन दरवाढीचे धोरण फारसे योग्य नव्हते.
28 Oct 2015 - 3:43 pm | मार्मिक गोडसे
बरोबर आहे,परंतू आपल्याच पक्षाचे राज्य असलेल्या राज्यांना सध्या केन्द्रात असलेल्या सरकारने तसे आवाहन केले आहे का? गोव्याचे उदाहरण देऊ नका, विषयाला फाटे फुटतील.
राज्यांच्या ad valorem करांमुळे आलेली तूट केन्द्र सरकार कोणते कर वाढवून भरून काढू शकते. अशी तूट केन्द्र सरकारने कधी भरून काढल्याची माहीती तुमच्याकडे आहे का? तुम्हाला ऑईल बाँड म्हणायचे आहे का?
तोटा? कोणता आणि कधी झाला तोटा? मग लाभांश का वाटतात ह्या कंपन्या? तोट्यातील कंपन्यांकडून केन्द्र सरकार हा लाभांश का स्विकारते ? ह्याचे उत्तर तुम्ही सोयिस्करपणे टाळले आहे.
ह्याविषयी आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
28 Oct 2015 - 10:40 pm | तर्राट जोकर
मार्मिकभाऊ,
अगदी अचूक पकडलात मुद्दा.... मी एवढं लिहूच शकलो नसतो. तुम्ही व्यवस्थित मांडत आहात.
गुरुजींच्या मुद्द्यांमधे दम नाही हे सरळ दिसत आहे. पण हार मानतील ते गुरुजी कसले...
28 Oct 2015 - 11:27 pm | श्रीगुरुजी
मी दिलेल्या ४-५ लिंक्स नीट वाचा. सर्व माहिती मिळेल. आधीच अनेक करांच्या बोजा असलेल्या पेट्रोलियम उत्पादनांवर valorem हा अजून एक कर लावणे अयोग्य आहे. हा कर व्हॅटसारखा थेट उत्पादन विक्री किंमतीशी निगडीत असल्याने जेव्हा भाव वाढतील तेव्हा करही त्या प्रमाणात वाढेल. थोडक्यात म्हणजे आधी लावलेला एखादा कर काढायचा आणि त्याजागी नवीन कर लावायचा. यातून काहीही साध्य होणार नाही. पेट्रोलियम पदार्थ हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणतेही सरकार त्याचा फायदा घेणारच. परंतु त्यात स्वयंपाकाचा गॅस व रॉकेल हे थेट स्वयंपाकघराशी निगडीत असल्याने या दोन उत्पादनांच्या किंमती वाढविण्यावर प्रचंड मर्यादा आहेत. म्हणून त्याची भरपाई पेट्रोल व डिझेलमधून केली जाते.
भारतातील ३ प्रमुख तेल उत्पादक कंपन्या — Indian Oil Corporation, Bharat Petroleum Corporation and Hindustan Petroleum Corporation — लाभांश वाटल्यामुळे फायद्यात वाटतात. परंतु ते खरे नाही. कारण त्यांना अंडर रिकव्हरी व तोट्यामुळे जे नुकसान होते त्याची भरपाई (१) केंद्र सरकारकडून मिळालेले काम्पेन्सेशन (याचा भरपाईत सर्वाधिक वाटा असतो), व (२) अपस्ट्रीम कंपन्यांकडून (ओएनजीसी, गेल इंडिया, ऑईल इंडिया) तेल उत्पादन विकत घेताना मिळालेला डिस्काऊंट, यातून केली जाते. थोडक्यात सांगायचे तर तेल उत्पादक कंपन्यांचे नुकसान केंद्र सरकार व अपस्ट्रीम कंपन्या भरून काढतात. केंद्र सरकारकडून दिली जाणारी भरपाई ही करदात्यांच्या करातूनच जात असते. म्हणजे जनतेला तेल उत्पादनांवर जे अनुदान मिळते ते करदात्यांच्या (म्हणजेच तुलनेने समृद्ध जनतेच्या) करांच्या पैशातूनच मिळत असते. श्रीमंतांचा पैसा अशा रितीने अप्रत्यक्ष रित्या गरीबांकरीता वापरला जातो.
28 Oct 2015 - 11:56 pm | तर्राट जोकर
तुमच्या विधानाचा सरळ अर्थ असा आहे की करदाते आधी कर भरतात, मग त्यातून इंधनावर सबसिडी देतात. म्हणजे १०० रुपयाची वस्तू असेल तर ती ७५ ला विकत घ्यायची मग ते २५ चं नुकसान भरून काढायला ते २५ रुपये दुसर्या हाताने दुकानदाराला द्यायचे. एकूण वस्तू १००लाच पडते ना?
श्रीमंतांचा पैसा गरिबांकरिता वापरणे ही लोकशाही अर्थव्यवस्थेची प्रचंड मोठी धूळफेक आहे. इथे जी जनता कर भरते तीच उपभोक्ता आहे. तिला सवलत मिळावी म्हणून तीच परत कर भरते हा उफराटा प्रकार आहे. यात रॉबीनहूडी वैगेरे काही प्रकार नाहीये.
याबद्दल सविस्तर नंतर टंकतो....
29 Oct 2015 - 10:31 am | श्रीगुरुजी
पेट्रोलियम उत्पादने सरसकट सर्वांना अनुदानित दराने दिली जातात. त्यामुळे अर्थातच तेल उत्पादक कंपन्यांना तोटा होतो. तो तोटा सरकारच भरून काढते. करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून तो तोटा भरून काढला जातो. जे तुलनेने श्रीमंत आहेत ते करही भरतात आणि त्यांना अनुदानही मिळते. जे तितकेसे श्रीमंत नाहीत ते कर भरत नाहीत पण त्यांना अनुदान मिळते. याचा सरळ अर्थ असा आहे जे तुलनेने श्रीमंत आहेत त्यांच्या उत्पन्नातून गरीबांना फायदे दिले जातात.
29 Oct 2015 - 10:36 am | कैलासवासी सोन्याबापु
अहो गुरूजी गोडसे बहुतेक तेच म्हणाले आहेत की वंचित गरीब लोक प्रत्यक्ष कर भरत नाही अप्रत्यक्ष भरतात असे काहीसे
29 Oct 2015 - 10:59 am | तर्राट जोकर
माझं काय म्हणणं आहे आधी तुम्ही पेट्रोलियम उत्पादन ते वितरण याबद्दल सविस्तर माहीती मिळवून प्रतिसाद द्या ना..!
28 Oct 2015 - 7:36 pm | कैलासवासी सोन्याबापु
हे तेल वालं एक्सप्लेनेशन तर तुरडाळी पेक्षा वरिष्ठ आहे राव ! पर गुरूजी नहीं मानेंगे :D :D
28 Oct 2015 - 10:38 pm | तर्राट जोकर
हा हा हा! धमाल चाललीये गुरुजींची...!
"पर गुरुजी नहीं मानेंगे" वरून बाहुबलीतलं, 'ना, शिव नही मानेंगे' आठवले!
29 Oct 2015 - 5:41 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
29 Oct 2015 - 12:24 am | मार्मिक गोडसे
मी वाचल्या मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे त्यात उत्तर नाही.तुम्हीच नीट वाचा त्या लिंक्स. हे अनेक कर valorem प्रकारातच मोडतात. हे अयोग्य आहे असे वाटल्याने मागच्या सरकारने ते specific करावे असे सर्व राज्यांना आवाहन केले होते. तुमचेही म्हणने हेच आहे ना?
कसं बोललात.
सांगा ना हे सरकारला. खुशाल लाभांश घेतात त्यांच्याकडून.
प्रत्यक्ष करातून ही भरपाई होत असेल तर प्रत्यक्ष कराचा इतका महसूल मिळतो का सरकारला? अप्रत्य़क्ष करातून होत असेल तर गरीब हा कर भरत नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
माझ्या मागील एकाही प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेले नाही.
29 Oct 2015 - 5:49 am | मोगा
पेट्रोलियम पदार्थ हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणतेही सरकार त्याचा फायदा घेणारच
तूरडाळ हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणताही चतुर व्यापारी त्याचा फायदा घेणारच.
...
राजकारण हे 'कॅश काऊ' या प्रकारातले असल्याने कोणताही पक्ष त्याचा फायदा घेणारच
29 Oct 2015 - 10:36 am | श्रीगुरुजी
तेल कंपन्यांकडून सरकारने लाभांश घेणे म्हणजे वाटीतले ताटात ओतणे किंवा एका खिशातले पैसे दुसर्या खिशात टाकण्यासारखे आहे. अर्थात या लाभांशाचे लाभार्थी फक्त सरकार नसून शेअर होल्डर्स सुद्धा असतात. गरीब वा श्रीमंत यांच्यासाठी बरेचसे कर समान असतात. काही करांचा अपवाद आहे. उदा. आयकर. भारतात आयकर भरणार्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्क्यांहून कमी आहे. मोठ्या उपाहारगृहात जेवणारे, महागड्या हॉटेलात वास्तव्य करणारे, मोठी घरे घेणारे इ. ना जास्त कर द्यावा लागतो. त्यामुळे तुलनेने समृद्ध जनतेचा करभरणा हा समृद्ध नसलेल्या जनतेच्या तुलनेत जास्तच असतो. याचाच काही वाटा पेट्रोलियम उत्पादने व इतर काही गोष्टींवर दिल्या जाणार्या अनुदानासाठी वापरला जातो.
29 Oct 2015 - 12:38 pm | मार्मिक गोडसे
मोघम बोलू नका.
माझ्या मागील एकाही प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेले नाही हेही लक्षात ठेवा.
29 Oct 2015 - 8:42 pm | श्रीगुरुजी
कुठे काय मोघम बोललोय? व्यवस्थित उदाहरणे आणि संदर्भ दिलेले आहेत.
तुम्ही बरेच प्रतिसाद लिहिले आहेत. मी त्यांना माझ्या अनेक प्रतिसादात व्यवस्थित उत्तर दिले आहे. माझ्या उत्तरांत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी अपेक्षा आहे. अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत असे वाटत असेल तर ते प्रश्न सांगा, म्हणजे त्या प्रश्नांनाही उत्तर देईन.
29 Oct 2015 - 10:10 pm | मार्मिक गोडसे
१) हे तुम्हीच म्हणताय ना ? मग हे अनुदान कसं ठरतं?
.
२) खरोखरंच असं करण्याचा सरकारचा मानस आहे की तुमचा अंदाज आहे. नवीन तेलविहिरींच्या शोधासाठी खाजगी कंपन्यांनापण हा महसूल मिळणार आहे की फक्त सरकारी कंपन्यांना? नफ्यात असणार्या ह्या कंपन्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे का?
३) वर्तमान सरकारने एका वर्षात इंधनावरील exciseचे दर ४ वेळा वाढविले, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे दर स्थिर नव्हते व एक वर्षात ह्या वाढीव दरामुळे केंद्र सरकारला ३०००० कोटीचा महसूल मिळाला. हा अप्रत्यक्षरीत्या वर्तमान सरकारचा इंधनाच्या दरांवर नियंत्रन ठेवण्याचाच प्रकार आहे. ह्यावर तुमचे मत काय आहे?
४) हे अनेक कर valorem प्रकारातच मोडतात. हे अयोग्य आहे असे वाटल्याने मागच्या सरकारने ते specific करावे असे सर्व राज्यांना आवाहन केले होते. परंतू आपल्याच पक्षाचे राज्य असलेल्या राज्यांना सध्या केन्द्रात असलेल्या सरकारने अशा प्रकारचे आवाहन केले आहे का?
५) प्रत्यक्ष करातून ही भरपाई होत असेल तर प्रत्यक्ष कराचा इतका महसूल मिळतो का सरकारला? अप्रत्य़क्ष करातून होत असेल तर गरीब हा कर भरत नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
30 Oct 2015 - 1:07 pm | श्रीगुरुजी
Immediately after independence the cost realization to the oil companies in the country was linked to the ‘import parity’ type of pricing, known as the ‘Value Stock Pricing’ (VSA). This mechanism was basically a cost-plus formula to the import price, which included added elements of all the costs such as shipping charges upto the Indian ports, insurance, transit losses, import duties and other levies and charges.
The VSA was followed by the Administered Price Mechanism (APM) which actually involved artificial price fixing by the government from time to time and hike or reduction in the prices become a political decision, rather than being a rational economic decision. The decision to dismantle the APM was aimed at gradually shifting from artificial pricing of petroleum products towards a situation where the price is determined by the market forces of demand and supply.
The new mechanism was designed to partially insulate the prices of petroleum products in the country from volatile international crude oil prices. At the same time it was to ensure that the prices of certain products like kerosene and LPG remained subsidised as per the government policy.
Following is an example of diesel price build up in Delhi.
Import Crude basket price : Rs 42.67/Lit
Refinery Gate Price : Rs 43.73/Lit
OMC’s DESIRED selling price : Rs 46.07/Lit
UNDER- RECOVERIES : Rs 6.31/Lit (हेच सरकारने दिलेले अनुदान)
Price charged to dealers by OMC : Rs 46.07 -6.31 = Rs 39.76/Lit
Dealer commision : Rs 1.09
Add TAXES : Rs 9.40/Lit
FINAL Price WE pay : Rs 50.25/Lit
Govt. tells OMC's, let's say IOCL, that the Price of Rs 46.07 is too high for the people. You give it for a discount of Rs 6.31/liter, and sell it at Rs 39.76/liter.
Which means a loss of Rs 6.31/Lit for the OMC. But Govt. assures don't worry, We will reimburse the loses at the end of the year!
सरकार हे करत असतेच. हा महसूल कोणाला द्यायचा हा निर्णय सरकारचा असतो. जर खाजगी कंपन्यांना सुद्धा अनुदान द्यावे लागत असेल तर त्याची भरपाई सरकारला करावी लागणारच. मुळात अशा किती खाजगी कंपन्या आहेत? काही वर्षांपूर्वी रिलायन्सने सुरू केलेल्या पेट्रोल पंपांपैकी बहुसंख्य पंप बंद झाले आहेत. रिलायन्सचा सुरू असलेला पंप आता क्वचितच दिसतो. या क्षेत्रात बहुतांशी सरकारी कंपन्याच आहेत.
जागतिक तेल व्यापारातील भाव काही वेळा खूप दोलायमान असतात. भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढले तर ग्राहकांना तितक्या प्रमाणात फटका बसू नये म्हणून भावासाठी काहीसे कुशन ठेवलेले असते. त्यामुळे ज्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेत भाव वाढतात त्या प्रमाणात भारतात भाव वाढत नाहीत. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेत भाव घसरतात त्या प्रमाणात भारतात भाव घसरत नाहीत. पेट्रोलियम उत्पादनांचे भाव २००२ पूर्वी पर्यंत फक्त सरकार नियंत्रित करत होते. त्यामुळे वर्षातून एकदा किंवा दोनदा भाव बदलायचे (म्हणजे वाढायचे. कमी कधीच झाले नव्हते.) नंतर भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य तेल वितरण कंपन्यांना देण्यात आले. त्यामुळे हे भाव दर १५ दिवसांनी जागतिक भावातील बदलानुसार कमी किंवा जास्त होऊ लागले. २००४ नंतर पुन्हा एकदा हे धोरण रद्द करण्यात येऊन सरकारने पुन्हा एकदा स्वत:च्या हातात भाव नियंत्रणाचे अधिकार घेतले. परंतु युपीए-२ च्या उत्तरार्धात पुन्हा एकदा भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य तेल वितरण कंपन्यांना देण्यात आले. परंतु त्या कंपन्यांना एका ठराविक कक्षेत भाव ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे. कंपन्या भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढवू शकत नाही. तसे करायचा प्रयत्न केल्यास सरकार लगेच हस्तक्षेप करते व अमर्यादीत भाव वाढीपासून ग्राहकांचे संरक्षण करते.
भारताच्या वार्षिक अंदाजपत्रकात दरवर्षी अंदाजे ४% तूट असते. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार विविध मार्गांचा उपयोग करते. सेवा कराच्या क्षेत्रात अजून क्षेत्रे आणणे, आयकरावर अधिभार, सेवा कराचे दर वाढविणे, नवीन कर लावणे (पूर्वी पी चिदंबरम यांनी फ्रींज बेनिफिट कर व १०००० रु. अधिक रोख रक्कम बँकेतून काढणे यावर कर लागू केला होता तो याच कारणासाठी), अबकारी कर वाढविणे, आयात कर वाढविणे इ. उपाय सरकार योजते. पेट्रोलियम पदार्थांवर अबकारी कराचे प्रमाण वाढविणे हा महसूल वाढीसाठी केलेला उपाय आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या भावावर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रकार नाही.
प्रत्येक राज्याला व्हॅट ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे. जर सरकारने राज्यांवर जबरदस्ती केली तर त्यातून केंद्र-राज्य संबंध असा नवा वाद निर्माण होईल. सरकार फक्त सूचना करू शकते, सूचना लादू शकत नाही. जर केंद्र सरकारने सर्व राज्यांना असे आवाहन केले असेल तर त्यात भाजपशासित राज्येही मोडतात.
गरीब व श्रीमंत विविध प्रकारचे कर भरतात. परंतु काही कर फक्त ठराविक उत्पन्न असलेले नागरिकच भरतात. उदा. आयकर. त्याव्यतिरिक्त पंचतारांकीत हॉटेलमधील वास्तव्य, तिथले उपाहारगृह अशांसारखे कर फक्त जास्त उत्पन्न असलेलेच नागरिक भरतात कारण तेच त्या सुविधा वापरतात.
29 Oct 2015 - 9:27 am | मार्मिक गोडसे
त्या एका वाक्याने त्यांची अवस्था अशी झाली.....
29 Oct 2015 - 11:53 am | याॅर्कर
सगळ्यांनी मस्त anylysis केलं सरकारचं.
एखादं न्यूजचॅनल सुद्धा फिके पडेल या धाग्यासमोर.
.
.
.
.
.एकापेक्षा एक प्रकांडपंडित आहेत मिपावर,अगदी भारावून गेलो.(उपरोध नव्हे सिरीयस बोलतोय)
29 Oct 2015 - 11:57 am | याॅर्कर
नाहीतर शुद्धलेखनावरून अब्रूचं खोबरं करणारे ही आहेतच.
29 Oct 2015 - 5:28 pm | मोगा
http://m.navbharattimes.indiatimes.com/world/asian-countries/china-refue...
नेपाल: ईंधन मामले में भारत का एकाधिकार खत्म.
29 Oct 2015 - 8:40 pm | श्रीगुरुजी
विश्वबँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार 'नवीन व्यवसाय सुरू करण्याची सुलभता' या मुद्द्यावर भारताचा मागील वर्षी १४२ वा क्रमांक होता. तोच क्रमांक यावर्षी सुधारून १३० इतका झाला आहे.
http://www.firstpost.com/business/heres-how-nda-pushed-india-up-to-130-i...
30 Oct 2015 - 2:44 pm | मार्मिक गोडसे
१)
व्वा क्या बात है, असे म्हणायला सिंहाची छाती असावी लागते. आता एकदा मोठ्याने सिंहगर्जना करून सांगा हे अनुदान पॉझिटीव्ह आहे की निगेटीव्ह ? कळत नसेल तर अनुदानाचे तुनतुने वाजवत रहा.
२)
मग खाजगी कंपन्यांना सरकार अनुदान का देत नाही?
३)
छान समजावून दिले गुरुजी तुम्ही.
जेव्हा जागतीक बाजारात तेलाच्या भावात अचानक वाढ झाली तेव्हा मागील सरकारने भारतातील तेलाचे भाव वाढवले नाहीत व महसूलावर पाणी सोडले. वर्तमान सरकारने जागतीक बाजारात तेलाचे भाव कमी झाल्यावर, तेलावरील exciseचे दर ४ वेळा वाढवून महसूलही वाढवण्याचा व भारतातील तेलाचे भाव 'स्थिर' ठेवण्याचा दुहेरी पराक्रम केला
४)
मुळात असे आवाहन वर्तमान सरकारने राज्यांना केले आहे का?
५)
मग गरिबांच्या योगदानाचे महत्व कमी का लेखता?
थांबा, आता मी पंतप्रधानांना तुमचे नावच सांगतो, की गुरुजी वर्गात गाईडमध्ये बघून उत्तरे देतात म्हणून.
अहो, गुरुजी जर स्वतः नीट अभ्यास करा व आमच्या 'डाळ' भातावर घरगुती ज्ञानाचे 'नवनीत' टाका.
30 Oct 2015 - 3:10 pm | शलभ
मला असं वाचलेले आठवतेय की, बीजेपी सरकार ऑईल रिजर्व करण्यासाठी प्रयत्न करतेय. त्यासाठी काही लाख कोटी रूपये लागणार आहेत. त्याच्यासाठी पण हे excise चे दर वाढवलेत. विदा पाहीजे असेल तर सर्च करून मिळेल. शोधा. :)
ऑईल रिजर्व: जी कल्पना वाजपेयी सरकार नी मांडलेली, युपीए नी बासनात गुंडाळली, आणि आता मोदी सरकार त्यावर काम करतेय.
बाकी मुद्द्यावर नो कमेंट्स. ;)
30 Oct 2015 - 3:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
एरवी यूपीए म्हणले की आठ्या पडतात कपाळावर पण ह्याबाबतीत जे आहे ते आहेच कारण यूपीए ने मंगलोर ला ओएनजीसी च्या अंतर्गत रिज़र्वच काम सुरु केले होते जे बहुतेक मागच्या (२०१४) ऑक्टोबर का डिसेम्बर मधे पुर्ण झाले होते, आता बहुतेक रिज़र्व भरणे सुरु असावे पण त्याचा रिटेल तेल कीमतीवर काय फरक पडतो/पडला आहे हे मला माहिती नाही तस्मात् ओवर टु एक्सपर्ट्स ऑफ़ द सब्जेक्ट एंड गुरूजी
30 Oct 2015 - 8:31 pm | श्रीगुरुजी
अनुदान पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह?
ते सरकारलाच विचारा ना.
मागील सरकारने केलेल्या 'पराक्रमाची' भरपाई नवीन सरकारला करावीच लागते. महाराष्ट्रात सुद्धा आघाडी सरकारने सरकारी कर्जाचा बोजा ३ लाख कोटी रू. वर नेऊन ठेवला आणि पूर्ण कर्जबाजारी राज्य भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे नवीन सरकारला हात राखूनच खर्च करावा लागणार.
'आवाहन' 'आवाहन' हे कसलं तुणतुणं लावलंय सुरवातीपासून! कसलं आवाहन आणि कसलं काय! हा 'आवाहन' शब्द सारखा सारखा वाचून आता बोअर व्हायला लागलंय. निदान शब्द तरी दुसरा वापरा.
समजा असे आवाहन केले असले तर काय फरक पडतो? किंवा केले नसले तर काय फरक पडतो?
तस्मात हे निरर्थक 'आवाहन' पुराण बंद करा असे मी 'आवाहन' करतो.
परत तेच. पूर्वीच लिहिलं आहे की गरीब-श्रीमंतांसाठी काही कर समान असतात. परंतु जे तुलनेने श्रीमंत असतात त्यांना इतर वेगळे कर भरावे लागतात. अभ्यासाचं म्हणाल तर कदाचित तुमच्याएवढा परीपूर्ण नसेल माझा अभ्यास, परंतु माझा अभ्यास सतत सुरू असतो. नवीन माहिती सतत येत असते आणि मी त्यानुसार स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
30 Oct 2015 - 3:09 pm | कैलासवासी सोन्याबापु
जौद्या गोडसे साहेब!
एक बार जो गुरूजी ने बोल दिया फिर वो अपने आप की भी नहीं सुनते!!
30 Oct 2015 - 3:56 pm | मार्मिक गोडसे
ओके बापुसाहेब, आपने बोला इस्ल्लिये जौदिया.
30 Oct 2015 - 6:37 pm | असंका
चांगलाच अभ्यास आहे आपला!
_/\_
या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद.
(रच्याकने, तुम्ही जौ दिलंत तरी गुरुजी जौ देतील असं काही वाटत नाही.)
2 Nov 2015 - 8:31 pm | धर्मराजमुटके
कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर येथील महापालिकांच्या निकालावरील जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत !
2 Nov 2015 - 9:12 pm | श्रीगुरुजी
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5462305830705376609&Se.....!
3 Nov 2015 - 10:12 pm | कपिलमुनी
फारच विनोदी !
आता मात्र ह्या प्रकारातला गंभीरपणा संपून विनोदीपणा सुरू झालाय
4 Nov 2015 - 12:04 pm | श्रीगुरुजी
हा प्रकार कधीच गंभीर नव्हता. प्रचारात आपापसांचा एकेरी उल्लेख करून पगार, लायकी वगैरे काढली गेली तेव्हाच विनोदीपणा सुरू झाला होता.
2 Nov 2015 - 9:21 pm | कैलासवासी सोन्याबापु
काय मग शिजले का वरण तुरीचे सब्सिडी च्या रॉकेल वर :P
3 Nov 2015 - 8:16 pm | श्रीगुरुजी
IOC reports Q2 loss of Rs. 329 crore
6 Nov 2015 - 10:13 am | मार्मिक गोडसे
ह्या माहितीचा धाग्याशी काय संबंध?
6 Nov 2015 - 2:11 pm | श्रीगुरुजी
वरील अनेक प्रतिसादांशी या माहितीचा संबंध आहे.
4 Nov 2015 - 10:04 am | सुबोध खरे
किती चूक किती बरोबर ते मला माहित नाही. परंतु एक वर्ष झाल्यावर मोदी सरकारचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडण्याचा प्रामाणिकपणा गुरुजी करीत आहेत हि एक नक्कीच प्रशंसनीय बाब आहे. मिपावर अशा तर्हेचा प्रयत्न दुसर्या कोणत्या सरकारच्या समर्थकांनी केल्याचे मला तरी आठवत नाही.
4 Nov 2015 - 12:05 pm | श्रीगुरुजी
धन्यवाद डॉक्टरसाहेब!
4 Nov 2015 - 4:26 pm | नितीनचंद्र
२०१४ मध्ये काँग्रेसने फारसे काही केले नाही म्हणुन लोकांनी त्यांना नाकारले. आता अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की त्याचे परिणाम लगेचच्या काही निवडणुकात अँटी इस्टाब्लीशमेंट म्हणुन दिसतील. असे झाले तर २०१७ चे मुल्यमापन लोक फारच क्रिटीकल करतील असे दिसते.
माझ्या मते लोकांनी अजुन ३.५ वर्षे थांबावे. इतक्या घाईने मुल्यमापनात तांत्रीक चुका मोठ्या दिसतील.
4 Nov 2015 - 6:05 pm | मोगा
लोकांच्या अपेक्षा मोदी , भाजपा , संघ आणि मित्रपक्षानी वाढवल्या.
7 Nov 2015 - 6:11 pm | मार्मिक गोडसे
No hike in petrol, diesel prices despite higher excise duty
7 Nov 2015 - 8:15 pm | मोगा
काश्मीरमधून आलेल्या सुफी परंपरेनं माणसांना जोडणं शिकवले .. ... मोदीजी बोलले !!
..... ख्वाजा मोगुद्दीन
10 Nov 2015 - 6:21 am | मोगा
British Indians projected the words "Modi not welcome" onto the Houses of Parliament building on Sunday evening (8 November) in a bold show of protest against the Indian Prime Minister's visit to the UK next week.
11 Nov 2015 - 6:30 pm | मोगा
पाटीदार पटेलांच्या आंदोलनाचा परिणाम गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला असून भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांनीच याचा मोठा धसका घेतला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मेहसाणा जिल्ह्यातच भाजपचा पळपुटेपणा दिसून आला आहे.
उंझा येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या एकाही सदस्याने अर्ज भरला नाही. कारण या भागात पाटीदार पटेल समाजाची संख्या मोठी आहे. पाटीदारांचा भाजपवर रोष आहे. हे पाहता आपला पराभव आधीच निश्चित मानून भाजपच्या सदस्यांनी उमेदवारीसाठी अर्जच भरला नाही. तर काही ठिकाणी भाजप सदस्यांनी आपले अर्ज मागे घेतले आहे
11 Nov 2015 - 9:09 pm | श्रीगुरुजी
आर्थिक आघाडीवर अजून एक आश्वासक पाऊल
http://indianexpress.com/article/india/india-news-india/govt-eases-fdi-n...
Close on the heels of the BJP’s defeat in Bihar, the government Tuesday further opened up several key sectors including defence, construction, civil aviation and media to foreign investment, eased norms for businesses such as single-brand retail and private banking and allowed the Foreign Investment Promotion Board (FIPB) to clear proposals up to Rs 5,000 crore from Rs 3,000 crore earlier.
12 Nov 2015 - 1:05 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी,
एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी पैसा खरंच पाहिजे का? जर तो येत असेल तर १००% परदेशी गुंतवणूक कशाला पाहिजे? ४९% पर्यंत सीमित ठेवायला काय अडचण आहे? भारतातही हल्ली लोकांच्या खिशात पैसे खुळखुळू लागलेत. थेट परकीय गुंतवणून मेक इन इंडिया मध्ये कुठे बसते?
आ.न.,
-गा.पै.
12 Nov 2015 - 2:42 pm | श्रीगुरुजी
भारताला परदेशी पैशाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था गतीमान होऊ शकते, रोजगार व निर्यात वाढू शकते. संरक्षण क्षेत्रासाठी परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९% टक्केच आहे. परंतु एफएम रेडिओ, डीटीएच इ. करमणुकीच्या क्षेत्रातच १००% टक्के गुंतवणुकीला परवानगी आहे. त्यात सुद्धा ४९% नंतर अधिक गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे.
12 Nov 2015 - 12:31 pm | मार्मिक गोडसे
परदेशी थेट गुंतवणुकीचे युपीए सरकारचेच धोरण सुरू ठेवले त्यात विशेष काय केले? ह्यासाठी बिहारच्या निवडणुकीतील पराभवाचा मुहुर्त कशाला हवा होता?
12 Nov 2015 - 12:37 pm | संदीप डांगे
विशेष म्हणजे काँग्रेस काळात याच एफडीआय ला भाजपेईंचा विरोध होता म्हणे.
12 Nov 2015 - 2:44 pm | श्रीगुरुजी
याला बिहारच्या निकालाचा मुहूर्त नसून मोदींच्या ब्रिटन दौर्याचा मुहूर्त आहे.
12 Nov 2015 - 12:47 pm | मार्मिक गोडसे
मल्टी ब्रँड रिटेलमध्ये ५१% FDI गुंतवणुकीला तेव्हा ह्यांचा विरोध होता.
12 Nov 2015 - 1:37 pm | कपिलमुनी
याचेही उत्तर मिळेल
12 Nov 2015 - 2:53 pm | श्रीगुरुजी
कालच्या निर्णयामुळे मल्टी ब्रँड रिटेलमध्ये नसून सिंगल ब्रॅंड रिटेलमध्ये एफडीआय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.
12 Nov 2015 - 3:31 pm | संदीप डांगे
हास्यास्पद उत्तर...
12 Nov 2015 - 3:41 pm | श्रीगुरुजी
अभ्यास वाढवा
12 Nov 2015 - 3:42 pm | संदीप डांगे
तुम्ही करताय ना.... तेव्हढा पुरे आहे....
12 Nov 2015 - 8:16 pm | श्रीगुरुजी
धन्यवाद!
12 Nov 2015 - 5:15 pm | मार्मिक गोडसे
मल्टी ब्रँड रिटेलमधील ५१% FDI गुंतवणुकीसंबंधी सध्याच्या सरकारचे काय धोरण आहे?
आणि
परदेशी थेट गुंतवणुकीचे युपीए सरकारचेच धोरण सुरू ठेवले त्यात विशेष काय केले? ह्याचेही उत्तर द्या.
12 Nov 2015 - 5:26 pm | चैतन्य ईन्या
उत्तर काहीही नाहीये. फक्त खान्ग्रेसला करू न देता आपण केले. पण ह्यात आता ह्यांचीच गोची होवून बसली आहे. आधी फुकट जिथे तिथे आडकाठी केली आता तेच प्रयोग ह्यांच्या बोकांडी बसले आहेत. त्यापेक्षा २००४-२००९ मधला पराभव मान्य करून चांगला योग्य ठिकाणी विरोध केला असता तर बरे झाले असते. पण आडवाणी आणि बाकीचे पिसाटल्या सारखे वागले. आता मोदी आणि शाह तोच कित्त गिरवत आहेत. फुकट आपले सेस लावता आहेत. मुळात लोकांना बेसिक गोष्टीत जास्त रस असतो. तिथेच गाडे अडले आहे. कितीही आवडले नाही तरी परसेप्शन असा प्रकार आहे कि कोणालाच सतत सुखी ठेवता येत नाही. त्यापेक्षा आधी पाया बळकट करणे जास्त चांगले तेच जमत नाहीये. जेटलीला पहिला हाकला आणि दुसरा शाहला. पण ते होणार नाही.
12 Nov 2015 - 8:39 pm | श्रीगुरुजी
५१% गुंतवणुकीचा निर्णय २०१२ मध्ये झाला होता. सरकारने त्यात काहीही बदल केला नाही. आता तो रद्द करणे म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरविण्यासारखे आहे. आर्थिक धोरणात कोणतेही सरकार एकदम १८० अंशात वळण घेऊ शकत नाही. अन्यथा परदेशी गुंतवणुकदारांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जाऊन गुंतवणुकीवर वाईट परीणाम होऊ शकतो. उद्या साम्यवादी/समाजवादी सत्तेवर आले तरी ते आर्थिक धोरणात आमूलाग्र बदल करू शकणार नाहीत.
परदेशी थेट गुंतवणुकीचे धोरण युपीए सरकारचे नसून ते त्यापूर्वीच्या सरकारचे होते. तेच धोरण युपीए सरकारने पुढे सुरू केले त्यात विशेष ते काय?
13 Nov 2015 - 12:06 am | मार्मिक गोडसे
आमचे सरकार आले तर आम्ही युपीए सरकारने घेतलेला हा निर्णय मागे घेऊ असा तेव्हा बीजेपी प्रचार का करत होती? तुम्हाला जे कळते ते बीजेपीला तेव्हा माहीत नव्हते का? ह्याला अ़़ज्ञान म्हणावे की खोटारडेपणा म्हणावा?
13 Nov 2015 - 3:21 pm | श्रीगुरुजी
युपीए चा निर्णय जैसे थे का ठेवला याची जरा माहिती मिळवितो आणि नंतर उत्तर देतो.
12 Nov 2015 - 9:22 pm | अनुप ढेरे
अजून आधार कार्डाबद्दल प्रश्न पडले नाहीत का कोणाला. मोदी निवडणुकांआधी बराच विरोध करत होते आधारला. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात वगैरे म्हणून. आता काय बदललं हे सांगायला पाहिजे त्यांनी.
टीपः मला आधीही आधार योग्य वाटत होतं. मोदींना त्याचा व्यापक वापर करणं चांगलं आहे. बट ही ओव्ज पीपल सम एक्स्प्लनेशन.
12 Nov 2015 - 9:46 pm | नाव आडनाव
+१
12 Nov 2015 - 9:49 pm | चैतन्य ईन्या
हाच तर प्रोब्लेम झालाय. आधी ज्याला जीव तोडून विरोध केला त्याचा पोलिसी पुढे चालवल्या जात आहे. शिवाय प्रचंड प्रमाणात आयएस वगैरे तत्सम नोकरशाहीला जास्त अधिकार दिलेत. आधी व्होडाफोन बद्दल सरळ सरळ भूमिका घेवून लगेच जेटली करावी केस रद्दबादल केली असती तर ह्यांची विश्वासार्हता वाढली असती. त्याआईवाजी वकिली थाटात उत्तरे दिली. मग चिदंबरम काय वेगळे करत होते. थोडक्यात लोकांना फरकच दिसत नाहीये. थोडासा फार अजित दोव्हल, पर्रीकर आणि गडकरी सोडले तर सगळा आनंदच आहे. नुसते रेल्वे स्टेशन स्वच्छ करून काय फायदा? तिथे वायफाय देवून गरीब लोकांना काय फरक पडणार आहे? माझ्यामते ह्यांच्या प्रायोरीटीज चुकल्या आहेत. कितीहि म्हटले तरी भारत हा अजूनही गरीब लोकांचा देश आहे. बेसिक गोष्टीत सुधारणा होत नाहीयेत. हीच बोंब आहे.
13 Nov 2015 - 3:20 pm | श्रीगुरुजी
3 days, 27 deals:
http://indianexpress.com/article/india/india-news-india/3-days-27-deals-...
13 Nov 2015 - 9:49 pm | संदीप डांगे
13 Nov 2015 - 10:26 pm | विवेक ठाकूर
पोकळ भावनिक आव्हाने करणे आणि भाषणे ठोकणे या व्यतिरिक्त त्यांना काहीही घंटा जमत नाही हे एव्हाना सगळ्या भारतीयांच्या लक्षात आलं आहे.
त्यात बिजेपीचा छुपा अजेंडा `विकास नसून मंदीर आहे' हे इथल्याच एका सदस्यानं निवडणूकीपूर्वी सांगितलं होतं आणि मोदी निवडून आले तर देशात कमालीचं जातीय अस्थैर्य माजून देशाची शांतताच धोक्यात येईल असं ही म्हटलं होतं.
आता राष्ट्रपतींपासून ते पार रिजर्व बँकेच्या गवर्नरपर्यंत सगळे तेच सांगतायंत.
आधीच आरक्षणामुळे देशाच्या बौद्धिक प्रगतीची वाट सरळ परदेशांकडे वळली आहे आणि आता ती घोडचूक बापाजन्मात दुरुस्त होणं शक्य नाही.
खरं तर मोहन भागवतांचा आरक्षणाचा मुद्दा (ते जातीनिहाय नसावं) योग्य आहे. पण इथले एक विद्वान राजकीय निरिक्षक भागवतांच्या वक्तव्याला `गाढवपणा ' म्हणालेत !
आता मंदीर झालं तर देशात आरक्षणानंतरची, देशाची संपूर्ण प्रगती आणि एकसंधतेचा बाजा वावणारी, आणि निस्तरायला असंभव अशी दुसरी घोडचूक होईल.
14 Nov 2015 - 5:24 am | अर्धवटराव
करेक्ट !! तुफ्फान !! चाबुक !!!
आणि म्हणुनच बिहारपासुन बदलाची सुरुवात झाली आहे. तसं पहिले केजरीवाल आलेच होते निवडुन. आता लालु पण आले आहेत रिंगणात मोदिंची जागा घ्यायला.
ह्म्म्म. 'जुन्या' सदस्याचा 'कमालीचा' रेफरन्स देताय होय... मग या प्रतिसादाचं काहि आश्चर्य वाटलं नाहि :)
हि लेखनशैली बघुन डोळे पाणवले, आठवणींचं काहुर माजलं... आणि बरच काहि झालं.
आमच्यासारख्या अडाण्यांचे डोळे खाडकन उघडण्यासाठी अनेकानेक धन्यवाद.
14 Nov 2015 - 10:33 am | विवेक ठाकूर
केजरीवाल दिल्लीत निवडणूक लढले त्यावेळी `मैं अपनी जानपे खेल रहा हूं ' म्हणाले होते ! यातच आपल्या वंदनीय मोदी-शहा जोडीची काय कर्तबगारी आहे ते कळून येतं.
असो, आपल्याला फार पुढचं समजेल असं दिसत नाही तरी, किमान मंदिर व्ह्यायच्या वेळी आकडेवारी आणि नाहक तर्क-वितर्कात गुंतण्यापेक्षा, डोळे उघडे ठेवून विरोध केला तरी पुरेसं होईल.
14 Nov 2015 - 12:05 pm | अर्धवटराव
आता तर खात्री पटायला लागली आहे. बरं, पराभूत मानसीकता वगैरे नाहि दिसली का एव्हाना?
बरं ते राहु दे. मंदीर विरोध करायचा कि कसं ते पुढे बघुच. सध्यातरी केजरीसाहेबांकरता आमचे डोळे केवळ उघडलेच नाहित तर अगदी वटारुन बाहेर आले आहेत... कौतुकाने हो. कसं आहे ना.. दादरी कांड झाल्याबरोब्बर हे साहेब त्या पिडीत कुटुंबाच्या भेटीला अगदी जातीने गेले. राज्यसरकारची जबाबदारी वगैरे किरकोळ मुद्द्यांना साहेबांनी हात घातलाच नाहि..सरळ मोदिंवर गेम टाकला. आणि लालुंच्या राजकीय पुनरज्जीवनासाठी एक तासभर उपोषण सुद्धा केलं म्हणे साहेबांनी. पण साहेबांचं कौतुकच नाहि कोणाला.
जरा भारताला बरे दिवस यायचे चान्सेस आले कि भारतीय मानसीकता झोपा का काढते हे कोडं उलगडलेल तो सोन्याचा दिवस. इथे काय काय होतय देशात... आणि पब्लीक मंदीर मुद्द्याकडे डोळे लावुन बसले आहेत. कठीण आहे.
14 Nov 2015 - 2:57 pm | श्रीगुरुजी
त्याचा अर्थ असा होता की आधीच्या निवडणुकीत ते स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे शो मॅनेज करीत होते, पण मतदार त्या नाटकाला फसले नव्हते. त्यामुळे यावेळी जास्त भयंकर म्हणजे स्वतःवर जीवघेणा हल्ला करून घ्यायचे शो मॅनेज करायला लागणार असा त्या 'जानपे खेलाचा' अर्थ होता.
14 Nov 2015 - 8:16 pm | विवेक ठाकूर
काय बाळबोध युक्तीवाद करतायं. निदान पुरते हारल्यावर तरी आपण काय लिहीतो याची समज यायला हवी .
एकट्या केजरीवालनी दिल्लीत; पंतप्रधान मोदी, त्यांचे दिव्य उजवे हात शहा , आक्खा भाजप पक्ष आणि केंद्र सरकारची राबवलेली यंत्रणा धूळधाण करून टाकली. थोबाडीत कुणाच्या बसली ते सुद्धा लक्षात येत नसेल तर कमाल आहे.
14 Nov 2015 - 8:45 pm | श्रीगुरुजी
अजिबात बाळबोध नाही. केजरीवालांनी २०१३ व २०१४ च्या निवडणुकीत स्वतःच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायचे किमान प्रयोग केले होते. प्रत्येक वेळी थोबाडीत खाल्ल्यावर ते भाजपवर आरोप करायचे आणि दुसर्या दिवशी माध्यमे शोधून काढायची की थोबाडीत मारणारा आआपचाच कार्यकर्ता होता. हे उघड झाल्यावर खजिल होण्याऐवजी हे महाभाग माध्यमांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन थोबाडीत मारणार्याच्या घरी जायचे व त्याला माफ केल्याचे नाटक करायचे.
थोबाडीत मारून घेण्यासारखी इतर नाटके देखील त्यांनी केली होती. उदाहरणार्थ स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून स्वत:च्या सदर्यावर शाई शिंपडून घेणे, गाडीवर अंडे टाकायला लावणे, इ. आणि प्रत्येक वेळी ते भाजपवर खोटे आरोप करायचे. वाराणशीत असताना एकदा फक्त टॉवेल गुंडाळून उघडेबंब अवस्थेत गंगा नदीवर डुबक्या मारायला गेले होते आणि बरोबर माध्यमांचे कॅमेरे होतेच. एकदा सलून मध्ये जाऊन केस कापत होते आणि बरोबर कॅमेरे होतेच. मफलर गुंडाळून खोकण्याची नाटके देखील झाली. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा खोकला अचानक गेला आहे. अशी असंख्य नाटके त्यांनी केली.
फुकट वीज, पाणी, वायफाय, १५ लाख सीसीटीव्ही अशी फुकटेगिरीची आश्वासने देऊन आणि काँग्रेसकडून वॉकओव्हर मिळवून काँग्रेसच्या मदतीने त्यांनी सत्ता मिळविली.
असो. 'मैं अपनी जानपे खेल रहा हूं' या वाक्याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ मान्य नसेल तर नक्की काय अर्थ आहे ते सांगाल का?
14 Nov 2015 - 8:46 pm | श्रीगुरुजी
किमान ३ प्रयोग केले होते.
15 Nov 2015 - 2:00 pm | विवेक ठाकूर
दिल्लीत तुमच्या मोदी, शहा, भाजपची संपूर्ण यंत्रणा, आणखी कोणकोण दिग्गज, सगळ्यांना एकट्या केजरीवालनी पार लोळवलंय.
शहा सुपारीचे व्यापारी आहेत आणि सध्या तुमच्या जोडगोळीनं निर्माण केलेली पक्षांतर्गत दहशत, आता तुमच्याच पक्षाच्या श्रेष्टींकडून मोडायचे प्रयत्न चाललेत. उगीच वेड घेऊन झेड गावला कशाला जातायं.
उगीच फालतूचा डेटा इकडून तिकडे डकवून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा वास्तविकात काय घडलंय ते पाहा.
15 Nov 2015 - 5:33 pm | श्रीगुरुजी
तेच सांगतोय. वास्तविकात काय घडलं ते पहा.
बादवे, 'जानपे खेल' म्हणजे नक्की काय याचं अजून उत्तर नाही मिळालं, ते जरा देता का?
एप्रिल २०१४ मध्ये दिल्लीतल्या एका सभेत गजेंद्र सिंह नावाच्या एका राजस्थानी शेतकर्याला तुमच्या केजरीवालांनी बोलाविले होते व त्याला झाडावर चढून गळ्यात फास लटकावण्याचं नाटक करायला सांगितलं होतं. त्याने ठरलेल्या नाटकानुसार इमानइतबारे गळ्यात फास घालून घेतला आणि हा 'जानपे खेल' आहे हे विसरून त्याला खरोखरच फास बसून त्यात तो गेला. त्याचे प्रेत झाडावर लटकत होते आणि त्याच्या लटकत्या प्रेतापासून ५० फुटांवर तुमचे केजरीवाल ७५ मिनिटे पुढची राणा भीमदेवी थाटात भाषणे ठोकत मोदींना शिव्या घालत होते. म्हणजे 'जान' त्याची गेली आणि 'खेल' यांचा झाला. हाच का तो केजरीवाल म्हणतात तो 'जानपे खेल'?
अर्थात तो गेल्यावर केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने त्याच्या प्रेताच्या टाळूवरील लोणी ओरपण्यात अजिबात कसर ठेवली नाही. त्यांचा बॉडीगार्ड संजय सिंह स्व्तःबरोबर बाउन्सर्सची गँग घेऊन त्याच्या घरी गेला व घरच्यांना धमकावूनही आला. आशुतोषने डोळ्यात पाण्याचा थेंब येऊन ने देता भोकाड पसरून रडण्याचा बेमालूम अभिनय केला. केजरीवालांनी सगळी जबाबदारी पोलिसांवर ढकलून स्वतः नामानिराळे राहिले. एकंदरीत गजेंद्रच्या 'जान'चा जो 'खेल' झाला त्याची चांगलीच मजा केजरीवालांनी लुटली.
17 Nov 2015 - 4:14 pm | विवेक ठाकूर
कुठूनही काहीही भंकस गोळा करून कशीही फेकायची यात तुमचा हात तुम्हीच धरावा!
जर केजरीवाल गजेंद्र सिंहच्या मृत्यूला जवाबदार आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून गजेंद्र फास लावायचा खेळ करत होता तर तुमचं बिजेपी सरकार काय गोट्या खेळतंय का ? का नाही दाखल केला गुन्हा ?
14 Nov 2015 - 12:03 am | कपिलमुनी
FDI वर भाजपाचा धोरण दुटप्पी आहे
14 Nov 2015 - 12:28 am | संदीप डांगे
भाजपचे हे सरकार युटर्नगामी आहे. यावर एक विशेष लेखच लिहायला लागेल. कारण इतके युटर्न्स आहेत की इथे ५००० प्रतिसादांचा वेगळा धागा अतिशय आवश्यक आहे. ज्यातले ४००० मास्तरांचेच असतील....
तत्लोक... https://www.quora.com/What-are-the-worst-U-turns-by-BJP-after-forming-th...
14 Nov 2015 - 5:27 am | अर्धवटराव
तुम्ही दिलेल्या लिंकसारखाच असेल तो धागा तर मात्र असु द्या :)
14 Nov 2015 - 2:51 pm | श्रीगुरुजी
मग काढा की धागा. तुमचे महनीय विचार वाचायला आवडतील.
14 Nov 2015 - 2:51 pm | श्रीगुरुजी
मग काढा की धागा. तुमचे महनीय विचार वाचायला आवडतील.
15 Nov 2015 - 7:23 pm | संदीप डांगे
सर ब्रॅडमन,
आधीच फक्त एकाच युटर्नच्या उत्तराची वाट बघत आहे. "एफडीआयचं काय झालं...?"
युपीए सरकारने जेव्हा एफडीआयचे निर्णय घेतले तेव्हा भाजपा बोंबाबोंब करत होती, तेच निर्णय गुपचूप स्वत: सत्तेरवर असतांना भाजपा का घेत आहे?
14 Nov 2015 - 2:52 pm | श्रीगुरुजी
भुजबळ कुटुंबियांना १६० कोटींचा झटका -
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bhujabal-famil...
15 Nov 2015 - 2:12 pm | काकासाहेब केंजळे
कसला दणका वगैरे काही नाही ओ गुरुजी , तुमचे लाडके मोदी ,जेटली, फडणवीस , खडसे हे पवारांचे मार्गदर्शन घ्यायला दर महिणा बारामतीला येतात .त्या पवारांचेचे शागिर्द भुजबळ साहेब आहेत हे विसरता काय मध्येच
15 Nov 2015 - 6:21 pm | श्रीगुरुजी
अहो अनेक आजी, माजी आणि भावी डूआयड्यांचे धनी,
जोपर्यंत भ्रष्टाचार्यांवर कारवाई होत आहे तोपर्यंत ही मंडळी बारामतीला गेली किंवा काटेवाडीला गेली तरी शष्प फरक पडत नाही.
15 Nov 2015 - 6:31 pm | काकासाहेब केंजळे
काय तो आत्मविश्वास....अहो गुरुजी भ्रष्टाचार्यांवर कारवाई कशी करायची याचे मार्गदर्शन बारामतीला मिळते हे विसरलात काय.
काय झाले पुढे सिंचन घोटाळ्याचे? टोल घोटाळ्यावर कारवाई सोडाच पण तुमच्या गडकरी साहेबांनी मुंबैइ गोवा हायवेच्या नवीन टोल प्लाझाचे उद्घाटनही करुन टाकलेय.
भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे,मग शिवसेनेला खिजवण्यासाठी ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते राष्ट्रवादीवालेही चालतात त्यांना...
15 Nov 2015 - 7:08 pm | श्रीगुरुजी
अहो अनेक आजी, माजी आणि भावी डूआयड्यांचे धनी,
बेकायदा लाटलेली जमीन जप्त करावी, बेकायदा जमा केलेल्या मालमत्तेवर धाडी टाकाव्या, भ्रष्टाचार्यांवर खटले दाखल करून तुरूंगात टाकावे इ. प्रकारचे मार्गदर्शन बारामतीला मिळत असेल तर असे मार्गदर्शन कायमच घ्यायला पाहिजे.
15 Nov 2015 - 7:15 pm | श्रीगुरुजी
मी उद्या १६ नोव्हेंबर २०१५ पासून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत sabbatical वर असणार आहे. मिसळपाव पासून दीड महिना दूर राहून या संकेतस्थळावर १ जानेवारीनंतर परत येईन. सर्वांना धन्यवाद!
15 Nov 2015 - 11:56 pm | राजेश घासकडवी
त्या काळात फार कंटाळवाणं, रुक्ष वाटेल हो मिपा. बाहेर भुरुभुरू बर्फ पडतोय, हातात छान कॉफीचा वाफाळता कप आहे, पण हायरे दैवा! वाचायला श्रीगुरुजींचे प्रतिसाद नाहीत. किती वाचक मिपा सोडून जातील कल्पना आहे का तुम्हाला? या काळातही तग धरून राहायला मिपाला आणि मिपाकरांना शुभेच्छा.
16 Nov 2015 - 11:39 am | तुषार काळभोर
१ जानेवारीला परत आल्यावर 'दीड वर्षानंतर..' असा नवीन धागा असेल.( किंवा पावणे दोन वर्षानंतर किंवा..)`
16 Nov 2015 - 12:33 pm | संदीप डांगे
काय काका, शालजोडीतले एकदम...?
असो. मैदानातून पळून गेल्याचे आरोप करू नये म्हणून ढिस्क्लेमर टाकलाय वो...
17 Nov 2015 - 6:24 am | राजेश घासकडवी
मला आरोप प्रत्यारोपाची काही पडलेली नाही. करमणूक होते की नाही याच्याशी मतलब आहे. श्रीगुरुजींचे प्रतिसाद वाचणं हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंद आहे. त्याला मीच नाही, तर सर्वच मिपाकर मुकणार हे वाचून मला अनावर दुःख झालेलं आहे.
16 Nov 2015 - 12:45 pm | मोगा
As per the instructions from Govt of India,w.e.f. 15-11-15,0.5% Swachh Bharat Cess will be levied. Service tax will be revised from 14% to 14.50%.Thank you