मॅनेजमेन्टच्या क्षेत्रात "SWOT analysis" ही एक संकल्पना आहे. SWOT म्हणजे Strengths (सामर्थ्यक्षेत्रे), Weaknesses (कमकुवत क्षेत्रे), Opportunities (संधी) आणि Threats (धोके) यांचे विश्लेषण. यातील सामर्थ्यक्षेत्रे आणि कमकुवत क्षेत्रे या दोन गोष्टी अंतर्गत असतात तर संधी आणि धोके या दोन गोष्टी बाह्य असतात. पहिल्या लेखामध्ये नितीश कुमारांच्या आघाडीचा परामर्श घेतला त्यावेळी सर्व मुद्दे त्या आघाडीशी अंतर्गत होते.याचे कारण या आघाडीला बाह्य कोणते मुद्दे हे संधी असतील आणि कोणते मुद्दे धोकादायक ठरतील याचा विचार केला तर खरोखरच तसे मुद्दे मिळाले नाहीत. कदाचित माझ्याकडून काही मुद्दे निसटले असतील. पण भाजप आघाडीबाबत मात्र संधी आणि धोके हे बाह्य मुद्देही तितक्याच प्रमाणावर मला सापडले. म्हणून या लेखाचे शीर्षकही तसेच दिले आहे.तेव्हा सुरवात करू SWOT याच क्रमाने.
भाजप आघाडीची Strengths (सामर्थ्यक्षेत्रे)
१. ही आघाडी नितीश कुमारांच्या आघाडीच्या मानाने अधिक सुसंगत आहे.बिहारमधील निवडणुक म्हटली की जातीपातींचा विचार अनिच्छेने का होईना पण करावाच लागतो. त्यामुळे हा मुद्दा जातीच्या आधारेच स्पष्ट करतो.
या आघाडीचे मतदार नक्की कोणते गट आहेत? उच्चवर्णीय, बनिया आणि सुशीलकुमार मोदींच्या ओ.बी.सी मधील जातींचे मतदार हे भाजपचे पारंपारिक मतदार आहेत.त्यापैकी कोणीही भाजपला सोडून जायची शक्यता नाही. महादलितांमधील पासवान, मल्या (नावाडी) या समाजातले मतदार रामविलास पासवानांच्या लोकजनशक्तीचे पारंपारिक मतदार आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये ही व्होटबॅंक पासवानांनी आपल्याबरोबर ठेवली आहे. ओ.बी.सींमधील कुशवाह समाज उपेन्द्र कुशवाहांबरोबर तर महादलितांपैकी मुसहार आणि इतर जातींचे मतदार जीतनराम मांझींबरोबर असतील असे म्हणायला हरकत नसावी. जीतनराम मांझींचे निवडणुकीतील सामर्थ्य अजून स्पष्ट झालेले नाही.यापूर्वी ते तितके महत्वाचे आणि मोठे नेते नव्हतेच.पण नितीशकुमारांनी त्यांना मुख्यमंत्रीपद खाली करायला सांगितल्यावर मात्र त्यांनी आपले पत्ते योग्य प्रकारे खेळले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले.तेव्हा त्या समाजातील मते त्यांच्यामागे जातील असे म्हणायला हरकत नसावी.
हे मतदार परस्परविरोधी नाहीत.म्हणजे नितीशकुमारांच्या आघाडीत यादव विरूध्द कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार आहेत. कुर्मी-कोयरींना लालूंच्या राज्यात डावलले जाते आणि सगळा फायदा यादवांनाच होतो या मुख्य कारणामुळे नितीशकुमार १९९४ मध्ये जनता दलातून बाहेर पडले होते.त्या कारणाने यादव आणि कुर्मी-कोयरी हे परस्परविरोधी मतदार झाले. तशा प्रकारे परस्परविरोध भाजप आघाडीत नाही.जीतनराम मांझींना बरोबर घेतल्यामुळे आणि नितीश-लालू युती असल्यामुळे लालूंच्या काळातील यादवीचा त्रास झालेले महादलित मतदार मोठ्या अक्कलहुशारीने भाजप आघाडीने आपल्याकडे वळवले आहेत. भाजप आघाडीचे सर्वात मोठे सामर्थ्यस्थान हेच आहे.
२. भाजप आघाडीमध्ये भाजप १६०, लोकजनशक्ती ४०, उपेन्द्र कुशवाहांचा पक्ष २३ तर जीतनराम मांझींचा पक्ष २० जागा लढवत आहे. त्यामुळे अर्थातच स्थैर्याच्या दृष्टीने ही आघाडी अधिक विश्वसनीय आहे.आघाडीचा विजय झाल्यास भाजप स्वबळावर बहुमताच्या बऱ्याच जास्त जवळ असेल आणि इतर पक्षांवर अवलंबून रहावे लागले तरी त्याप्रमाणात कमी असेल.मतदारांनी सरकारचे स्थैर्य हा मुद्दा लक्षात घेतल्यास नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी ही मतदारांना अधिक आकर्षक असेल.
३. भाजप आघाडीचा प्रचार हा एकत्रितपणे चालला आहे असे अजूनपर्यंतचे तरी चित्र आहे. नरेन्द्र मोदींच्या दोन सभांना सर्व पक्षांचे नेते हजर होते.कदाचित भविष्यातल्या काही सभांनाही असतील. यातून मतदारांपुढे ऐक्याचा संदेश नक्कीच जात आहे.
भाजप आघाडीचा Weaknesses (कमकुवत क्षेत्रे)
१. भाजप आघाडीचा सर्वात मोठा वीकनेस म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा अभाव. नितीशकुमारांना तोड देईल असा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजप आघाडीकडे नाही. आजही सर्व सर्वेक्षणांमध्ये नितीश कुमार हे भाजपच्या कोणाही संभाव्य उमेदवारापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत.
भाजप आघाडीच्या Opportunities (संधी)
१. या निवडणुकांमध्ये एका बाजूला भाजप आघाडी आहे तर दुसऱ्या बाजूला नितीशकुमार-लालू आणि कॉंग्रेस आहेत. दुसऱ्या बाजूच्या पक्षांनी स्वातंत्र्यापासून बिहारमध्ये सरकार चालवले होते-- सर्वाधिक काळ कॉंग्रेसने, त्याखालोखाल लालूंनी १५ वर्षे आणि त्याखालोखाल नितीशकुमारांनी १० वर्षे!! त्यामुळे अन्य कोणाला एक संधी द्यायला हवी असे वाटणारे मतदारांना नितीशकुमारांच्या आघाडीपेक्षा भाजप आघाडी अधिक आकर्षक आहे हे नक्कीच. ही भाजप आघाडीसाठी मोठी संधी आहे.
२. २०१४ च्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही ३५ पेक्षा कमी वय असलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. या तरूण मतदारांनी २०१४ मध्ये नरेन्द्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला मते दिली होती. लालू बरोबर नसते तर त्याच मुद्द्यावर यातील बहुसंख्य मते नितीश कुमारांकडे जायची शक्यता होती.पण नितीशकुमारांनी लालूंचे जोखड गळ्यात अडकवून घेतल्यामुळे ही मते परत एकदा आपल्याकडे आकर्षित करणे भाजपला सोपे जाईल.
भाजप आघाडीसाठीचे Threats (धोके)
१. अजूनही भाजप आघाडी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर अधिक प्रमाणावर अवलंबून आहे. नरेंद्र मोदी बिहारमध्ये लोकप्रिय असतीलही पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत.तसेच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेवर मतदारांनी २०१४ मध्ये मते दिली.आता परत त्याच नावावर मते मागण्यावर नक्कीच मर्यादा आहेत. शेवटी अर्थशास्त्रातला Law of diminishing marginal returns हा प्रकार सर्वत्र असतोच. एका कारणावरून मागच्या वेळी जितकी मते मोदी फिरवू शकले तितक्या प्रमाणावर यावेळी आणि त्यातही विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी फिरवू शकतील का? एकाच मुद्द्यावर किती काळ अवलंबून राहायचे याचा विचार भाजपने करायलाच हवा.
२. बिहारमधील जातीपातींचे वर्चस्व असलेल्या परिस्थितीत एकाच आघाडीत रामविलास पासवान आणि जीतनराम मांझी हे दोन एकाच समाजातील नेते असणे हे धोकादायक ठरू शकते. शेवटी रामविलास पासवान हे बिहारमधील ज्येष्ठ नेते आहेत. ते सर्वप्रथम १९६९ मध्ये राज्य विधानसभेवर निवडून गेले होते.आणि १९७७ पासून १९८४ आणि २००९ चा अपवाद वगळता ते सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्या तुलनेत जीतनराम मांझी हे बऱ्यापैकी उपऱ्यासारखे आले आणि आपल्याला मिळाल्या त्याच्या अर्ध्या जागा मिळवून गेले असे पासवानांना वाटणारच.त्यातून पासवानांचे आपल्याच समाजातील नेत्यांबरोबर कसे वाकडे असते याविषयी माझ्या मिसळपाववरील पूर्वजन्मात या प्रतिसादात लिहिले होते.
याला मिटिगेटींग फॅक्टर म्हणजे मायावतींचा जसा पासवानांना एकदा नाही तर दोनदा स्वत:ला फटका बसला तसे मांझी करू शकतील असे वाटत नाही.तसेच एकदा निवडणुका झाल्या की नंतर मांझींना फारसे कोणी विचारेल असे वाटतही नाही.मायावतींमुळे पासवानांच्या मतांवर जसे गंडांतर आले तसे मांझी करतील याची शक्यता कमी.आणि दुसरे म्हणजे मांझी हे पासवानांचे मतदार-- पासवान आणि मल्या या जातींचे मतदार पळवतील याची शक्यता त्या मानाने कमी. म्हणून बहुदा पासवान गप्प बसले असावेत. पण समजा भविष्यात या दोघांमध्ये मतभेद उफाळून आले तर मात्र तो भाजप आघाडीसाठी मोठा धोका असेल.
आता यापुढच्या लेखामध्ये या निवडणुकांसाठीच्या "x-factors" चा परामर्श घेईन.
प्रतिक्रिया
8 Oct 2015 - 8:21 pm | गॅरी ट्रुमन
वीकनेसमध्ये राहिलेला मुद्दा
खरं तर हा मुद्दा म्हणजे वीकनेसमधला पहिला मुद्दा हवा.
१. निवडणुकांच्या तोंडावरच रा.स्व.संघाचे मोहन भागवत यांचे कथित आरक्षणविरोधी वक्तव्य आले. नितीश-लालूंनी अर्थातच त्या संधीचा फायदा घेतला.शेवटी बिहारमध्ये जातीपाती महत्वाच्या असल्यामुळे हा घरचा अहेर भाजप आघाडीला महाग पडू शकतो. दुसरे म्हणजे निवडणुकांच्याच तोंडावर दादरीची घटना झाली आणि त्यानंतर भाजपमधील संगीत सोम, साक्षी महाराज इत्यादी वाचाळवीरांची वक्तव्येही आली.आजच्या सभेत नरेंद्र मोदींनी त्या घटनेचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला आणि त्याविरूध्द ते बोलले.पण अशा घटना होणे म्हणजे विकासाचा मुद्दा डळमळीत होण्यासारखे होईल.
8 Oct 2015 - 8:29 pm | होबासराव
डॉग्विजय सरांनि जेव्ह्ढे नुकसान काँग्रेस चे केले त्या पेक्षा किति तरि पटिने हे लोक भाजपचा आणि एका स्थिर सरकार च नुकसान आपल्या वाचाळवीरते मुळे करतायत.
8 Oct 2015 - 10:47 pm | श्रीगुरुजी
भाजप व एनडीए साठी आज वाईट बातम्या आहेत. आज संध्याकाळी एकूण ३ नवीन सर्वेक्षणांचे अंदाज जाहीर केले गेले. ते खालीलप्रमाणे आहेत.
(१) आयबीएन - ७
संजद+ ४६% मते आणि जागा १३७ (संजद ६९ + राजद ४८ + काँग्रेस २०)
भाजप+ ३८% मते आणि जागा ९५ (भाजप ८२ + लोजप २ + मांझीचा पक्ष ७ + चौथा पक्ष ४)
(२) इंडिया टुडे - सिसेरो
संजद+ १२२
भाजप+ १११
(३) इंडिया टिव्ही - सी व्होटर
संजद+ ११६
भाजप+ ११९
8 Oct 2015 - 11:31 pm | सव्यसाची
कॉंंग्रेस - २०?????
काँग्रेसची त्सुनामी आहे की काय?
9 Oct 2015 - 2:04 pm | गॅरी ट्रुमन
काँग्रेसला २० जागा म्हणजे जरा जास्तच वाटत आहेत ही गोष्ट खरी आहे. पण निवडणुकींच्या बाजारात अशा अतर्क्य गोष्टीही घडू शकतात. महिन्याभरात कळेलच.
रच्याकने, राहुल गांधींनी चंपारण जिल्ह्यात केलेल्या भाषणाचा व्हिडिओ इथे चिकटवत आहे. हे भाषण २३ मिनिटांचे होते अशा बातम्या वाचल्या आहेत त्यापैकी २१ मिनिटे या व्हिडिओत आहेत.म्हणजे भाषणाच्या व्हिडिओमध्ये फार काटछाट झाली नसावी. हा व्हिडिओ भाजप समर्थकांनी अपलोड केला असला तरी या भाषणाला विनोदीही म्हणणे मला स्वतःला जिवावर येत आहे. तथाकथित जंगलराज, बिहारमध्ये यांच्या आघाडीचे सरकार आले तर त्याचा कार्यक्रम काय असणार, बिहारच्या विकासासाठी हे नक्की काय करणार वगैरे फालतू गोष्टींना राहुल गांधींनी अगदी फाट्यावरच मारले आहे आणि "हम धोती को अपनाना चाहते है" अशा पध्दतीची धोरण, विचार अशा गोष्टींचा पूर्णपणे अभाव असलेली वाक्ये त्यांनी फेकली होती. अर्थातच मी स्वतः एक सुशिक्षित व्यक्ती असल्यामुळे यातला मूर्खपणा माझ्या लक्षात आला. पण बिहारमधले सामान्य मतदार अशा गोष्टींना भुलले तर त्यांचे सरकार येईलही. इतकी वर्षे लालूंचे जंगलराज असूनही लोक परतपरत त्यांनाच निवडून देत होतेच की. मला वाटते की देशात लोकशाही राज्यव्यवस्था असायची ही किंमत आपल्याला मोजायला हवी. फक्त समाधान इतकेच मानायचे की हुकुमशाही असती तर मोजायला लागणारी किंमत कदाचित आणखी बरीच जास्त असती.
9 Oct 2015 - 2:24 pm | शलभ
कोट करण्यालायक वाक्य..
9 Oct 2015 - 10:42 pm | सव्यसाची
क्लिंटन सर,
कॉंग्रेस ला २० जागा देताना लोजप ला फक्त २ जागा दिल्या आहेत. हे मला सध्या तरी अशक्य वाटत आहे.
कॉंग्रेसचे सध्या ४ आमदार आहेत. हे ४ आमदार किती जागा लढवल्या तेव्हा निवडून आले याचा काही विदा आहे का? (आपण पूर्वीच कुठे दिला असेल तर क्षमस्व. )
बाकी राहुल यांच्या भाषणावर काय बोलावे. अलीकडे दुसर्या लोकांनी घातलेले कपडे आणि त्यांचे रंग यावरच निम्मे भाषण होते.
पायजमा, धोतर, सूट, कुर्ता सगळे काही बोलून झाले आहे.
10 Oct 2015 - 4:34 pm | गॅरी ट्रुमन
हो बरोबर आहे. २०१० मध्ये नितीश कुमारांची त्सुनामी आली होती तेव्हाही लोजपला ४ जागा मिळाल्या होत्या.तेव्हा यावेळी लोजपला दोनच जागा हे जरा कठिणच वाटत आहे.
मागच्या वेळी काँग्रेसने सर्व २४३ जागा स्वबळावर लढवल्या होत्या आणि त्यापैकी ४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला बिहारमध्ये २० जागा गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये मिळालेल्या नव्हत्या. १९९५ मध्ये २९ तर २००० मध्ये २३ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.या दोन्ही निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवल्या होत्या आणि दोन्ही निवडणुकांच्या वेळी झारखंड सुध्दा बिहारचाच भाग होते. आणि काँग्रेस त्या भागात बिहारपेक्षा थोड्या अधिक प्रमाणावर ताकद राखून आहे. तेव्हा सध्याच्या बिहारमध्ये काँग्रेसला २० जागा मिळणे म्हणजे काँग्रेससाठी सुगीचे दिवस आल्याचेच लक्षण आहे.
नक्की काय होते हे ८ नोव्हेंबरला समजेलच.
24 Oct 2015 - 7:02 pm | कानडाऊ योगेशु
विडिओ पाहीला. एक वाटुन गेले जे काही मुद्दे राहुल गांधीने मांडले ते तर्कसंगत होते. मुळात अश्या सभांना तुम्ही चुकीचे बोलता कि बरोबर बोलता ह्याला महत्व नसुन किती तर्कसंगत बोलता ह्याला महत्व असते. म्हणजे तुमचा मूळचा मुद्दा चुकीचा असु दे पण तो तुम्ही तोच चुकीचा मुद्दा कसा बरोबर आहे हे कसे सिध्द करता हे महत्वाचे. जसे मोदी व गांधीं ह्यांच्या वेशभूषेची तुलनाच चुकीची . पण हाच मुद्दा रेटुन उदाहरण देऊन कसा मोदी कसे चूक व गांधीजी कसे बरोबर हे व्यवस्थित सिद्ध केले रा.गां ने. माझ्या मते एक वक्ता म्हणुन प्रगती रा.गां मध्ये प्रगती नक्कीच दिसली.
10 Oct 2015 - 12:03 pm | श्रीगुरुजी
काल अजून ३ नवीन सर्वेक्षणांचे अंदाज जाहीर झाले.
(४) न्यूज इंडिया
संजद+ ११७
भाजप+ १२२
(५) न्यूज नेशन
संजद+ ११०
भाजप+ १२६
(६) झी न्यूज (टेलिफोनिक सर्वेक्षण)
संजद+ ५१
भाजप+ १६२
झी न्यूज च्या दाव्यानुसार त्यांनी सुमारे १० लाख मतदारांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यातील ५४,४०० नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्यावरून त्यांनी अंदाज काढला आहे. त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या बरोबर ८ दिवस आधी असाच दूरध्वनीवरून सर्व्हे केला होता व त्यात आआपला ६६ व भाजपला २ असा अंदाज दिला होता.
वरील ६ सर्वेक्षणांचे अंदाज परस्परविरोधी आहेत. झी न्यूजने तर पूर्ण टोक गाठले आहे. ३ अंदाज भाजपला बहुमत देणारे आहेत, २ अंदाज संजद+ ला बहुमत देणारे आहेत व एक अंदाज कोणालाही बहुमत देत नाही परंतु भाजप+ सर्वाधिक मोठा पक्ष असणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी असेच झाले होते. कोणालाही केजरीवाल लाटेचा अंदाज आला नव्हता.
10 Oct 2015 - 4:14 pm | गॅरी ट्रुमन
या सगळ्या सर्व्हेंच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
झी न्यूज च्या दाव्यानुसार त्यांनी सुमारे १० लाख मतदारांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यातील ५४,४०० नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्यावरून त्यांनी अंदाज काढला आहे.
१० लाख मतदारांपैकी ५४,४०० म्हणजे ५.४४% प्रतिसादच त्यांनी घेतलेले दिसतात.मग उरलेले ९४.५६% प्रतिसाद का घेतले नाहीत याविषयी त्यांनी काही भाष्य केले आहे का?
त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या बरोबर ८ दिवस आधी असाच दूरध्वनीवरून सर्व्हे केला होता व त्यात आआपला ६६ व भाजपला २ असा अंदाज दिला होता.
हा बाण पहिल्यांदा मारून मग त्याच्याभोवती वर्तुळ काढायचा प्रकार दिसतो आहे. झी न्यूजने असा कोणताही सर्व्हे केल्याच्या बातम्या त्यावेळी आलेल्या नव्हत्या.आताही युट्यूबवर शोधाशोध केली तर एका सर्व्हेमध्ये त्यांनी भाजपला ३७ आणि आआपला २९ जागा दिलेल्या दिसल्या. व्हिडिओ पूर्ण बघितला नाही पण फॉरवर्ड करून ते जागांचे अंदाज व्यक्त करत आहेत तोच भाग बघितला (साधारण १४ मिनिटांच्या आसपास).
असल्या सर्व्हेंवर फार विश्वास ठेवण्यात अर्थ नाही असे दिसते.
10 Oct 2015 - 10:37 pm | श्रीगुरुजी
मतदान सर्वेक्षणाची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत आहे. साधारणपणे १९९९ पर्यंत सर्वेक्षणाचे अंदाज बहुतांशी बरोबर येत होते. १९८० लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया टुडेने काँगेससाठी ३५३ जागांचा अंदाज दिला होता, पत्यक्षात काँग्रेसला ३५५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर १९८५ (अंदाज - ३६०+, प्रत्यक्ष - ४१४), १९८९ (अंदाज - १९५, प्रत्यक्ष - १९५) हे सर्व अंदाज जवळपास अचूक होते. १९९१ चे आठवत नाही. पण १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभेसाठी कॉंग्रेस ८० व भाजप-सेना युती १२५ असा अंदाज होता आणि प्रत्यक्षात काँग्रेस ८३ व युती १३८ अशी परिस्थिती होती. १९९९ लोकसभेसाठी सुद्धा रालोआला वेगवेगळ्या सर्वेक्षणांनी २७४-३०० जागांचा अंदाज दिला होता व प्रत्यक्षात रालोआला २९१ जागा होत्या.
२००४ पासून सर्वेक्षणाचे अंदाज चुकायला लागले. २०१५ मध्ये तर कहरच झाला आहे. अनेक वेगवेगळ्या वृत्तसंस्था सर्वेक्षणात उतरल्या. प्रत्येकाचे अंदाज दुसर्यापेक्षा पूर्ण वेगळे असतात. ही सर्वेक्षणे बहुतेक मॅनेज्ड व पेड सर्वेक्षणे असतात यावर विश्वास बसायला सुरूवात झाली आहे.
13 Oct 2015 - 4:01 pm | गॅरी ट्रुमन
मी १९८० आणि १९८४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी बराच लहान असल्यामुळे तेव्हाची सर्वेक्षणे नक्की काय सांगत होती हे अर्थातच मला माहित नाही. माझ्या आठवणीतले पहिले सर्वेक्षण होते १९९३ मधील उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश मधील निवडणुकांचे. हे सर्वेक्षण इंडिया टुडेमध्ये आले होते. त्यात उत्तर प्रदेशात कल्याणसिंगांना निसटते बहुमत, दिल्लीमध्ये भाजप आणि हिमाचलमध्ये काँग्रेसचा स्वीप, राजस्थानात भाजपला निसटते बहुमत तर मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत असे निष्कर्ष मांडले होते. त्यापैकी केवळ दिल्ली आणि हिमाचलमधले निष्कर्ष बरोबर आले. राजस्थानात भाजपचे सरकार बनले पण बहुमत थोडक्यात हुकले होते (२०० पैकी ९६). मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात निष्कर्ष चुकले.
पुढे १९९६ मध्ये ओपिनिअन पोल्सपेक्षा एक्झिट पोल अधिक विश्वासार्ह होते. १९९८ आणि १९९९ मध्येही लोकमतने केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल असे म्हटले होते ते पण चुकले. पण इतर सर्वेक्षणे बरोबर होती. २००४ मध्ये तर या सर्वेक्षणांचा अगदीच पचका झाला.
महाराष्ट्रात १९९५ मध्ये प्रणव रॉयने सर्वेक्षणात काँग्रेसला १२५ जागा दिल्या होत्या. या निवडणुकांमधले मतदान ९ आणि १२ फेब्रुवारीला झाले होते तर मतमोजणी ११ मार्चला सुरू झाली. मधल्या काळात 'संध्याकाळ' या तत्कालीन सांज दैनिकामध्ये भाऊ तोरसेकरांनी 'किलर इन्स्टिन्क्ट' नावाचा एक अप्रतिम अग्रलेख लिहून प्रणव रॉयचे अंदाज नक्कीच चुकणार आणि शिवसेना-भाजप युतीचे सरकार येणार असे छातीठोकपणे लिहिले होते. १४ मार्चला मनोहर जोशींचा शपथविधी झाला त्या दिवशी तोच अग्रलेख परत एकदा छापून हा अंदाज आपण आधीच व्यक्त केला होता हे त्यांनी लिहिले होते.
एकूणच या सर्वेक्षणांचा इतिहास संमीश्र आहे. सध्या तरी एक्झिट पोल थोडे तरी बरोबर असतात-- (दिल्लीमध्ये अॅक्सिस पोलने आआपला ६० जागा दिल्या होत्या आणि चाणक्यने २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला २९१ तर एन.डी.ए ला ३४० जागा दिल्या होत्या) पण मतदानपूर्व चाचण्यांवर मात्र तितका विश्वास राहिलेला नाही.
24 Oct 2015 - 9:33 am | याॅर्कर
ते कायम भाजपच्या जागा जास्त दाखवतात.दिल्ली निवडूकवेळीही इतर सर्वे 'आप' सर्वाधिक जागा घेईल किंवा समान टक्कर होईल असे दाखवत होते.आणि हे इंडिया टीवीवाले तर चक्क भाजपला 40 च्या वर जागा दाखवत होते.यावरून ज्यांना जे समजायचे आहे ते समजतेच(केवढयाला विकले म्हणायचे).
8 Oct 2015 - 11:04 pm | बोका-ए-आझम
हा काय मुद्दा आहे ते नीट समजलं नाही.
9 Oct 2015 - 10:59 am | गॅरी ट्रुमन
रामविलास पासवान १९७७ आणि १९८० मध्ये हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. १९८४ मध्ये काँग्रेस लाटेत त्यांचा पराभव झाला. १९८५ मध्ये उत्तर प्रदेशात बिजनोर मध्ये पोटनिवडणुक होती.ती रामविलास पासवानांनी लढवली.दरम्यान मीरा कुमार यांनी आय.एफ.एस चा राजीनामा दिला होता आणि त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या.बसपाच्या मायावतींनीही तीच पोटनिवडणुक लढवली. या निवडणुकीत मीरा कुमार यांनी पासवानांचा सुमारे ५३०० मतांनी पराभव केला.तर मायावतींनी सुमारे ६१ हजार मते घेतली. मायावती आणि पासवान एकाच समाजातले नेते असल्यामुळे मायावतींनी पासवानांची मते फोडली हे उघड होते. पुढे १९८७ मध्ये परत हरिद्वारमध्ये पोटनिवडणुक होती. या निवडणुकीतही परत मायावती आणि पासवान एकमेकांविरूध्द आले. या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला मायावतींपेक्षा सुमारे २४ हजार मते अधिक मिळाली आणि मायावती दुसर्या क्रमांकावर राहिल्या. तर पासवान अवघ्या ३४ हजार मते घेऊन चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. तेव्हापासून पासवान आणि मायावती यांच्यातून विस्तवही जात नाही. २००२ मध्ये उत्तर प्रदेशात तिसर्यांदा बसपा-भाजपचे सरकार बनले.नेमक्या त्याच्या दुसर्या दिवशी (मे २००२ मध्ये) पासवानांनी गुजरात दंगलींविरूध्द वाजपेयी मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला आणि एन.डी.ए पण सोडली. अर्थातच त्याचे कारण गुजरात दंगली होते की मायावतींबरोबर भाजपने केलेली हातमिळवणी हे होते हा प्रश्न नक्कीच आहे.
तेव्हा मायावतींनी पासवानांना एकदा नाही तर दोनदा झटका दिला तसा झटका मांझी देऊ शकतील असे याक्षणी तरी वाटत नाही. तसेच सामाजिक उतरंडीमध्ये पासवान, मल्ला आणि मायावतींची जातव या जाती साधारण एकाच वर्गात मोडतात. तर मांझींची मूसहार ही जात आणखी खालच्या वर्गात मोडते.तेव्हा पासवानांच्या मतांना मायावतींकडून धोका होता तसा मांझींकडून असायची शक्यता कमी.
9 Oct 2015 - 2:17 am | निनाद मुक्काम प...
दादरी घटनेचा बिहारवर आणि विशेतः भाजपाच्या मतांवर कसा परिणाम होतो ह्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल
ओविसी चा कुठेही उल्लेख नाही हे खटकले
म्हणजे भाजपला त्याचा फायदा होणार को तोटा
9 Oct 2015 - 1:47 pm | गॅरी ट्रुमन
ओवेसीचा उल्लेख तिसर्या भागात करणार आहे.
दादरीच्या घटनेमुळे ओवेसी मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण अधिक प्रमाणात करण्यात यशस्वी होईल. पण ती ध्रुवीकरण झालेली मते जो विजयी व्हायची शक्यता आहे अशा उमेदवारामागे (लालू-नितीश) अधिक प्रमाणावर वळतील. अगदी निवडणुकीच्या तोंडावरच दादरी झाले नसते तर कदाचित ही मते काही प्रमाणात मुलायमसिंग किंवा ओवेसीकडे वळायची शक्यता होती. पण आता ती मते अधिक प्रमाणात लालू-नितीशकडे वळतील आणि भाजपला जड जायची शक्यता आहे.
9 Oct 2015 - 4:58 pm | मोहन
अहो शिवसेनेचा ही विचार करा हो. :-) बिचारे एवढ्या जागा लढवताहेत. त्यांना अगदीच फाट्यावर मारु नका राव.
9 Oct 2015 - 8:12 pm | रमेश आठवले
शिवसेना १५० जागा लढवत आहे. त्यापैकी १२२ जागा ते जिंकतील असा अंदाज आहे. त्या नंतर शिवसेनेचे पूर्ण बहुमताचे सरकार बिहार मध्ये येईल व बाळराजे आदित्य ठाकरे याना पाटना येथे बिहारचे नवे छत्रपति म्हणू राज्याभिषेक करण्यात येईल .
10 Oct 2015 - 8:19 am | होबासराव
:)
11 Oct 2015 - 10:18 am | विवेकपटाईत
लालूजी मुलायम सिंहाला भेटून गेले. त्या नंतर उत्तर प्रदेशात अफवांचे पिक उठले. दादरी प्रकरण घडले. याचा अर्थ मुस्लीम मते १००% लालूजींच्या खिश्यात येणार. (ओवेसी रिकाम्या हाताने परत जातील). बहनजीची हि रिकाम्या हाताने परत जातील. गेल्या निवडनुकीत (JDU २२% RJD २१% कॉग्रेस १०%) तर भाजप २०% आणि LJP १०%. अंतर पहा. शिवाय या वेळी मुस्लीम वोट १००% (१८ टक्के निश्चित वोट)
मला तर भीती वाटते, कुठे दिल्ली सारखे घडले तर. लोकसभेहून जास्ती वोट मिळवून हि भाजप धुळीस मिळाली.
11 Oct 2015 - 9:55 pm | रमेश आठवले
मुझ्झफरपुरच्या २०१३ च्या दंगली नंतर भाजपाला उत्तर प्रदेशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. आता बिहार मध्ये गोमास सेवनाचा मुद्दा निघाला आहे आणि लालूजी व त्यांचे अनुयायी रघुवंश प्रसाद यांनी हिंदूही गोमास खात होते आणि खात आहेत असे म्हटले आहे. त्याचा परिणाम हिंदू मते एक समुहाने भाजपा कडे जाण्यात होणार नाही का ?
मला वाटते कि दिल्लीच्या गरीब व मधम वर्गातील मतदारांनी ( जे कुठेही बहुमतात असतात ) केजरीवाल यांच्या प्रलोभनावर भाळुन त्यांना मते दिली.
अल्पसंख्याक मंडळी ही नेहमीच भाजपाच्या विरुद्ध मत देतात असे सर्व पक्षांनी गृहीत धरलेले असणार.
11 Oct 2015 - 11:44 pm | जयन्त बा शिम्पि
माझा अंदाज मी काही दिवसांनी म्हणजे ८ नोव्हेम्बर २०१५ ला सायंकाळी अचुक सांगीन ! !
13 Oct 2015 - 1:35 pm | बोका-ए-आझम
मतदानात ५७% मतदान झाल्याचं आणि महिला मतदारांचं प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. जर हाच trend पुढील मतदानामध्ये दिसून आला तर त्याला anti-incumbency चा परिणाम समजता येईल का?
13 Oct 2015 - 3:35 pm | गॅरी ट्रुमन
काल बातम्यांमध्ये म्हणत होते की मागच्या वेळी याच मतदारसंघांमध्ये ५०% मतदान झाले होते. यावेळी ५७% मतदान झाले आहे. बहुतांश वेळा जास्त मतदान होणे हे कुठलीतरी लाट असल्याचे लक्षण असते. १९८४ मध्ये काँग्रेसची लाट होती त्यावेळीही मतदान जास्त झाले होते तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही मतदान जास्त झाले होते. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने लाट येण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लाट येण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अधिक मतदान म्हणजे anti-incumbency असे समजले जाते. अर्थातच ५०% विरूध्द ५७% म्हणजे लाट आहे इतक्या जास्त प्रमाणावर मतदान म्हणता येईल का याबाबत मी साशंक आहे. कदाचित तसे असेलही.
14 Oct 2015 - 5:17 am | अन्या दातार
तसंही बायपोलर निवडणूक असल्याने दोन्ही गट आपापले मतदार मतदानासाठी खेचून आणणार. त्याचाही परिणाम असू शकतो.
14 Oct 2015 - 10:41 am | गॅरी ट्रुमन
शक्य आहे. पण मुद्दा हा की दुरंगी लढत यापूर्वीही अनेकदा झाली आहे. अगदी काट्यांची टक्कर असलेल्या दुरंगी लढतीही पूर्वी झालेल्या आहेत.पण प्रत्येक वेळी अशी मतदानाची टक्केवारी वाढतेच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) असे नाही.
19 Oct 2015 - 10:01 pm | श्रीगुरुजी
बिहारमध्ये आतापर्यंत आलेल्या बातम्यांवरून असं दिसतंय की ही निवडणुक भाजप+ आघाडीला थोडीशी जड जात आहे. मोहन भागवतांचे राखीव जागांविषयीचे वक्तव्य, दादरीतील घटना, भाजपमधील अनेक गणंगांची प्रक्षोभक वक्तव्ये, अतोनात वाढत असलेले बाजारभाव, तथाकथित विचारवंतांनी भाजप सरकारविरूद्ध उठविलेला आवाज आणि त्यांना विविध वाहिन्यांवरून मिळणारे फुटेज, भाजप+ आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नसणे इ. मुद्दे त्यांच्या विरोधात जात आहेत. संजद+ आघाडीत लालू, संजद व काँग्रेसची मते एकत्रित होत आहेत व निव्वळ आकडेवारीच्या जोरावर संजद+ आघाडीकडे जास्त मते आहेत.
त्यामुळे संजद+ आघाडीला भाजप+ आघाडीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वाटत आहे. संजद+ आघाडीला बहुमत मिळेल का ते सांगता येत नाही, परंतु त्यांना सर्वाधिक जागा मिळतील असे आतापर्यंत तरी चित्र आहे.
ही निवडणुक व संजद+ आघाडी यामुळे मला उ. प्र. मधील १९९३ च्या निवडणुकीची आठवण होत आहे. उत्तर प्रदेशात १९९० मध्ये निवडणुक होउन तत्कालीन जनता दलाचे मुलायमसिंग मुख्यमंत्री बनले. ते सरकार अल्पमतात गेल्यामुळे १९९१ मध्ये पुन्हा निवडणुक होऊन भाजपला निसटते बहुमत मिळून कल्याणसिंग मुख्यमंत्री झाले. नंतर डिसेंबर १९९२ मध्ये ते सरकार बरखास्त झाल्यावर १ वर्षानंतर डिसेंबर १९९३ मध्ये पुन्हा एकदा निवडणुक झाली. त्यावेळी सपा व बसपाने युती करून निवडणुक लढविली. अत्यंत बेभरवशाच्या असलेल्या व उत्तर प्रदेशात फारशी मते नसलेल्या काशीरामबरोबर मुलायमसिंगांनी हातमिळवणी केल्याबद्दल अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. निकाल लागल्यानंतर एकूण ४२५ जागांपैकी भाजपला सर्वाधिक १७७, सपा १०९ + बसपा ६६ अशा दोघांना एकत्रित १७६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ३० च्या आसपास जागा होत्या. कॉंग्रेस, अपक्ष व इतर सर्व छोट्या पक्षांनी सपाला पाठिंबा दिल्याने मुलायमसिंग पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
परंतु त्यांनी एक घोडचूक केली होती. फारसा जनाधार नसलेल्या बसपाला बरोबर घेऊन, बसपाचा जनाधार वाढवून त्यांनी आपल्यासाठी एक कायमस्वरूपी नवीन प्रतिस्पर्धी निर्माण केला. कालांतराने बसपाने पाठिंबा घेतल्याने ते सरकार कोसळले परंतु तोपर्यंत बसपाने आपले बस्तान चांगले बसविले होते.
बिहारच्या या निवडणुकीत असेच होत आहे. जनाधार खूप कमी झालेल्या राजदला संजदने बरोबर घेऊन जुगार खेळला आहे. त्यांना बहुमत मिळाले तरी लालूसारखा अत्यंत पाताळयंत्री माणूस नितीशकुमारांना स्वस्थ बसून देणार नाही. कालांतराने पाठिंबा काढून घेतला जाईल. बहुमत नाही मिळाले तरी राजदने आपले बस्तान पुन्हा एकदा बसविले असणार आणि पुढील निवडणुकीत संजदला एक प्रबळ प्रतिस्पर्धी निर्माण होणार.
21 Oct 2015 - 10:51 am | गॅरी ट्रुमन
सहमत आहे. पप्पू यादव, मुलायमसिंग यादव यांना महाआघाडीपासून फोडणे, जीतनराम मांझींच्या पक्षाला बरोबर घेणे आणि त्याद्वारे महादलित मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करणे, युतीतील जागावाटपाचा कटकटा मुद्दा सोडविणे इथपर्यंत गोष्टी भाजप आघाडीसाठी सुरळीत चालल्या होत्या. पण त्यानंतर नेहमीप्रमाणे अतीउत्साही वाचाळवीरांनी घाण घातली आहे.
सर्वात डोकेदुखी करणारे वक्तव्य म्हणजे 'आरक्षण धोरणाचा फेरविचार करावा' हे मोहन भागवतांचे वक्तव्य. त्यातून भाजप दलितविरोधी आहे असा संदेश नक्कीच गेला. आणि ध्यानीमनी नसताना संघाकडून आलेल्या या आयत्या मुद्द्याचे भांडवल नितीश कुमारांनी केले नसते तरच नवल. बीफच्या मुद्द्यावरून कारण नसताना भाजपने रान केलेच.पण त्या मुद्द्यामुळे भाजपला जी मते अन्यथा मिळाली असती ती दुरावायची शक्यता फार नव्हती. पण आरक्षण हा मुद्दा मात्र काही मतदारांना नक्कीच जिव्हाळ्याचा आहे. लालूंचा विजय झाला तर जंगलराज येईल पण त्या जंगलराजचा वैयक्तिक मतदारांवर डायरेक्ट फरक पडणार नाही (म्हणजे गुंडगिरी वाढली आणि अपराध अगदी चौपट जरी झाले तरी कोणताही माणूस त्यात अडकायची शक्यता म्हणजे अपराधांची संख्या भागिले बिहारची लोकसंख्या इतकी कमी असेल. तसेच लालूंनी गुंडगिरी करून ज्या कंपन्यांमुळे नोकर्या अन्यथा बिहारमध्ये आल्या असत्या त्या येणार नाहीत पण जी गोष्ट आली असती ती न आल्यामुळे होणारे नुकसान जाणवणारे नसते-- निदान सामान्य मतदारांना) . पण भाजप आरक्षण काढणार हा संदेश मतदारांमध्ये गेला असेल तर त्याचा परिणाम दलित-महादलित समाजातील अगदी प्रत्येकावर होईल. मोहन भागवतांच्या या अत्यंत बेजबाबदार (आणि खरं म्हणायचं तर गुडघ्यात मेंदू ठेऊन केलेल्या) वक्तव्यामुळे अनेक मते अन्यथा भाजपला मिळाली असती ती लालू-नितीशकडे जातील याची बेगमी करून ठेवलेली आहे. म्हणजे मोदी-शहांनी मोठ्या कष्टाने एक मजबूत आघाडी बिहारमध्ये बनवली होती त्यावर पाणी फेरायचे काम या भागवतांनी केले आहे.
त्यावर नेहमीप्रमाणे मिडियाने मला मिसकोट केले असे म्हणायला संघवाले मोकळे आहेतच. पण आतापर्यंत शेकडो नाही तर हजारोवेळा मिडियाने यांच्या वक्तव्याची चिरफाड करून वेगळीच बातमी दिलेली आहे हे माहित असताना एकतर निवडणुका समोर असताना मिडियाबरोबर बोलायला जायचे नाही अन्यथा बोलताना कमालीची सावधानता बाळगायची.
दुसरे म्हणजे मोदी विकासाचा मुद्दा मांडत असताना भाजपमधील वाचाळवीर मात्र बीफच्या मुद्द्यावर रान उठवत आहेत. जणू काही बीफ हा एकच मुद्दा सोडवायचा राहिला आहे. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये तसा उल्लेख असेल तर गोहत्याबंदी व्हावी असे मलाही वाटते पण तो मुद्दा इतर मुद्द्यांना बाजूला ठेऊन सर्वात पुढे आणायची काहीच गरज नव्हती. ते खट्टर म्हणाले की मुस्लिमांना भारतात राहायचे असेल तर बीफ सोडायला हवे आणि संघाचे पांचजन्य म्हणजे की वेदांमध्ये बीफ खाणार्याला ठार मारा असे म्हटले आहे. म्हणजे मध्यपूर्वेत जन्मलेल्या एका धर्माच्या पुस्तकातही त्यांच्या प्रेषिताला न मानणार्याला ठार मारा असे म्हटले आहे असा दावा करून रान उठविणारे लोक परत तशाच स्वरूपाचे वक्तव्य करून ठार मारायचे समर्थन कसे करतात? याविषयी रान उठल्यावर मात्र संघाच्या मा.गो.वैद्यांनी पांचजन्य हे संघाचे मुखपत्र नाहीच असे अंमळ वेडसर वक्तव्य केले. त्यावर शेंबड्या पोराचाही विश्वास बसणे कठिण आहे.
एकूणच उजव्या गटाच्या लोकांना सत्तेत कसे राहायचे हे अजिबात समजत नाही हे या निमित्ताने मात्र अधोरेखित होत आहे. काँग्रेसवाले इतकी वर्षे सत्तेत होते पण फालतूची बडबड करून विरोधकांच्या हातात आयते कोलित काँग्रेसवाल्यांनी दिले असे फारवेळा झालेले नाही. या संघवाल्यांना गप्प बसायला काय होते समजत नाही. एकूणच तत्वनिष्ठेचा अतीआग्रह धरणारे आणि आपण सोडून इतर सगळे हलकट असा होलिअर दॅन दाऊ दृष्टीकोन असणारे लोक घसरगुंडीवरून खाली खालीच घसरत जातात. मग ते संघवाले असोत की केजरीवाल असोत.
एकीकडे नितीश विकासाचा मुद्दा उठवत असताना त्याचवेळी लालूंबरोबर केलेली युती हे त्या मुद्द्यावरचे जोखड आहे नेमके तसेच जोखड ही रा.स्व.संघाची मंडळी मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर आणत आहेत. डाळींचे वाढलेले भाव पण भाजपच्या कामगिरीवर परिणाम करणार आहेत. क्रिकेट सामन्याचे उदाहरण द्यायचे झाले तर ५० पैकी ४५ षटके सामन्यावर पकड असावी पण शेवटच्या ५ षटकांमध्ये आत्मघाती चुका कराव्यात आणि त्यामुळे सामना गमावायची वेळ यावी असे भाजपचे काहीसे झाले आहे असे चित्र आहे.
असो. बिहार निवडणुकांवर तिसरा लेख एक्स-फॅक्टर म्हणून लिहिणार होतो. पण बरेचसे मुद्दे या आणि आधीच्या लेखावरील प्रतिसादात आल्यामुळे तो तिसरा लेख लिहावा की नाही हा विचार करत आहे. मतमोजणीच्या २-३ दिवस आधी दिल्ली निवडणुकांप्रमाणेच मतमोजणीपूर्व धागा काढेन आणि त्यात निकाल कोणत्याही बाजूने लागल्यास त्याचे राष्ट्रीय राजकारणावर नक्की काय परिणाम होतील याविषयी भाष्य करेन.
22 Oct 2015 - 1:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
भाजप मधिल/मागिल व्यक्ती/संघटनांची वक्तव्ये/कृती पाहता माझा असा अंदाज आहे की या मागे मूर्खपणापेक्षा आणि बेजबाबदारपणापेक्षा जास्त अंतर्गत सत्तासंघर्ष आहे. वेळ साधून केलेल्या या कृती म्हणजे "आम्हाला महत्व दिले नाही तर आम्ही ऐनवेळी अवसानघात करून तुमच्या पायात खीळ घालू शकतो" हे दाखवून देण्याचे हे प्रयत्न आहेत. इंग्लिशमध्ये याला एक चपखल वाकप्रचार आहे, "Making presence felt by nuisance."
माझ्या मते अश्या तत्वांना ताब्यात ठेवणे आणि वेळ साधून नामोहरम करणे हेच मोदींपुढचे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण, राजकिय विरोधक हे स्पष्टपणे दिसणारे आव्हान आहे; परंतु अंतःपुरापर्यंत वावर असलेले अंतर्गत हितशत्रू मित्रत्वाचा दावा करता करता कधी आणि कसा घात करतील याचा नेम नाही ! शिवाय, अंतर्गत हितशत्रूंच्या कारवायांनी विरोधकांना अधिक ताकद मिळते ते वेगळेच.
सद्याचे मोदींंचे विरोधक असो वा अंतर्गत हितशत्रू, दोघांमध्ये एक विलक्षण साम्य आहे... या दोघांनाही मोदींवर कडी करून आपले महत्व प्रस्थापित करायचे आहे. तसे करताना समाज आणि देशाचे नुकसान झाले तरी त्यांना काही सोयरसुतक नाही. ही शेवटची वस्तुस्थिती मात्र दु:खदायक आणि देशासाठी धोकादायक आहे.
22 Oct 2015 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
या तथाकथित "प्रो-बीजेपी" लोकांच्या कारवायांबद्दल वरचे माझे मत थोडक्यात असेही सांगता येईल, "I clearly see a method in this madness !"
22 Oct 2015 - 2:17 pm | प्रदीप
.
23 Oct 2015 - 12:31 pm | गॅरी ट्रुमन
शक्य आहे. पण एक गोष्ट समजत नाही. संगीत सोम, साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती यासारखी मंडळी नरेंद्र मोदींशी सत्तासंघर्ष करायच्या परिस्थितीत नक्कीच नाहीत. म्हणजे मोदींची लोकप्रियता आणि अशा गणंगांची लोकप्रियता यात अगदी जमिन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा सत्तासंघर्षापेक्षाही "Making presence felt by nuisance." हे मला अधिक पटते.
याला अगदी +१०००००
24 Oct 2015 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
संगीत सोम, साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती यासारखी मंडळी नरेंद्र मोदींशी सत्तासंघर्ष करायच्या परिस्थितीत नक्कीच नाहीत.
बुद्धीबळात आणि राजकारणात दर वेळेस भारी मोहरे भरीला घातली जातील असे नाही... प्याद्यांकरवी केलेल्या चाली कमी खर्चात/धोक्यात जास्त फायदे/संदेश देऊन जातात.
24 Oct 2015 - 11:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
विषेशतः स्वतःचे महत्व दाखवून देणे / वाढवणे हा उद्देश्य असेल व टक्कर देणे (कन्फ्राँटेशन) हा उद्द्येश नसेल, तेव्हा !
21 Oct 2015 - 1:39 pm | गॅरी ट्रुमन
बसपाला १९९३ पूर्वी उत्तर प्रदेशात फार जनाधार नव्हता असे म्हणता येईल असे वाटत नाही. मायावतींनी १९८४ ते १९९३ या काळात उत्तर प्रदेशातील जवळपास प्रत्येक गाव पिंजून काढले होते आणि तिथल्या दलित मतदारांमध्ये बसपाने बस्तान वाढविले होते. १९८५ मध्ये बिजनोरमध्ये पोटनिवडणुकीत मायावतींनी रामविलास पासवानांना धक्का दिला होता हे अन्य एका प्रतिसादात लिहिलेच आहे. १९८७ मध्ये बसपाने बिजनोरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही बर्यापैकी जागा मिळवल्या होत्या. १९८७ मध्येच मायावती हरिद्वारमध्ये पोटनिवडणुकीत दुसर्या क्रमांकावर आल्या आणि पासवानांना त्यांनी चौथ्या क्रमांकावर ढकलले हे पण त्याच प्रतिसादात लिहिले आहे.
१९८८ मध्ये कांशीरामांनी अलाहाबादमध्ये पोटनिवडणुक लढवली होती. ही पोटनिवडणुक अत्यंत हाय व्होल्टेज पोटनिवडणुक होती. बोफोर्स प्रकरणी आपले नाव गोवले गेल्यानंतर खासदार अमिताभ बच्चन यांनी राजीनामा दिला आणि मग ही पोटनिवडणुक झाली. त्यात काँग्रेसचे उमेदवार होते सुनील शास्त्री (लालबहादूर शास्त्रींचे चिरंजीव) आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार होते वि.प्र.सिंग. आणि तिसरे उमेदवार होते कांशीराम. या पोटनिवडणुकीत वि.प्र.सिंगांना २ लाख १० हजार, शास्त्रींना ९२ हजार तर कांशीरामांना ७० हजार मते मिळाली. इतक्या महत्वाच्या पोटनिवडणुकीमध्ये इतकी मते घेऊन त्यांनी आपले आणि बसपाचे अस्तित्व दाखवून दिले. बिजनोर आणि हरिद्वार या उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागातील जागा आहेत तर अलाहाबाद हे राज्याच्या पूर्व भागातील आहे. म्हणजे बसपाचे हातपाय हळूहळू राज्यभर पसरत होते. १९८९ आणि १९९१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसपाने सुमारे ९.५% मते आणि १९८९ मध्ये १३ तर १९९१ मध्ये १२ जागा जिंकल्या होत्या. १९९१ मध्ये मुलायमसिंगांच्या समाजवादी जनता दलाला १२.५% मते आणि ३४ जागा होत्या तर बसपाला ९.५% मते आणि १२ जागा होत्या.
या पार्श्वभूमीवर बसपा आपला जनाधार वाढवत होता हे दिसतेच. अर्थातच १९९३ मध्ये मुलायमसिंगांशी युती करून सत्तेत गेल्याने बसपाला हातपाय पसरायला आणखी वाव मिळाला ही गोष्ट नक्कीच खरी आहे.पण त्यापूर्वीही बसपाला जनाधार नव्हता असे म्हणता येणार नाही.
21 Oct 2015 - 2:36 pm | श्रीगुरुजी
मुख्य मुद्दा हा आहे की उत्तर प्रदेशात भाजप, बसप आणि सपा हे तिघेही कॉंग्रेस विरोधात होते कारण काँग्रेस काही किरकोळ अपवाद वगळता १९४७ पासून १९९० पर्यंत बहुतेक वेळ सत्तेवर होती. १९९० मध्ये सपा (त्यावेळचे जनता दल) फक्त सव्वा वर्षे सत्तेत होते आणि नंतर १९९१-९३ या काळातील दीड वर्षात भाजप सत्तेत होता. परंतु १९९० पासून १९९३ पर्यंत कॉंग्रेस बरीच क्षीण व्हायला सुरूवात झाली होती. त्यामुळे सपाचा मुख्य विरोधक भाजप झाला होता. अशा वेळी बसपाच्या स्वरूपात भाजपला अजून एक विरोधक निर्माण करणे म्हणजे पर्यायाने स्वतःलाच एक पर्याय निर्माण करून ठेवणे ही सपाची चूक होती.
महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ या. शिवसेना भाजपवर खार खाऊन आहे. समजा भाजपच्या विरोधात सेनेने मनसेशी युती करून मनसेला बर्याच जागा देऊन निवडणुक लढविली तर ते मनसेसाठी फायद्याचे होईल आणि शिवसेनेसाठी तोट्याचे ठरेल. कारण मनसे हा जवळपास मृतवत झालेला पक्ष आहे. अशा वेळी अशा कोमात गेलेल्या पक्षाला आपल्या बरोबर घेऊन नवसंजीवनी दिली तर भविष्यात भाजपविरोधात सेनेऐवजी मनसे हा पर्याय उभा राहू शकतो.
राजकारणात आपण सत्तेवर आल्यावर विरोधकांना नेस्तनाबूत करून आपल्याला पर्याय निर्माण होऊन द्यायचा नसतो. तसेच विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाविरूद्ध आपण सोडून अजून एक वेगळा नवीन पर्याय निर्माण होऊन द्यायचा नसतो.
जी चूक सपाने १९९३ मध्ये केली, तीच चूक नरसिंहरावांनी १९९६ मध्ये केली आणि तीच चूक नितीशकुमारांनी बिहारमध्ये केली आहे.
21 Oct 2015 - 2:11 pm | पैसा
गॅरी भाऊंचे लिखाण आणि प्रतिक्रिया नेहमीच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय असतात. हा लेखही आवडला.
बघूया बिहारमधे कोण दिवाळी साजरी करतात ते!
22 Oct 2015 - 11:18 am | नया है वह
गॅरी भाऊंचे लिखाण आणि प्रतिक्रिया नेहमीच अभ्यासपूर्ण आणि वाचनीय असतात
22 Oct 2015 - 11:22 am | प्यारे१
जसजसे मतदानाचे टप्पे पार होताहेत, नितीशकुमार यांचं जिंकणं निश्चित होत आहे.
नितीश आणि त्यामुळं लालू देखील जिंकतील.
23 Oct 2015 - 12:42 pm | गॅरी ट्रुमन
फरिदाबादमधील दुर्दैवी घटनेनंतर मंत्री व्ही.के.सिंग यांचे वादग्रस्त वक्तव्य आले आहे. मला वाटते भाजपवाल्यांनी एकामागोमाग एक सेल्फ गोल करायचा सपाटा लावलेला आहे असे दिसते.
खरे तर या वक्तव्यात इतके वादंग उठावे असे मला स्वतःला वाटत नाही. मी पण "झाडावरून पान जरी पडले तरी आआपला त्यात मोदींचा हात दिसतो" असे कुठल्यातरी प्रतिसादात म्हटले होते. म्हणजे फरिदाबादमध्ये बळी पडलेल्या त्या मुलांची तुलना झाडाच्या पानाशी मी केली असा अर्थ होत नाही. पण मिडियावाल्यांना कुठलातरी मुद्दा हवाच असतो. आणि ते अशा मुद्द्यांवरून राईचा पर्वत करतात. व्हि.के.सिंगांनी नेमक्या याच प्रवृत्तीबद्दल मिडियावाल्यांना "प्रेस्टिट्यूट" म्हटले होते. मग परत त्याच प्रेस्टिट्यूटकडून आपले कुठलेही वाक्य असे विपर्यास करून प्रसिध्द केले जाणार हे माहित असूनही परत त्यांच्याशीच बोलायला जायचे प्रयोजन समजले नाही. आता लालू-नितीश "भाजपवाले बघा तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांची तुलना कुत्र्याशी करतात" असे रान उठवायला मोकळे झाले आहेत. आणि तसे रान त्यांनी उठवले नाही तरच नवल. आधीच मोहन भागवतांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजपला हा नवा घरचा अहेर नक्कीच महागात पडायची शक्यता आहे.
एकूणच फालतूची बडबड करून हातातोंडाशी आलेला घास भाजपवाले गमावणार आहेत असे दिसायला लागले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी एक गिरीराज सिंग सोडले तर इतर कोणीही फालतूची बडबड केलेली नव्हती. अगदी संघवालेही तोंडाला चिकटपट्टी लावून बसले होते. ती शिस्त यावेळी कुठे गेली आहे कुणास ठाऊक? यातून होणार असे आहे की बिहारला परत एकदा त्या जंगलराजच्या काळ्या दिवसांना सामोरे जावे लागायची शक्यता आहे आणि देशाच्या राजकारणात लालू-मुलायम-केजरीवाल अशा गणंगांचे प्रस्थ वाढायची शक्यता असून त्याचे देशाच्या आर्थिक आणि सर्वच धोरणांवर मूलगामी परिणाम होणार आहेत.
23 Oct 2015 - 12:50 pm | श्रीगुरुजी
+१
भाजप/संघ नेते वादग्रस्त वक्तव्ये थांबवायला तयार नाहीत. मोहन भागवतांनी सुद्द्धा काल बोलताना सांगितले "की किरकोळ घटनांमुळे देशावर परीणाम होणार नाही". लगेच माध्यमांनी असा अर्थ काढला की ते दादरी घटना किरकोळ आहे असे म्हणाले.
मला हे कळत नाही की आपल्या वक्तव्याचे अनेक अर्थ निघू शकतात आणि विशेषत: निवडणुकीच्या काळात अशा वक्तव्यांचा सोयिस्कर अर्थ काढून आपल्या विरोधकांच्या हातात कोलीत मिळू शकेल हे यांच्या लक्षात का येत नाही.
अशा वक्तव्यांमुळेच या निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.
23 Oct 2015 - 1:07 pm | बोका-ए-आझम
अशा वक्तव्यांनी भाजपला किती फटका बसू शकतो? ज्यांना भाजपला मतं द्यायचीच नाहीत ते भाजप नेत्यांनी अगदी ब्र जरी नाही काढला, तरी भाजपला मतं देणार नाहीच आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना द्यायची आहेत ते देतीलच. नितीशकुमारांनी भाजप जातीयवादी आणि उच्चवर्णीयांना धार्जिणा पक्ष आहे असा प्रचार दादरी घटनेच्या आधीपासून केलेला आहे आणि त्यांना गेली १७ वर्षे भाजप कसा चालत होता हा प्रश्न लोकांना नक्कीच पडेल हा मुद्दाही या किंवा इतर धाग्यांवर येऊन गेलेला आहे. ही अशी बेजबाबदार वक्तव्यं करणं हे नक्कीच चुकीचं आहे पण त्याच्यामुळे असा काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. श्रीगुरुजी आणि गॅरीभाऊ - तुम्हाला का असं वाटतंय?
23 Oct 2015 - 1:40 pm | गॅरी ट्रुमन
मुद्दा महादलित मतांचा आहे. ही मते हक्काची नितीश कुमारांची होती. पण एकतर नितीश कुमारांनी लालूंबरोबर हातमिळवणी केल्यामुळे आणि जीतनराम मांझींच्या पक्षाला आपल्याबरोबर घेतल्यामुळे ही मते आपल्याकडे वळवता येणे सोपे गेले असते. लालू सत्तेत असताना सुरवातीला 'मै आपको स्वर दुंगा' ला भूलून या महादलित समाजातील लोकांनी मते लालूंना दिली होती. पण नंतरच्या काळात या त्यांना ब्राह्मण आणि इतर उच्चवर्णीयांपेक्षा ओबीसी समाजातील (विशेषतः यादव) लोकांचा त्रास जास्त होता हे त्यांच्या लक्षात आले.म्हणून ही मते एकगठ्ठा नितीश कुमारांना गेली.
आता त्या समाजातील लोकांची तुलना कुत्र्याबरोबर केली जात आहे, भाजपवाले आरक्षणच काढणार असे चित्र उभे राहिले तर त्याचा त्रास महादलित समाजातील अगदी प्रत्येकाला होणार आहे. लालूंच्या जंगलराजमध्ये त्यांना त्रास जरूर होईल पण कोणतीही एक व्यक्ती त्याला बळी पडायची शक्यता किती?तर ती फारच कमी. पण भाजपवाले आरक्षण काढणार असे चित्र उभे राहिल्याचा त्रास अगदी सगळ्यांनाच होणार. म्हणून शेवटी ही मते परत लालू-नितीश आघाडीकडे वळायची शक्यता आहे.
दुसरे म्हणजे अनेक मतदार असे आहेत की त्यांनी भाजपची इतर मते मान्य नसूनही २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यामुळे भाजपला मते दिली होती. अशी बेताल वक्तव्ये केल्यामुळे भाजपचा कोअर अजेंडा विकास नसून धार्मिक आहे असे चित्र अशा मतदारांपुढे उभे राहायची शक्यता आहे. लालू किती वाईट आहेत हा विचार हे मतदार करतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीसांनी १५ दिवस राष्ट्रवादीची मदत घेतली हे न आवडल्यामुळे पुढच्या वेळी आपले मत काँग्रेसला असे मिसळपाववरच काही जणांनी म्हटले होते. म्हणजे ज्या राष्ट्रवादीची साथ १५ दिवस नकोशी होते त्याच भ्रष्ट, गुंड राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस पक्ष १५ वर्षे सत्तेत होता हे लक्षात घ्यायला हे लोक तयार नव्हते!! ही मानसिकता जर शिकल्यासवरलेल्या मतदारांची असेल तर सामान्य मतदाराकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करता येणे कठिण आहे. शेवटी मतदारांची मेमरी फारच कमी कालावधीची असते.
23 Oct 2015 - 1:46 pm | नया है वह
23 Oct 2015 - 2:34 pm | दुश्यन्त
यात लोकांची काही चूक नाही. कॉंग्रेसने राष्ट्रवादीची मदत उघडपणे घेतली होती. त्यांनी निवडणुका एकत्र लढवल्या होत्या मुळात ते एकच आहेत हे लोक जाणतात . भाजपवाले मात्र त्यांच्यावर टीका करून, त्यांना तुरुंगात टाकू वगैरे घोषणा देत मते मिळवतात आणि वेळ येताच त्यांची मदत घेतात हा मतदारांना विश्वासघात वाटणार यात नवल काय? एनसीपी म्हणजे न्याचुरली करप्ट पार्टी, बारामतीकर अजूनही पवारांची वेठबिगारी करतात असे म्हणणारे प्रधानसेवक बारामतीत व्यालेण्टाइन डे साजरा करतात, जेटली म्हणतात कि अश्या १०० बारामती निर्माण झाल्या पाहिजेत हे लोकांना गृहीत धरणे भाजपला महागात पडणार आहे. आणि भाजपने काहीही कोलांट्या मारायच्या, पवार / मुलायम यांची संगत करायची ते चालते. जनतेने त्यांना धडा शिकवला कि देशाचे नुकसान होणार वगैरे गळे काढायचे ही थीम जुनी झाली. लोक याला भुलणार नाहीत. देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार येवून काय दिवे लावले आहेत ते लोकांनी १- १.५ वर्षे पाहिलेच आहे.
23 Oct 2015 - 5:40 pm | अभिजित - १
फडणवीस चांगले / बरे काम करत आहेत. त्यांच्या परिघात. कारण वरून मोदी / शहा आणि खालून शिवसेना .. करणार काय ?
23 Oct 2015 - 9:15 pm | श्रीगुरुजी
राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने पाठिंबा स्वीकारला नव्हता किंवा नाकारलाही नव्हता. या विषयाबद्दल दुसर्या एका धाग्यावर सविस्तर लिहिले होते.
गेल्या काही महिन्यात खालील घटना घडल्या.
- छगन भुजबळांच्या अनेक मालमत्तांवर छापे घालून तब्बल २६०० कोटी रू. ची मालमत्ता उघडकीला आली. अॅण्टी करप्शन ब्यूरोने त्यांची अनेक तास चौकशी केली. त्यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा आणि अजून एका प्रकरणात दोन वेगवेगळे एफआयआर दाखल झाले आहेत.
- राष्ट्रवादीचा आमदार रमेश कदम याने केलेला अण्णाभाऊ साठे महामंडळातील ७८ कोटींचा घोटाळा उघडकीला येऊन त्याला अटक झालेली आहे.
- पुणे महानगरपालिकेतील शिक्षण मंडळातील राष्ट्रवादीचे दोन सदस्य रवि चौधरी आणि धुमाळ यांच्यावर लाच व भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाल्याने त्यांना सदस्वत्व सोडावे लागले.
- कोल्हापूरची राष्ट्रवादीची महापौर तृप्ती माळवी लाच घेताना सापडल्यावर तिच्या गुन्हा दाखल होऊन अटक झाली व तिला महापौरपदावरून काढले गेले.
- अजित पवार व तटकरे यांना अॅण्टी करप्शन ब्यूरो समोर उपस्थित राहून चौकशीस सामोरे जावे लागत आहे.
- राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह राष्ट्रवादी व इतर अनेक पक्षांच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या घटना पुरेश्या बोलक्या आहेत.
देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार येवून काय दिवे लावले आहेत ते लोकांनी १- १.५ वर्षे पाहिलेच आहे.
23 Oct 2015 - 9:17 pm | श्रीगुरुजी
वरील प्रतिसाद जरा गंडला आहे. त्यातील काही भाग खालीलप्रमाणे हवा.
पवार, मुलायम यांची भाजपने संगत केली म्हणजे नक्की काय केले? युती केली? त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला संरक्षण दिले?
राष्ट्रीय स्तरावर अनेक नेते विरोधी पक्षांबरोबर अनेकवेळा एका व्यासपीठावर असतात. त्यातून लगेच त्यांनी संगत केली असा अर्थ कसा निघतो? २-३ दिवसांपुर्वी सोनिया व अमित शहा एकाच व्यासपीठावर होते. २ महिन्यांपूर्वी मोदी आणि नितीशकुमार बिहारमध्ये एकाच व्यासपीठावर होते. म्हणजे लगेच यांनी एकमेकांची संगत केली असा अर्थ होतो का?
नक्की काय दिवे लावले ते सांगता का जरा.
23 Oct 2015 - 11:57 pm | दुश्यन्त
<राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने पाठिंबा स्वीकारला नव्हता किंवा नाकारलाही नव्हता. >
यांनी सांगाव आणि लोकांनी विश्वास ठेवावा. डोळे मिटून दुध प्या आणि वर अस अंग झटकण भाजपेयीच करु शकतात. भाजप एनसीपीचे सेटिंग लपून राहिले नाही. प्रधानसेवक बारामतीत येवून मी पवारांचा सल्ला /मार्गदर्शन घेत असतो वगैरे म्हणतात आणि लगेच भक्त लोक यात राजकारण पाहू नका म्हणतात. दिल्लीत मुलायम आणि पवार अधूनमधून सरकारला अनुकूल भूमिका घेतात, पवार बाहेरून महाराष्ट्र सरकारला आतून पाठींबा देवू करतात, मुलायम महा आघाडीतून बाहेर पडून भाजपची अडचण थोडी कमी करू पाहतात या सगळ्याला संगत /मिलीभगत नाही म्हणायची तर काय म्हणायचे?
< देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार येवून काय दिवे लावले आहेत ते लोकांनी १- १.५ वर्षे पाहिलेच आहे.>
नीट वाचा गुरुजी. मी विचारतोय काय दिवे लावले आहेत तर तुम्हीच मला परत प्रश्न विचारा. अलंकारिक प्रश्न आहे याचा अर्थ अजून तरी काही ओठे काम केले नाही नुसती भाषणबाजी झाली आहे.
24 Oct 2015 - 1:21 pm | श्रीगुरुजी
मुलायम मंडळींना बिहारमध्ये नगण्य स्थान आहे. त्यामुळे नितीशकुमार गटाने त्यांना २४३ पैकी फक्त ३ जागा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांचा तिळपापड होऊन ते महाआघाडीतून बाहेर पडले. त्यांच्या बाहेर पडण्याशी भाजपशी संबंध जोडणे हे वैचारिक काविळीचे लक्षण आहे. मुलायम आघाडीत असले किंवा नसले तरी महाआघाडी किंवा भाजप यांना शष्प फरक पडत नव्हता.
पवारांनी महाराष्ट्रात भाजपने न मागता एकतर्फी जाहीर केलेल्या आणि भाजपने न स्वीकारलेल्या पाठिंब्याविषयी पूर्वीच लिहून झाले आहे. त्याची पुनरावृत्ती करीत नाही. परंतु वैचारि़क काविळीमुळे हा विषय पुन्हा पुन्हा काढला जात आहे.
दिल्लीत मुलायम किंवा पवार यांनी अजिबात सरकारला अनुकूल भूमिका घेतलेली नाही. भूमी अधिग्रहण कायदा, जीएसटी इ. महत्त्वाच्या विषयात त्यांनी सातत्याने सरकारविरोधात भूमिका घेतलेली आहे.
मोदी पवार तर सोडाच, पक्षातील जेष्ठांचेही मार्गदर्शन घेत असतील असे दिसत नाही.
महाराष्ट्रात सातत्याने एनसीपीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. हे त्यांच्यातील सेटिंग आहे असे म्हणणे वैचारिक काविळीचे लक्षण आहे.
24 Oct 2015 - 1:47 pm | दुश्यन्त
तुम्हाला अंधपणामुळे बाकीच्यांना काहीपण दुषणे देवू वाटतात हा तुमचा प्रोब्लेम आहे. मोदी स्वतः बारामतीत येवून तसे बोलले आहेत तेव्हा तुम्हाला ऐकू आले नाही .कदाचित कानाचा पण प्रोब्लेम असावा . परवा जेटली पण बारामतीकराचे गुणगान गावून गेले आहेत फक्त अंध भक्तांना यात राजकारण / मिलीभगत नाही असे वाटते पब्लिकला सगळे कळत असते.शरद पवार न मागता पाठींबा देतात यावर विश्वास ठेवणारा तुमच्यासारखा विरळाच असू शकतो.
24 Oct 2015 - 2:40 pm | श्रीगुरुजी
मोदी तसे म्हणाले म्हणून काय फरक पडला? जेटली तसे म्हणाले तर काय फरक पडला? एखाद्याच्या निमंत्रणावरून त्याच्या घरी गेल्यावर त्या माणसाबद्दल वाईट न बोलता चार शब्द बरे बोलायचे असतात हा सर्वमान्य शिष्टाचार आहे. तसे मोदी बिहारमध्ये नितीशकुमारांबरोबर एका व्यासपीठावर होते. म्हणजे त्यांचे साटेलोटे झाले काय?
मोदींच्या बारामती भेटीनंतर पवारांना किंवा भाजपला नक्की काय फायदा झाला?
पवारांना मंत्रीपद मिळाले?
गेलाबाजार एखाद्या राज्याचे राज्यपालपद तरी मिळाले?
त्यांचा पक्षाला केंद्रात/राज्यात सत्तेत वाटा मिळाला?
पवार केंद्रात व राज्यात सरकारला पाठिंबा देत आहेत?
भाजप केंद्रात व राज्यात त्यांचा पाठिंबा घेत आहेत?
मह्त्त्वाच्या विधेयकांना, निर्णयांना पवारांच्या पक्षाचा पाठिंबा मिळाला?
पवारांनी व त्यांच्या पक्षाने भाजपवरील टीका थांबविली?
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण मिळाले?
मोदी किंवा जेटलींनी बारामतीला भेट देऊन पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला नक्की मिळाले काय? किंवा भाजपने त्यांना नक्की दिले काय?
बारामतीत पवारांच्या विद्या प्रतिष्ठानने बळकावलेली ७० एकर जमीन नुकतीच मुक्त झाली. लव्हासाने बळकावलेली आदिवासींची १९० एकर जमीन मुक्त करण्याचा आदेश आला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भ्रष्टाचाराबद्दल चौकशीला सामोरे जावे लागत असून काही जणांवर एफआयआर दाखल झाला आहे तर काही जण अटकेत आहेत.
पवार व मोदी यांचे साटेलोटे आहे हे फक्त वैचारिक कावीळ झालेल्यांनाच वाटते. त्यांच्यात जर काही मिलीभगत असेल तर त्याची उदाहरणे देता का जरा.
मिलीभगत/साटेलोटे कसे असते याचे एक उदाहरण देतो.
दिल्ली विधानसभेच्या डिसेंबर २०१२ मधील निवडणुकीत प्रचार करताना केजरीवाल जाहीर सभेत शीला दिक्षितांनी राष्ट्रकुल स्पर्धेत केलेल्या भ्रष्टाचाराची यादी वाचून दाखवायचे. आपल्याकडे त्या भ्रष्टाचाराचे ३७० पानी पुरावे आहेत असेही त्यांनी सांगितले होते. निवडणुकीनंतर भ्रष्ट काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद मिळविल्यावर लगेच त्यांची भाषा बदलली. "पुरावे द्या, म्हणजे लगेच शीला दिक्षितांवर कारवाई करतो" अस ते सांगायला लागले. पण तुमच्याकडे तर ३७० पानी पुरावे आहेत असे एका पत्रकाराने विचारल्यावर, ते पुरावे नसून वृत्तपत्रातील कात्रणे कापून त्याची ३७० पानांची फाईल मी केली आहे अशी टोपी त्यांनी फिरविली.
नंतर फेब्रु २०१५ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन आता ८ महिने होऊन गेले. अजून कारवाईचा पत्ता नाही. ऑगस्टमध्ये त्यांचेच कायदा मंत्री असलेल्या कपिल शर्मांनी शीला दिक्षितांच्या काळातील वॉटर टॅकर घोटाळ्याचे कागदपत्र अभ्यासून त्यातील भ्रष्टाचारात शीला दिक्षितांचा हात स्पष्टपणे दिसत आहे असे पत्र लिहून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई सुरू करण्याची मागणी केली. ही मागणी केल्यावर ३ दिवसात केजरीवालांनी त्यांना कायदामंत्री पदावरून हटविले. या प्रकरणातील कारवाईचा सुद्धा अजून पत्ता नाही.
काँग्रेस व आआप आणि केजरीवाल व शीला दिक्षित यांच्यात जे आहे त्याला साटेलोटे म्हणतात.
23 Oct 2015 - 2:00 pm | गॅरी ट्रुमन
आणखी एक मुद्दा म्हणजे मुस्लिम मतदारांविषयीचा.
बीफवर विनाकारण रान उठविल्यामुळे आणि मुख्य म्हणजे दादरी कांड होणे आणि वेदात बीफ खाणार्यांना ठार मारा असे पांचजन्यने म्हणणे, मुस्लिम देशात राहू शकतात पण बीफ सोडायला हवे असे खट्टर यांनी म्हणणे याचा एक परिणाम होणार आहे. या घटना झाल्या नसत्या तर काही प्रमाणावर मुस्लिम मते ओवेसी आणि मुलायमसिंग यादव यांच्या तिसर्या आघाडीला गेली असती आणि ते भाजप आघाडीच्या पथ्यावर पडले असते.पण आता ती सगळी मते लालू-नितीश आघाडीमागे एकवटतील.
ही मते तशीही भाजपला मिळणार नव्हती.पण तसे असेल तर ती मते जितकी विखुरतील तितके भाजप आघाडीला चांगले झाले असते. पण या अतिउत्साही वाचाळवीरांनी ही सगळी मते लालू-नितीशला जातील याची बेगमी करून ठेवली आहे. शुध्द शब्दात सांगायचे झाले तर हा अडाणीपणा भाजप-संघातील अतिउत्साही लोकांनी केला आहे.
23 Oct 2015 - 2:52 pm | दुश्यन्त
भाजपला सत्ता कशी राबवायची ते कळले नाही. कधी नव्हे ते बहुमत आले आहे मात्र मोदी -शहा यांची एकाधिकारशाही भाजपला नडत आहे.उठसुठ सेल्फी आणि नुसत्या घोषणा आणि फ़ेकम्फ़ाक यातून स्वताचे तात्पुरते मार्केटिंग होते लोक जास्त काल भुलत नाहीत. स्वताच्या इमेजच्या प्रेमातून मोडी बाहेर पडतील तो सुदिन. जनतेने इंदिरा गांधींना यापाई धडा शिकवला त्यांच्या पुढे मोदी तर खूप लहान आहेत. मंत्रिमंडळात विदुषक बसवून ठेवले आहेत. गुजरातेत केले तशी एकाधीकाराची पकड आपण केंद्रात पण चालवू हा भ्रम मोदींना झाला असावा. मोदींना विरोधात आणायला त्यांचेच लोक तयार आहेत किंवा अति उत्साहात काहीजण बरळत आहेत असेच कश्यावरून ? मोदी- शहांची त्याला फूस नसेल कश्यावरून ? कट्टर लोकांनी अशी विधाने करायची आणि मोदींनी विकासाचा जप करायचा अशी दुहेरी नीतीहि असू शकते . जातीय / धार्मिक ध्रुवीकरण करूनच भाजपने युपीत ७२ खासदार निवडून आणले आहेत दर वेळेस तो फंडा चालत नसतो कधीकधी उलटा पण पडतो.पण ते सोडले तरी जनतादेखील त्यांच्या कारभारावर खुश आहे अश्यातला भाग नाही. महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न अजून तसेच आहेत. बिहार निवडणुकीच्या तोंडावर बाता करत लिलाव पद्धतीने प्याकेज जाहीर केले आता त्याची चर्चा पण होत नाही. भाजपने आधी विकासाच्या गप्पा मारल्या नंतर जातीय / धार्मिक ध्रुवीकरण करायला गेले आता अजून निवडणुका पूर्ण व्हायच्या तरी यांचेच लोक खांदे पाडून बसले आहेत, मोदींच्या सभा रद्द होत आहेत. नाण्यातच खोट आहे हे मान्य करायला हवे.
23 Oct 2015 - 3:49 pm | बॅटमॅन
अगदी असेच म्हणतो.
23 Oct 2015 - 4:08 pm | इरसाल
अगदी असेच आणी असेच म्हणतो.
23 Oct 2015 - 10:13 pm | बोका-ए-आझम
शरीरात असलेल्या काविळीवर उपाय असतो पण अशा वैचारिक काविळीवर काय उपाय असणार आहे? आणि पुरावा नसताना भाजपने ध्रुवीकरण करून ७२ खासदार निवडून आणले, जनता कारभारावर खुश नाही, यांचेच लोक खांदे पाडून बसले आहेत, मोदींच्या सभा रद्द होत आहेत वगैरे असली निराशाजनक विधाने करून नक्की काय मिळवायचं आहे? आहे का तुमच्याकडे दुसरा समर्थ पर्याय? असं बॅकसीट ड्रायव्हिंग काय, कोणीही करू शकतो. त्याला काही लागत नाही. आणि जे काही काम होतंय त्याच्याकडे एकदा नकारात्मक दृष्टीनेच बघायचं असं एकदा ठरवलं की मग कोणतीही चांगली गोष्ट ही वाईटच वाटणार. त्यामुळे अशा मतांच्या पिंका टाका. त्याने रस्ता लाल होईल, काम मात्र काहीही होणार नाही.
23 Oct 2015 - 11:06 pm | श्रीगुरुजी
यांचे प्रतिसाद पूर्वीपासून अत्यंत नकारात्मकच आहेत. यांच्या दुर्दैवाने त्यांनी केलेल्या भाकितांपैकी एकही खरे झाले नाही. खालील काही उदाहरणे पहा.
http://www.misalpav.com/comment/632013#comment-632013
पवार सरकारमध्ये येतील ही भविष्यवाणी खोटी ठरली आहे.
http://www.misalpav.com/comment/631001#comment-631001
सेनेने विरोधात बसायचे सोडून सत्तेच्या मोहाने १० मंत्रीपदाच्या बदल्यात (५ कॅबिनेट + ५ राज्यमंत्री) भाजपपुढे कशी नांगी टाकली ते दिसलेच आहे. त्यामुळे सेना भाजपच्या मागे फरफटत जाणार नाही ही भविष्यवाणी सुद्धा खोटी ठरली.
http://www.misalpav.com/comment/632500#comment-632500
हे भाकितही खोटे ठरले.
23 Oct 2015 - 11:47 pm | दुश्यन्त
श्रीगुरुजी - मी कुठली भविष्यवाणी केली नव्हती. एवढे जुने पोस्त शोधण्याचे कष्ट करता तेवढेच कष्ट नीट वाचन करण्यात पण करा.
24 Oct 2015 - 1:06 pm | श्रीगुरुजी
वरील ३ प्रतिसादात अनेक भाकिते आहेत. पुन्हा एकदा नीट वाचा. त्यातील एकही खरे झालेले नाही.
24 Oct 2015 - 2:42 pm | सुनील
शक्य आहे.
(स्त्रोत - http://misalpav.com/comment/741093#comment-741093)
या अंदाजाचे काय झाले म्हणे?
असो.
हाती प्रचंड विदा आणि रिसोर्सेस असतानाही बड्या-बड्या संस्थांची निकाल भाकिते साफ गंडतात, तिथे तुम्हा-आम्हा गुगलानुयायींच्या भाकितांचे काय घेऊन बसलात?
24 Oct 2015 - 2:45 pm | श्रीगुरुजी
बंडखोरी झाली पण युती तुटली नाही. आपल्याला एकमेकांची गरज आहे हे दोन्ही पक्षांना पूर्णपणे लक्षात आलेले दिसतेय. त्यामुळे माझा अंदाज चुकला.
24 Oct 2015 - 3:11 pm | दुश्यन्त
हाहा.. असे खूप आहेत भाकित. आपल ठेवायचं झाकून… असो आपल्याकडे थोडीच यांच्याएवढा वेळ आहे, चिकटपणे एकच मुद्दा सतत मांडत , ज्ञानाच्या गमजा मारत बसायला, आपलीच लाल करायला!
24 Oct 2015 - 11:21 pm | श्रीगुरुजी
भाकित एखाद्यावेळी चुकलं म्हणून मला कधीच वाईट वाटत नाही. प्रत्येक भाकितातून काहीतरी नवीन शिकता येतं. जून २०१३ मध्ये नितीशकुमारांनी भाजपबरोबरची युती तोडल्यावर याचा त्यांना जबर फटका बसणार हे भाकित मी तेव्हाच केलं होतं आणि ते मे २०१४ मध्ये तंतोतंत खरं झालं. शिवसेनेने कितीही लुटुपुटीचा विरोध केला तरी ते शेवटी भाजपला शरण जाऊन सत्तेत भागीदार होणार हेही भाकीत पूर्ण बरोबर आले. कधी भाकिते बरोबर येतात तर कधी येत नाहीत.
पण तुम्ही सिनिकल आणि नकारात्मक भावनेतून केलेली सर्वच्या सर्व भाकिते चुकली हे मान्यच करायची तुमची तयारी नाही. हाच मुख्य फरक असतो वैचारिक कावीळ झालेल्यात आणि न झालेल्यात.
नितीश-लालूची युती अजून तरी तुटलेली नाही. नितीशकुमारांनी आपल्या पक्षहिताचा बळी देऊन केवळ स्वतःचा अहंकार कुरवाळण्यासाठी ही युती केली आहे. आता माझे नवीन भाकित ऐका. ही युती फार काळ टिकणार नाही. त्यांना बहुमत मिळाले किंवा नाही मिळाले तरी ही युती फार काळ टिकणार नाही. लालू जीवापाड प्रयत्न करून संजद फोडायचा प्रयत्न करेल किंवा नितीशकुमारांना अडचणीत आणण्याचा अथक प्रयत्न करेल व त्यातून ही युती तुटेल. लालूसारख्या अत्यंत जातीयवादी आणि कमालीच्या भ्रष्ट व्यक्तीबरोबर युती केल्याची जबर किंमत नितीशकुमारांना द्यावी लागणार आहे.
24 Oct 2015 - 11:47 pm | दुश्यन्त
तुमचा गोंदीसारखा चिकटपणा आणि स्वताची लाल करायची वृत्ती अतुलनीय आहे हे मी जाणतोच! लगे रहो.
25 Oct 2015 - 1:27 pm | श्रीगुरुजी
वा! छान!! असेच लिहीत चला. अशा उच्च पातळीचे दर्जेदार प्रतिसाद तुमच्याकडून येतील हा अंदाज होताच (हा अंदाज सुद्धा खरा ठरला).
माझ्याबद्दल दिलेल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद! अजून येऊ द्या.
भविष्यातही तुमच्याकडून यापेक्षाही उच्च पातळीचे प्रतिसाद येणारच येणार हे भाकित आधीच वर्तवून ठेवतो.
25 Oct 2015 - 8:05 am | बोका-ए-आझम
अंदाज असा शब्द वापरलाय. ज्याच्यात शक्यता अध्याहृत आहे. त्यामुळे तो चुकण्याची शक्यता गृहीत धरलेली आहे. बरं, त्यांनी इथे मान्यही केलेलं आहे की त्यांचा अंदाज चुकला. पण पुरावे नसताना बेछूट विधानं करणाऱ्या पिवळ्या वाचाळवीरांनी अजून काहीही पुरावा दिलेला नाही. फक्त नकारात्मक भावना पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
24 Oct 2015 - 12:02 am | दुश्यन्त
माझे प्रतिसाद नकारात्मक. हाहा.. चिकटपणे माझच म्हणण खर म्हणत एका पक्षाला/नेत्याला निष्ठा वाहून गोंधळी प्रतिसाद टाकण्यापेक्षा ते बरच ना.
24 Oct 2015 - 12:08 am | दुश्यन्त
युपी मध्ये लोकसभेआधी दंगे पेटवून, भडकावू विधाने करून धार्मिक ध्रुवीकरण होवून फायदा कुणाचा झाला?लोकांनी लोकसभेत एकदा बहुमत दिले म्हणजे त्या पक्षाच्या हो मध्ये हो मिसळला पाहिजे असे तुमचे मत दिसते आहे. यालाच अंधभक्त म्हणतात आम्ही नागरिक आहोत आम्हाला जे दिसेल ते बोलतो तुम्हाला त्यात नकारात्मकता दिसते. विरोधाला वैचारिक कावीळ असे बरळून आपला आंधळेपणा सिद्ध होतो बाकी काही नाही.
24 Oct 2015 - 8:44 am | बोका-ए-आझम
जसा तुम्हाला मतं मांडायचा अधिकार आहे, तसा आम्हालाही तुमच्या मतांवर टीका करायचा अधिकार आहे. म्हणूनच वैचारिक कावीळ असं म्हटलंय. एकदा वृत्ती सिनिकल झाली की मग माणसाला वैचारिक कावीळ, वैचारिक सर्दी आणि वैचारिक अतिसारपण होतो. तुमचा दोष नाही. तुमच्या सिनिकल आणि प्रत्येक गोष्टीत नकारात्मक बाजू शोधण्याच्या वृत्तीचा दोष आहे. Cynic is the one who questions the price of everything but doesn't realize value of anything असं म्हटलं जातं, तेच तुम्ही सिद्ध करत आहात, बाकी काही नाही. पुरावे नसताना बोलण्याला काय म्हणावं? तरी बरं, तुम्ही मिपावर आहात. दिल्लीत असतात तर नक्कीच आम्ही तुम्हाला अरविंद केजरीवाल म्हटलं असतं!
24 Oct 2015 - 1:44 pm | दुश्यन्त
बोका- तुम्ही काहीही बरळाल हो तुमच्या अश्या प्रमाणपत्रांना कोण महत्व देत. बाकी वर सांगितलेली लक्षणे कधीपासून आहेत तुम्हाला. विरोधी मत दिसले कि त्याला कपोकल्पित आजार वगैरे म्हणणे म्हणजे तुमच्यातच काही केमिकल लोच्या असल्याचे निदर्शन आहे. लवकर चांगला डॉक्टर गाठा. शुभेच्छा!
24 Oct 2015 - 3:11 pm | बोका-ए-आझम
पहिले स्वतःचा आयडी नीट लिहायला शिका आणि मग इतरांवर टीका करा. मी तुमच्या नकारात्मक विचारांवर टीका केली होती, तुमच्यावर नाही पण तुम्हीच माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहात. आणि माझ्या प्रमाणपत्रांना तुम्ही जर महत्व देत नाही तर नाव घेऊन प्रतिसाद द्यायची काय गरज होती? विरोधी मतावर आम्ही तुटून पडणारच. ते शेवटी विरोधी मत आहे. आणि बरळायची सवय ही तुम्हाला आहे. पुरावे नसताना वाटेल ती विधानं करणं याला बरळणं हाच शब्द आहे. हे असे नकारात्मक विचार आहेत तुमचे त्यामुळेच जरा कोणी विरूद्ध मत मांडलं की तो बरळतोय असं म्हणून त्याच्यावर हल्ला चढवता. मुद्दे नसले की माणूस वैयक्तिक टीकेवर उतरतो आणि अशांना आम्ही इतके दिवस आपटार्ड म्हणायचो. आता दुश्यंत म्हणायला लागू. हाकानाका!
24 Oct 2015 - 3:17 pm | दुश्यन्त
झोंबला दिसतोय सल्ला!आमचा आयडी आम्ही कसाही लिहू तुम्हाला काय पंचाईत.आम्ही विचारतो का तुमच्या आयडीबद्दल कारण माहित आहे काय लोच्या आहे ते. आणि तुमच नाव लिहिल कारण तुम्हाला कळावं म्हणून. आधीच गैरसमज/ भ्रम कमी नाहीत तुमचे त्यात अजून भर नको. पुरावे काय हे तुम्ही संगांर होय. सगळ्या अकलीचा मक्ता तुमच्याकडेच ना. वर सांगितल आहेच इलाज करा!
24 Oct 2015 - 5:46 pm | बोका-ए-आझम
तुम्हाला मेंदू नसावा अशी शंका होतीच, पण आता खात्री पटली. कसं आहे, तुमचा दोष नाहीच आहे पण. एकदा मनाला वैचारिक काविळीचा संसर्ग झाला की आपलं चुकीचं, पुराव्याशिवाय दिलेलं मतही बरोबर असल्याचे साक्षात्कार भल्याभल्यंना होतात. मग तुम्ही तर एक क्षुद्र मानव (नक्की ना?) आहात. अशा लोकांची आम्ही नेहमीच कीव करतो. यापुढेही करु. काळजी करु नये. किंवा मिपाच्या स्टाईलमध्ये
- कल्जी क्रू नये.
24 Oct 2015 - 1:13 pm | श्रीगुरुजी
युपीतील दंगे जाट-मुस्लिम यांच्यात पेटले होते. जाट मुलीच्या छेडछाडीवरून तिच्या भावांनी छेडछाड करणार्या मुस्लिम तरूणांना जाब विचारल्यावर त्या दोन भावांचा खून झाला व त्यातून दंगल पेटली. दंगलीत मृत झालेल्या हिंदूंना २ लाख रू. नुकसानभरपाई व मृत झालेल्या मुस्लिमांना ५ लाख रू. नुकसानभरपाई असा पक्षपात अखिलेश यादव सरकारने केला. त्यामुळे दंगलीत तेल ओतण्याचे काम झाले. दुर्दैवाने बोकोबांनी लिहिल्याप्रमाणे वैचारिक कावीळ आणि सिनिकल वृत्ती यामुळे प्रत्येक गोष्टीत, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तुम्हाला भाजपच दिसतो. जसे मोगलांना संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे किंवा इंदिरा गांधींना प्रत्येक घटनेत सीआयए चा हात दिसायचा किंवा काँग्रेसला सर्वत्र संघ दिसतो, तसेच इथेही झाले आहे.
23 Oct 2015 - 10:36 pm | श्रीगुरुजी
बरं, तसं समजा.
24 Oct 2015 - 2:00 pm | गॅरी ट्रुमन
निवडणुकांच्या संदर्भात माझा एक हायपोथिसिस आहे. मला नेहमी वाटते की सत्ताधारी पक्षाच्या बाजूने/विरोधात मते देताना मतदार दोन गोष्टींचा विचार करतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाकडून असलेल्या अपेक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सत्ताधारी पक्षाने नक्की किती अपेक्षांची पूर्तता केली. समजा सत्ताधारी पक्षाने १०० गोष्टी कराव्या अशी अपेक्षा असेल पण प्रत्यक्षात केल्या केवळ २० तर त्या सत्ताधारी पक्षाविरूध्द लोकांचा असलेला क्षोभ हा १० गोष्टी कराव्या अशी अपेक्षा असलेल्या पण प्रत्यक्षात ८ गोष्टी केलेल्या सत्ताधारी पक्षाविरूध्दच्या क्षोभापेक्षा जास्त असतो. मतदार मत देताना पर्याय ८ पेक्षा जास्त गोष्टी करूच शकत नाही त्यापेक्षा सध्याच्या सत्ताधारी पक्षाने २० गोष्टी केलेल्या आहेत-- भले त्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्या तरी विरोधी पक्ष देऊ शकेल त्यापेक्षा जास्त आहेत हा विचार करत नाहीत. म्हणजेच माझ्या हायपोथिसिसप्रमाणे सत्ताधारी पक्षाविरूध्द मते बनविताना पर्यायी पक्ष किती चांगला आहे/वाईट आहे हा विचार मतदार करत नसतात.
इतके दिवस या हायपोथिसिसच्या पुष्ट्यर्थ मतदार खरोखरच असा विचार करतात याचा समाधानकारक पुरावा मला मिळालेला नव्हता. तो काही प्रमाणात मिळताना दिसत आहे.
नाण्यात खोट आहे की नाही हे ज्याचेत्याचे मत झाले. त्याविषयी इतरांनी भाष्य करून काही अर्थ नाही. पण या नाण्यात खोट आहे म्हणून पर्यायी नाण्याच्या बाजूने मत बनविण्यापूर्वी पर्यायी नाणे किती रद्दड आहे याचा विचार कोणी करताना दिसत नाही. एन.डी.ए हरेल तर बरेच होईल (पक्षी लालू-नितीश आघाडी जिंकेल तर बरेच होईल) असे मिसळपाववरच एका सदस्याने म्हटलेले आहे. कुठलाही सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस लालू जिंकावा अशी इच्छा करणार नाही अशी माझी भाबडी समजूत होती.पण ती पार चुकीची होती हे मिसळपाववरच बघायला मिळाले. उच्चशिक्षित मतदार असा विचार करत असतील तर सामान्य मतदार त्यापेक्षा वेगळा विचार कसा करणार?
24 Oct 2015 - 2:26 pm | दुश्यन्त
<नाण्यात खोट आहे की नाही हे ज्याचेत्याचे मत झाले. त्याविषयी इतरांनी भाष्य करून काही अर्थ नाही.>
सहमत. पण यालाच काही लोक कावीळ वगैरे बरळू लागतात. आपल्या विरोधी मत मांडले कि कावीळ असा यांचा सोपा फंडा असतो.
आता तुम्ही लालू आणि सुशिक्षित मतदार याबद्दल बोलत आहात त्यावर माझे मत असे आहे कि काँग्रेस जसे मुस्लिमांना भाजपची भीती दाखवून मते मिळवायची तसे भाजपवाल्यांचे लालू वगैरे बद्दल मत आहे काय? म्हणजे आम्हाला निवडून द्या नाहीतर लालू येईल हेच लोकांना गृहीत धरणे झाले. आपण काहीही करू लोक आपल्यालाच निवडून देतील यातच काँग्रेस गेली भाजपही तसेच करत आहे. आपल्याला (मराठी लोक) लालूची जेवढी घृणा/ तिटकारा असतो तेवढा बिहारी लोकांना नसतो. आपले पवार, ठाकरे वगैरेंना तिकडे असे पाण्यात पाहणारे खूप आहेत. सुशिक्षित किंवा इतरही लोकांत साधारणपणे सगळेच राजकारणी चोर /भ्रष्ट असा समज असतो, त्यात लालू सापडले बाकी सापडले नाहीत एवढाच फरक अशी धारणा असते. लालू सोबत आले म्हणून काही सुशिक्षित नाराज असू शकतात पण तरीही नितीश मुख्यमंत्री आणि लालूंचा पक्ष त्यात सामील हे समीकरण भाजप+ मांझी + पासवान यांच्या पेक्षा बरेच असे समजू शकतात. दुसरे म्हणजे महाआघाडीचा चेहरा नितीश आहे. आज बिहारमध्ये त्यांचा तोडीचा स्वच्छ चेहरा कुणाकडेच नाही , भाजपकडे तर चेहराच नाही. मोदींच्या नावावर मते मागून दिल्लीत झाले तेच होईल हे भाजपच्या उशिरा लक्षात आले असावे म्हणून आता सभा रद्द होणे , पोस्टरवर लोकल चेहऱ्यांना स्थान देणे वगैरे होत आहे. लोकसभेत बिहारमध्ये कधी नव्हे जातीय समीकरणे मागे पडून लोकांनी भाजप/ मोदींना कौल दिला १.५ वर्षात अच्छे दिन , महागाई , काला धन १५ लाख यांच काय झाल हा लोकांना पटकन पडणारा प्रश्न आहे शेवटी हे पब्लिक परसेप्शन असते. लालूच्या भीतीपेक्षा लोकांना ते महत्वाचे वाटले तर तो त्यांचा प्रश्न आहे. लोकसभेत मोदींना मत देणाऱ्या लोकांनी आपले परसेप्शन बदलून विधानसभेत वेगळा विचार केला कि भक्त लोकांना आता देशाचे नुकसान होणार, घात वगैरे प्रश्न पडू लागतात आपल्या लाडक्या पक्षाने खरच विकास केला असता तर हे घडलेच नसते हे ते मान्य करत नाहीत.
24 Oct 2015 - 3:18 pm | बोका-ए-आझम
आणि तुमचा आधीचा प्रतिसाद आणि तुमची भाषा यात केवढा फरक आहे! तुम्ही जर कालचा प्रतिसाद अशा भाषेत दिला असतात, तर तुम्हाला एवढा मनस्ताप झाला नसता. पण आधी कांगावा केल्यावर घसा दुखतोय म्हणून ओरडणे आणि समोरच्याने ते दाखवून दिल्यावर त्याच्यावरच डाफरणे हा काही जणांचा स्वभाव असतो. काय करणार?
24 Oct 2015 - 3:35 pm | दुश्यन्त
नीट वाचा. कावीळ वगैरे मुक्ताफळे कोण उधळत होत आधी ते. दुसर्याचे दोष दाखवायच्या गप्पा मारायच्या आधी स्वताची भाषा आणि नजर सुधारा. मनस्ताप ? मनोरंजन झाल मस्त पैकी, अंधभक्तांच्या एकेक करामती पाहून. भाजपवर कुणी टीका केली कि चवताळून स्वतःच अंगावर ओढवून घ्यायचं आणि नंतर दुखल म्हणून विव्हळत बसायचं. भाजपला विरोध केला कि केजरीवाल , कधी शिवसेनेचा ठरवायचे.असल्या नमुन्यांची घरे भाजप चालवतो कि काय असा प्रश्न पडतो. आपण एवढे इमानदार आणि सोज्ज्वळ हे भाजपचे नेते एकवेळ खाजगीत स्वतः मान्य करतील पण हे राजाहून जास्त राजनिष्ठ ते मान्य करणार नाहीत.
24 Oct 2015 - 3:36 pm | दुश्यन्त
आपण एवढे इमानदार आणि सोज्ज्वळ नाही हे भाजपचे नेते एकवेळ खाजगीत स्वतः मान्य करतील पण हे राजाहून जास्त राजनिष्ठ ते मान्य करणार नाहीत.
24 Oct 2015 - 6:05 pm | बोका-ए-आझम
कांगावा करायची सवय नाहीये हो दुश्यंतराव. आणि तुम्हाला वैचारिक कावीळ झालेलीे आहेच पण आता तर वैचारिक अतिसारही झालेला दिसतोय. त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरवण्याचं तुमचं निसर्गदत्त कार्य संपणार कधी? बरं, भाजपचा पाठीराखा असणं यात चुकीचं काय आहे? आणि जखमा तर तुम्हाला झाल्या आहेत. तुमच्या विव्हळण्यावरनं कळतं आहेच की ते. आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघा जरा. आम्हाला नडाल तर याहून जास्त जखमा होऊ शकतात.
24 Oct 2015 - 7:43 pm | दुश्यन्त
जबरी भ्रम आहेत तर स्वतःबद्दलचे. असले म्यावू म्यावू करणारे खूप पाहिले आहेत. आणि पाठीराखे कि पेड शिपाई ? असो लवकर बरे व्हा!
24 Oct 2015 - 8:01 pm | बोका-ए-आझम
अच्छा! म्हणजे आता लक्षात आलं. भाजपच्या पाठीराख्यांना पैसे मिळतात असा समज आहे तर. आता तर कावीळ हेपॅटायटीस बी च्या लेव्हलला गेली हो. काहीतरी करा. प्राणघातक आजार असतो हा. फुल डोक्यात गेलेला आहेच, पण रिकव्हरीचा चान्स आहे.
25 Oct 2015 - 9:40 am | दुश्यन्त
कुठवर आलाय इलाज ?आम्हाला तुमच्यासारखा वेळच वेळ नाही ना इथे यायला. आपली रोगाची लक्षणे दुसर्यावर ढकलण अजून सुरूच आहे.अरेरे झटके वाढले दिसतेय.आजार जुना दिसतोय कि अच्छे दिनाची वाट पाहून अस अस झालंय ?असो. लवकर आपल्या प्रकृतीला आराम मिळो.
24 Oct 2015 - 9:07 pm | रमेश आठवले
बिहार मध्ये दुसऱ्या चरणाचे मतदान १२ ऑक्टोबर ला झाले व तिसऱ्या चरणाचे मतदान २८ ऑक्टोबर ला आहे. मधल्या काळात मोदींच्या सभा झल्या नाहीत.याचा खोडसाळ अर्थ मतदार त्यांच्या सभाना फारसा प्रतिसाद देत नाहीत आणि म्हणून त्या रद्द कराव्या लागत आहेत असा नितीश आणि त्यांच्या समर्थकांनी लावला. क़ेन्द्र सरकार व भाजपा पक्ष यांच्यात महत्वाचे स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनीही तत्सम विधान केले आहे.
त्यावर केंद्रीय मंत्री आणि बिहार मधील भाजपा चे वरिष्ठ नेते रवि शंकर प्रसाद यांनी खुलासा केला आहे.ते म्हणतात की मधल्या काळात मोदींच्या कुठल्याही सभेचे आयोजनच केले नाही. तर मग त्या रद्द कशा करणार ? सभा का आयोजित केल्या नाही याचे स्पष्टीकरण त्यानी दिले आहे.
http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bihar-polls...
25 Oct 2015 - 2:55 pm | सव्यसाची
दुष्यंत साहेब,
बाकी गोष्टींवर सध्या तरी प्रतिसाद देत नाही. पण
याच्याशी सहमत नाही.
ज्या सभेच्या रद्द होण्याबद्दल बातम्या पसरल्या ती सभा १६ ऑक्टोबर ची होती असेही सांगण्यात आले. त्याबद्दल बीजेपी कडून सांगण्यात आले कि १६ ते २४ च्या दरम्यान कोणतीही सभा आयोजित करण्यात आली नव्हती. २५ तारखेपासून परत पंतप्रधान प्रचाराला सुरुवात करतील. (जे कि आज आपल्याला दिसले आहे. )
थोड्या वेळासाठी असे समजून चालू अशी काही सभा होती. ती रद्द होण्याचे कारण बिहार मध्ये होते असे मला वाटत नाही. १३ तारखेपर्यंत पंतप्रधान माहिती कायद्याला १० वर्षे पूर्ण होण्याप्रीत्यार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात जाणार नव्हते. परंतु, शेवटी त्यांनी या कार्यक्रमास होकार कळवला. तो कार्यक्रम १६ तारखेला दिल्ली येथे होता.
त्यामुळे सभा रद्द झालीय हेच तितकेसे खरे वाटत नाही आणि सभा रद्द जरी झाली असली तरी तिचे कारण बिहार मध्ये आहे असे तर वाटत नाही.
धन्यवाद.
25 Oct 2015 - 10:33 pm | दुश्यन्त
ओके ठीक आहे. आपण म्हणता तसेही असू शकेल. धन्यवाद!
26 Oct 2015 - 12:08 am | रमेश आठवले
मी याच्या वरच दिलेल्या प्रतिसादात रवि शंकर प्रसाद यांची लींक दिली आहे. ते म्हणतात कि त्यांनी १६ तारखेला सभा घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्या कडून परवानगीही मागितली नव्हती .
23 Oct 2015 - 11:16 pm | म्हसोबा
कसले डोंबलाचे SWOT Analysis घेऊन बसला आहात, यांची एकेक मुक्ताफळे ऐकली की असे वाटते
.
24 Oct 2015 - 9:51 am | याॅर्कर
कि आपण इथे निपक्षपाती चर्चा करायला हवी.
काहीजण भाजपप्रति फारच सहानभूती दाखवतात,आणि काहीजण भाजपला फारच पाण्यात बघतात.आपण इथे कोण्या एका पक्षाचे समर्थक म्हणून चर्चा करणे उचित ठरणार नाही.
24 Oct 2015 - 6:37 pm | सुबोध खरे
कोण्या एका पक्षाचे समर्थक म्हणून चर्चा करणे उचित ठरणार नाही.
करु द्या कि
समर्थक लोक पक्षाच्या चांगल्या बाजू समोर मांडतात आणि विरोधक वाईट बाजू. दोन्ही कडच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समोर आल्या तर वाईट काय?
टीका किंवा स्तुती विधायक असली आणि सभ्य शब्दात असली म्हणजे झालं.
24 Oct 2015 - 3:07 pm | श्रीगुरुजी
नितीशबरोबर लालू असल्याने बिहारमधील काही घटकात आतापासूनच भीति पसरायला सुरूवात झाली आहे. त्याबद्दल हा एक वृत्तांत - http://indianexpress.com/article/india/india-news-india/why-bjp-is-going...
24 Oct 2015 - 8:00 pm | शाम भागवत
पुरूषांपेक्षा ५ ते ७ टक्के इतका जास्त सहभाग स्त्रियांचा आहे. त्याचा अर्थ काय असावा? कारण हा जास्तीचा सहभाग काही हजार मतांचा होतो व तो निवडणूक निकालावर नक्कीच परिणाम करतो. इतकेच नव्हे तर जातीच्या समीकरणावर हे मतदान मातही करू शकेल असे वाटते.
जिथे राजद असेल तिथे राजदाच्या विरोधात आणि इतरठिकाणी नितिशकुमारांना पाठिंबा असा त्याचा अर्थ असेल काय? नितिशकुमारांच्या मंत्रीमंडळातील भाजपाच्या मंत्र्यांची कामगीरी चांगली असेल तर असे होऊ शकेल असे वाटते.
जरी नितीशकुमार व भाजप यांना एकत्र यायचे नसेल पण मतदारांना ते एकत्र यावेत असे वाटत असेल तर मात्र मतदार ते मतपेटीतून नक्कीच दाखवतील का?
मला राजकारणातले फारसे कळत नाही म्हणून फक्त माझी शंका विचारतोय.
24 Oct 2015 - 9:56 pm | राही
वॉट्स अॅप वर सध्या एक प्रचंड विनोदी मेसेज फिरतोय. खोडसाळ आहे की उपरोधात्मक आहे की प्रामाणिक अंदाज आहे काही कळत नाही. प्रणव मुकर्जींची राष्ट्रपतिपदाची मुदत पुढल्या वर्षी संपते आहे. त्या वेळी शरद पवारांना ते पद देऊ केले जाईल अशी बातमी त्यात आहे.
24 Oct 2015 - 10:28 pm | गॅरी ट्रुमन
व्हॉट्सअॅपवर फिरणारे मेसेजेस बाय डिफॉल्ट प्रचंड विनोदीच असतात. डिसेंबर २०१४ मध्ये असाही एक मेसेज फिरत होता की मोदींनी व्लादिमिर पुतिनबरोबर तेल विकत घ्यायचा करार केला म्हणून तेलाचे दर कोसळले. केवळ भारतीयांनी स्वीस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाचे व्हॉट्सअॅपवर फिरणारे आकडे म्हणाल तर हे ५००-१००० लोक जगातील ६५० कोटी लोकांकडे असतील त्यापेक्षा कैक पटीने जास्त पैसे कॅशमध्ये राखून आहेत असे कोणाला वाटायचे.
कोणाची इतकी कल्पनाशक्ती अफाट दौडते आणि मुख्य म्हणजे इतका वेळ कोणाला असतो असले काहीतरी कल्पना करून लिहायला कुणास ठाऊक. इतरांचे ठिक आहे. फॉरवर्ड करायला फार कष्ट पडत नाहीत. पण मुळात कोणीतरी असे मेसेज तयार करत असलेच पाहिजे ना. त्यांना अशा कल्पना सुचतातच कशा आणि इतका वेळ त्यांच्याकडे कसा असतो कुणास ठाऊक. व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज हे एवढे क्वालिफिकेशन एखाद्या मेसेजला फाट्यावर मारायला पुरेसे आहे.
24 Oct 2015 - 10:59 pm | दुश्यन्त
प्रणव मुकर्जींची राष्ट्रपतिपदाची मुदत पुढल्या वर्षी संपते आहे
प्रणव मुखर्जींची मुदत जुलै २०१७ पर्यंत आहे.
24 Oct 2015 - 11:40 pm | श्रीगुरुजी
या निवडणुकीमुळे मला १९९० मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आठवण होत आहे. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने फक्त १९५ जागा जिंकून सत्ता गमाविली होती. बोफोर्स प्रकरण, शहाबानो प्रकरण, श्रीराम जन्मभूमी इ. चा फटका काँग्रेसला बसला होता. महाराष्ट्रात १९८५ मध्ये ४८ पैकी ४३ जागा जिंकणार्या काँग्रेसला १९८९ मध्ये २८ जागा मिळाल्या होत्या.
नंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीने मोठे आव्हान उभे केले होते. परंतु पवारांनी अतिशय चतुराईने आपले पत्ते खेळले. प्रथम त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले व गवई गटाबरोबर युती करून काही दलित मतांची बेगमी केली. त्यावेळी प्रचारात बाळासाहेब ठाकरे अत्यंत आक्रमक भाषेत प्रचार करीत होते. पवारांनी अनेक वृत्तपत्रांना हाताशी धरून बाळासाहेबांवर टीकेची झोड उठविली. बाळासाहेब आपल्या भाषणातून महिलांचा अपमान करीत आहेत, आदरणीय पत्रकारांचा अपमान करीत आहेत असे वारंवार लिहून येऊ लागले. सध्या भाजपच्या प्रत्येक नेत्याच्या प्रत्येक वाक्याचा वेगळा अर्थ काढून त्यांना झोडपले जात आहे. अगदी तसेच त्यावेळी बाळासाहेबांच्या भाषणातील प्रत्येक वाक्याचा कीस काढला जाऊ लागला. ते अगदी ऑफ द रेकॉर्ड बोललेले सुद्धा माध्यमांना लीक केले गेले. त्याचवेळी दादा कोंडके सेनेच्या बाजूने प्रचार करताना काही वेळा बिलो द बेल्ट बोलत होते. त्यावरही प्रचंड टीका झाली. असे चित्र निर्माण केले गेले की या मंडळींनी महाराष्ट्राची संस्कृती, महिलांची सभ्यता धोक्यात आणली आहे. पुष्पा भावे यांच्या सारख्या साहित्यिकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. आपल्या आयाबहिणींची निंदानालस्ती करणार्यांचा, असभ्य वक्तव्ये करणार्यांचा पराभव करा असा जोरदार प्रचार काँग्रेसने सुरू केला.
त्याबरोबरीने पवारांनी जातीय प्रचार सुरू केला. आज लालू जे करीत आहे त्याचेच जरा सभ्य स्वरूप म्हणजे तो प्रचार होता. सेना-भाजप सत्तेवर आले तर पुन्हा एकदा पेशवाई येईल, यांना पेशवाई आणायची आहे अशा तर्हेच्या सूचक जातीयवादी जाहिराती रोज वृतपत्रात येऊ लागल्या.
शेवटी निकाल लागल्यावर काँग्रेसला २८८ पैकी १४१, भाजप ४२ + सेना ५२ अशा ९४ जागा व जनता दल २५ अशा जागा मिळाल्या. भाजप-सेनेचा प्रचार बघता व काँग्रेसविरोधी वातावरण बघता सेना-भाजपला अजून किमान २०-२५ जागा मिळायला हव्या होत्या.
बिहार निवडणुकीत साधारणपणे असेच चित्र आहे. लालू जोरदार जातीयवादी प्रचार करीत आहे, ढोंगी साहित्यिक पुरस्कार परत करून निषेधाची नाटके करीत आहेत, नितीशकुमारांनी बिहारची अस्मिता हा मुद्दा केला आहे. आणि त्याचवेळी भाजपमधील वाचाळवीर प्रक्षोभक वक्तव्ये करून आगीत तेल ओतत आहेत. एकंदरीत चारही बाजूने भाजप घेरला गेला आहे.
26 Oct 2015 - 11:19 am | सौंदाळा
भाषण ऐकले आहे दादा कोंडकेंचे. एकेकाला काय फोडुन काढलं आहे. हसुन हसुन बेजार झालो होतो.
दादांचा पहिला निर्मिती केलेला चित्रपट - 'सोंगाड्या' मुंबईतल्या कोहीनुर चित्रपट्गृहात लावायचे ठरले होते. तेव्हा चित्रपट्गृहे निर्मात्याला ठराविक रक्कम देऊन बुक करावी लागत त्याप्रमाणे दादांनी बुकींग केले होते. पण अचानक एक तिकडे दादांचा चित्रपट डावलुन हिंदी चित्रपट (देव आनंदचा - जॉनी मेरा नाम) लावायचे ठरले. दादा चित्रपट्गृहाच्या मालकाकडे गेले पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच वेळी कोणीतरी दादांना बाळासाहेबांना भेटायचा सल्ला दिला. शिवसेना त्यावेळी नुकतेच बाळसे धरत होती. दादा बाळासाहेबांना भेटल्यावर ताबडतोब बाळासाहेब स्वतः काही शिवसैनिकांना बरोबर घेऊन गेले आणि त्यांच्या खास शैलीत त्या चित्रपट्गृहाच्या मालकाला 'समजावले'. शेवटी तिकडे दादांचा सोंगाड्याच प्रदर्शित झाला आणि रौप्यमहोत्सवी ठरला. त्यावेळेपासुन दादा आणि बाळासाहेबांचा स्नेह जुळला आणि पुढे कित्येक वर्षे टिकला.
(दादांचे चरित्र 'एकटा जीव' मधे हे वाचले होते)
31 Oct 2015 - 12:13 am | दुश्यन्त
भाजप हरली तर पाकिस्तानात फटाके वाजतील- इति जुमला सम्राट अमित शहा. आले हे फेकू आपल्या लाइनिवर.
लालू यादव आपल्या करणीने बदनाम आहे आणि ते बरेच आहे पण हे शहा आणि मोदी जे काही बरळतात त्यावर भक्तलोक आणि काही शहाणेपण मुग (किंवा अन्य काही) गिळून गप्प बसलेले असतात.मागे पण हरियानामध्ये अमित शहाच्या मंचावर डीपी यादव उपस्थित होता तेव्हा भाजपेयिन साधनशुचिता आठवत नव्हती. एका तडीपार गुंडाला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवणार्यांना काश्याची आलीय म्हणा साधनशुचिता. भाजपला निवडून द्या नाहीतर लालू यादव येईल हे विधान किंवा भाजपला निवडून द्या नाहीतर पाकिस्तानात फटाके वाजतील हे विधान यात जास्त फरक नाही.असो. पब्लिक याला जास्त महत्व देत नसते.
31 Oct 2015 - 1:44 am | जॅक द रिपर
क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकला तर भारतात फटाके वाजवणार्यांच्या अवलादींना यातला अर्थ कळणार नाहीच.
31 Oct 2015 - 5:11 pm | श्रीगुरुजी
+ १
असल्या लोकांना फक्त मोदींना अपशकुन करायचा आहे. मग त्यासाठी लालूसारख्या गुन्हेगाराला पाठिंबा द्यावा लागला तरी हरकत नाही, पण मोदींना अपशकुन व्हायला पाहिजे अशी यांची मानसिकता आहे.
31 Oct 2015 - 5:09 pm | श्रीगुरुजी
इथे हे वाक्य टाकून थयथयाट करावासा वाटला यातच या वाक्याचं महत्त्व दिसून येत आहे!
31 Oct 2015 - 10:25 pm | जॅक द रिपर
पब्लिकने कशाला महत्व दिले हे २०१४ च्या मे महिन्यात स्पष्टपणे दिसून आले आहे.
अद्यापही त्या मानसिक आघातातून बाहेर न आलेल्यांचा या वैचारीक डान्सबार सुरु आहे.
31 Oct 2015 - 10:38 pm | श्रीगुरुजी
+१
31 Oct 2015 - 11:20 pm | श्रीगुरुजी
सट्टेबाजांचा अंदाज -
संजद+ : १२९
भाजप+ : ११०
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bihar-polls-grand-alliance...
1 Nov 2015 - 9:15 am | गॅरी ट्रुमन
हे सट्टेबाज नक्की किती विश्वासार्ह असतात?
फेब्रुवारी २०१५ च्या दिल्ली निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसबरोबरच या सट्टेबाजांचाही प्रचंड पराभव झाला होता .
डिसेंबर २०१३ च्या निवडणुकांमध्ये सट्टेबाजांनी दिल्लीमध्ये केजरीवाल ८ ते १० जागा घेऊन तिसर्या क्रमांकावर येतील असे म्हटले होते. प्रत्यक्षात जागा मिळाल्या २८ आणि क्रमा़ंक होता दुसरा. याच सट्टेबाजांनी भाजपला मध्य प्रदेशात १२२ ते १२४ तर काँग्रेसला ७८-८० जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपला १६३ तर काँग्रेसला ६५ जागा मिळाल्या. राजस्थानात सट्टेबाजांनी भाजपला ११४ ते ११६ तर काँग्रेसला ६२ ते ६४ जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपला १६२ तर काँग्रेसला २३ जागा मिळाल्या. दुवा
मला वाटते की बिहारमध्ये चुरस मतांच्या टक्केवारीमध्ये असेल. ज्या आघाडीला एखादा टक्का मते जास्त मिळतील ती आघाडी १४०-१५० जागा मिळवून अगदी आरामात विजय मिळवेल आणि दुसर्या आघाडीला ७०-८० जागांवर समाधान मानावे लागेल. माझ्या मते नितीश कुमार आघाडीला विजयाची शक्यता जास्त आहे. प्रत्यक्षात काय होते ते पुढच्या रविवारी कळेलच.
1 Nov 2015 - 2:32 pm | श्रीगुरुजी
गुदस्ता साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सट्टेबाजांचा खालील अंदाज होता.
भाजप - ११०+, शिवसेना - ५०, काँग्रेस - ४०-४५, राकॉं - ४५-५०, मनसे - १५-२०, अपक्ष व इतर - १२-१५
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bookies-predic...
यापैकी भाजप व दोन्ही काँग्रेसच्या बाबतीत सट्टेबाजांचे अंदाज बरेचसे खरे ठरले. मनसेच्या बाबतीत अंदाज पूर्ण चुकला. शिवसेनेच्या बाबतीत काही फरकाने चुकला.
1 Nov 2015 - 3:20 pm | श्रीगुरुजी
सट्टेबाजांचे अंदाज बरोबरसुद्धा येतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सट्टेबाजांनी रालोआला ३१७ जागांचा अंदाज दिला होता. रालोआला त्याच्या जवळपास म्हणजे ३३६ जागा मिळाल्या होत्या.
http://zeenews.india.com/news/general-elections-2014/lok-sabha-polls-boo...
1 Nov 2015 - 7:38 pm | श्रीगुरुजी
बिहारमध्ये मतदानाचे ३ टप्पे पार पडले आहेत. अजून २ टप्प्यातील १०७ जागांचे मतदान व्हायचे आहे.
वरील बातमीनुसार पहिल्या २ टप्प्यात भाजप मागे पडल्याने सट्टेबाजांनी संजद+ ला १४५ जागांचा अंदाज दिला होता. परंतु ३ र्या टप्प्यात भाजपची परिस्थिती सुधारल्याने सट्टेबाजांनी तो अंदाज १२९ पर्यंत खाली आणला. जर उर्वरीत २ फेरीत भाजपची स्थिती अशीच सुधारली,तर हा आकडा अजून कमी येईल.
1 Nov 2015 - 10:47 pm | रमेश आठवले
हे सट्टेबाजांचे अंदाज कशावर अवलंबून असतात या सम्बन्धी माहिती कोणी देऊ शकेल का ?
1 Nov 2015 - 7:16 pm | गॅरी ट्रुमन
या निवडणुकांमध्ये एक गोष्ट समजत नाही. भाजप जर बॅकफूटवर असेल तर नरेंद्र मोदींना संभाव्य पराभवाच्या दोषापासून वाचविण्यासाठी एक तर त्यांच्या सभा न आयोजित करणे आणि पराभवाचे खापर फोडायला स्थानिक पातळीवरील एखादा बकरा शोधणे हे प्रकार झाले असते (जसे दिल्लीमध्ये झाले). तसे यावेळी झालेले दिसत नाही. दिल्ली निवडणुकांच्या वेळी आपण जिंकणार हा दावा भाजपने केला होता (तसा तो करायलाच हवा) पण तो दावा फार वेळा केलेला नव्हता. पण यावेळी मात्र आपण दोन-तृतीयांश बहुमत घेऊन येणार असा दावा अमित शहा जवळपास दररोज करत आहेत.भाजपने मतदानाच्या चौथ्या फेरीनंतरच निवडणुका जिंकलेल्या असतील असे अमित शहांनी कालच म्हटले आहे. प्रत्यक्ष भाजप बॅकफूटवर आहे की नाही हे कळत नाही पण निदान भाजपची देहबोली तरी तसे दर्शवत नाही. दिल्ली निवडणुकांच्या वेळी पोस्चरींग इतके नव्हते हे तर नक्कीच.
इंडिया टुडेमध्ये या चौकटीत एन.डी.ए चे नेते दावा करत आहेत की महादलित मते दूर गेलेली नाहीत.पण ही मते नेहमी "मूक मते" असतात त्याप्रमाणे यावेळीही तशीच मूक आहेत. हे मतदार राजदच्या गुंडांना घाबरून आपण मत कंदिलालाच (राजदचे चिन्ह) असे म्हणत आहेत पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी मते आम्हालाच दिलेली आहेत असा त्यांचा दावा आहे. बसपची मते मुख्यत्वे अशी मूकमते असतात.त्यामुळे प्रत्येक मतकल चाचणीमध्ये बसपला दिलेल्या असतात त्यापेक्षा प्रत्यक्षात जास्त जागा मिळतात. तसे एन.डी.ए विषयी होणार असा त्यांचा दावा दिसत आहे. प्रत्यक्षात काय होते हे पुढच्या रविवारीच कळेल.
1 Nov 2015 - 7:17 pm | गॅरी ट्रुमन
एन.डी.टि.व्ही. वर दाखविलेल्या कार्यक्रमात कोसी नदीच्या भागात पप्पू यादवलाही बराच पाठिंबा आहे असे दिसते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पप्पू यादवने खुद्द शरद यादव यांचा त्यांच्याच मधेपुरा मतदारसंघात पराभव केला होता.त्यानंतर ते राजदमधून बाहेर पडले. कोसी नदीच्या भागात त्यांचा पक्ष काही प्रमाणात राजदची यादव मते खाईल ही भाजपची अपेक्षा नक्कीच असेल. पण मधेपुरा भागात भाजपला फारसे स्थान नाही त्यामुळे पप्पू यादवने मते फोडून भाजपला फार फायदा होईल असे नाही. तसेच झंझारपूर भागात राजदचे माजी नेते देवेन्द्रप्रसाद यादव यांचा पक्ष मुलायमसिंग यादव यांच्या तिसऱ्या आघाडीचा सदस्य आहे. २०१४ मध्ये देवेन्द्रप्रसाद यादव यांनी राजद सोडून संजदमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुक लढवली.ही जागा भाजपने जिंकली.पण देवेन्द्रप्रसाद यादव झंझारपूरमधून पूर्वी पाचवेळा निवडून गेले आहेत त्यामुळे त्यांची स्वत:ची काही मते त्या भागात असतील ती राजद-संजदपासून फोडली जातील अशी भाजपची नक्कीच अपेक्षा असेल. प्रत्यक्षात काय होते हे पुढच्या रविवारीच कळेल. मी बिहार निवडणुकांविषयी एक्स-फॅक्टर हा तिसरा लेख लिहिणार होतो त्यातील इतर सगळे मुद्दे पहिल्या दोन लेखांमध्ये चर्चेत किंवा प्रतिसादात आले आहेत.म्हणून तिसरा लेख स्वतंत्र लिहित नाही.पण त्या लेखात लिहायचे पण अन्य कुठल्याच प्रतिसादात किंवा चर्चेत न आलेले हे दोन मुद्दे इथे लिहित आहे.
2 Nov 2015 - 7:59 pm | श्रीगुरुजी
जयपूर, इंदूर, दिल्ली आणि मुंबई येथील सट्टेबाजांचे नवीन अंदाज -
भाजप+ : १२७-१५०, संजद+ : ७०-१०९
रविवारीच समजेल हे अंदाज किती बरोबर येतात आणि कोणत्या शहरातल्या सट्टेबाजांचे अंदाज प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जातात ते..