आमच्याकडे नेहमी मेथी, पालक याचा घोळाणा करतात. त्याबरोबर कांद्याच्या पातीचा घोळाणा सुद्धा करतात. पोळी बरोबर खायला छान लागतो.
साहित्य:
1. कांद्याची पात
2. शेंगदाण्याची पुड
3. मीठ
4. साखर
5. तेल
कृती:
कांद्याची पात बारिक चिरून घ्या. एका बाऊल मध्ये चिरलेली कांद्याची पात,शेंगदाण्याची पुड,मीठ,साखर,तेल (सर्व अंदाजाने)टाका. सर्व मिश्रण चमच्याने एकत्र करा.
प्रतिक्रिया
15 Oct 2015 - 7:18 pm | रेवती
घोळणा दोनदा आलाय तरी इथेच प्रतिसाद देते. ही पाकृ वाचून गायब मिपाकर शाल्मलीची आठवण आली. तिने ही कांदापातीची कोशिंबीर म्हणून दिली होती व फारच टेस्टी लागते असे अनुभवास आले आहे.
15 Oct 2015 - 7:18 pm | राघवेंद्र
फोटु कुठे आहे ?
15 Oct 2015 - 7:26 pm | सूड
फोटो?
15 Oct 2015 - 7:37 pm | मदनबाण
फोटो ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Babla's Disco Dandia Theme (India, 1982) :- Babla
15 Oct 2015 - 8:08 pm | श्रीरंग_जोशी
घोळाणा माझा आवडता पदार्थ आहे. पाकृसाठी धन्यवाद.
पण फोटो मात्र हवाच. जेव्हाही उपलब्ध होईल तेव्हा प्रतिसादात प्रकाशित करा.
15 Oct 2015 - 9:48 pm | pradnya deshpande
असाच घोळाणा मेथीचाही करता येतो.सेम कृती आहे
15 Oct 2015 - 9:52 pm | मांत्रिक
याला खरंतर पचडी (कन्नड) म्हणतात, त्यात दही घालतात, आणि ती मेथी किंवा पालकची करतात!!!
18 Oct 2015 - 10:46 am | शेखरमोघे
मी "मराठी पचडी" देखील खाल्लेली आहे. पचडी हे नामकरण कदाचि़त दक्षिण महाराष्ट्रातले किन्वा उत्तर कर्नाटकातले असावे. चवीसाठी भिजलेली मुगाची डाळ किन्वा मोड आलेले मूगही त्यात घालता येतील.
18 Oct 2015 - 10:53 am | पाटीलअमित
लाटकर साहेब
कधी बोलवा जेवायला