आयटीवाले !

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
8 Oct 2015 - 7:59 am
गाभा: 

परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?

लोकांच्या मते
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Oct 2015 - 2:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

परदेशात स्थायिक झालेल्यांना ठाणे,नाशिक,मनमाड रेल्वे स्टेशनबाहेर मिळणारी मिसळ,उसळ 'अप्रतिम' लागते त्यातलाच प्रकार म्हणायचा.

बॅटमॅन's picture

9 Oct 2015 - 4:04 pm | बॅटमॅन

हा हा हा =)) =)) =))

मैत्रीनीला काय टपरीवर नेऊन चा पाजायचा व्हय? बरिस्ता मध कसा एम्बियन्स असतो!:P

असंका's picture

9 Oct 2015 - 1:01 pm | असंका

:-))

खटपट्या's picture

9 Oct 2015 - 1:02 pm | खटपट्या

सतत घरी व कामावर चांगल्याचुंगल्या 'दिसणार्‍या/राहणार्‍या' लोकात वावरल्यामुळे एक सुखकर, हवाहवासा असा सुपीरीआरीटी भाव मनात येतो

म्हंजे आयटीत असणारे सगळे दीसायला चांगलेचुंगले कींवा त्यांचे बायका/नवरे दीसायला चांगलेचुंगले असतात असे म्ह्णायचे आहे कारे दादा तुला ?

एशीने स्कीन चाम्गली राहते म्हणे. मग एक गोरी अन हजार गुण चोरी. परत पगारामुळे मेकप बिकप खर्च्यापाण्याला पैसे शिल्लक राहतात. कमज्यादीला तिथलेच आयटी चहाते असतातच. कपडे बिपडे तर ब्रॅण्ड्स आम्हाला आयटीमुळेच समजले ब्वा. नायतर बीवाय टेलरकडे कपडे शिवणार्‍याला आम्हाला कुठले म्हैत वॅन ह्युसन अन लुई फिलिप.
एवढे सगळे असलयावर दिसणारच कि ओ साजरे. अजून काय म्हणायचे?

खटपट्या's picture

9 Oct 2015 - 3:04 pm | खटपट्या

टापटीप म्हणा टापटीप..

असंका's picture

9 Oct 2015 - 12:58 pm | असंका

चांगली इन्साइट दिलीत...

धन्यवाद...!!

मुक्त विहारि's picture

9 Oct 2015 - 11:26 am | मुक्त विहारि

आणि रोचक प्रतिसाद....

कायले फुकट धुर काढू रहायाले सगळे??

सतिश गावडे's picture

10 Oct 2015 - 12:27 pm | सतिश गावडे

"सायाचे" शब्द राहिला काय लिहायचा? ;)

वाक्यात कुठं येणारे हा शब्द? आणि अर्थ काय म्हणजे त्याचा?
-इमानदारीत अज्ञानी

सतिश गावडे's picture

10 Oct 2015 - 2:53 pm | सतिश गावडे

तुमाले सायाचे मयीत नाही?

सायाचे

जातवेद's picture

10 Oct 2015 - 12:14 am | जातवेद

बर्‍याच जणांना माहित नसेल पण जे आयटी मधे काम करताहेत त्यांना सध्या वेगळ्याच चिंतेने ग्रासलय. ते म्हणजे ऑटोमेशन! आजच्या घडीला सर्वच मोठ्या आयटी कंपन्यांनी ऑटोमेशनची कास पकडायची ठरवली आहे त्यामुळे कर्मचार्‍यांना करो या मरो ची परिस्थिती उभी राहिली आहे. साहजिक आहे, हि चिंता आज मला काम मिळेल कि नाही अशी नसून आज पासून पाच किंवा दहा वर्षांनी भारतातील आयटी चे स्वरूप कसे असेल आणि आपण त्यात कुठे असू हि आहे. या ऑटोमेशनला बर्‍याच ठिकाणी विरोध झाला आणि कंपनीच्या कार्यकारी अधिकार्‍यांना कर्मचार्‍यांची, "औद्योगिक क्रांती मुळे नोकर्‍या जातील असे आधी वाटले होते, पण त्यामुळे फायदाच झाला कि नाही" अशा प्रकारची समजूत काढावी लागत आहे. (पण म्हणून तेव्हा नोकर्‍या गेल्याच नाहित असे नाही :-) )
भारतातल्या आयटीचे यापुर्वीचे मॉडेल यापुढे काम करणार नाही. आधी मा.तं. कंपन्या एखाद्या प्रोजेक्टवर जास्तीत जास्त कर्मचारी कसे लावता येतील हे बघत होती. जेणेकरून माणशी तेवढेच जास्तीचे बिलींग लावून जास्त नफा कमवता येईल. पण आता फोकस कमीत कमी कर्मचार्‍यांमधे ऑटोमेशन आणि आर्टिफीशीअल इंटेलिजन्स च्या सहाय्याने जास्तीत जास्त काम कसे करता येईल यावर आला आहे.
यामुळे दोन गोष्टी होणार,

  1. काहितरी शिक आणि आयटीत घुस, हि प्रथा हळू हळू बंद होईल
  2. पुर्वीसारखं एक टेक्नॉलॉजी शिकून काढले ५-७ वर्ष आणि मग मॅनेजर बनून झालो निश्चिंत असे चालणार नाही

चांगली काम मिळवण्याची अंतर्गत स्पर्धा फार तीव्र झाली आहे. त्यात भरीस भर म्हणजे बर्‍याच कंपन्यानी ऑनसाईट्/ऑफशोर रेशो बराच कमी केला आहे. त्यामुळे परदेशी जाण्यास फारच विलंब होत आहे अथवा अशी संधीच मिळत नाहिये. आधी १-२-३ वर्षात अमेरिकास्वारी, तिथे काही वर्षे नोटा छापून भारतात परत, मग लग्न, मग परत जमले तर एक स्वारी आणि मुल झाले कि भारतात सेटलमेंट हे चक्र मोडलेले आहे. आता अशी संधी मिळण्यासाठीच ५-६-७ वर्षे थांबावं लागत आहे.
थोडक्यात "आधीसारखं (सोपं) राहिलं नाही आता"! अजुन २५-३० वर्षे या क्षेत्रात काढायची असतील तर हा सर्व विचार करायलाच हवा.

अवतार's picture

11 Oct 2015 - 2:32 pm | अवतार

ही सत्य परिस्थिती आहे. ज्यांची सतत शिकत राहण्याची तयारी नाही अशांची झोप उडालेली आहे. मॅनेजर असून देखील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक झाले आहे. क्लायंटच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करतांना लीडपासून ज्युनियरपर्यंत सर्वांचीच दमछाक होत आहे. शिवाय सतत नवीन गोष्टी शिकूनही तग धरून राहण्याची शाश्वती नाही. मंदीचा वरवंटा कोणावर कसा आणि कधी फिरेल हे सांगता येत नाही. पिझ्झा आणि कोक घेऊन दोन दिवस आॅफिसमधे बसून राहणे हे अमेरिकन कल्चर शारिरिक पातळीवर स्वीकारले तरी मानसिक पातळीवर स्वीकारणे अवघड जात आहे. महत्वाच्या क्षणी कुटुंबीय, मित्र ह्यांच्याशी बोलायला वेळ नाही. पैसा मिळूनही आयुष्य हरवत चालल्याची भावना बळावत आहे. त्यातून येणारी व्यसनं, मानसिक ताण हे वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.
मनी इज ए बायप्राॅडक्ट आॅफ कल्चर. व्हेन इट कम्स इट ब्रिंग्ज इट्स कल्चर वुइथ इट.

काळा पहाड's picture

12 Oct 2015 - 1:03 am | काळा पहाड

अजुन २५-३० वर्षे या क्षेत्रात काढायची असतील तर हा सर्व विचार करायलाच हवा.

फारच ऑप्टिमिस्टीक आहात तुम्ही. मी पुढची १० वर्षं ही वेळ्चौकट धरली आहे. कदाचित एक दोन वर्षं पुढे मागे. भारतातील आयटी कंपन्या दुकानं बंद करतील. जे पाट्या टाकायचे उद्योग करतायत ते आधी घरी जातील. विषयतज्ञ (तांत्रिक तज्ञ नव्हे कारण ऑटोमेशन इतकं असेल की तांत्रिक तज्ञांची गरजच भासणार नाही) काही वर्षं टिकतील. विषयतज्ञ + तांत्रिकतज्ञ असे लोक तग धरतील. भारतात प्रचंड बेकारी येईल (जर डिजिटल इंडिया वगैरे जमलं नाही तर आपण सरळ काळ्या काँग्रेस युगात परत जावू). हे सगळं केव्हा? तर फेडरल रिझर्व आणि अमेरिकन राजकारण्यांच्या करणीने त्या पूर्वीच जागतिक मंदी आली नाही तर!

जातवेद's picture

12 Oct 2015 - 11:27 am | जातवेद

१० वर्षानंतर जर क्षेत्र बदलायचेच आहे, तर आताच का नाही बदलावे? मुळात एवढी वर्षे आयटीत काढल्यावर पुढे कशा प्रकारची नोकरी मिळेल? जरी शिक्षण इतर क्षेत्रात झाले असले तरी शुन्यापासूनच सुरुवात करावी लागेल; प्रसंगी अत्यंत कमी पगारावर. आणि तुम्ही म्हणता तशी प्रचंड बेकारी आलीच तर तेव्हा नवीन नोकरी मिळणेही प्रचंड अवघड होणार नाही का?
मग पर्याय उरतो तो व्ययसाय करण्याचा. घराचा हफ्ता फेडून उरलेल्या भांडवलात व्ययसाय करणे शक्य आहे का? तेव्हा घर विकण्याचा तर प्रश्नच उरत नाही, कारण लाखो जणांची हफ्ता भरायची ऐपत संपल्यावर घरांच्या किमती सर्रकन खाली येतील आणि लाखोंच्या उच्चशिक्षीत बेरोजगारांच्या देशात व्यवसाय कोणता करावा?

भारतातील आयटी उद्योग एकदम रसातळाला जाईल हि कल्पना चुकीची आहे. जगाला नेहमीच माहिती तंत्रज्ञान सेवांची आणि उत्पादनांची गरज राहणार आहे. किंबहुना ती वाढतच जाणार आहे. आपण फक्त येत्या काळात रेलेवंट राहू आणि आपले काम असे असेल कि उद्या नोकरकपात झालीच तर आपला नंबर त्यात लागणार नाही असे काम करत रहावे.

तर्राट जोकर's picture

12 Oct 2015 - 11:41 am | तर्राट जोकर

आपण फक्त येत्या काळात रेलेवंट राहू आणि आपले काम असे असेल कि उद्या नोकरकपात झालीच तर आपला नंबर त्यात लागणार नाही असे काम करत रहावे.

इस बात की कोनो गारंटी नही.

नोकरकपात ही सर्वस्वी कंपनीवर अवलंबून आहे. कामगारांच्या गुणवत्तेवर नाही. कितीही चांगले कामगार असतील आणि कंपनीलाच काम मिळत नसेल तर कुठून पगार येईल..? नोकरीवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलणे हीच काळाची गरज आहे. जोडधंदा शोधणे, नोकरीसोबत वेळ काढून स्वतःचे काहीतरी डेवलप करत राहणे हे फार आवश्यक होत चालले आहे. छोट्या उद्योजकांसाठी सॉफ्टवेअर्स स्वस्तात बनवून देणे याला भविष्यात खूप स्कोप आहे असे वाटते. दूरदर्शीपणा व चालू घडामोडींच्या अभ्यास करणे, त्यानुसार निर्णय घेणे हेही आवश्यक आहे.

हे क्षेत्र अ‍ॅबसोल्युट होणार नाहीच पण प्रचंड रोजगार देण्याची क्षमता पुर्णपणे संपुष्टात येइल त्याचे काय? नवीन येणार्‍यांनी या क्षेत्रात येतांना फार विचार करावा असा माझा सल्ला आहे. प्रत्येक क्षेत्राचा एक जीवनक्रम असतो. आयटीचाही आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Oct 2015 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

आयटी संपली / संपणार आहे असे हाकारे पूर्वीही झाले आहेत... Y2K, टेक बबल फुटला तेव्हा आणि दर रिसेशन (किंवा रिसेशनच्या अफवे) बरोबर.

आयटी उद्योग इतर उद्योगधंद्यांपेक्षा वेगळा आहे. तो एक "स्वतंत्र" उद्योग/व्यवसाय तर आहेच पण, "इतर कोणत्याही उद्योग/व्यवसायाला अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवण्याची क्षमता असलेला" उद्योग/व्यवसाय आहे. हे त्याचे दुसरे रूप, जगातला शेवटचा नॉन-आयटी उद्योग/व्यवसाय शिल्लक असेपर्यंत तरी, त्याचे महत्व अबाधित ठेवेल.

शिवाय, खर्‍या उद्योजकांचे मेंदू आणी काळजे (सुदैवाने) वाटतात त्यापेक्षा जास्त खंबीर व कल्पक असतात. दर उतारचढावात कमकुवत नष्ट होतात आणि जुन्यातले बळकट लोक व काही नवे उद्योग/उद्योजक उभारून पुढे येतात. "नवीन परिस्थितील फायदे हेरून त्यांचा फायदा घेणे व तोट्यांना वळसा घालून पुढे जायचा मार्ग शोधणे" ज्यांना जमेल ते तगतील व/किंवा अजून विकसित होतील. इतर कचर्‍याच्या डब्यात जातील. त्यामुळे उगाच निराश न होता बदलत्या परिस्थितील आपापला मार्ग निवडून तशी तयारी कराणेच योग्य... Change is the only constant thing in this world !

आत्तापर्यंतचा पृथ्वीच्या विकासाचा आलेख पाहिला तर हेच दिसून येते की दर आपत्तीमध्ये तगुन राहीलेले जीव/लोक/उद्योग विकासाचा स्तर अधिकाधिक वर घेऊन गेले आहेत. "सर्व्हाव्हल ऑफ द फिटेस्ट" हे तत्व सगळीकडे लागू होते !

तर्राट जोकर's picture

10 Oct 2015 - 3:28 pm | तर्राट जोकर

धागा मेला......, धागे की मौत हो चुकी है.

ना कोइ आहट, ना हलचल, सुखे पनघट
कोई सिसकिया, ना रुदालीयोंका जमघट.

खामोश रहके वो इल्जाम मुकर गये.
क्यों जवाब दे इतने लोग किधर गये.

१०+ वर्शे वर्षे आय.टीत काढल्यावर सुद्धा दर वर्शी निदान २ तरी नवीन टेक्नोलॉजी शिकाव्या लागताहेत कारण माहीतिये कि नाही शिकलो तर नारळ मिळालाच म्हणून समजा :-)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Oct 2015 - 3:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दर दोन वर्षांनी शिकावे लागत असेल तर तंत्रज्ञान अगदीच कचकड्याचे आहे असे म्हणावे लागेल असे ह्यांचे मत.
जे शिकतात ते खरोखरच उच्च तंत्रज्ञान असते की ए.पी.आय.चा मुलामा चढवलेला कुठलातरी प्रोग्रॅम?

जातवेद's picture

11 Oct 2015 - 8:06 pm | जातवेद

आले का तुमचे हे? तुमचे 'हे' पारंपारिक शेती करतात कि गिलावा करतात वर्षानुवर्षे काहिच न शिकता काम करायला?

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Oct 2015 - 4:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

आमि अजून ६ वर्ष त्येच त्ये करतुय … अजूनबी लय डिमांड हाये त्याले.

कळण्यासाठी लिहिलय ओ. मुद्दा समजावून घ्या.

धर्मराजमुटके's picture

12 Oct 2015 - 9:40 am | धर्मराजमुटके

सकाळमधील ह्या लेखांचा आणि त्याखालील प्रतिक्रियांचा आनंद घ्या.

दूवा क्र. १

दूवा क्र. २

आयटीतील कामगारांना सध्या कधी बुडावर लाथ बसेल अशी कायम चिंता असते.
जर्रा कुठे बेंच वर आला की लग्गेच दुसरी कम्पनी शोधायला लागतात.

बिहाग's picture

13 Oct 2015 - 5:42 pm | बिहाग

गेले १० १५ वर्षतरी आशीच परिस्थिती आहे आताची नाही. बर नोकरी नाही बघितली तर सुलभ मासिक हप्ते कोण भरणार ?

विजुभाऊ's picture

14 Oct 2015 - 10:04 am | विजुभाऊ

<माई मोड ऑन >अरे बिहाग्या आयटीतली ती कचकड्याची टेक्नॉलॉजी ,फट म्हणता जुनी होउन बाद होते. आमच्या ह्यांच्या हापिसात ते कसली वजाबाकी करायची यंत्रे आली आणि याला सुरवात झाली. ह्यानी त्यांच्या कंपनीत सत्तावीस वर्षे एकाच टायपिंग मशिनवर काम केले. ते टायपिंग मशीन आणि हे दोघेही एकाच वर्षी रीटायर झाले. कंपनीने रीटायरमेंट्च्या कार्यक्रमात त्याना ते मशीन गिफ्ट भेट दिले. अज्जून आहे ते आमच्या माळ्यावर. दरवर्षी न चुकता खंडेनवमीला पूजा असते त्या मशीनची आमच्याकडे. < माइ मोड ऑफ्फ>
खीक्क.....

हेमंत लाटकर's picture

14 Oct 2015 - 1:25 pm | हेमंत लाटकर

आयटी क्षेत्र म्हणजे, "दिसत तस नसत".

@ टका
थ्रीफोर्थ टीशर्ट कसा असतो रे?

टका, आयडीसारखे टवाळखोर दिसता.:)

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2015 - 2:00 pm | टवाळ कार्टा

टका, आयडीसारखे टवाळखोर दिसता.:)

तुम्हाला(सुध्धा) आयडीवरून माणूस तस्साच आहे याचा शोध लावता येतो हे पाहून चान वाटले...खालील आयडींबद्दलसुध्धा हेच मत आहे का?

बॅटमॅन
शब्दबम्बाळ
तर्राट जोकर
पैसा
फुलथ्रॉटल जिनिअस
आणि असे अनेक आयडी

हेमंत लाटकर's picture

14 Oct 2015 - 2:22 pm | हेमंत लाटकर

@ टका

मजेत म्हणालो.

"थ्रीफोर्थ टीशर्ट कसा असतो रे?" हे वाचून खूप हसू आले.

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2015 - 3:30 pm | टवाळ कार्टा

खिक्क...मी पण मजेतच लिहिलेले

विजुभाऊ's picture

14 Oct 2015 - 4:58 pm | विजुभाऊ

ख्खीक्क. ख्खीक्क्क

अभिजित - १'s picture

17 Oct 2015 - 8:20 pm | अभिजित - १

बाकी विजू काका तुम्ही कितीही IT ला हलक्यात काढा . फोक्स वागेन ला जेव्हा तो झोल करायचा होता तेव्हा कोणी मेक्यानिकल वाल्या कडे नाही गेले ते. IT कडे गेले.

प्यारे१'s picture

17 Oct 2015 - 8:48 pm | प्यारे१

हे आयटीचं कौतुक आहे?

हेमंत लाटकर's picture

14 Oct 2015 - 5:18 pm | हेमंत लाटकर

टवाळ कार्टा चा अर्थ खोडकर मुलगा.

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2015 - 5:26 pm | टवाळ कार्टा

हो का....मला माहितचं नव्हतं :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Oct 2015 - 5:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हे !!! आयटी(बद्दलच्या चर्चे)ला इतक्या लवकर इतके वाईट दिवस येतील असे वाटले नव्हते :)

चर्चेला तसेही कधीच वाईट दिवस नव्हते.
सत्तेत यायच्या अगोदर कितीतरी वर्षे "बौद्धिके " या नावाखाली खुल्या चर्चा ब्यान केल्या होत्या.
इतरांच्या बाबतीत असे केले की त्याला गळचेपे म्हणयचा रिवाज होता.
आता आयटीबद्दलच्या चर्चेचे म्ह्णत असाल तर ती सदोदित चालूच असते.

हेमंत लाटकर's picture

15 Oct 2015 - 10:16 am | हेमंत लाटकर

खालील आयडीचे डिक्शनरीतील अर्थ. :)

बॅटमॅन - लष्करी अधिकार्याचा सेवक
शब्दबम्बाळ - पाल्हाळिक
तर्राट जोकर - भारी विदुषक
पैसा - मानमरातब चाहणारे
फुलथ्रॉटल जिनिअस - उच्चतम हुशार

टवाळ कार्टा's picture

15 Oct 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा

आँ...अच्च जालं तलं

त्यामुळे खरे पाहता आल्फ्रेडच बॅटमॅन आहे.

("गंगाधर ही शक्तिमान है" च्या चालीवर वाचावे.)

प्यारे१'s picture

17 Oct 2015 - 8:50 pm | प्यारे१

हमारे नाम का अर्थ नहीं बताएंगे पंडितजी?

श्रीरंग_जोशी's picture

17 Oct 2015 - 9:06 pm | श्रीरंग_जोशी

विजुभाऊ स्वतः मातंमध्येच आहेत नं?.

बहुधा या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍यांपैकी काहींची जेवढी वयेही नसतील तेवढा व्यावसायिक अनुभव विजुभाऊंकडे असणार आहे.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 3:45 am | तर्राट जोकर

माझं वय ३५ आहे आणि माझ्याकडे आयटीचा ३५ सेकंदांचाही अनुभव नाही. :-)

विजुभाऊ's picture

20 Oct 2015 - 10:56 am | विजुभाऊ

हो आहे.
पण आयटी इंडस्ट्रीशी दूरान्वयेही संबन्ध नसलेल्या लोकांची अशी मते का बनावीत हा मलाही संभ्रम आहे.
सुरुवातीची काही वर्षे तर लोक "कॉलसेंटर" म्हणजे काहितरी वेगळाच प्रकार अस्तो असे समजायची. त्याना समजावताना नाकी नऊ याय्चे.

तर्राट जोकर's picture

20 Oct 2015 - 1:16 pm | तर्राट जोकर

पण आयटी इंडस्ट्रीशी दूरान्वयेही संबन्ध नसलेल्या लोकांची अशी मते का बनावीत हा मलाही संभ्रम आहे

असे विधान आपण कसे काय करू शकतात. आयटीवाले इथे याच जगात राहतात, खातात-पितात-खर्च करतात. ज्यांची एक लाइफस्टाइल असते, त्यांच्याबद्दल इतरांना कुतुहल वा विशिष्ट मत असणे शक्य आहे.

पब मधे जाणारे बहुतेक कॉलसेंटर मधले लोकच असतात त्यामुळे पुण्याचे कल्चर बिघड्त चालले आहे हे आणखी एक मत कोणीतरी पिंकायचे.

मोग्याम्बो's picture

20 Oct 2015 - 5:17 pm | मोग्याम्बो

भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो

ह्याला प्रमुख कारण म्हणजे भारतीयांची मानसिकता. अजूनही अनेकजण पायरेटेड विंडोज वापरतात. सोफ्टवेयर ही विकत घेण्याची गोष्ट आहे हे अजूनही भारतीयांना पटत नाही. असे अनेक भारतीय आहेत जे आय फोन वापरतात पण एखादा गेम किंवा अॅप्लिकेशन साठी पैसे देण्यास तयार होत नाहीत. अशी मानसिकता असताना प्रोडक्ट बेस कंपनी कशी नफा कमवणार?

धाग्यात बरेच जण म्हणाले की पुढील २० वर्षांमध्ये IT क्षेत्राला वाईट दिवस येतील. मला असे वाटत नाही. माझ्यामते ते शक्य नाही. भारताची त्रांत्रिक गरज प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात भारताच्या IT क्षेत्रासाठी भारत हीच मोठी बाजारपेठ बनणार आहे.

अभिजित - १'s picture

20 Oct 2015 - 7:08 pm | अभिजित - १

अरेच्या !! इतक्या कठीण प्रश्नांचे उत्तर इतके सोपे आहे तर.

तर्राट जोकर's picture

20 Oct 2015 - 11:57 pm | तर्राट जोकर

समस्या सोडवायच्या असतील तर उपाय खूप असतात. आपल्याला मोबाँड माहीती असेल. एम-इंडीकेटर वापरत असाल. फुकट आहे. त्यांना जाहिरातीतून प्रचंड पैसा मिळतोय. युजर्सनी विकत घेतले नसते. विकत घेतले असते त्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहेत. एवढं उदाहरण पुरेसे आहे.

भारतीय मानसिकतेला दोष द्यायचा असेल तर तो सॉफ्ट्वेअर बनवणार्‍यांच्या द्या. कोण पैसे देणार नाही, सगळ्यांना फुकट पाहिजे ह्या विचाराने कुणी काही बनवत नाही. पैसे मिळाले पाहिजे म्हणून कोणी काम करत असेल तर ते कधीच होणार नाही. कळकळ पाहिजे. तळमळ पाहिजे. कित्येक एकांडे शिलेदार छोटी छोटी सॉफ्टवेअर बनवतात. फ्री-वर्जन देऊन नंतर पेड वर्जनमधे चांगले कमावतातही. अशा पद्धतीने काम करणार्‍या भारतीयांचे काही उदाहरण आहे का?

शाम भागवत's picture

10 Jun 2016 - 9:40 pm | शाम भागवत

बराहा याचे उत्तम उदाहरण होऊ शकेल. जवळजवळ ७-८ वर्षे बराहा फुकट होते. शेवटचे फ्री व्हर्जन ९.२ आता मात्र पैसे पडतात. खपत की नाही ते माहित नाही.

शाम भागवत's picture

10 Jun 2016 - 9:43 pm | शाम भागवत

पण प्रॉडक्ट म्हणून सर्वात यशस्वी म्हणायचे असेल तर क्विक हीलचे नाव घ्यावे लागेल. म्हणजे माझी अशी समजूत आहे.

अर्धवटराव's picture

8 Jun 2016 - 12:37 am | अर्धवटराव

बाकि बरोबर आहे... प्र. क्र. ८ बद्दल नो कमेण्ट्स ;)

रमेश भिडे's picture

8 Jun 2016 - 12:47 am | रमेश भिडे

200 च्या दिशेने विजुभौंनी धागा दौडवला आहे.

विजुभौ, आपलेच धागे वर आणत असतात असं एक निरीक्षण आहे.

सिरुसेरि's picture

10 Jun 2016 - 1:22 pm | सिरुसेरि

"डफलीवाले डफली बजा " सारखे "आयटीवाले किबोर्ड बजा" असे गाणे यायला हरकत नाही .

कोवीड नंतर ही या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाहिय्ये

चित्रगुप्त's picture

12 Feb 2023 - 6:32 pm | चित्रगुप्त

माझ्या नात्यातील 'आयटीवाल्यां'ना या लेखाचा दुवा मी पाठवला होता, त्यापैकी माझ्या पुतण्याने खालील मजकूर पाठवलेला आहे:

९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही

याचं कारण असं की भारतात STEM (Science, Technology, Engineering Mathematics) मध्ये Masters आणि PhD level च्या universities अत्यल्प आहेत.
Innovation needs research and USA is 10x ahead of India in research capacity. China has invested strategically in research capacity over the last 20 years - I have seen it personally - and has gone far ahead of India in innovation. China has companies like Tencent and Alibaba that rival Microsoft and Amazon