ब्लॉग

जयेश माधव's picture
जयेश माधव in काथ्याकूट
17 Dec 2008 - 10:14 pm
गाभा: 

मला blogspot.com वर माझा ब्लॉग बनवायचा आहे.कुणी मला मदत करेल काय?

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

17 Dec 2008 - 10:22 pm | पांथस्थ

हे अतिशय सोपे काम आहे. त्यामुळे तुम्हाला नेमेकी काय मदत हवी आहे हे लक्षात येणे कठीण आहे. जरा स्पष्ट खुलासा करणार का?

उदा. - खाते कसे उघडावे, टेम्प्लेट कसे निवडावे - बदलावे ई.ई.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

सागर's picture

17 Dec 2008 - 11:42 pm | सागर

जयेश,

थोडीशी प्राथमिक माहिती देत आहे . कदाचित उपयोग होईन.

१. http://blogspot.com/ या संकेतस्थळावर जावे
२. येथे ब्लॉग तयार करण्यासाठी तुमच्याकडे जी-मेलचे अकाऊंट असणे आवश्यक आहे. हेही फुकट आहे http://www.google.co.in/ किंवा http://www.gmail.com येथे नोंदणी करता येईल... (मि.पा.वर लिहिता आहात म्हणजे ह्या प्राथमिक बाबींचा तुम्ही विचार केला असेलच.. तरीही माहीती म्हणून सांगत आहे)
३. create blog या दुव्यावर क्लिक केले की तुम्ही नवीन ब्लॉग तयार करु शकता - किंवा ही लिंक थेट उघडलीत तरी चालेल.... http://www.blogger.com/create-blog.g
४. या पानावर दिलेल्या सूचनांचे पालन केले तर ब्लॉग सहजपणे तयार कराल याची खात्री आहे

ब्लॉगसाठी शुभेच्छा...
सागर

संदीप चित्रे's picture

18 Dec 2008 - 12:13 am | संदीप चित्रे

जयेश,
तुमचे जर गुगल खाते असेल (जीमेल, ऑर्कुट इ.) तर तो आय.डी. आणि पासवर्ड ब्लॉगस्पॉटसाठी चालतो.

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 1:07 am | विसोबा खेचर

जळ्ळं आम्हाला कोण आलं होतं शिकवायला? आम्ही आपले आपण शिकलो!