एक वर्षानंतर . . .

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 May 2015 - 12:31 pm
गाभा: 

१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.

परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.

मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.

एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.

आर्थिक

विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील.

२०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली.

औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे.

आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे

भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे.

२०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले.

वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली.

थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली.

ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.

मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे.

थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे.

जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे.

प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे.

५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.

मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.

जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.

महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.

आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.

संरक्षण व परराष्ट्र धोरण

आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता.

त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती.

मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला.

काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला.

येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती.

मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे.

गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे.

मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता.

जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत.

ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला.

मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye".

याच लेखात पुढील वाक्ये आहेत.

Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing.

चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत.

२ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.

२००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली.

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे.

"संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.

भ्रष्टाचार निर्मूलन

गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे.

मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे.

कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे.

देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे.

"भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.

राजकीय

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल.

महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय.

दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित.

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल.

नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते.

नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते.

मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल.

एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे.

राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.

सामाजिक

गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते.

काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती.

मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे.

एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे.

"सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.

विरोधी पक्षांची कामगिरी

संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही.

लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित.

महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत.

एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे.

विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण.

_________________________________________________________________________________

मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे.

मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते.

_________________________________________________________________________________

एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण.

_________________________________________________________________________________

अच्छे दिन

माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की!

_________________________________________________________________________________

तळटीप

विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो.

वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन.

जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल.

Now shoot

_________________________________________________________________________________

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Oct 2015 - 9:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नेहरूंसारखा दूरदर्शी नेता नसता तर आय.आय.टी.,आय आय एम. डी आर डी. ओ सारख्या संस्था उदयाला आल्या असत्या का ?बससेवा सुरु करणे म्हणजे मुत्सद्दीपणा नव्हे. परिवहन मंडळाचे अधिकारी ते करत असतातच.

श्रीगुरुजी's picture

12 Oct 2015 - 10:21 pm | श्रीगुरुजी

नेहरूंसारखा दूरदर्शी नेता नसता तर आय.आय.टी.,आय आय एम. डी आर डी. ओ सारख्या संस्था उदयाला आल्या असत्या का ?बससेवा सुरु करणे म्हणजे मुत्सद्दीपणा नव्हे. परिवहन मंडळाचे अधिकारी ते करत असतातच.

देवेगौडा नसते तर भारतात आंतरजाल सुरू झाले असते का किंवा गुजराल नसते तर भारतात भ्रमणभाष सेवा सुरू झाली असती का या प्रश्नाचे जे उत्तर आहे तेच इथे लागू आहे.

श्रीगुरुजी,

तुमचा प्रतिसाद वाचल्यावर माईसाहेबांच्या प्रश्नातच दडलेलं उत्तर सापडलं. संस्था सुरू करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टी बाळगणे नव्हे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आधीपासून कार्यरत होतेच.

आ.न.,
-गा.पै.

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 11:07 pm | dadadarekar

क्यु रुला रही है ?

बस बोलते बोलते अब एरोप्लेन ( और उसमेंसे छोडे उग्रवादी ) की याद आकर श्रीगुर्जी रो पडेंगे !

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Oct 2015 - 9:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर

संस्था सुरू करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टी बाळगणे नव्हे

आंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू करणे ह्या गोष्टी भिन्न आहेत.वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२,आय.टी.अ‍ॅक्ट-२००० ह्या गोष्टी झाल्याच असत्या असेच समजायचे ना?

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 1:59 pm | श्रीगुरुजी

आंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू करणे ह्या गोष्टी भिन्न आहेत.वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२,आय.टी.अ‍ॅक्ट-२००० ह्या गोष्टी झाल्याच असत्या असेच समजायचे ना?

नरसिंहराव यांनी १९९५ मध्येच पोखरणची तयारी केली होती, परंतु अमेरिकेला त्याचा वास लागल्यावर त्यांच्यावर दडपण आणून अमेरिकेने ती चाचणी होऊन दिली नाही. हे लक्षात घेऊन वाजपेयींनी अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकून ती चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. वाजपेयी पंतप्रधान नसते तरी पोखरण-२, आय टी अ‍ॅक्ट - २००० इ. गोष्टी नक्कीच झाल्या असत्या.

प्यारे१'s picture

13 Oct 2015 - 2:01 pm | प्यारे१

कुठल्या प्रकारची धूळ होती म्हणे?
काय दराने घेतली?
किति कोटेशन मागवले होते?
वगैरे वगैरे....

गॅरी ट्रुमन's picture

13 Oct 2015 - 2:09 pm | गॅरी ट्रुमन

यथेच्छ टर आणि टिंगळटवाळी उडवून झाली असली आणि खरोखरच काय झाले होते हे जाणून घ्यायची इच्छा असली तर एक गोष्ट नक्कीच शोधून बघा.१९९८ च्या अणुचाचण्या भारताने अमेरिकेला अंधारात ठेऊन केल्या होत्या आणि त्याला अमेरिकेने intelligence failure of the decade असे म्हटले होते. बघा जरा शोधाशोध करून. नक्कीच काहीतरी मिळेल.

श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं भाजप सरकारची पाठराखण चालवली आहे त्यामुळे थोडी खेचावीशी वाटली. ;)

मुळात काँग्रेस सरकार असतं तर असं झालं नसतं का असा प्रश्न आहे. कारण देशाचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण हे शक्यतो सरकार निरपेक्ष असतं ऐकलं आहे.

आज निर्णय घेतला आणि उद्या अणुचाचण्या झाल्या असं होणं शक्य नाही. १९९५ साली नरसिंहराव सरकार वर चाचण्या न करण्यासाठी दबाव आणला होता म्हणजे तेव्हा सगळी यंत्रणा सज्ज होती. १९९८ साली अणुचाचण्या झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया नकारार्थी होती का?

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 2:27 pm | श्रीगुरुजी

श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं भाजप सरकारची पाठराखण चालवली आहे त्यामुळे थोडी खेचावीशी वाटली. ;)

पाहिजे तेवढी खेचा हो. मी एंजॉय करतो.

मुळात काँग्रेस सरकार असतं तर असं झालं नसतं का असा प्रश्न आहे. कारण देशाचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण हे शक्यतो सरकार निरपेक्ष असतं ऐकलं आहे.

मी आधीच्याच प्रतिसादात लिहिले आहे. काँग्रेस सरकार असते तरी पोखरण-२ झालेच असते.

आज निर्णय घेतला आणि उद्या अणुचाचण्या झाल्या असं होणं शक्य नाही. १९९५ साली नरसिंहराव सरकार वर चाचण्या न करण्यासाठी दबाव आणला होता म्हणजे तेव्हा सगळी यंत्रणा सज्ज होती. १९९८ साली अणुचाचण्या झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया नकारार्थी होती का?

पोखरण-२ झाल्यावर कम्युनिस्टांनी तर जाहीर विरोधच केला होता. पाकिस्तानवादी पुरोगामी विचारवंतांनी (उदा. कुलदीप नय्यर) देखील विरोध केला होता. कॉन्ग्रेसचा विरोध वेगळ्या प्रकारचा होता. शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना भाजपने ही चाचणी याचवेळी का घेतली असे अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीररित्या विचारले होते आणि त्याचे उत्तर देखील दिले होते. सरकारला जयललिता त्रस्त करीत होती व त्यामुळे सरकारची प्रतिमा खालावत होती. आपली प्रतिमा जनमानसात उंचावण्यासाठी पोखरण-२ केले गेले अशी टीका काँग्रेसवाले करीत होते.

कपिलमुनी's picture

13 Oct 2015 - 4:13 pm | कपिलमुनी

पोखरण -१ च्या वेळी काय झाला होता ??

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 8:16 pm | श्रीगुरुजी

त्यावेळी काय झाले होते ते आठवत नाही/माहिती नाही.

मालोजीराव's picture

16 Oct 2015 - 2:59 pm | मालोजीराव

नेहरूंच्या इतका International प्रेसेंस असणारा नेता त्यांच्यानंतर झाला नाही, मोदी आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत हे मान्य करावे लागेल पण त्यांचाकडे तो क्लास आणि चार्म नाही

कपिलमुनी's picture

16 Oct 2015 - 3:04 pm | कपिलमुनी

आता दंगा होणार
मालोजीराव , एक तर नेहरू मोदी तुलना ! आणि डायरेक्ट निकाल लावून टाकलात !
पळा!!!

मृत्युन्जय's picture

16 Oct 2015 - 4:13 pm | मृत्युन्जय

पण त्यांचाकडे तो क्लास आणि चार्म नाही

निर्विवाद सत्य

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Oct 2015 - 5:25 pm | बिपिन कार्यकर्ते

"मोदी सरकारने 1 वर्षात काय केले, काय केले नाही हे कसे काय ठरवणार."

सोप्पंय! ५५ वर्षात काँग्रेसने काहीही केले नाही हे ज्या निकषांवर ठरवले त्याच निकषांवर वरील प्रश्नाचेही उत्तर निघेलच की. काय म्हणता?

बाकी मोदी आल्यावर २-३ महिन्यातच मंगळयान पोचलं मंगळावर, ते ही पहिल्याच प्रयत्नात. किंवा आज जे काही पब्लिक अमेरिकेत आहे आणि ज्यांना भुलवायचा प्रयत्न मोदी करत आहेत, त्यातले बहुसंख्य हे काँग्रेसच्याच काळात उदयास आलेल्या आयायट्या आणि आयायेम (आणि तत्सम) वगैरे ठिकाणाहून शिकून बाहेर पडले आहेत. This is just FYI बरं का.

अजून एक म्हणजे, 'त्यांनी ५५ वर्षे नालायकपणा केला, मग आता आम्हाला संधी द्या' अशा मुख्य युक्तिवादामुळे सत्ता मिळाल्यावर, एका वर्षात काही तरी दिशा दिसण्याची (फळं मागतच नाहीये, दिशा तरी दिसू द्या किमान) अपेक्षा आहे. त्याऐवजी जे काही दिसते आहे त्यावरून फारसे वेगळे काही होईल असे वाटत तरी नाहीये. अजून ४ वर्षे वाट बघूच. आणि झालेच यशस्वी मोदी तर देशाचेच भले होईल, मोदींबद्दल आकस नाहीच. कोणाच्या तरी काठीने साप मरू दे, बास!

dadadarekar's picture

12 Oct 2015 - 11:08 pm | dadadarekar

चौथे सोनेरी पान सुरु झाले!

गामा पैलवान's picture

12 Oct 2015 - 11:20 pm | गामा पैलवान

दादोबा, तीनपत्ती खेळताय वाटतं? चौथं पान लावलंत ते!
आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 9:14 am | कैलासवासी सोन्याबापु

गुरूजी तुमची विचारसरणी आत्यंतिक उजवी दिसते, अम्हांस काहीच आत्यंतिक पचत नाही देवानु, मग तो दादु असो का गुरूजी, त्यातल्यात्यात तुम्ही ज़रा आकड़े वगैरे देता (कल्याण लकी ड्रॉ नाही स्टैटिस्टिक्स म्हणतो मी) म्हणुन थोड़े बरे पड़ते, पण आत्यंतिक विचारांनी काहीही साध्य होऊ शकत नाही हे उगाच्च तुमच्याजवळ नोंदवावे वाटले बघा, तुम्ही कितीही द्वेष करा ह्या देशाच्या प्रगति मधे नेहरुंचा एक हिस्सा अन कंट्रीब्यूशन आहेच आहे! अर्थात ह्याच्यासाठी आता माझ्यावर ही टिका करणार असाल तर कठीण आहे

नाव आडनाव's picture

13 Oct 2015 - 9:38 am | नाव आडनाव

लै वेळा +

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Oct 2015 - 9:57 am | माईसाहेब कुरसूंदीकर

संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच प्रोब्लेम आहे असे ह्यांचे मत.नेहेरूंनीच बोस ह्यांचा अपघात घडवला, नेहेरूंना पटेल नको होते,नेहरू मराठी द्वेषक होते..असल्या पुड्या पूर्वीपासून सोडल्या जायच्या ह्या लोकांकडून.नेहरूंच्या राजकारणाला विरोध करता येईल पण देशोदेशीच्या लोकांन भेटून्,शेकडो कोटींची मदत घेउन ह्या संस्था उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला हे वास्तव आहे.
गाय खावी की खाउ नये,शाकाहार की मांसाहार,वंदे मातरम म्हणावे की म्हणू नये हा वाद नेहरू घालत बसले नाहीत.

dadadarekar's picture

13 Oct 2015 - 10:18 am | dadadarekar

चाय पे चर्चा

गाय पे चर्चा

माय पे चर्चा

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 10:49 am | मृत्युन्जय

गाय खावी की खाउ नये,

घटनेच्या ४८ व्या कलमाप्रमाणे गायींचे शिरकाण रोखणे हे सरकारचे काम आहे. ही घटना तीच जी बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने लिहिली आणि श्री जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना लागू झाली. ही घटना आपल्या सर्वांच्या वरची आहे. त्यामुळे नेहरुंनी गाय खावी की खाऊ नये यावर वाद घातला नाही हे वक्तव्य अंशतः मान्य कारण त्यांनी वाद नाही घातला तर सरळ हा सर्वोच्च कायदा करुन मोकळे झाले. तर अश्या या गाईंना मारणे हे घटनाबाह्य कृत्य असल्याचे आपल्या निदर्शनास आणुन देतो.

कलम ४८ खाली देत आहे:

Organisation of agriculture and animal husbandry The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle

dadadarekar's picture

13 Oct 2015 - 11:05 am | dadadarekar

गाय , म्हैस व शेळी यांचा समावेश होतो.

हिंदू लोक शेळी खायचे कधी बंद करणार ?

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 11:44 am | मृत्युन्जय
  1. मी गाय म्हैस शेळी बोकड काहिही खात नाही.
  2. वरती उद्धृत केलेले वाक्य घटनेतले आहे. जी सगळ्यांना समान लागू पडते. फक्त हिंदुंना नाही. त्यामुळे हे प्राणी सर्वधर्मीयांनी खाणे बंद करावे अथवा घटना बदलुन घ्यावी.
  3. वरती उद्धृत केलेले वाक्य घटनेतले आहे. ते माझे मत असेलच असे नाही पण घटनेला सर्वोच्च प्राधान्य असते असे कायद्याचा अभ्यास करताना वाचले होते. खरे खोटे नेहरु जाणे.
  4. नेहरुंनी असले वाद घातले नाहित असे इनोदी वक्तव्य माईंनी केले (माई, नाना, हितेश, सचीन, जिनीयस, फिलोसॉफर वगैरे सगळे तुम्हीच असे काही म्हणतात. जे इथे विचारात घेतले गेलेले नाही त्यामुळे माईंचा सेपरेट उल्लेख केला) म्हणुन केवळ पुरावा दिला. स्वतः नेहरुंनी देखील असल्या गंमती केल्या आहेत.
dadadarekar's picture

13 Oct 2015 - 12:01 pm | dadadarekar

वरील कलम पूर्वीपासूनच आहे तर गोहत्याबंदीच्या कायद्याचे सेप्रेट नाटक कशासाठी ?

हिंदुंचा उल्लेख मी अशासाठी केला की या व अशा कायद्याचे हत्यार वापरुन हिंदू बीफ न खाण्याबाबत मुस्लिमाना टार्गेट करतात.

कायदा असाच असेल तर गोहत्येप्रमाणेच सर्वप्राणीहत्येसाठी केसेस घालाव्यात व सर्वानाच शिक्षा द्यावी.

आणि हिंदू हा कायदा बिनधास्तपणे मोडून जर शेळी खातात तर मुसलमानानी किंवा इतर कुणीही तितक्याच बिनधास्तपणे बीफ का खाउ नये ?

... कोंबड्याना संरक्षण न दिल्याबद्दल अखिल भारतीय कुकुचकू संघाकडून जाहिर निषेध.

बॅटमॅन's picture

13 Oct 2015 - 12:06 pm | बॅटमॅन

पॉइंट आहे. या तो घोडा बोलो या तो चतुर.

गॅरी ट्रुमन's picture

13 Oct 2015 - 12:15 pm | गॅरी ट्रुमन

वरील कलम पूर्वीपासूनच आहे तर गोहत्याबंदीच्या कायद्याचे सेप्रेट नाटक कशासाठी ?

ओ दादा. हे घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधले कलम आहे. मार्गदर्शक तत्वे आणि घटनेतील इतर बंधनकारक तरतुदी यातला फरक समजतो ना? याच मार्गदर्शक तत्वांपैकी कलम ४४ आहे: "—The State shall endeavour to
secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India" म्हणजे समान नागरी कायदा असावा. सध्या तो आहे का?

एक गोष्ट समजत नाही. राज्यघटनेतल्या एका मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करायचा प्रयत्न झाल्यावर हे सगळे बुध्दीवादी, विज्ञानवादी आणि आदर्श लिबरल लोक इतका गोंधळ घालत आहेत. मग कलम ४४ ची अंमलबजावणी करायचा प्रयत्न केल्यास किती गदारोळ घालतील असली मंडळी काय माहित!!

dadadarekar's picture

13 Oct 2015 - 1:06 pm | dadadarekar

हायला , गाय मारणार्‍याचं बखोट पकडायचं व त्याला घटना दाखवायची .

शेळी खाणार्‍याला हेच करा असं आम्ही म्हटलं की युक्तिवाद करायचा की ते केवळ मार्गदर्शक तत्व आहे , बंधनकारक नाही !

भाजपाचे रामराज्य ते हेच की काय ?

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 1:50 pm | मृत्युन्जय

तुम्ही स्वतःचा विचार करा आधी. तुम्ही दोन्ही खाता ना? पण डुक्कर खाण्यावर बंदी नाही. ट्राय करुन बघा

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 3:19 pm | मृत्युन्जय

दादा तुम्ही मूळ मुद्दा बघितला का? अश्या गंमतीजमती नेहरुंनी केल्या नाहित हा देखील अपप्रचारच म्हणायचा ना मग? घटनेच्या चौकटीत राहुन, घटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार जर सरकारने एखादा कायदा केला असेल तर त्यासाठी केवळ सद्य सरकारला जबाबदार धरण्यात काहिच हशील नाही.

शिवाय नेहरु नेहरु म्हणुन छाती बडवुन घेणार्‍या लोकांनी हा विरोधाभासही लक्षात घ्यावा आणि गोहत्याबंदीचे जनक डॉ. आंबेडकर आणि चाचा नेहरु आहेत हे मुळात जाणुन घ्यावे.

तिसरी गोष्ट म्हणजे शेळ्या मेंढ्या हिंदुही खातात आणि मुसलमानही. मात्र बीफ केवळ मुसलमानच खातात हिंदु खात नाहित (असा आपला लोकांचा समज आहे. प्रत्यक्षात बीफ खाणारे हिंदुही बरेच सापडतील). मुसलमानांनी बीफ खावे किंवा खाऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे पण असे करताना ते कायदा मोडत नाहित हे त्यांनी स्वतःच तपासावे. ज्या देशाच्या घटनेने त्यांना चार लग्ने करण्याची आणि घटस्फोटित बायकांना पोटगी न देण्याचा अधिकार दिला त्याच देशाच्या कायद्याने बीफ वर बंदी देखील आणली आहे. त्यामुळे एका कायद्याचे फायदे घ्यायचे आणी दुसर्‍याच्या नावाने गळे काढायचे हा प्रकार करण्याचा नैतिक अधिकार मुसलमानांना आहे की नाही हाच एक चर्चेचा विषय होउ शकतो.

चौथा आणी गंमतीचा मुद्दा की गाय खाणे अधिकार असल्याचे ठासुन सांगणार्‍या बर्‍याच जणांना मोर, बेबी क्रोकोडाइल, कुत्र असले प्राणी खाण्याचा विषय निघाला की भूतदयेचा उमाळा येतो. एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असतानाही जर कुणाला गाय खायचीच असेल तर इतर प्राण्यांना मारुन खाण्यावर किंवा त्यांचा इतर "उपयोग" करण्यावर प्राणिमित्रांना आक्षेप कसा असु शकतो हे कळत नाही. असो. हा मुद्दा इथे अस्थायी असल्याने चर्चिला जाऊ शकत नाही.

अजुन छिद्रान्वेषी विचार करायचा झाल्यास माणसांच्या जगात माणसाने इतर प्राण्यांना नेहमीच दुय्यम स्थान तर दिलेच आहे शिवाय प्राण्यांविषयीच्या त्याच्या वर्तनात दुटप्पीपणा देखील आहे. गरजेप्रमाणे प्राणिमात्रांविषयी कळवळा दाखवणारा माणूस अनेक प्राण्यांच्या जगण्याचा हक्क त्याच्या स्वतःच्या जिव्हालोलुपासाठी हिरावुन घेतो मात्र हेच जर एका माणसाने दुसर्‍या माणसाबाबत केले तर तो गुन्हा ठरतो. म्हणजेच थोडक्यात प्राणिप्रेमाचे उमाळे येणारा माणूस हा पुरेपूर दुटप्पी आहे. असो. हाही मुद्दा इथे अस्थायी असल्याने चर्चिला जाऊ शकत नाही.

इथे हे ही नमूद करणे मला योग्य वाटते की कुणीही कुठलाही प्राणी खाण्याबद्दल माझा कुठलाही आक्षेप नाही. किंबहुना प्राण्यांचा मानवी जीवनाच्या विविध गरजा अथवा सुखे भागवण्यासाठी वापर करण्यावरही माझा काही आक्षेप नाही. एकदा खाण्यसाठी प्राणी कापणे योग्य आहे हे सिद्ध झाले की मग इतर गोष्टींसाठी कापण्यातही काही आक्षेपार्ह आहे असे मला वाटत नाही.

तस्मात गोमांस बंदी घटनेने बंधनकारक केली नसती तर मी त्याला आक्षेप घेतलाही नसता कदाचित. पण आता घटनेनेच बंधनकारक केली असल्याने डॉ. आंबेडकर आणि चिच्चा नेहरुंच्या समर्थकांनी तसे का आहे याचा खुलासा केल्यास मला आनंद होइल

बंधनकारक नाही आहे .

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 4:23 pm | मृत्युन्जय

छिद्रान्वेषी मुद्दा आहे. घटना म्हणते की सरकारने यासाठी योग्य ती पावले उचलावीत. म्हणजे असा माझा तरी कलम ४८ वाचुन ग्रह झाला आहे. तुमचे मत वेगळे का आहे हे कळेल का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 4:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

पण डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी उर्फ़ डीपीएसपी कोर्ट ऑफ़ लॉ मधे non-justiciable and legally non enforcable आहेत, अर्थात ह्या मुद्द्यावरही आयव्हर जेनिंग्स अन ग्रेनविल ऑस्टिन वाद प्रतिवाद आहेतच.

कपिलमुनी's picture

13 Oct 2015 - 8:14 pm | कपिलमुनी

(खालील प्रतिसाद माझ्या समजुतीनुसार , कायदेतज्ञ नसल्याने चुभुद्याघ्या)
कायदा आणि मार्गदर्शक तत्वे यांमधे असा फरक आहे की ,
"योग्य ती पावले उचलावीत" पावले उचलावीतच असे बंधन नाही.

जसे भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे असे मार्गदर्शक तत्व आहे पण कायदा नाही त्यासाठी कायदा करावा लागेल.
तसेच हे आहे असे मला वाटते.
बहुधा यामुळेच भारतामध्ये वेगवेग्ळ्या राज्यांमध्ये बीफबद्दल वेग वेगळे कायदे आहेत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 11:10 am | कैलासवासी सोन्याबापु

endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds

This article of the constitution in itself is largely confusing, एकीकडे तुम्ही म्हणता आहात ते ग्राह्य धरले तरी ह्या कलमातला ठळक केलेला भाग साध्य कसा करणार सरकार? कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पशुसंवर्धन हे शास्त्र म्हणुन पाहिल्यास त्यात फ़क्त दुग्ध व्यवसाय नाही तर मीट प्रोडक्शन सुद्धा येतेच असे वाटते

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 12:26 pm | मृत्युन्जय

The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines

इथे "endeavour" हा शब्द देखील फार महत्वाचा आहे. थोडक्यात प्रयत्न करावा असे लिहिले आहे. करावेच असे नाही. शिवाय कायद्यामध्ये कलमांचा अर्थ लावण्याचे जे काही नियम आहेत त्या नुसार दोन कलमे जर एकमेकांच्या विरोधी वक्तव्य करत असतील सर्वांचा समन्वय साधणे महत्वाचे आहे. प्रार्थमिक नियम असा आहे की " कायदा एकत्रित वाचावा" असे करताना तुमच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines" पण

"in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle"

इथे प्रायोरिटी स्पष्ट आहे आणि दोन्ही गोष्टी एकत्रित वाचल्यास हे स्पष्ट होइल की पहिले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा पण दुसरे "खासकरुन" साध्य करावेच.

याशिवाय "animal husbandry" म्हणजे काय हे देखील एकदा बघा:

Animal husbandry is the management and care of farm animals by humans for profit, in which genetic qualities and behavior, considered to be advantageous to humans, are further developed. The term can refer to the practice of selectively breeding and raising livestock to promote desirable traits in animals for utility, sport, pleasure, or research

इथे फक्त दुग्ध व्यवसाय अपेक्षित आहे असे वाटत नाही. इतरही गोष्टी आहेत पण "प्राणी मारुन खाणे" ही गोष्ट ठळकपणे उद्धृत केलेली दिसत नाही. इथे "utility" किंवा "pleasure" या शब्दांमध्ये प्राणी मारुन खाणे अपेक्षित आहे असा प्रतिवाद काही जण करु इच्छितील पण यात २ प्रॉब्लेम्स आहेत ते असे:

१. जर "प्राणी" एक खाद्य म्हणुन अपेक्षित असेल तर तसा स्पष्ट उल्लेख कायद्यात येतो
२. जर प्राणी एक खाद्य म्हणुन अपेक्षित असल्याचे स्पष्टपणे लिहिले नसेल तर "utility" किंवा "pleasure" या शब्दांमध्ये प्राणी मारुन खाणे अपेक्षित आहे असा प्रतिवाद कदाचित करताही आला असता पण "prohibiting the slaughter, of cows and calves" असा स्प्ष्ट उल्लेख आल्याने "utility" किंवा "pleasure" या शब्दांमध्ये प्राणी मारुन खाणे अपेक्षित नाही हे सिद्ध होते.

"This article of the constitution in itself is largely confusing, एकीकडे तुम्ही म्हणता आहात ते ग्राह्य धरले तरी ह्या कलमातला ठळक केलेला भाग साध्य कसा करणार सरकार? कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पशुसंवर्धन हे शास्त्र म्हणुन पाहिल्यास त्यात फ़क्त दुग्ध व्यवसाय नाही तर मीट प्रोडक्शन सुद्धा येतेच असे वाटते"

आधुनिक संशोधनानुसार बीफ उत्पादन हे वातावरणासाठी सर्वात घातक आहे.
प्रती किलो बीफ उत्पादनासाठी ( बीफ आणि रेड मीट) १ चिकन उत्पादनाच्या तुलनेत
१. सुमारे २८ पट जास्ती जमीन .
२. सुमारे ११ पण जास्ती पाणी.
३. ५ पट हरित गृह वायू निर्मिती ( green house gas )
हेच प्रमाण भात आणि भाजीपाला उत्पादनाच्या तुलनेत अति प्रचंड आहे.
UN Food and Agriculture Association ने २००६ साली प्रसिद्ध केलेल्या संशोधनावर (live stock 's long shadow ) आधारित.
बीफ, रेड मीट खाण्याने शरीरावर होणारे गंभीर परिणाम विचारात नाही घेतले तरी संपूर्ण जगाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हि फारच गंभीर गोष्ट आहे. गोवंश हत्या विरोधात रान उठवणारे विज्ञानवादी, पर्यावरणवादी आणि पुरोगामी हि गोष्ट कधी विचारात घेतील?
देशी गायीचे दुध, तूप इ. उत्पादनांना सध्या व्यावसायिक उत्पादनांच्या बाजारभावापेक्षा जास्ती मागणी आणि भाव आहे. गोमुत्र आणि गोमायासाठी सेंद्रिय शेती साठी प्रचंड मागणी आहे. सेंद्रिय उत्पादनांना जगभर मागणी आणि चांगला भाव आहे.
बाकी चालुद्या.

The heavy impact on the environment of meat production was known but the research shows a new scale and scope of damage, particularly for beef. The popular red meat requires 28 times more land to produce than pork or chicken, 11 times more water and results in five times more climate-warming emissions. When compared to staples like potatoes, wheat, and rice, the impact of beef per calorie is even more extreme, requiring 160 times more land and producing 11 times more greenhouse gases.

dadadarekar's picture

13 Oct 2015 - 1:36 pm | dadadarekar

गायीऐवजी कोणत्याही प्राण्याचे मांस घेतलेत तरी हे समीकरण खरे ठरते.

त्यामुळे सर्व हत्या बंद कराव्यात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 1:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुमच्या भावना समजू शकतो पण तुमचा मुद्दा मी बोललो आहे त्याला पुर्ण tangent आहे, मी कुठे ही मीट पक्षी बीफ प्रोडक्शन वाढवा असे बोललेलो नाही तर आधुनिक पशुपालन व्यवसायात मांस उद्योग हा सुद्धा अंतर्भूत असतो असे म्हणले आहे, शिवाय मृत्युंजय साहेब (कायदा तज्ञ आहेत ते अन सीएस सुद्धा) ह्यांनी जे कलम दिले आहे त्याचे इंटरप्रिटेशन कसे होईल अश्या शंकेतून एक प्रश्न चिन्ह (? असे दिसते प्रश्नचिन्ह) देऊन प्रश्न विचारला आहे, (त्याचे त्यांनी आतिशय सुलभ लीगल भाषेत उत्तर ही दिले आहे) , मांस उद्योगाने पर्यावरण ह्रास हा एक पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे! म्हणायला तर ऑटोमोबाइल इंडस्ट्री सुद्धा कार्बन उत्सर्जन करतेच हो! पण म्हणुन तो धंदा व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचा नाही असे नाही कोणी म्हणत, मांस व्यवसायात फायदा आहे म्हणून लोक तो करत असावेत नाही का?

अर्थात ह्याचा अर्थ आता दिसला बैल का कापा असा लावु नका म्हणजे मिळवली

बाकी काय? चालूच द्या तुम्ही पण

पण तरीही माझा मुद्दा भावनिक नाहीये. जगभरच्या एकूण कार्बन उत्सर्जनात बीफ आणि रेड मीट उत्पादनाचा सुमारे ७.५% वाटा आहे. च्या तुलनेत चिकन अथवा पोर्क सुमारे १.५-२ %च उत्सर्जन करतं. १ किलो मांस निर्मिती साठी. या शिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी आणि जमीन या मुलभूत स्त्रोतांवर येणारा ताण पण बीफ आणि रेड मीट उत्पादनामुळे कित्येक पटींनी जास्ती आहे. आता लोकांनी जर बीफ खाणे बंद केला तर ( खाणार्यांसाठी चिकन,मासे, पोर्क खाण्याचा पर्याय आहेच कि) तर आपोआप उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल शिवाय जमीन आणि पाणी हे महत्वाचे स्त्रोत अन्नधान्य उत्पादनासाठी जास्ती उपलब्ध होतील. या व्ह्यू पोइण्टने गोवंश हत्या बंदी खरतर स्वागतार्ह आहे असा माझा मुद्दा होता.
बाकी मी कोणत्याही राजकीय पक्षाचा हाडाचा पंखा वगैरे काही नाही. म्हणून म्हटले इतर चर्चा चालुद्या.

dadadarekar's picture

13 Oct 2015 - 5:34 pm | dadadarekar

कार्बन उत्सर्जनात ... समजा..

बीफचा वाटा ७ % आहे . व इतर मांसाचा २ % आहे. एकूण ९ %

बीफ बंद केले तर हे लोक शेपूची भाजी किंवा मेतकूट भात खाणार नाहीत.

ते इतर मांस खातील. व कार्बनचे एकून उत्सर्जन ९ % इतकेच राहील.

गणित काहीतरी झोल वाटतंय.

टक्केवारी प्रती किलो होती ना ?
म्हणजे एकूण ४% झाले असं समजलो.
संदर्भ : http://www.balbharati.in/downloadbooks/2nd-Maths-Marathi.pdf

असो, चालू द्या!

दत्ता जोशी's picture

14 Oct 2015 - 6:34 pm | दत्ता जोशी

करेक्ट! :-).

गॅरी ट्रुमन's picture

13 Oct 2015 - 12:09 pm | गॅरी ट्रुमन

याविषयीच काल लिहिले होते---

गेल्या काही दिवसांपासून अनेक आदर्श लिबरल लोक छाती पिटून म्हणत आहेत की प्राचीन भारतात ऋषीमुनी गोमांस खात असत आणि वेदांमध्ये तसे उल्लेख आहेत. खरोखर असे उल्लेख आहेत का याची तपासणी मी करायला गेलेलो नाही आणि तसे तपासण्यात काडीमात्र इंटरेस्टही मला नाही. पण इतक्या आदर्श लिबरलांनी इतक्या छातीठोकपणे तसा दावा केला आहे त्यापैकी एखादा तरी नक्की कुठच्या वेदामध्ये कुठल्या ऋचेमध्ये असा उल्लेख आहे यावर प्रकाश टाकेल असे वाटले होते.पण कुठचे काय. एकानेही आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ असा कसलाही पुरावा सादर केला नाही. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांनी वेद तपासून तसे असल्याची खात्री करायची का?वेदकालात विमाने होती असा काहींचा दावा असतो त्याला प्रश्न विचारणाऱ्यांना "तुम्ही जाऊन तपासा" असे उलटे म्हटले जाते त्याचीच ही उदारमतवादी आवृत्ती म्हणायची का?

दुसरे म्हणजे हिंदू परंपरेत कसलाहीही उल्लेख असला तरी त्यावर हिरवेपिवळे होऊन तुटून पडणारे आदर्श लिबरल लोक आता मात्र या गोमांस खायच्या परंपरेचे (जर का अशी परंपरा असलीच तर) मात्र अगदी हिरीरीने समर्थन करताना दिसत आहेत हे कशाचे लक्षण म्हणायचे?

तिसरे म्हणजे अन्यथा हे आदर्श लिबरल लोक नेहमी राज्यघटनेचे पालन करा हे अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत असतात.पण आपल्याच राज्यघटनेत directive principles of state policy मध्ये कलम ४८ प्रमाणे: "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle" असे स्पष्टपणे म्हटलेले आहे ( http://lawmin.nic.in/olwing/coi/coi-english/Const.Pock%202Pg.Rom8Fsss(7).pdf वर पान २१). ही directive principles of state policy म्हणजे देशाची वाटचाल नक्की कुठच्या मार्गावरून व्हावी यासाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत.अपेक्षा अशी की भविष्यकाळात एक दिवस असा यावा की या सगळ्या तत्वांचे पालन सरकारकडून व्हावे. त्या तत्वांपैकी एका तत्वाचे पालन केले जात असेल तर या आदर्श लिबरल लोकांच्या पोटात नक्की का दुखते? म्हणजे इतर वेळी राज्यघटनेचे पालन करा असे म्हणणारेच लोक त्याच राज्यघटनेचे पालन सरकार करत असेल तरी वेदांमध्ये अमुक म्हटले आहे (जर का तसे म्हटले असेल तर) म्हणून त्याचे पालन करा असे म्हणत घडाळ्याचे काटे उलटे का फिरवतात?हे पुरोगामी ना? मग यांना राज्यघटनेपेक्षा ५ की १० हजार वर्षांपूर्वी लिहिलेले वेद अधिक प्रिय कसे काय?

तुमच्या गोमातेला नेमकं कोण कापतय हे तरी पहा.

http://muslimmirror.com/eng/out-of-six-largest-meat-suppliers-in-india-f...

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 12:28 pm | मृत्युन्जय

कोणीही कापत असेल तरी ते घटनाबाह्य आहे हे नमूद करु इच्छितो.

याॅर्कर's picture

13 Oct 2015 - 1:00 pm | याॅर्कर

-ऋग्वेद(10.86.14)
-ऋग्वेद(10.91.14)
-महाभारत वन पर्व(अ 208,199)
-मनुस्मृती 5/18
-आपस्तंभ धर्मसूत्र(श्लोक 14,15,17)
-गृहसूत्र(1.9.122)

पण आता यांचे अर्थ हे आपल्या सोयीनुसार काहीजण काढत आहेत(संस्कृत कठीण आहे ना!).त्यामुळे 100% खात्री देता येत नाही.
पण पशुवध व्हायचे हे मात्र नक्की.

गॅरी ट्रुमन's picture

13 Oct 2015 - 2:00 pm | गॅरी ट्रुमन

पण पशुवध व्हायचे हे मात्र नक्की.

पशुवध व्हायचे हे कोणीच नाकारत नाही. प्रश्न इतकाच की गोमांसभक्षण व्हायचे की नाही.

बाकी तुम्ही दिलेले संदर्भ मी स्वतः तपासायला गेलेलो नाही.कारण एकतर दहावीनंतर संस्कृत एकदाही वापरलेले नाही त्यामुळे त्या संदर्भांचा योग्य तो अर्थ काढता येईल इतके संस्कृत मला येत नाही. पण जितके कितके संस्कृत मी बघितलेले आहे त्यावरून एक गोष्ट नक्कीच सांगतो की संस्कृत भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात. आपण 'गो' म्हणजे गाय या अर्थी वापरतो त्याच शब्दाचे संस्कृतमध्ये अनेक वेगवेगळे अर्थ होतात-- त्या अर्थांमध्ये गायीबरोबरच बैल, चंद्र, सूर्य, सरस्वती (देवी) असे अनेकविध अर्थ होतात हे http://www.spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=%E0... या संस्कृत डिक्शनरीवरून समजले. एकाच शब्दाचे इतके वेगवेगळे अर्थ होत असतील तर नक्की कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो शब्द वापरला आहे हे समजून घेतले नाही तर नक्कीच जो अर्थ अभिप्रेत आहे त्यापेक्षा नक्कीच वेगळा अर्थ काढला जाईल. हे सगळे कॉन्टेक्स्ट समजून जो अर्थ अभिप्रेत आहे तो काढण्याइतके संस्कृत मला नक्कीच येत नाही तेव्हा यावर अधिक भाष्य टाळतो. पण हे सगळे आदर्श लिबरल लोक छतांवरून बोंबलत आहेत की वेदांमध्ये असे उल्लेख आहेत तेव्हा ते अभ्यास करून बोलतात की या खाचाखोचा लक्षात न घेता काहीतरी लिहिलेले वाचून (बहुतांश इंग्लिश पुस्तके) काहीतरी पोपटपंची करत असतात? म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांचे असते का?

आणि दुसरे म्हणजे क्षणभर मान्य केले की त्यावेळी गायी कापून खात होते. सो व्हॉट? कोणत्याही पुस्तकात काहीही लिहिले असेल तर त्यावर स्वतःचा विचार न करता ते जसेच्या तसे अंमलात आणणे यापेक्षा मोठा मूर्खपणा नसेल. कदाचित त्यावेळी परिस्थिती वेगळी असल्यामुळे गरजा वेगळ्या असतील. एक उदाहरण द्यायचे झाले तर शाळेत असताना मला नेहमी वाटायचे की चिनी लोक झुरळे खातात-- म्हणजे घरी एखादे झुरळ आले की त्याला पकडून ते तोंडात टाकतात. असाच समज माझा बनविण्यात आला होता. १९४० च्या दशकात दुसरे महायुध्द आणि दुष्काळ या कठिण काळात काही ठिकाणी लोकांवर ही वेळ आलीही होती.पण म्हणजे चिनी लोक सरसकट झुरळे खातात असा अर्थ थोडीच होतो? हेच आदर्श लिबरल लोक हिंदू परंपरेतल्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख जरी आला तरी त्यांची प्रतिक्रिया रस्त्यावरून जात असताना चुकून शेणात पाय गेल्यानंतर जसे तोंड होईल त्यापेक्षा वाईट असते. आणि हेच लोक कुठल्याकुठल्या वेदांमध्ये गोमांसभक्षणाचे उल्लेख आहेत म्हणून आताही तसे करावे हे म्हणतात याचेच आश्चर्य वाटते.
समजा वेदांमध्ये अगदी म्हटले असले की माणूस कापून खावा तर ते माणूसही कापावा असे मानणार का?तेव्हा माझ्या मते वेदांमध्ये काय लिहिले आहे हे अगदी गौण आहे. आपल्या राज्यघटनेत जर ते एक मार्गदर्शक तत्व म्हणून असेल तर त्याची अंमलबजावणी केली जात असेल तर त्यात चुकीचे काही नाही. आणि जर का हे मार्गदर्शक तत्व बहुसंख्य लोकांना मान्य नसेल तर राज्यघटनेतून ते कलम वगळून टाकावे.

आपल्या (किंवा कुठल्याही) परंपरांमध्ये जे काही सध्याच्या काळाला उपयोगी आहे ते घ्यावे आणि बाकीचे टाकून पुढे व्हावे हे भान हिंदू परंपरा आणि संस्कृती इत्यादी इत्यादींचा जाज्वल्य अभिमान बाळवणार्‍यांना तर नसतेच. आणि आदर्श लिबरल लोक मात्र केवळ टिका करण्यापुरते आपल्या सोयीप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा वापर करतात.

मला वाटते की ते जाज्वल्य अभिमानवाले तर नकोतच आणि आदर्श लिबरल तर त्याहून नकोत. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य आपल्याला काढता येतच नाही का?

याॅर्कर's picture

13 Oct 2015 - 2:24 pm | याॅर्कर

"ते जाज्वल्य अभिमानवाले तर नकोतच आणि आदर्श लिबरल तर त्याहून नकोत. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य आपल्याला काढता येतच नाही का?"

----→ जाज्वल्य अभिमानवाल्यांची मेजाॅरिटी आहे ना आता, मग कसा काय सुवर्णमध्य काढणार?

बाकि उत्तम विवेचन

गोमांसभक्षणही झाल्याचे उल्लेख आहेत. उत्तररामचरितम् नामक नाटकात (चौथ्या अंकात) एक प्रसंग आहे, जनक राजाकडे वसिष्ठ ऋषी येतात तेव्हा त्यांच्यासाठी गाय कापल्याचा त्यात उल्लेख आहे. जनकाकडील एक सेवक सौधातकी/सौधीतकी वसिष्ठांना शिव्या घालतो (पीठ पीछे) की माझी आवडती गाय का कापली म्हणून इ.इ.

याज्ञवल्क्य ऋषींनीही सांगितलेय की "मी गोमांस खाईन, पण पुरेसे लुसलुशीत असेल तरच." आता सकृद्दर्शनी पाहता हे विधान सनसनाटी आहे, त्यामुळे पुरावा देणे अवश्य आहे.

शतपथ ब्राह्मण नामक ग्रंथाच्या तिसर्‍या कांडातील पहिल्या अध्यायाच्या दुसर्‍या ब्राह्मणातील एकविसावे कडवे पहा.

अगोदर इंग्लिश अर्थ देतो.

http://sacred-texts.com/hin/sbr/sbe26/sbe2604.htm

3:1:2:21

He (the Adhvaryu) then makes him enter the hall. Let him not eat (the flesh) of either the cow or the ox; for the cow and the ox doubtless support everything here on earth. The gods spake, 'Verily, the cow and the ox support everything here: come, let us bestow on the cow and the ox whatever vigour belongs to other species 1!' Accordingly they bestowed on the cow and the ox whatever vigour belonged to other species (of animals); and therefore the cow and the ox eat most. Hence, were one to eat (the flesh) of an ox or a cow, there would be, as it were, an eating of everything, or, as it were, a going on to the end (or, to destruction). Such a one indeed would be likely to be born (again) as a strange being, (as one of whom there is) evil report, such as 'he has expelled an embryo from a woman,' 'he has committed a sin 2;' let him therefore not eat (the flesh) of the cow and the ox. Nevertheless Yâgñavalkya said, 'I, for one, eat it, provided that it is tender.'

आता मूळ संस्कृत पाठ पाहू. तो इथून हुडकलेला आहे.

http://titus.uni-frankfurt.de/texte/etcs/ind/aind/ved/yvw/sbm/sbm.htm

Verse: 21
Sentence: a átʰainaṃ śā́lām prápādayati
Sentence: b sá dʰenvaí cānaḍúhaśca nā̀śnīyāddʰenvanaḍuhau vā́ idaṃ sárvam bibʰr̥tasté devā́ abruvandʰenvanaḍuhau vā́ idaṃ sárvam bibʰr̥to hánta yádanyéṣāṃ váyasāṃ vīryáṃ táddʰenvanaḍuháyordádʰāméti sa yádanyéṣāṃ váyasāṃ vīryámā́sīttáddʰenvanaḍuháyoradadʰustásmāddʰenúścaivā̀naḍvā́ṃśca bʰū́yiṣṭʰam bʰuṅktastáddʰaitátsarvā́śyamiva yó dʰenvanaḍuháyoraśnīyādántagatiriva taṃ hā́dbʰutamabʰíjanitorjāyā́yai garbʰaṃ nírabadʰīdíti papámakadíti pāpī́ kīrtistásmāddʰenvanaḍuháyornāśnī̀yāttádu hovāca yā́jñavalkyo 'śnā́myevā̀hámaṃsalaṃ cedbʰávatī́ti

म्हणजेच देवनागरीत

वाक्य अ: अथैनम् शालाम् प्रपादयति |
वाक्य बः स धेन्वै चानडूहश्च नाश्नीयाद्धेन्वनडुहौ वा इदं सर्वं बिभृतस्ते देवा अब्रुवन्धेन्वनडुहौ वा इदं सर्वं बिभृतो हन्त यदन्येषाम् वयसं वीर्यं तद्धेन्वनडुहयोर्दधामेति स यदन्येषां वयसं वीर्यमासीत्तद्धेन्वनडुहयोर्दधुस्तस्माद्धेनुश्चैवानड्वांश्च भूयिष्ठम् भुङ्क्तस्तद्धैतत्सर्वाश्यमिव यो धेन्वनडुहयोरश्नीयादन्तगतिरिव तं हाद्भुतमभिजनितोर्जायायै गर्भं निरबधीदिति पपमकदिति पापी कीर्तिस्तस्माद्धेन्वनडुहयोर्नाश्नीयात्तदु होवाच याज्ञवल्क्योऽश्नाम्येवाहमंसलं चेद्भवतीति|

याज्ञवल्क्यो होवाच- "अंसलं चेत् भवति इति अश्नामि एव अहम् |" अंसलम् = लस्टी, स्ट्राँग. खालील लिंक पहा.

http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+aMsala...

तेव्हा याज्ञवल्क्यांनी इफ-एल्स कंडिशन टाकून त्या त्या केसमध्ये आपण बीफ खाऊ असे म्हटल्याचे इथे स्पष्ट दिसते आहे. शिवाय त्या कंडिशन म्हणजे आपद्धर्मही दिसत नाहीत.

हे एक उदाहरण सांगितलेय फक्त. अशा थाटाची अजून कैक उदाहरणे सांगता येतील. तेव्हा फक्त डाव्यांच्या कल्पनाशक्तीचा हा नतीजा नाही इतके कळाले तरी बास आहे.

आता दुसरा मुद्दा- जुन्या ग्रंथांत लिहिलेय म्हणून आत्ताही तसेच करावे हे का?

त्याचे उत्तर साधे आहे. तुम्ही खात नसाल तर नका खाऊ, तसेच इतरांना अटकावही करू नका. घटनेची मार्गदर्शक तत्त्वे वगैरे जी आहेत त्यांना बायपास करणार्‍यांतही हिंदूच आघाडीवर आहेत. केरळात पारंपरिकरीत्या हिंदूही बीफ खातात. अनेक आघाडीचे मीट सप्लायर्स हिंदू आहेत जे बीफही सप्लाय करतात. तेव्हा निव्वळ डाव्यांना शिव्या घालताना इकडेही दुर्लक्ष होते आहे हे पहावे असे वाटते.

आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा: बीफ या लेबलमध्ये गाय, बैल, म्हैस आणि रेडा या सर्वांचेच मांस अपेक्षित आहे. त्यामुळे बीफ म्हटले की ते निव्वळ गोमांसच आहे हाही निव्वळ खोटारडा अपप्रचार आहे.

याॅर्कर's picture

13 Oct 2015 - 2:59 pm | याॅर्कर

हो,मी सगळं हेच शोधत होतो
तुम्ही माझं काम हलकं केलं.
त्याबद्दल धन्यवाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 3:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन बना बैट्समन!! एक्सक्टली हेच टाइप करायला आलतो फ़क्त याज्ञवल्क्य ऋषींचा संदर्भ मुखोद्गत नव्हता, अश्वमेध सुद्धा असाच नाही का गोथम नरेश!?

बॅटमॅन's picture

13 Oct 2015 - 3:24 pm | बॅटमॅन

येस्सार, अश्वमेधातही घोड्याच्या मांसाचे उल्लेख आहेत.

मृत्युन्जय's picture

13 Oct 2015 - 3:25 pm | मृत्युन्जय

अश्वमेधात अजुनही बरेच उल्लेख आहेत. कुणी पुर्ण वर्णन वाचले असेल तर किती बिभत्स वर्णन आहे हे लक्षात येइल. असो. असोच.

अर्थात आहेच. मुद्दा इतकाच आहे की हे सारे ग्रंथांत लिहिले आहे हे तरी स्वीकारणार की नाही लोक्स?

हे स्वीकारले म्हणजे आटोम्याटिक बीफसंमती झाली असे नाहीच अर्थात.

दुर्गविहारी's picture

16 Oct 2015 - 5:06 pm | दुर्गविहारी

एकीकडे रामायण काल्पनिक आहे असे म्हणायचे आणि दुसर्या धाग्यात त्याच रामायणाचे सन्दर्भ द्यायचे ?

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 3:17 pm | तर्राट जोकर

हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या प्रतिसादाखाली असला तरी व्यक्तिशः त्यांना नाही. घटनेची कलमं आणि वेदाचे दाखले यावर जे चर्चा करत आहेत त्यांच्यासाठी आहे.

जर गायीला पुज्य मानण्याचा हिंदूंचा हक्क त्यांचे सनातन धर्मावरिल प्रेम व मान्यता लक्षात घेऊन मान्य केला तर त्याच हिंदूंना त्याच सनातन वेदाचे दाखले दिले तर कुठे चुकले? यात आ.पु.लि. चे प्रतिवाद हे धर्माभिमान्यांनी दिलेल्या वेदांच्या-धर्माच्या दाखल्यातुनच प्रसवले आहेत. जर आधीच हिंदू-धर्माभिमान्यांनी असले काही केले नसते प्रश्नच आला नसता. काही अतिधर्माभिमानी 'उद्या माणुस मारून खातील तरी ते चालेल का?' इतकं ताणतात. इतकंच ताणायचं तर कोंबड्या, बकरे, मासे हे तरी का ह्या भूतदयेमधून सुटतात याचे उत्तर एकही धर्माभिमानी देऊ शकलेला नाही. या आदर्श धर्माभिमानी गोपुजक समाजाचा दांभिकपणा सर्रास नजरेआड करून घटनेतली कलमे सोयिस्करपणे अर्थ लावून तोंडावर फेकली की बरं वाटत असेल नाही?

गंमत म्हणजे जेव्हा मासे खाण्यावर बंदी करा असे म्हटलं की मी मी म्हणणारे गोमाताभक्त शेपुट घालून पळतांना पाहिले आहेत. कारण तिथे त्यांचा तर्क काहीच चालत नाही कारण..... त्यांच्यासाठी मासे हे अन्न आहे, प्राणी-भक्षण नव्हे. आपण एक सजीवप्राणी मारून खातो हे त्यांच्या सबस्कॉन्शस मधे नोट नाही. पण कुणी गाय खातंय म्हटल्यावर यांना किळसवाणं वाटतं, तेही 'जीला आम्ही गोमाता म्हणून पुजतो तिलाच खातात.. शिव शिव शिव.' असल्या प्रतिक्रिया देतात.

मला कित्येकदा काही कोकण-स्थित बंधू-भगिनींच्या 'जवला...' करत ओरडत, आयुष्याचे उपाशी असल्यागत टीफिन डब्यावर झडप घालतांना बघून, तो भयंकर उग्र वास घेऊन उलटीची उबळ येते. मला किळसवाणं वाटतं कारण ते माझं अन्न नाही, माझ्या पिढ्यांनी ते कधी खाल्लं नाही. माझ्या संस्काराच्या बाहेर आहे ते. पण मग मी स्वतः कोंबडीची तंगडी, बोकडाचं हाड चघळत असतांना कोकणस्थ बंधू-भगिनिंना त्यांच्या मासली-प्रेमाबद्दल दूषणे द्यायचा काय अधिकार..? हफ्त्यातून तीन दिस बोकड खाणारा मी, पाठ्यपुस्तकात कुणातरी प्रतिष्ठित (बहुतेक ब्राहमणच) लेखिकेच्या घरी मासे कसे खाल्ले जातात याचे वर्णन वाचून त्यावेळी मला फार किळस वाटली होती. आमच्यासारखे गरिब, अशिक्षित, झोपडपट्टीवाल्यांचं ठिकेय, पण एवढी प्रतिष्ठित, उच्च्भ्रू, सुशिक्षित, सुसंस्कारित लोक असलं घाणेरडं (?) खातात ह्याच्यवर विश्वास नव्हता बसत. कारण तेव्हा रोजच्या भेटण्यातले तसलेच प्र.उ.सु.सु.लोक आम्हाला असं बकरे-कोंबडे खाण्यावरून, दारू पिण्यावरून हिणवत असत. आज दारू पिणे प्रतिष्ठेचे झाले आहे, ते एक असो.

इथे केवळ गाय-बैल हिंदूंना पूज्य व मुस्लिमांचे ते प्रमुख अन्न, यात धर्माचा बादरायण संबंध लावून धार्मिक तेढ वाढवण्याऐवजी काय घडतंय? जणू मुस्लिम हे हिंदूंवर सूड उगवण्यासाठीच गाय-बैल खातात असा सूर का असतो धर्माभिमान्यांचा? त्यांना मांसच खायचं तर डुक्कर खा असं सरळ सरळ हिणवलं का जातंय? त्यांना काय खायचं, नाही हा त्यांचा प्रश्न आहे हे एवढे सरळ पुरोगामी विचार हजम होत नाहीत. मग ते मुस्लिम देशांचे पोर्कबंदीचे-दारुबंदीचे खोटे-नाटे दाखले देतात, तेव्हा कोण तपासायला जातं का? समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल-डुकरं खातात त्यांना गोहत्येसाठी दोषी ठरवण्याचं आपण सोयिस्कर विसरतो. इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्‍या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही. दिसते फक्त एका गरिबाच्या घरच्या फ्रीजमधलं तथाकथि गोमांस. मोबाइलवरून पसरवलेल्या अफवा. घटनेची कलमं सोयिस्कररित्या प्रवचून चर्चा प्रभावी केली जाऊ शकते, पण खरे प्रश्न सुटत नाहीत. कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत. घटनेची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे घटना नाही. उपलब्ध परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असावे असा त्याचा अर्थ असावा. गोहत्याबंदी हा शब्द घटनेत यायला तसा इतिहासही आहे. चर्चा करणारे हवेत तीर मारतात, सोयिस्कर तेवढंच उचलतात असे निरिक्षण आहे. भारतीय घटना भूतदयावादी-प्राणिपक्षी प्रेमी अशी काही नाहीये. राज्यघटनेचा अर्थ प्रथम, कायदेशीर नागरिकांना जगण्यास योग्य वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. पक्षीप्राण्यांना नव्हे. तो प्राधान्यक्रम नव्हे. असे असते तर फिशरी डीपार्टमेंट आधी बंद करायला हवे. तमाम मच्छिमारांना घरी बसवायला हवे.

धर्माभिमान्यांचा 'आज गाय खातात उद्या माणसंही खाल्ली तर चालेल का?' हाच प्रश्न 'आज मासे मारून खातात, उद्या माणसंही खातील' असा करून आ.पु.लि. विचारतील तेव्हा काय उत्तर असेल?

समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल-डुकरं खातात त्यांना गोहत्येसाठी दोषी ठरवण्याचं आपण सोयिस्कर विसरतो. इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्‍या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही. दिसते फक्त एका गरिबाच्या घरच्या फ्रीजमधलं तथाकथि गोमांस.

जोकराशी पूर्ण सहमत. (बॅटमॅन असून)

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 3:31 pm | तर्राट जोकर

Don't make it a habit.....!

after all.... why so serious?

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 3:44 pm | कैलासवासी सोन्याबापु


कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत.

आई शपथ एक एक शब्दाशी सहमत! मला असेच काहीसे म्हणायचे होते. मुजरा घ्या ह्या तर्काला!

अस्वस्थामा's picture

13 Oct 2015 - 5:19 pm | अस्वस्थामा

अतिशय सहमत रे जोकरा.. बरेच मुद्दे 'हेच म्हणायचं होतं' असे आहेत. खासकरुन,

त्यांना काय खायचं, नाही हा त्यांचा प्रश्न आहे हे एवढे सरळ

इथून मांस कित्येक दशकं निर्यात होतंय. ते आजवर का दिसले नाही गोमाता भक्तांना? त्याच गोमाताभक्तांना प्लास्टीक खाऊन मरणार्‍या गायी दिसत नाहीत, उकिरड्यावर सोडून दिलेल्या गायी दिसत नाहीत, आपल्याच हिंदूंचे कत्तलखाने असून तेच हजारो गायी मारून विदेशात पाठवतात ते दिसत नाही.

कायद्यात पशुसंवर्धन हे धार्मिक रुढी-मान्यतांसाठी नसून भौगोलिक, जैविक विविधता जोपासणे, त्यातून रीसोर्सेस तयार करणे, ज्यातून देशातल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था होऊ शकेल असे व्यवसाय निर्माण करणे, निर्यातयोग्य मांस निर्माण करणे हेही हे उद्दिष्टे आहेत. घटनेची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे घटना नाही. उपलब्ध परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असावे असा त्याचा अर्थ असावा. गोहत्याबंदी हा शब्द घटनेत यायला तसा इतिहासही आहे. चर्चा करणारे हवेत तीर मारतात, सोयिस्कर तेवढंच उचलतात असे निरिक्षण आहे. भारतीय घटना भूतदयावादी-प्राणिपक्षी प्रेमी अशी काही नाहीये. राज्यघटनेचा अर्थ प्रथम, कायदेशीर नागरिकांना जगण्यास योग्य वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.

By education I am an Englishman, by views an internationalist, by culture a Muslim, and I am a Hindu only by accident of birth.

सिक्युलरांचे आदर्श असेच असणार हे उघड आहे.

लाडक्या नेहरु मामांचे आणखी एक वाक्य
चीनचे युद्ध हरल्यावर …. “Not a blade of grass grows in Aksai Chin; loss of Indian Territory to China is a loss too little.”

त्यावर महावीर त्यागींचे उत्तर
नेहरुमामांच्या डोक्याकडे बोट दाखवून …. “Nothing grows there. Should it be cut off or given away to someone else too?"

प्यारे१'s picture

13 Oct 2015 - 3:54 pm | प्यारे१

चिनार सेठ,

पूरि दुनिया के 'चाचा' को आप 'मामा' कहे कह रहे हो???? जवळचे नातेवाईक का काय? ;)

नाय हो…. म्हनल थोडी व्हेरायटी द्यावी…

भारतरत्न पं. मदन मोहन मालवीय यांचे आहे , असे वाटते

बॅटमॅन's picture

13 Oct 2015 - 5:34 pm | बॅटमॅन

मालवीयांचे असणे शक्य नै कारण ते १९४६ सालीच वारले. मी हे वाक्य पिलू मोदी यांच्या नावे वाचले होते.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Oct 2015 - 5:38 pm | बिपिन कार्यकर्ते

पिलू मोदीच.

चिनार's picture

14 Oct 2015 - 9:40 am | चिनार

तसं नै कै ब्याट्या...नेहरुमामांना प्रत्युत्तर द्यायला प. मदन मोहन मालवीय सारखा तज्ञ माणूसच लागतो..येरागबाळाचे काम नव्हे ते असा अभिमान वाटतोय दादांना..म्हणजे कसय की, मला झापड मारली ह्यापेक्षा मला मोठ्या साहेबांनी झापड मारली असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो बऱ्याच लोकांना..

बॅटमॅन's picture

14 Oct 2015 - 11:59 am | बॅटमॅन

खी खी खी. अगदी सहमत हो चिनारशेठ.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 2:05 pm | श्रीगुरुजी

संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच प्रोब्लेम आहे असे ह्यांचे मत.नेहेरूंनीच बोस ह्यांचा अपघात घडवला, नेहेरूंना पटेल नको होते,नेहरू मराठी द्वेषक होते..असल्या पुड्या पूर्वीपासून सोडल्या जायच्या ह्या लोकांकडून.नेहरूंच्या राजकारणाला विरोध करता येईल पण देशोदेशीच्या लोकांन भेटून्,शेकडो कोटींची मदत घेउन ह्या संस्था उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला हे वास्तव आहे.
गाय खावी की खाउ नये,शाकाहार की मांसाहार,वंदे मातरम म्हणावे की म्हणू नये हा वाद नेहरू घालत बसले नाहीत.

बोस यांच्या कुटुंबियांवर ते बेपत्ता झाल्यावर पुढील २० वर्षे का पाळत ठेवली जात होती? त्यांच्या कुटुंबियांची पत्रे का फोडून वाचली जात होती? नेहरू सातत्याने संयुक्त महाराष्ट्राच्या का विरोधात होते? या प्रश्नांची उत्तरे सापडली की या पुड्या होत्या का वस्तुस्थिती होती ते तुमच्या 'ह्यां'ना समजेल.

गाय खावी का नाही याविषयी घटनेतच उल्लेख आहे. वंदेमातरमचे म्हणाल तर 'तुम्हाला वंदेमातरम म्हणायचं नसेल तर तुमच्या भावना दुखावू नयेत म्हणून आपण सगळ्यांनीच ते म्हणायला नको' असा निर्णय घेऊन नेहरू मोकळे झाले होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Oct 2015 - 11:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पण आता बहुमत आहे ना? मग मोदी,राजनाथ येऊ देत टी.व्ही.वर चर्चेला. त्यांना तर सगळे माहित असेलच ना?
दाखवा फाईली आणी सिद्ध करा की नेहरूंच्या आदेशानुसार हे होत होते म्हणून.

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2015 - 9:42 am | श्रीरंग_जोशी

सोन्याबापूंचे विचार वाचून माझा या धाग्यावरचा जुना प्रतिसाद आठवला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 10:35 am | कैलासवासी सोन्याबापु

तुमचा सहृद प्रतिसाद अन त्यावर गुरुजींचा प्रतिसाद पाहून चित्र आश्वासक नक्कीच वाटत नाहीये

गामा पैलवान's picture

13 Oct 2015 - 12:35 pm | गामा पैलवान

श्रीरंग_जोशी,

तुमच्याशी सहमत आहे. शासनाच्या धोरणांतले कच्चे दुवे आणि अंमलबजावणीतल्या चुका दाखवून देणे श्रीगुरुजींना अवघड जाऊ नये. यासाठी शासनाला धोरण आणि अंमलबजावणीची इच्छा असणे अत्यावश्यक आहे.

एक उदाहरण देतो. गेल्या सव्वाएक वर्षात मोदींनी/पररीकरांनी श्रीलंकेच्या नेतेपदी सिरीसेना नामे भारतमित्रांना आणण्यापासून न्यूयॉर्कमध्ये बलुची आणि मोहजिरांची निदर्शने घडवण्यापर्यंत बरीच कामगिरी केली. ही कामगिरी काँग्रेसी सरकारला सहज जमण्यासारखी होती. मात्र काँग्रेसी सरकारकडे इच्छाशक्ती होती का? प्रमुख मुद्दा राजकीय इच्छाशक्तीचा (वा अभावाचा) आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्या तरी अन्नाची निकड सर्वात महत्त्वाची. नंतर वस्त्र आणि शेवटी निवारा असा काहीतरी प्राधान्यक्रम ठेवावाच लागतो.

मोदींना राजकीय इच्छाशक्ती असल्याने मोदी शासनाचं मूल्यमापन काँग्रेसी सरकारपेक्षा वेगळ्या तऱ्हेने करायला पाहिजे. आणि नेमकं तिथेच घोडं अडतं. सुस्पष्ट धोरण असणे ही इतकी दुर्मिळ चीज होती की मोदींची पहिली काही वर्षे जनतेच्या अपेक्षांची निश्चिती (पूर्ती नव्हे) करण्यातच जातील. एकदा का अपेक्षांची निश्चिती झाली की मगच मूल्यमापन करता येईल.

आ.न.,
-गा.पै.

dadadarekar's picture

13 Oct 2015 - 1:01 pm | dadadarekar

सिरिसेना लंकेत गादीवर बसले तर श्रेय मोदीना !

हिरण्यकश्यपूला हरवून प्रल्हादाला गादीवर बसवायचे कर्तृत्वही मोदींचेच , आता हेही जाहीर करा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 1:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

दादु तुम्ही किंवा हे गुर्जी एकाच माळेचे मणि!! कट्टरपणा ची माळ!

प्रदीप's picture

13 Oct 2015 - 7:02 pm | प्रदीप

आपण (म्हणजे भारताने) श्रीलंकेच्या निवडणूकीच्या दरम्यान नक्की काय केले असेल हे ठाऊक नाही.पण इथे काही दुवे आपणासाठी देत आहे, ते पहावेतः

दुवा १

दुवा २

दुवा ३

दुवा ४

दुवा ५

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 1:31 pm | तर्राट जोकर

मोदींना राजकीय इच्छाशक्ती असल्याने मोदी शासनाचं मूल्यमापन काँग्रेसी सरकारपेक्षा वेगळ्या तऱ्हेने करायला पाहिजे. आणि नेमकं तिथेच घोडं अडतं. सुस्पष्ट धोरण असणे ही इतकी दुर्मिळ चीज होती की मोदींची पहिली काही वर्षे जनतेच्या अपेक्षांची निश्चिती (पूर्ती नव्हे) करण्यातच जातील. एकदा का अपेक्षांची निश्चिती झाली की मगच मूल्यमापन करता येईल.

एवढा हास्यास्पद प्रतिसाद आजवर कुणा भक्ताने लिहिला नसेल....? तुम्ही काय लिहिताय हे तुम्हाला तरी कळत असेल अशी अपेक्षा आहे. माझ्या ह्या अपेक्षेची निश्चिती करण्यातच तुमचा किती वेळ जाइल कुणास ठाउक...

श्रीगुरुजी's picture

15 Oct 2015 - 11:54 pm | श्रीगुरुजी

श्रीरंग_जोशी,

तुमच्याशी सहमत आहे. शासनाच्या धोरणांतले कच्चे दुवे आणि अंमलबजावणीतल्या चुका दाखवून देणे श्रीगुरुजींना अवघड जाऊ नये. यासाठी शासनाला धोरण आणि अंमलबजावणीची इच्छा असणे अत्यावश्यक आहे.

मोदी राजवटीतील चुका, चुकीचे निर्णय इ. वर लेख लिहायचा विचार आहे. केव्हा लिहावा हाच प्रश्न आहे. २ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली तर अजून किमान ७ महिने थांबावे लागेल. त्याऐवजी बिहार निवडणुक निकालानंतर (८ नोव्हेंबर नंतर) लिहिणे योग्य ठरेल. तसेही पुढील महिन्यात मोदी सरकारला दीड वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे पुढील महिन्यातच लिहायचा प्रयत्न करीन.

केवळ एक हिस्सा नाहि तर आणि प्रगतीशील आणि मजबूत पायाभरणीच्या स्वरुपातलं ते कॉण्ट्रीब्युशन आहे.

गामा पैलवान's picture

13 Oct 2015 - 12:21 pm | गामा पैलवान

सोन्याबापू,

>> तुम्ही कितीही द्वेष करा ह्या देशाच्या प्रगति मधे नेहरुंचा एक हिस्सा अन कंट्रीब्यूशन आहेच आहे!

नेहरूंचा द्वेष कोणी नाहीये हो करत!

आता ज्या योगदानाबद्दल तुम्ही म्हणताय तर तो मुद्दा मान्य आहे. हे योगदान फक्त प्रशासकीय पातळीपुरतं मर्यादित आहे. पण काँग्रेसकडून चित्रं असं रंगवलं जातंय की नेहरू सर्वेसर्वा होते. केवळ त्यांच्यामुळे भारतात आज तंत्रज्ञानाची क्रांतीबिंती दिसून येते, वगैरे, वगैरे.

आ.न.,
-गा.पै.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2015 - 12:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

गापै

Agreed to some extent

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 2:20 pm | श्रीगुरुजी

आता ज्या योगदानाबद्दल तुम्ही म्हणताय तर तो मुद्दा मान्य आहे. हे योगदान फक्त प्रशासकीय पातळीपुरतं मर्यादित आहे. पण काँग्रेसकडून चित्रं असं रंगवलं जातंय की नेहरू सर्वेसर्वा होते. केवळ त्यांच्यामुळे भारतात आज तंत्रज्ञानाची क्रांतीबिंती दिसून येते, वगैरे, वगैरे.

प्रशासनाचा मुद्दा सुद्धा मला मान्य नाही. लाल फितीचा कारभार, अवाढव्य आणि नुकसानीतले सरकारी उद्योग, डावीकडे झुकलेले भोंगळ समाजवादी आर्थिक धोरण, संरक्षणव्यवस्था दुर्बल ठेवणे इ. गोष्टी नेहरूंच्याच काळात झाल्या. नेहरू लोकशाहीवादी होते असे सांगितले जाते. पण लोकशाही मार्गाने निवडून आलेले केरळमधील साम्यवादी सरकार १९५७ मध्ये बरखास्त करताना लोकशाहीची कोणती मूल्ये पाळली गेली होती? बाकी संयुक्त राष्ट्रसंघात नेलेला काश्मिर प्रश्न, कलम ३७०, चीनने केलेला दारूण पराभव, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याची शक्यता असताना आपल्याऐवजी चीनचे नाव पुढे करणे इ. चुका काढल्या तर इथे तुंबळ युद्ध पेटेल.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 1:56 pm | श्रीगुरुजी

तुम्हाला माझा आधीचा प्रतिसाद नीट समजलेला दिसत नाही. वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतो.

२००७ मध्ये भारताने क्रिकेटची ट-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्यावेळी जाणता राजा शरद पवार साहेब बीसीसीआयचे अध्यक्ष होते.

नंतर २०११ मध्ये भारताने क्रिकेटची एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्यावेळी जाणता राजा शरद पवार साहेब आयसीसीचे अध्यक्ष होते.

पवार साहेब या स्थानांवर नसते तर भारत विजयी झाला असता का या प्रश्नाचे जे उत्तर आहे, तेच मूळ प्रश्नाचे उत्तर आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 8:07 pm | श्रीगुरुजी

गुरूजी तुमची विचारसरणी आत्यंतिक उजवी दिसते, अम्हांस काहीच आत्यंतिक पचत नाही देवानु, मग तो दादु असो का गुरूजी

मी तथाकथित उजव्या विचारांचा आहे, पण आत्यंतिक विचारसरणी वगैरे अजिबात नाही.

भटकंती अनलिमिटेड's picture

13 Oct 2015 - 11:16 am | भटकंती अनलिमिटेड

दारिद्र्य निर्मूलन, पायाभूत सुविधा विकास, आरोग्य, रस्तेबांधणी, ग्रामविकास, दुष्काळनिवारण या क्षेत्रांत अजूनही म्हणावे तसे काम झालेले दिसत नाही.

टोलचा झोल आहे तो वेगळाच. गडकरींनी मोठ्या गर्जना केल्या होत्या टोलचे भूत मी उभे केले होते, मीच संपवणार. पण गेल्या दोन आठवड्यांपूर्वी स्वतः मान्य केले की टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही. डिजिटल इंडिया साठी स्पेक्ट्रम विकले पण ४जी अजूनही सुरु झालेले नाही. टेलिकॉम कंपन्यांच्या मानगुटीवर बसून ते करवून घेणे गरजेचे आहे. आरोग्य मंत्रालयात हर्षवर्धन आणि आता नड्डा कंपनीचे काय चालले आहे ते कुणालाच समजत नाही. रेल्वेत प्रभूंना अजून विशेष चमत्कार दाखवता आला नाही म्हणून कॅप्टन मोदी नाराज असल्याची चर्चा आहे.

सरकारची बरीच एनर्जी नुसत्या मिडिया आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देत बसणे आणि आपल्याच संघटनांची खरकटी काढणे यात खर्च होताना दिसत आहे. प्रत्येकाने काय खावे, व्हॉट्सअप कसे वापरावे, फेसबुक किती वापरावे याच्या पॉलिसी बनवण्यात उरली सुरली हवा निघून चालली आहे. रेल्वे (प्रभू), आरोग्य (नड्डा), मानवी संसाधन (इराणी), Surface Transport (गडकरी), अवजड उद्योग (गिते), महिला सक्षमीकरण (मनेका गांधी) या मंत्रालयांनी परिणामकारक कार्य करण्याची (किंवा केले असेल ते प्रोजेक्ट करण्याची) निकड आहे. त्या मानाने बेस्ट परफॉर्मिंग अशा परराष्ट्रमंत्रालय (स्वराज) आणि रक्षा मंत्रालयास (पर्रीकर) पाचपैकी साडेचार गुण.

तुम्हा लोकांसारखे असेच सरकारची उणी धुणी काढणारे व असमाधानी असणार्यांनी दिल्लीत 'आम आदमी' पक्ष काढला आणि निवडूनही आले. काही विधायक कामे केलीही.पण परत तेच एरंडाचं गुर्हाळ सुरू झालंच.
मुद्दा इतकाच आहे "फाटक्या विचारांच्या जनतेने फाटक्या सरकारकडून अपेक्षा ठेवू नयेत"

"जसा राजा तशी प्रजा"
नाही नाही.....
"जशी प्रजा तसाच राजा"
मग त्यात मीही आलोच.

तर्राट जोकर's picture

13 Oct 2015 - 3:28 pm | तर्राट जोकर

अन्नसुरक्षा योजना मागे पडून गेलीये, लाखो लोक उपाशिपोटी झोपत असतांना, कित्येकांना अन्नावाचून उपास घडतांना, हजारो मुले कुपोषणाने मरत असतांना 'कुणी काय खायला हवं' यावर मेगाबायटी चर्चा करणारांना माझा साष्टांग दंडवत.

सगळा भारत धनधान्याने भरभरून वाहत आहे, सगळ्या समस्या संपल्या आहेत. 'मुस्लिम गाय खातात' हाच एकमेव राष्ट्रप्रगतीतला अडथळा उरला आहे. तेव्हा मुस्लिम मारुन गाय वाचवणे हेच राष्ट्रकार्य कट्टर देशभक्तांनी आरंभले आहे यात दुमत असायचे कारणच काय? भारतमातेचे अश्रू आनंदाचेच तर आहेत, तुम्हाला काय वाटलं नाहीतर...?

वाढती असहिष्णुता, दादरी सारख्या घटना आणि विचारवंतांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून तीव्र निषेधाचा सूर निघत असताना, अन्य राज्यातील साहित्यिकांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील साहित्यिकांनीही आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. प्रसिद्ध कवियित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार, लेखक हरिश्चंद्र थोरात, अनुवादक गणेश विसपूते, लेखक संजय भास्कर जोशी यांनी आपण पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली आहे

याॅर्कर's picture

13 Oct 2015 - 10:15 pm | याॅर्कर

म्हणजे काॅग्रेसने जशी याआधी इतरांच्या नावाने हिंदुत्वाची केली तशी?
गुदमरत असेल नै त्यांना गळचेपी केल्यावर? शिवाय लंग्स,थ्रोट इनफेक्शन हे प्राॅब्लेमही आलेच.

प्यारे१'s picture

13 Oct 2015 - 10:19 pm | प्यारे१

भिवंडी मध्ये मारलेल्या पोलिसांचं काय झालं ओ पुढे????

या वरच्या कार्यकर्त्यांपैकी कुणीकुणी काय काय 'परत' केलं म्हणे?
शबाना आझमी, भट वगैरे मंडळी आली असतीलच नै निषेधाला?

बाकी कुठल्याही हिंसात्मक घटनेचा निषेधच असला तरी वि शिष्ट प्रसंगीच गळे काढणार्‍या लोकांना डुकराचं लोणचं देण्याची इच्छा दाबत आहे. कशाला बिचार्‍याचा जीव घ्या?

जाळपोळ व दंगल केली होती. त्यात एक पोलिस चौकीही जाळली होती. त्याचे काय झाले हो ?

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2015 - 11:44 pm | श्रीगुरुजी

केरळमध्ये २-३ वर्षांपूर्वी तिथल्या मुस्लिम मूलतत्ववाद्यांनी प्रश्नपत्रिकेत इस्लामवर प्रश्न विचारल्याने एका प्राध्यापकाचे दोन्ही हात कोपरापासून कापून टाकले होते, तेव्हा अकादमी पारितोषिक विजेत्या एकाही साहित्यिकाने तोंडातून निषेधाचा चकार शब्द काढल्याचे ऐकिवातनाही.

केरळमध्ये तर अशा अनेक बुद्धिवतांच्या हत्या झाल्या आहेत. परंतु यांच्याकडून कधी निषेध झाल्याचे ऐकलेले नाही. बाबासाहेब पुरंदरेंवर शाई फेकल्यानंतरसुद्धा हे गप्प होते.

पुलं देशपांडेनाही ठोकशाहीचा अनुभव आला होता म्हणे.

गामा पैलवान's picture

14 Oct 2015 - 11:54 am | गामा पैलवान

डुकराचा तरी कशाला जीव घ्यावा? मला दुसराच पदार्थ सुचतोय! :-D

-गा.पै.

dadadarekar's picture

14 Oct 2015 - 11:57 am | dadadarekar

तुझं मायबोलिचं लंगोट उडालं ना ? दुसरं घेतलं का ?

गामा पैलवान's picture

15 Oct 2015 - 12:36 pm | गामा पैलवान

परम आदरणीय दादासाहेब दरेकर यांस अत्यादरपूर्वक प्रणाम.

पत्र लिहिण्यास कारण की आपण माझ्या लंगोटाची आस्थेने चौकशी केलीत. त्यामुळे माझा ऊर भरून आला आहे. तुमच्याकडे बनावट अवतारांची खाण आहे तर बापड्या माझ्याकडे एकही बनावट अवतार नाही. या बाबतीत तुम्ही गर्भश्रीमंत आहात. तेव्हा माझ्यासारख्या गरीब माणसाकडे फारसं लक्ष न देता तुमची संपत्ती वाढवायच्या योजनांत चित्त गुंतवावे.

हे जमत नसल्यास धाग्याच्या विषयास धरून बोलावे.

हेही जमत नसल्यास इथून कलटी मारावी.

हेही जमत नसल्यास अस्मादिकांच्या दर्शनास या आणि कृतकृत्य व्हा. मी कुठल्या अवस्थेत आहे ते तुम्हाला माहिती आहेच.

आ.न.,
-गा.पै.

गोध्रा आणि अहमदाबाद दंगलीमुळे जे मोदी जगभरात पोहोचले, त्यांनीच आज गुलाम अली आणि कसुरींना झालेल्या विरोधाबद्दल दुःख व्यक्त करावं, हे दुर्दैवी असल्याची 'मार्मिक' टिप्पणी शिवसेनेनं केली आहे.

नरेंद्र मोदी जे बोलले, ते पंतप्रधान मोदींचं मत असेल; आमच्या प्रिय मोदींची ही भावना असूच शकत नाही, अशी पुस्ती जोडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींची गोची करण्याचाही प्रयत्न केलाय. त्यामुळे भाजप-सेनेतील वाक् युद्ध भडकण्याची शक्यता आहे.

दादरी हत्या प्रकरणावर गेले १६ दिवस बाळगलेलं मौन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर आज सोडलं. एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी दादरीची घटना दुःखद असल्याचं प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला झालेला विरोधही स्वागतार्ह - समर्थनीय असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं. या दोन्ही घटनांबाबत केंद्र सरकार दोषी कसं?, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला

कपिलमुनी's picture

15 Oct 2015 - 3:30 pm | कपिलमुनी

मागच्या दोन वर्षात महागाई अफाट वाढली आहे.
भाजपा सरकारची ही दुसरी दिवाळी . रोजच्या वापरामधल्या वस्तूचे दर जबरदस्त वाढले आहेत.
डिझेलवाढ झाली की लगेच किमती वाढतात पण सध्या डिझेलच्या किमती खाली असूनदेखील त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोचत नाहिये. साठे बाजी जबरदस्त वाढली आहे. यावर केंद्र / राज्य सरकारने उपाय करायला हवा

loksaataa

चित्र : लोकसत्तामधून साभार

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Oct 2015 - 5:02 pm | बिपिन कार्यकर्ते

६५ वर्षं बरी सहन केलीत दिवाळी! आत्ताच बरी आठवण आली? एका वर्षात काय काय करेल माणूस? माणूस आहे, देव नाही. सिक्युलर कुठले.

बॅटमॅन's picture

15 Oct 2015 - 5:16 pm | बॅटमॅन

तसंही फक्त महागाईसाठी आम्ही मत दिलेलंच नव्हतं. देशाच्या विकासासाठी इतकंही तुम्हांला सहन करता येऊ नये म्हणजे अवघड आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Oct 2015 - 7:27 pm | कैलासवासी सोन्याबापु

राष्ट्रद्रोही बिका दादा अन बॅट्या,

तुम्ही विकासावर (?) जळता!! हे कपिलमुनी बी तसलंच!! काय हो गाववालं शोभतं का हे असलं आपणांस? आम्ही बघा कसा मार्ग काढतो परवा पिशवी घेऊन डाळ आणायला गेलो (२००₹/किलो वाली) अन एक किलो चिकन घेऊन आलो त्या जागी! २० रुपये वाचवले !! (घटस्थापना असल्या कारणे त्या दिवशी आमच्या नवती न आमच्या ७ डुयांचा उद्धार केला घरी हा भाग अलाहिदा)

तर्राट जोकर's picture

15 Oct 2015 - 10:13 pm | तर्राट जोकर

काय तुमी बापुसायेब, कसं कर्ता राजेहो... येवळे सारे लोकं तुमाले सांगून रायले शाखारी व्हा शाखारी व्हा. तुमी इचीबीन आयकतच नै बॉ..

नै नै हे तुमच्यावालं बरबर नै राजेहो... तुमी निरा थ्या मोदीच्या मांगंच लागले. काम नै धंदे नै तुमाले. थे इलेक्शनले होयेल खर्च काळून रायले अन् तुम्ही येवळ्या चांगल्या कामाले पाचर मारून रायले. थे पंदरा लाक येतीनच, त्यातून काळून घेजा तुमचे हे दोन-शे-गिन-शे तवाच्या तवा. याजासकट! मंग मोदीले निवळून काहाले देल्लं तं मंग आपुन...?

(पा सायाची, उतराले लागली की लोय परस्नं कोयकोय कर्तात डोस्क्यात. आता परस्न पळ्ला भौ आमाले, का थे येक किलो चिकन तुमी येका वख्तालेच गायप केलं असन्ना... तुरीची दाय भी किलोभर एकखट्ट्या संपोता काय..? )

टेन्शन नै घ्याचं, का? घेता का मंग उलशीक लाइट लाईट...

तर्राट देशीप्रेमी -

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 7:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

बापा बापा!! ८ जणांचा जानोसा जेव्याले आसन तर का मुठ्ठी भर डाय शिजोता? थेच्यात सायची आपली अलग जिम्मक रायते आपुन पडलो अकोलावाले अपल्याले पानी वरन ज्यमत ना! रोज घट पेंड लागते वरनाचा जेवत्या टाइम ले! मंग सांगा बापा तुम्हीच कसे भागवा २०० रु च्या डाय मदी? बातच संपत जाय न ते २ झाक्टीत!!

बाकी थे पंधरा लाख येतीन तवा येतीन! सपने काहाले दाखोता गळ्या!

सोन्याबापू… एक डाव या घरी जेवाले …. तुम्हाले उरावर बसू बसू तुरडाळ खाऊ घालतो का नाही ते बघा फकस्त… झ्याक इहीर करा भाताची आन ओता त्याच्यात वरन पाहिजे तेव्हढ…. पन कायले त्या गुरुजीच्या मांग लागू राहिले….

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 10:21 am | कैलासवासी सोन्याबापु

पण तुमाले कायचा तरास होऊ रायला चिनार भाऊ? तुमी तुरीत मारा न गोते, मले कायले डुबोता? अन माय उरावर काहले बसता? त्याहीनं तर्क गलत देला म्या सब्बन तर्कान थो चुक हाय थे सांगो, हेच्यातनी तुम्हाले मांगे लागल्यावानी काय दिसू राहले? अन थुमी काइले मले आवतन देऊ राहले!

पायजा बापा हाऊ! नाहीत नंतर म्हणसान देश असहिष्णु झालाच नाही!

का राजेहो तुम्हाले म्या 'तूर पे चर्चा ' आवतान देल्ल त तुमी मायावरच चील्लावता…अरे नाही डुबवत ना बाप्पा तुमाले..
पन थुमी तिकड उलट्या घड्यावर पानी ओतून राहिले ना… माले काही त्रास नाही बाप्पा… पन नंतर म्हनजो नका दुष्काळ पडला म्हनून

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 11:00 am | कैलासवासी सोन्याबापु

असे झाले नाही मंग ते!! तुम्ही मोर्शी मोर्शी चिल्लाऊ रायलते अन म्या धारनी ची गाडी समजलो!! माफ़ करा दादा आमाले बी गलती झाली उलिशिक

dadadarekar's picture

16 Oct 2015 - 9:07 am | dadadarekar

चिकन , मासे , बक्री स्वस्त आहे तोवर खाउन घ्या.

आता मोदींच्या राज्यात पूर्ण भारतभर बीफबंदी झाली की सगळेच लोक चिकन मासे बक्रीच्या मागे लागतील.

तेंव्हा मांसाहारासाठी मोदी कर्ज योजना आणणार आहेत.

dadadarekar's picture

16 Oct 2015 - 9:07 am | dadadarekar

चिकन , मासे , बक्री स्वस्त आहे तोवर खाउन घ्या.

आता मोदींच्या राज्यात पूर्ण भारतभर बीफबंदी झाली की सगळेच लोक चिकन मासे बक्रीच्या मागे लागतील.

तेंव्हा मांसाहारासाठी मोदी कर्ज योजना आणणार आहेत.

नाव आडनाव's picture

15 Oct 2015 - 10:25 pm | नाव आडनाव

भौ, भारत लै पुढं जौन र्‍हायला ना, आन तुमाले काय ते डाळी-डुळी ची फिकर पडून र्‍हायली :) तुम्ही ईकासाचे ईरोधक हौ का? :)

श्रीगुरुजी's picture

15 Oct 2015 - 11:24 pm | श्रीगुरुजी

डाळी खूप महाग झाल्या आहेत हे खरे आहे. परंतु त्यामागे निसर्गनिर्मित कारण आहे. यावर्षी खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन खूप कमी होणार आहे. पिण्याच्या पाण्याचीच टंचाई झाली आहे, त्यामुळे शेतीला फारसे पाणी देता येणारच नाही. त्यामुळे भाववाढ अटळ आहे.

पण त्यावर नक्की काय उपाय आहे? परदेशातून डाळी आयात करणे हा सध्या तरी एकच उपाय दिसतो. आयात सुरू झाली आहे अशा बातम्या येत आहेत. त्याचा भावावर किती परीणाम होतो ते काही दिवसात कळेलच.

मोदी सरकारला परदेशातून डाळ आयात करता येते तर पाउस पण आयात करायचा ना …. वीस - पंचवीस विमानांनी युरोपावर जोरजोरात घिरट्या घालून तिकडचा पाउस इकडे वळवणे सहज शक्य होते :-) :-) .... राजकीय इच्छाशक्ती हवी हो…. बाकी काही नाही..

हेच का ते अच्छे दिन ???

dadadarekar's picture

16 Oct 2015 - 10:23 am | dadadarekar

गुर्जी आहो पाणी फक्त तूरडाळीलाच कमी पडले का ?

तांदूळ , उस , मूग याना अजितदादा सिंचन करत होते की काय !

दादा तुमचं बरोबर आहे…. राहुल गांधींना पंतप्रधान केलं असतं तर बदाबदा पाऊस पडला असता बघा…. ही तुरडाळ पिकली असती टम्म फुगलेली!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 1:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

निसर्गनिर्मित कारण:- ह्यावर आपले काय वाचन आहे अन तर्क आहे ते जरा सांगाल का हु
गुरूजी? कारण मी हे चक्र निसर्गनिर्मित नाही हे सिद्ध करू शकतो, १२-१२ एकर तुर पेरणी ते समिति सांभाळली आहे मी वय वर्षे १४-२४ दर वर्षी, इन एंड आउट बघितला आहे तो धंदा.

तरीही आपला आदर म्हणुन प्रथम मान आपला :)

(माजी जय किसान) बाप्या

तर्राट जोकर's picture

16 Oct 2015 - 1:36 pm | तर्राट जोकर

हा सुंदर यॉर्कर आहे आणि गुरुजी बेसावध....

श्रीगुरुजी's picture

16 Oct 2015 - 2:07 pm | श्रीगुरुजी

पाऊस कमी पडणे हे कारण निसर्गनिर्मित नसेल तर मग तुम्ही सांगा काय कारण आहे ते?

हे सुद्धा वाचा.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/pulses-crisis-in-india/art...

अभिजित - १'s picture

15 Oct 2015 - 7:04 pm | अभिजित - १

महागाईविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीचे आंदोलन

डाळी, कांदे इत्यादींच्या भडकणाऱ्या भाववाढीविरोधात मुंबई ग्राहक पंचायतीने आंदोलन

छेडले आहे. खालील पत्रक काळजीपूर्वक वाचा, आणि ते मुख्यमंत्री, अन्नमंत्री आणि

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे पाठवा. या मेलची एक प्रत पंचायतीला

पाठवा. या सर्वांचे इ-मेल सदर पत्रकात आहेत.

आंदोलन - ANDOLAN

तुम्ही पुढील ‘लिंक’ कॉपी करून ई-मेलमध्ये थेट पेस्ट करून

राज्य सरकारला मेल पाठवू शकता.

http://mumbaigrahakpanchayat.org/Uploads/ANDOLAN.pdf

कपिलमुनी's picture

16 Oct 2015 - 1:46 pm | कपिलमुनी

महागाई वाढली आहे , कारणे निसर्गनिर्मित असतीलही !
मला गुरुजींकडून भाजपा सरकारने 'आजवर' केलेल्या उपायांच्या माहितीची अपेक्षा होती.

बाकी ५ जुलै २०१० ला याच निसर्गनिर्मित महागाई विरुद्ध भाजपाने देशव्यापी बंद केला होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 2:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

अहो पण डाळ तूटवडा हा निसर्गनिर्मित नाहीचे न कपिलमुनी! मी त्येच म्हणतो आहे

कपिलमुनी's picture

16 Oct 2015 - 2:10 pm | कपिलमुनी

मला पटतय ओ !
पण ....... आले त्यांच्या मना , तेथे कोणाचे चालेना

तर्राट जोकर's picture

16 Oct 2015 - 2:31 pm | तर्राट जोकर

डेन्लाज ने बोला ना तो वही होगा सर...!

dadadarekar's picture

16 Oct 2015 - 3:06 pm | dadadarekar

अबकी बार, अबकी बार म्हणत लेडीज बार सुरु केला ना भाऊ...

अबकी बार मधला बार हा होता हे आता समजल.....

कपिलमुनी's picture

16 Oct 2015 - 3:10 pm | कपिलमुनी

लेडीज बार सुरू करायला राज्य / केंद्र सरकारने परवानगी दिली नसून सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
ढकलपत्र समजून ढकलत चला !

काय राव कपिलमुनी…यु पी ए च्या काळात सर्वोच्च न्यायालय म्हणजे १० जनपथ !!
त्यामुळे दादांचं नेहेमीप्रमाणे बरोबरच आहे

मृत्युन्जय's picture

16 Oct 2015 - 4:15 pm | मृत्युन्जय

तुमच्या युक्तिवादातुन हे तर सिद्ध झाले की युपीयु२ च्या काळातले सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अकार्यक्षम सरकारच्या नाकर्तेपणामुळे न केलेल्या युक्तिवदामुळे झाले.

तर्राट जोकर's picture

16 Oct 2015 - 3:32 pm | तर्राट जोकर

नाम फाउंडेशनला मुख्यमंत्रीनिधीपेक्षा जास्त देणगी मिळाली म्हणे... किती हा लोकांचा विकासाभिमुख सरकारवरचा विश्वास!

तो काळा पैसा तर सोडाच गेल्या वर्षभरात सरकारवरचा विश्वासही परत आणू न शकलेल्या भाजपाकडे काय उत्तर आहे आता?

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 7:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रथम जिथुन विषयाला तोंड लागले तो मुद्दा घेतोय, कपिलमुनी ह्यांनी डकवलेला फोटो,डाळ, तिचे गेल्यावर्षीचे भाव, ह्यावर्षी दिनांक ऑक्टोबर 07 अन दिनांक ऑक्टोबर 14 (एक आठवड्याचा काळ) असे एकंदरित त्या इन्फ़ोग्राफ़िक चित्राचे स्वरुप आहे.

(चित्र इथे दिसत नसल्यास आपणांस वरती स्क्रोल करुन पहावे लागेल , त्या तसदी बद्दल आगाऊ क्षमस्व)

जर "हे निसर्गनिर्मित नाही तर कसे?" हा प्रश्न विचारात घेतला तर मला पुढील काही उपप्रश्न पडले आहेत

एकट्या तुरीचा भाव एका आठवड्यात इतका चढ़ा कसा झाला? कारण ऐकवेळ तुरीचे 2014 मधले भाव जरी सोडले (65 रु किलो) सोडल्यास दिनांक 07 ऑक्टोबर 2015 ला किंमत होती 115-155 ₹/किलो ह्यातले ह्यातली उच्च बजुकडली किंमत पकड़ता 155₹/किलो ते 210₹/किलो अर्थात 55 रुपयांची वाढ ही एका आठवड्यात झाली आहे, उडीद डाळ ह्याच प्रकारे एका आठवड्यात 25 रूपये वाढली आहे, मुग 2 रुपये वाढली आहे मसूर 3 रुपये अन चणा डाळ 3 रुपये कमी झाली आहे, मग नक्की काय झोल आहे? तुर अन उडीद डाळी ला एकदम एका आठड्यात एका वर्षाच्या बरोबरी ची भाववाढ का झाली? अन चण्याची कमी का झाली? दुष्काळ सुद्धा सेलेक्टिव होता असे म्हणता की काय आता? का एक आठवड्या पासुन जनता तुर सप्ताह साजरा करते आहे ?(ह्या आठवड्यात इंधन दरवाढ झालेली ही दिसत नाहीये) तो भाई मामला क्या है? हे साठेबाजी वाढीला लागल्याचे इंडिकेटर नाहीये का?

दूसरे, ठीक एकवेळ कोणी म्हणेल की तुर अन उडीद ह्यांचा खप सर्वाधिक असतो अन दुष्काळ ही आहे (जे अगदी बरोबर आहेच म्हणा) म्हणून एका आठवड्यात जीएसएलव्ही मधे बसली आहे तुर तर मी थोडक्यात "तुर : पेरा ते डाळ" मांडायचा प्रयत्न करतो

प्रथम तुर पिक (विषयाला धरून जितके आहे तितकेच मांडतोय आत्ता)
-पिक म्हणुन जबरदस्त दुष्काळ रेसिस्टेंट पीक
-झाडांची मुळे "टॅप रुट सिस्टम" ची म्हणजे वाढ होताना विशिष्ठ काळ सोडता (40-45 दिवस) पोषण हिवाळ्यातले दव पडले तरी अन मातीच्या ओली वर सुद्धा भागते (अर्थात ऊँटा सारखी असते ही वनस्पती पहिले 45 दिवस दाब्बुन पाणी पिते), ह्या वनस्पती मधे सुद्धा आता बारीक दांडी चे "एचपीए 90" नामक वाण आले आहे जे ओलीत ला सूटेबल आहे (खुरटे असते झाड़ अन दाणा टापोर असतो पण एकंदरित लाग कमी)
-कोरडवाहु साठी परंपरागत लांब पिक चक्र असलेली वाणेच बरी पडतात कारण ती अवर्षण परिस्थिती मधे टिकून राहतात, मिश्र पिक म्हणून लावली तरी उत्तम लाग देतात अन प्रचण्ड वाढतात जेणे करून मिश्रपद्धतीत अंतरपिकांस छाया अन ओल दोन्ही मिळते
-ह्या परंपरागत तुरीचे झाड़ पुर्ण वाढल्या नंतर तोडायला कुर्हाड़ लागते इतपत त्याचा बूंधा होतो आमच्या विदर्भात,अन असे हे पिक मिश्र पद्धतीत असल्या कारणे मधल्या ओळीत 3 3 महिन्याची 3 पिके सहज निघतात
-विदर्भात बहुसंख्य पेरा हा कोरडवाहु चा असतो कारण सिंचन शष्प नाही, हे पिक 270 दिवसांचे वगैरे असते म्हणजे पुर्ण वाढचक्र तश्या शेंगा 190 दिवसा नंतर सुरु होतात, साधारण 45 ते 90 मधे फुले धरणे वगैरे (पॉइंट टु बी नोटेड मी लॉर्ड)
-आता 2013 चे पर्जन्यमान पाहता ते "नॉर्मल टु एक्सेसिव" गटात होते, म्हणजे 2013 च्या जून मधे खरिपात जी तुर पेरली होती तिला 45 दिवस (वाढीचे) जे अगदी स्लो असतात तेव्हा पुरेसे मुबलक पाणी मिळाले होते
-190 दिवसा नंतर शेंगा म्हणजे सरासरी जानेवारी 2014 चा पहिला आठवडा ह्या काळात शेंग फुटवे फुटायला सुरुवात झाली होती, दाणे भरणे अंदाजे मार्च मिड पर्यंत नंतर मे पहिला आठवडा मधे शेंग काळी पडणे अन कापणी असे एकंदरित क्रॉप टेन्योर असते,
-(आता आपण वळु डाळ उद्योगाकडे) तर अशी ही तुर आपण 10 मे 2014 च्या दरम्यान सोंगली (तोड़नी केली) तरीही तुरीचे पिक हे काही लगेच सोंगली-थ्रेशर मधे घातली-मिल ला पाठवली अन डाळ केली इतकी सोपी नसते तर लगेच जमीन पुढल्या पिकासाठी तयार करावी लागते (मशागत करणे जुनी तुर उपटणे इत्यादी) त्याच दरम्यान वळीव पाऊस कचरा करू शकतो म्हणून सेफ साइड ही तुर गोठ्यात शेड मधे वगैरे दाबून ठेवली जाते, तुर थेट मिल ला न धाडने अन दाबून ठेवणे ह्याचे एक अजून फायदेशीर कारण म्हणजे "क्युरिंग" करणे डाळीचे , तुर ही नीट वाळवली नाही तर डाळ काढ़ताना खुप नुकसान होते (छिलका नीट न उतरणे ते गर भागाचा घसारा वाढने पर्यायाने डाळ लो क्वालिटी होणे अन नफा कमी होणे) तस्मात् नवी पेरणे होईपर्यंत अन पावसाळा सरे पर्यंत तुर दाबणे अन नंतर ऑक्टोबर हीट मधे ती कड़कड़ीत वाळवली की भाव वाढीव मिळतो, अश्याप्रकारे 2015 मधे आपण जो डाळ साठा खातो आहोत तो 2013 च्या पेर्याचा आहे.
-आता खरी ज्ञानबाची मेख पॉइंट, एक एक वर्षाची गॅप म्हणजे 2014 चा डाळ साठा 2016 मधे मार्केट ला येणार असता नॉर्मली, पण आता 2014 पासुन पाण्याने हात दिलाय एकंदरित तस्मात् तुरीच्या "फ्यूचर्स" ला तेजी आली कारण 2016 मधे तुटवड़ा असणार हे 2014 च्या पर्जन्यमानाने जवळपास फिक्स केले आहे, ही साठेबाजी नुसती डाळ नाही तर कच्ची तुर ह्याची ही सुरु आहे, अन आत्तापासुन भाव वाढायचे कारण ही तेच आहे, कारण 2016 मधला दाम दुप्पट नफ़ा खुणावतो आहे, नसता एका आठवड्यात किंमत 55-60 रु कसे उडी मारली असेल विचार करा आता स्वतःच! थोडक्यात एक वर्ष साइकिल लैप्स झाल्याने ह्यावर्षी चे भाव वाढणार नाहीत तर पुढल्या वर्षीच्या लोभात वाढणार आहेत.

आता सांगा ह्यावर्षी चा भाव निसर्गनियांत्रित कसा

(तरीही मी ह्यात दलाल अड़ते ह्यांची हरामखोरी , भारतातल्या सर्वात मोठ्या तुर मार्केट (अकोला-अमरावती-यवतमाळ) मधल्या मारवाड़ीलोकांची बीजेपी मधली उठबस वगैरे राजकीय अन सेंसिटिव विषय टाळतोच आहे)

श्रीगुरुजी's picture

16 Oct 2015 - 9:07 pm | श्रीगुरुजी

तुमच्या वरील वेळापत्रकाप्रमाणे २०१६ मध्ये तुरीचा तुटवडा असणार आहे. त्यामुळे आतापासूनच पुरवठा कमी झालेला आहे. मागणी आणि पुरवठा यावर भाव ठरतो. मागणी अजिबात कमी झालेली नाही. परंतु पुढील वर्षी पुरवठा कमी असणार आहे हे ओळखूनच आतापासूनच तूर साठवायला लागल्यामुळे पुरवठा कमी झालेला आहे.

एखादी वस्तू पुढील काही काळ मिळणार नाही हे समजल्यावर घरात सुद्धा आपण त्या वस्तूचा साठा करून ठेवतो. इथेही तेच होत आहे. पूर्वी जेव्हा साखरेचे रेशनिंग होते तेव्हा ज्यांच्या घरात लग्नकार्य वगैरे असायचे ते नागरिक मिळेल तिथून साखर आणून घरी साठवून ठेवायचे. आता पुरवठा मुबलक असल्याने साखरेचा साठा घरी करायची गरज नाही. पावसाने ओढ दिल्याने तुरीचे उत्पादन कमी होणार पण मागणी तेवढीच राहणार. त्यामुळे भाव वाढणारच. अर्थात त्यामागे नफेखोरी हाही भाग असणारच. पाऊस नेहमीसारखाच पडला असता तर भाव वाढण्याचे कारणच नव्हते. त्यामुळे हे निसर्गनिर्मितच कारण आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 9:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

२०१६ मधे म्हणा की नैसर्गिक कारण नाही कोण म्हणतो बुआ? आजच्या संदर्भात तुमची जी वाक्य पाहिल्या परिच्छेदा च्या शेवटी शेवटी आहेत ती पाहता तुम्ही "आत्ता साठेबाजी होते आहे" हे मानता आहात काय?

(नसेल वाटत तसे तर हट्टाग्रह अट्टहास वगैरे नाही फ़क्त नंतर तोंडी वाक्य घातले असे नको म्हणुन स्पष्ट तोंडावर विचारतो आहे)

श्रीगुरुजी's picture

16 Oct 2015 - 9:19 pm | श्रीगुरुजी

तुटवडा होणार हे नक्की आहे. त्यामुळे साठेबाजी होणारच. आणि चतुर व्यापारी याचा फायदा उठविणारच. मुंबईत टॅक्सी किंवा बेस्टचा संप होतो तेव्हा रिक्षावाले अवाच्या सवा भाडे उकळतात. कारण तेच. पुरवठा कमी.

इथेही कमी पुरवठ्याचेच कारण आहे, पण कमी पुरवठ्यामागे नैसर्गिक कारण आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 9:23 pm | कैलासवासी सोन्याबापु

परत तेच! अहो तुम्ही २०१६ बद्दल बोलत असाल तर मान्य आहेच की पण सद्धयाची भाववाढ ही नैसर्गिक लारणास्तव नाही शुद्ध नफेखोरी मधुन आलेली आहे असे मी म्हणतो आहे! आता २०१५ किंवा साध्यस्थिति अन २०१६ ह्याच्यातले नेमके काय समजले नाही आपणांस?

श्रीगुरुजी's picture

17 Oct 2015 - 5:38 pm | श्रीगुरुजी

परत तेच! अहो तुम्ही २०१६ बद्दल बोलत असाल तर मान्य आहेच की पण सद्धयाची भाववाढ ही नैसर्गिक लारणास्तव नाही शुद्ध नफेखोरी मधुन आलेली आहे असे मी म्हणतो आहे! आता २०१५ किंवा साध्यस्थिति अन २०१६ ह्याच्यातले नेमके काय समजले नाही आपणांस?

भारतात तूरडाळीची वार्षिक मागणी अंदाजे २ कोटी ३० लाख टनांच्या आसपास आहे. भारतात २०१४ मध्ये तूर डाळीचे एकूण उत्पादन १ कोटी ७३ लाख टनांच्या आसपास झाले. म्हणजे मागणीच्या अंदाजे ७५% टक्केच उत्पादन झाले व एकूण तूट ५५ लाख टनांच्या आसपास आहे. २०१५ मध्ये दुष्काळामुळे हे उत्पादन अजून कमी होऊ शकते.

तुमच्या कोष्टकाप्रमाणे २०१५ मध्ये कमी उत्पादन होणार असल्याने त्याचा भावावर परीणाम २०१६ मध्ये दिसायला हवा. त्याच गणिताप्रमाणे २०१४ मधील कमी झालेल्या उत्पादनाचा भावावर होणारा परीणाम २०१५ मध्येच दिसणार ना.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Oct 2015 - 7:30 am | कैलासवासी सोन्याबापु

काय गुरूजी,

तुम्ही कोष्टक कोष्टक करताय नुसते मनःपूर्वक वाचलेले दिसत नाही तुम्ही ते अन्यथा

अश्याप्रकारे 2015 मधे आपण जो डाळ साठा खातो आहोत तो 2013 च्या पेर्याचा आहे.

हे वाक्य का मिस केले असते आपण ? क्लियर बोललोय एक वर्ष जवळपास गॅप असते मधे मग २०१४ चा माल १५ मधेच कसा येणार मार्केट ला? २०१४ च्या दुष्काळ परिस्थिती मुळेच २०१६ मधे कमी पुरवठा असेल हे मान्य केले आहे त्यात, ओढून ताणुन त्याचा संबंध ह्या वर्षी च्या जमाखोरी ला काय म्हणून लावता आहात देवानु?

शिवाय, २०१४ मधल्या दुष्काळ मुळे २०१५ मधे डाळ महाग झाली हे तुमचे विधान ग्राह्य धरले (चुक वरती दाखवणेत आली आहे तरी) तरी भाववाढ़ एकाच आठवड्यात रु १५५/किलो ते रु २१०/किलो अशी ५० पंचावन्न रूपये एकदम कशी वाढली? ह्यावर काही विचारमौक्तिके?

श्रीगुरुजी's picture

18 Oct 2015 - 11:03 pm | श्रीगुरुजी

गेली ३ वर्षे पाऊस सरासरीपेक्षा बर्‍यापैकी कमी प्रमाणात पडलेला आहे. या तिन्ही वर्षात जून व जुलै महिने जवळपास कोरडेच गेले. यावर्षी तर पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. तूर डाळ व साधारणपणे जवळपास सगळ्याच डाळींच्या देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे भाववाढ होणे अपरिहार्य आहे. सध्या तूर डाळ आयात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा भाव खूप वाढलेले आहेत व आंतरराष्ट्रीय भावात व भारतात विकल्या जाणार्‍या भावात जेमतेम २०-३० रू. प्रति किलो इतकाच फरक आहे (भारतातला तूर डाळीचा आजचा भाव १५०-१८० रू. प्रति किलो धरला तर दोन्ही भावात फारसा फरक नाही). त्यामुळे तूर डाळ आयात करूनसुद्धा भावात फारसा फरक पडणार नाही. २०१३, २०१४ आणि २०१५ अशी लागोपाठ ३ वर्षे कमी पावसाचा फटका बसल्याने भाववाढ अपरिहार्य आहे.

कपिलमुनी's picture

16 Oct 2015 - 9:53 pm | कपिलमुनी

चतुर म्हणालात इथेच सर्व काही आले !

तर्राट जोकर's picture

17 Oct 2015 - 1:34 am | तर्राट जोकर

गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा कॅमेरावरच बॉल दाणकन आदळलाय. बेल्स उडून ग्राउंडच्या बाहेर आहेत. तरीही गल्ली क्रिकेटमधल्या ब्याटमालक पोरासारखं "मी आउट नाहीच" असं म्हणणं कसं जमतं हो तुम्हाला? जावा घरी. क्लीन्बोल्ड झाला आहात.

कमी पुरवठ्यामागे तुमचे च'तुर' व्यापारी आहेत, निसर्ग नाही. तुमच्या सरकारला ह्या च'तुर' व्यापार्‍यांच्या चतुराईला मोडता घालायला वेळ नाही. जनतेचे हाल होऊ देत. तुम्ही फक्त भाजपाचे कपडे सांभाळा.

@बापुसायेब. एक सल्यूट खाटकन. तुरीची शेंग कोणत्या रंगाची असते हे गुगलून पाहणारास यापेक्षा अधिक समर्पक उत्तर शक्य नव्हते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 6:00 am | कैलासवासी सोन्याबापु

मला हातावर तुरी मिळाल्या! :P

श्रीगुरुजी's picture

17 Oct 2015 - 11:32 pm | श्रीगुरुजी

गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा कॅमेरावरच बॉल दाणकन आदळलाय. बेल्स उडून ग्राउंडच्या बाहेर आहेत. तरीही गल्ली क्रिकेटमधल्या ब्याटमालक पोरासारखं "मी आउट नाहीच" असं म्हणणं कसं जमतं हो तुम्हाला? जावा घरी. क्लीन्बोल्ड झाला आहात.

हा प्रतिसाद वाचून करमणूक झाली.

इथे मला सोन्याबापू गोलंदाजी करीत नाहीत किंवा ते माझी गोलंदाजी खेळत नाहीय्येत. त्यामुळे त्यांनी मला किंवा मी त्यांना बाद करण्याचा किंवा आम्ही एकमेकांची गोलंदाजी फोडून काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

परंतु तरीसुद्धा माझा त्रिफळा उडालाय अशी तुम्ही स्वतःची समजूत करून घेत असल्यास माझी अजिबात हरकत नाही.

त्यामुळे साठेबाजी होणारच. आणि चतुर व्यापारी याचा फायदा उठविणारच.

साठेबाजी करणार्‍या ह्याच "चतुर" व्यापार्‍यांबद्दल २००९-१० किंवा २०१२-१३ साली श्रीगुरूजी, तुमचं मत काय असलं असतं बरं? आणि अर्थातच तेंव्हा ते मत फक्त व्यापारी नाही तर सरकार बद्दल पण असलं असतं. तेच मत आत्ताच्या सरकारला लागू होतं का?

स्वतःच्या खिशाला कात्री लागत असतांना (खरंतर दरोडाच घातलाय) व्यापार्‍यांना "चतुर" म्हणणार्‍या श्रीगुरूजींच्या भाजप प्रेमाला सलाम :)

असाच चतुरपणा भाजपच्या राज्य सरकारने दुधाच्या भावात ४०% पैसे "चतुर" व्यापर्‍यांच्या घशात घालून केला आहे.

व्यापारी खरंच "चतुर" आहेत :)

dadadarekar's picture

17 Oct 2015 - 10:59 am | dadadarekar

काँग्रेसच्या काळात व्यापारी नफेखोर होते.

आता त्याना चतुर म्हणायचं बरं का !

मृत्युन्जय's picture

17 Oct 2015 - 12:09 pm | मृत्युन्जय

आणि चतुर व्यापारी याचा फायदा उठविणारच.

चतुर व्यापारी?????????????????????????????????????//

बोह करे तो कॅरेक्टर ढीला, हम करे सो रासलीला?? :) ;)

बात कुछ हजम नही गुर्जी.

बाकी या धग्यावर ही एक गंमतच आहे. २०१२ - १३ मध्ये जे लोक प्राणपणाने ज्या सगळ्या गोष्टींची पाठराखण करत होते तेच आता त्याच गोष्टींसाठी भाजपावर आणि गुर्जींवर टीका करत आहेत आणि जे लोक त्यावेळेस तुटुन पडले होते ते आता इतरांच्या चतुरपणाचे आणि नैसर्गिक आपत्तीचे रडगाणे गात आहेत.

त्याहुन गंमत म्हणजे सध्या कावीळीची खूप मोठी साथ पसरली आहे. लाल रंग दिसला तरी लोक भगवा भगवा म्हणुन आक्रोश करुन राहिले बाप्पा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 12:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

कोणी केला बाप्पा! ;)

मृत्युन्जय's picture

17 Oct 2015 - 5:44 pm | मृत्युन्जय

मी "बाप्पा" म्हणलो हो. बापु नाही म्हणालो :) ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Oct 2015 - 9:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

सद्धया २०१५ मधे जे आठवड्या ला ५० रूपये भाव एकदम वाढले आहेत ते साठेबाजी वगळता अजुन कुठल्या संभाव्य कारणास्तव वाढलेली नाहीत, हे मात्र मी म्हणतो आहे