काही अपेक्षा.... मिपाकरांकडून

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in काथ्याकूट
14 Dec 2008 - 10:18 pm
गाभा: 

खुलासा-

हे विचार आम्ही धोंडोपंत आपटे या एका मिपाकराच्या भूमिकेतून मांडत आहोत. आमच्या मिसळपाव डॉट कॉमच्या मॉडरेटर पदाचा या विचारांशी काहीही संबंध नाही. मिपाच्या संपादक मंडळाला हे विचार पटतील किंवा पटणारही नाहीत.

सध्या मिपाच्या संपादक मंडळाची एसटी इतकी खचाखच भरलेली आहे की, काहींना त्यात बसायला देखील जागा नाही. असो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संपादक मंडळातील काहींना पटणे आणि काहींना न पटणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या पटण्या किंवा न पटण्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही.

बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते. कारण इंग्लंड अमेरिकेत राहिले म्हणजे ते मोठे.... अशी एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली आहे.

आम्ही आपले कोकणातले साधेसुधे लोक. टमरेल घेऊन पोफळीखाली बसतो. पण या परदेशस्थांना वातानुकूलित शौचकूप लागते. त्यामुळे सहाजिकच परदेशस्थ लोकांचा सर्वत्र दबदबा असतो.

आपल्या सायटीच्या संपादकात अशा उच्चभ्रू परदेशस्थांचा भरणा असावा अशी अनेक साईटवाल्या मालकांची इच्छा असते. कारण त्यांच्या मताला किंमत जास्त अशी परिस्थिती मराठीच नव्हे तर इतर भारतीय भाषातील संकेतस्थळावर आहे. असो.

तर सांगण्याचा मुद्दा एवढाचं की खाली लिहिलेले विचार ही आमची वैयक्तिक पातळीवरची मते आहेत.

आमच्या असे पाहण्यात आले आहे की, अनेक उपटसुंभ इतर संकेतस्थळांवर प्रथम लेखन करून नंतर त्या ताटातले खरकटे लोकप्रियता मिळविण्यासाठी मिपावर टाकतात.

कोणी कुठे लेखन करावं हा लोकशाही स्वातंत्र्याचा भाग आहे असे आम्ही देखिल मानतो. पण जेव्हा पूर्वप्रसिद्धीचे संदर्भ दिले जातात त्यात मिपाची विलक्षण अवहेलना होते हे नक्की.

कारण इतर ठिकाणी आधी लेखन प्रसिद्ध करायचं आणि ते तिथे प्रसिद्ध झाले आहे हे तारे इथे तोडायचे हा भिकारचोटपणा आहे. म्हणजे " हे पहा किती चांगलं आहे? आधी तिथेसुद्धा प्रसिद्ध झालाय..... " असे त्यातून सुचवून प्रसिद्धी इथे मिळवायची हा उद्देश चीड आणणारा आहे.

मिपा हे उगवत्या प्रतिभेला वाव देणारं संकेतस्थळ म्हणून नावारूपाला आलेले आम्हाला आवडेल.

इतर ठिकाणी पाडलेल्या साहित्याचा जिर्णोद्धार करण्याचे हे ठिकाण ठरू नये हीच अपेक्षा.

आपला,
(स्पष्ट) धोंडोपंत

वर जे लिहिले आहे ते पोटतिडकीने लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्याचा स्तोत या संकेतस्थळाबद्दल आमच्या मनात असलेले प्रेम हा आहे , हे सुज्ञास समजेल अशी अपेक्षा आहे. काही त्रस्त संमंधांची कोल्हेकुई गृहीत धरली आहे.

वरील विचार किंवा त्यात आलेले शब्द संपादक मंडळाच्या माननीय, वंदनीय, आदरणीय, पूजनीय, प्रातःस्मरणीय अमेरिकन संपादकांना जर अश्लील, ग्राम्य , असंस्कृत वाटले तर हा संपूर्ण लेखच्या लेख उडविण्याची कृपा करावी ही विनंती.

आपला,
(स्पष्टवक्ता) धोंडोपंत

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

14 Dec 2008 - 10:55 pm | आजानुकर्ण

अतिशय सहमत आहे.

मराठीत अनेक संकेतस्थळे आहेत आणि एका संकेतस्थळावर लिहिणारे सदस्य दुसऱ्या संकेतस्थळावर वाचनमात्र म्हणून का होईना (कितीही नाकारत असले तरी) असतातच. लिहिण्याची हौस भागवण्यासाठी कुठेही पण एकाच ठिकाणी लिहावे असे वाटते. लेखकांनीच ही मर्यादा स्वतःला घालून घेतली पाहिजे.

होतं काय की प्रत्येक संकेतस्थळावर तोच लेख वाचायला मिळतो. हाईट म्हणजे अनेकदा तोच प्रतिसादही दोन्ही ठिकाणी दिसतो.

आपला,
(सहमत) आजानुकर्ण

परदेशी सदस्यांबाबतचे निरीक्षण ढोबळमानाने योग्य वाटत असले तरी माझ्याबाबतीत खरे नाही. मीदेखील परदेशात आहे पण माझ्या मतांना कोणीही विचारत नाही.

आपला
(देशी) आजानुकर्ण

कलंत्री's picture

14 Dec 2008 - 10:59 pm | कलंत्री

आपल्या समंजस आणि परिपक्व दृष्टीकोनाचा आम्हाला अभिमानच वाटतो.

(देशी) कलंत्री

अवलिया's picture

14 Dec 2008 - 10:57 pm | अवलिया

पुर्णपणे सहमत

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:14 pm | धोंडोपंत

नाना,

कुणीतरी हे बोलायला हवं होतं. ते कार्य आम्ही केलं. वाईटाचे धनी होण्यात आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही.

बोललो ते काही... तुमचिया हिता
वचन नेणता .... क्षमा कीजे

असे तुकारामाने म्हटले आहे. भूमिका स्पष्ट करण्यासाठी हा अभिप्राय लिहिला.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

अवलिया's picture

14 Dec 2008 - 11:45 pm | अवलिया

वाईटाचे धनी होण्यात आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही.

त्यात काय वाईट वाटायचे. लोक आधी शिव्या देतील नंतर हारतुरे देतील.
काळजी नको.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

भडकमकर मास्तर's picture

14 Dec 2008 - 11:02 pm | भडकमकर मास्तर

आपला संदर्भ लक्षात आला ...
तुमचे हे म्हणणे पटते की दुसरीकडे प्रकाशित केलेली गोष्ट / लेख / कविता इकडे प्रकाशित करू नये....

ज्या कवितेबद्दल आपण बोलत आहात ती त्या सदस्याने पूर्वी प्रकाशित केलेली होती ... ती नंतर नुकतीच वर आलेली होती ... आणि त्या सदस्याने त्याबद्दल स्पष्टीकरणसुद्धा दिले होते...
तुम्ही म्हणता तसे इंग्लंड अमेरिकेचा काय संबंध असेलसे वाटत नाही...तुम्ही इतके चिडण्यासारखे बाकी अजून काही घडले असेल तर माहित नाही...

तुमची एक चलाखी आवडली... तुमच्या बाजूने न लिहिणारा कोल्हेकुई करतो आहे हे आधीच स्पष्ट केलेत .....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Dec 2008 - 11:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तरांशी सहमत.

आणखी एक निरीक्षणः
आणि परदेशी, अनिवासी भारतीय लोकांना जास्त भाव देणारे देशीच असतात. काही इतर जळणारे असतात. आणि अगदीच मोजके "काय फरक पडतो" असा "विचार करु शकतात".

(फारीन रिटर्न्ड, संपूर्ण भारतीय) अदिती

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:09 pm | धोंडोपंत

मास्तरांचे पोवाडे खरडवहीत लिहिता येतील.

इथे विषयाबद्दल चर्चा अपेक्षित आहे.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Dec 2008 - 11:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे काय लिहायचं हे पण खरडवहीत लिहिता नाही का येत?

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:17 pm | धोंडोपंत

नाही.

हा चर्चाविषय आहे. खरडवहीत हा लिहिता येत नाही .

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

आनंदयात्री's picture

15 Dec 2008 - 12:26 pm | आनंदयात्री

>>देवघर आणि बेडरूममध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतात. समजले?

मला नाही समजले ?? समजवता ???
शब्द जरा सांभाळुन वापरा सुभाषराव !! संपादक असाला म्हणुन काहीही लिहलेले खपवुन घेणार नाही.

-
आनंदयात्री

सदस्य
मिसळपाव डॉट कॉम

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Dec 2008 - 12:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

देवघर आणि बेडरूममध्ये वेगवेगळ्या गोष्टी करतात. समजले?
नाही समजलं! मी पडले कट्टर नास्तिक ना? आमच्या घरात देव नाही माणसं रहातात.

बाकी या चर्चेत टोकेरी शब्द वापरून लोकांना घालून पाडून बोलणे, माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना शयनगृहाचा उल्लेख करणे आणि शेवटी
"नमस्कार,
चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. चर्चेदरम्यान काही अधिक उणे आमच्याकडून बोलले गेले असेल तर क्षमायाचना. मनात काही कटूता नाही हे खात्रीपूर्वक सांगतो.
लोभ असावा ही विनंती.
आपला,
(शुभेच्छुक) धोंडोपंत"
असे व्यनी खरडणे हे मला अंंमळ संशयास्पद वाटत आहे.
अशा "शुभेच्छुका"चं काय करावं असा धागा उघडावा का काय असा विचार डोक्यात डोकवत आहे.

(थंड डोकंवाली) अदिती

अवांतरः लाथ मारून सॉरी म्हणण्यापेक्षा एकतर लाथ मारू नये नाहीतर केलेल्या कृत्याची जबाबदारीतरी घ्यावी. एकदा टोकेरी वाक्य आणि नंतर क्षमायाचनेचा गुळमुळीतपणाचा दुतोंडीपणा माझ्या तर्कट डोक्याला झेपत नाही.

अदिती

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 3:15 pm | विसोबा खेचर

बाकी या चर्चेत टोकेरी शब्द वापरून लोकांना घालून पाडून बोलणे, माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना शयनगृहाचा उल्लेख करणे

तो उलेख आता संपादित केला आहे. तरीही धोंडोपंतांनी केलेल्या या अत्यंत असभ्य लेखनाबद्दल मी व्यक्तिश: क्षमा मागतो..

तात्या.

इनोबा म्हणे's picture

14 Dec 2008 - 11:15 pm | इनोबा म्हणे

मास्तरांचे पोवाडे खरडवहीत लिहिता येतील.
धोंडोपंत, तुमचा खुलासा ही खरडवहीतच लिहायचा ना.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:18 pm | धोंडोपंत

तो खरडवहीत लिहिला असता तर तुमच्यासारख्या विषय भरकटवणार्‍यांना तो कळला नसता. म्हणून इथे लिहिला. तुमची सोय म्हणून.

आता हे पुरे. विषयाबद्दल चर्चा चालू द्या.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

इनोबा म्हणे's picture

14 Dec 2008 - 11:36 pm | इनोबा म्हणे

माझ्या माहितीप्रमाणे सदर कविता(ज्यामुळे हे तुणतुणे सुरु झाले) मिपाच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झाली होती. काही प्रतिसादांमुळे ती वर आली.
ती त्यापुर्वी तिथे प्रसिद्ध झाली होती म्हणुन ती इथे प्रसिद्ध होऊ नये असे का? कित्येक लोक आधी आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर लिहून मग ते इथे डकवतात. स्वाक्षरीमध्ये स्वतःच्या ब्लॉगची जाहिरात करतात. मग याच कवितेवर असा रोष का? बरे ही कविता ज्यावेळी प्रसिद्ध झाली होती तेव्हा हा वाद का नाही घातला? आत्ताच असे काय झाले, की ही कविता इथे नकोशी झाली? खरे कारण नेमके काय आहे?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:54 pm | धोंडोपंत

तोच तोच मुद्दा उगाळू नका. मास्तरांना दिलेल्या अभिप्रायात तुमच्या आक्षेपांची उत्तरे दिली आहेत.

तीन मराठी संकेतस्थळांवरील मुखपृष्ठांवर काही दिवस नजर टाका . म्हणजे आम्ही काय म्हणतोय याचा अर्थबोध होईल.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

इनोबा म्हणे's picture

15 Dec 2008 - 12:06 am | इनोबा म्हणे

तोच तोच मुद्दा उगाळू नका.
अरे हो! विसरलोच होतो. तोच तोच मुद्दा उगाळायचे स्वातंत्र्य फक्त आपल्यालाच आहे.

तीन मराठी संकेतस्थळांवरील मुखपृष्ठांवर काही दिवस नजर टाका . म्हणजे आम्ही काय म्हणतोय याचा अर्थबोध होईल.
त्याची गरज नाही, तुम्ही काय म्हणताय आणि का म्हणताय याचा बर्‍यापैकी अर्थबोध झालाय आम्हाला. तरीही आपण स्पष्टवक्ते असल्याने आणखी काही बाबी स्पष्ट कराल या अपेक्षेने बोललो.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धोंडोपंत's picture

15 Dec 2008 - 12:44 am | धोंडोपंत

तुम्हाला अर्थबोध होऊ शकतो हे वाचून आम्ही भरून पावलो. अशीच प्रगती कायम ठेवा.
शुभेच्छा.
आता मूळ विषयाकडे

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

इनोबा म्हणे's picture

15 Dec 2008 - 1:02 am | इनोबा म्हणे

अजूनतरी ज्योतीषांच्या, ग्रहांच्या भानगडीत न पडल्याने आमची प्रगती उत्तम चालू आहे. :)
आता मूळ विषयाकडे या. उगाच चर्चेला फाटे फोडू नका.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ's picture

25 Oct 2013 - 2:12 pm | विजुभाऊ

इनोबा.
या गृहस्थांशी वाद घालण्यात अर्थ नाही. एका प्रतिसादाबद्दल त्यानी काही सदस्यांना विंचू ठेचता येतो वगैरे शब्दात व्यनी केले होते. ज्या लोकाना टीका खिलाडूपणे स्वीकारता येत नाही अशी एक जमात असते. त्यातलेच हे एक.

मदनबाण's picture

25 Oct 2013 - 2:18 pm | मदनबाण

काय इजुभाऊ ताप चढलाय का ? नाही उगाच उत्खनन प्रकल्प राबवतायत म्हणुन विरारले हो !

अवलिया's picture

15 Dec 2008 - 12:28 am | अवलिया

प्रकाटाआ

आजानुकर्ण's picture

14 Dec 2008 - 11:03 pm | आजानुकर्ण

त्रस्त संबंधांची ऐवजी येथे त्रस्त समंधांची असे हवे असे वाटते..

आपला
(पिंगळा) आजानुकर्ण

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:07 pm | धोंडोपंत

धन्यवाद आजानुकर्ण,

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

आपला अभिजित's picture

15 Dec 2008 - 9:22 am | आपला अभिजित

हे अवांतर आहे, हे कबूल. तरीही, वरची प्रतिक्रिया वाचली, म्हणून हा अभिप्राय.

आजानुकर्णांने तुमची चूक चुकीची दाखवली आहे.
तुम्ही `संमंधांची' असा शब्द वापरलात. तो `समंधांची' असा हवा होता. (मूळ शब्द `समंध.') आजानुकर्णांनी चूक पकडलेय, पण तुम्ही `संबंधांची' असा उल्लेख केल्याचे त्यांनी म्हटलेय. ते अर्धेच खरे आहे. असो.

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:04 pm | धोंडोपंत

अहो मास्तर,

जरा दमानं घ्या. इथे अनेक गोष्टी घडतात. तुम्ही ते एकच वांगं कुठे धरून बसला आहात?
इथला इतिहास माहित असेल तर असे अनेक संदर्भ समजतील.

तेव्हा त्या कालच्या शिळ्या कढीला ऊत आणून नको त्या पुड्या सोडू नका.

विषय गंभीर आहे तो गांभीर्यानेच पुढे जाऊ द्या.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

भडकमकर मास्तर's picture

14 Dec 2008 - 11:10 pm | भडकमकर मास्तर

आम्ही मनोगतावर जातच नसल्याने तिथे काय रोज चालू असते ते माहित नव्हते....
आम्ही एकच मराठी संस्थळ वाचतो आणि एकाच संस्थळावर लिहितो...
यामुळे कोण कुठे किती वेळा लिहितो याविषयी कल्पना नाही...

असो....गंभीर विषय चालूद्यात....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धोंडोपंत's picture

15 Dec 2008 - 12:08 am | धोंडोपंत

असो मास्तर,

जाऊ द्या.

नमोगतावर आम्हीही जात नाही पण तेच आमच्या परसात येतं कोंबडीसारखं.

तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

खरा डॉन's picture

14 Dec 2008 - 11:07 pm | खरा डॉन

पंत त्रिवार सहमत!! आताच मिपाच्या मुख्यपानावर आणि मनोगताच्या मुख्य पानावर पाहा. किमान दोन लेख जसेच्या तसे फोटो सकट झळकले आहेत. मनोगतावरच प्रसिद्धी हवी होती तर मिपाच्या सर्वरवर निष्कारण ताण का वाढवता? ज्याला जिथे लिहायचे त्याने तिथे लिहावे पण हा दोन दगडांवर पाय ठेवण्याचा खेळ पुरे!

(पंतांचा पंखा) खरा डॉन

आणि हो भारतातील सदस्यांची संख्या बघता इतके अमेरिकन संपादक काय कामाचे? हे ही पटले

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:33 pm | धोंडोपंत

डॉन,

या आमच्या लेखाचे श्रेय आम्ही तुम्हाला देतो. श्रेय देण्यासाठी हा अभिप्राय.

तुम्ही आमच्या या अस्वस्थ विचारांना वाचा फोडलीत. आणि अनेक जण याच विचारांचे आहेत हे समजले.

मैं अकेला ही चला था जानिब-ए- मंज़िल मगर
लोग तो मिलते गये .... कारवाँ बनता गया

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

इनोबा म्हणे's picture

14 Dec 2008 - 11:07 pm | इनोबा म्हणे

तुम्ही म्हणता तसे इंग्लंड अमेरिकेचा काय संबंध असेलसे वाटत नाही...तुम्ही इतके चिडण्यासारखे बाकी अजून काही घडले असेल तर माहित नाही...
तसेच काहीसे असावे.

तुमची एक चलाखी आवडली... तुमच्या बाजूने न लिहिणारा कोल्हेकुई करतो आहे हे आधीच स्पष्ट केलेत .....
ही काय आजची गोष्ट आहे काय मास्तर?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विनायक पाचलग's picture

14 Dec 2008 - 11:08 pm | विनायक पाचलग

हो मी शमत आहे.मीदेखिल फक्त मिपावरच लिहितो.
मला इथल्या वादामुळेच इतर साइट समजल्या पण मी तिकडे पाहिलेही नाही.
पण परवा जेव्हा शुद्धलेखनाचा अंमळ गोंधळ उडाला तेव्हा आम्हि मनोगत जॉइन केले पण जेव्हा एक विनन्ती ह लेख वाचला तेव्हा सर्व शन्का दुर झाल्या त्यामुळे आताही मी फक्त मिपावासीच.
आणि हो परदेशी लोकान्बद्दल म्हणाल तर ते खरे आहे.
मी जेव्हा ६ महिन्यापुर्वी मायबोली पाहिली होती तेव्हा म्हणुनच मला ती आवडली न्हवती.
आपला,
(मिपावासी)को दा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Dec 2008 - 11:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,
एकच लेखन चार संकेतस्थळावर असायला नको असे मागे आम्ही बोलून दाखवले होते. किमान इकडचे तिकडचे खरकटे मिपावर तर नकोच नको...जिथे लिहाल तिथे स्वतंत्र लेखन करावे या मताचे आम्ही. मिपावर तर स्वतंत्रच लेख यावे या विचाराचे आम्ही समर्थन करतो...असो, अशा लेखनांना आम्ही प्रतिसादच लिहित नाही हे आमचे धोरण आहे. ( आज एका उत्तम लेखाच्या निमित्ताने धोरण मोडले तो भाग सोडून द्या )

-दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

14 Dec 2008 - 11:37 pm | लिखाळ

आपला मुद्दा मिपाकर म्हणून मान्य आहे. लेखन स्वतःचा ब्लॉग आणि एक संकेतस्थळ असे सीमित असले तर बरे.

अमेरिकेतले संपादक, भारतातले संपादक असे वर्गीकरण आणि आपल्या लेखनातून या दोन वर्गात होणारा भेदभाव आपण मांडला आहे. तो संपादक मंडळातले अंतर्गत प्रवाह समोर आणतो. सामान्य सदस्यांनी या बाबत काय भूमिका ठेवावी? अमेरिकन संपादकाने लेख संपादित केला तर भारतीय संपादकाकडे दाद मागावी (किंवा उलटे) असे करावे का? असा नवाच विचार मनात येत आहे. संपादक मंडळातले मतभेद असे एकदम सार्वजनिक झालेले पाहून थोडे विचारात पडायला झाले आहे.

-- लिखाळ.
अनुकूल जागा पाहून शौचाला बसणे आणि जागा अनुकूल करुन शौचाला बसणे यातला मूलभूत फरकाचा विचार करतो आहे.

धोंडोपंत's picture

14 Dec 2008 - 11:45 pm | धोंडोपंत

<<<<<अनुकूल जागा पाहून शौचाला बसणे आणि जागा अनुकूल करुन शौचाला बसणे यातला मूलभूत फरकाचा विचार करतो आहे.>>>>

जरुर करा. तुमचे पोट साफ होवो या सदिच्छा. आता मूळ मुद्द्याकडे.

संपादक मंडळातील मतभेद हा जावईशोध आमचा नाही. आम्ही असे म्हटले आहे की एकूणच भारतीय भाषातील संकेतस्थळावरील मालकांचा कल जास्तीत जास्त परदेशस्थ संपादक आयात करणे हा असतो. केवळ मराठी नव्हे तर गुजराती, कन्नड, पंजाबी, हिंदी संकेतस्थळांवर सुद्धा तुम्हाला हीच प्रवृत्ती आढळेल.

आम्ही एका उर्दू संकेतस्थळाचेही संपादक आहोत, तिथेही हाच प्रकार आहे. आम्ही ते सूचित केले आहे.

मिपाच्या संपादक मंडळातील भांडणे वगैरे मुद्दे आमच्या डोक्यात देखील नाहीत. तेवढे करत बसायला वेळही नाही आणि कंडही नाही. मतभेदाचे मुद्दे निर्माण झाले की आम्ही सरळ फोन उचलून सरपंचांना शिव्या देतो. .... इतकचं.

त्यामुळे आपण मांडलेली कलाटणी या विषयाला नको.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

लिखाळ's picture

14 Dec 2008 - 11:49 pm | लिखाळ

जरुर करा. तुमचे पोट साफ होवो या सदिच्छा.
:) आभार.

मिपाच्या संपादक मंडळातील भांडणे वगैरे मुद्दे आमच्या डोक्यात देखील नाहीत.
ठीक. पण आपल्या खुलाश्यातल्या मतांवरुन तसे वाटले. असो..

-- लिखाळ.
भरपूर विचार हे एरंडेलाचे काम करतात असा अनेकदा अनुभव येतो. :)

टारझन's picture

15 Dec 2008 - 12:09 am | टारझन

आमचे मुद्दे :
१. आमच्या ब्राऊझर मधे फक्त ऑर्कुट, कंपनीचा मेलबॉक्स, जी-मेल, आणि मिपा, हे चारच टैब्स नेहमी उघडे असतात, आम्ही फक्त मिपावरच वाचतो. त्यामुळे ते लेखण आधी कुठे प्रसिद्ध केलंय का ? वगैरे आम्हाला *ट माहीत नसते, ते आमच्या साठी " के व ळ अ प्र ति म " नविन लेखण असते.
२. मी इथं आलोच लेट त्यामुळे आधीच्या वादाची आम्हाला जाणिव नाही, आम्ही आमचे लेखण पण आधी मिपावर प्रसिद्ध करतो आणि मग आमच्या ब्लौग वर. तो ब्लौग पण मिपा जॉइन केल्यावर २-३ महिन्यांनी काढला.
३. उगाच भारतिय-अभारतीय असा वाद पसरवू पहाणार्‍यांना आम्ही तरी फाट्यावर मारतो.
४. ज्या कविते मुळे वाद सुरू झाला आहे ती कविता मिपासुरू झाल्यावर १ महिन्याने सुरू झाल्याचं चर्चे वरून कळतं.
५. ह्या धाग्यातुन मला एका मिपाकराचे नाहीत तर एका संपादकाचे दुसर्‍या संपादकाबद्दल वाजल्याचे कळतं आणि हा धागा केवळ त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचे जाणवते. त्यामुळे लेखात कितीही दावा केला की हा एका मिपाकराचा विचार आहे, ते मान्य होत नाही .
६. कोणी ह्याला कोल्हेकुई म्हणायची रिस्क आपल्या जबाबदारीवर घ्यावी.
७. मागे एकदा गांधीवादाचा अतिरेक झाला होता .. आता मिपावादाचा अतिरेक होतोय असं वाटतं.
८. संपादकांना सारासार विचारशक्ती असते , ते आमच्यासारख्या टवाळ पोरांसारखे उस्फूर्त प्रतिक्रिया / लेख देत नाहीत अशी इथं अट असते असं वाटतं , त्याची पुन्हा परिक्षा घेण्यात यावी .

कळाचे ,
लोभ असला नसला काय फरक पडतो ?
(टारझन)

धोंडोपंत's picture

15 Dec 2008 - 12:25 am | धोंडोपंत

१) तुमच्या ब्राऊझरमध्ये काय दिसतं हा या चर्चेचा विषय नाही. विषय भरकटवणारे लेखन नको.

२) तुम्ही तुमच्या ब्लॉगावर लेखन कधी करायचं हा ही या चर्चेचा विषय नाही.

३) तुम्ही कुणाला फाट्यावर मारता आणि तुम्हाला कोण मारतं हा ही या चर्चेचा विषय नाही.

४) कोणत्याही एका लेखावरून वाद सुरू झालेला नाही. इथे मिपाकरांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. नको ती गुर्‍हाळे सुरू करून मूळ मुद्द्याला बगल देऊ नये.

५)हे तुमचे स्वप्नरंजन आहे. तसे असते तर इतर अनेक लोक या मुद्द्याशी सहमत झाले नसते. हा तुम्ही जाणीवपूर्वक केलेला अपप्रचार आहे.

६) जो तो आपली रिस्क घ्यायला समर्थ आहे. सल्ल्याची गरज नाही.

७) मिपावादाचा अतिरेक? नविन इझमचा शोध लावलात की काय? याला बांधिलकी अभिमान आणि आपुलकी म्हणतात. पुख्खे झोडण्यासाठी मिपावर येणार्‍यांना ते कळणार नाही. जाऊ द्या.

८) तुमच्या सूचनेबद्दल सरपंचांना आणि संपादक मंडळाला कळवा. हा ही या चर्चेचा विषय नाही.

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

टारझन's picture

15 Dec 2008 - 12:59 am | टारझन

तुमच्या ब्राऊझरमध्ये काय दिसतं हा या चर्चेचा विषय नाही. विषय भरकटवणारे लेखन नको.
तुम्ही तुमच्या ब्लॉगावर लेखन कधी करायचं हा ही या चर्चेचा विषय नाही.

का ? हा का मुद्द्याचा विषय नाही ? ह्यावरून आम्ही केवळ मिपाकर आहोत आणि आम्हालाही आस्था आहे हे दाखवायचं होतं .. पण बगल द्यायची असेल तर कोण काय करणार ?

तुम्ही कुणाला फाट्यावर मारता आणि तुम्हाला कोण मारतं हा ही या चर्चेचा विषय नाही.

का ? मिपावर जर बाहेरील संकेतस्थळांवरील लेख लिहील्यावर इथं धागा काढू शकता तर आम्ही इथं आमचा मिपाकर पणा नाही दाखवू शकत ?

हे तुमचे स्वप्नरंजन आहे. तसे असते तर इतर अनेक लोक या मुद्द्याशी सहमत झाले नसते. हा तुम्ही जाणीवपूर्वक केलेला अपप्रचार आहे.

उठा झोपेतून .. सहमत असणार्‍यांपेक्षा आपल्याला फाट्यावर मारणार्‍यांचीच संख्या जास्त दिसते आहे.

पुख्खे झोडण्यासाठी मिपावर येणार्‍यांना ते कळणार नाही. जाऊ द्या.

बासंच .. असले धागे काढणे म्हनजे मिपाभक्ती आहे का ? यामुळेच म्हंटलेलो मिपावादाचा अतिरेक होतो. शोबाजी आहे ही आणि व्यक्तिगत अपमानामुळे काढलेला धागा.. मला ह्या आधी काय झालंय ते माहीत नाही, तरी सुद्धा सांगू शकतो .. आणि आपल्या प्रतिक्रियांच्या भाषेवरून तर ते सिद्धच आहे. आमच्या हेतूवर बेट ठेऊ नका, तुटतील .. आम्ही हाताच्या पण हाडांचा पण विमा काढतो...

तुमच्या सूचनेबद्दल सरपंचांना आणि संपादक मंडळाला कळवा. हा ही या चर्चेचा विषय नाही.

आम्ही काय करावं हे आम्हाला शिकवण्यासाठी आम्हाला आपल्या सल्ल्याची गरज नाही..

भारतीय आणि अभारतीय संपादकांचं मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण सांगाल काय ?

एरवी फक्त प्रतिक्रिया अवांतर पाहिलेल्या ... हा तर धागाच अवांतर आहे, पहिलाच अवांतर धागा काढल्याबद्दल हाबिणंदण ... मला वाद घालायची इच्छा नाही .. माझा शेवटचा रीप्लाय

प्रियाली's picture

15 Dec 2008 - 12:19 am | प्रियाली

धोंडोपंतांच्या मूळ विषयाशी मी सहमत आहे. एकच लेख दोन्हीकडे येऊ नये असे मत यापूर्वीही मांडले आहे. त्यांच्या लेखातील इतर काही बाबींशीही मी सहमत आहे. परंतु, हे माझे मत झाले. लेखकाने काय करावे हा त्याचा प्रश्न.

सध्या मिपाच्या संपादक मंडळाची एसटी इतकी खचाखच भरलेली आहे की, काहींना त्यात बसायला देखील जागा नाही. असो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट संपादक मंडळातील काहींना पटणे आणि काहींना न पटणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या पटण्या किंवा न पटण्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही.

ही गोष्ट माझ्याही लक्षात आलेली आहे आणि यापूर्वी तात्यांशी बोलणे झाले आहे. तरी आज मी स्वखुशीने माझी जागा रिकामी करत आहे. एश्टीत इतर कोणाला चढायचे असल्यास माझे काहीही म्हणणे नाही.

बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते. कारण इंग्लंड अमेरिकेत राहिले म्हणजे ते मोठे.... अशी एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली आहे.

आम्ही आपले कोकणातले साधेसुधे लोक. टमरेल घेऊन पोफळीखाली बसतो. पण या परदेशस्थांना वातानुकूलित शौचकूप लागते. त्यामुळे सहाजिकच परदेशस्थ लोकांचा सर्वत्र दबदबा असतो.

ही वाक्ये अनावश्यक वाटली पण मी संपादन करणे कधीच सोडलेले आहे त्यामुळे फारसा फरक पडत नाही.

कारण इतर ठिकाणी आधी लेखन प्रसिद्ध करायचं आणि ते तिथे प्रसिद्ध झाले आहे हे तारे इथे तोडायचे हा भिकारचोटपणा आहे. म्हणजे " हे पहा किती चांगलं आहे? आधी तिथेसुद्धा प्रसिद्ध झालाय..... " असे त्यातून सुचवून प्रसिद्धी इथे मिळवायची हा उद्देश चीड आणणारा आहे.

सर्वसाक्षी, श्रावण मोडक वगैरे आणि इतरही असे काही करतात असे मला वाटत नाही.

वरील विचार किंवा त्यात आलेले शब्द संपादक मंडळाच्या माननीय, वंदनीय, आदरणीय, पूजनीय, प्रातःस्मरणीय अमेरिकन संपादकांना जर अश्लील, ग्राम्य , असंस्कृत वाटले तर हा संपूर्ण लेखच्या लेख उडविण्याची कृपा करावी ही विनंती.

अमेरिकन संपादकांची भरपूर भरणा झाली आहे ही गोष्ट खरीच. बाकी गोष्टींशी माझे काही देणे घेणे नाही. तसाही वेळ कमी असतो. तात्यांना सांगून उपयोग झाला नाही त्यामुळे जाहीर येथे लिहिते. त्याला हा लेख केवळ निमित्त समजावे. मी मिसळपावाचे संपादन सोडून देत आहे. एष्टीत जो कोणी दुसरा बसू इच्छितो त्याला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 12:24 am | विसोबा खेचर

संपादक म्हणून आपले राजीनामापत्र आम्ही पुन्हा एकवार नाकारत आहोत..

आपण संपादन करा वा करू नका, आपले संपादनाचे अधिकार तसेच अबाधित राहतील असे पुन्हा एकवार सांगू इच्छितो..

तात्या.

धोंडोपंत's picture

15 Dec 2008 - 12:29 am | धोंडोपंत

प्रियालीताई,

तुमच्या राजीनाम्याचा प्रश्न कुठे उद्भवतो? तुम्ही उगाच स्वतःला यात खेचत आहात. राजीनामा वगैरे देऊ नका. ही चर्चा आहे. ही व्हावीच. राजीनामा ठेवायला आता आपल्याकडे जागा नाही. विलासरावांचा आला, आबांचा आला. ड्रॉवर भरला की हो.

चिअर्स प्रियाली. धिस इज नॉट द वे.

आय ऍश्युअर यू दॅट यू आर नॉट इन्व्हॉव्ह्ड हिअर. बिलिव्ह मी.

आपला,
(प्रामाणिक) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

प्रियाली's picture

15 Dec 2008 - 12:43 am | प्रियाली

आय ऍश्युअर यू दॅट यू आर नॉट इन्व्हॉव्ह्ड हिअर. बिलिव्ह मी.

हो ते मला माहित आहे. :) मी फक्त राजिनाम्याचा चान्स मारला.

माझा राजिनामा कृपया मूळ चर्चेशी अवांतर समजावा परंतु इथे असू दे. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की खरेच मिपावर खूप संपादक आहेत आणि मी माझ्या आयुष्यात हल्ली खूप गुंतलेली आहे त्यामुळे मी बशीतून उतरते.

ही चर्चा मी माझ्यावर ओढवून घेत नाही आणि तात्या आणि धोंडोपंतांनीही त्यांच्यामुळे मी असा निर्णय घेते हे समजू नये. :)

कृपया, कोणाचाही गैरसमज नसावा.

माझा राजिनामा चर्चेशी संबंधीत नाही. मला संपादन करणे वेळेअभावी आणि इतर जबाबदार्‍यांमुळे केवळ अशक्य आहे हे कृपया समजून घ्यावे.

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 12:20 am | विसोबा खेचर

चर्चा छान सुरू आहे... :)

एका जमान्यात आम्ही देखील आमचे सर्व लेखन एकाच मराठी संस्थळावर प्रकाशित करत होतो. कोठेही लिहावे परंतु शक्यतोवर एकाच संस्थळावर लिहावे हा पंतांचा मुद्दा आम्हाला वैयक्तिकरित्या पटण्याजोगा आहे. अर्थात, मिपाचे मालक या नात्याने येथे केल्या गेलेल्या प्रत्येक लेखनाचे आम्ही स्वागतच करू. सदर लेखन अन्य कुठल्या संस्थळावर प्रकाशित झाले आहे किंवा नाही याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही..

असो...

आता मिपाच्या संपादक मंडळाबद्दल -

सध्या मिपाच्या संपादक मंडळाची एसटी इतकी खचाखच भरलेली आहे की, काहींना त्यात बसायला देखील जागा नाही.

एस टी संपादक मंडळाने भरलेली आहे अथवा नाही, कुणाला बसायला जागा आहे, कोण उभे आहेत याची चिंता कृपया कुणीही करू नये. त्याकरता आम्ही समर्थ आहोत..!

बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते. कारण इंग्लंड अमेरिकेत राहिले म्हणजे ते मोठे.... अशी एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली आहे.
त्यामुळे सहाजिकच परदेशस्थ लोकांचा सर्वत्र दबदबा असतो.
आपल्या सायटीच्या संपादकात अशा उच्चभ्रू परदेशस्थांचा भरणा असावा अशी अनेक साईटवाल्या मालकांची इच्छा असते.

वरील विधानांशी आम्ही असहमत आहोत. आम्हाला कुणाच्याही दबावाखाली येऊन कुणालाही संपादक नेमण्याची आवश्यकता नाही. ना आम्ही त्या पद्धतीने कुणाला नेमले आहे..!

संपादकांच्या निवडीबाबत कुठल्या देशातले किती संपादक नेमायचे याचे सर्वाधिकार आम्ही राखून ठेवत आहोत. तरीही माहिती म्हणून आम्ही असे सांगू इच्छितो की सध्या एकूण संपादकांपैकी आम्ही धरून चार संपादक भारतातले आहेत. दोन युरोपातील आहेत आणि अन्य अमेरीकेतील आहेत.

काही संस्थळकंटकांनी भारतात रात्र झाल्यावर आम्ही व अन्य भारतीय संपादक निद्रादेवीच्या आधीन झालेले असतांना मिपावर येऊन मिपावर, तसेच आमच्यावर व्यक्तिगत गरळ ओकणारे लेखन या पूर्वी अनेकदा केल्याचे आमच्या पाहण्यात आहे. अश्या वेळेस सदर लेखन उडवण्याचे, मिपावर रात्रभर लक्ष ठेवण्याचे काम आमचे अमेरीका/युरोपातलेच संपादक अत्यंत चोखरित्या करत असतात असे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो..

संपादकांचा विषय निघालाच आहे म्हणून आम्ही जाता जाता हा खुलासा करत आहोत. अर्थात, हा खुलासा करायला आम्ही कुणाचेही बांधील नाही असे पुन्हा एकवार स्पष्ट करू इच्छितो..

पंतांचा आणि आमचा व्यक्तिगत स्नेह आहे. त्या स्नेहापोटी, तसेच मिपावरील त्यांच्या स्नेहापोटी त्यांनी काही एका आपुलकीने हा लेख लिहिला आहे याची आम्हाला जाणीव आहे. फक्त लेखातील भाषा जरा बोचरी आणि थोडी पूर्वग्रहदुषित वाटली.

असो..

या चर्चेतील आमचा हा पहिला आणि शेवटचा प्रतिसाद..

बाकी चालू द्या...

साला दमड्या पण खर्च करा अन् डोक्याला तापही करून घ्या हे आम्हाला जमणार नाही! मिपा जे आहे, जसे आहे तसे सुरू राहील. गेले दीड वर्ष आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे मिपाचा कारभार एकहाती सांभाळत आहोत. जोपर्यंत लोक इथे आपुलकीने येताहेत, वाचताहेत, लिहिताहेत तोपर्यंत उत्तमच आहे अन्यथा मिपा आपोआपच बंद पडेल! फिकीर नाही..!

तात्या.

चतुरंग's picture

15 Dec 2008 - 1:37 am | चतुरंग

तात्या, तुमच्याकडून अशाच प्रतिसादाची आवश्यकता आणि अपेक्षा होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत त्याबद्दल धन्यवाद!

'मिपा' आणि आपला ब्लॉग ह्याव्यतिरिक्त आणखी ठिकाणी तेच लिहू नये ह्या मताचा मी आहे पण शेवटी हा त्या त्या लेखकाचा वैयक्तिक प्रश्न आहे असे मला वाटते. त्याला कुठे कसा प्रतिसाद द्यायचा/द्यायचा नाही हा वाचकांचा वैयक्तिक प्रश्न आहे असेही वाटते. पण त्याकारणाने कोणीही वैयक्तिक शेरेबाजी, गरळ ओकणे, पूर्वग्रहदूषित फटकेबाजी केलेली योग्य वाटत नाही. कोणाशीही असलेले वैयक्तिक मतभेद हे असे विनाकारण चव्हाट्यावर टांगणार्‍या मतांचा मी निषेध करतो!

बरं होतं असं की , विदेशी प्रवासी आले की त्यांना जागा खाली करून द्यावी लागते. कारण इंग्लंड अमेरिकेत राहिले म्हणजे ते मोठे.... अशी एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली आहे.
त्यामुळे सहाजिकच परदेशस्थ लोकांचा सर्वत्र दबदबा असतो.
आपल्या सायटीच्या संपादकात अशा उच्चभ्रू परदेशस्थांचा भरणा असावा अशी अनेक साईटवाल्या मालकांची इच्छा असते.

ह्या मतांचा तर इथे धाग्यात काडिमात्र संबंध दिसत नाही. मी स्वतःला मिपाचा एक प्रामाणिक सदस्य आणि नंतर संपादक मानतो. मला संपादनाचे अधिकार नव्हते तेव्हाही आणि आताही माझ्या हेतूंविषयी कोणीही शंका घेतलेली नाही (त्यात खुद्द तात्याही आले). त्यामुळे देशी आणि विदेशी असा निष्कारण वाद ह्याठिकाणी आमच्या एका संपादकानेच निर्माण करावा ह्याचा विलक्षण खेद झाला!
आधी काही बोलूच नये असेच वाटत होते पण निदान माझी बाजू स्पष्ट करावी ह्याकारणाने मी प्रतिसाद दिला. असो, ह्या धाग्यावरचा हा माझा शेवटचा प्रतिसाद आहे.

चतुरंग

धोंडोपंत's picture

15 Dec 2008 - 1:11 am | धोंडोपंत

तात्यांच्या अभिप्रायावर मतप्रदर्शन करून या चर्चेला कायमचा पूर्णविराम देत आहोत.

ज्यांनी ज्यांनी आपली मते या विषयावर नोंदवली त्या सर्वांना धन्यवाद. चूकभूल द्यावी घ्यावी.

कुणाला काही कमी जास्त बोललो असू , तर मोकळ्या मनाने क्षमा करावी. चर्चेचा टेम्पो सांभाळतांना काही वाक्ये कमीजास्त लिहिले जाण्याची शक्यता असते. तसे झाले असेल तर क्षमायाचना.

कुणाबद्दलही कटुता नाही हे पुन्हा एकदा सांगतो. आता तात्यांच्या मुद्यांना उत्तरे देऊन थांबतो. समारोप शुद्ध भावाने व्हावा म्हणजे सर्व देवाणघेवाण गोड होते. असो. तात्या म्हणतात-

एस टी संपादक मंडळाने भरलेली आहे अथवा नाही, कुणाला बसायला जागा आहे, कोण उभे आहेत याची चिंता कृपया कुणीही करू नये. त्याकरता आम्ही समर्थ आहोत..!

नक्कीच !!! त्याबद्दल काही वाद नाहीच. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. वस्तुस्थिती सांगितली.

वरील विधानांशी आम्ही असहमत आहोत. आम्हाला कुणाच्याही दबावाखाली येऊन कुणालाही संपादक नेमण्याची आवश्यकता नाही. ना आम्ही त्या पद्धतीने कुणाला नेमले आहे..!

दबावाखाली येऊन कुणी संपादक म्हणून नियुक्त झाले आहे असे विधान या लेखात कुठेच नाही. बहुतेक सर्व संकेतस्थळांचा कल परदेशस्थ संपादक नेमण्याकडे आहे हे अवलोकन इथे सांगितले आहे.

काही संस्थळकंटकांनी भारतात रात्र झाल्यावर आम्ही व अन्य भारतीय संपादक निद्रादेवीच्या आधीन झालेले असतांना मिपावर येऊन मिपावर, तसेच आमच्यावर व्यक्तिगत गरळ ओकणारे लेखन या पूर्वी अनेकदा केल्याचे आमच्या पाहण्यात आहे. अश्या वेळेस सदर लेखन उडवण्याचे, मिपावर रात्रभर लक्ष ठेवण्याचे काम आमचे अमेरीका/युरोपातलेच संपादक अत्यंत चोखरित्या करत असतात असे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो..

१००% मान्य.

संपादकांचा विषय निघालाच आहे म्हणून आम्ही जाता जाता हा खुलासा करत आहोत. अर्थात, हा खुलासा करायला आम्ही कुणाचेही बांधील नाही असे पुन्हा एकवार स्पष्ट करू इच्छितो..

हे ही १००% मान्य.

संपादकांच्या निवडीबाबत कुठल्या देशातले किती संपादक नेमायचे याचे सर्वाधिकार आम्ही राखून ठेवत आहोत.

हे ही एकदम मान्य. तो फक्त मालकांचाच अधिकार असतो आणि असावा.

पंतांचा आणि आमचा व्यक्तिगत स्नेह आहे. त्या स्नेहापोटी, तसेच मिपावरील त्यांच्या स्नेहापोटी त्यांनी काही एका आपुलकीने हा लेख लिहिला आहे याची आम्हाला जाणीव आहे.

धन्यवाद. आमचा उद्देश कळला हे चांगले झाले. नाहीतर गैरसमज झाला असता. याचसाठी केला होता अट्टाहास!!!

फक्त लेखातील भाषा जरा बोचरी आणि थोडी पूर्वग्रहदुषित वाटली.

असहमत. बोचरी वाटू शकते हे मान्य. पण पूर्वग्रहदुषित दृष्टीकोणाने काहीही लेखन केलेले नाही. काही मुद्दे ऐरणीवर घेतले ते तुम्हाला लागले असतील म्हणून तसे मत झाले असेल.

जोपर्यंत लोक इथे आपुलकीने येताहेत, वाचताहेत, लिहिताहेत तोपर्यंत उत्तमच आहे अन्यथा मिपा आपोआपच बंद पडेल! फिकीर नाही..!

असे होणे कुणालाच नको आहे. तसे जर असते तर भेटणार्‍या प्रत्येकाला मिपाबद्दल सांगून इथे आणले नसते. ही भूमिका फार टोकाची आहे असे वाटते. मिपा वृद्धींगत व्हावे हाच उद्देश आहे म्हणून ही हळी दिलेली आहे. गैरसमज नसावा.

आपला,
(मिपाप्रेमी) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(उजाले अपनी यादों के हमारे साथ ही रहने दो.... न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये!)

देवदत्त's picture

15 Dec 2008 - 1:26 am | देवदत्त

नेमके कुणाचा काय वाद आहे हा मला नीट कळला नाही. पण एखाद्याने फक्त मिपावरच लिहिणे हे चुकीचे वाटते. ह्या २/३ संकेतस्थळाच्या आंतरिक वादामुळे इथे येणार्‍या लोकांचा उत्साह कमी होऊ नये असे मला वाटते.
एखाद्याने स्वतःचा जुना लेख मिपावर लिहिणे हे त्याचा आणि मिपाच्या संपादक मंडळाचा बघण्याचा दृष्टीकोन आहे. जर लिहिणारा मिपाच्या ह्या धोरणाचे पालन करत असेल तर काय हरकत आहे?
इतर संकेतस्थळ,ब्लॉग व मिसळपाव वरील सदस्य ह्यात थोडाफार फरक आहेच. सर्वच सगळीकडेच नाहीत. मागे एका प्रतिक्रियेत मी लिहिण्याप्रमाणे एखाद्या नाटकाचे जसे वेगवेगळ्या शहरात प्रयोग होतात तसलाच हा प्रकार समजावा. माझ्यासारखे लिखाण करणारे लोक हे अजून नीटसे लिहू शकत नाहीत. त्यांना जर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत असतील त्यांचा उत्साह वाढेलच.

मिपा हे उगवत्या प्रतिभेला वाव देणारं संकेतस्थळ म्हणून नावारूपाला आलेले आम्हाला आवडेल.
सहमत. मलाही आवडेल. गेले २ महिने माझा मिपावर (इतर ठिकाणीही) जास्त वावर नाही. पण गेल्या काही दिवसांत जे एखाद्या लेखात अवांतर लेखन होत गेल्याचे पाहिले त्यावरून तर उगवत्या प्रतिभेला वाव मिळणे हळू होतेय असे मला वाटते.

नीधप's picture

15 Dec 2008 - 9:27 am | नीधप

कोल्हेकुई म्हणा नाहीतर अजून काही.
एक लिहिती (लेखक म्हणवून घेण्यासाठी माझ्यासकट आपण कोणीच लायकीचे नाही आहोत अजून..) या नात्याने म्हणायचं तर...
१. लिखाण करताना कोणीही व्यक्ती स्वतःसाठी किंवा केवळ लिहून कपाटात बंद करून ठेवण्यासाठी करत नाही. प्रत्येकाला जास्तीतजास्त वाचक मिळावे आपल्या लिखाणाला अशीच इच्छा असते. यात चूक काहीच नाही.
२. मिपाची एक्स्क्लूजिव्हिटी राखण्यासाठी हे आवाहन/ नियम असेल तर माझ्यासारखे काही लोक गमावले हे समजा. (मी महत्वाची लिहिती आहे असा दावा नाही.) प्रत्येक माणसाचे प्रेफरन्सेस असतात. माझ्याबाबतीत माझा प्रेफरन्स मायबोली आहे (माझी वैयक्तिक कारणे आहेत पण म्हणजे मी मिपाला कमी लेखते असे नाही). असा नियम आला तर प्रत्येक जण आपापल्या प्रेफरन्सप्रमाणे त्या त्या ठिकाणी लिहिल.
३. लोक केवळ एकाच संकेतस्थळावर लिहू लागल्यास केवळ मिपावर येणारे अनेक लोक हे वेगळा प्रेफरन्स असलेल्या अनेकांचे लिखाण वाचूच शकणार नाहीत.
४. एखादा लेख एखाद्या संकेतस्थळावर गाजला तर दुसर्‍या संकेतस्थळावर पण तो टाकावा म्हणजे तिकडेही लोक वाचतील असा आग्रह करणारेही अनेक जण असतात. उदाहरण माझ्याच खरडवहीत बघायला मिळेल. यात पण चूक काही नाही.

मिपाबद्दल प्रेम असणं यात चूक काही नाही. मिपाबद्दल आस्था असणं हे ही ठीकच पण हा उपाय काही पटत नाही. आणि त्यासाठी लिहित्यांना प्रसिद्धीची हाव किंवा तत्सम शेरे देणं हे चूकच. (बाकी प्रेम आणि आस्था हे सहवासाने घडतं. तेव्हा मिपावर नियमांचा अतिरेक न झाल्यास इथेही सहवास घडेल आणि आम्हालाही मिपाबद्दल हे सर्व काही निर्माण होईलच हळूहळू)

इथे एक्स्क्लूजिव्हिटीची मागणी करणं हे प्रेम मागण्यासारखं आहे. मागून मिळत नाही ते घडावे लागते. उदाहरणादाखल सांगायचं तर माझी एक लेखमाला मी केवळ मायबोलीवर लिहिते. माझ्या ब्लॉगवरही लिहित नाही. यामधे माबो प्रशासनाच्या नियमांचा हात नाही. हा माझा माझा निर्णय आहे आणि माझं मायबोलीवरचं प्रेम आहे हो. हे मिपासाठीही घडेलच की. पण त्याची इतक्या कडक शब्दांत मागणी करू नका हो हक्क असल्यासारखी.

प्रत्येक लिहित्याला जास्तीतजास्त वाचक हवे असतात. प्रसिद्धी हवी असते. त्यावर नाके मुरडणे हे ढोंग म्हणता येऊ शकेल कारण नाके मुरडणार्‍यांचा स्वतःचा ब्लॉग तरी आहेच ना. असो. अशी बंधने घालू नयेत ही विनंती आहे. पण बंधने घालायचीच असल्यास आमच्या इथल्या लिखाणाचा रामराम समजावा.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

त.टी.: - माबो चे नाव केवळ उदाहरणादाखल घेतले आहे. कुणाचे वैयक्तिक मत माबोबद्दल वेगळे असले तर त्याला माझा नाइलाज आहे. आणि माबो चांगले कि मिपा हा वाद अर्थहीन आहे.

धम्मकलाडू's picture

15 Dec 2008 - 2:47 pm | धम्मकलाडू

प्रत्येक लिहित्याला जास्तीतजास्त वाचक हवे असतात. प्रसिद्धी हवी असते.

खरे आहे. आपल्या कुणी ओळखले की अगदी धन्य झाल्यासारखं वाटते. अज्जुका, तुम्ही त्याच ना श्वासवाल्या, 'स्वच्छतेच्या बैलाला'वाल्या? तुम्ही त्याच ना ज्यांची कथा पण 'झुंजुमुंजु'च्या दिवाळी अंकात आली आहे? तुम्ही इथे वावरता हे मिपाकरांचं भाग्यच म्हणायला हवं!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चंबू गबाळे's picture

15 Dec 2008 - 3:12 pm | चंबू गबाळे

तुम्ही इथे वावरता हे मिपाकरांचं दूर्भाग्यच म्हणायला हवं

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

नीधप's picture

15 Dec 2008 - 10:31 pm | नीधप

खरं बोललेलं पेलत नाही हेच खरं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रभाकर पेठकर's picture

16 Dec 2008 - 1:18 pm | प्रभाकर पेठकर

अज्जुका ह्यांच्या विचारांशी १००% सहमत.

इतर संकेत स्थळावर लिहिल्यावर, प्रसिद्धीच्या हावे पोटी मिपावर लिहिले, असे म्हणणे किंवा इतर संकेतस्थळावरील 'खरकटे' मिपावर सांडण्याचा उल्लेख मिपावर लिखाण करणार्‍यांवर अन्यायकारक आणि अपमानकारक आहे. ह्या विषयावर आधीही मी माझे मत मांडले आहे. मिपाच्या मालकांची ह्या गोष्टीला हरकत नसताना कोणाही सदस्याने आक्षेप घेणे हे मालकांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्यासारखे होईल. तात्यांनी त्यांचे विचार स्पष्ट केले आहेतच. त्यामुळे हा विषय संपला आहे असे मला वाटते.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आपला अभिजित's picture

15 Dec 2008 - 9:52 am | आपला अभिजित

मनोरंजन होतंय!
अजून येऊ द्या!!

धम्मकलाडू's picture

15 Dec 2008 - 11:45 am | धम्मकलाडू

मनोरंजन होतंय!
अजून येऊ द्या!!

अजून यायला हवे. खूप्पच मनोरंजन होते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

JAGOMOHANPYARE's picture

15 Dec 2008 - 2:59 pm | JAGOMOHANPYARE

अज्जुकांचे बरोबर आहे..... लेख किती वेबसाईटवर प्रकशित करायचा हे लेखकाने ठरवावे, इतरानी नाही... आणि मुळात दुसर्‍या साईटवरपण इथले लेख प्रकाशित होतात, हे धोन्डोपन्ताना कसे समजले ? म्हणजे तेही दुसर्‍या साईटवर जात असणार ! वाचणारा दुसरीकडे जाऊ शकतो, मग लिहिणार्‍याने गेले तर बिघडले कुठे ?

आम्हाघरीधन's picture

15 Dec 2008 - 5:38 pm | आम्हाघरीधन

एक विचार : क्रुपया व्यक्तिशः घेवु नये.
मुळात धोंडोपंत आपटे यान्चे हे मत एकान्गी आहे.
पुण्यात जश्या 'आमची कुठेही शाखा नाही'(आजही व्यापारात आपण किती मागे राहिलो आहोत याचे प्रदर्शन करित आहोत याचे ही भान नाहि) च्या पाट्या निर्लज्ज पणे लावण्याला आदर्श समजला जातो तसाच हा विचार आहे. आपले मत इतर कोठेही नोन्दवु नये अथवा ते केवळ इथेच नोन्दवावे असे म्हणने योग्य नाहीच.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

लिखाळ's picture

15 Dec 2008 - 5:50 pm | लिखाळ

पुण्यात जश्या 'आमची कुठेही शाखा नाही'(आजही व्यापारात आपण किती मागे राहिलो आहोत याचे प्रदर्शन करित आहोत याचे ही भान नाहि) च्या पाट्या निर्लज्ज पणे लावण्याला आदर्श समजला जातो तसाच हा विचार आहे.
पुण्यातील व्यावसायीकांबद्दलचे आपले मत समजू शकतो. पण अनेकदा अतिशय प्रसिद्ध अश्या खाद्यपदार्थ बनवणार्‍या दुकानदाराचे कुठे शाखा नसते. पण त्याच्या कडून ते पदार्थ कुणी विकत घेऊन परस्पर जास्त किंमतीत (किंवा शिळे) विकू नये (तसे ग्राहकाला असमाजावे) या हेतूने अनेकदा त्या पाट्या लावलेल्या असाव्यात. अर्थात हा माझा अंदाज. ते व्यावसायीक निर्लज्ज असावेत असे वाटत नाही.

माझा हा प्रतिसाद मूळ लेखाला अवांतर आहे. यापुढे काही लिहायचे असल्यास ख.व.चा वापर करुया.
-- लिखाळ.

कवटी's picture

15 Dec 2008 - 5:42 pm | कवटी

वर जे लिहिले आहे ते पोटतिडकीने लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्याचा स्तोत या संकेतस्थळाबद्दल आमच्या मनात असलेले प्रेम हा आहे , हे सुज्ञास समजेल अशी अपेक्षा आहे. काही त्रस्त संमंधांची कोल्हेकुई गृहीत धरली आहे.

कुणीतरी हे बोलायला हवं होतं. ते कार्य आम्ही केलं. वाईटाचे धनी होण्यात आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही.

नमोगतावर आम्हीही जात नाही पण तेच आमच्या परसात येतं कोंबडीसारखं.

तसे जर असते तर भेटणार्‍या प्रत्येकाला मिपाबद्दल सांगून इथे आणले नसते. ही भूमिका फार टोकाची आहे असे वाटते. मिपा वृद्धींगत व्हावे हाच उद्देश आहे म्हणून ही हळी दिलेली आहे.

असे स्वतःच स्वतःचे पवाडे कुठ बर गाता आले आसते? :/

कुणी कुठे लिहायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे.परंतु आपले लेखन करताना मी प्रथम अमुकतमुक ठिकाणी लिहले होते व आज इथे लिहित आहे ,असे करणे मनाला खुपच क्लेषदायक आहे.सर्वप्रथम मला मनोगत हे वाचायला मिळाले पन तिथे कोणाच्या तरी लेखनात मिपा बद्दल वाचले व इथे आलो.प्रथम भेटीत ,प्रथम नजरेत जे प्रेम होते तो प्रकार आपला मिपाबाबत झाला. आजकाल मी बाकी सर्व मराठी संस्थळे विसरुन गेलो हयाचे कारण म्हणजे मिपावरचे वातावरण.इथे कॉलेज कट्ट्यावरची खरी मज्जा अनुभवायास मिळते. तात्या,धोडोंपंत,अवलिया ,विप्र,कलंत्री,व पिडां काका सारखे अनुभवी लोक ,ज्याच्यावर कोणीही किती टिका केली तरी तेवढेच रागावुन परत एकरुप होणारी माणसे .बाकी खेळकर कट्टेकरी हे वातावरण इतरत्र अनुभवास येत नाही. मी दररोज काय वाचत बसतो बघुन माझे कितीतरी दोस्त इथे सभासद झाले आहेत.आपले लेखन इथे करताना ते अगोदर कुठे प्रसिध्द झाले ते सांगण्याचे टाळावे.तसेच जुन्या मिपाकरानी अधिकारने काही सांगितले तर त्याचे वाईट वाटुन घेवु नये.

(संपुर्ण मिपाकरी)वेताळ

अवलिया's picture

15 Dec 2008 - 7:14 pm | अवलिया

तात्या,धोडोंपंत,अवलिया ,विप्र,कलंत्री,व पिडां काका सारखे अनुभवी लोक ,ज्याच्यावर कोणीही किती टिका केली तरी तेवढेच रागावुन परत एकरुप होणारी माणसे

धन्यवाद रे वेताळा.
अरे टिका करा जरुर करा... रागवा आमच्यावर...अरे तुमचा तो हक्कच आहे.
दोन तोंडात मारल्या तुम्ही तरी चालेल....
पण एक काम करा.... मनातला सल मनात ठेवु नका... बोलुन दाखवा.
अन बोलल्यानंतर, मारल्यानंतर परत सगळे विसरुन एक व्हा.
फक्त अबोला धरु नका. बास!
अरे दोन शब्द प्रेमाचे असो की भांडणाचे... शब्द जरुरी आहेत.
शब्दांवरच दुनिया आहे.. पण जर शब्दच संपले तर माणुस संपला. अवलिया संपला.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

मीनल's picture

15 Dec 2008 - 6:56 pm | मीनल

एका ठिकाणी प्रकाशित झालेला लेख,कविता मिपावर प्रकाशित करूच नये असा काही नियम नाही.
तसे लेखन मिपावर केल्यास तसे सूचित करावे हा नियम मात्र आहे.
जर असे काही नियमात बसणारे असेल तर लेखकाला मोकळीक आहे की त्याने आधी कुठे लिहावे.ती मोकळीक असायलाच हवी.
पूर्वप्रसिद्धीचे संदर्भ दिले जातात त्यात मिपाची विलक्षण अवहेलना होते हे ही पटत नाही.

दुसर म्हणजे एका मिपाभक्त संपादकाने त्यांच्या अपेक्षा समोर मांडल्या.त्या पूण व्हाव्यात हाच हेतू आहे हे उघड आहे.
पण त्या पूर्ण काराव्यात की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मला तरी वाटते की जोपर्यंत नियमात आहे तोपर्यंत काही आक्षेप नसावा.
ज्याला ते विचार पटतात ते करतील ,करतात सुध्दा.
आणि जे त्या अपेक्षा पूर्ण करत नसतील त्यांच्यावर वैयक्तिक हल्ल्याच्या हेतूने प्रतिक्रिया देऊ नयेत.कारण नियमात स्वातंत्र्य असायलाच हवे.
`मी करतो .तुम्ही ही तेच करा` अशी अपेक्षा करून ती पूरी व्हावी हा आग्रह किंवा अपेक्षा रास्त वाटत नाही.

आणि केवळ ` प्रथम मिपावर लेखन करून मग ते दुसरी कडे प्रकाशित केल्याने ` मिपावरची भक्ती प्रकट होत नाही.

मीनल.

विसोबा खेचर's picture

15 Dec 2008 - 7:29 pm | विसोबा खेचर

आम्हाला असे वाटते की लोकांनी आता ही चर्चा थांबवावी. कारण सदर धागा हा मिपावरील लेखनाच्या धोरणांशी निगडीत आहे आणि त्याबाबत मालक या नात्याने आम्ही आमचे मत येथे या पूर्वीच मांडले आहे.

तरीही पुन्हा एकदा तेच मत मांडू इच्छितो की मिपाला फक्त मिपावर केल्या गेलेल्या लेखनाशी मतलब आहे. लेखकाने ते लेखन अन्यत्र कुठे प्रकाशित केले आहे अथवा नाही, वा करणार आहे अथवा नाही याच्याशी मिपाला काडीचेही देणेघेणे नाही..

त्याचप्रमाणे मिपावर लेखन प्रकाशित करतेवेळी ते लेखन अन्यत्र कुठे प्रकाशित झाले आहे, अथवा होणार आहे याबदलही काही सूचना देण्याचे कुणावरही बंधन नाही..

आमच्या मते हा खुलासा पुरेसा आहे. सबब, ही चर्चा थांबवायला हरकत नाही..

असो..

तात्या.