नमस्कार मंडळी,
मराठी संकेतस्थळांवर वावरायला लागल्यापासून 'अवांतर' या शब्दाची विशिष्ट छटा लक्षात यायला लागली. हा शब्द अनेकदा वापरला गेलेला पाहिला. अवांतर लेखनाबद्दल आपली मते जाणून घ्यावीत असे वाटल्याने काथ्याकूटासाठी हा प्रस्ताव मांडत आहे.
एखाद्या लेखामध्ये किंवा चर्चेमध्ये प्रतिसादात सदस्य काही उपमा देतो, मजेने काही लिहितो. वाचणार्याला वाटते की आपण दाद द्यावी. (इथेच अवांतर प्रतिसादाला सुरुवात होत असावी.) मग तो दाद देतो किंवा अजून काही भर घालतो. आता ज्याला उपप्रतिसाद आला आहे तो सौजन्य म्हणून त्वरित उत्तर देतो. या मध्ये हे उत्तर म्हणजे अक्षरशः मूळ लेखापेक्षा पूर्ण वेगळे होते. या किंवा अश्या अनेक कारणाने अवांतर प्रतिसाद येतात, त्यांची संख्या अचानक वाढते. यामध्ये प्रतिसादांची वाढलेली संख्या पाहून मूळ लेखक उत्सुकतेने आपला लेख उघडतो आणि पाहतो तर सर्व प्रतिसाद भलतेच काही सांगणारे. :)
संकेतस्थळावरती प्रामुख्याने लोक संवाद, मनोरंजन या हेतूने येतात. त्यामुळे विषयातून विषय वाढतो. हे ओळखून अनेकदा मौजमजेसाठी काढलेल्या धाग्यात अवांतराला बराच वाव मिळेल असे पाहून विषय मांडला जातो. सदस्यांना सुद्धा प्रतिसाद वाचून आणि लिहून मजा येते.
माझ्या मते आपला प्रतिसाद पहिला अवांतर असेल तर तो लेखात द्यावा आणि पुढील चर्चा खव मध्ये करु असे अवाहन करावे. आणि कुणाच्या विनोदबुद्धीला दाद द्यायची असेल आणि आपली दाद अस्थानी होईल असे वाटले की खवचा आधार घ्यावा.
आता मला असा प्रश्न पडतो की,
अवांतर नक्की कधी अक्षेपार्ह होते?
अवांतर प्रतिसादाच्या 'गप्पा' कधी होतात? म्हणजे चाराच्या वर तिरके प्रतिसाद म्हणजे गप्पा..की नक्की कसे?
अवांतर प्रतिसादाबद्द्ल मूळ लेखकाने तक्रार घ्यावी आणि संपादकाकडे मदत मागावी आणि मगच संपादकाने कार्यवाही करावी?
की संपादकाने असे प्रतिसादांचे स्वतः न्यायकरुन संपादन करावे?
मिपावरती अवांतर प्रतिसाद, गप्पा यांचे काही संकेत सदस्यांनीच ठरवावेत? की त्याची गरज नाही?
आपली मते कृपया मांडावीत आणि आपल्याला या संदर्भात काही अजून भर घालायची असेल तर मोकळेपणी भर घालावी.
आपलाच,
--लिखाळ.
प्रतिक्रिया
16 Dec 2008 - 12:04 am | टारझन
लिखाळ भाऊ ...आपली मतं ग्राह्य धरली जातील का ?
सगळं सुरळीत चाललं असताना ... अनपेक्षितपणे आपलाच कोणता बर्यापैकी रिलेव्हंट प्रतिसाद "अवांतर आहे" असं कळंलं तर प्रतिसाद द्यावे की नाही असा प्रश्न उद्भवतो .. मग आपलं एक टेंप्लेट बनवून ठेवावं ... कोणतंही एक राउंड रॉबीन पद्धतीने सिलेक्ट करून लेखास चिटकवावं लागेल, उदा,
१. लेख आवडला
२. मस्त लिहीलंय
३. पुलेशू
४. चौथा पॅरा आवडला
५. फारच मार्मिक लिहीलंय
६. आपल्या लेखणात पु.लं दिसले
७. मागील भागांपेक्षा हा भाग उत्तम जमला आहे
८. ह्म्म्म .. मस्त भट्टी जमलीये ... येउन द्या अजून
९. पाकृ छानच आहे... आत्ता करून पहातो/ते घरी जाऊन
१०. फोटू के व ळ अ प्र ति म
११. दरवेळी लेखाची स्तुती करून बोटं दुखली
१२. कसं काय सुचतं बुआ आपल्याला एवढं भारी लिहायला ? आम्हाला आपला जाम हेवा वाटतो
१३. फारच विचार करायला लावणारा संपादकीय लेख आहे ... आतापर्यंतच्या संपादकीय मधला बेष्ट.
१४. जिंकलंस मित्रा ... तोडलंस .. पार चेंदामेंदा केलास ...
१५. सहमत , +१ , असेच म्हणतो .
(स्वगत : हा लिखाळ चालू ... गुपचूप संपादकांना माझा प्रतिदास उडवायला तर नाही ना लावणार ? )
- आणीबाणीचा प्रतिसादकर्ता
16 Dec 2008 - 12:10 am | लिखाळ
> लिखाळ भाऊ ...आपली मतं ग्राह्य धरली जातील का ? <
वास्तविक आपली मते काय आहेत तेच जाणण्यासाठी हा धागा आहे. यातील मतांची संपादकांनी (जे आपल्यातलेच सदस्य आहेत) दखल घ्यावी असा काही आग्रह नाही.
पण संकेतस्थळाचा प्रथमदर्शनी दर्जा हा तिथल्या लेखांवरुन आणि मुख्यतः प्रतिसादांवरुन, त्यातल्या भाषेवरुन नवा सदस्य ठरवत असतो. तसेच लेखकाला हुरुप येणे - हुरुप जाणे यामध्ये सुद्धा प्रतिसादांचाच वाटा असतो. आता अवांतर प्रतिसाद हे प्रतिसादच असल्याने या मुद्द्यांचा विचार करणे क्रमप्राप्तच आहे.
>> आणीबाणीचा प्रतिसादकर्ता <<
:)
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 2:32 am | टग्या (not verified)
प्रतिसादांवरून लेखकाने आपला हुरूप घालवायचा की नाही हा सर्वस्वी लेखकाचा प्रश्न आहे.
सामंतकाकांचे लेख वाचलेत कधी? (मी तरी नाहीत.) त्याला येणारे प्रतिसाद वाचलेत? (मी तरी नाहीत.) सामंतकाकांचा हुरूप कधी कमी झालेला दिसलाय? (मला तरी नाही.)
अरे शिका काहीतरी सामंतकाकांकडून! (सामंतकाकांचे उदाहरण हे प्रातिनिधिक झाले. अशी आणखीही उदाहरणे घेता येतील. पण सध्या एकच पुरेसे आहे. दुसरा गाल - आपले, दुसरे उदाहरण - पुढे करायची वेळ आली तर त्या वेळचे त्या वेळी घेऊ पाहून!)
मला तर वाटते की लिहिणार्याने लिहीत जावे, प्रतिसाद देणार्याने प्रतिसाद देत जावे. आणि प्रतिसाद देतादेता एके दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन जाव्यात.
16 Dec 2008 - 12:22 am | विसोबा खेचर
लिखाळ भावजी,
बरे झाले आपण हा धागा सुरू केलात.
आम्ही कॉलेजचे कॅन्टीन मानून सूट दिली खरी परंतु मिपावर अलिकडे अवांतरचे प्रमाण बरेच वाढले आहे..
हरकत नाही, यापुढे आम्ही स्वत: लक्ष घालून, सारासार विचार करून अवांतर किंवा विषयांतर करणारे लेखन कोणते हे तपासू आणि धडाध्धड अप्रकाशित करू....!
काही ठराविक मंडळी बर्याच ठिकाणी अवांतर किंवा विषयांतर करणारे प्रतिसाद देतात आणि तिथेच चक्क गप्पा मारायला लागतात असे आमच्या ध्यानात आले आहे. आम्ही आजपर्यंत कधी कुणाला फारसे टोकले नाही, प्रत्येक वेळेस 'जाऊ दे, चालायचेच..!' असा विचार केला. परंतु अलिकडे हे प्रमाण बरेच वाढल्याचे आमच्या लक्षात आले आहे. यामुळे मूळ लेखातील विषय बाजूला राहतो व लेखाचे गांभीर्यही कमी होते व पर्यायाने लेखकावरही पर्यायाने अन्याय होतो..
कोई बात नही, येत्या काही दिवसात मिपावरील बरेचसे अवांतर प्रतिसाद गायब झालेले आपल्याला दिसतील! :)
काही मंडळींना अनेकद सूचना/विनंत्या करूनही ती मंडळी ऐकत नाहीत, त्यामुळे नाईलाजाने आम्ही हे पाऊल उचलणार आहोत..
वास्तविक, कुठल्याही धाग्यात आपले लेखन अवांतर तर होत नाही ना, हे पाहण्याचे प्रत्येकाचे काम आहे. कारण आम्हाला आमच्या कामाच्या व्यापामुळे प्रत्येक वेळेला लक्ष देणे जमत नाही. परंतु या पुढे अवांतर प्रतिसाद उडवण्याकरता थोडा वेळ काढला पाहिजे! :)
असो, हा धागा जाहीरपणे मांडल्याबद्दल लिखाळ भावजींचे आभार..
तात्या.
16 Dec 2008 - 10:36 am | प्रदीप
आपला हेतू स्तुत्य असला तरी प्रत्येक प्रतिसाद अशा तर्हेने तपासून बघणे हे एक मोठे जिकीरीचे काम होऊन बसेल (किंवा तसे ते आता झाले आहेच).
ह्याला एक तांत्रिकी उपाय आहे, तो रोग समूळ नष्ट करीत नाही पण वाचकांना खूपच दिलासा देतो. न्यूजनेटवरील कुठलाही न्यूजग्रूप गूगलमधून बघतांना 'व्ह्यू ऍज अ ट्री' असा वाचकांना ऑप्शन उपलब्ध असतो. तो वापरला की मूळ धाग्याला फुटलेले 'तंतू' डावीकडच्या पेनमध्ये दिसतात. त्यातून वाचकाला हवा तो तंतू अथवा हवा तो प्रतिसाद वाचण्यासाठी निवडता येतो. उदा. इथे पहा.
अर्थात ह्यात संस्थळाची रचना बरीच बदलावी लागेल आणि येणार्या अवांतर प्रतिसादांनी व्यापलेली जागा व बॅंडविड्थ हे तसेच राहतील. पण ज्यांना मूळ धागा पकडून पुढे जायचे आहे, ते तसे सहजपणे करू शकतील.
16 Dec 2008 - 2:10 pm | लिखाळ
तात्या,
प्रतिसादाबद्दल आभार.
वास्तविक माफक अवांतर प्रतिसाद संकेतस्थळावर आनंद निर्माण करतात. पण प्रतिसाद उडवणे चालू झाले की नक्की अवांतर कशाला म्हणावे असा वाद होतो. हे तारतम्य कसे ठरवणार? या साठी सदस्यांनी मते मांडावित असे मला वाटले.
संकेतस्थळावर आपुलकिने लिहिणार्या, मौजमजा करणार्या नेहमीच्या सदस्यांना प्रत्येक प्रतिसाद लिहिताना विचार पडू नये असे वाटते. त्यामुळे मोकळे वातावरण राहणार नाही. प्रतिसाद उडवला की सदस्य अपमानित होतो, नाराज होतो.
या वर सदस्य स्वतःच काही मार्ग काढु शकतील असे वाटल्याने ही चर्चा चालू केली.
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 1:34 am | चित्रा
आता मला असा प्रश्न पडतो की,
अवांतर नक्की कधी अक्षेपार्ह होते?
माझा मापदंड (!) असा - विषयाला धरून असलेल्या प्रतिसादापर्यंत पोचायला खूपच अधिक स्क्रोल करायला लागले की मधले बरेचसे प्रतिसाद अवांतर असण्याची शक्यता असते. आणि असे स्क्रोल करायला लागणे हे मधले प्रतिसाद लेखाच्या विषयात काही भर टाकत नसले तर ते कधीकधी आक्षेपार्ह (किंवा खरेतर कंटाळा येण्यासारखे किंवा रसभंग करणारे) असू शकतात. याची समज सदस्यांनी स्वत: ठेवावी. एकमेकांना खाजगी प्रश्न विचारायचे असले तर खरडवही, खरडफळा यांचा वापर करावा.
मिपावरती अवांतर प्रतिसाद, गप्पा यांचे काही संकेत सदस्यांनीच ठरवावेत? की त्याची गरज नाही?
सतत नवीन सदस्य येत असलेल्या संकेतस्थळावर असे सदस्यांनी असे संकेत ठरवणे आणि त्यांची अंमलबजावणी होते आहे का नाही ते पाहणे अवघड जाऊ शकते. सदस्यांनी एकमेकांना किंवा संपादकांना यासंबंधी जाणीव करून दिली तर असे लेखन अप्रकाशित करणे किंवा मूळ अवांतरकारास (विचारपालट झाला तर) त्यात बदल करणे सोपे जाईल. फक्त संपादकांनी अवांतर म्हणजे काय यासंबंधी एकवाक्यता ठेवली तर बरे होईल. नसल्यास भांडणे लागण्यास वेळ लागणार नाही. (याचा हा अवांतर प्रतिसाद राहिला, माझा काढला इत्यादी).
माझ्या मते अवांतर म्हणजे जे विषयाला मूळ मुद्द्यापासून खूपच दूर घेऊन जाते असे - उदा. भौतिकशास्त्राच्या लेखात व्याकरणाची चर्चा किंवा उलटे. आत्ता खरे तर अनेक "मॉडेल" अवांतर प्रतिसाद शोधून इथे देण्याचा मोह होतो आहे, पण तो आवरता घेत आहे.
16 Dec 2008 - 2:20 pm | लिखाळ
स्पष्ट मत दिल्याबद्दल आभार.
अगदी बरोबर. याचसाठी हा चर्चा प्रस्ताव.
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 2:29 am | चतुरंग
अवांतर असलेल्या (वाटणार्या नाही) प्रतिक्रिया लगोलग उडवून टाकल्या! आता कसा, लेख आणि त्यावरचे योग्य प्रतिसाद मामला सुटसुटीत झाला! :)
बाकी ज्यांना गप्पा ठोकायच्या आहेत त्यांना ख.फ./ख.व. आहेतच ;)
चतुरंग
16 Dec 2008 - 2:32 am | विकेड बनी
गंमतच आहे. लिखाळ कसे बघणार? त्यांना कसं कळणार की किती अवांतर प्रतिसाद होते? त्यांना काही पेशल अधिकार हायेत का की उडवलेले प्रतिसाद ते पाहू शकतात?
आता आमचा प्रतिसाद आवडला नाही म्हणून उडवू नका. काय असतं ना की आपण अवांतर लिहिलं नाही की अवांतर प्रतिसाद येत नाहीत. >:)
-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.
16 Dec 2008 - 2:38 am | टारझन
आहो ... आमच्या बँकिंग डोमेन मधे असं म्हणतात, सिंपल ट्रांझॅक्शन हँडल करायला काही अवघड नसतं... इश्शूज येतात ते एक्सेप्शनल ट्रांझॅक्शनच्या वेळी .... उडवलेले प्रतिसाद कोणपण सांगेल ते अवांतरच्या व्याख्येबाहेरचे होते. इथं प्रश्न आहे... काँप्लेक्स केस चा ... कधीकधी प्रांजळपणे दिलेले प्रतिसाद पण उडवले जातात. उगाच अवांतरपणा केला तर ते उडवणं ठिक .. पण चर्चेचर्चेत ते अवांतर गेलं तर ? ते ही उडवणार का ? मग जर असं असेल तर
मी वर १५ टेंप्लेट्स दिलेली आहेत.. त्यात भर घालून तीच रिपीट रिपीट वापरावीत... आणी बाकी सगळं ख.व. मधे हालवावं .. हे लै भारी होईल का ?
- (सही केलेली नाही)
16 Dec 2008 - 2:46 am | चतुरंग
एक्सेप्शनल ट्रँजॅक्शनच्या वेळी इश्यूज येतात हे कबूल आहे पण दरवेळी फक्त असेच ट्रँजॅक्शन होत असेल तर ते एक्सेप्शनल नसते ते रुटीन होते आणि मग विचार करावाच लागतो!
वरती बघतोच आहेस पुन्हा कसे टाकलेत प्रतिसाद. अशा ठिकाणी चर्चा करण्यात अर्थ असतो असं वाटतंय तुला?
चतुरंग
16 Dec 2008 - 2:50 am | विकेड बनी
संपादकच अवांतर प्रतिसाद देऊ लागले की.
-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.
16 Dec 2008 - 2:17 pm | लिखाळ
बरोबर हेच तर मला विचारायचे आहे. याचे निकष-संकेत कसे ठरावेत?
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 3:08 am | मुक्तसुनीत
ज्या सदस्यांना "आता अवांतर पुरे" असे सुचवायला गेलो त्यांनी आपल्या खरडवह्या डिस्-एबल केल्या आहेत. एक मॉडरेटर म्हणून हे मला थोडेसे विसंगत वाटले. ज्या सभासदांना मुक्त व्यासपीठावर मुद्दाम अवांतर प्रतिसादच द्यायचे आहेत त्यांनी आपली खरडवही बंद ठेवावी याचा अर्थ समजू शकेल काय ? म्हणजे ज्यांना तापलेले वातावरण "मॉडरेट" करायचे आहे त्यांची ही नाकेबंदी आहे असे समजावे काय ? आणि मॉडरेशनच्या प्रक्रियेला असा अडथळा निर्माण करणे आडमुठेपणाचे , पर्यायाने ज्याला "झारीतल्या शुक्राचार्यांचे "वागणे म्हणावे काय ?
सगळ्यात वाईट म्हणजे असे करणार्यांमधे काही मित्र आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे. पण त्यांचे याबाबतीत चुकते आहे असे मला वाटते.
(एक संत्रस्त मॉडरेटर.)
16 Dec 2008 - 3:13 am | मुक्तसुनीत
माझ्या या पोस्टची दखल घेऊन आमच्या काही मित्रांनी आमच्या विनंतीला मान दिला आहे. त्यांचे धन्यवाद.
16 Dec 2008 - 6:50 pm | धम्मकलाडू
तात्यापेक्षा संपादक जड!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
16 Dec 2008 - 3:20 am | विकेड बनी
हं! हं! सुरु झाले व्यक्तिगत हल्ले. हा वरचा प्रतिसाद आधी कोणीतरी मॉडरेट करा रे.
मिसळपावाने तसा पर्याय दिला आहे त्यामुळे कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.
-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.
16 Dec 2008 - 3:25 am | मुक्तसुनीत
खरे तर स्पष्टीकरण द्यायची गरज नाही पण देतो आपला.
"झारीतले शुक्राचार्य" म्हणजे नक्की काय ? इथे ते कसे योग्य ठरते ? आणि याच धाग्यापुरते ते कसे रेलेव्हंट आहे ? याचे पूर्ण स्पष्टीकरण देऊनच मी तसे म्हण्टले आहे.
प्रश्नकर्त्याने आपली खरडवही बंद केलेली नाही. आणि त्यांना विनवावे/सुचवावे कशाला ? मित्र असण्याबद्दल आणि आदर असण्याचे विधान मी प्रश्नकर्त्याच्या बाबतीत केलेले नाही . बाकी ज्यांना अकारण मिरच्या झोंबल्या त्यांनी बसावे खोकत. =))
16 Dec 2008 - 3:46 am | टग्या (not verified)
माझी खरडवही मी बंद ठेवलेली आहे. त्याचे मी कोणतेही स्पष्टीकरण देऊ इच्छीत नाही. खरडवही बंद ठेवणे हे मिसळपावाच्या नियमांविरुद्ध असल्यास ती सुविधा मिसळपावाने बंद करावी. येणार्या खरडींचे उत्तर देण्यास किंवा त्या कचर्याच्या पेटीत टाकून देण्यापूर्वी वाचण्यास मी बांधील नाही.
बाकी प्रस्तुत संपादकाच्या आदर आणि मित्रत्वाच्या दाव्याने माझ्या सेल्फ-एस्टीमला (मराठी?) प्रचंड धक्का पोहोचून माझी जी अपरिमित मानसिक हानी झालेली आहे आणि त्यामुळे मला ज्या सकारण मिरच्या झोंबलेल्या आहेत त्याची गणना करणे केवळ अशक्य आहे. अशा दाव्यांचा मी कडक शब्दांत निषेध करतो आणि जाहीर माफीची मागणी करतो.
16 Dec 2008 - 3:48 am | मुक्तसुनीत
सेल्फ एस्टीम = आत्मसन्मान ?
16 Dec 2008 - 3:50 am | विकेड बनी
माझा आणि वरचा प्रतिसाद मूळ चर्चेशी अवांतर आहे.
-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.
16 Dec 2008 - 3:00 pm | विनायक प्रभू
सेल्फ एस्टीम= स्वःत च्या पैशाने घेतलेली एस्टीम गाडी
ह्याला अवांतर प्रतिसाद म्हणतात.
16 Dec 2008 - 3:09 pm | लिखाळ
हा हा..
--(अतिअवांतर) लिखाळ.
16 Dec 2008 - 4:08 am | मुक्तसुनीत
>> बाकी प्रस्तुत संपादकाच्या आदर आणि मित्रत्वाच्या दाव्याने माझ्या सेल्फ-एस्टीमला (मराठी?) प्रचंड धक्का पोहोचून माझी जी अपरिमित मानसिक हानी झालेली आहे
सभासदाने नक्की कशामुळे आत्मसन्मानाला धक्का पोचला ते सांगावे. तुमच्या निषेधाची दखल घेतली आहे. जाहीर माफी आणि इतर फ्री गुडीज् तुमची परिस्थिती समजून घेतल्यानंतरच देता येतील. जाहीर माफीची खिरापत कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय द्यायला तुम्ही म्हणजे सिटीग्रुप आणि आम्ही व्हाईट हाऊस कुठे आहोत ? :-)
16 Dec 2008 - 3:09 am | कोलबेर
फारच मार्मिक लिहीलंय
टारझन ह्यांनी दिलेले टेंप्लेट १ आणि ५ वापरुन प्रतिसाद व्हॅलीड केला आहे.
आता अवांतर: तात्यांचं बिघडलेलं पोट आता बरं आहे ना? मुख्य पानावर आज चणे फुटाणे लावलेत
16 Dec 2008 - 3:27 am | टारझन
=)) =)) =))
कितीअवांतर : तात्या पोटातल्या विषाणूंबरोबर गांधीवाद गांधीवाद खेळत होते म्हणे ... तो एवढ्या लवकर संपला का काय ?
- टार्या भयंकर
16 Dec 2008 - 2:16 pm | लिखाळ
हा हा :)
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 10:19 am | आनंदयात्री
३. पुलेशू
(हा प्रतिसाद अवांतर नाही)
16 Dec 2008 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपली मते कृपया मांडावीत आणि आपल्याला या संदर्भात काही अजून भर घालायची असेल तर मोकळेपणी भर घालावी.
हे क्रिप्टीक होतं का?
16 Dec 2008 - 1:58 pm | लिखाळ
हे काही क्रिप्टिक नाही.
अवांतर प्रतिसाद असा एक वर्ग तयार झाल्याने (कॅटॅगरी) प्रतिसाद देताना हात आखडायला होईल असे मला वाटू लागले. पण अवांतर प्रतिसाद हेच मुळात सापेक्ष आहे. मी प्रतिसाद लिहिला तर तो अवांतर नाही पण दुसर्याचा आहे असे वाटु शकते. खेळीमेळीचे वातावरण, थोडी थट्टा-मस्करी अवांतर प्रतिसादात होते. संकेतस्थळावरचा वावर आनंददायी करायला त्याचा हातभारच लागतो.
पण मग तारतम्य कसे ठरवणार? म्हणून सदस्यांनी आपली मते लिहावित अशी मी विनंती केली. जेणे करुन अवांतराचे काही संकेत डोळ्यासमोर येतील.
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 2:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लिखाळ धन्यवाद.
थोडं अवांतर होईल, पण कमीतकमी गृहितकांवर आधारीत विचार करायचा असा विचार असल्यामुळे विचारलं.
16 Dec 2008 - 3:17 pm | लिखाळ
हे माझ्यासाठी क्रिप्टीक झालं. :)
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 3:27 pm | टारझन
तुम्हाला जे क्रिप्टीक झालं ते विचारण्यासाठी ख.व. / ख.फ. ची सोय केली आहे ... इथे हा अवांतर प्रतिसाद वाटतो .. सबब उडवावा !! (ह.घे रे बाबा ...)
- आणीबाणीचा अवांतरकर्ता
16 Dec 2008 - 3:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यावरुन पुन्हा एक उपप्रश्नः
या धाग्यावर अवांतर चालणार आहे का?
16 Dec 2008 - 3:55 pm | लिखाळ
> या धाग्यावर अवांतर चालणार आहे का? <
याचा अर्थ हे लेखकाने ठरवावे असे आपले मत दिसते. किंवा तो प्रश्न संपादकांना होता असे वाटते.
माझे मत असे आहे की (माफक) अवांतर मजेचे प्रतिसाद असावेत. खेळिमेळीचे वातावरण राहणेच चांगले.
त्यांची मजा संपून त्यांचा त्रास कधी वाटतो त्याबद्दलची मते जाणुन घ्यायला उत्सुक आहे.
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 4:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडं अवांतर होईल, पण कमीतकमी गृहितकांवर आधारीत विचार करायचा असा विचार असल्यामुळे विचारलं.
हे माझ्यासाठी क्रिप्टीक झालं.
काय कधी कसं क्रिप्टीक निघेल आणि नसेल सांगता येत नाही.
आधीच विचारुन घेतलेलं बरं; नंतर चुकीचे निष्कर्ष निघत नाहीत; असं आम्हाला शिकवतात म्हणून विचारलं.
16 Dec 2008 - 1:49 pm | अवलिया
अवांतर नक्की कधी अक्षेपार्ह होते?
अवांतर हे होतच रहाणार. प्रश्नात थोडा बदल करतो.
म्हणजे असे की अवांतर कोणाला आक्षेपार्ह होते?
तर मला असे वाटते की काही जण जे थोडे गंभीर स्वरुपाचे आहेत आणि खेळीमेळीचे प्रतिसाद ज्यांना आवडत नाहीत त्यांना हे आक्षेपार्ह होत असावे.
अवांतर प्रतिसादाच्या 'गप्पा' कधी होतात? म्हणजे चाराच्या वर तिरके प्रतिसाद म्हणजे गप्पा..की नक्की कसे?
प्रतिसाद हाच मुळी 'गप्पा' या स्वरुपाचा असतो. केवळ 'वा वा', 'छान लेख', '+१ सहमत' अशा प्रतिसादांनी सुरवातीला बरे वाटेल पण नंतर होईल काय की त्यामुळे प्रतिसादांची व एकंदर मिपाची मजाच कमी होईल
अवांतर प्रतिसादाबद्द्ल मूळ लेखकाने तक्रार घ्यावी आणि संपादकाकडे मदत मागावी आणि मगच संपादकाने कार्यवाही करावी?की संपादकाने असे प्रतिसादांचे स्वतः न्यायकरुन संपादन करावे?मिपावरती अवांतर प्रतिसाद, गप्पा यांचे काही संकेत सदस्यांनीच ठरवावेत? की त्याची गरज नाही?
माझ्या मते लेखकाने लेखाच्या सुरवातीला किंवा शेवटी अ किंवा यु असे लिहावे. ज्यामुळे त्याला गुळमुळीत प्रतिसादांची अपेक्षा आहे किंवा खरे मत हवे आहे तसेच अवांतर गप्पा चालु शकतील हे कळेल. तसेच प्रतिसाद देणा-याने पण केले तर त्याला उपप्रतिसाद देणारा विचार करुन देईल. सदस्यांनी प्रतिसादाला उपप्रतिसाद देतांना लेखाचे व प्रतिसादाचे वर्गीकरण यांची सांगड घालुन सारासार विचाराने उपप्रतिसाद द्यावा.
संपादकांनी त्यांची कार्यवाही कशी करावी याचे तात्याच त्यांना मार्गदर्शन करु शकतात.
वरील सर्व माझी वैयक्तिक मते आहेत. विशेष गांभीर्याने घेतली नाही तरी चालतील.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
16 Dec 2008 - 2:13 pm | लिखाळ
बरोबर. अवांत प्रतिसाद असावेतच.
पण अनेकदा आक्षेप जास्त अवांतर झाले की येतो. ते सुद्धा सापेक्षच. म्हणून प्रश्न पडला.
हे सुद्धा चांगले वाटते.
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार
प्रत्येक सभासदाने उद्यापासुन कोणी काय लिहावे आणी काय लिहु नये किंवा लिहिल्यास कसे लिहावे हे सर्व लेखकांना सांगणयास सुरुवात केली तर कसे होइल ? हे म्हणजे थोडेसे 'छापा मी जिंकलो, काटा तु हरलास' असे वाटत नाहि का ? काहि सभासद जर मुद्दाम त्रास देण्यासाठी म्हणुन तिरकस प्रतिक्रिया देत असतिल तर त्या निश्चीत उडवल्या जाव्यात, पण मझ्यामते इतर सभासदांना मात्र प्रतिक्रिया देण्यासाठी मोकळेपणा द्यावा. (हे वैयक्त्तिक मत आहे, ह्याचा विचार केलाच जावा असा आग्रह नाही.)
हुकुमावरुन
सर्व प्रतिक्रिया समान आनंदाने स्विकरणारा
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
16 Dec 2008 - 2:15 pm | लिखाळ
बरोबर. मोकळेपणा कमी होऊ नये असेच वाटते. मोकळेपणा किती असावा?
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 3:28 pm | विनायक प्रभू
मोकळेपणा साडे बत्त्याणव इंच असावा.
16 Dec 2008 - 3:44 pm | लिखाळ
ही ही ही.. हे मस्तच..
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 3:26 pm | धम्मकलाडू
प्रतिसादांचा आणि सदस्यांचा अवांतरपणा बंद झाल्यास मिपाच्या अस्तित्वाला, जिवंतपणाला अर्थच राहणार नाही. नाही का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
16 Dec 2008 - 5:17 pm | विनायक प्रभू
लेखन अवांतर असेल तर काय करावे
16 Dec 2008 - 5:49 pm | लिखाळ
लगोलग एक कौल टाकावा -
१. अमुक धाग्यातले लेखन अवांतर आहे असे वाटते का?
२. असेल तर का?
३. नसेल तर का?
४. ते काढून टाकावे का?
५. ....
६. ह हक्क कुणी कुणाला द्यावा?
वगैरे वगैरे :)
मुद्याचे : लेखन अवांतर म्हणजे काय तेच कळाले नाही.
मुद्याचे अवांतर : असे लेखन कसे ओळखावे?
पुन्हा अवांतर : एका प्रतिसादात असे अनेक तर्हेचे मुद्याचे आणि अवांतर असे लिहावे का?
-- लिखाळ.
16 Dec 2008 - 5:52 pm | विनायक प्रभू
अवांतर प्रतिसादाचा आणखी एक नमुना. मला असे भरपुर बघायला मिळाले. म्हणुन आपण बघु प्रयत्न करुन आपल्याला जमते ते का? नाही जमले.