माझ्या प्रिय सुगरीणी॑नो ,सुगरण्या॑नो,
बो॑बील हा मास इतका चवदार असुन सुद्धा कोणीच त्यावर नविन पाकक्रुती तयार का करीत नाही हो?
जर कोणाकडे असेल तर आम्हालाही द्या!
ओल्या बोंबलाच कालवण -
४-५ ओले बो॑बील, १/२ नारळ किसलेला, २ इंचा आल, १०-१२ पाकळ्या लसुण, कोथिंबीर १ छोटी जुडी , ४ हिरव्या तिखट मिरच्या, आवळ्या एवढ्या चिंचेचा कोळ, १ छोटा चमचा हळद, २ छोटे चमचे मालवणी मसाला
नारळ, आल, लसुण, कोथिंबीर आणि मिरच्या वाटून घ्याव्या. बो॑बील साफ करून प्रत्येकी ३ तुकडे करून घ्यावेत. त्यात ३-४ मोठे चमचे तेल, वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ, मीठ आणि २ चमचे मालवणी मसाला सगळा एकत्र लावून ५ मिनिटे ठेवावे. नंतर दाट कलवण होईल इतके पाणी ठेवून चांगली उकळी आणावी. ५ मिनिटापेक्षा जास्त उकळवु नये. गरम भाकरी बरोबर खूप छान लागते.
याच कालवणात हिरवी भोपळी मिरची सुद्धा छान लागते.
बोंबिल साफ करून प्रत्येकी ३ तुकडे करावे. नंतर प्रत्येक तुकडा मध्ये चिरावा, पण पूर्ण कापू नये. मधल्या कट्यापर्यन्त कापून ओपन करावा. त्याला मीठ, हळद, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, थोडी लाल मिरची पूड, लिंबाचा रस लावून १० मिनिटे ठेवावे. नंतर रवा किंवा तांदळाच्या पिठात घोळवून थोड्या तेलात फ्राय करावे.
ही कृती ओल्या आणि सुकया दोन्ही साठी चालते. सुके बोंबिल पाण्यात १० मिनिटे भिजवून, थोडे ठेचून मग त्याला मसला लावावा आणी तळावे.
है शाब्बास! सिंधुदुर्गात असेच करतात. म्हणून बोंबील कुरकुरीत होतात. हा माणूस खरा मासेखाऊ!! पापलेट, सुरमई, कोळंबी खाऊन मासे खाल्याची भाषा करणारा माणूस खरा मासेखाऊ असूच शकत नाही. कर्लीसारखा चवदार पण काट्याने भरलेला मासा मनापासून हादडणारा खरा मत्स्यावतारभक्त!
थोडे अवांतर : माझ्या एका मित्राचे सासरे असेच अट्टल मासेखाऊ, तो बिचारा पु.लं.च्या भाषेत आम्ही फिश खाल्लं या प्रकारातील आहे. त्याच्या सासर्यांना सोमवार, गुरुवार , शनिवार म्हणजे शिक्षा वाटे शाकाहारी जेवण जेवताना किमान चारवेळा तरी हॅ, आज काय साधं जेवण! म्हणून हळहळत असत एकदा मित्राने त्यांना हळूच म्हटलं तुम्हाला एक दिवस मासे खायला मिळाले नाहीत तर अक्षरशः माशासारखे काय तडफडताय? त्यावर ते म्हणाले ते तुला कळणार नाही, त्यासाठी पिढ्यानपिढ्या मत्स्यावताराची भक्ती करावी लागते. :))
जयेश माधव
प्रिय स॑दिप,
खर॑ तर मला बो॑बलाच्या रेसिपीपेक्षा सर्वा॑चे लेखच॑ खुप आवड्ले!
मस्त कुर्कुरीत बो॑बला॑पेक्षा अनेक लेख्,टिका,टिपण्णीच जास्त कुर्कुरीत होत्या.खुप मजा आली.
हा प्रकार लहानपणी खुप खाल्ला होता. माझा आवडता प्रकार म्हणुन इथे देत आहे.
साहीत्य : १० / १२ बोंबील
चुल / कोळश्याची शेगडी आवश्यक (बोंबला तिच्यायला . . )
कृती :
बोंबील साफ करण्यासाठी ३/४ वेळेस जमीनीवर आपटा. जमल्यास हाताने साफ करा. (बास. यपेक्षा जास्त सफाइ नको). शेजारी शाकाहारी असतील तर घराची दारे / खिडक्या उघड्या ठेवा, मांसाहारी असतील तर बंद करा. आता साफ केलेले (?) बोंबील शेगडी किंवा चुलीच्या कोळश्यावर मंद भाजा. भाजुन पुर्ण होईपर्यंत मनावर ताबा ठेवा. लगेच खाउ नका. शाकाहारी शेजार्यांच्या आदळापटी कडे दुर्लक्ष करा. असे हे खरपुस भाजलेले बोंबील पुन्हा जमीनीवर आपटुन त्याची राख साफ करा. पहा भाजके बोंबील तयार. आता खा.
प्रतिक्रिया
15 Dec 2008 - 9:15 pm | सुनील
मेल्या तुला संकष्टीला बोंबिल आठवतोय?
असो, बोंबलाचं भुजणं म्हणून एक झक्कास प्रकार आहे. कुणीतरी द्या त्याची पाकृ.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Dec 2008 - 9:26 pm | प्रकाश घाटपांडे
बोंबलाच्या वासाने कुणाच्या तोंडात लाळ गळायला सुरवात होते तर त्याच वासाने कुणाची भुक मरते व मळमळायला लागत. एकाचा वासाचा काय हा महिमा.
प्रकाश घाटपांडे
17 Dec 2008 - 12:14 am | अवलिया
हेच म्हणतो की बोंबलतो ;)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
15 Dec 2008 - 9:31 pm | मिलि॑द अहीरे
दारु पिताना मा॑देली फ्राय सुद्धा छान लागते,थोडा आमचाही विचार करा.
16 Dec 2008 - 1:21 am | लवंगी
ओल्या बोंबलाच कालवण -
४-५ ओले बो॑बील, १/२ नारळ किसलेला, २ इंचा आल, १०-१२ पाकळ्या लसुण, कोथिंबीर १ छोटी जुडी , ४ हिरव्या तिखट मिरच्या, आवळ्या एवढ्या चिंचेचा कोळ, १ छोटा चमचा हळद, २ छोटे चमचे मालवणी मसाला
नारळ, आल, लसुण, कोथिंबीर आणि मिरच्या वाटून घ्याव्या. बो॑बील साफ करून प्रत्येकी ३ तुकडे करून घ्यावेत. त्यात ३-४ मोठे चमचे तेल, वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ, मीठ आणि २ चमचे मालवणी मसाला सगळा एकत्र लावून ५ मिनिटे ठेवावे. नंतर दाट कलवण होईल इतके पाणी ठेवून चांगली उकळी आणावी. ५ मिनिटापेक्षा जास्त उकळवु नये. गरम भाकरी बरोबर खूप छान लागते.
याच कालवणात हिरवी भोपळी मिरची सुद्धा छान लागते.
अजुन २-३ आहेत .. नंतर देईन
16 Dec 2008 - 1:25 am | पांथस्थ
ओले बोंबील सगळीकडे नाहि मिळत. सुक्याच्या पाकृ येउद्या.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
16 Dec 2008 - 3:47 am | लवंगी
बोंबिल साफ करून प्रत्येकी ३ तुकडे करावे. नंतर प्रत्येक तुकडा मध्ये चिरावा, पण पूर्ण कापू नये. मधल्या कट्यापर्यन्त कापून ओपन करावा. त्याला मीठ, हळद, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, थोडी लाल मिरची पूड, लिंबाचा रस लावून १० मिनिटे ठेवावे. नंतर रवा किंवा तांदळाच्या पिठात घोळवून थोड्या तेलात फ्राय करावे.
ही कृती ओल्या आणि सुकया दोन्ही साठी चालते. सुके बोंबिल पाण्यात १० मिनिटे भिजवून, थोडे ठेचून मग त्याला मसला लावावा आणी तळावे.
16 Dec 2008 - 3:48 am | लवंगी
३ मोठे कांदे, २ मोठे टोमॅटो, ३-४ हिरव्या मिरच्या, ४-५ सुके बोंबिल, लाल तिखट, हळद, मीठ, आल-लसूण पेस्ट, कोथिंबीर
कांदे-टोमॅटो बारीक कापून घ्यावे. बोंबिल बारीक तुकडे करून १० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. तेलावर बोंबिल, आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची परतून घ्यावी. त्यात कांदा - टोमॅटो शिजवून घ्यावा. लाल तिखट, हळद आणि मीठ घालावे. शिजल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
16 Dec 2008 - 2:06 am | टारझन
बोंबिल पाकृ : कच्चे बोंबील
साहीत्य : ५ किलो ओले बोंबील
कृती :
१. ओले बोंबील धूवून घ्या
२. ताटात वाढून घ्या
३. आता करा सुरूवात चापायला
- बल्लवाचार्य भीम ) टारझन
16 Dec 2008 - 4:58 pm | मनस्वी
तेवढे पण कष्ट कशाला??
16 Dec 2008 - 6:27 pm | संताजी धनाजी
बोंबला :D
- संताजी धनाजी
16 Dec 2008 - 7:01 pm | सुनील
५ किलो ओले बोंबील
किलोवर बोंबील विकणारी कोळीण कुठल्या गावात आहे भौ?
(लाल तोंडाचे ,आ वासून पडलेले बोंबील, वाट्यावर घेणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Dec 2008 - 7:20 pm | टारझन
हे अवांतर आहे ... असले प्रश्न विचारायला ख.व. मधे खरड करा !
अवांतर : बोंबील कसे पण आणा ... घरी वजन करून घ्या !! झाले पाच किलो ! आता बोंबलांना वजन नसतं असं म्हणू नका
16 Dec 2008 - 2:18 pm | सुनील
बोंबलात पाणी फार असते, तेव्हा फ्राय करण्यापूर्वी एखाद्या पाट्याखाली ठेवून त्यातील पाणी काढून टाकले तर बोंबील अधिक चांगले फ्राय होतात.
सुके बोंबील म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Dec 2008 - 4:57 pm | अनंत छंदी
है शाब्बास! सिंधुदुर्गात असेच करतात. म्हणून बोंबील कुरकुरीत होतात. हा माणूस खरा मासेखाऊ!! पापलेट, सुरमई, कोळंबी खाऊन मासे खाल्याची भाषा करणारा माणूस खरा मासेखाऊ असूच शकत नाही. कर्लीसारखा चवदार पण काट्याने भरलेला मासा मनापासून हादडणारा खरा मत्स्यावतारभक्त!
थोडे अवांतर : माझ्या एका मित्राचे सासरे असेच अट्टल मासेखाऊ, तो बिचारा पु.लं.च्या भाषेत आम्ही फिश खाल्लं या प्रकारातील आहे. त्याच्या सासर्यांना सोमवार, गुरुवार , शनिवार म्हणजे शिक्षा वाटे शाकाहारी जेवण जेवताना किमान चारवेळा तरी हॅ, आज काय साधं जेवण! म्हणून हळहळत असत एकदा मित्राने त्यांना हळूच म्हटलं तुम्हाला एक दिवस मासे खायला मिळाले नाहीत तर अक्षरशः माशासारखे काय तडफडताय? त्यावर ते म्हणाले ते तुला कळणार नाही, त्यासाठी पिढ्यानपिढ्या मत्स्यावताराची भक्ती करावी लागते. :))
16 Dec 2008 - 9:04 pm | जयेश माधव
जयेश माधव
बो॑बला तीच्या आयला!!
मी बो॑बील माश्याच्या पाककृती विषयी लिहीले होते ,इथे तर भलतेच काही,काय खर॑ नाही बुवा!!
16 Dec 2008 - 9:11 pm | सुनील
आपण येथे नवीन आहात!
अवांतर-अवांतर हा मिपाकरांचा आवडीचा खेळ आहे.
तुम्हाला बोंबलाची पाकृ हवी असेल तर, राजस्थानात वसुंधरा राजे सरकारचा पराभव का झाला अशी चर्चा सुरू करा. तुमचे उत्तर मिळण्याची शक्यता अधिक!!
अवांतर (?) - आणि तसेही इथे काही पाकृ मिळालेल्या आहेतच की!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Dec 2008 - 9:22 pm | जयेश माधव
जयेश माधव
धन्यवाद!!
16 Dec 2008 - 9:41 pm | संदीप चित्रे
जयेश,
रेसिपी नाही पण मी हे बोंबील आख्यान देऊ शकतो... पहा आवडतंय का !!
16 Dec 2008 - 9:52 pm | सुनील
एवढा छान लेख कसा नजरेतून निसटला?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Dec 2008 - 10:36 pm | संदीप चित्रे
सुनील -- प्रतिक्रियेसाठी धन्स :)
17 Dec 2008 - 9:58 pm | जयेश माधव
जयेश माधव
प्रिय स॑दिप,
खर॑ तर मला बो॑बलाच्या रेसिपीपेक्षा सर्वा॑चे लेखच॑ खुप आवड्ले!
मस्त कुर्कुरीत बो॑बला॑पेक्षा अनेक लेख्,टिका,टिपण्णीच जास्त कुर्कुरीत होत्या.खुप मजा आली.
16 Dec 2008 - 11:57 pm | सुक्या
हा प्रकार लहानपणी खुप खाल्ला होता. माझा आवडता प्रकार म्हणुन इथे देत आहे.
साहीत्य : १० / १२ बोंबील
चुल / कोळश्याची शेगडी आवश्यक (बोंबला तिच्यायला . . )
कृती :
बोंबील साफ करण्यासाठी ३/४ वेळेस जमीनीवर आपटा. जमल्यास हाताने साफ करा. (बास. यपेक्षा जास्त सफाइ नको). शेजारी शाकाहारी असतील तर घराची दारे / खिडक्या उघड्या ठेवा, मांसाहारी असतील तर बंद करा. आता साफ केलेले (?) बोंबील शेगडी किंवा चुलीच्या कोळश्यावर मंद भाजा. भाजुन पुर्ण होईपर्यंत मनावर ताबा ठेवा. लगेच खाउ नका. शाकाहारी शेजार्यांच्या आदळापटी कडे दुर्लक्ष करा. असे हे खरपुस भाजलेले बोंबील पुन्हा जमीनीवर आपटुन त्याची राख साफ करा. पहा भाजके बोंबील तयार. आता खा.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
17 Dec 2008 - 10:00 pm | जयेश माधव
जयेश माधव
च्या मायला सुक्या बो॑बला.......
18 Dec 2008 - 5:12 pm | विसोबा खेचर
बोंबिलाच्या वरील पाकृ वाचून धन्य झालो! :)
(बोंबिलप्रेमी) तात्या.
18 Dec 2008 - 7:26 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुले शु
----
सखाराम गटणे