१) गेल्या मे महिन्यातील 'खाद्यपदार्थ छायाचित्र चढवा' अभियाना दरम्यान खालील छायाचित्र विकिमीडिया कॉमन्सवर कुणीतरी चढवले. त्यांनी चित्र संचिकेस (फाईलला) नाव Gavara Chicken Bhakari.jpg असे दिले आहे. यातील Gavara हे 'गावरान'चे त्रुटीयूक्त लेखन असेल का ? कि गावरा/गवारा नावाचा काही चिकन प्रकार महाराष्ट्रात आहे आणि आज पर्यंत ऐकण्यात नाही ? हा वेगळा पदार्थ असेल तर कुणी रेसिपी देऊ शकेल का ?
२) छायाचित्रातील पांढरा वर्ख असलेला पदार्थ कोणता असेल ? खिर असण्याची शक्यता आहे का ? की कढीचा फोटो तसा आला आहे ?
छायाचित्र सौजन्य आणि दुवा : विकिमिडीया कॉमन्स
* आपले या धाग्यास आलेले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिक्रिया
16 Sep 2015 - 10:06 am | अमित मुंबईचा
अहो तो पांढरा पदार्थ म्हणजे पांढरा रस्सा आहे, खीर भाकरी बरोबर विचार सुद्धा नाही करू शकत.
16 Sep 2015 - 10:10 am | प्रभाकर पेठकर
हं! तांबडा-पांढरा रश्श्यासोबत कोल्हापुरी गावरान कोंबडी आणि भाकरी असा बेत दिसतो आहे. खीर नाहीए ती.
16 Sep 2015 - 10:19 am | मांत्रिक
तेलाच्या तर्रीमुळे तो पांढरा रस्सा स्पेशल इफेक्ट दिल्याप्रमाणे दिसत आहे.
16 Sep 2015 - 11:22 am | नि३सोलपुरकर
छायाचित्रातील पांढरा वर्ख असलेला पदार्थ कोणता असेल ? खिर असण्याची शक्यता आहे का ? की कढीचा फोटो तसा आला आहे ?
___/\____
16 Sep 2015 - 11:50 am | माहितगार
=))
माहितगारच्या अज्ञानाचे पितळ उघडे पडले तर =))
16 Sep 2015 - 11:26 am | आनंदराव
विचारांची क्रांती !
यापुढे आपण पांढर्या रस्स्याला खीर म्हणणार .
16 Sep 2015 - 11:51 am | माहितगार
जरूर पण तसे होणार आहे माहित असते तर खीर शब्दावर कापीराइट राखून ठेवला असता =))
16 Sep 2015 - 11:44 am | माहितगार
माझ्याकडून एक महत्वाचा मराठी पदार्थ पांढरा रस्सा खाण्याचा राहीला आहे तर ! पुण्यात कुठेतरी शोधून खावा लागेल की आंजावर शोधून मलाच बनवून पहावा लागेल.
- प्रतिसादाम्मधून माझे अज्ञान जाहीर करून देण्यासाठी सर्वांचे आभार :)
16 Sep 2015 - 11:47 am | मांत्रिक
भौ त्याची तयार पाकिटं मिलतात आता. चेकवा जरा.
16 Sep 2015 - 11:56 am | माहितगार
जे पुस्तक आपण वाचलेले नसेल तरी आपण ते वाचलेले असणार अशी ज्याच्याविषयी आपली समजूत असते त्या पुस्तकाला अभिजात पुस्तकाचा (classic) दर्जा प्राप्त झालेला असतो असे म्हटले गेले आहे. - इति मेघश्याम पुंडलिक रेगे
कोल्लापुरी चिकन आपल्याला माहित आहे असे वाटले होते पण माहित नसूनही माहित असल्यासारखे वाटत होते म्हणजेच अभिजात रेग्यांच्या शब्दा अभिजात पाककृती.
माझे शेजारी चतुर्मास करतात म्हणून माझाही चतुर्मास होत असतो, चतुर्मास संपला की जरूर करून बघेन,
धन्यवाद
16 Sep 2015 - 12:02 pm | मांत्रिक
मराठा दरबार हाॅटेलची चांगली आहेत पाकीटे. तुम्ही शाका. असाल तर मसूर वापरून सुद्धा बनवतात.
16 Sep 2015 - 1:29 pm | आनंदराव
मी पुण्यातच असतो.
जाउ एकदा दुपारी मटण खायला.
तुमच्या शंका कायमच्या मिटवुन टाकतो.
16 Sep 2015 - 2:57 pm | माहितगार
नक्की !
16 Sep 2015 - 3:03 pm | मांत्रिक
ऑ? एकटे माहितगारच का? आम्ही काय कोंबडी मारली आहे?
16 Sep 2015 - 3:33 pm | माहितगार
कट्टा योजना करूयात, त्यात काय एवढे !
16 Sep 2015 - 7:07 pm | आनंदराव
मांत्रिक राव
तुम्ही काहीही मारले तरी आमची काहीही हरकत नाही.
चला जाउ पी. के बिर्याणी ला... राजाराम पुला जवळ.
आणि श्रावण, चातुर्मास या सगळ्या अफवा आहेत असे आमचे मत आहे.
त्यामुळे कोणताही दिवस निषिद्ध नाही.
16 Sep 2015 - 11:14 pm | मांत्रिक
;)
16 Sep 2015 - 3:26 pm | गिरकी
पुण्यात 'पुरेपूर कोल्हापूर' नावाची चेन आहे. तिथे पूर्वी हे रस्से चांगले मिळायचे. अगदी कोल्हापुरी दर्जाचे नसले तरी कोल्हापूरला जायची तहान भागायची. आता कित्येक वर्षांत गेले नाही त्यामुळे सध्याची कल्पना नाही.
24 Sep 2015 - 9:41 am | कोमल
पुरेपुर कोल्हापूर : एक गंडलेली साखळी.
अतिशय भंगार चव. कोल्हापुरी टॅग खाली काहिही खायला घालतात, सावजी च्या आसपास जाणारी चव आहे (होती. एव्हाना सगळे पुको बंद पडलेले आहेत वाटतं)
कोल्हापुरी साठी "गावकरी" मस्त आहे. चव तंतोतंत नसली तरी चटक लागावी इतकी चांगली आहे.
16 Sep 2015 - 11:48 am | माहितगार
मंडळी मधल्या दोन वाट्यातील एक तांबड्या रस्स्याची असणार, दुसरी आमटी सदृष्य वाटी आमटीचीच असेल का तर्री आहे का तोच तांबंडा रस्सा आहे.
अनभिज्ञतेतून कोल्लापूरी चिकन प्रेमींच्या भावना दुखावत असल्याबद्दल क्षमस्व :)
16 Sep 2015 - 12:34 pm | यसवायजी
घड्याळवाईज-
लिंबू-कांदा-चिकन-"गिरव्ही"-तां.रस्सा-पां.रस्सा-भाकरी.
16 Sep 2015 - 3:34 pm | माहितगार
यकदम विकिपीडिया श्टाईलमध्ये लिवून दिल्या बद्दल आभारी आहे.
16 Sep 2015 - 11:56 am | प्रसाद गोडबोले
तांबडा पांढरा रसाच आहे तो ...
नका ओ आठवण करुन देवु माहीतगार ...
16 Sep 2015 - 3:37 pm | माहितगार
छायाचित्र पाहून आम्हालाही हे कोल्लापुरीकर्म करण्याची इच्छा झाली आहे परंतु चतुर्मासामुळे (मी पाळत नसतो तरी समर्थन करतो म्हणून लादला जाणारा) पार पडला की, तो पर्यंत तुमची आणि आमची भावना सेम सेम
16 Sep 2015 - 3:55 pm | आदूबाळ
अजून "गळ्ळ्यात साख्ख्ळी सोन्याची, ही चिकन थाळी कोणाची" असं विडंबन आलं नाही म्हणून णीशेढ.
16 Sep 2015 - 4:02 pm | माहितगार
=))
गळ्ळ्यात साख्ख्ळी सोन्याची, ही चिकन थाळी कोणाची
आवडल ब्वॉ विडंबन :)
24 Sep 2015 - 5:12 pm | dadadarekar
खीर चिकन भाकरी !
24 Sep 2015 - 5:55 pm | मांत्रिक
ओ दादुमियां आज बेत काय ईदचा!
25 Sep 2015 - 3:19 pm | आनंदराव
पाकातले मटण आणि उपासाची भुर्जी
25 Sep 2015 - 4:50 pm | शंतनु _०३१
पाकातलं मटण >>> जबराट काँबिनेशन
25 Sep 2015 - 4:51 pm | माहितगार
+१
25 Sep 2015 - 4:50 pm | माहितगार
एकंदरीत आम्ही सुचवलेली खिरी सोबतची चिकनथाळी :) सेंच्युरी मारुन फ्येमस होण्याचे च्यान्सेस दिसतात :)
लगे रहो खिर आणि 'हि चिकन थाळी कोणची ?' :)
25 Sep 2015 - 5:38 pm | मांत्रिक
शेंचुरी झाल्यावर पार्टी द्या साहेब!!!