सफर आडवळणावरील खेड्यांची....!

मेघनाद's picture
मेघनाद in भटकंती
15 Sep 2015 - 11:25 am

हि सफर विदेशाची नाही तर कोंकणातील खेड्यांची आहे, तेही फार प्रसिद्ध नसलेल्या खेड्यांची. हल्लीच जूलै महिन्यात कोकणात जाऊन आलो. तिकडच्या नातेवाईकांची भेट घ्यावी आणि कोकणातला पावसाळी ऋतू मनमुराद अनुभवावा एवढाच मानस होता.
माझ्या ह्या खेपेला मी ३ गावी जाऊन आलो, टी पुढीलप्रमाणे - १.कोंड्ये, २.मीठगवाणे, गगनगड आणि गिर्ये.

गुगल नकाश्यांचे दुवे: १. कोंड्ये २. मीठगवाणे ३. गिर्ये ४. गगनगड (नकाशे बघण्यासाठी नावावर राईट क्लिक "ओपन इन न्यू टाब" )

पैकी वरील दोन गावं (कोंड्ये आणि मीठगवाणे) हि गुगल नकाशावर मीच नोंदवली आहेत. काही दिवसांनी गुगल वाल्यांनी ह्या दोन खुणा सच्च्या असल्याची ग्वाही देऊन नकाशावर प्रकाशित केली. गिर्ये गावात पवनचक्क्या असल्याने ते गावं आधीपासूनच नकाशावर होते....धन्यवाद गुगल बाबा! असो..

२१ जून रोजी संध्याकाळी पनवेल डेपो वरून रिझर्वेशन केलेली बोरीवली-राजापूर एसटी पकडायची होती, लाल डब्बा आपला एकदम फेवरेट! अगदी लहान असल्यापासून एसटीचा प्रवास दरवर्षी केलेला असल्याने लाल डब्ब्याशी जिव्हाळ्याच नात तयार झालेलं आहे. पूर्वीच्या तुलनेत आता लाल डब्बा काही अगदीच डब्बा राहिलेला नाही हां. २x२ आणि आरामदायक सीट, स्वच्छता, शांत परंतु वेगवान इंजिन अश्या अनेक सुधारणा एसटी महामंडळाने केल्या आहेत, तरीहि नाक मुरडण्याची सवयच झालेली मंडळी अजूनही एसटी प्रवासाला नाकारतात...असो ज्याची त्याची आवड.

तर अश्याप्रकारे आम्ही (मी आणि माझा आत्या भाऊ) डोंबिवलीहून पनवेलला पोहोचलो. काही काळाची प्रतीक्षा झाल्यावर ट्राफिक मुळे रखडलेली आमची एसटी येऊन दाखल झाली, ठरलेल्या सीटा पकडून बसलो.


एसटी

चालक वेगवान होता परंतु सध्या चालू असलेल्या मुंबई-गोआ महामार्गाच्या रुंदीकरणामुळे रस्ता अगदीच बेकार झाला आहे, त्यामुळे होडीप्रमाणे आमची बस हेलकावे खात २०-३० च्या वेगाने प्रवास करत होती. तरी देखील ९ वाजता पनवेल सोडलेले आम्ही रात्री १२ वाजता महाडला पोहोचलो. पुढे अतिशय सुंदर असा कशेडी घाट वेगाने ओलांडून १:३० वाजता चिपळूण गाठलं. इथे चालक आणि वाहक बदलून दुसरे आले, दुसरा चालक तर विमानासारखी बस हाकत होता. त्याच ड्रायविंग कौशल्य खरच थक्क करणार होत. १५० किमी चा घाटांचा वळणावळणांचा रस्ता अगदी सहज २.३० तासात पूर्ण करून राजापूरला पहाटे ४ वाजता पोहोचलो, आणि टपरीवरचा मस्त गरमागरम चहा पिऊन फ्रेश झालो.

इथून सकाळी ६ वाजताची दुसरी एसटी पकडून पुढे १४ कि.मी वरील कोंड्ये ह्या गावी उतरलो. मुंबई-गोआ हाइवेच्या दोन्ही बाजूला पसरलेलं टुमदार गावं आहे हे. घरी पोहोचून मावशी आणि माझ्या भावंडाना भेटलो आणि सगळे दैनंदिन व्यवहार आटपून हातात क्यामेरा (कॅनन 600डी विथ १८-५५ आणि ७५-३०० युएसम लेन्स) घेऊन फिरायला बाहेर पडलो. त्यातील काही छायाचित्र पुढे देत आहे.

स्वागतोत्सुक म्हैस.
स्वागतोत्सुक म्हैस.

.

अळवावरच पाणी
अळवांवरच पाणी

.

गावातून जाणारा मुंबई-गोवा हाइवे
गावातून जाणारा मुंबई-गोवा हाइवे

.

रस्त्याशेजारील शेतमळा
रस्त्याशेजारील शेतमळा

.

उनाड खोड
उनाड खोड

.

नवीन पालवी
नवीन पालवी

.


हिरव्या रंगछटा

क्रमशः

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

15 Sep 2015 - 11:28 am | मांत्रिक

कल्पना तर सुंदर आहे. पुढील भागांची प्रतिक्षा देखील वाढलेली आहे. पण छायाचित्रांचे दुवे आलेले नाहीत.

एस's picture

15 Sep 2015 - 11:32 am | एस

गणेशा!

मांत्रिक's picture

15 Sep 2015 - 12:40 pm | मांत्रिक

गणेशा होणे म्हणजे काय? जरा नवीन मेंब्रांना पण सांगा की ईस्कटून!

सूड's picture

15 Sep 2015 - 3:05 pm | सूड

+१

मेघनाद's picture

15 Sep 2015 - 12:36 pm | मेघनाद

गणेशा ऊत्तमच झाला आहे.

छायाचिञांचे दुवे लवकरच अद्ययावत करतो.

तोपर्यंत माफि असावी.

बाबा योगिराज's picture

15 Sep 2015 - 12:39 pm | बाबा योगिराज

पन फोटु दिसनात बगा...........

अविनाश पांढरकर's picture

15 Sep 2015 - 12:52 pm | अविनाश पांढरकर

पुढील भागांची प्रतिक्षा देखील वाढलेली आहे

अजया's picture

15 Sep 2015 - 2:18 pm | अजया

फोटो काय वापरून टाकले आहेत? पिकासा,फ्लिकर, फेसबुक यातल्या लिंक चालतात मिपावर.मोबाईलवर postimage.org
वापरता येईल.

वाचकहो छायाचित्र अद्ययावत केली आहेत....
कृपया भेट द्यावी....

मदनबाण's picture

15 Sep 2015 - 2:20 pm | मदनबाण

ब्रम्ह कमळ दिसले ! :प

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne

मेघनाद's picture

15 Sep 2015 - 2:23 pm | मेघनाद

मी हे फोटो गुगल ड्राइव्ह वापरून टाकले आहेत...

सेटिंग चा थोडा घोळ झाला होता … आता सर्व ठीक झालय

सेटिंग चा थोडा घोळ झाला होता … आता सर्व ठीक झालय
अजुनही फोटो दिसेनात... गुगल ड्राइव्ह वरचे फोटो दिसण्यात काय झोल आहे, ते कळत नाही... म्हणुनच ब्रम्ह कमळ दिसले असे गमतीने लिहले,एक्का काकांच्या धाग्यावर शेवट पर्यंत ते दिसले नव्हते ना ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne

हो खरच कि अजूनही फोटो दिसेनात.
फ्लीकर वर उपलोड ते कसे वापरावे नाहीये.
कोणी मार्गदर्शन केल्यास बरे पडेल

आता तरी सर्वाना फोटो दिसतील आशा आहे। वाचकहो प्रतिसाद द्या.

संजय पाटिल's picture

15 Sep 2015 - 3:09 pm | संजय पाटिल

दिसले दिसले फोटो...

फोटु दिसले! म्हस लईच स्वागतोत्सुक दिसतीया. :-)

मस्त फोटो.

संजय पाटिल's picture

15 Sep 2015 - 3:29 pm | संजय पाटिल

लेख आणी फोटो छान !!

छान आहेत फोटो.म्हशीचा तर एका आय डीच्या प्रोफाईलला पण वापरता येईल.

अभी सब फोटु बराबर दिख्या... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne

प्यारे१'s picture

15 Sep 2015 - 4:12 pm | प्यारे१

यष्टी आणि म्हस विथ रस्ता..... मस्त फोटो आलेत
पुलंची म्हैस आठवली.

अखिल भारतीय म्हैस संघटनेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा इतका मस्त फोटो आलाय म्हशीचा. आवडला.

प्रचेतस's picture

15 Sep 2015 - 4:29 pm | प्रचेतस

झकास सुरुवात आणि सुरेख छायाचित्रे.

सौंदाळा's picture

15 Sep 2015 - 4:37 pm | सौंदाळा

मस्त
फोटो दिसल्यावर तर चार चांद लागले लेखाला.
अजुन डीट्टेलवारी वर्णन येऊ द्या.
पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2015 - 4:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ! न मळलेल्या पाऊलवाटांवरच्या अनवट जागांची पुढची माहिती आणि चित्रे पाहण्यास उत्सुक आहे. पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

15 Sep 2015 - 5:04 pm | मुक्त विहारि

तर काही फोटो बाबत आमचा "गणेशा." झाला.

सुरवात ठीक आहे पण लेन्स ७५-३०० लिहिलंय.३०० एमेमचे फोटो टाका लवकर.

मेघनाद's picture

21 Sep 2015 - 1:30 am | मेघनाद

कंजूसजी, ३०० एमेम ची छायाचित्रे पुढील भागांमध्ये येतीलच.

पद्मावति's picture

15 Sep 2015 - 10:31 pm | पद्मावति

सफरीची मस्तं सुरूवात.
पुढचे भाग वाचायला उत्सुक.
म्हशीचा फोटो फारच क्यूट आहे.

रेवती's picture

16 Sep 2015 - 2:59 am | रेवती

फोटू दिसले व आवडले.

अळवांवरच पाणी हा फोटो मला आवडला...

नीलमोहर's picture

16 Sep 2015 - 10:48 am | नीलमोहर

भारी फोटो आलेत सगळेच !!
हिरवंगार शेत बघून डोळे आणि मन दोन्ही प्रसन्न झाले.

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2015 - 6:36 pm | दिपक.कुवेत

ह्या मीठगवाणे गावाला जायचा योग आला होता मागच्या वर्षी. चीपळूण हुन अचानक जायचा प्लॅन ठरल्याने आधी जायची टाळाटाळ करत होतो आणि प्रवास संपता संपत नव्हता. शेवटी पोहचलो एकदाचे. माय गॉड पण गाव ७ लाच चीडीचूप. पण खूप शांत वाटत होतं. गड्बड, गोंधळ, कोलाह्लापासून दुर्....एकंदरीत आवड्लं नंतर. लाल डबा सुद्धा दिवसातून दोनदाच जातो असं एकलं होतं.

अरे वाह! मीठगवाणे गावात माझे आजोळ आहे. गाव खरच अतिशय शांत परिसरात वसले आहे. एकूणच अंतर्भागातील खेड्याचा अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. बाकी गोष्टींचा खुलासा गावासंबंधीच्या भागात करेनच.

आदिअनन्त's picture

17 Sep 2015 - 1:34 am | आदिअनन्त

अन्तिम चित्रात जी वेइल आहे त्याचे नाव आहे कारन्दे. हे कारन्दे. बतत्या सार्खे लाग्तात. आस्चर्या चि. गोस्त म्हान्जे मालआ आइइ ने ४ कारन्दे दीले होते. मी ते . इइकदे माझ्ह्य बागेत लाव्ले. उन्हाल आहे म्हानुन वेल्ल चन्ग्ल आला आहे. पान दोल्तान मास्त दिस्स्तत आनि खूप सुन्दर दिस्तत. बाघु हा वेल इकद्चि थान्दि सोसेल का.

दिपक.कुवेत's picture

17 Sep 2015 - 2:18 pm | दिपक.कुवेत

कित्ती कित्ती गोल (गोड) बोलता तुम्ही.

आदिअनन्त's picture

17 Sep 2015 - 9:06 pm | आदिअनन्त

pahilyaanda marathi madhye type karaycha pranjal prayatna hota...
shuddha lekhana che 3 13 wajle rao. Tya sathi kshama aasavi

pan karandyancha vel baghun khup utsaahit zhaalo mhanun pratisad dila.

ã

पैसा's picture

17 Sep 2015 - 9:14 pm | पैसा

होईल सवय हळूहळू

पैसा's picture

17 Sep 2015 - 9:15 pm | पैसा

लेख आणि फटु सुंदरच आहेत! म्हशीचा फटु जाम आवडला.

सत्याचे प्रयोग's picture

17 Sep 2015 - 10:56 pm | सत्याचे प्रयोग

अळवांवरच पाणी जीवंत फोटोग्राफी.

रातराणी's picture

18 Sep 2015 - 4:25 am | रातराणी

सुंदर आहेत फोटो!

सुबोध खरे's picture

18 Sep 2015 - 10:34 am | सुबोध खरे

अशा शांत आणि सध्या अप्रसिद्ध ठिकाणांचे पर्यटन मला फार आवडते.
अन्यथा प्रत्येक हवशा गवशा प्यारीसला जाऊन आयफेल टॉवर चिमटीत धरल्याचा फोटो किंवा पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला टेकू दिल्याचा फोटो टाकतो ते पाहायला आणि ते वर्णन वाचायला आताशा कंटाळा येतो.
गुलाबांचे प्रदर्शन फार झाले. अशी रानफुले आणि गवतफुले पाहायला फार आवडेल.
अजून येऊ द्या.

mdmagar's picture

20 Sep 2015 - 1:11 pm | mdmagar

राहण्याची व्यवस्था होऊ शकते का? तुमच्यासारखे आमचे कोणी नाते वायिक तिकडे नाहीत . पूर्ण माहिती द्यावी ही विनंती

हो, होऊ शकेल, परंतु मला थोडी माहिती काढावी लागेल. लवकरच माहिती व्यनि करतो

सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मिपा वाचकांचे प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. हुरूप वाढतो प्रतिसादांनी

दीपा माने's picture

21 Sep 2015 - 7:24 pm | दीपा माने

फोटोतील म्हशी समोरील जांभा दगडांची कुस पाहून रत्नागिरीच्या गावाची भावुकतेने आठवण आली.

चांदणे संदीप's picture

21 Sep 2015 - 7:56 pm | चांदणे संदीप

तुमचा यातलाच एक फ़ोटो माझ्यासाठी प्रेरणा घेऊन आला आहे.
लवकरच येईल भेटीला!

रीडर's picture

12 Jul 2020 - 6:02 am | रीडर

म्हैशीचा फोटो खूपच cute

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2020 - 1:10 pm | चौथा कोनाडा

व्हवा मस्तच !
लाल परीचं कौतुक आणि निष्ठा पाहून अंमळ सुखावलो ! फोटो अप्रतिम !

श्वेता२४'s picture

12 Jul 2020 - 3:25 pm | श्वेता२४

स्वागतोत्सुक म्हैस हा फोटो फारच आवडला!