ज्या काळात महाजालाचा उदय आणि विकास झाला तेंव्हा मराठी अथवा एत्तदेशीय भाषेला इंग्रजीचे ग्रहण लागणार असे सर्वसाधारण लोक आपपासात बोलत असत. हे तंत्रज्ज्ञान इंग्रजीतून आलेले असल्याकारणे तत्कालिन संकेतस्थळावर इंग्रजीचा प्रभाव असणे आणि त्या त्या संकेतस्थळाची भरभराट होणेही स्वाभाविकच होते.
मराठी भाषकात एका प्रकारच्या निराशेचा सूर असतांना मात्र काही मराठीप्रेमी आपापल्या परीने मराठीत संकेतस्थळे बनवित होतेच. त्यात मराठीवर्ल्ड.कॉम, मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या संकेतस्थळाचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. ही सर्व संकेतस्थळे बर्यापैकी प्रगत असतांनाही यावर मराठीभाषकांचा वावर मात्र तसा कमीच आहे.
तरीसुद्धा मला असे वाटते की मराठी भाषेत अजूनही काही संकेतस्थळे असावी.
माझ्या मनात खालील दोन प्रकारची / विभागाची संकेतस्थळे यावी अशी अभिलाषा आहे.
१. मराठी भाषेतील विनोद, हसवणूकीचे एक स्थळ असावे. मराठी भाषेत श्रीपाद कोल्हटकरांपासून ते आता आता पुलदेशपांडे पर्यंत विनोदाची सशक्त परंपरा आहे. या सर्व लेखकाच्या विनोदाचा आणि असंख्य अशा छोट्यामोठ्या विनोदाचा परामर्ष या संकेतस्थळावर व्ह्यावा. सकाळी सकाळी या स्थळाला भेट द्यावी आणि मनमुराद हसावे अश्या प्रकारचे हे संकेतस्थळ बनविले जावे. त्यात व्यंगचित्राचाही समावेश असावा. त्याचबरोबर देशीविदेशी विनोदी साहित्याचा आणि विनोदाचा प्रचंड असा खजिना असावा असे मला वाटते.
२. मराठी भाषेत शृंगारावर एक वेगळे असे संकेतस्थळ असावे. मराठीला भावगर्भ अशा लावणीचा संदर्भ आहेच. बतावण्या इत्यादी प्रकारही लोकपरंपरेत आहेच. दादा कोंडके यांनी याचा वापर करत आपला ठसा मराठी भाषेत उमठवला होताच. माझ्या लहानपणी ( ७५/८० च्या सुमारास) काकोडकरांच्या कादंबर्याचा वेगळा शौकिन असा वर्ग होताच. थोडेफार छचोर असे म्हणता येईल असे साहित्यही यावर असायला हरकत नाही. मात्र हे सर्व मराठीतच असायला हवे. आमच्या मित्रमंडळीत फंडु असा उल्लेख असलेले साहित्य विरोपाद्वारे/ ढकलपत्राद्वारे फिरत असतेच. थोडेफार असे साहित्यही येथे तयार झाले तरी हरकत नाही. ( अर्थातच मी यावर फारसा विचार केला नाही हे मी मान्य करतो.)
या दोन्ही विभागाची मराठी भाषेतील संकेतस्थळाची निर्मिती मराठी भाषकांना महाजालावर आणण्यास प्रवृत्त करेलच अशी मला खात्री आहे.
आज अनेक संगणक अभियंते महाजालावर सक्षमतेने वावरत असतात त्यापैकी कोणीतरी वरील स्थळे बनवण्याचा प्रयत्न करेल अशी मला आशा वाटते.
मराठीतल्या अनेक संकेतस्थळावर एकाच वेळेस लाखभर तरी लोक असावे असे माझे स्वप्न आहे. ( १ कोटी मराठीपैकी १ लाख म्हणजे फारसे मोठे नसलेले स्वप्न आहे असे म्हणाणा हवे तर).
याही पेक्षा काही संकेतस्थळे निर्माण व्हावी असे वाटले तर नक्की लिहाच.
प्रतिक्रिया
13 Dec 2008 - 8:29 pm | JAGOMOHANPYARE
सूचना चान्गली आहे, पण ती व्यवहार्य नाही..कॉपी राईट चे फार मोठे प्रश्न निर्माण होतील.
13 Dec 2008 - 9:04 pm | कलंत्री
पहिला मुद्दा म्हणजे कोणाही व्यक्तिच्या मृत्युनंतर ६० वर्षानंतर स्वामीत्वाचा प्रश्न राहत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे त्या व्यक्तिचा उल्लेख केला तर आपण काही चोरी करीत आहे असे होत नाही. ( मी हे सर्व मराठी विनोदीलेखकाच्या कथा, कादंबर्याबद्दल लिहित आहे.)
मुख्य म्हणजे विनोदाचे झरे आटलेले नाही. चिंटु किंवा इतरत्र अनेक प्रकारे विनोदी निर्मिती होत असतेच.
आणि नैतिक पातळीवरुन असे स्वामित्व द्यावे लागले तरी काय हरकत आहे?
खरे तर असे संकेतस्थळ निर्माण करण्यात काय अडचणी येतील याचाही उहापोह व्हावा.
14 Dec 2008 - 1:05 am | पाषाणभेद
असा विचार करायला आणि भाषासम्रूद्धिसाठी असे संकेतस्थळे विकसीत करायला हवीत. न जाणो उद्या कदाचीत बिझनेस हाऊसेस पण यात रस घेतील.
अवांतर: आम्ही पण दादांचे पंखे आहोत म्हटलं.
-( सणकी )पाषाणभेद
14 Dec 2008 - 9:53 am | भडकमकर मास्तर
त्या दुसर्या प्रकाराची कल्पना उत्तम आहे....
मराठीत असे दर्जेदार लेखन नेहमी वाचनात येत नाही....( म्हणजे इंग्रजीत येते असे कोण म्हणाला रे ?)
त्या साईटच्या मुखपृष्ठावर धोंडोपंतांची ती कविता डकवा... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/