शाकाहारी थाळी

जेपी's picture
जेपी in पाककृती
4 Oct 2014 - 4:27 pm

सादर करीत आहे एक शाकाहारी थाळी
thaaLI thaali
डाव्याबाजुला आहे,शेंगदाण्याची चटणी,मेतकुट्,पंचामृत. उजव्याबाजुला आहे,पालकाची मुद्दा / पातळ भाजी,
गव्हाची कुरुडी,उडिद पापड, वडा. नंतर पुरण पोळी ,साधे वरण आणी भात. वाटीमधे कटाची आमटी,कढि आनि
तुप.

सुचना:- शेंगदाण्याची चटणी,मेतकुट्,गव्हाची कुरुडी,उडिद पापड, ,साधे वरण आणी भात याची पाकक्रुती
सर्वमान्य आहे त्यामुळे ईथे देत नाही.
पुर्वतयारी:- एक वाटी चिचेंचा कोळ काढुन ठेवावा.

पुरणपोळी:-
साहित्यः-
सारण :- १ ग्लास हरभरा डाळ+ १ ग्लास साखर+विलायची आणी जायफळ ची १ चमचा पुड
कॄती :-
१)हरभरा डाळ स्वछ धुवुन घ्या. दुप्पट पाणी घालुन कुकर मधे २० मिनीट शिजवुन घ्या.
२)शिजल्यानंतर डाळीतील अतिरीक्त पाणी काढुन ठेवा.( हे पाणी पुढे कटाच्या आमटी साठी उपयोगी
पडेळ)
३)आता डाळ पुरणयंत्रातुन वाटुन घ्या.
४)वाटण एका कढईत घेउन त्यात साखर आणी विलायचि पुड घालुन चटका द्यावा( भाजुन घ्यावे).
५) हे मिश्रण थंड होऊ द्यावे.
पोळी साठी:
१) कणीक सैलसर तिबुंन घ्यावी.
२) कणकेचा छोटासा गोळा घेवुन त्याची एक लहान लाटी बनवावी. यामधे पुरणाच्या सारणाचा गो़ळा
ठेवुन लाटी हलक्या हाताने बंद करुन घ्यावी.
३) बंद लाटीची पोळी लाटुन घ्यावी. पोळी तव्यावर तुप टाकुन खरपुस भाजुन घ्यावी.

पंचामृतः-
साहित्यः- १ चमचा मेथि दाणे + १ चमचा जिरे + हळद + आर्धि वाटी बारीक केलेली हिरवी मिरची+
२ चमचे शेगंदाण्याचे कुट + चिंचेचा कोळ ४ चमचे+ चवी नुसार मीठ आणी गुळ ,फोडणीसाठि
तेल.
कृती :- १) कढईत तेल गरम करा त्यात अनुक्रमे जिरे,मेथी दाणे टाकुन फोडणी करुन घ्या.
२) आता बाकीचे साहित्य घालुन वर अर्धा ग्लास पाणी घालुन मिश्रन घट्ट्सर होईपर्यंत
शिजवुन घ्या.
वडा:-
साहित्यः- हरभर्याची भरड १ वाटी + चवीनुसार तिखट्+मीठ+ हळद+ बारीक चिरलेली कोथींबिर+
तळण्यासाठी तेल
कृती:- १)भरड आणी ईतर साहित्य ( तेल सोडुन) एकत्र पुरेसे पाणी घालुन घट्ट मळुन घ्या.
२) तयार मिश्रणाचे लहान चपटे गोळे बनवुन तेलात डिप फ्राय करुन घ्यावे.

पालकाची भाजी:-
साहित्यः- १ जुडी पालक + हरभरा डाळीचे पीठ १ वाटी + शेगंदाणा कुट आर्धि वाटी + चविनुसार
तिखट,मिठ,हळद+ फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे,हिंग,वाळलेल्या लाल मिरच्या.

कृती: १) पालक स्वछ धुवुन बारीक चिरुन घ्यावा.
२) चिरलेला पालक पुरेसे पाणी घालुन पातेल्यात शिजवुन घ्यावा.
३) पालक शिजल्यानंतर यामधे हरभरा डाळीचे पीठ+ शेगंदाण्याचे कुट+ तिखट,
मीठ्,हळद घालुन हाटुन (घोटुन) घ्यावे.
४) वरिल मिश्रणात अर्धा ग्लास पाणी घालुन पुन्हा शि
5)आता फोडणीच्या कढईत तेल गरम करुन मोहरी,जिरे,हिंग आणी लाल मिरच्याची फोडणी करुन
घ्या.ही फोडणी भाजीवरती टाका.

कढी:-
साहित्य:- 1 ग्लास दही+ आर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ+ अद्र 1/2 इंच ठेचुन + कडीपत्त्याची पाने 8 ते
10+ फोडणीसाठी तुप 2 चमचे आणी अर्धा चमचे जिरे.
कॄती :-
1) दही रवीने घुसळुन त्यात आवश्यक तेव्हढे पाणी घालुन ताक बनवा.यामध्ये डाळीचे पीठ टाकु
चांगले ढवळुन घ्या.
2) एक पातेल्यात तुप गरम करुन त्यात जिरे ,कढीपत्ता आणी जिरे यांची फोडणी करुन घ्या.
3) फोडणीत वरील ताकाचे मिश्रण टाका आणी 10 मिनीटे उकळी येऊ द्या.

कटाची आमटी:-
साहित्यः- पुरणातुन काढलेले अतिरीक्त पाणी ( कट )+चिचेंचा कोळ आर्धि वाटी + काळे तिखट २ चमचे
+ चविनुसार गुळ, मीठ, २ चमचे खोबर्याचा किस , मोहरि १ टिस्पुन, फोडणीसाठी तेल,
आवड आसल्यास वरुन सजावटीसाठी कोथिबींर
कृती :-१)एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी करुन घ्या.
२)आता मंद आचेवर काळे तिखट चांगले भाजुन घ्या.
३)यामध्ये कट+ चिचेंचा कोळ+ चविनुसार गुळ + मीठ + खोबर्याच किस + आणी कोथिबींर
टाकुन एक उकळी येऊ द्या.

आशा आहे आपणास आवडेल. संंमला विनंती शक्य आसल्यास हा धागा पुर्णब्रम्ह या सदरात हलवावा
धन्यवाद.

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Oct 2014 - 4:31 pm | पैसा

जेपी, मस्तच! थाळीचे फोटो आणि डिट्टेल पाककृती खूप आवडल्या!

कविता१९७८'s picture

4 Oct 2014 - 4:32 pm | कविता१९७८

थाळी एकदम तों.पा.सु. आहे.

कविता१९७८'s picture

4 Oct 2014 - 4:33 pm | कविता१९७८

कटाच्या आमटीची चव कालच पहिल्यांदा घेतली, आवडली.

मस्त थाळी अाणि पाकृ पण बेस्ट!

मस्त दिसतीये रंगीत थाळी....

रेवती's picture

4 Oct 2014 - 6:02 pm | रेवती

फोटू छान आलेत.

जेपी's picture

4 Oct 2014 - 6:11 pm | जेपी

आपल्या सर्वांचे आभार.

(स्वगत-पाचजणींनी धागा ओवाळला आहे.
हाफ सेंच्युरी व्हायला हरकत नाही.[क्रु ह घ्या])

मस्त!

आतिवास's picture

4 Oct 2014 - 6:54 pm | आतिवास

ही थाळी कुठे मिळेल? :-)

जेपी's picture

4 Oct 2014 - 6:55 pm | जेपी

1)मागील 3 वर्ष आमच्यातील बल्लव जरा कोमात होता.त्याला काल दसर्यानिमीत्त जागे केले आणी किचन मध्ये घुसुन जे तयार केल ते आपल्या पुढे मांडल आहे.
2)प्रथमच मिपाच ऑनलाईन गमभन वापरुन हा लेख पुर्ण केला आहे.

पैसा's picture

4 Oct 2014 - 7:08 pm | पैसा

पुरणपोळ्या आणि कटाची आमटी तू केलीस? प्रचंड कौतुक आहे! आणि गमभन वापरायला अगदी सोपं आहे. सवय होईपर्यंत काय तो प्रश्न!

जुइ's picture

4 Oct 2014 - 7:03 pm | जुइ

थाळी छान दिसत आहे Good

@आतिवास-या लातुरला नक्कीच स्वहस्ते पेश करीन.
@पैसाताई- स्वत: केली आहे म्हणुनच इथे टाकली.
जुई -धन्यवाद

वा वा मस्त दिसतेय थाली थाळी....

प्रचेतस's picture

4 Oct 2014 - 9:06 pm | प्रचेतस

कसं काय राव जमतं हे?
इथे साधा चहा करायची पण आमची बोंब.

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2014 - 9:14 pm | प्रभाकर पेठकर

वेगळी पाककृती आहे. करून पाहायला हवी.
काळे तिखट म्हणजे काय?

जेपी's picture

5 Oct 2014 - 10:21 am | जेपी

काळे तिखट म्हणजे काय?
@ पेठकर काका- काळे तिखट मंजे आपण जे मसाले जेवणात वापरतो, ते सर्व मसाले आणी लाल मिरची तेलात भाजुन
एकत्र कुटुन तयार करतात. भाजल्यामुळे तिखट काळे दिसते.
आधी घरी बनवायचे पण आता बाजारात विकत मिळते. फोटो देतो बघा काही अंदाज येतो का ?
black

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2014 - 10:30 am | प्रभाकर पेठकर

ह्म्म्म! धन्यवाद जेपी.

भारताबाहेर पडल्याला आता ३४ वर्षे झाली, तसा रजेवर येत असतोच अधूनमधून पण, लागतील ते ते मसाले (शक्यतो) घरीच बनवायच्या हौसेपायी कधी पाहण्यात आले नाही. आता रजेवर आल्यावर पुण्यात कुठे मिळते ते पाहून वापरून पाहिन.

मधुरा देशपांडे's picture

4 Oct 2014 - 9:31 pm | मधुरा देशपांडे

वावा. मस्त. सगळ्याच पाकृ आवडल्या. पंचामृत कित्येक दिवसात खाल्ले नाही. खूप आवडीचा प्रकार. आमच्याकडे यात खोबर्‍याचे काप पण घालतात.

मुक्त विहारि's picture

4 Oct 2014 - 10:33 pm | मुक्त विहारि

जेपी....

तुम्ही जर स्वतः पुरणपोळी करत असलात.... तर दंडवत....

आमच्या पोळ्यांना कुत्र पण तोंड लावत नाही, पुरणपोळी तर फार्र दूरची गोष्ट...

एस's picture

16 Oct 2014 - 5:54 pm | एस

असेच म्हणतो.

आम्हांला फक्त बटाटेवडे बनवता येताहेत. हळूहळू पुरणपोळीपर्यंतचा टप्पा नक्की पार करू! ;-)

सविता००१'s picture

4 Oct 2014 - 11:31 pm | सविता००१

छानच दिसते आहे थाळी. आणि तुम्ही सगळं स्वतः केलंत म्हणजे कमाल आहे

शिद's picture

4 Oct 2014 - 11:33 pm | शिद

+१००...असेच म्हणतो. *ok*

सानिकास्वप्निल's picture

5 Oct 2014 - 12:40 am | सानिकास्वप्निल

थाळी एकदम झकास दिसतेय.
सगळे पदार्थ पण मस्तं, खंग्री बेत :)

लातूरच्या म्हणजे आमच्यासाठी एका नवीन ठिकाणच्या थाळीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

वाटीभर साजूक तूप पाहून अगदी प्रसन्न वाटले!

आपला आहार शास्त्रीय पद्धती प्रमाणेच "आदर्श चौरस आहार" असण्याचे प्रमाणपत्रच.
तेही मेकॉले पद्धतीच्या शाळेत न जाणाऱ्या पीढी दर पीढीच्या पूर्वापार चालत आलेल्या अगाध ज्ञानाचा ठेवा आपल्यापर्यंत आपल्या पूर्वजांनी पोचवला हे केवढे महान भाग्य आपले.

(पण आपण भारतीयांनी कधी याचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.)

"दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा" अगदी खरे ठरवलं आपण!

प्यारे१'s picture

5 Oct 2014 - 2:17 am | प्यारे१

जेपी,
सुंदरच थाळी हो!
पुरण बाहेर न आलेली पु. पो. आणि कटाची आमटी व्यवस्थित बनवू शकणारी व्यक्ती आमच्यासाठी सुगरण आहे. :)

रमेश आठवले's picture

5 Oct 2014 - 3:22 am | रमेश आठवले

भाताच्या मुदीवर तुळशीपत्र ठेवले आहे का ?

श्रीरंग_जोशी's picture

5 Oct 2014 - 8:36 am | श्रीरंग_जोशी

जेपी - तोडंलस मित्रा. टांगा पल्टी घोडे फरार. :-) .

तपशीलवार वर्णन आणि सादरीकरण आवडले.

अवांतर - टाइल्सवर मांडलेल्या ताटाचा वरील फटु पाहून पत्रावळींवरील जेवणाची आठवण झाली.

सविता००१'s picture

5 Oct 2014 - 11:26 am | सविता००१

नैवेद्याच ताट असेल ना हे.. म्हणून ठेवलं असेल.

नाव आडनाव's picture

5 Oct 2014 - 11:57 am | नाव आडनाव

तुमचा पहिलाच प्रयत्न आहे, पण चांगलं जमलंय (असं फोटूत वाटतंय). मी कधीच प्रयत्न केला नाही, पण तुमची पाक कॄती वाचून मला पण वाटायला लागलंय मी पण एक प्रयत्न करुन बघायला पाहिजे (आणी जमलं तर शिकायला कंटीन्यू केलं पाहिजे). अर्थात मी एव्हढी अवघड पाक कॄती नाही ट्राय करणार, सुरवातीला थोडी सोपी (कच्चा लिंबू म्ह्णून सूट :) ).

नाव आडनाव, पहिला प्रयत्न नाहीये हा. जुनाच नाद आहे.पुन्हा चालु केलाय.

कवितानागेश's picture

5 Oct 2014 - 3:42 pm | कवितानागेश

पयल्या नंबरची थाळी!! :)

जेपी भाव - टायटलात २ का आहे? १ कुठंय?

थाळी खंग्री झाली आहे.

आदूदादु ,त्याच काय झाल आधी पुर्णब्रम्ह सदरात टाकणार होतो.तिथे आधीच एक शाकाहारी थाळी होती.मनुन नं 2 टाकला.पण पुर्णब्रम्ह सदरात टाकता आल नाही आणी पाकक्रुती विभागात टाकताना नाव बदलायचे राहिले.

आतिवास's picture

5 Oct 2014 - 5:15 pm | आतिवास

'जेपी भाव'; 'आदूदादु' ...शाकाहारी थाळीचा परिणाम झाला की काय दोघांवरही? :-)

या संबोधनांचा उगम खफवर आहे...

दिपक.कुवेत's picture

5 Oct 2014 - 8:42 pm | दिपक.कुवेत

छान जमलेत सगळे प्रकार. पण फोटो एवढ्या दुरुन का काढलाय? अजुन एक पुरणाच्या पोळीबाबत. पुरण सेम असलं तरी काहि ठिकाणी ते कणकेच्या पारीत का भरतात? आय मीन जनरली मैद्याच्या पारीतली पुरणपोळी खाल्ली / बघीतली आहे. तशी ह्या कणकेच्या पारीतलीहि खाल्ली आहे. मस्त खमंग लागते. माझ्या मते कणकेची पारी मैद्या पेक्षा लाटायला सोपी जात असेल. काहि ठिकाणी मैदा + कणीकहि घेतात का?

रेवती's picture

6 Oct 2014 - 5:38 am | रेवती

दिपकराव, मैद्याची पुपो लाटायला सोपी जाते. पुरण बाहेर येत नाही. पण पोळी गार होताहोता तडतडीत होते. तरीही घाईगडबडीच्यावेळी कणकेत चमचाभर मैदा घालून पोळी करता येते. मूळ पद्धतीत कणकेत तेल मीठ घालून नेहमीप्रमाणे भिजवायचॆ. थोड्यावेळाने थोडे पाणी व भरपूर तेल घालून घालायचे तिंबत रहायची..कणकेत सगळे तेल मुरते. मग पुन्हा तेल असे करत तार आली की सगळी कणिक तेलात बुडेल इतक्या तेलात झाकून ठेवायचॆ. अशा कणकेत पुरण भरून तांदळाच्या पिठीवर पोळी लाटायची किंवा नुसत्या तेलावरही लाटता येते. जरा कौशल्याचे काम आहे पण चवीला चांगली लागते. आपापली सोय आहे. चांगली वाईट असे काही म्हणायचे नाही.

भाते's picture

5 Oct 2014 - 8:48 pm | भाते

नक्की तुझा व्यवसाय काय आहे रे बाबा? हा धागा बघितल्यावर लातुरमध्ये (किंवा इतरत्र) तुझे स्वत:चे उपहारगृह आहे किंवा तसे काढायची इच्छा आहे आणि त्यासाठी तु भागीदार/मदतनीस शोधतो आहेस असे वाटते!
अप्रतिम! केवळ अप्रतिम!

मी (झाकण मारून) पोळी करण्याचा प्रयत्न केला तरी कुठल्यातरी देशाचा नकाशा तयार होतो!
नंतर प्रत्येक पदार्थ वाचुन (हा पदार्थ करायला मला जमेल का? याचा विचार करून) सविस्तर प्रतिसाद देईन! :)

जेपी's picture

6 Oct 2014 - 6:08 pm | जेपी

सर्व वाचकांचे आणी प्रतिसादकांचे आभार.
:-)

पारंपारिक पद्धतीतली कणकेच्या पारीत केलेली पुरणपोळी पाहून बरं वाटलं. दसर्‍यादिवशी यथेच्छ पुपो हादडल्याने जळजळ मात्र झाली नाही. ;)

छान आहे थाळी.एकदम मराठवाडी झणका स्टाईल.तुम्ही स्वत: बनवली आहे हे कळाल्यावर साष्टांग नमस्कार.

संजय कथले's picture

16 Oct 2014 - 3:46 pm | संजय कथले

छानच दिसते आहे थाळी,तुमची पाक कॄती वाचून मला पण वाटायला लागलंय मी पण एक प्रयत्न करुन बघायला पाहिजे

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा

जर मी केली थाळी
तर त्यात काय काय असेल?

@करंट टमॅटो सार, फ्लॉवर/गाजर/पनीर(मॅरिनेटेड)बिर्याणी, तीनपदरी चपाती, डाळींब/केळी/ओलंखोबरं=कोशिंबीर, दुधीभोपळा(अंगूरी)खीर, आख्खीहळदमिर्चीफ्राय, ठेचमुळा-तवाफ्राय.. इत्यादी...इत्यादी!

@आणि नंतर मला स्वतःला तयार करता येणारी पानं:-
१)मसाला ड्रायफ्रुट >>> हे हल्ली फेमस झालेल्या चॉकलेट पानाला मात देणारं पान आहे.

२)साधामिठा(गावरान) >>> यात गुलकंद/खुशबू/चटणी असले पदार्थ न वापरताही हे पान खायला लागल्यावर २मिनिटानी अस्सं गोडीत चढतं की क्या केहेने!

३)फूलचंदकेसरीचांदी >>> पारंपारिकच.. पण फक्त फूलचंदचा हल्ली जो घमघमाट करण्यावर भर दिला जातो,ते टाळून त्याचा तोंडात जायका निर्माण करणारं असं हे राजसपान आहे.

४)साधापत्तातंबाखू(गावरान) >>> हे तर शुद्ध मराठी(घाटी) पान आहे. पन १२०/३०० चा जमाना आल्यापासून विस्मरणात गेलेलं आहे. याची मजा अशी..की मनमुराद जेवणानंतर हे पान - लावलं- की किमान अर्धातास आपला मनोदेह फ्लाईंगबलून सारखा हळूहळू..हळूहळू..तरंगत..तरंगत..परब्रम्हाला भेटायला जातो!

५)फूलचंदकेसरीचांदी१६०(तंबाखू) >>> हे मात्र जरा शाहीपान आहे. आणि हल्ली किवाम/तंबाखुच्या (भडकलेल्या :-/ ) भावामुळे बरच महागडंही आहे. पण तरिही पान-लावल्यावर पहिली ५ मिनिटं तोंडात एका बाजुला निपचीत ठेऊन दिलं,आणि नंतर हळूहळू..हळूहळू..चावायला सुरवात केली,की गावठी बाणासारखं जरावेळ जमिनीवर थयथयाट करून एकदम-----------------आकाशात नेऊन सोडतं! अर्थात नंतर लगेचच दहा मिनिटात जमिनीवर पण आणतं. पण तरी त्यातनं उतरायची इच्छा होत नै आपल्याला..( :D ) असं ओढ लावणारं हे पान आहे.
============================
फक्स्त ह्यो थाळी/पान योग जमवून आणायला मला परत एकदा "घरचे स्वयंपाकघर" या विभागात किमान १ महिना कंपल्सरी शिरावं लागेल. कारण तिथे माझा वियोग होऊन साधारण १० वर्ष होत आलियेत.
============================

>>डाळींब/केळी/ओलंखोबरं

हे बरं लागतं??

जेपी's picture

16 Oct 2014 - 5:27 pm | जेपी

गुर्जी पान म्हणाल तर,
तिन पानी, कात चुना लावुन आणी कच्ची पक्की सुपारी गावरान तंबाकु ,थोडास 300 चा शिडकावा आणी आणखीन चुना अलगसे. ब्रम्हानंदी टाळी.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा

@तिन पानी, कात चुना लावुन आणी कच्ची पक्की सुपारी गावरान तंबाकु ,थोडास 300 चा शिडकावा आणी आणखीन चुना अलगसे. ब्रम्हानंदी टाळी.>>> धण्यवाद्स.... लै जंबारडिंग वाटतया ऐकून..आज रातच्याला ह्येच पाण ट्राय करनेत येइल.

व्यसनांबद्दलच्या किती त्या रम्य चर्चा

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 5:47 pm | अत्रुप्त आत्मा

@व्यसनांबद्दलच्या >>> आणि आपल्याला खादाडीच्या रम्य चर्चांच व्यसन आहे..ते विसरला हा आगोबा! :-/

थाळी कल्पनेबद्दल अक्षरंही न काढलेल्या आगोबाचा टीव्र णिसेध...! :-/ llllllllllllllllllluuuuuuuuuu :-/

थाळीचा प्रतिसाद एक आणि पानाचे पाचपाच त्यामुळे =))

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा

@थाळीचा प्रतिसाद एक आणि पानाचे पाचपाच त्यामुळे >>> :-/ हेच्च..हेच्च..हाच तो निरर्र्थकपणा! :-/ थाळीतले पदार्थ किती आहेत??? हे मोजायची बुद्धी का बरं नै झाली? :-/
.
.
.
समांतरः- अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे?

प्रचेतस's picture

16 Oct 2014 - 5:59 pm | प्रचेतस

अहो पण त्या पाच प्रकारच्या पानात किती विविध पदार्थ भरलेत तुम्हीच बघा.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 6:03 pm | अत्रुप्त आत्मा

@अजुन तरी कळेल कि नै कोण जाणे? >>> झालं की नै खरं!? =))

@ पाच प्रकारच्या पानात किती विविध पदार्थ भरलेत तुम्हीच बघा.>>> :-/ आपण ऑब्जेकटिव्ह बोल्लो की जाणूनबजुन सबजेकटिव्ह होणार हा आगोबा! :-/

प्रचेतस's picture

16 Oct 2014 - 6:23 pm | प्रचेतस

=))

जेपी's picture

16 Oct 2014 - 5:47 pm | जेपी

व्यसन नाही वल्लीदा.
आस जड जेवण केल्यावर पान तो बनता है.

पान ठीके ना, पण तंबाखूचंच काय म्हणून?

वल्लीदा गावरान तंबाखुचे व्यसन लागत नाही.
बाकी पानामुळे पन्नाशी अलीकडे अडकलेला धागा पन्नाशी पलीकडे गेला.
=))

प्रचेतस's picture

16 Oct 2014 - 6:00 pm | प्रचेतस

गावरान म्हणजे काय ओ नेमका?

उडन खटोला's picture

3 Jan 2015 - 7:17 pm | उडन खटोला

कल्पना करा बरं... की तुम्ही सहकुटुंब एखाद्या हॉटेलात गेला आहात... आणि ऑर्डर केली आहे की आम्हाला सुरुवातीला दोन सोलकढी, एक मुगाचे कळण - दोघांत एक, सोबत एक प्लेट कोथिंबीर वडी, एक प्लेट अळूवडी द्या. नंतर जेवणासाठी एक प्लेट अळूची पातळ भाजी, एक प्लेट डाळींब्यांची उसळ, चार घडीच्या पोळ्या, मसाले भात, दोन बाजरीच्या भाकर्‍या आणि एक वांग्याचे भरीत द्या. सर्वात शेवटी आंबा पियुष व रस शेवई दोघांमध्ये चार द्या !
तिथला स्टिवर्ड तुम्हाला सुचवतोय की कधीतरी त्यांच्याकडच्या कोळाचे पोहे, केळ्याची तिखटगोड भजी, शहाळ्याची भाजी, मुगाची सावजी उसळ, कुळथाचं पिठलं, पाकातल्या पुर्‍या, रताळ्याचा कीस अशा 'मेतकूट खास' पदार्थांचाही तुम्ही आस्वाद घ्यावा...
तुम्ही म्हणाल, काय राव..... आज भंकस करायला दुसरं कोणी भेटलं नाही का?
आहो... ही आता कल्पनेतली गोष्ट नाही. ठाण्यात सुरु झाले आहे. मराठी आहारसंस्कृतीचे खाद्यपीठ ! कोकण, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ, नाशिक अशा ठिकठिकाणचे पारंपरिक खाद्यपदार्थ आता मिळतील ... ‘मेतकूट’™ - Culinary Heritage of Maharashtra मध्ये.
नवीन वर्षात १ जानेवारी रोजी शुभारंभ होत असलेल्या या नवीन खानपानगृहास आवर्जून सहकुटुंब, सहपरिवार भेट द्या. आपल्या सोसायटीमधील, कार्यालयातील खन्ना, गिडवानी, अय्यर, चटर्जी यांनाही घेऊन जा. त्यांनाही कळूदे अस्सल चव महाराष्ट्राची !
पत्ता - १,२, वाटीका सोसायटी, घंटाळी देवी पथ, नौपाडा, ठाणे (प) संपर्क - ०२२२५४१०८२१
किरण भिडे यांनी हे हाॅटेल सुरु केलं आहे. ही कल्पना आवडल्यास इतरांकडे हे मेसेज पाठवा. आवर्जून 'मेतकूट'ला भेट द्या.
C/P-Suruchi Gurjar

हेमंत लाटकर's picture

5 Sep 2015 - 9:30 am | हेमंत लाटकर

ही शाकाहरी थाळी पाहून येणार्या महालक्ष्मीच्या जेवणाची आठवण झाली.