गाभा:
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत.
ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते.
प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.
प्रतिक्रिया
3 Sep 2015 - 3:32 pm | हेमंत लाटकर
पुर्ण अंथरूणाला खिळलेल्या लोकांचे खुप करावे लागते हे मान्य. पण धडधाकट आपले काम आपण करू शकणार्या आई-वडिलांनी मुलांकडे न राहता वृद्धाश्रमात का जावे.
तेथे समवयस्क असतात गप्पा होतात करमणुक होते ही अतिशयोक्ती आहे. मी एक लेख वाचला त्यातील वृद्ध पती-पत्नी मुलगा परदेशी राहत असल्यामुळे वृद्धाश्रमात जातात. पण तेथे वृद्धांचे वयोमानानुसार होणारे मृत्यु बघून त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडते. मग त्यांनी आपल्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला.
3 Sep 2015 - 6:38 pm | बहुगुणी
या धाग्यातून निदान "वृद्ध होऊ घातलेल्या माझ्यासाठी" तरी काही नि:ष्पन्न व्हावं म्हणून आंतर्जालावर शोध घेतला तर Categorization of Old Age Homes ही उपयुक्त माहिती मिळाली. अशा संस्थांचे लोकांनी केलेले परीक्षण (reviews) करणारं एखादं संस्थळ असेल तर सूचवा (नसेल तर ते तयार करणं ही काळाची गरज आणि उपयुक्त [and not to overlook, profitable] ठरू शकेल!)
3 Sep 2015 - 6:59 pm | अनिवासि
ह्या विषयावर लिहलॆले एक उत्तम पुस्तक:
अमेरिकेत जन्मलेल्या व शिकलेल्या डॉक्टर अतुल गवांडे ह्यांचे being mortal.
flipcart वर मिळु शकते.
माझी प्रत मित्र घेऊन गेला आहे म्हणुन परिक्षण लिहू शकत नाही. वरील अनेक प्रश्नाची उत्तरे त्यात आहेत. आणि त्यातील चर्चा फक्त अमेरिकेला उद्देशून नाही..
4 Sep 2015 - 12:57 am | आस्तिक शिरोमणि
काळाचा न्याय कुणाला बरे लागू होत नाही? बर्या वाइट दोन्ही बाजुनी..सांगा बरे?
4 Sep 2015 - 2:05 pm | तुडतुडी
आपण अनाहितांचा वृद्धाश्रम काढूया का? ;)
अनाहिता? ते काय आहे ?
4 Sep 2015 - 2:18 pm | खटपट्या
अनाहीतांनो ऐकताय ना?
4 Sep 2015 - 8:09 pm | पैसा
सांगायला हवंच का? त्या तशा ओळखीच्या वाटत आहेत खरे तर!
6 Sep 2015 - 7:08 pm | शि बि आय
लाटकर साहेब "वृद्धाश्रम" हा मुद्दा आपण कसा घेतो त्या दृष्टिकोनावर सारं अवलंबून आहे… वृद्धाश्रम हि आता काळाची गरज बनत आहेत.
काही ठिकाणी वृद्धांची काळजी घ्यायला कोणी नसते तेव्हा अशा ठिकाणी केअर टेकर होम ची गरज भासतेच. आता काही जण त्याला वृद्धाश्रम म्हणतात पण जर आपला दृष्टीकोन सुधारला तर त्यातून होणारे फायदेही दिसू लागतील. खर तर आत्ता ह्या संकल्पनेचा बाऊ होतोय पण काही वर्षातच डे केअर सेंटर सारखी त्याचीही गरज भासणार आहे.
अजून २५ ते ३० वर्षांनी जीवन अजून धकाधकीचे झाल्यावर आत्ता जेवढे लक्ष घरी आणि वैयक्तिक गोष्टीकडे देता येत आहे तेवढे देणेही जमणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही पुढल्या पिढीकडून काय अपेक्षा करणार? त्यापेक्षा आर्थिक बाजू भक्कम करत स्वतःची पुढची वाटचालही आपणच ठरवावी हे उत्तम.
तेव्हा आत्ताच्या तरुण पिढीने हात-पाय हलत आहेत तोपर्यंत आपल्यासाठीचे केअर टेकर होम निवाडून ठेवावे.
6 Sep 2015 - 7:14 pm | शि बि आय
अनाहितांच्या वृद्धाश्रमास आमचेही अनुमोदन....