काही काळापूर्वी वि.प्र. साहेबांच्या एका धाग्यात प्रतीसाद देताना
मी लिहिले होते की "वीज वाचवण्या साठी कॅपॅसिटरचा वापर करा".
ह्यावर आनंदजींनी व्यंनी. पाठवून स्पष्टीकरण दिले की कॅपॅसिटरमुळे वीज कंपनीची वीज वाचते. ग्राहकाची नव्हे.
ग्राहकाने कॅपॅसिटर लावला की तो, वीज कं. कडून अतिरिक्त वीज खेचत नाही. ही वाचलेली वीज, कंपनी इतरत्र पूरवठा करून,
भार नियमन आटोक्यात आणू शकते.
आताच त्यांनी आणखी एक व्यनी पाठवला व दै. सकाळच्या १०.१२.२००८ आवृत्तीतील खालील बातमी कडे लक्ष वेधले.
http://www.esakal.com/esakal/12102008/SakalvisheshBADC7B3A40.htm
वि.प्रं.च्या त्याच धाग्यात चतुरंग साहेबांनी कॅपॅसिटरच्या वापरा संबंधी लेकलिहिण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
भारनियमन हा महाराष्ट्रातला एक ज्वलंत विषय.
मी विनंती करतो की मि.पा. वरील जाणकारांनी ह्या विषयावर अधीक प्रकाश टाकावा.
प्रतिक्रिया
12 Dec 2008 - 11:15 pm | विसोबा खेचर
अभ्यंकरसाहेब,
कपॅसिटर म्हणजे काय याबद्दल मला कल्पना नाही.
भारनियमनाचा थोडा कमी त्रास व्हावा, मुंबईच्या उकाड्यात निदान एखादा पंखा तरी चालू रहावा या उद्देशाने आमच्या घरी इन्व्हर्टर बसवला आहे. त्याच्या क्षमतेनुसार दोन पंखे व दोन ट्यूबलाईटस् तीन ते चार तास जळू शकतात..
आपण उल्लेख केलेला कपॅसिटर आणि इन्व्हर्टर ही एकच वस्तु आहे का?
आपला,
(आडनाव बंधु) तात्या.
12 Dec 2008 - 11:22 pm | सखाराम_गटणे™
आपण उल्लेख केलेला कपॅसिटर आणि इन्व्हर्टर ही एकच वस्तु आहे का?
नाही,
15 Dec 2008 - 1:55 pm | अप्पासाहेब
इन्व्हर्टर व कपॅसिटर पुर्णतः वेगळे आहेत.
इन्व्हर्टर हे एक ईलेक्ट्रोनीक सर्कीट आहे, त्याचे एकमात्र काम म्हणजे ब्याट्रीतुन येणा-या (६ / १२/ २४ ) डि.सी. व्होल्टेज चे २३० व्होल्ट ए.सी.म्हणजेच आपल्या घरात येणारा विज पुरवठ्याप्रमाणेच व्होल्टेज पातळी मध्ये रुपांतर करणे. ह्या इन्व्हर्टर च्या जोडीला ब्याट्री खतम झाल्यावर ती पुन्हा चार्ज करण्यासाठी एक लहानसे ईलेक्ट्रोनीक सर्कीट लागतेच त्याला ब्याट्री चार्जर म्हणतात.
इन्व्हर्टर + ब्याट्री + ब्याट्री चार्जर मिळुन एक पर्यायी विजपुरवठा सिस्टम तयार होते. पण आपल्या घरात येणारा विज पुरवठा खंडीत झाल्यावर हा पर्यायी विजपुरवठा तत्काळ चालु होणार नाही , तर तो प्रत्येकवेळी आपल्याला चालु करावा लागेल. म्हणुन त्याला ऑफलाईन सिस्टीम म्हणतात,
मुख्य विज पुरवठा खंडीत झाल्याबरोबर पर्यायी विजपुरवठा तत्काळ व आपोआप चालु होण्यासाठी इन्व्हर्टर + ब्याट्री + ब्याट्री चार्जर सोबतच 'मेन्स फेल्युअर सेन्सींग सर्कीट' जोडावे लागेल. हे 'मेन्स फेल्युअर सेन्सींग सर्कीट ' मुख्य विज पुरवठ्याचे सतत परिक्षण करते व मुख्य विज पुरवठा खंडीत होताक्षणी पर्यायी विजपुरवठा तत्काळ व आपोआप चालु करते .
म्हणजेच ' इन्व्हर्टर + ब्याट्री + ब्याट्री चार्जर + मेन्स फेल्युअर सेन्सींग सर्कीट' मिळुन एक संपुर्ण 'आपतकालीन' पर्यायी विज पुरवठा सिस्टीम बनते. त्याला ऑनलाईन सिस्टीम म्हणतात,
असा 'आपतकालीन' पर्यायी विज पुरवठा ' किती वेळ पुरेल हे खालील गोष्टींवर अवलंबुन असते.
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
13 Dec 2008 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ट्यूबलाईट्सच्या जागी जर सी.एफ.एल. किंवा एल.ई.डी.वाले दिवे लावलेत तरीही बरीच वीज वाचेल.
शिवाय (उपाय खर्चिक आहे) पण सी.आर.टी.वाल्या मॉनिटर आणि टी.व्ही.च्या जागी शक्य असल्यास एल.सी.डी. किंवा प्लाझ्मा स्क्रीन्स वापरले तर डोळ्याला त्रास कमी होईल आणि वीजही वाचेल.
15 Dec 2008 - 12:41 am | संजय अभ्यंकर
ईन्वर्टर मध्ये विज साठवता येते. जी वीज पुरवठा खंडीत झाल्यावर आपणास वापरता येते. परंतू ईन्वर्टर मुळे प्रत्यक्ष विजेची बचत होत नाही.
कॅपॅसिटर वीजेची बचत करतो (वीज कंपनीची बचत).
परंतू ग्राहकाने कॅपॅसिटर लाऊन वीज कं. ची वीज वाचवली म्हणून, जर वीज कं. त्या ग्राहकास काहीच मोबदला देत नसेल, तर कोणीच कॅपॅसिटर लावणार नाही.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
15 Dec 2008 - 1:27 am | विसोबा खेचर
खुलाश्याबद्दल धन्यवाद शेठ..
तात्या.
12 Dec 2008 - 11:42 pm | एक
इलेक्ट्रॉनिक इंजिनियरींग ला ४ वर्ष खपलो होतो त्याला स्मरून सांगतो. तसा खूप गहन विषय आहे (१ वर्षात २ विषय होते या संबंधी).. प्रयत्न करतो.
आपण विजेवर चालणार्या ज्या वस्तू वापरतो त्या बहुतेक "ईंडक्टीव्ह" लोड असलेल्या असतात. ढोबळपणे ईंडक्टीव्ह म्हणजे ज्या वस्तूत कॉईल असते असं लोड उ.दा मोटर (म्हणजे फॅन, मिक्सर, इ.) किंवा ट्रान्सफॉर्मर (म्हणजे सगळ्याच वस्तू आल्या). पूर्ण घराचा विचार केला तर घरातलं टोटल लोड हे रेझिस्टिव्ह (म्हणजे लाईट बल्ब) आणि इंडक्टीव्ह या मधे विभागलं जातं. त्यात ईंडक्टीव्ह लोडचं प्रमाण जास्त असतं.
हे लोड चालवायला पॉवर जास्त लागते तसचं यातून जी "रिजनरेटीव्ह पॉवर" तयार होते ती वाया जाते. ही पॉवर, कपॅसिटर द्वारे परत ईडक्टीव्ह लोड मधे टाकता येते. त्यामुळे विज कंपनी कडून कमी पॉवर ओढली जाते..
ईंडक्टीव्ह लोड चा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे फेज शिफ्टींग ते पण कॅपऍसिटीव्ह लोड ने बॅलन्स करता येतं.
१० वर्ष शिकून झाली आता त्या विषयाचा संबंध राहिला नाही त्यामुळे चुका झाल्या असतील आणि मला सोपं करून पण सांगता आलं नसेल. क्षमस्व.
13 Dec 2008 - 3:46 am | नाटक्या
अगदी शास्त्रशुद्ध माहीती दिली आहेत. माझ्या पहिल्या नोकरी मध्ये मी याच प्रकारच्या उपकरणावर संशोधन केले होते. त्याला आता २० वर्षे झालीत. पण अजुनही ईंडक्टीव्ह आणि कॅपऍसिटीव्ह लोड आठवतो.
- नाटक्या
13 Dec 2008 - 5:29 am | एक
इलेक्ट्रॉनिक्स च्या काही कन्सेप्टस आठवल्या..
ते z = R + jwL + 1/jwC आणि स्टार-डेल्टा नेटवर्क्स अजून आठवत होती.
BTW, free wheeling diod सुद्धा वापरतात ना पॉवर सर्कीटस मधे?
12 Dec 2008 - 11:46 pm | रामदास
टाकीत पाणी साठवतो आणि अडचणीला वापरतो.इन्व्हर्टर हा तसाच प्रकार विज साठवण्यासाठी आहे.
कपॅसीटरमुळे विज काटकसरीनी वापरता येते आणि उर्जेचा अपव्यय टळतो.काही वर्षापूर्वी मराविमने कपॅसीटरच्या उपयोगावर बंदी घातली होती.आता तसे नाही.बेस्टने मात्र कायम कपॅसीटरच्या वापराचा पाठपुरावा केला आहे.मला वाटते की एका सोसायटीला एक कपॅसीटर पुरावा.
अवांतरः या महीन्यात आमच्या सोसायटीत हा बदल आम्ही करणार आहोत.
13 Dec 2008 - 3:57 am | चंबा मुतनाळ
ईथे तोक्योमधे, रस्त्यावरच्या प्रत्येक विजेच्या खांबावर एकेक कपॅसिटर बसवलेला असतो. त्यामुळे घरात विज येण्याआधीच पॉवर फॅक्टर ०.९५ ते ०.९८ पर्यंत आणलेला असतो. त्यामुळे विजेची बचत होते ह्याबद्दल शंकाच नाही.
13 Dec 2008 - 10:42 am | आनंद
संजय जी धन्यवाद!! महत्वाच्या विषया वर धागा सुरु केल्या बद्द्ल
कॅपॅसिटर लावल्याने बीलात फरक पडणार नाही .
पण कॅपॅसिटर लावल्यामुळे विज कंपनी कडून जी अतिरिक्त वीज आपण ओढतो ती कमी होईल.
हि दोन्हि विधाने परस्पर विरोधी भासतात
ही दोनीही विधाने परस्पर विरोधी भासत असली तरी ती तशी नाहीत, (दोनीही बरोबर आहेत)
कारण वॅट मिटर जे की true power मोजते, power in kwh= v x i x cos phi
इथे (inductive load )cos phi एक पे़क्शा कमी असल्याने मोजलेली power ही नेहमी apperant power (kva) कमीच असते. म्हणजे cos phi जीतका कमी तेवढे वीज मंड्ळाचे नुकसान जास्ती.(म्हणुनच पॉवर फॅक्टर (cos phi) कमी आढळल्यास पेनाल्टी लावते.)
कॅपॅसिटर लावल्यामुळे आपण पॉवर फॅक्टर एक च्या जवळ नेतो. व एपिरंट करंट कमी करतो त्यामुळे गुणाकार (true power )तेवढाच राहतो(वीज बील तेवढे रहाते).पण करंट कमी झाल्यामुळे वीज मंडळाची क्षमता वाढते व त्यांचे नुकसान कमी होते. ग्राहकाच्या उपकरणा मधे कमी करंट गेल्या मुळे ओवर हीटींग होत नाही उपकरणाचे आयुश्य वाढ्ते हा ग्राहकाच फायदा.
हे नीट समजुन दिले जात नाही. लोकाना वाट्ते की कॅपॅसिटर लावल्यामुळे त्यांचे वीज बील कमी येइल पण तसे होत नसल्यामुळे कॅपॅसिटर लावण्या बाबतीत लोक उदासिन असतात.
13 Dec 2008 - 10:51 am | अवलिया
कपॅसिटर हा मोठा गहन विषय आहे.
वायरमन कपॅसिटर लावा लावा म्हणुन शेतक-यांच्या मागे लागतात. पण कपॅसिटर जे दिले जातात ते सेटलमेंट मधले असतात. लगेच जळतात. एकाने लावुन उपयोग नाही. डीपी बोंब मारते. डिपीचे पैसे शेतकरी भरतो. वायरमन हुशार. कोटेशन भरुन घेतात मालासहित. शेतक-याला पण माल आणायला लावतात. दोन्हीकडुन खातात.
शेतकरी हुशार. साधी मोटार रिवायंडींग करुन पाण्यात टाकतो. ५ एचपीची १२ एचपी. साहेब येतो. मोटार काढ बाहेर. काढली. शिक्का ५ एचपी, ठिक म्हणतो. परत सोडतो पाण्यात. कोंबडी खावुन निघुन जातो. डीपी परत जळते.
आकडे बाजारात मिळतात. एरिया सांगितला की त्या एरियातील वायरीच्या मापाचा आकडा मिळतो. कोणी दिले माप? आतलेच फुटीर.
लई हुशार म्हणे मंडळ. थ्री फेज काढून शिंगल फेज केली. काय फरक पडतो. सर्किट तयार आहे. कपॅसिटर परत वापरले. सिंगल फेज तु थ्री फेज. पाचशे रुपयात. मोटार फिरते गरागरा. परत वरजिनल थ्रि फेज वर लावायची नाही येवढे भान ठेवायचे. बास. सरकार खुश सिंगल फेज करुन वीज वाचली. शेतकरी खुश आहे त्यात मोटार फिरली.
जै हिंद जै म्हाराष्ट्र
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
15 Dec 2008 - 3:33 pm | आनंद
मी वेल्डींग मशीन व स्पेशल परपझ मशीनचे उत्पादन करत असल्या मुळे कपॅसिटर चा आणि माझा नेहमी संबध येतो.
आमच्या मशीन मधे तर सुरवती पासुनच आम्ही पॉवर फॅक्टर इंप्रुवमेंट कपॅसिटर
लावत होतोच ,
पण एकदा वेगळ्याच समस्येला सामोर जाव लागल होत, त्याच अस होत की एका ऑद्योगीक विभागातील एका भागात वारंवार मशीन लो वोल्टेज आल्या मुळे बंद पडत होती.तेंव्हा मशीन बंद ठेवुन योग्य वोल्टेज येण्याची वाट बघण्या शिवाय ग्राहक काही करु शकत नव्ह्ता, तेव्हां त्या कंपनी ला व तीच्या आजुबाजुच्या कंपन्यात जाउन त्यांचा पॉवर फॅक्टर मोजुन योग्य कपॅसिटर बसवुन घेण्याची शिफारस केली , जेंव्हा सगळ्या कंपन्यानी कपॅसिटर बसवुन घेतले तेंव्हा वोल्टेज मधे सुधारणा झाली ( वाढले.) व त्यांची समस्या दुर झाली.
23 Dec 2008 - 2:39 pm | अमोल नागपूरकर
capacitor मुळे तुमचे kvah कमी होतात तर kwh वर काही परिणाम होत नाही. capacitor हा kvar मध्ये मोजतात.
capacitor चे दोन फायदे आहेत.
१) पी ए फ हा १ च्या जवळ्पास ठेवणे. (हा प्रामुख्याने वीज कम्पन्यान्चा फायद. ह्याने त्यान्च्या सिस्टम वरील ताण कमी होतो.)
२) व्होल्टेज लेव्हल मेन्टेन करणे. (ह्याने तुमची सर्व उपकरणे व्यवस्थीत काम करतात. तसेच त्यान्चे आयुष्य वाढते.)
म रा वि म ने काही विशिष्ट लोड पेक्षा (५ एच पी बहुधा)जास्त लोड साठि capacitor अनिवार्य केले आहे. आपले घरगुती लोड ह्या पेक्ष खूप कमी असते. जवळ्पास सर्वच थ्री फेज औद्योगिक तसेच शेती पम्प ग्राहकान्चे लोड ह्य मर्यादेपेक्षा जास्त असते. तसेच त्यान्चे लोड इन्डक्टिव असते. छोट्या औद्योगिक तसेच शेती पम्प ग्राहकान्चे फक्त साधे kwh meter असते . जे power factor मोजत नाही. तसेच त्याना क्व्ह नुसर बील आक म्हणुन त्यान्नि capacitor न बसविल्यस वीज बिलात दन्ड आकारल्या जातो.
जे मोठे औद्योगिक तसेच शेती पम्प ग्राहक असतात त्यान्च्याकडे Trivector मीटर असते. ज्यात पी ए फ मोजल्या जातो. तो काहि विशि ष्ट मर्यादेपेक्षा कमी आढळ्ल्यास वीज बिलात दन्ड आकारल्या जातो. तसेच काही वीज कम्पन्या kva नुसार वीज बिल आकारतात त्यात आपोआपच capacitorचा प्रभाव येईल. त्यान्नी capacitor बसवल्यास बिल तर कमी येइलच पण त्यान्ना सेवा सुदधा चांगली मिळेल.
तुम्च्या लोड नुसार गणित करून किति क्षमतेचा capacitor बसवावा हे ठरवावे लागते. जास्त क्षमतेच्या capacitor मुळे ओवर व्होल्टेजचा प्रश्न निर्माण होउन तुमचे उपकरण बिघदू शकते.
समजा तुमचे लोड a kw आहे. तुमचा power factor हा cos phi1 आहे आणि तो तुम्हाला cos phi2 पर्यन्त आणायचा आहे. तर मग तुम्हाला b kvar क्षमतेचा capacitor लागेल जिथे
b= a X (tan (phi1) -tan(phi2))
28 Dec 2008 - 2:24 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
29 Dec 2008 - 6:24 pm | नितिन थत्ते
अगोदर सर्वानी कप्यासिटर लावून म रा वि म चा फायदा होईल असे सान्गितले आहे.
ए़कूण सामाजिक फायद्यासाटी हे करायला काही हरकत नाही.
तसेच इन्वर्टर सुद्धा लावू नये. यामध्ये एकदा ब्याटरी चार्ज करताना ३० टक्के ऊर्जा वाया जाते आणि वापरताना पुन्हा ३० टक्के वाया जाते. म्हणून जेथे २ ते ३ तास भारनियमन असते तेथील लोकानी इन्वर्टर लावू नये. तसेच इन्वर्टर वर ए सी / फ्रीज वापरू नये.
नितिन