मित्रांनो ,
आपल्या या आवडत्या संकेतस्थळावर होणार्या हल्ल्याबद्दल, त्यावरील उपाययोजनांबद्दल , सर्व्हरच्या वेगाबद्दल , तो वाढवण्याबद्दल , वर्गणीबद्दल आपण सर्व इथे आपापले विचार मांडतच असतो. हा धागाही या संकेतस्थळाबद्दलचाच आहे.
अलिकडच्या काळात एक संपादक म्हणून आणि एक मित्र म्हणून मला काही व्य नी आले की , अवांतर प्रतिसाद , थट्टा मस्करी वगैरेचे प्रमाण खूप वाढले आहे आणि मुख्य म्हणजे, जिथे एखाद्याने एखादे मनोगत/चर्चाप्रस्ताव मांडला आहे तिथेही हेच घडल्याचे प्रकारही घडले आहेत. या संदर्भात संपादक मंडळाची काही जबाबदारी आहे की नाही ? या अर्थाचा प्रश्न प्रश्नकर्त्याने केला आहे.
मिपाच्या कलमांचा कुणी सरळसरळ भंग केला , प्रक्षोभक लिखाण , शिवीगाळ , वैयक्तिक शेरेबाजी, वगैरे केली तर ते निपटून टाकणे हे संपादक मंडळाचे काम आहे आणि मंडळातील प्रत्येकजण जमेल तितपत ते करतोच. मात्र , या संकेतस्थळावर सौहार्दाचे , एकंदर समंजसपणाचे वातावरण रहाणे , विनोद-मस्करी आणि विचारांची देवाणघेवाण या सार्याचा समतोल राखणे ही जबाबदारी अंतिमतः सगळ्या सभासदांचीच आहे. कुठल्या गोष्टी खरडवहीत लिहायच्या, कुठल्या ख फ वर लिहायच्या , आणि कुठल्या धाग्याचे उद्दिष्ट काय याचे भान राखणे आवश्यक आहे. असे न केल्याने कुठल्या नियमाचा भंग तर होत नाही , पण आपल्याच संकेतस्थळाचे आपण (नकळत) नुकसान करतो.
इथे विनोद, थट्टा , मस्करी करूच नये असे मी बिलकुल म्हणत नाही आहे. पण या नादात आपण आपल्याच स्थळाच्या नावाला , प्रसिद्धीला बाध तर आणत नाही ना ? याचे भान राखणे आवश्यक आहे. कुणाही एका व्यक्तीला उद्देशूने हे आवाहन केलेले नाही, थोडेसे "लाऊड थिंकिन्ग" केल्यासारखे लिहिले आहे याची नोंद घ्यावी.
प्रतिक्रिया
12 Dec 2008 - 9:01 pm | विनायक पाचलग
अहो माझ्या मनातले बोललात्.ज्याने कुणी तुम्हाला हे निरोप धाडले त्याचे आभार.बदलाची अपेक्षा
12 Dec 2008 - 9:03 pm | घाटावरचे भट
की बदल्याची???
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
13 Dec 2008 - 12:11 am | टारझन
तु . के व ळ . अ प्र ति म . आ हे स . मि त्रा
=)) =)) =))
तुझ्या बारिक नजरेला आणि मनकवडेपणाला आपला सलाम
- घाटावरचा बाटा
13 Dec 2008 - 9:19 pm | शलाका
इथले वाहिदाजी, अदितीजी आणि माझे प्रतिसाद कुठे गेले?? किती दिवस अशी दाबादाबी करणार आहात? संपादकाच्या बुरख्याखाली असला भ्याडपणा का करता?
13 Dec 2008 - 10:54 pm | वेताळ
शब्द वापरताना जपुन वापरा.अर्थ चुकीचा होतो.
वेताळ
14 Dec 2008 - 12:01 am | विसोबा खेचर
शब्द वापरताना जपुन वापरा.अर्थ चुकीचा होतो.
:)
तात्या.
14 Dec 2008 - 11:48 am | अवलिया
सहमत
पण तात्या असे करणार नाही याची खात्री आहे.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
12 Dec 2008 - 9:09 pm | चतुरंग
मलाही अशाच प्रकारचे व्यनि आलेले आहेत आणि मी ह्याविषयी धागा उघडणार तेवढ्यात मुक्तरावांचा धागा दिसला!
सध्या कामाच्या प्रचंड व्यापामुळे मला पूर्वीइतके मिपावर येणे जमत नाहीये. येणार्या लिखाणाची आणि प्रतिसादाची संख्याही प्रचंड असल्याने सर्व धागे डोळ्याखालून घालणेही अशक्य होऊन बसते. कोणा सदस्यांना अशा प्रकारचे अवांतर/अश्लील/द्व्यर्थी लिखाण आढळले तर कृपया संपादक मंडळातील जो/जे सदस्य त्यावेळी ऑनलाईन असतील त्यांच्या नजरेस आणून द्याव्यात त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
मिसळपाव हे एक समर्थ आणि खिलाडूवृत्तीचे संस्थळ असावे ह्याबद्दल आपण सर्वांनी प्रयत्नशील रहायलाच हवे.
एक सदस्य आणि संपादक म्हणून मी माझे काम जास्तितजास्त प्रामाणिक कसे राहील ह्याचाच विचार करतो आणि ह्यापुढेही करीन.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद!
चतुरंग
12 Dec 2008 - 9:28 pm | प्राजु
मलाही असे व्य. नि. आले आहेत. आजकाल मिपावरच्या ट्रॅफिकमुळे प्रत्येक धागा उघडून प्रत्येक प्रतिक्रिया वाचणे जमत नाही. पण आजकाल आवांतर प्रतिक्रिया येणे, सह्यांच्या नकला करणे खूप चालू आहे. सभासदांच्या नावाची टवाळी करत रहाणे हे ही चालले आहे....या सर्वाला आळा बसण्यासाठी प्रत्येक सभासदाने सहकार्य करणे गरजेचे आहे. हलकीशी थट्टा मस्करी ठिक आहे पण मस्करीची जेव्हा कुस्करी होते तेव्हा विचार करावा लागतो. वैयक्तिक ताशेरे ओढणे हे ही चुकीचे आहे. अशा काही कारणांमुळे काही चांगल्या लेखांचे धागे उडवावे लागतात कारण . एक संपादक म्हणून मी माझे काम जास्तीत जास्त चोख होईल याची खात्री देते.
आपण सगळेच या मिपाचे खव्वये आहोत हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. एखादा मीठाचा खडा लागला तर चालून जातो पण त्यात जेव्हा खर खर येऊ लागते तेव्हा ते नक्कीच चांगलं लक्षण नसतं.
सर्व सभासदसहकार्य करावे ही विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Dec 2008 - 9:31 pm | शक्तिमान
याचे एक कारण मिपा वर वाढलेली लोकसंख्या आहे.
"खूप" म्हणजे नक्की किती ते स्पष्ट होत नाही. विकीपिडीयाच्या भाषेत सांगायचे तर "Avoid peacock terms".
बाकी मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.
12 Dec 2008 - 9:34 pm | मुक्तसुनीत
"खूप" म्हणजे नक्की किती ते स्पष्ट होत नाही. विकीपिडीयाच्या भाषेत सांगायचे तर "Avoid peacock terms".
हम्म. स्पष्ट होत नाही खरे. मी माझ्या प्रश्नकर्त्यांना विचारतो आणि काही कळले तर सांगतो. "Avoid peacock terms" हा संदेश तेही वाचत आहेतच.
12 Dec 2008 - 9:50 pm | छोटा डॉन
प्रश्नकर्त्याला काय वाटते ते माहित नाही पण माझे मत सांगतो ना ...
तसे पहायला गेले तर "खुप म्हणजे नक्की किती" ह्याचा अंदाज घेणे फार सोपे आहे.
उदा १ : समजा तुम्ही मित्रांबरोबर एखादा चावट, व्दिअर्थी संवाद असलेला चित्रपट ( जास्त पुढे जात नाही पण सध्या बॉलीवुडमधले काही चित्रपट चालतील ) पहात आहात तर काही वाटणार नाही कारण सध्या प्रेक्षक एका वयोगटातला, एका विचाराचा, एका मानसीक पातळीवर पोहचलेला असा आहे. त्यामुळे हे चालुन जाते. म्हणजे काय तर हे "खुप" ह्या व्याख्येत मोडत नाही.
पण समजा हेच चित्रपट जर तुम्हाला वयावे व मानाने जेष्ठ अशा काका, काकु, मामा, गुरुजीकइंवा घरातील लहान मुले ह्यांच्याबरोबर पाहन्याची वेळ आली तर तुमची मान शरमेने खाली जाईल की नाही ?
का असे ?
चित्रपट तर तोच आहे मग "खुप जास्त" का झाले ?
ह्याचे कारण आहे प्रेक्षकवर्गाचे वय, ज्ञान, तुम्हाला त्यांच्याविषयी वाटणारा आदर, त्यांचा दरारा वगैरे वगैरे ....
बघा म्हणजे एखादी गोष्ट एका ठिकाणी "खुप जास्त" मध्ये मोडत नाही पण दुसर्या ठिकाणी ती मात्र काटेकोरपणे "खुप जास्त" मध्येच तोलली पाहिजे.
पटते आहे का ?
हिच गोष्ट "संकेतस्थळांबाबत" का नाही होऊ शकत ?
इथे सुद्धा तो समजुतदारपणा, आचारसंहिता, सामंजसपणा नको का ?
मला वाटते आहे की माझे म्हणणे योग्य शब्दात मांडले आहे. बाकी "प्रश्नकर्त्याला" काय वाटते ह्याच्याशी मला देणेघेणे नाही.
बाकी संपादक मंडळाचे हे पाऊल उचलल्याबद्दल अभिनंदन.
आमचा पाठिंबा आहेच ...
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
12 Dec 2008 - 10:03 pm | छोटा डॉन
वर सांगितलेले "चित्रपटाचे" उदाहरण हे "गप्पांचे विषय, वाचले जाणारे साहित्य " ह्यांनाही लागु होते.
आपण मित्रमंडळीत ह्या प्रकारच्या गप्पा मारतो त्याच लेव्हलच्या गप्पा आपण "वरिष्ठांसमोर" मारतो का हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर मला वाटते की " खुप जास्त म्हणजे नक्की किती ?" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळायला अडचड येणार नाही ...
बाकी सर्व आपल्या "सुज्ञपणावर" अवलंबुन आहे / असते.
मला वाटते पुरेसे स्पष्ट मी बोललो आहे. :)
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
12 Dec 2008 - 9:41 pm | चतुरंग
आपल्या प्रत्येकाजवळच एक तराजू असतो त्यात तोलून बघावे आणि स्वतःच ठरवावे हाच लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो.
प्रत्येकवेळीच "किती?" ह्याचे संख्यात्मक उत्तर देता येते असे नाही!
चतुरंग
12 Dec 2008 - 10:41 pm | शक्तिमान
छोटे डॉनजी आणि चतुरंगजी..
मला एखादी १०००रू ची वस्तू स्वस्त वाटेल, परंतु दुस-याला ती फार महाग वाटेल.
जवळजवळ प्रत्येक गोष्टीबाबत मत हे व्यक्तीसापेक्ष असते.
त्यामुळे कोणाही एका व्यक्तीचा दृष्टिकोण चर्चेसाठी विचारात घेणे हे हानीकारक ठरू शकते.
त्याउलट जर एखादी सांख्यिक माहिती मिळाली तर निश्चितपणे व्यक्ति-निरपेक्ष बाजू समोर येऊ शकते.
हाच माझ्या प्रश्नामागचा हेतू.
12 Dec 2008 - 10:47 pm | छोटा डॉन
प्रति मर्द मावळा,
आपले म्हणणे पटते काहीसे ....
पण आपण जेव्हा एका "समुहाचा म्हणजे मिपाचा " विचार करतो तेव्हा मी जी व्याख्या वर मांडली आहे ती माझ्या मते योग्य वाटते.
जेव्हा काही व्यक्तीगत असेल तेव्हा आपण म्हणाता ते योग्य ठरते.
म्हणुन माझ्या मते "व्यक्तीसापेक्ष " दृष्टीकोण हा "एखाद्या समाजीक समुहाचा " विचार करताना बाजुला ठेवावा ( असे माझे मत आहे.)
कारण एखाद्या "समुहाच्या" अपेक्षा ह्या "व्यक्ती" पेक्षा अधिक भिन्न व काटेकोर असतात ...
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
12 Dec 2008 - 9:33 pm | विकास
वर मुक्तसुनीत, प्राजु आणि चतुरंगनी लिहीले त्यात अधिक काही लिहू इच्छित नाही. पण सार्वजनीक संकेतस्थळ हे सर्वांच्याच जबाबदारीने चांगले चालू शकते आणि यशस्वी ठरू शकते.
या संकेतस्थळाची सुरवात करताना तात्यांना व्यक्तीस्वातंत्र्य आबाधीत रहावे असे वाटण्यातून झाली होती हे येथे सुरवातीपासून असणार्यांना माहीत असेलच. माझे कुणाशीही कितीही वैचारीक वाद होत असले तरी मला देखील सर्व विचार सर्वत्र यावेत आणि लोकांच्या वाचनात यावेत असे वाटते. काही लेखन आवडते, काही आवडत नाही, काही पटत नाही, तरी देखील त्यातून विविध विचार आणि व्यक्ती तितक्या प्रकृती दिसतात हेच या संकेतस्थळाचे वैशिष्ठ्य आहे. म्हणूनच कुठल्याच पद्धतीच्या लिखाणावर नियंत्रण अर्थात सेन्सॉरशिप करणे हे योग्य वाटत नाही. म्हणून मी शक्यतितके दुर्लक्ष करत आलो आहे.
पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीपण येते. ती जबाबदारी जर आपण कोणीच पाळणार नसलो तर इथे काय आणि समाजात/देशात काय गोष्टी बिघडतच राहू शकतात.
म्हणून यापुढे सर्वांना एक विनंती की चर्चेत, लेखात आणि इतर लेखनात रसभंग होईल अथवा मस्करीची कुस्करी होईल असले प्रतिसाद देणे कृपया टाळावे. जर असे अतिरेक होणारे प्रतिसाद दिसले तर मी आणि इतर संपादकही ते अप्रकाशीत करून लेखाची गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करून आमच्यावर असलेली जबाबदारी पार पाडू शकतील.
12 Dec 2008 - 9:40 pm | लिखाळ
> येणार्या लिखाणाची आणि प्रतिसादाची संख्याही प्रचंड असल्याने सर्व धागे डोळ्याखालून घालणेही अशक्य होऊन बसते. > -- चतुरंग
> आजकाल मिपावरच्या ट्रॅफिकमुळे प्रत्येक धागा उघडून प्रत्येक प्रतिक्रिया वाचणे जमत नाही. >-- प्राजु
एक सुचवावेसे वाटते.
संपादकांनी कविता-साहित्य-चर्चा-पाकृ हे विभाग आपासात वाटुन घ्यावेत.
समजा संपादक अ (अमेरिका) आणि संपादक ब(भारत) यांनी कविता विभाग घेतला, तर अ,ब जेव्हा केन्व्हा मिपावर येतील तेव्हा त्यांनी आधी त्यांचा विभाग पिंजून काढायचा, संपादन करायचे आणि मग स्वतःच्या आवडिचे वाचन करायचे. स्वतःच्या आवडिचे वाचन करताना काही चुकीचे दिसले तरी ते दुरुस्त्या करु शकतीलच. सध्या संपादकांची संख्या बरीच असल्याने हे साधू शकेल आणि कुणावरच भार पडणार नाही. अनेकदा एवरीवन्स लँड इज नोबडीज लँड असे होते आणि एखाद्या धाग्याकडे कुणीतरी दुसरा पाहिलच असे वाटून दूर्लक्ष होण्याची शक्यता असते.
संपादक अश्या काही व्यवस्था आधीच करुन अंमलात आणत असतील तर चांगलेच आहे.
तसेच सभासदांनी सुद्धा अक्षेपार्ह लेखन संपादकांना कळवावे हे बरोबरच आहे.
-- लिखाळ.
12 Dec 2008 - 9:45 pm | प्राजु
विचार करायला हरकत नाही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Dec 2008 - 9:45 pm | विकास
लिखाळ राव,
आपली सुचना चांगली आहे.
तसेच सभासदांनी सुद्धा अक्षेपार्ह लेखन संपादकांना कळवावे हे बरोबरच आहे.
ह्याचा उपयोग नक्कीच होतो. अर्थात जर कोणी तक्रार करत व्यक्तिगत उट्टे काढते आहे अथवा उगाच जास्तच हळवेपणाने (सेन्सेटीव्ह) वागू लागले तर दुर्लक्ष करणे गरजेचे होते. कारण "संपादन" करणे म्हणजे "सेन्सॉर" करणे असा ढोबळ अर्थ देखील होऊ नये असे वाटते.
12 Dec 2008 - 10:49 pm | शक्तिमान
..
12 Dec 2008 - 9:58 pm | यशोधरा
संपादक मंडळाने याची दखल घेतली हे उत्तम. कधी कधी लेख आणि प्रतिसाद/ अवांतर प्रतिसादाचा काही ताळमेळही नसतो!
लिखाळ यांची सूचना चांगली आहे.
12 Dec 2008 - 10:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाववर खूप लेखन आणि प्रतिसाद येतात त्यामुळे बरेच प्रतिसाद वाचायचे राहूनही जातात. त्यामुळे संपादक म्हणून काही उणिवा राहतही असतील. पण मिसळपावच्या संस्थळाच्या निर्मितीमागच्या प्रेरणा लेखन स्वातंत्र्यच होते हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे चर्चाप्रस्तावात म्हटल्याप्रमाणे कधी-कधी वैयक्तिक शेरेबाजी, शिवीगाळ, नावावरुन , स्वाक्षरीवरुन, किंवा कशा-कशावरुन इतके काही-बाही विचार प्रतिसादात येतात की डोके भणकून जाते. अतिअवांतर प्रतिसादात सार्वजनिक संस्थळाचे भान म्हणून काही शब्द / प्रतिसाद संपादक या नात्याने आणि मिपाच्या प्रेमापोटी काही लेखन ठेवतो काही संपादितही करतो. पण अधिक जवाबदारी आहे ती मिपावरील वाचकांचीच. जराशी गम्मत असलीच पाहिजे पण किती याचाही विचार झाला पाहिजेच. त्याबरोबर एक गोष्ट मात्र मला सांगतांना आनंद होतो की लेखनात /प्रतिसादात इतके सुंदर विचार मांडलेले असतात की त्याला तोड नाही . त्याबद्दल मिपावरील मंडळींचे कौतुकच केले पाहिजे.
मी मिळेल त्या वेळेत संपादनाचे काम करतच असतो, पण सध्या जरा वेळ कमी पडतोय नाही तर तक्रारीची वेळ आलीच नसती :)
-दिलीप बिरुटे
12 Dec 2008 - 10:43 pm | घाटावरचे भट
माझ्या मते, या धाग्यावरील चर्चा, त्यावरील सभासदांची तसेच संपादकांची मते एकत्र करून मिसळपाववरती लेखनासाठी मार्गदर्शक सूचना निर्माण केल्या जाव्यात आणि त्याचा दुवा
मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर्वी कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती!
प्रमाणे मुख्य पृष्ठावर द्यावा. जेव्हा कुठल्याही ठिकाणी लोकांची संख्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढते तेव्हा सभासदांद्वारे 'सेल्फ रेग्युलेशन' हे तिथल्या काही समस्यांसाठी उपाय म्हणून शिल्लक राहात नाही. तिथे कोणत्यातरी स्वरूपाची नियमावली आवश्यक होऊन बसते. अर्थात मिपावरील स्वातंत्र्याचा मान ठेवत आपल्याला या गोष्टी नियम म्हणून न ठेवता मार्गदर्शक तत्वे म्हणून ठेवता येतील. याचा कृपया विचार व्हावा.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
12 Dec 2008 - 10:46 pm | विसोबा खेचर
प्रिय संपादकहो,
आपण सर्वजण मिपाची काळजी घेताय याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. इथे कुठले लेखन रहावे, कुठले राहू नये या बाबतचे सर्वाधिकार आपल्याला दिलेले आहेतच..
मिपा हे कुठलंही गंभीर वगैरे संस्थ़ळ नसून ते एक खिलाडूवृत्तीचे प्रोफेश्वर असलेले अन् त्यांच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असलेल्या परंतु तेवढ्याच दे धम्माल वृत्तीच्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजचे कँटीन आहे.
संपादन करताना मिपाच्या कॉलेजचं हे कँटीनपण कुठेही बिघडणार नाही याचीही जरूर काळजी घ्यावी अशीही सर्व संपादकांना विनंती. सर्व संपादक सारासार विचार करून योग्य ते निर्णय घेऊ शकतात असा मला विश्वास आहे..
असो,
आपला,
(दे धम्मालपणे कॉलेजचं जीवन जगलेला) तात्या.
13 Dec 2008 - 1:12 am | टारझन
धन्यवाद्स तात्या, जियो .. आमच्या मंडळातर्फे सह्यांच्या कॉप्या होतात, अगदी तात्या-सर्किटापासून कोदापर्यंत... पण मंडळ कधी गचाळ कारभार करत नाही, पण त्यातुन काही अश्लिल/डबल मिनींग्/लाज वाटावी असं कधीच नसतं ...
वरिल मोठ्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचून आमच्या मंडळावर दडपण आलेलं, आणि इतकं अपराधी वाटू लागलेलं की मंडळाने आता प्रतिक्रिया द्यावी की नाही याचाच विचार करत होतो.
छोटे धागे, विनाकारण लिंक्स देउन काढलेले धागे, निरर्थल कौल यांचा समाचार घेण्यास हात सळसळतात, बाकी पर्सनल टार्गेट करून कोणाला बोलण्याबाबदही मंडळ जागृक आहे. लैच्च डिसेंट डिसेंट झालं तर उगाच डिसेंट्रीची भावना निर्माण होईल... आणि मिपावरची मजाच निघून जाइल...
राहिलं अवांतर प्रतिसादांबद्दल, काही दिवसांपुर्वीच एक तम्मा तम्मा लोगे वाला मनातलं गाण्याचा प्रतिसाद वाचला आणि मन भरून हसलो, बाकींना ही सेम अनुभव आला असेल याची खात्री वाटते. पण अवांतर प्रतिसादांची चेन नको हे मान्य आहे.
मिपावर व्यक्तिस्वातंत्र्य रहावं .. आम्ही आमच्या मंडळाकडून मस्करीची कुस्करी होणार नाही याची ग्वाही देतो.
- शुभेच्छूक
अध्यक्ष, टारझन मित्र मंडळ
13 Dec 2008 - 5:11 am | खरा डॉन
इथले कुणी कुणी संपादक लै डोक्यात जातात त्यांची तक्रार केली तर विचार केला जाईल का?
खरा डॉन
13 Dec 2008 - 4:12 pm | मराठी_माणूस
हेच म्हणतो
13 Dec 2008 - 5:09 pm | विसोबा खेचर
इथले कुणी कुणी संपादक लै डोक्यात जातात त्यांची तक्रार केली तर विचार केला जाईल का?
नाही जाणार!
एकूण आपली येथील वाटचाल पाहता, आपण जेव्हा जेव्हा येथे येता तेव्हा तेव्हा अधिकारवाणीची, सतत लोकांना फैलावर घेण्याची भाषा वापरता हेच ध्यानात येते. मिपावर आपले कधीही काही कन्स्ट्रक्टिव्ह लेखन माझ्या पाहण्यात नाही. सतत दरडावण्याची, मुजोरीचीच भाषा आपण येथे केलेली आहे. असे असताना इथल्या कुणा संपादकाबद्दल तक्रार करण्याचा किंवा जाब विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे असे मला वाटत नाही!
तात्या.
13 Dec 2008 - 11:03 pm | खरा डॉन
तात्या तुम्ही विनाकारण माज्यावर सतत आगपाखड करता. मी थोडा गरम डोक्याचा आहे कधीतरी एखादा शब्द जातो चुकुन. तो उडवल्याबद्दल मी कदी तरी तक्रार केली आहे का? काही संपादक मात्र मला अजीबात आवडत नाहीत. मिपावर आता वर्गणी काढायचा विषय चालू आहे, मी वर्गणी द्यायला एका पायावर तयार आहे पण मग लोकांना आवडत नसलेले संपादक कमी करणे आवश्यक नाही का? पैसे भरुन आपले लेखन उडवुन घेतलेले किती जणाना आवडेल? ह्यावर गंभीर विचार करावा. तुम्हाला माजे वागणे उर्मट वाटत असल्यास माफी!
खरा डॉन
12 Dec 2008 - 10:49 pm | शक्तिमान
युट्यूबवर प्रत्येक प्रतिसादासमोर दोन अंगठे असतात - एक thumb up, तर दुसरा thumb down. आपणांस तो प्रतिसाद रूचला तर आपण thumb up वर टिचकी मारू शकतो, नाही रूचला तर thumb down वर. अशा रितीने कोणाकोणास प्रतिसाद रूचला त्यांची संख्या, आणि कोणाकोणाला रूचला नाही त्यांची संख्या तेथे दिसते. एक सदस्य एकदाच thumb up/thumb down वर टिचकी देऊ शकतो.
अशी व्यवस्था जर मिपा वर केली तर, जेव्हा एखादा प्रतिसाद न रूचणार्यांची संख्या ५/१० च्या वर जाईल, तेव्हा आपोआप एक व्य.नि. संपादकमंडळाला पाठवता येईल व ते योग्य तो निर्णय घेऊ शकतील.
याचा एक फायदा असा होईल की केवळ लेखकाला वाटते म्हणून फक्त प्रतिसाद उडवला जाणार नाही.
दुसरे असे की ज्याने तो प्रतिसाद लिहीला असेल, त्यालाही कळेल की तो प्रतिसाद इतरांना आक्षेपार्ह वाटतो की नाही.
13 Dec 2008 - 12:08 am | इनोबा म्हणे
'रिपोर्ट अब्यूस' या सुविधेबाबत निलकांतशी यापुर्वी बोलणे झाले होते. परंतू याचा फायदा फेक आयडीधारक उचलतील आणि आपल्याला न आवडलेल्या किंवा आपल्या विरोधात जाणार्या लेख/प्रतिसादांना केराची टोपली दाखवण्याची अशी शक्यता नाकारता येत नाही.असे मत नीलकांतने मांडले होते. मला ही ते पटले.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
13 Dec 2008 - 12:43 am | शक्तिमान
आपले म्हणणे उचित आहे. परंतु, असे जास्त करून 'रिपोर्ट अब्यूस' सारख्या एकतर्फी पद्धतीत होऊ शकते.
जरा बारकाईने पाहिल्यास thumbs up, thumbs down पद्धतीमध्ये सदस्य thumbs up किंवा thumbs down असे मत नोंदवू शकतात.
जर आपण असे गृहीत धरले की तोतयांची संख्या खर्या आयडींपेक्षा कमी आहे, तर जरी तोतयांनी/vandelisers ने उगीचच thumbs down देण्याचा प्रयत्न केला, तरी खरे लोक thumbs up देतील. आता जर thumbs up = १ आणि thumbs down = -१ धरले, तर thumbs up + thumbs down हे बर्याचवेळा शून्याच्यावरच राहील. (असेच तत्व विकीपिडीयावर चालू आहे. आणि आपण जाणताच विकीपिडीयाची महती.)
जेव्हा thumbs up + thumbs down हे -५/-१० च्या खाली जाईल तेव्हा संपादकांना सूचित करता येईल.
तसेच प्रतिसाद आपोआप न उडवता, तो उडवण्याचा अधिकार फक्त संपादक मंडळाकडे राहील[जसा आत्ता आहे.].
त्यामुळे याउपरही कदाचित एखादा प्रतिसाद तोतयांच्या प्रतापामुळे संपादकांकडे पोहोचला तर संपादक मंडळ समर्थ आहेच.
13 Dec 2008 - 12:52 am | इनोबा म्हणे
जर आपण असे गृहीत धरले की तोतयांची संख्या खर्या आयडींपेक्षा कमी आहे
मी तरी असे गृहीत धरले आहे की, खर्या आयडींची संख्या तोतयांपेक्षा कमी आहे. अर्थात ज्याची त्याची मते.
याउपरही कदाचित एखादा प्रतिसाद तोतयांच्या प्रतापामुळे संपादकांकडे पोहोचला तर संपादक मंडळ समर्थ आहेच.
म्हणजे शेवटी तेच. मग या 'थम्स अप/डाऊन'चा नेमका फायदा काय होणार राव?
फारतर एखाद्या लेखाबद्दल/प्रतिसादाबद्दल संपादकांना कळवण्याकरिता याचा फायदा होउ शकेल.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
13 Dec 2008 - 12:57 am | विसोबा खेचर
मी तरी असे गृहीत धरले आहे की, खर्या आयडींची संख्या तोतयांपेक्षा कमी आहे.
असहमत आहे..
अर्थात ज्याची त्याची मते.
खरं आहे. कुणी काय गृहीत धरावं याला काही नियम नाही..
असो.
आपला,
(मिपासंदर्भात बर्याचश्या ऍक्चुअल फॅक्ट्स माहीत असणारा) तात्या.
13 Dec 2008 - 5:28 am | अघळ पघळ
काय तात्या.. एकट्या तुझेच फेक आयडीज किती रे?? :D
खातोय आता मार.. स ट क तो ;)
13 Dec 2008 - 7:39 pm | धम्मकलाडू
हे वाक्य आधी
असे वाचले होते. :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
13 Dec 2008 - 12:13 am | प्राजु
आपण सुचवलेला पर्याय चांगला आहे. पण मिपाच्या सध्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसे करणे कदाचित अवघड होईल. तांत्रिक आणि आर्थिक दृष्टीने हे कितिपत शक्य आहे माहिती नाही. तरी मिपाचे संपादक मंडळ असल्या प्रकारच्या प्रतिक्रियांबद्दल योग्य तो निर्णय घेईलच. आपण याबद्दल निश्चिंत रहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Dec 2008 - 12:21 am | इनोबा म्हणे
महापुरुषांच्या नावाचा वापर करुन लिहील्या गेलेल्या लेखांबद्दल(उदा. तांब्या घेऊन जाणे किंवा शिवाजी महाराजांचे नविन संकेतस्थळ वगैरे) संपादक मंडळाचे काय मत आहे?
जाणून घेण्याची इच्छा आहे.
सह्यांच्या नकला करणे खूप चालू आहे.
कवितांच्या विडंबनाबाबत काय?
सभासदांच्या नावाची टवाळी
ह्म्म. उगाच 'नडगीफोड तरुणांकडून धक्काबुकीची शक्यता' वर्तवणार्या 'पोपट भविष्य'वाल्यांवर काही कारवाई होऊ शकेल काय?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
13 Dec 2008 - 12:27 am | विसोबा खेचर
महापुरुषांच्या नावाचा वापर करुन लिहील्या गेलेल्या लेखांबद्दल(उदा. तांब्या घेऊन जाणे किंवा शिवाजी महाराजांचे नविन संकेतस्थळ वगैरे) संपादक मंडळाचे काय मत आहे?
अश्या पद्धतीचे लेख अप्रकाशित केलेले आहेत. नसल्यास कृपया दाखवून द्या, लगेच अप्रकाशित करतो...
मुक्तरावांनी हा धागा काही एका चांगल्या हेतूने, उद्देशाने सुरू केला आहे हे जरी खरे असले तरी,
या सर्व चर्चेदरम्यान मिपावर अद्याप आणिबाणी सुरू आहे आणि मालक व संपादक मंडळ कुणालाही कुठलेही उत्तर देणे लागत नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यावी..
तात्या.
13 Dec 2008 - 12:44 am | इनोबा म्हणे
अश्या पद्धतीचे लेख अप्रकाशित केलेले आहेत. नसल्यास कृपया दाखवून द्या, लगेच अप्रकाशित करतो...
खाली उत्तर दिले आहे.
या सर्व चर्चेदरम्यान मिपावर अद्याप आणिबाणी सुरू आहे आणि मालक व संपादक मंडळ कुणालाही कुठलेही उत्तर देणे लागत नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यावी..
कळवल्याबद्दल आभारी आहोत. यापुढे प्रश्न विचारताना विचार करेन.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
13 Dec 2008 - 4:52 am | बगाराम
महापुरुषांच्या नावाचा वापर करुन लिहील्या गेलेल्या लेखांबद्दल(उदा. तांब्या घेऊन जाणे किंवा शिवाजी महाराजांचे नविन संकेतस्थळ वगैरे) संपादक मंडळाचे काय मत आहे?
अश्या पद्धतीचे लेख अप्रकाशित केलेले आहेत. नसल्यास कृपया दाखवून द्या, लगेच अप्रकाशित करतो...
तुमचे हे धोरण पटले आणि आवडले. ह्याउपर इतकेच सांगू इच्छितो की महापुरूषांच्या यादीत महात्मा गांधी देखिल येतात.
गांधीजींचा काही लोकांनी इथे टवाळक्या करुन केलेला अनादर संपादक मंडळ दुरुस्त करतील अशी अपेक्षा आहे.
-बगाराम
13 Dec 2008 - 4:35 am | धनंजय
त्या धाग्यात पुढे
सळसळणारे रक्त नैसर्गिक - अराजक-नसलेली राज्ये काय करतात?
या प्रतिसादात हे वाक्य लिहिलेले आहे :
भविष्य वर्तवणारा पोपट असेल, पण प्रामाणिकपणे मते बदलणारा आहे.
संपादक योग्य ती कारवाई करण्यास समर्थ आहेत, आणि मिसळपावाचे भले त्यांच्या मनात आहे, याबद्दल मला खात्री आहे.
("नडगीफोड" हा शब्द अनेकांनी वापरला आहे - मजेमजेतही ते कोणाचे वैयक्तिक टोपणनाव असल्याचे मला ठाऊक नव्हते. असल्यास कळवावे. माफी मागेन. असे वैयक्तिक टोपणनाव असलेली कोणी व्यक्ती असेल तर ही गोष्ट मला माहीत नव्हती असे समजून, त्या प्रमाणातच संताप मानून घ्यावा.)
13 Dec 2008 - 1:53 am | पाषाणभेद
कुणीही जो reply देतो तो धागा वरती यायला हवा. जसे ईतर forum मध्ये होते.
त्या मुळे जिवंत धागा वर दिसावा.
-( सणकी )पाषाणभेद
13 Dec 2008 - 1:57 am | इनोबा म्हणे
ते इथेही चालतेच की! निरीक्षण करा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
13 Dec 2008 - 11:11 am | अवलिया
मुक्तसुनीत रावांनी काहीतरी विचार करुनच लेख लिहीला असेल याची खात्री आहे.
परंतु.....
जर एकमेकांची खेचणे, नकला करणे, थोडीशी टवाळी करणे, द्वयर्थी लिहिणे अशा गोष्टींवर जर का लगाम आला तर मला असे वाटते की तात्याच्या डोक्याला सर्वर क्षमता वाढवणे, या पोरांचे काय करायचे हा ताण रहाणार नाही. तसेच मिपाचा वाढता ओघ थांबेल आणि तात्या निवांत बसला हे मला तरी पाहवणार नाही.
तेव्हा मुक्तसुनीतराव, मी तरी याला सहमत नाही. मी मला वाटेल तेव्हा कुणाची खेचीन, टवाळकी करीन, कुणाची स्तुती करेल तर कुणाला शाब्दिक फटकारे देईन कारण हेच जर कुणी मला केले तरी मला त्याचे वाईट वाटत नाही. उलटपक्षी अशा सदस्याशी डोके लावायला आवडते. अर्थात काही उगाचच कमरेखाली वार करणारे भ्याड असतात, त्यांच्याकडे मी दुर्लक्षच करतो. त्याचबरोबर ज्याना या गोष्टी आवडत नाहीत असे त्यांनी खरड वा व्यनीतुन सुचित केलेले असते त्यांच्याकडे मी ढुंकुन पहात नाही.
मिपाचे वैशिष्ठ्य हे त्यातील कॉलेज कॅन्टीन वातावरण आहे. त्याला बंदी आणु नका. फार पस्तावाल.
अगदीच वाटत असेल तर एक 'गंभीर विषय' असा विभाग चालु करा.
सदस्य त्यात प्रतिक्रिया देतांना आधी एरंडाचे तेल पितील नंतरच टंकन करतील. असो.
काहितरी आपले लिहायचे म्हणुन लिहिले. माझ्याबद्दल बोलतोय मी... उगाच रागवुन पाहु नका :)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
13 Dec 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
मिपाचे वैशिष्ठ्य हे त्यातील कॉलेज कॅन्टीन वातावरण आहे. त्याला बंदी आणु नका. फार पस्तावाल.
कॅन्टीन वातावरणावर बंदी आणली पाहिजे/आणावी, असा काही मुक्तरावांचा हेतू आहे असे मला वाटत नाही..
तात्या.
13 Dec 2008 - 12:46 pm | परिकथेतील राजकुमार
माझ्या पहिल्याच लेखावर इथे १०० प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील ९०% अवांतर आहेत हे मला शेवट शेवटच्या काहि प्रतिकियांमधुन समजले :P तोवर मला तो एक विनोदी विषयातुन निघालेला दुसरा विषय आणी त्यावर चाललेली चेष्टा मस्करी आहे असेच वाटत होते आणी त्या बद्दल मला तरी काहि आक्षेप न्हवता, उलट माझ्या लेखामुळे येव्ह्ड्या मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना चेष्टा मस्करिचा आनंद लुटता आला ह्याचे समाधान वाटले.
मला असे सुचवावेसे वाटते कि ज्या लेखकांना आपल्या लेखावर फ़क्त गंभिर, विषयाला धरुन व कोठेही अवांतरपणा नसणार्या प्रतिक्रिया याव्यात असे वाटते त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरवातिला (अ) असे लिहावे, आणी ज्यांची आपल्या लेखनावर येणारी कुठलिही प्रतिक्रिया (अगदी समजा ती लेखकावर वैयक्तिक टिपणी करणारी असली तरी) खिलाडुपणाने घ्यायची तयारी असेल त्याने (यु) असे लिहावे, ज्या लेखकांना थोड्या मजेशीर पण उगाच विषयाला फाटे न फोडणार्या प्रतिक्रिया सुद्धा चालतिल त्यांनी (अ / यु) असे लिहावे.
येथे सर्व भाषातील सह्यांच्या नकला करुन मिळतील
हुबेहुब टारोक्स
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
13 Dec 2008 - 5:01 pm | भडकमकर मास्तर
मी अ / यु वाला आहे....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
13 Dec 2008 - 5:21 pm | अवलिया
मी ट्रिपल यु वाला...
(पण माझ्या लेखात कुणी जास्त अवांतर लिहितच नाही. माझी विषयाची निवड चुकीची असते की काय असे वाटायला लागले आजकाल)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
13 Dec 2008 - 6:14 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत !
जसे आम्ही काय लिहावे हे वाचक ठरवत नाहित तसे त्यांनी काय प्रतिक्रिया द्यावि हे आम्ही ठरवत नाहि ;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
13 Dec 2008 - 4:51 pm | कलंत्री
मिपा हे आपल्या सर्वांचे विसाव्याचे स्थान आहे हे नक्कीच. येथे मौजमस्ती चालावी हे अभिप्रेत आहेच.
त्याच बरोबर गंभीर लेखाचा विचार अभ्यासू वृत्तीनेच व्हावा.
अनेकदा आपल्या विरुद्धबाजूचे मत टवाळी ने उडवुन लावण्याचा सोपा मार्ग हाताळळा जातो.
अशा वेळेस प्रामाणिक लोकांची तारांबळ उडते. या सकेतस्थळाचा वापर करुन गंभीर आणि मूळ विषयावरचा अभ्यासही केला गेला पाहिजे.
एकमत झाले नाही तरी चालेल पण संवाद मात्र झाला पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे.
बाकी समझनेवालेको इशारा काफी है...
13 Dec 2008 - 5:11 pm | यशोधरा
मी अ/यु गटात आहे.
13 Dec 2008 - 5:14 pm | विनायक प्रभू
मी कशात मोडीन. अ का यु?
मी तर साधे लिहितो बॉ. कोणाची मस्करी करत नाही. कोणी क्रिप्टीक म्हटले तर रागावत नाही. कुणी जादा शानपती केली तरी भांडण करत नाही.कुणी कुणी कविता करतात त्या सहन करतो. कधी कधी काही कळले नाही तरी १+ सहमत च्या प्रतिक्रिया देतो.
आदर्श मिपाकर
वि.प्र.
13 Dec 2008 - 8:00 pm | अवलिया
प्रकाटाआ
13 Dec 2008 - 5:36 pm | सुनील
कधी कधी काही कळले नाही तरी १+ सहमत च्या प्रतिक्रिया देतो
लै भारी!!
(अ/यु) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Dec 2008 - 5:16 pm | वारकरि रशियात
मुक्तसंगः अनहंवादि
माझा गट
अ / यु
13 Dec 2008 - 7:02 pm | वेताळ
तात्या आणिबाणी कधी संपणार ?
वेताळ
13 Dec 2008 - 10:48 pm | विनायक पाचलग
अहो मी कॉलेजात जातो ना.तिथे मी कट्टा करतोचना म्हणून मग इथे आल्यावर सगळे कसे गंभीर बरळतो.माफी असावी हा सुधारतोय..
आपला,
(बिनअक्कलेचा)को दा
14 Dec 2008 - 9:54 am | दवबिन्दु
पन सगळ्यांनी संयम पाळला पाहीजे हे खरेच आहे. विशेष करुन
तायांना तरास द्यायचे बंद केले पाहीजे. मी असे लिहिले म्हणून रागवू नये.