पुर्वार्ध
महाराजा प्रतीपने गंगेला दिलेल्या वचनानुसार आपला पुत्र शान्तनुला गंगेशी विवाह करण्याचा आदेश दिला व स्वत: स्वर्गाकडे प्रस्थान केले. वडिलांच्या आदेशानुसार महाराज शान्तनु ने गंगेशी विवाह केला. पण गंगेने महाराज शांन्तनु कडून एक वचन घेतले., कोणत्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही. महाराज शान्तनु ला आठ पुत्रे झाली. त्यातील सात पुत्रांना गंगेने गंगेत सोडुन दिले. (हे सात पुत्र म्हणजे मानव लोकात राहण्याचा शाप मिळालेले अश्विनी कुमार, त्यांना गंगेने गंगेत सोडून शापमुक्त केले) पण आठव्या पुत्राच्या वेळेस महाराज शान्तनुने हस्तक्षेप केल्यामुळे गंगा आठव्या पुत्रासोबत गुप्त झाली.
महाराजा शान्तनु काही काळ ब्रह्मचारी राहिले. एक दिवस आठव्या पुत्राची आठवण झाल्यावर गंगेकडे आपल्या पुत्राची मागणी केली. तेव्हा गंगेने देवव्रताला महाराज शान्तनुच्या हवाली केले. हा पुत्र परशुरामासारखा पराक्रमी होता. महाराज शान्तनुने त्याला हस्तिनापुरचा युवराज घोषित केले.
एक दिवस महाराज शान्तनु यमुनेच्या किनार्यावर फिरत असताना सत्यवती नजरेस पडली. तिचे सौंदर्य पाहुन महाराज शान्तनु तिच्यावर मोहित झाले. महाराज शान्तनु ने तिच्या पित्याकडे सत्यवतीशी विवाह करण्याचे विचारले. सत्यवतीच्या पित्याने विवाहाला मान्यता दिली. पण एक अट घातली. सत्यवतीला होणार्या पुत्राला हस्तिनापुरचा उत्तराघिकारी केले पाहिजे. देवव्रताने महाराज शान्तनुसाठी आजन्म बह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हापासून देवव्रताचे नाव भीष्म पडले.
महाराज शान्तनुचा सत्यवतीशी विवाह झाला.महाराज शान्तनुला सत्यवतीपासून चित्रानंद व विचित्रवीर्य हे दोन पुत्र झाले. महाराज शान्तनुचे काही दिवसानी निधन झाले. भीष्माने चित्रानंदाला राजगादीवर बसवले. गंधर्वा बरोबर झालेल्या युद्धात चित्रानंद मारला गेला. भीष्माने विचित्रवीर्याला राजगादीवर बसवले. विचित्रवीर्याचा विवाह अंबिका व अंबालिका बरोबर झाला. विचित्रवीर्याचा क्षयाने मृत्यु झाला. वंशविस्तारासाठी सत्यवतीने व्यास ऋषिनां पाचारण केले. ( व्यास म्हणजे सत्यवतीचा लग्नाआधी पराशर मुंनी पासून झालेला पुत्र) व्यासापासून अंबिकेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पान्डु व दासीला विदुर असे पुत्र झाले.
उत्तरार्धातील माहिती चर्चेव्दारे प्रतिसादातून प्रत्येकाने थोडी थोडी सांगावी.
प्रतिक्रिया
27 Aug 2015 - 3:05 pm | जेपी
मिपाकर म्रुत्युजंय आणी चित्रगुप्त यांचे लेख वाचा.
महाभारत समजुन जाईल.
27 Aug 2015 - 6:10 pm | मांत्रिक
कृपया सदरहू लिंक्स व्य.नी. कराल? बर्याचशा जुन्या लेखांना वा.खू. साठवता येत नाही. म्हणून व्य.नि. मागत आहे.
27 Aug 2015 - 8:32 pm | दमामि
मला पण!
27 Aug 2015 - 9:29 pm | मांत्रिक
आॅ! वा.खु. मागतोय, खाऊ नाही. लगेच्च मला पण! ;)
28 Aug 2015 - 3:25 pm | कहर
व्य नि कशाला ? इथेच द्या सगळ्यांनाच माहिती मिळेल
28 Aug 2015 - 3:30 pm | जेपी
माझ्याकडे लिंका नाहित.
कुणीतरी द्या अथवा खरडफळ्यावर जाऊन मागा..
27 Aug 2015 - 3:09 pm | भीमराव
मोठे लोक भारी भारीतलं विचारतील माझी आपली साधी शंका,
एवढा मोठा राजा म्हटल्यावर निदान ५-५० दासींची फौज सहज आसल, मग विदुराच्या मातोसरींनाच ह्यो मान का बर मिळाला असावा?
27 Aug 2015 - 3:44 pm | संचित
हाजिर तो वजिर
27 Aug 2015 - 3:50 pm | हेमंत लाटकर
व्यासाच्या तेजाला अंबिका व अंबालिका दोघी घाबरल्या. अंबिकाने डोळे मिटल्यामुळे धृतराष्ट्र आंधळा, अंबालिका पिवळी पडल्यामुऴे पान्डुला पंडु रोग झाला. दुसर्या वेळी अंबालिकाने स्वत: न जाता आपल्या दासीला पाठवले. ती दासी घाबरली नाही डोळे मिटले नाही म्हणून विदुर व्यासासारखा विद्वान, ज्ञानी झाला.
27 Aug 2015 - 3:41 pm | अत्रन्गि पाउस
कुणाला कुणापासून कधी किती कशी मुले झाली वगैरे एवढेच बघितले तर पेज ३ वरचे वर्णन वाटते ...
27 Aug 2015 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
मानवाच्या सर्व इतिहासात पृथ्वीवरील सर्व भागांत पेज ३ होते. महाभारतात तर ते "संजय टिव्ही"वरही प्रसारित होत होते !
27 Aug 2015 - 10:25 pm | मांत्रिक
मस्त बोललात डाॅक्टर!
27 Aug 2015 - 4:44 pm | मृत्युन्जय
हे सात पुत्र म्हणजे मानव लोकात राहण्याचा शाप मिळालेले अश्विनी कुमार
नाही हे सात पुत्र म्हणजे अष्टवसुंपैकी एक. भीष्म देखील त्यांच्यापैकीच एक. अश्विनी कुमार २ च होते.
27 Aug 2015 - 5:08 pm | प्रचेतस
ते मुद्दामच करायलेत असं वाटतं.
27 Aug 2015 - 5:16 pm | तुषार काळभोर
जेपींनी आधीच सांगितलं व्हतं :)
27 Aug 2015 - 6:35 pm | हेमंत लाटकर
मृत्युंजय तुमचे बरोबर आहे. माहिती बद्दल धन्यवाद!
वसिष्ट ऋषिनी नॆदिनी गाय चोरल्याबद्दल अष्टवसूनां मानव योनीत जाण्याचा शाप दिला. उ:शाप म्हणून त्यातील सात जणांना काही तास मानव योनीत राहावे लागेल. पण आठव्याला मात्र बरेच वर्ष मानव योनीत राहावे लागेल. हे अष्टवसू गंगेच्या पोटी जन्मले, परंतु यातील सात वसूंना जन्मल्यावर गंगेने गंगेत सोडून शापमुक्त केले. आठवा वसू मात्र मानव योनीत बरेच वर्ष राहिला. आणि महाभारतात भीष्म म्हणून नावारूपास आला.
27 Aug 2015 - 7:51 pm | कंजूस
शांतनुचा वंश मिटला?
27 Aug 2015 - 9:24 pm | हेमंत लाटकर
महाभारतात असेच आहे.
सत्यवतीने आधी भीष्माला (शान्तनु-गंगा पुत्र) वंशविस्तारासाठी विचारले, पण भीष्माने आजन्म बह्मचाराची प्रतिज्ञा घेतली असल्यामुळे नकार दिला. मग सत्यवतीने व्यासाला (पराशर मुनी-सत्यवती पुत्र) विचारले. व्यासापासून विचित्रवीर्य पत्नी अंबिका, अंबालिकाला धृतराष्ट व पान्डु व अंबालिका दासीला विदुर हे तीन पुत्र झाले.
कुंतीकडून देवांना आवाहन केल्याने यंमापासून युद्धीष्टर, वायूपासून भीम, इंद्रापासून अर्जुन तसेच माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेवहे पांच पुत्र झाले.
विचित्रवीर्याचा वंश सत्यवती पुत्र व्यास व पान्डुचा वंश कुंती आणि माद्रीनी देवाला आवाहन केल्याने पुढे चालु राहिला.
28 Aug 2015 - 12:59 pm | हेमंत लाटकर
कुंतीकडून देवांना आवाहन केल्याने यंमापासून युद्धीष्टर, वायूपासून भीम, इंद्रापासून अर्जुन तसेच माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेवहे पांच पुत्र झाले.????
कुंतीने व माद्रीने देवांना आवाहन केल्याने पाच पांडवांचा जन्म झाला यात मला तथ्य वाटत नाही.
पांन्डुला किंदम ऋषिनीं शाप दिल्यामुळे मनस्वास्थासाठी 'पान्डु कुंती व माद्री बरोबर हिमालयीन भागात गेला असताना पाच पांडवाचा जन्म देवांना आवाहन केल्यामुळे झाला. (हदेव म्हणजे ऋषि मुनी असू शकतात.
महाभारतात नियोग पद्धत वंशविस्तारासाठी नवरा किंवा सासूच्या संमतीने उपयोगात आणली.
28 Aug 2015 - 2:27 pm | पैसा
वर एक प्रतिसाद देताय न मग त्याचंच खंडन करताय? आयडी तरी दुसरा वापरा ओ.
28 Aug 2015 - 2:53 pm | अस्वस्थामा
:))))
पैसा तै.. मस्त पकडलंत .. ते नाना याबाबतीत भलतेच पारंगत म्हणायचे. हजार आयडी वापरुन देखील कधी असली गल्लत होत नै त्यांची.
28 Aug 2015 - 2:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते "दे बोनोच्या सहा टोप्या" या नाटकाचा प्रयोग मिपावर सादर करत आहेत ;)
28 Aug 2015 - 3:28 pm | प्यारे१
काय स्टोरी आहे नाटकाची? संदर्भ?
28 Aug 2015 - 4:05 pm | काळा पहाड
मी सहमत आहे
28 Aug 2015 - 4:06 pm | काळा पहाड
काहीही काय! म्हणे मी सहमत आहे. मी तर अजिबात सहमत नाही.
28 Aug 2015 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
दे/दी बोनो नावाच्या व्यवस्थापन तज्ञाने एकाच गोष्टीचा एकाच माणसाने (किंवा अनेक माणसांनी) दर वेळेस वेगळ्या रंगाची हॅट घालून (अथवा घातली आहे अशी कल्पना करून) त्या रंगाशी संबंधीत वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची पद्धत मांडली आहे. यामुळे समोरच्या मुद्द्याचा वैयक्तीक आवड/हितसंबंध बाजूला ठेवून सर्वांगिण विचार करता येतो. ही पद्धत "दे बोनोज सिक्स थिंकिंग हॅट्स" या नावाने प्रसिद्ध आहे.
माझ्या अंदाजाप्रमाणे, महाभारताची अशी अनेक अंगांनी चर्चा व्हावी असा लेखकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते स्वतःच एका मुद्द्याबद्दल एक मत देऊन लगेच त्याविरुद्ध / वेगळे मत लिहीत आहेत.
de Bono's Six Thinking Hats
(जालावरून साभार)
29 Aug 2015 - 1:08 am | प्यारे१
च्यामारी. बाकी पाच लोकांच्या नोकऱ्या गेल्या की म्हणजे.
आणि एकच माणूस एवढा विचार करु लागला तर काम कसा करणार? SWOT पेक्षा पुढे गेला की हां विचार.
29 Aug 2015 - 7:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
तसंच काही नाही... टीममध्ये जास्त लोक असले तर सहा वेगवेगळ्या लोकांनी / लोकांच्या समुहांनी वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या घालून विचार करायचा असतो... मग टोपी बदलायच प्रश्नच येत नाही :)
28 Aug 2015 - 4:08 pm | हेमंत लाटकर
वर एक प्रतिसाद देताय न मग त्याचंच खंडन करताय? आयडी तरी दुसरा वापरा???
वरचा प्रतिसाद महाभारत कथेवरचा आहे. खाली दिलेला वस्तुनिष्ट प्रतिसाद आहे.
मी हा धागा चर्चसाठी टाकलेला आहे. स्वत:च्या मनातील विचार इतरांना कळण्यासाठी मी एकच आयडी वापरला. (मिपावर माझा एकच आयडी आहे)
28 Aug 2015 - 5:15 pm | आदूबाळ
द्याट एक्सप्लेन्स इट.
28 Aug 2015 - 5:28 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
29 Aug 2015 - 1:45 am | अंतु बर्वा
ध्यानीमनी नसताना फिसकन हसलो!! :-) ऑफिसातले आजुबाजुचे विचित्र नजरेने पाहतायेत!
27 Aug 2015 - 10:19 pm | शीतल जोशी
नमस्कार ,
महाभारत , हा व्यासकृत ग्रंथ , खूपच विचार करायला लावणारा आहे . श्री हेमंत लाटकर , यांनी दिलेलेच संदर्भ माझ्या हि महाभारत वाचना मध्ये आले आहेत . मला नेहमीच असे वाटत आले आहे कि , महाभारतामध्ये मानवी मनाचे , नाते संबंधाचे , लोभ, माया, कर्त्यव्य, हव्यास , द्वेष, अहंकार या आणि अश्या अनेक गोष्टींचा, भवनाचा अंतर्भाव केला आहे, त्याची सारासार मांडणी केली आहे आणि विवेचन हि आहे . महाभारत सत्याच्या इतके जवळ वाटते कि अश्या व्यक्ती रेखा आजूबाजूला आजही दिसू शकतात . समाजात , नात्यात आजही हि असणारे प्रश्न , महाभारतामध्ये सापडतात . मला तरी किती वेळा असे वाटते कि आपण कितीहि नव्या कथा लिहिल्या , तरी महाभारतामध्ये तश्या व्यक्ती रेखाचे अंश नक्की आले असतील . महाभारत रंजक तर आहेच , पण विचार करायला लावणारे आणि अभ्यास करायला लावणारे हि वाटते . मनुष्य स्वभाव आणि समाजचे वास्तव चित्रण , आपण त्यात शोधू शकतो . अर्थात काही गोष्टी या अति रंजक पद्धतीने कित्येक पिढ्या सांगितल्याने , आपण त्यातले चमत्कार किंवा अति रंजक भाग मात्र नक्की बाजूला केला पाहिजे .
मध्यंतरी एपिक नव्याच्या वाहिनीवर , महाभारत या वर आधारित , धर्मयुद्ध नावाचा अत्यंत छान असा कार्यक्रम होता . वेगळ्या दृष्टीनी , त्याची मांडणी होती . विविध व्यक्तिरेखांचे , एकमेकांवरील आरोप आणि त्याचे खंडन आणि ते हि युद्ध संपल्यावर , चित्रगुप्ताच्या दरबारात , असा कार्यक्रमाचा आराखडा होता . यु ट्यूब वर असल्यास , ज्यांना बघायला आवडेल , त्यांनी जरूर पाहावे . एक वेगळ्या नजरेतून महाभारत :०
28 Aug 2015 - 11:10 am | उगा काहितरीच
पटले विचार, त्यामुळेच महाभारत आवडते मला. पण मला महाभारताकडे इतिहास म्हणून पहायला जास्त आवडेल . कुणालाही दैवी पणाची झालर लागली कि वस्तुनिष्ठ परिक्षण करता येत नाही. त्यामुळे महाभारत : एक इतिहास म्हणून जास्त भावते.
31 Aug 2015 - 8:58 pm | बहिरुपी
मध्यंतरी एपिक नव्याच्या वाहिनीवर , महाभारत या वर आधारित , धर्मयुद्ध नावाचा अत्यंत छान असा कार्यक्रम होता .
ते धर्मक्षेत्र आहे.28 Aug 2015 - 12:55 pm | तुडतुडी
खि:क 'युगंधर' वाचलेलं दिसतंय . इरावती कर्वेंच (इरावती कर्वें च ना . नाव नक्की आठवत नाहीये. ) अतिशय भंगार कादंबरी . कैच्या काई फेकुपणा केलाय .
28 Aug 2015 - 2:29 pm | पैसा
इरावती कर्वेंचं पुस्तक म्हणलात तर त्याचं नाव "युगांत" आहे. "युगंधर" शिवाजी सावंतांचं आहे.
28 Aug 2015 - 3:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
इरावती कर्वेंचे एकही पुस्तक तुम्ही वाचलेले नाही हे सिद्ध केलेत !
त्यांचे "युगांत" सारासार विचार आणि डोळे उघडे ठेऊन वाचून पहाच एकदा.
28 Aug 2015 - 3:08 pm | अस्वस्थामा
+१ काका.. हेच म्हणायला आलो होतो.
28 Aug 2015 - 1:05 pm | हेमंत लाटकर
हे खरे नाही, महाभारतातील कल्पनाविस्तार आहे हे मलाही कळते.
28 Aug 2015 - 2:24 pm | मारवा
इतर ४ पांडव आकर्षीत झाले होते त्यांच्यात पुढे एकी रहावी म्हणुन कुंती ने द्रौपदी ला सर्व भावांत वाटुन दिले. हा भाग
दुसरा लाक्षागृहात पांडवांएवजी ज्या आदिवासी निषादी स्त्री व पाच मुलांना रीप्लेसमेंट म्हणुन ठेवले व जे नंतर जळुन मेले त्याविषयीची महाभारतकाराने दाखवलेली उदासीनता वा गृहीत धरणे, अर्जुन एक संपुर्ण वन जाळतो सर्पसत्र च्या वेळेस तेथील एक एक पक्षी झाड ज्या भयंकर रीतीने जाळतो त्याच मुळ वर्णन ,एक अर्जुन व कृष्ण ऑर्गी सारखी पार्टी करतात त्याचे वर्णन, दिर्घतमा ची कथा, एकेकाचे वेगवेळ्या पद्धतीने होणारे मृत्यु, एकंदरीत बराच म्हणजे बराच भाग रोचक आहे.
28 Aug 2015 - 2:40 pm | प्यारे१
मारवाजी, तुमच्या एकंदर मिपावाटचालीकडं बघितलं तर साधारण जे मत सामान्यपणं सगळ्यांना मान्य आहे, सर्वमान्य आहे त्याच्या विरोधी तुमची मतं असतात.
समलिंगी संबंधापासून अनेक वेळी हे आढळलंय. विरोधी मत असणं हे तुमच्या मताबद्दल सामान्य मत मानायला हरकत नसावी.
28 Aug 2015 - 2:56 pm | अस्वस्थामा
पण प्यारेबुवा, जोवर ते ससंदर्भ बोलतायत तोवर किमान विचारात घ्यायला तरी काही हरकत नाही. :)
उगी विरोधी मत द्यायचं म्हणून देत असतील तर वेगळी बाब.
28 Aug 2015 - 3:07 pm | प्यारे१
जेम्स बॉन्ड च्या चित्रपटात कोलॅटरल डॅमेज भरपूर होतो. एका हिरोईन ला वाचवायला बॉन्ड अनेकांना मारतो. बरं नंतर तिला सुद्धा सोडून देतो. तरी नंतर बॉन्ड च हीरो असतो. का???? कारण चित्रपट त्याचा आहे म्हणून की त्याचा ध्येय मोठं आणि जास्त लोकांच्या फायद्याचं, मानवतेच्या भल्याचं आहे म्हणून? उद्या या मेलेल्या लोकांच्या भोवती कॅमेरा फिरू लागला तर आपल्याला त्यांच्याबद्दल निश्चितपणं करुणा वाटेल. एखादी स्ट्रीप क्लब वाली एक्स्ट्रा आणखी एका चित्रपटाला जन्म देईल. लेखकाचा दिग्दर्शकाचा मुद्दा तो नसतो ना पण?
महाभारतामध्ये काळं पांढरं नाही तर सगळे कमी अधिक करडे आहेत. त्यातल्या कमी करड्यांना विजयी झालेलं दाखवलंय कारण त्यांच्याकडं पांढरा रंग त्या कालाच्या नीतींनुसार जास्त होता. त्यांना विजयी झालेलं दाखवलं की विषय तिथंच संपतो की!
28 Aug 2015 - 4:24 pm | मारवा
तुम्ही वरील महाभारता च्या संदर्भात म्हणत असाल तर निषादी आदिवासी संदर्भातील मत माझे एकट्याचे नाही मला त्याची माहीती महाश्वेतादेवींच्या कुरुक्षेत्रानंतर या पुस्तकावरुन झाली. त्यात निषादी स्त्री व कुंती यांचा एक काल्पनिक संवाद दिलेला आहे. शेवटच्या क्षणी कुंती वणवा येतो व त्यात जळुन भस्म होते ती पार्श्वभुमी वापरुन त्या वेळेस निषादी तिच्याशी एक स्त्री एक माता या नात्याने काल्पनिक संवाद करते अशा अर्थाच एक अप्रतिम कथानक आहे नेमके डिटेल्स आठवत नाही. हे सर्व महाश्वेतादेवींनी लिहीलेल आहे. त्यांनी अनेक वर्ष आदिवासींसाठी कार्य केलेल आहे आपल अवघ जीवन त्यांनी त्यासाठी समर्पित केलेल आहे आपणाला माहीतच असेल. तर त्यामुळे त्यांना त्या आदिवासी स्त्री च दु:ख वेदना अधिक तीव्रतेने कदाचित जाणवली असेल. त्यात त्यांनी दाखवुन दिल की समाजाचा मुख्य प्रवाह इनक्लुडिंग वेद व्यास देखील कीती सहजतेने त्या आदिवासींच्या मृत्युवर गप्प उदासीनतेने किंवा गृहीत धरत होते हक्काने. इ.
महाश्वेतादेवींनी हा स्टार्क कॉन्ट्रास्ट दाखवुन दिला.
तसेच इतर बाबींविषयी पण आहे. तर तुम्हाला माझे मत विरोधी आहे असे का वाटले ?
28 Aug 2015 - 4:35 pm | प्यारे१
महाश्वेतादेवी, इरावती कर्वे, कुरुंदकर आणि सगळेच महाभारतावर भाष्य करणारे लोक. महाभारतकारांना नेमकं काय सांगायचं आहे ते महाभारत वाचून समजेल. त्यावरची भाष्यं वाचून नाही. हेच सगळ्या गोष्टीबाबत (काही अपवाद म्हणजे संतसाहित्य. तिथे बऱ्याचदा मूळ ग्रंथ आणि टीका/ भाष्य यात एकवाक्यता असते)
इतर व्यक्तींकडून तटस्थपणं मत व्यक्त होत नाही. तुमच्याच् मतानं महाश्वेतादेवी यांनी 'काल्पनिक' संवाद लिहिला आहे. त्यावर जास्त भर द्याल की खऱ्या महाभारत रचनेवर? कुरुंदकरांनी इरावती कर्वे यांची मतं खोडून काढली आहेत असं प्रचेतस नं कुठल्याशा धाग्यात दिलं होतं.
मुळात तत्कालीन समाजस्थिति रचना आणि वर्गांची उतरंड याचा आणि आजची स्थिति रचना आणि उतरंड यांच्याशी मेळ बसणार नाही. संत्रा सफरचंद तुलना किंवा एकच वर्ग मानायचा तर साधा आणि हापूस आंबा यात तुलना केल्याप्रमाणं होईल.
28 Aug 2015 - 3:02 pm | जेपी
एस.एल.भैरप्पा लिखीत 'पर्व' ही कादबंरी महाभारतावरील सर्वात भारी रचना आहे.
एका कादबंरी साठी बारा वर्ष अभ्यास करणे हि काय सोप्पी गोष्ट नाही.
28 Aug 2015 - 4:29 pm | मारवा
भैरप्पांनी नियोगाविषयी मोकळेपणाने लिहीलेल आहे. मी इंग्रजी अनुवाद वाचण्याची घोडचुक केली. एकदा मराठी अनुवाद वाचायला हवा.
भैरप्पा सुंदर लिहीतात आणि मुख्य म्हणजे आपल्यावर कुठलाही शिक्का बसेल ( हिंदुवादी) वा आपल्याला कॅटेगराइज केल जाइल या भीतीने त्यांची मते व्यक्त करण्यास ते अजिबात कचरत नाहीत.
28 Aug 2015 - 5:55 pm | मारवा
साधारण जे मत सामान्यपणं सगळ्यांना मान्य आहे, सर्वमान्य आहे त्याच्या विरोधी तुमची मतं असतात.
माझ म्हणण यात तुम्हाला माझ एकट्याच च मत नाही महाश्वेतादेवींनी हि असे मत व्यक्त केले आहे असे म्हणत होतो.
दुसर म्हणजे काल्पनिक कथाच आहे ती मात्र त्यांनी त्याद्वारे निषादीची बाजु वेदना व्यक्त केलेली आहे. जसे कर्णाची बाजु व्यक्त करण्याचा मृत्युंजय हा एक प्रयत्न होता. तो पर्यंत कर्णावर असा विचार क्वचितच व्यक्त झाला असावा. महाश्वेतादेवी कुंती व निषादी दोन्ही स्त्रीया आहेत माता आहेत व कुंतीचा मृत्यु व तिचा मृत्यु जळुन च होतो आदि समान धागे बांधुन ती कथा सुंदर कलात्मक जुळवणी करुन लिहीतात. त्यात त्या निषादी द्वारे कुंती ला जी मुख्य प्रवाहाची प्रतिनीधी आहे तीला तीच्या मुल्यांना (ज्या प्रकारे निषादी व तिच्या मुलाविंषयी उदासीनता खर म्हणजे त्यांचा मृत्यु जसा ओरखडा हि उमटवत नाही या बाबी ) आदि ती क्वेश्चन करते कुंती च्या कॉन्सस ला एक प्रकारे त्या सर्व अभिजन वर्गाला ती चॅलेंज करते तेच महाश्वेतादेवींनी दाखवुन दिलेल आहे. महाश्वेतादेवी हे सर्व परत कलात्मकतेने दाखवुन देतात हे विशेष.
महाभारतकारांना नेमकं काय सांगायचं आहे ते महाभारत वाचून समजेल
पुर्णपणे सहमत आहे मुळ उतारा वाचण व त्यावरुन मत बनविण नंतर ती मते कालसापेक्ष अनुभव सापेक्ष तपासुन/ ताडुन बघण हाच योग्य मार्ग बाटतो.
मुळ उतारा वाचल्यावर (संस्कृत नाही मात्र मुळ संस्कृत चा मराठी अनुवाद एकापाठोपाठ ) मला अनेक नविन गोष्टी कळल्या कधी गंमत वाटते वन जाळणारा पक्षी जाळणारा कृष्ण अर्जुन सर्पसत्राच्या वेळची वर्णन वाचतांना वृक्षवल्ली आम्हा सोयरे गाण कॅसेट वर वाजत होत तेव्हा तुकाराम हे वसुधैव कुटुंबकम ला नंतरच्या काळातील असुनही अधिक जवळ होते असे वाटले.
तुम्ही एकदा अर्जुन कृष्णा च्या सेलीब्रेट केलेल्या एका पार्टीचा मुळ मराठी संस्कृत उतारा एकदा वाचुन पहा तुम्हाला रोचक वाटेल इतक आजकालच्या पार्टीशी ते वर्णन मॅच होत.
महाभारत इंटरेस्टींग आहे फुल ऑफ लाइफ आहे रामायणा सारख बोरींग एकसुरी नाही.
28 Aug 2015 - 6:17 pm | हेमंत लाटकर
धृतराष्टाचे म्हणणे होते मी जेष्ट पुत्र असुनही अंध असल्यामुळे पान्डुला हस्तिनापुरच्या राजगादीवर बसवले.
दुर्याधनाचे म्हणणे होते पाच पांडव हे पान्डुचे पुत्र नसल्यामुळे कौरव घराण्याचे नाहीत. आम्हीच कौरव घराण्याचे खरे वारस, त्यामुळे हस्तिनापुरच्या राजगादीवर आमचाच अघिकार आहे.
28 Aug 2015 - 9:18 pm | कूल बाळ
तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू, कौरव किंवा पांडवकुणीच खरे कुरूवंशी नव्हते, आणि हाच मुद्दा मांडून विदुरनी दुर्योधनाला निरुत्तरकेले होते.
29 Aug 2015 - 8:07 am | हेमंत लाटकर
तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू, कौरव किंवा पांडवकुणीच खरे कुरूवंशी नव्हते,???
धृतराष्ट, पन्डु हे सत्यवती पुत्र व्यासापासून जन्मले म्हणून त्यांचा कुरू वंशाची थोडा संबध येतो. पण पाच पांडव हे कोणापासून झाले अज्ञात आहे. (देवापासून झाले हा तर्क)
29 Aug 2015 - 10:51 am | कानडा
१. धृतराष्ट, पन्डु हे सत्यवती पुत्र व्यासापासून जन्मले म्हणून त्यांचा कुरू वंशाची थोडा संबध येतो. >> सत्यवती पुत्र व्यासापासून जन्मले म्हणून नाही, राजमातेच्या संमतीने नियोग पद्धतीने जन्मले म्हणुन ते कुरू वंशीय आहेत.
२. "त्या काळातील" प्रचलीत पद्धतीनुसार आई ने जर सांगितले की हा माझा माझ्या नवर्याच्या संमतीने झालेला मुलगा आहे तर ते "त्या वेळच्या" धर्मानुसार (==कायद्यानुसार) न्यायसंमत होते आणि आईने सांगितलेला बापच अधिकृत बाप मानला जात होता. त्यामुळे पांडव हे पांडुपुत्रच होते.
28 Aug 2015 - 11:14 pm | बोका-ए-आझम
यांनी लिहिलेल्या ' हा जय नावाचा इतिहास आहे ' बद्दल काय मत आहे? युधिष्ठिर जर आजच्या काळात असता तर त्याने साधल्यांवर अब्रूनुकसानीचा दावा नक्कीच केला असता. वाईट झोडलाय त्यात युधिष्ठिराला. मुंबईच्या भाषेत सांगायचं तर राशनपानी देकर मारेला है!
29 Aug 2015 - 10:07 am | जेपी
भागवत बाईंचे 'व्यासपर्व',
इरावती कर्वेंच 'युगांत',
कुरुदंकरांच 'व्यासशिल्प',
भैरप्पा यांच 'पर्व',
मुत्युजंय यांचे लेख,
चित्रगुप्त यांचे" कोणी घडवल महाभारत"
एवढ वाचल्यावर आता काय डोक्यात जागा नाय
24 Jun 2018 - 8:14 am | चित्रगुप्त
जेपी साहेब, आनंद साधले यांचे 'हा जय नावाचा इतिहास आहे' वाचले नसेल तर अवश्य वाचावे असे सुचवतो.
29 Aug 2015 - 10:38 am | मारवा
पीटर ब्रुक यांचे महाभारत जोडावे.
29 Aug 2015 - 10:57 am | कानडा
महाभारतावर सुरूवातीपासुन नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की स्त्रीयांच्या शब्दावरचा विश्वास कमी होत गेलेला आहे. ऊदा. सत्यवती तिच्या लग्नाआधीच्या मुलाबद्दल (व्यास) लपवत नाही. पण दोन पिढ्यांनंतर कुंतीला अगदी तश्याच परिस्थीतीत जन्मलेल्या कर्णाबद्दल कुणालाही न सांगता लपवावे लागते.
29 Aug 2015 - 8:24 pm | बोका-ए-आझम
हा सरळसरळ जात आणि वंश यांच्याशी आहे. सत्यवती ही कोळीण होती. मत्स्यगंधा हे नाव तिलाच उद्देशून आहे. कुंती ही राजकन्या होती. मानसन्मानाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या. पुढे द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून आपल्या स्वयंवरात भाग घेऊ दिला नव्हता. त्यामुळे स्त्रियांच्या शब्दांपेक्षा सामाजिक बंधनांचा मुद्दा हा जास्त महत्वाचा असावा असं वाटतं.
29 Aug 2015 - 2:14 pm | हेमंत लाटकर
मला वाटते सत्यवतीने महाराज शान्तनुला सांगितले नसावे. महाराज शान्तनुला चित्रानंद व विचित्रवीर्य ही दोन मुले झाली आणि मुले लहान असतानाच महाराज शांन्तनुचे निधन झाले. भीष्माने या मुलांचे पालनपोषण केले. चित्रानंदाला राजगादीवर बसवले. पण गंधर्वा बरोबर झालेल्या युद्धात तो मारला गेला. त्यानंतर भीष्माने विचित्रवीर्याला राजगादीवर बसवले व त्याचा विवाह अबिका, अंबालिका बरोबर लावून दिला. परंतु विचित्रवीर्याचा क्षयाने मृत्यु झाला. विचित्रवीर्याला मुले न झाल्यामुळे त्याकाळातील नियोग पद्धतीप्रमाणे माता सत्यवतीने आधी भीष्माला विचारले त्याने नकार दिल्यामुळे नंतर व्यासाला विचारले . व्यासापासून अंबिकेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पन्डु न अंबालिका दासीला विदुर असे तीन पुत्र झाले.
29 Aug 2015 - 2:53 pm | कानडा
>> महाराज शान्तनुला चित्रानंद व विचित्रवीर्य ही दोन मुले झाली >> चित्रानंद नव्हे चित्रांगद
29 Aug 2015 - 3:47 pm | हेमंत लाटकर
चित्रानंद नव्हे चित्रांगद???
बरोबर
29 Aug 2015 - 2:42 pm | द-बाहुबली
चला चर्चेद्वारे महाभारताची खिल्ली वाढवू......
31 Aug 2015 - 7:34 pm | चित्रगुप्त
वरील अगदी पहिल्या प्रतिसादात महाभारतावरील माझ्या लिखाणाचा उल्लेख आलाय, म्हणून माझ्या त्या सर्व लिखाणाचे दुवे एका नवीन धाग्यात दिले आहेतः
अजब महाभारत
http://www.misalpav.com/node/32588
31 Aug 2015 - 11:46 pm | शिवोऽहम्
आप, ध्रुव, सोम, धर्म, अनल, अनील, प्रत्युष आणि प्रभास.
देवव्रत भीष्म हा प्रभास वसूचा अंश म्हणावा..