गीता

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in काथ्याकूट
9 Dec 2008 - 3:10 pm
गाभा: 

युक्ताहारविहारस्य युक्तचेश्टस्य कर्मसु|
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा||
तर मित्रानो,
आज गीता जयंती ,
वरील श्लोकाप्रमाणे अनेक श्लोकातुन जीवन तत्वज्ञान सांगणारी भगवद्गीता.
याच दिवशी(तिथीनुसार्)श्रीकृष्णाने गीता सांगीतली.किती वर्षापुर्वी त्यावर अनेक वादविवाद आजही चालु आहेत.
आपण सर्वानी गीता वाचली असेल मनन केले असेल निदान ती चाळली असेल .
गीतेचा कालावधी बराच जुना आहे.इतके वर्ष गीता जगाला मार्गदर्शन करत आहे हेच गीतेचे वैशिश्ट्य आहे.
गीतेवर अनेक वादविवाद झाले.प्रथम ती वेदान्विरुद्ध आहे असे म्हटले गेले मात्र ती वेदविरोधी नाही.त्यात वेद(ज्यांचे स्थान कोणी कितिहि नाकारले तरी अढळ आहे)आणि ढासळणारी परिस्थिती यांचा समन्वय साधला आहे.याशिवाय तो ब्राम्हणांचा ग्रंथ हा दुसरा वाद.प्रत्यक्षात गीता सांगीतली कृष्णाने जो क्षत्रिय.(कृष्णासारख्या व्यक्तीबद्दल जातीचा उल्लेख येत आहे,याबद्दल क्षमस्व )तरी यावर खुप चर्चा झाली.आणि तिसरे त्याचे अनेक धर्मविरोधी उपदेश(हा अरोप अनेक हिंदु कट्टरपंथी आजही करतात) मात्र येथे त्याची दुरदृष्टी होती.पुन्हा ती भुमिका समन्वयवादी होती .माझ्यामते गीता ही जग्नमान्य आहे .माझ्यामते तो सर्वोत्तम ग्रंथ आहे .सामान्याना न समजणारा वेद त्याने अवघ्या ७०० श्लोकात जगाला सांगीतला.(लहान तोंडी मोठा घास घेतोय जाहीर माफी)
आणी हो आता दोन महत्वाचे प्रश्न
१.गीता अस्तीत्वात आहे का?
हो.तुम्ही देवाला माना अगर मानु नका .पण जे म्हणतात की जे जगात आहे तेच आम्ही मानतो तर गीता लिखित स्वरुपात आहे त्यामुळे ती मानायला माझ्या मते काही हरकत नाही .(अनेक धर्म न मानणारे व्यक्ती हा प्रश्न विचारतात.)
२.आम्ही गीताच का वाचायची ?
तर मित्रानो आतापर्यंत तुम्ही अनेक लेखन वाचले असेल त्याने काही जग बदलले नाही नाहीतर आता जगात शांतता नांदली असती.
आणि गीता युद्धकाळात लिहिली आहे ज्या काळातुन सध्या आपण जात आहोत.आणि निदान एक उत्कृष्ट वांडःम्य म्हणून तुम्ही गीता नाकारु शकत नाही .मग वाचायला काय हरकत आहे?
ही माझी गीतेबद्दलची काही प्रामाणीक मते.
पण येथे माझ्यापेक्षा लाखपटीने हुशार आणि अनुभवी माणसे आहेत आणि गीतेचे विवेचन कोण एकटा करु शकत नाही .(मी तर नाहीच नाही.)
तर माझी आपणाला नम्र विनती आहे की येथे आपण गीतेबद्दलची आपली सर्व मते मांडावीत .त्यातील विचार ,चांगल्या गोष्टी,वाइट गोष्टी यावर उहापोह व्हावा कारण तो उपयोगी आहे .
तर कृपया येथे या वाचा आणि बिनधास्त बोला.
(खरे तर या विषयावर बोलायची माझी लायकी नाही,पण विषय मांडायचा या हेतुने प्रेरित होवुन मी हे विचार मांडले आहेत्.चुक भुल द्यावी घ्यावी)

प्रतिक्रिया

सुनील's picture

9 Dec 2008 - 3:36 pm | सुनील

अवांतर -
१.गीता अस्तीत्वात आहे का?
म्हणजे काय? किमान तीन गीतांना मी ओळखतो!

२.आम्ही गीताच का वाचायची ?
सक्ती नाही. मीता अथवा प्रीता आवडत असल्यास तीला वाचा!!

युक्ताहारविहारस्य युक्त्चेश्टस्य कर्मसु|
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा||
डोक्यावरून गेले!!

आता मुद्याचे -
तर माझी आपणाला नम्र विनती आहे की येथे आपण गीतेबद्दल्ची आपली सर्व मते मान्डावीत .त्यातील विचार ,चान्गल्या गोश्टी,वाइट गोश्टी यावर उहापोह व्हावा कारण तो उपयोगी आहे .
नक्कीच वाचायला आवडेल

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2008 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा
म्हणजे काटेकोर पणे आहार, निद्रा , विहार ह्यांची तत्वे पाळतो (वेळच्या वेळि झोप, झोपण्याच्या व उठण्याच्या नियमीत वेळा, सकस व ठरलेल्या वेळी योग्य आहार, वेळच्या वेळी उपवास ), तसेच जो निरंतर कर्म (अशी कामे जी सतत दुसर्‍यांना सुख देतील व त्याबदल्यात कुठलीहि अपेक्षा न ठेवता) करतो त्याच्या साठी हा योग दु:खाचा अंत करणारा असतो.
हा सहाव्या "आत्मसंयम योग " ह्या अध्यायातला हा श्लोक आहे.

१.गीता अस्तीत्वात आहे का?
हा प्रश्न कळाला नाही. ति एक सत्यच आहे, फक्त मुळ गीता आणी नविन (सध्या आपण बघतो ती) ह्या दोघिंमध्ये फरक आहे असा काहि महानुभवांचा दावा आहे. त्यांच्यामते जुन्या गीतेत अकारण काहि श्लोक घुसडले गेले आहेत. गीता मुळ ७०० श्लोकांची असुन नविन गीता ७४५ ची आहे. ( मला नक्कि आठवत नाहिये. काहि चुकत असल्यास चुक सुधारण्यास मदत करावी.)

२.आम्ही गीताच का वाचायची ?
कारण रामायण , महाभारत आणी गीता ह्या मध्ये आलेले नाहि असे य जगात काहिहि नाहि ! अगदि यंत्रांच्या वर्णनापासुन, कथांपर्यंत.
महाभारतात 'भिष्मपर्वा' मध्ये अध्याय २३ ते ४० या मध्ये गीता आली आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन करणे हा गीता वाचन व पालन करणार्‍यांचा प्रमुख उद्देश. ज्ञानयोग , कर्मयोग, भक्तीयोग अशात ति विभागलेली आहे.
गीतारहस्य (बाळ गं. टिळक), गीताई (विनोबा भावे), योगी अरविंद, राधाक्रिश्नन ह्यांच्या गीता ह्या सर्वात जास्त प्रमाणात वाचल्या जातात.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

लिखाळ's picture

9 Dec 2008 - 9:18 pm | लिखाळ

श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगीतलेली गीता ७०० श्लोकांची आहे. १३ व्या (बहुधा) अध्यायाच्या सुरुवातीचा श्लोक क्षेत्रक्षेत्रज्ञ विवेक म्हणजे काय वगैरे बद्दल आहे तो प्रक्षिप्त असावा असे शंकराचार्यांचे मत आहे. तो वगळता गीता ७०० श्लोकांची होते. टिळकांनी याच कारणाने तो श्लोक गीतारहस्यामध्ये वगळला आहे. यासंबंधी अधिक माहिती गीतारहस्याच्या प्रस्तावनेत वाचायला मिळेल. गीता कोणकोणत्या आहेत? भगवद्गीता नक्की कोणती? वगैरे बद्दल बराच उहापोह प्रस्तावनेत आहे.
-- लिखाळ.

विकास's picture

9 Dec 2008 - 5:24 pm | विकास

वरील श्लोक आणि त्या आधीचा श्लोक विनोबाकॄत मराठी गीताईत असा दिला आहे. (आधीचा श्लोक दिल्याने या श्लोकाचा अर्थ जास्त लक्षात येतो):

न योग फार खाऊनि किंवा खाणे चि सोडुनी ।
न फार झोप घेऊनि किंवा जागत बैसुनी ॥ ६-१६ ॥

निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि ।
मोजूनि करितो त्यास योग हा दुःख-नाशन ॥ ६-१७ ॥

बाकी प्रतिक्रीया नंतर...

विनायक पाचलग's picture

9 Dec 2008 - 9:58 pm | विनायक पाचलग

सर्वाना अगदी मनापासुन धन्यवाद.
खुप छान माहीती मिळाली
कुणीतरी येथे पण चेश्टा केली आहे पण जावु द्फे
येथे विचारान्बद्दल देखील चर्चा व्हावी ही अपेक्शा आहे.

सुनील's picture

11 Dec 2008 - 6:01 pm | सुनील

कुणीतरी येथे पण चेश्टा केली आहे पण जावु द्फे

अहो, चेष्टेतले गुद्दे जरूर मारले आहेत पण मुद्द्याचेही लिहिले आहे की!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

11 Dec 2008 - 9:57 am | विसोबा खेचर

"अरे श्याम, ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे बाबा ते. पण आपण नाही ना एवढे थोर!"

इति काकाजी, नाटक - तुझे आहे तुझपाशी.

:)

केवळ_विशेष's picture

11 Dec 2008 - 4:12 pm | केवळ_विशेष

१.गीता अस्तीत्वात आहे का?
म्हणजे काय? किमान तीन गीतांना मी ओळखतो!

:) :) :)

अप्पासाहेब's picture

11 Dec 2008 - 5:53 pm | अप्पासाहेब

गीताभवन , ईड्ली सांभार व डोश्यासाठी , नंतर बाहेरच्या बाजुला बाबु कुल्फीवाल्याची थंडगार , करकरीत कुल्फी चापावी , तसेच पुढे जाउन सलीममिया चे बनार्सी पान , वा क्या बात है.

ही आमची गीता, हा च आमचा कर्मयोग.
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते

विनायक पाचलग's picture

11 Dec 2008 - 7:54 pm | विनायक पाचलग

सर्व जणाना मनापासुन धन्यवाद.
मात्र एक गोश्ट मी मनापासुन सान्गु इछितो की हा विशय मी चश्टेसाठी काढलेला नाही .

तात्या,
मला मान्य आहे की ह्या विशयाबाबतीत आपण सारेच लहान आहोत.
पण माझ्या मते आता परिस्थीतीच अशी निर्माअण झाली आहे की आपणाला शान्ततामय जीवनासाठी गीतेचा त्यातील तत्वज्ञानाचा विचार करावयास हवा.
आजकाल गीतेतील विचार जाणन्यापेक्षा लोक त्यावर वाद रन्गवत बसतात .ते टाळुन त्यावर मन्थन व्हावे या हेतुने गीता जयन्तीचा मुहुर्त साधुन मी हा विशय टाकला होता.
अजुन्ही मी अशी अपेक्शा करतो की येथे या विशयावर योग्य चर्चा होइल.

शक्तिमान's picture

11 Dec 2008 - 10:39 pm | शक्तिमान

मला मान्य आहे की ह्या विशयाबाबतीत आपण सारेच लहान आहोत.
पण माझ्या मते आता परिस्थीतीच अशी निर्माअण झाली आहे की आपणाला शान्ततामय जीवनासाठी गीतेचा त्यातील तत्वज्ञानाचा विचार करावयास हवा.
आजकाल गीतेतील विचार जाणन्यापेक्षा लोक त्यावर वाद रन्गवत बसतात .ते टाळुन त्यावर मन्थन व्हावे या हेतुने गीता जयन्तीचा मुहुर्त साधुन मी हा विशय टाकला होता.

हा प्रतिसाद वाचल्यावर आपल्याला बुवा पु.लं. च्या सखाराम गटणेची आठवण झाली! :)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2008 - 8:21 pm | परिकथेतील राजकुमार

>>पण माझ्या मते आता परिस्थीतीच अशी निर्माअण झाली आहे की आपणाला शान्ततामय जीवनासाठी गीतेचा त्यातील तत्वज्ञानाचा विचार करावयास हवा
पै. हे वाक्य मात्र आम्हाला खरच कळाले नाहिये बघा ! जरा खोलात जाउन समजवाल का ? नक्की गीतेतल्या कोणत्या तत्वज्ञाना बद्दल आपण बोलत आहत ? आणी अगदि खरे खरे सांगा, आपण गीता वाचली आहे का ??

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

शंकरराव's picture

11 Dec 2008 - 8:41 pm | शंकरराव

गीतेमधील तत्वज्ञान अतिषय उच्चदर्जाचे आहे. जे आज आत्मसात करण्याची गरज आहे.
अधूनिक जगातिल सर्व मानवी व्रुत्ती-प्रव्रुत्ती आणि समस्यांचे दाखले महाभारतात सापडतात.
गीतेमधील तत्वज्ञानाने आजच्या समस्यांचे निराकारण करणे सहज होउ शकते.

आत्म्याचे परमात्म्याशी मिलन करणे हा गीता वाचन व पालन करणार्‍यांचा प्रमुख उद्देश.
प रा शी सहमत
गीता जयन्तीचा मुहुर्त साधुन हा विशय टाकल्या बद्द्ल को दा ला शूभेच्छा
व विषय योग्य दिशेने गतीमान रहावा हि ईच्छा :)

जसे एक तरि ओवी अनुभवावी.. ..

कलंत्री's picture

11 Dec 2008 - 9:01 pm | कलंत्री

"गीता" या अध्यात्मिक ग्रंथाला घरोघरी नेण्याचे श्रेय गीताप्रेस गोरखपूर ला द्यायला हवे.

माझ्या माहितीप्रमाणे गीता ही ७०० श्लोकात होती. त्या श्लोकांना अध्यायात विभागणी गीताप्रेसवाल्यांनी केली.

भारतातील स्वातंत्र्य आंदोलनात गीता या धर्मग्रंथाने अनेकांना प्रेरणा आणि मार्ग दाखविला. अनेक क्रांतिकारकांनी फासावर जाण्यापूर्वी गीतेची प्रत हातात ठेवली होती.

विनोबांची गीताप्रवचने एकदातरी वाचायला हवीच.

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 12:04 am | लिखाळ

> माझ्या माहितीप्रमाणे गीता ही ७०० श्लोकात होती. त्या श्लोकांना अध्यायात विभागणी गीताप्रेसवाल्यांनी केली. <
मी याबाबत कधी विचारच केला नव्हता. पण वरवर पाहता गीतेची अध्यायांत विभागणी व्यासांनीच महाभारतात करुन ठेवली असावी असे वाटते.

गीतारहस्यात अध्यायानुसार विवेचन आहे. गीतारहस्य १९१६ मध्ये प्रकाशित झाले आणि गीताप्रेस गोरखपुरची स्थापनाच १९२३ ची दिसते. त्यामुळे हे गोरखपुरकरांचे काम नाही निश्चित :)

-- लिखाळ.

कलंत्री's picture

12 Dec 2008 - 8:34 pm | कलंत्री

माझे विधान कालसुसंगत दिसत नाही. परत एकदा माझ्या माहितीच्या स्त्रोताची तपासणी करावयाला हवी.

एक मात्र खरे मुळ महाभारतात मात्र अशी विभागणी नव्हती.

खरे तर मी थोडा विचार केला असता तर ज्ञानेश्वरीही सुद्धा अध्यायाच्या अनुषंगानेच लिहिलेली आहे. म्हणजे एकतर मुळमहाभारतात अशी विभागणी असावी अथवा नंतर कधीतरी झाली असावी.

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 8:50 pm | लिखाळ

:) वास्तविक मी प्रतिसाद दिल्यावर थोड्या वेळाने मला सुद्धा ज्ञानेश्वरीची आठवण झाली. आणि उगीच गीताप्रेस आणि काय काय गुगलत बसलो असे वाटले...
पाहु.. कुणी याबद्दल अधिक माहिती दिली तर बरेच आहे.
-- लिखाळ.

विनायक पाचलग's picture

13 Dec 2008 - 9:22 am | विनायक पाचलग

मला मिळालेल्या माहितीनुसार ही विभागणी बरीच पुर्वी झाली आहे.गीतेत कृश्णासोबत अर्जुन्,सन्जय यासन्दर्भातील वा यन्चे श्लोक असल्याने(नीट माहिती नाही,क्षमस्व)विभग वगैरेवरुन वाद झाला होता असे समजले.
गीतेवर आता वैचारीक चर्चा अपेक्षीत

प्राजु's picture

11 Dec 2008 - 9:56 pm | प्राजु

प्रत्यक्शात गीता सान्गीतली क्रुश्णाने जो क्शत्रिय
माझ्यामते श्री कृष्ण हा यादव होता. म्हणजे यदुवंशीय..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2008 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार

>>प्रत्यक्शात गीता सान्गीतली क्रुश्णाने जो क्शत्रिय
>>माझ्यामते श्री कृष्ण हा यादव होता. म्हणजे यदुवंशीय..
ह्या अवताराला कुठल्याशी जातीशी वा कुळाशी जोडणे योग्य वाटत नाही. स्वतः क्रुष्णानी सांगीतल्या प्रमाणे मानव हा एकच धर्म आहे, आपण जन्म त्याच्या शरीरातुन घेतो आणी आपला शेवटही त्याच ठिकाणी जाउन होतो. जर विश्वरुप दर्शनाचा प्रसंग नीट वाचला तर हे आपल्या ध्यानात येइल. रामायणात जेंव्हा वाली ने रामाला लपुन बाण चालवल्याबद्दल दोष दिला आणी त्या क्रुत्याच्या जाब विचरला तेंव्हा त्याने विचारलेल्या प्रश्नांपैकी एका प्रश्नाला उत्तर देताना श्रीराम असे सांगतात की मनुष्याचा धर्म वा जात त्याच्या जन्मानी न्हवे तर कर्मामुळे ठरते. मानव जन्म घेउन नंतर राक्षस झालेले वा पुण्यकर्मानी राक्षस योनितुन मुक्ती पाउन मानव झालेले अनेक लोक तेंव्हा अस्तित्वात होते. आणी क्रुष्णाचा जन्म हा वसुदेव व देवकी च्या पोटि झाला होता. फक्त त्याचे पालन पोषण गोकुळात यादव वंशात झाले होते. श्री क्रुष्णाचे वडिल वसुदेव हे शुरसेनाचे पुत्र होते व राजा होते, त्यामुळे राजा ह्या नात्याने ते भुपती अर्थातच ब्राम्हण व जनतेचे रक्षण करण्यास सशस्त्र कटिबद्ध ह्या नात्याने क्षत्रिय सुद्धा म्हणता येत होते.
अवांतर :- आतापर्यंत जगात दोनच पुर्ण पुरुष जन्माला येउन गेले व ते म्हणजे श्री क्रुष्ण व अर्जुन होय. ह्या दोघांनाही स्तन न्हवते.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

12 Dec 2008 - 9:37 am | विनायक पाचलग

सर्वान्चे अगदी मनापासुन आभार्.गीता प्रेस्स वाल्यानी केलेले प्रयत्न अजोड आहेत आणि हो स्वाध्याय सारख्या चळवळीनी ही खुप काम केले आहे.
गीतेतील विचार्,आतच्या जीवनात त्यान्चा उपयोग याबद्दल आपले मत काय आहे?

गीतेचे अर्थ अनेक विचारवंतांनी आपापल्यापरीने सांगितले आहेत.

लोकमान्यांना गीतेत कर्मयोग दिसला तर गांधी-विनोबांना त्यात भक्तीयोग. पांडुरंगशात्री आठवल्यांना त्यात स्वाध्याय योग दिसला.

पैकी, कर्मयोग आणि भक्तीयोग बर्‍यापैकी समजू शकतात (संपूर्ण जरी नसले तरी) पण स्वाध्याय योगाबद्दल कुणी अधिक माहिती दिली तर उत्तम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक पाचलग's picture

13 Dec 2008 - 6:16 pm | विनायक पाचलग

लवकरच देइन माहिती

विनायक पाचलग's picture

16 Dec 2008 - 10:13 am | विनायक पाचलग

अधिक माहितीसाठी या सन्केत्स्थळाला भेट द्या .
येथे आपणास स्वाध्यायासंबंधी सर्व माहिती मिळेल.
http://www.dadaji.net/

सुनील's picture

16 Dec 2008 - 2:19 pm | सुनील

माहितीबद्दल धन्यवाद. तसे तत्वज्ञान विद्यापीठही ठाण्याततच आहे. तेथेही जाऊन काही माहिती मिळेल का ते पहातो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.