मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे.....मला एका समारंभानिमित्त २५ जणांना मराठी पुस्तक गिफ्ट द्यायची आहेत. तर तुम्ही मला काही चांगल्या मराठी पुस्तकांची नावं सुचवु शकाल का?
दळवींच्या लहानपणीच्या आठवणी, त्यातून रंगणारी भावल्या किलिंडर, नरू, पावटेमास्तर, वामनदाजी, बाबुली, आबा, झिलू केदार, केशा चांभार, काळ्या माठाला पाय फुटून तो तुरूतुरू चालत आहे असं वाटणारा तात्या रेडकर इत्यादी व्यक्तिचित्र, याचं वर्णन करणारं हे एक छोटेखानी पुस्तक आहे! :)
सर्वांना एकच पुस्तक देण्यापेक्षा २५ जणांना २५ वेगवेगळी पुस्तके द्या. म्हणजे आपापसात देवाण-घेवाण (वाचण्यापुरती) होऊन, सर्वांना २५ निरनिराळ्या पुस्तकांचा आस्वाद घेता येईल.
पुल, जयवंत दलवी, वपु ही नावे चटकन सुचतात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मनोहर जोशी वारंवार विमान प्रवास करतात. 1A हि त्यांची आवडती सीट.
त्यांच्या शेजारच्या म्हणजे 1B सीट वर अनेक नामांकीत व सामान्य व्यक्ती बसतात.
त्या पैकी निवडक व्यक्तींशी मारलेल्या गप्पांवरून लिहिलेले हे व्यक्तिचित्रांचे हे पुस्तक आहे.
विविध वयाची, विविध क्षेत्रातल्या मात्तबर मंडळींबद्दल तसेच सामान्य परंतू काही वैशिष्ट्य पूर्ण व्यक्ती (जसे त्यांना भेटलेली एक चिमुरडी) ह्यांच्या बद्दल लिहिलेले एक सुंदर पुस्तक.
पु.लंचे कुठलेहि (खरंतर इथेच २०-२५ उत्तम पुस्तकं झाली :) .. त्यातहि अपूर्वाई, पुर्वरंग, जावे त्यांच्या देशा
अनिल अवचट यांचे "कार्यरत"
प्रकाश नारायण संतांचे कुठलेहि (झुंबर,पंखा, ....वगैरे वगैरे)
वि.सा. खांडेकरांच्या क्रौंचवध / ययाती
वीणा गवाणकरांचे "एक होता कार्व्हर"
रारंगढांग
हि झाली काहि (माझ्याकडून इतरांना) साधारणतः भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके. अजून अनेक अनवट सुंदर पुस्तके आहेत.. परंतु ज्याच्या आवडीनिवडी माहित नसतात त्यांना वरील पैकी एक पुस्तक देतो :)
१. शाळा - मिलिंद बोकिल
२. हसवणूक - पु.ल. देशपांडे (संकलन - जयवंत दळवी )
३. तोत्तोचान
४. चीपर बाय द डझन - अनुवाद : मंगला निरगुडकर
५. मिरासदारी - द. मा. मिरासदार
६. नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे
७. छंदाविषयी - अनिल अवचट
८. कोसबाडच्या जंगलात - अनुताई वाघ
९. माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग
साने गुरुजी लिखीत
श्याम ची आई , The best one I have ever read
धडपडणारी मुले
जयन्त नार लीकर लिखीत
GANIT ANI VIDNYAN
YAKSHANCHI DENAGI
KHAGOLSHASTRACHE VISHVA
~ वाहीदा
मिन्टे.... साधारण पन्नाशीनन्तर... मनुष्याचा वानप्रस्थाश्रम सुरु होतो.....
त्यामुळे काही पुस्तकांची नावे सुचवत आहे.. अर्थात ज्यांना अध्यात्म किन्वा तत्सम आवड असेल्..आणि विचारांची खोली असेल... त्यांना ही पुस्तके द्यायला हरकत नाही...
१. ""मृत्यूनन्तरचे जीवन"" .
ले.: श्री. अरविंद देशपांडे.
२. ""साद देती हिमशिखरे""
ले.: श्री. आनंद प्रधान.
३. ""पृथ्वीवर माणूस उपराच""
ले.: श्री. सुरेशचंद्र नाडकर्णी.
आणि अजुन.. पुल., व.पु... जयवन्त दळवी...'तें'.. बेस्टच आहेत..
:)
उपरा का उपडा? 11 Dec 2008 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
३. "पृथ्वीवर माणूस उपराच"
ले.: श्री. सुरेशचंद्र नाडकर्णी.
उपरा का उपडाच?
मला हे पुस्तक अजिबातच पटलं नाही, त्यामुळे आवडलं नाही. माझं या पुस्तकाबद्दलचं मतः लेखकाची "गोष्ट" सांगण्याची पद्धत फार चांगली आहे. पण आवड प्रत्येकाची, कसं?
मी डॉ. ठाकूर यांचे "संगीत सरिता" हे पुस्तक सुचवितो. यांत शंभरावर रागांची अगदी जुजबी माहिति दिली आहे. मुख्य म्हणजे त्या रागांमध्ये असलेली मराठी आणि हिंदी गाणी दिली आहेत. त्यामुळे सामन्यांना शास्त्रीय संगिताची गोडी लागेल.
लेखक डॉ. विश्वास पाटील. (नेताजींचा संपूर्ण जीवनपट व संघर्ष उत्तम साकारला आहे)
साक्षिदेवा, तुझी सूचना उत्तमच आहे, अरे पण त्या अमृता अमितचा काहितरी विचार कर! नेताजी या पुस्तकाची किंमत जवळपास ६०० रुपये आहे आणि तिला २५ लोकांना हे पुस्तक द्यायचे आहे!
मुक्तसंगः अनहंवादि
श्री ज्ञानेश्वरी अनुवाद: प्रकाशक - श्री स्वामी वरदानंद भारती प्रतिष्ठान, पंढरपूर
अनुवादकः श्री स्वामी वरदानंद भारती (अनंतराव आठवले)
प्रचलित मराठीत, रसाळ व प्रासादिक ओवीबद्ध अनुवाद. वाचक, अभ्यासक व साधक या सर्वांना उपयुक्त!
वाचनसुलभ - डाव्या पानावर मूळ ज्ञानेश्वरी व समोर उजव्या पानावर त्याच ओव्यांचा समर्थ अनुवाद. अक्षरे मोठी.
अवांतरः स्वामींची अन्य ग्रंथसंपदाही खूप आहे. (तिचा परिचय - सविस्तार लिहायचाय! पण पुन्हा केव्हातरी)
प्रतिक्रिया
11 Dec 2008 - 12:20 pm | विसोबा खेचर
सारे प्रवासी घडीचे हे जयवंत दळवींचे पुस्तक सगळ्यांना भेट म्हणून द्या..
फारच सुरेख व निखळ मनोरंजन करणारे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने तुमची एक छान आठवण नेहमीच सर्वांपाशी राहील.. :)
आपला,
(दळवीप्रेमी) तात्या.
11 Dec 2008 - 12:55 pm | मिंटी
धन्यवाद तात्या. पण हे पुस्तक कुठल्या विषयावर आहे हे कळेल का ?
11 Dec 2008 - 12:59 pm | विसोबा खेचर
दळवींच्या लहानपणीच्या आठवणी, त्यातून रंगणारी भावल्या किलिंडर, नरू, पावटेमास्तर, वामनदाजी, बाबुली, आबा, झिलू केदार, केशा चांभार, काळ्या माठाला पाय फुटून तो तुरूतुरू चालत आहे असं वाटणारा तात्या रेडकर इत्यादी व्यक्तिचित्र, याचं वर्णन करणारं हे एक छोटेखानी पुस्तक आहे! :)
आपला,
(मालवणी) नरूतात्या.
11 Dec 2008 - 12:20 pm | यशोधरा
काय वयोगट आहे?
11 Dec 2008 - 12:21 pm | मिंटी
सर्व जण पन्नाशी ओलांडलेले आहेत...
13 Dec 2008 - 7:30 pm | जनोबा रेगे
पन्नाशी पुढचे असतील तर..
१) गरूडपुराण
२) मुमुक्षू
३) जीवन-गीता
४) तत्वज्ञान मासिकाचे जुने अ॑क
५) व इतर बरीच डे॑गळेकालीन डभोई..:)
(ह.घ्या.न.सा॑)
11 Dec 2008 - 1:10 pm | सागर
पु.ल. देशपांडे यांची अपूर्वाई अथवा व.पु.काळे यांचे पार्टनर एक चांगला पर्याय ठरेल
11 Dec 2008 - 1:19 pm | टारझन
हल्ली प्रभू सरांना एक पुस्तक प्रकाशित करावं असं सुचवतोय .. ते येईल का पन्नाशीच्या पुढच्या लोकांच्या कामाला ?
- टारझन
11 Dec 2008 - 1:23 pm | अवलिया
प्रभुंची लीला अगाध आहे.
पन्नाशीच्या पुढ्चे पन्नाशीच्या आत येतात अन वयात नसलेले मतदार होतात
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
11 Dec 2008 - 1:32 pm | मिसंदीप
"जरा चौकटीबाहेर" नावाचे एक पुस्तक पण छान आहे.(लेखक - बर्वे)
11 Dec 2008 - 1:46 pm | सुनील
सर्वांना एकच पुस्तक देण्यापेक्षा २५ जणांना २५ वेगवेगळी पुस्तके द्या. म्हणजे आपापसात देवाण-घेवाण (वाचण्यापुरती) होऊन, सर्वांना २५ निरनिराळ्या पुस्तकांचा आस्वाद घेता येईल.
पुल, जयवंत दलवी, वपु ही नावे चटकन सुचतात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Dec 2008 - 2:17 pm | संजय अभ्यंकर
मनोहर जोशी लिखित 1B
मनोहर जोशी वारंवार विमान प्रवास करतात.
1A हि त्यांची आवडती सीट.
त्यांच्या शेजारच्या म्हणजे 1B सीट वर अनेक नामांकीत व सामान्य व्यक्ती बसतात.
त्या पैकी निवडक व्यक्तींशी मारलेल्या गप्पांवरून लिहिलेले हे व्यक्तिचित्रांचे हे पुस्तक आहे.
विविध वयाची, विविध क्षेत्रातल्या मात्तबर मंडळींबद्दल तसेच सामान्य परंतू काही वैशिष्ट्य पूर्ण व्यक्ती (जसे त्यांना भेटलेली एक चिमुरडी) ह्यांच्या बद्दल लिहिलेले एक सुंदर पुस्तक.
अगदी भेट देण्या योग्य!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
11 Dec 2008 - 2:18 pm | ऋषिकेश
हि झाली काहि (माझ्याकडून इतरांना) साधारणतः भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके. अजून अनेक अनवट सुंदर पुस्तके आहेत.. परंतु ज्याच्या आवडीनिवडी माहित नसतात त्यांना वरील पैकी एक पुस्तक देतो :)
-(गोंधळलेला) ऋषिकेश
11 Dec 2008 - 2:42 pm | दत्ता काळे
अजून काही पुस्तके :
१. शाळा - मिलिंद बोकिल
२. हसवणूक - पु.ल. देशपांडे (संकलन - जयवंत दळवी )
३. तोत्तोचान
४. चीपर बाय द डझन - अनुवाद : मंगला निरगुडकर
५. मिरासदारी - द. मा. मिरासदार
६. नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे
७. छंदाविषयी - अनिल अवचट
८. कोसबाडच्या जंगलात - अनुताई वाघ
९. माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग
अजून बरीच आहेत . . .
11 Dec 2008 - 3:14 pm | भडकमकर मास्तर
पन्नाशीला माझा साक्षात्कारी ह्रदयरोग - अभय बंग
हेच बरे
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
11 Dec 2008 - 10:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
... "सुखी माणसाचा सदरा" दिलंत तरी चालेल.
मूळ लेखक: बर्ट्रांड रसल
मराठी भाषांतरः करूणा गोखले.
प्रकाशकः राजहंस (?)
आणि हो, अभिनंदन. भेटवस्तू म्हणून पुस्तक देण्याची कल्पना तशी नवीन नाही, पण ती पुढे सुरु ठेवल्याबद्दल!
11 Dec 2008 - 2:56 pm | वाहीदा
साने गुरुजी लिखीत
श्याम ची आई , The best one I have ever read
धडपडणारी मुले
जयन्त नार लीकर लिखीत
GANIT ANI VIDNYAN
YAKSHANCHI DENAGI
KHAGOLSHASTRACHE VISHVA
~ वाहीदा
11 Dec 2008 - 3:14 pm | मृगनयनी
मिन्टे.... साधारण पन्नाशीनन्तर... मनुष्याचा वानप्रस्थाश्रम सुरु होतो.....
त्यामुळे काही पुस्तकांची नावे सुचवत आहे.. अर्थात ज्यांना अध्यात्म किन्वा तत्सम आवड असेल्..आणि विचारांची खोली असेल... त्यांना ही पुस्तके द्यायला हरकत नाही...
१. ""मृत्यूनन्तरचे जीवन"" .
ले.: श्री. अरविंद देशपांडे.
२. ""साद देती हिमशिखरे""
ले.: श्री. आनंद प्रधान.
३. ""पृथ्वीवर माणूस उपराच""
ले.: श्री. सुरेशचंद्र नाडकर्णी.
आणि अजुन.. पुल., व.पु... जयवन्त दळवी...'तें'.. बेस्टच आहेत..
:)
11 Dec 2008 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
३. "पृथ्वीवर माणूस उपराच"
ले.: श्री. सुरेशचंद्र नाडकर्णी.
उपरा का उपडाच?
मला हे पुस्तक अजिबातच पटलं नाही, त्यामुळे आवडलं नाही. माझं या पुस्तकाबद्दलचं मतः लेखकाची "गोष्ट" सांगण्याची पद्धत फार चांगली आहे. पण आवड प्रत्येकाची, कसं?
11 Dec 2008 - 3:49 pm | संताजी धनाजी
अनिल अवचटांचं "अमेरीका" पण छान आहे.
- संताजी धनाजी
11 Dec 2008 - 10:04 pm | भाष
मी डॉ. ठाकूर यांचे "संगीत सरिता" हे पुस्तक सुचवितो. यांत शंभरावर रागांची अगदी जुजबी माहिति दिली आहे. मुख्य म्हणजे त्या रागांमध्ये असलेली मराठी आणि हिंदी गाणी दिली आहेत. त्यामुळे सामन्यांना शास्त्रीय संगिताची गोडी लागेल.
सुभाष
11 Dec 2008 - 10:15 pm | वाटाड्या...
"संगीत सरिता" कुठे मिळेल...
11 Dec 2008 - 10:22 pm | सर्वसाक्षी
लेखक डॉ. विश्वास पाटील. (नेताजींचा संपूर्ण जीवनपट व संघर्ष उत्तम साकारला आहे)
12 Dec 2008 - 12:23 am | विसोबा खेचर
लेखक डॉ. विश्वास पाटील. (नेताजींचा संपूर्ण जीवनपट व संघर्ष उत्तम साकारला आहे)
साक्षिदेवा, तुझी सूचना उत्तमच आहे, अरे पण त्या अमृता अमितचा काहितरी विचार कर! नेताजी या पुस्तकाची किंमत जवळपास ६०० रुपये आहे आणि तिला २५ लोकांना हे पुस्तक द्यायचे आहे!
म्हणजे २५ गुणीले ६००?
साक्षिदेवा, कर पाहू गुणाकार! शिकवलाय ना शाळेत? :)
आपला,
(गणीतज्ञ!) तात्या.
11 Dec 2008 - 11:46 pm | लिखाळ
उपनिषदांचा आभ्यास
लेखक : प्रा. के वी बेलसरे.
प्रकाशक : त्रिदल प्रकाशन.
छपाई उत्तम आणि अक्षरे सुबक.
पुस्तकामध्ये प्रचलित मुख्य अश्या उपनिषदांचे सुंदर विवेचन आहे.
-- लिखाळ.
12 Dec 2008 - 3:38 am | वेदनयन
मिपावर काही दिवसापूर्वि हा विषय झालेला आहे (दुवा शोधावा लागेल). त्यावेळी संकलित केलेली नावे देत आहे.
1. मृत्युंजय
2. राधेय
3. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
4. धनंजय
5. एक होता कार्व्हर (अनुवाद – वीणा गव्हाणकर)
6. दुनियादारी
7. तोत्तोचान (अनुवाद – चेतना गोसावी)
8. चौघीजणी
9. झपाटलेल्या गोष्टी (रत्नाकर मतकरी)
10. ऐक.. टोले पडताहेत (रत्नाकर मतकरी)
11. संभाजी (विश्वास पाटील)
12. कोसला (भालचंद्र नेमाडे)
13. जरीला (भालचंद्र नेमाडे)
14. झूल (भालचंद्र नेमाडे)
15. हूल (भालचंद्र नेमाडे)
16. बिढार (भालचंद्र नेमाडे)
17. आई समजून घेतांना (उत्तम कांबळे)
18. रार॑ग ढा॑ग (प्रभाकर पे॑ढारकर)
19. माचीवरला बुधा (गोनीदां)
20. पडघवली (गोनीदां)
21. मॄण्मयी (गोनीदां)
22. रानभुली (गोनीदां)
23. कुण्या एकाची भ्रमणगाथा (गोनीदां)
24. जैत रे जैत (गोनीदां)
25. एक शुन्य मी (पु.ल.देशपांडे)
26. माणदेशी माणसं (व्यंकटेश माडगूळकर)
27. बनगरवाडी (व्यंकटेश माडगूळकर)
28. शाळा (मिलिंद बोकील)
29. आणि मी (मंगला गोडबोले)
30. पार्टनर (व.पु.काळे)
31. दिवसेंदिवस (शं. ना. नवरे )
32. डेझर्टर (अनुवादित)
33. नॉट विदाऊट माय डॉटर (अनुवादित)
34. गारंबीचा बापू (श्री. ना. पेंडसे)
35. शारदा संगीत (प्रकाश नारायण संत )
36. पंखा (प्रकाश नारायण संत)
37. वनवास (प्रकाश नारायण संत)
38. झुंबर (प्रकाश नारायण संत)
39. माणसे: अरभाट अणि चिल्लर (जी. ए.)
40. सुवर्णकण (वि स खांडेकरा)
41. ययाती (वि स खांडेकर)
42. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी (प्रतिभा रानडे)
43. समाधीवरील अश्रू (आचार्य अत्र्यांनी)
44. उरलंसुरलं (पु.ल.देशपांडे)
45. कृष्णपर्व (दुर्गा भागवत)
46. पॅपिलॉन (अनुवाद - रविंद्र गुर्जर)
47. दु:ख पर्वताएवढे (भा. रा. भागवत)
48. चकवाचांदणे (मारुतिचितमपल्ली)
49. कार्यरत (अनिल अवचट)
50. माणस॑ (अनिल अवचट)
51. पिंगळावेळ
52. कोल्ह्याट्याचं पोर (डॉ. किशोर शांताबाई काळे)
53. उपरा
54. झोंबी
12 Dec 2008 - 10:07 pm | बहुगुणी
स्वामी, श्रीमान योगी, युगांत
12 Dec 2008 - 11:32 pm | आपला अभिजित
ग्राफिटी! (भाग १ आणि २!)
अवांतर : जाहिरात करणे हा आमचा धंदा नाही, पण संधी मिळाली, तर आम्ही सोडत नाही!
12 Dec 2008 - 11:35 pm | विसोबा खेचर
अवांतर : जाहिरात करणे हा आमचा धंदा नाही, पण संधी मिळाली, तर आम्ही सोडत नाही!
:)
12 Dec 2008 - 11:39 pm | यशोधरा
अरे वा! ५४ पुस्तकांचं मस्त संकलन!
12 Dec 2008 - 11:53 pm | आपला अभिजित
क्रुष्णमेघ कुंटे याने मुदुमलाईच्या जंगलातील भटकंतीवर लिहिलेले `एका रानवेड्याची शोधयात्रा' पण भन्नाट आहे!
13 Dec 2008 - 12:03 am | आजानुकर्ण
तोत्तोचान द्या. न्याशनल बुक स्टोरने छापलेले आहे. फार स्वस्त आहे
आपला,
(चीप) आजानुकर्ण
13 Dec 2008 - 4:27 pm | मिंटी
सर्वांना मनापासुन धन्यवाद. माझ्या मनात खुप गोंधळ झाला होता कुठलं पुस्तक द्यायचं याचा...तो सोडवण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार :)
13 Dec 2008 - 4:29 pm | वारकरि रशियात
मुक्तसंगः अनहंवादि
श्री ज्ञानेश्वरी अनुवाद: प्रकाशक - श्री स्वामी वरदानंद भारती प्रतिष्ठान, पंढरपूर
अनुवादकः श्री स्वामी वरदानंद भारती (अनंतराव आठवले)
प्रचलित मराठीत, रसाळ व प्रासादिक ओवीबद्ध अनुवाद. वाचक, अभ्यासक व साधक या सर्वांना उपयुक्त!
वाचनसुलभ - डाव्या पानावर मूळ ज्ञानेश्वरी व समोर उजव्या पानावर त्याच ओव्यांचा समर्थ अनुवाद. अक्षरे मोठी.
अवांतरः स्वामींची अन्य ग्रंथसंपदाही खूप आहे. (तिचा परिचय - सविस्तार लिहायचाय! पण पुन्हा केव्हातरी)
13 Dec 2008 - 7:03 pm | यशोधरा
कोणती पुस्तकं दिलीस ते सांग गं आम्हाला.