[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल (उत्तरार्ध)

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in स्पर्धा
24 Aug 2015 - 5:06 pm

निकाल - १

दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेवटची सही करताना बघता बघता मन भूतकाळात गेले. सासरच्या त्रासाला कंटाळून परत आल्यावर मामांनी केलेले भांडण, समाजातली खोटीनाटी बदनामी, एकटी बघून लोकांनी घेतलेला गैरफायदा, कधीतरी सोबतच्या श्रीमंत मैत्रिणींचा वाटलेला हेवा, पण नशीबाने लाभलेले कायम पाठबळ देणारे मार्गदर्शक, कापड दुकानात काम करत संस्थेच्या वसतीगृहात राहून कष्टाने पूर्ण केलेले शिक्षण, काळा कोर्ट चढवून कोर्टात आले तो दिवस…
आणि आज समोर होती सुनीता, डोळ्यात तीच चमक, अंगावर माराच्या त्याच खुणा. हुंड्यासाठी हिला जाळायला निघाले होते. पण पठ्ठीने पुराव्यानिशी खेचून आणले कोर्टात. इतक्या वर्षात काय बदलले असा प्रश्न पडतो कधीतरी, पण हेच बदलण्यात माझा खारीचा वाटा. आज न्यायाधीश म्हणून निकाल दिलेली ही पहिली केस.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्पर्धा आयोजक आणि पहिल्या कथेला प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!!

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 5:09 pm | मांत्रिक

+१ छान!

चिनार's picture

24 Aug 2015 - 5:26 pm | चिनार

+१

यशोधरा's picture

24 Aug 2015 - 5:28 pm | यशोधरा

लईच भारी. एकदम सही.

+१
कथेचा दुसरा भागही आवडला.

चिगो's picture

24 Aug 2015 - 5:31 pm | चिगो

+१ मस्त.. एक सुधारणा..

काळा कोर्ट चढवून कोर्टात आले तो दिवस…

काळा 'कोट' हवं..

मधुरा देशपांडे's picture

24 Aug 2015 - 6:14 pm | मधुरा देशपांडे

अर्र करेक्ट.कोट हवं होतं. पण स्पर्धेसाठी असल्याने आता बदल करत नाही.

यशोधरा's picture

24 Aug 2015 - 7:47 pm | यशोधरा

मला वाटतं की कोर्ट चं कोट बदलायला हरकत नसावी. तू काही कथा बदलत नाही आहेस..

अविनाश पांढरकर's picture

24 Aug 2015 - 5:36 pm | अविनाश पांढरकर

+१

बबन ताम्बे's picture

24 Aug 2015 - 5:36 pm | बबन ताम्बे

+१

पद्मावति's picture

24 Aug 2015 - 5:56 pm | पद्मावति

खूप छान पॉझिटीव संदेश देणारी कथा. आवडली.

मीता's picture

24 Aug 2015 - 6:00 pm | मीता

+१

रेवती's picture

24 Aug 2015 - 6:00 pm | रेवती

+१.
उत्तरार्ध आवडलाच!

प्यारे१'s picture

24 Aug 2015 - 6:03 pm | प्यारे१

+१ जियो!

पैसा's picture

24 Aug 2015 - 6:35 pm | पैसा

+१

जियो! अजूनच मस्त!

बोका-ए-आझम's picture

24 Aug 2015 - 6:39 pm | बोका-ए-आझम

वर्तुळ पूर्ण केलंत. +१

बहुगुणी's picture

24 Aug 2015 - 10:00 pm | बहुगुणी

वर्तुळ पूर्ण केलंत. हे विशेष आवडलं.

नाखु's picture

25 Aug 2015 - 10:46 am | नाखु

एकहाती रांगोळी.

काव्यान्जलि's picture

24 Aug 2015 - 6:40 pm | काव्यान्जलि

खूप छान....

जेपी's picture

24 Aug 2015 - 7:04 pm | जेपी

+1
आवडली कथा.

चैतन्यमय's picture

24 Aug 2015 - 7:07 pm | चैतन्यमय

+१ छान आहे

नावातकायआहे's picture

24 Aug 2015 - 7:14 pm | नावातकायआहे

आवडेश....

पिलीयन रायडर's picture

24 Aug 2015 - 7:16 pm | पिलीयन रायडर

+१
आवडली

एक एकटा एकटाच's picture

24 Aug 2015 - 7:18 pm | एक एकटा एकटाच

+१

राघवेंद्र's picture

24 Aug 2015 - 7:18 pm | राघवेंद्र

आवडली.

नाव आडनाव's picture

24 Aug 2015 - 9:46 pm | नाव आडनाव

+१

अत्रुप्त आत्मा's picture

24 Aug 2015 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

+१

अर्धवटराव's picture

24 Aug 2015 - 11:53 pm | अर्धवटराव

लावा निकाल च्यायला.

स्मिता.'s picture

25 Aug 2015 - 9:47 am | स्मिता.

अर्थातच आवडली... कारण तेच! खूप सकारात्मकता आहे या कथेत.
कथेच्या उत्तरार्धात आणखी काहितरी विलक्षण कलाटणी देण्यापेक्षा पूर्वार्धाला प्रवाहीपणे पुढे नेणारा म्हणून हा भाग आणखी आवडला.

देशपांडे विनायक's picture

25 Aug 2015 - 11:01 am | देशपांडे विनायक

+१

मृत्युन्जय's picture

25 Aug 2015 - 11:22 am | मृत्युन्जय

+१

पिशी अबोली's picture

25 Aug 2015 - 11:28 am | पिशी अबोली

+१

मी सगळ्या कथा वाचल्या नव्हत्या त्यामुळे कुणालाच मागच्या वेळी दिलं नाही मत. पण या कथेने द्यायला भाग पाडलं. आता सगळ्या कथा कंपल्सरी वाचते.

तुडतुडी's picture

25 Aug 2015 - 11:46 am | तुडतुडी

+१सुंदर . समाजाची घाणेरडी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे

समीरसूर's picture

25 Aug 2015 - 3:18 pm | समीरसूर

खूप छान! हा भागदेखील खूप आवडला. +१

सकारात्मक आणि वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी कथा. अशी बरीच उदाहरणे आस-पास बघायला मिळतात. आवडेश.

बहिरुपी's picture

25 Aug 2015 - 5:14 pm | बहिरुपी

+१ कथेला आणि प्रतिसादाला.

संजय पाटिल's picture

25 Aug 2015 - 3:58 pm | संजय पाटिल

+१ पहिला भाग तर आवडला होताच पण दुसरा भाग वाचताना अंगावर रोमांच उभे रहिले. निकाल हे शिर्षक तर दोन्ही भागांना पर्फेक्ट बसतय.

गिरकी's picture

25 Aug 2015 - 4:10 pm | गिरकी

+1

मोहन's picture

25 Aug 2015 - 5:05 pm | मोहन

आवडला हाही भाग

स्मिता श्रीपाद's picture

25 Aug 2015 - 5:45 pm | स्मिता श्रीपाद

+१..
.खुप मस्त कथा

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 1:00 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

आवडली !

स्रुजा's picture

26 Aug 2015 - 7:03 am | स्रुजा

+१ , खुप छान

प्रीत-मोहर's picture

26 Aug 2015 - 8:55 am | प्रीत-मोहर

+१ खूप्च आवडली ही कथा मधुरा

विवेक्पूजा's picture

26 Aug 2015 - 3:42 pm | विवेक्पूजा

+१

माधुरी विनायक's picture

26 Aug 2015 - 4:18 pm | माधुरी विनायक

सकारात्मक शेवट आवडला.

रातराणी's picture

29 Aug 2015 - 11:46 pm | रातराणी

+१
प्रचंड आवडली आहे ही कथा!

त्रिवेणी's picture

30 Aug 2015 - 8:51 pm | त्रिवेणी

+१
मस्त लिहिलाय हा कथा भाग.

स्पंदना's picture

31 Aug 2015 - 6:41 am | स्पंदना

छान झालाय दुसरा भाग सुद्धा.

अजया's picture

31 Aug 2015 - 7:19 am | अजया

+१ मस्त.

श्रीरंग_जोशी's picture

31 Aug 2015 - 8:31 am | श्रीरंग_जोशी

+१

कवितानागेश's picture

31 Aug 2015 - 12:06 pm | कवितानागेश

+१