सकाळचे मुखपृष्ठ...

वाटाड्या...'s picture
वाटाड्या... in काथ्याकूट
11 Dec 2008 - 9:09 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी...

सकाळी सकाळी सकाळ (इ-सकाळ) उघडला आणि एक धक्का बसला...खाली बघा का ते...हे जरा आमच्यासाठी नवीनच होतं. आम्ही पडलो जुन्या विचारांचे त्यांमूळे म्हणलं जरा मिपाच्या मित्रांचे काय मत आहे बघाव..सांगा तुम्हाला काय वाटतं की सकाळ सारख्या वृत्तपत्राने असल्या जाहीराती देणं म्हणजे जरा ...आपल्या डोक्याचा पार भुगा झाला...लोकलज्जेस्तव चित्र अर्धवटच देत आहे...डाव्या हाताला खाली पहा...इतकी वाईट अवस्था आहे का सकाळ ची की त्यांना आता असल्या जाहीराती देणार्‍या साईटकडून सुद्धा पैसे मिळवायला लागतात...

सगळ्यांची माफी मागुन सरळ त्या साईट वरुन इथे चिकटवत आहे...

स्वगत : देवा ...वाचव रे बाबा...

मला सांगा तुम्हाला काय वाटतं...

मुकुल...

प्रतिक्रिया

सिद्धू's picture

11 Dec 2008 - 9:13 pm | सिद्धू

अहो...आम्ही आमचे मत देतो हो...पण मुळात ते चित्रच दिसत नाहीये तर प्रतिक्रिया काय देणार कप्पाळ ?

ईसकाळ's picture

12 Dec 2008 - 5:45 pm | ईसकाळ

प्रिय मित्रांनो,

आपण नियमितपणे ई-सकाळ वाचतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

उपरोक्त लेखन वाचले आणि त्याबद्दल काही बाबी स्पष्ट कराव्या असे वाटते.
बहुतेक सर्वच मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तसंकेतस्थळांप्रमाणेच "गुगल ऍडसेन्स' साठी ई-सकाळने गुगलशी करार केला आहे. त्यानुसार सदरहू जाहिराती ई-सकाळच्या वेबसाईटवर झळकत असतात. दिवसातून ठराविक काळाच्या अंतरानुसार या जाहितराती बदलतात.

कोणत्या भागात दिवसातल्या कोणत्या वेळेत कोणत्या जाहिराती दिसाव्यात याचेही गुगलचे काही निकष आहेत. त्यानुसार या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. म्हणूनच की काय पुण्यातील आमच्या कार्यालयात किंवा जवळपासच्या शहरांमध्ये या जाहिराती अजून तरी दिसलेल्या नाहीत.

त्यासाठी गुगल ला कोणत्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या याची यादी सकाळतर्फे दिली जाते. अशी यादी देताना सकाळकडून कुठल्याही प्रकारे "डेटिंग' च्या किंवा तत्संबंधी जाहिराती प्रसिद्ध करण्याविषयी संबंधित कंपनीला सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मुळात सकाळच्या जाहिरातविषयक धोरणात अशा गोष्टी मुळीच बसत नाहीत. हे आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो.

अशा जाहिरातीं भविष्यात प्रसिद्ध होऊ नये यासाठी सकाळतर्फे बेंगळूरस्थित "गुगल ऍडसेन्स'च्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच त्याविषयी अंमलबजावणी करण्यात येईल.

आपल्यासारख्या असंख्य वाचकांच्या भावनांचा आणि मताचा सकाळ आणि ई-सकाळने नेहमीच आदर केला असून आपल्या सूचना आम्हाला स्वागतार्ह आहेत.

कृपया आपल्या सूचना विरोपाने पाठवाव्यात.

आमचा ई पत्ता - webeditor@esakal.com

कळावे,

पंकज प्र. जोशी
वरिष्ठ उपसंपादक, ई-सकाळ
सकाळ पेपर्स लि., पुणे

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 7:04 pm | विसोबा खेचर

अशा जाहिरातीं भविष्यात प्रसिद्ध होऊ नये यासाठी सकाळतर्फे बेंगळूरस्थित "गुगल ऍडसेन्स'च्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून लवकरच त्याविषयी अंमलबजावणी करण्यात येईल.

मिपावर हा विषय छेडला गेला आणि ई-सकाळने त्या संदर्भात योग्य ती अंमलवजावणी करण्याचे पाऊल उचलले याचे एक मिपाकर म्हणून मला समाधान वाटते!

पंकज प्र. जोशी
वरिष्ठ उपसंपादक, ई-सकाळ
सकाळ पेपर्स लि., पुणे

सकाळ परिवाराचं मिसळपाव परिवारात स्वागत आहे! :)

तात्या.

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 7:46 pm | लिखाळ

>> मिपावर हा विषय छेडला गेला आणि ई-सकाळने त्या संदर्भात योग्य ती अंमलवजावणी करण्याचे पाऊल उचलले याचे एक मिपाकर म्हणून मला समाधान वाटते! <<
सहमत आहे.

ईसकाळच्या संपादकाने त्वरित दखल घेतली हे फार आवडले.
-- लिखाळ.

अभिजीत's picture

12 Dec 2008 - 8:32 pm | अभिजीत

>>मिपावर हा विषय छेडला गेला आणि ई-सकाळने त्या संदर्भात योग्य ती अंमलवजावणी करण्याचे पाऊल उचलले याचे एक मिपाकर म्हणून मला समाधान वाटते!

सहमत आहे.

- अभिजीत

'मिसळपाव' वरील वाचकांच्या चर्चेला तातडीने उत्तर देऊन त्याच्यावर लगेच कृती करण्याची तत्परता सकाळच्या प्रकाशन विभागाने दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!
मिपासारख्या आंतरजालीय व्यासपीठातल्या विधायक चर्चेचा वृत्तपत्रासारख्या माध्यमावर कसा परिणाम होऊ शकतो ह्याचे हे एक उत्तम उदाहरण ठरावे.

मुख्य पानावरील www.esakal.com/esakal/12132008/TajyabatmyaPuneMaharashtraMumbaiNagpurNas... ही बातमी वाचा!

चतुरंग

वाटाड्या...'s picture

11 Dec 2008 - 9:14 pm | वाटाड्या...

किती प्रयत्न केला पण चित्र टाकता येत नाहीये..प्रयत्न चालु आहे...

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Dec 2008 - 9:15 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो कुठाय?

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

12 Dec 2008 - 2:45 am | टारझन

सकाळने ह्या जाहिराती दिलेल्या नाहीत. रैण्डमली ह्या जाहीराती येतात. आणि बहुदा कुकीज स्कैन करून युजरने कोणत्या प्रकारच्या साईट्स ऍक्सेस केल्यात त्याच्या संबंधित जाहिराती येतात असं ऐकून आहे. मला ह्या ऐड्स दिसल्या नाहीत. दिसल्या तरी मला त्यात सकाळला दोष देउ वाटत नाही. आणि आपल्या एरियातली नावं येणं ही मोठी गोष्ट नाही... एकाच कोडने आपल्याला आयपी ही भेटतो आणि कुठला आयपी आहे हे अगदी कोणत्या शहरातून आलाय ते ही कळू शकतं.. त्यामुळे आपल्या एरियाचं नाव वाचून लगेच पेटू नका.

स्पष्टच बोलायचं झालं तर खाली वर आलेल्या प्रतिक्रिया बळेच आपण किती सज्जन, आपण त्या साईट्स ऐक्सेस करतच नाही.. आता त्या ऐड्स आल्या.. आता मी ई-सकाळ वाचणार नाही,ब्ला ब्ला ब्ला... उगाच तकलादू वाटलं... प्लास्टिक सर्जरी म्हणा हवं तर .. असो .. मला स्वत:ला खात्री वाटते ह्या धाग्यामुळे ई-सकाळचे हिट्स वाढले असतील.

-(सर्व प्रकारच्या साईट्स ऍक्सेस करणारा)
टायरफॉक्स टॉझ्झिला ३.०.०.४

टारझन's picture

12 Dec 2008 - 2:55 am | टारझन

फो टू . के व ळ . अ प्र ति म

- (फोटूप्रेमी) टार्‍या भयंकर

सूर्य's picture

11 Dec 2008 - 9:18 pm | सूर्य

सकाळी सकाळी आम्ही सुद्धा अचंबित झालो होतो. (चित्र दिसत नाहीये पण अंदाज करुन प्रतिक्रीया देतोय ;) )

वाटाड्या...'s picture

11 Dec 2008 - 9:18 pm | वाटाड्या...

फोटो चढवता येत नाहीये...

वाटाड्या...'s picture

11 Dec 2008 - 9:26 pm | वाटाड्या...

संपादक मंडळात कोणाला हे गैर वाटल्यास कृपया ते काढू शकतात...पण मला तरी साठवलेले चित्र इथे डकवता आलेले नाही...तरीपण माफी...

भडकमकर मास्तर's picture

11 Dec 2008 - 9:29 pm | भडकमकर मास्तर

दिसली बुवा चित्रे.... सकाळ वयात आला असे म्हणायचे काय?
.... अवांतर : महाराष्ट्र टाईम्स्च्या अंकात तर अशी पेज थ्री आणि इतर अनेक चित्रे पहायची सवय आहेच... तिकडे हे आधी दिसले असते तर आश्चर्य नसते वाटले. कसा का आला असेना साईटला पैसा महत्त्वाचा, अशी विचारसरणी दिसते.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वाटाड्या...'s picture

11 Dec 2008 - 10:00 pm | वाटाड्या...

असल्या चित्रांची अपेक्षाच नव्हती...हे चित्र तसे अपेक्षित नव्हते पण ह्या पेक्षा बरीच घाणेरडी चित्र दिसली पण लाजेकाजेस्तव टाकणं शक्य नाही...

टारझन's picture

12 Dec 2008 - 2:51 am | टारझन

असल्या चित्रांची अपेक्षाच नव्हती...हे चित्र तसे अपेक्षित नव्हते पण ह्या पेक्षा बरीच घाणेरडी चित्र दिसली पण लाजेकाजेस्तव टाकणं शक्य नाही...

काय सांगता ? घाणेरडी ? =)) =)) =)) =)) अबब आजकाल घाणेरड्या गोष्टींमागे जिभल्या चाटत फिरतात म्हणे माणसे .... "घाणेरडी" हा शब्द जाम खटकला ... मग हा घाणेरडेपणा असता तर जगाची उत्पत्तीच नसती झाली ...

आजकाल लोकं उगाचंच स्वत:ला काहीतरी प्रुव्ह करायच्या मागे लागलेली असतात कोण जाणो .. कोण इंप्रेस होत असेल बरं अशा मुळे ?

टिप : प्रतिक्रिया आजिबात वैयक्तिक नाही. वाटल्यास तो टार्‍याचा दोष नाही.

- चोच्याराम फुटाणे
(आम्हाला हलकेच घ्या, नाही तर जड जाईल)

वाटाड्या...'s picture

12 Dec 2008 - 3:02 am | वाटाड्या...

"मग हा घाणेरडेपणा असता तर जगाची उत्पत्तीच नसती झाली ..."...लेका जगात तुझी पुढची पिढी आणण्यासाठी काय तू सगळ्यांसमोर करशील काय?(ह. घे.) नाहीना?मग.....म्हणुनच म्हण्तो की जे ४ भितींमधे व्हायला पाहीजे ते उघड्यावर करु नये...नाहीतर मग तो "घाणेरडेपणा" (च) होतो....

टारझन's picture

12 Dec 2008 - 3:11 am | टारझन

लेका जगात तुझी पुढची पिढी आणण्यासाठी काय तू सगळ्यांसमोर करशील काय?
औफकौर्स नौट (वा मलाबी सुद लिवता याय लागलं)
ओ भौ .. मी फक्त घाणेरडेपणा विषयी बोललो .. कारण जर ती गोष्ट घाण आहे, तर ती आपण करणार नाही. गोष्ट सुमडीत करा नाय तर चौकात , तिचा अर्थ बदलत नाही (दृष्टीकोण बदलू शकतो). मी फक्त म्हणतो ... की ती गोष्ट घाण नसते.. सगळे उगाच मिटक्या मारत नाही पहात. आणि जर ते एवढंच घाण आहे ... तर ती घाण गोष्ट तुम्ही मिपावर पार चव्हाट्यावर आणलीत की .. :)
मंग त्या णिमित्त तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

- (विचारी) टारूबाळ

"कारण जर ती गोष्ट घाण आहे, तर ती आपण करणार नाही."...काय सांगतो..बघ हां..;)....कुठल्याही गोष्टीचे संदर्भ हे जागेप्रमाणे बदलत असतात..."सगळे उगाच मिटक्या मारत नाही पहात."..हे बघ असल्या गोष्टी मिटक्या मारत पहाणं हे पण एका प्रकाराची मानसिक विकृतीच नाही का? का आपण आता त्याचीही भलामण करणार??..एकदाच काय ते ठरवा...साला ह्या अलिकड्च्या नव्या संस्कृती(?)नी पार उच्छाद मांडलाय...शेवटी ज्याचात्याचा प्रश्न...

टारझन's picture

12 Dec 2008 - 3:43 am | टारझन

आता मात्र हसून फुटायची पाळी आहे =)) =)) =))

.हे बघ असल्या गोष्टी मिटक्या मारत पहाणं हे पण एका प्रकाराची मानसिक विकृतीच नाही का?
बासंच आं आता ... काही दिवसांपुर्वीच "खरं खरं सांगा - भाग २" आला होता, श्रीमान कोलबेरांनी काढलेला तो. त्यात बर्‍याच मिपाकरांनी काय मान्य केलं होतं ह्याची आपल्यास कल्पना असावीच .. त्यामुळं तुमच्याच म्हणन्यानुसार मिपा हे एक विकृत सभासदांच संस्थळ होईल ... बाकी आमच्या मागची पिढी "करायचं सर्व काही .. दाखवायचं मात्र काहीच नाही" ह्या विचारसरणीची आहे ह्याची या पिढीला उत्तम कल्पना आहे.

(नवी पिढी) टारझन
(कोल्हापुर सहकारी पतपेढी, नागपूर)

ता.क. आमचं खाजगी गोष्टी चारचौघात करण्याच्या गोष्टीला अनुमोदन नाही.. पण त्या गोष्टी सुमडीत करून बाहेर ते लै घाण .. ते लै वंगाळ अशा वाफा सोडून इंप्रेशन मारण्याला आमचा निषेध आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Dec 2008 - 9:42 pm | बिपिन कार्यकर्ते

आत्ता दिसली चित्रं.... नीट बारकाईनं बघून प्रतिसाद देतो.... ;) ;) ;)

'सकाळ हॅज जॉइन्ड द क्लब' एवढंच म्हणावंसं वाटतंय. :(

बिपिन कार्यकर्ते

पांथस्थ's picture

11 Dec 2008 - 9:46 pm | पांथस्थ

सध्याच्या धक्कादायक बातम्यांच्या जगात वाचकांना काहि क्षण का होइना विरंगुळा मिळावा ह्या सद्हेतुने संपादक मंडळाने हे पाउल उचलले असावे :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

ऋषिकेश's picture

11 Dec 2008 - 10:03 pm | ऋषिकेश

हं!!! सकाळने आपला पुरुष वाचकवर्गाचा बेस वाढवायचं ठरवलेलं दिसतंय ;)

-(गोंधळलेला) ऋषिकेश

भास्कर केन्डे's picture

11 Dec 2008 - 10:13 pm | भास्कर केन्डे

काय हा योगायोग. आजच अशा प्रकारची थिल्लर चित्रबाजी लोकमतच्या मुखपृष्ठावर पाहिली. एका मराठी सहकार्‍याने सांगितले की हे तेथे बर्‍याच अगोदर पासून चालू आहे व म्हणून त्याने लोकमत वाचने बंद केले आहे म्हणे. आजपासून आमचा या दोन्ही वर्तमानपत्रांबर बहिष्कार. आता आम्ही मराठी वाचनार ते केवळ मिपा वर...

आपला,
(मिपाकर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सुक्या's picture

12 Dec 2008 - 8:59 am | सुक्या

अहो लोकमत (जालावरचा) एकदम भिकार पेपर आहे. मी अगोदर तो वाचत होतो पन नंतर बंद करुन टाकला.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

शिंगाड्या's picture

12 Dec 2008 - 11:15 am | शिंगाड्या

>>अहो लोकमत (जालावरचा) एकदम भिकार पेपर आहे
काही बदल करुन सहमत :-)

इनोबा म्हणे's picture

11 Dec 2008 - 11:35 pm | इनोबा म्हणे

या जाहिराती जनरेटेड असतात.संस्थळचालक या जाहिरातींवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत. जर तुम्ही गुगलच्या ऍडसेन्सचा वापर केला तर गुगल दाखवेल त्या जाहिराती तुमच्या संकेतस्थळावरच दिसणारच. वरील चित्रांमध्ये ज्या जाहिराती आहेत अशा जाहिराती आजकाल भरपूर संकेतस्थळांवर पाहायला मिळतात, कारण त्यांच्याकडे आकर्षित होणारा ग्राहकवर्ग मोठा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या जाहिराती तुमचा आयपी ओळखून त्या त्या फोटोखाली तुमच्या जवळच्या शहरांची/गावांची नावे दाखवतो. (उदा. तुमचा आयपी जर दिल्लीचा असेल तर त्या फोटोतील गोर्‍या कातडीच्या पोरीच्या नावाखाली meet delhi girls असे संदेश दाखवतात.) या प्रकाराची माहिती नव्हती तेव्हा एका संस्थळावर मला पनवेल्,रायगड, नवी मुंबई,पुणे असल्या शहरांची नावे दिसली तेव्हा मी ही चाट पडलो होतो.

वरील जाहिराती एकवेळ परवडल्या, पण सद्ध्या संध्यानंद-आज का आनंद मधे आतल्या पानावर वैदू बाबांच्या जाहिराती येतात तसल्या सेक्ससंबंधीच्या जाहिरातींनी धुमाकूळ घातलाय. या जाहिरातींमधे डोळे मोठ्ठाले केलेली एखादी स्त्री दिसते. आणि खाली मोठ्या अक्षरात 'आपल्या **चा आकार वाढवून तिला आश्चर्यचकीत करा.' असले मजकूर असतात. याच उत्पादनांच्या जाहिराती करणार्‍या स्पॅम मेल्सचा ही सद्ध्या सुळसुळाट आहे. माझ्या मेल पत्त्यांवर या जाहिरतई करणार्‍यांच्या रोजच्या ३ ते ४ स्पॅम असतातच.

तुमच्या कुटूंबियांपुढे/ऑफिसमधे कुठलेही संस्थळ उघडताना यापुढे काळजी घ्या.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सखाराम_गटणे™'s picture

12 Dec 2008 - 8:47 am | सखाराम_गटणे™

ऍडसेन्समध्ये काही जाहीराती ब्लॉक करु शकतो.

ऋषिकेश's picture

12 Dec 2008 - 12:21 pm | ऋषिकेश

कुठलेही संस्थळ उघडताना यापुढे काळजी घ्या.

सहमत. यावरून मागे एकदा सर्कीटरावांनी वापरलेले वाक्य आठवले "एखाद्या युआरएल वर क्लीक करणे पदार्थ तोंडात टाकण्यासारखे असते"

-(गोंधळलेला) ऋषिकेश

वाटाड्या...'s picture

11 Dec 2008 - 11:43 pm | वाटाड्या...

अरे, तुझ म्हणणं खर आहे की गुगल ऍडसेन्सवर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही पण गुगलऍडसेन्स वापरायची तरी पाळी का यावी सकाळवर? इतकी पैशांची कमतरता आहे का? साला आपण सगळेहुन म्हणतोय तरी तात्या तयार नाहीयेत ते मिपावर वापरायला...

बरोबर का नाय? सांग...

इनोबा म्हणे's picture

11 Dec 2008 - 11:54 pm | इनोबा म्हणे

तुझं म्हणणं बरोबर आहे. सकाळसारख्या जबाबदार(आता म्हणावे की नाही?) वृत्तपत्राच्या संस्थळाला अशा जाहिरातींची गरज का पडली हे कळत नाही. पैशाचा हव्यास दुसरे काय?

साला आपण सगळेहुन म्हणतोय तरी तात्या तयार नाहीयेत ते मिपावर वापरायला...
मिसळपावने जाहिरात्या लावाव्या याचा मी ही आग्रही होतो. पण आता असे प्रकार वाढल्यामुळे गुगल अथवा तत्सम संस्थांच्या जाहिराती न लावल्या तर बरे! असेच म्हणावे लागतेय.
स्थानिक उत्पादनांच्या जाहिराती आणि वर्गणी हे दोनच पर्याय सद्ध्या शिल्लक आहेत.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 12:45 am | विसोबा खेचर

साला आपण सगळेहुन म्हणतोय तरी तात्या तयार नाहीयेत ते मिपावर वापरायला...

म्हणजे? आता मीही मिपावर अश्या चवचाल बायांच्या जाहिराती देऊ म्हणता की काय? छ्या..ते आपल्याला जमणार नाय! :)

असल्या जाहिराती मिपावर येऊ नयेत हे माझे व्यक्तिगत मत आहे, त्यामुळे त्या येणारही नाहीत. परंतु सकाळने अश्या जाहिराती देऊन काही फार मोठ्ठे घोर पाप केले आहे असे मला तरी वाटत नाही!

तात्या.

वाटाड्या...'s picture

12 Dec 2008 - 12:49 am | वाटाड्या...

"अश्या चवचाल बायांच्या जाहिराती" बद्दल नाही पण गुगल ऍडसेन्स वापण्याबद्दल मी बोलत होतो....

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

मुकुल, कोण रे बायका या? अंमळ चवचाल वाटताहेत..:)

आपला,
(बाईलवेडा) तात्या.

वाटाड्या...'s picture

12 Dec 2008 - 12:43 am | वाटाड्या...

मला काय माहीत..कदाचीत सकाळ वाल्यांना ठाऊक असतील...:)

अवलिया's picture

12 Dec 2008 - 11:21 am | अवलिया

तात्या

तुमी पण चालु करा ना मिपाच्या मुखपृष्ठावर 'आजची बायडी' ;)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

सखाराम_गटणे™'s picture

12 Dec 2008 - 11:28 am | सखाराम_गटणे™

तुमी पण चालु करा ना मिपाच्या मुखपृष्ठावर 'आजची बायडी'

=))

भडकमकर मास्तर's picture

14 Dec 2008 - 9:18 am | भडकमकर मास्तर

मिपाच्या मुखपृष्ठावर 'आजची बायडी'

=)) =)) =)) =)) ______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुनील's picture

12 Dec 2008 - 6:04 pm | सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विशेषतः गुगलच्या - म्हणजे फक्त 'मजकूर' स्वरुप आणि 'चित्रांसकट' - सकाळ ने बहुधा दुसरा पर्याय स्वीकारलेला दिसतोय.

अर्थात - ह्यासाठी वर्तमानपत्रावर 'बहिष्कार' घालण्याचे काहीच कारण नाही - 'फायरफॉक्स' ह्या न्याहाळकात 'ऍड ब्लॉक' नावाचे 'विस्तारक' वापरुन हा प्रश्न सहजच सोडवता येईल. त्याचबरोबर एक 'नो स्क्रिप्ट' नावाचेही विस्तारक येते ते सुद्धा उत्तम काम करते.

(मला तर आधी दिसल्याच नव्हत्या - साधारण अंदाज आला म्हणून 'आय ई' मधे उघडून 'खात्री' करुन घेतली :) )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Dec 2008 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थात - ह्यासाठी वर्तमानपत्रावर 'बहिष्कार' घालण्याचे काहीच कारण नाही - 'फायरफॉक्स' ह्या न्याहाळकात 'ऍड ब्लॉक' नावाचे 'विस्तारक' वापरुन हा प्रश्न सहजच सोडवता येईल. त्याचबरोबर एक 'नो स्क्रिप्ट' नावाचेही विस्तारक येते ते सुद्धा उत्तम काम करते.
वाचकाशी सहमत.

आणि खरंतर सकाळच्या जाहीरातींबद्दल (ज्या मला फाफॉच्या कृपेने दिसल्या नाहीत आणि बघण्याची इच्छाही नाही), हू केअर्स!

-- आदीमाया दुर्बिटणे
फायरफॉक्स वापरा आणि जाहिरातींपासून लांब रहा!

अभिजीत's picture

12 Dec 2008 - 12:34 am | अभिजीत

सकाळ वाल्यांचं काय बिघडलयं काय कळत नाय..
ज्यानी कुणी ही आयडिया सकाळला दिली आहे ते लोक धन्य आहेत.

जाहिरात हाच वर्तमानपत्राचा उत्पन्नाचा मूळ स्त्रोत असतो पण म्हणून वर्तमानपत्राच्या साइटने गुगल ऍड वापरणे एकदम हास्यास्यद आहे.
सकाळ ने गुगल ऍड टाकुन वाचकांना तर दुखावले आहेच पण स्वःताच्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे.
इ-सकाळ वर जाहिरातीचा चांगला प्लॅटफोर्म बनवायचा सोडून हे चीप धंदे करुन सकाळ ची इंटरनेट माध्यमाची जाण (!) किती गंडलेली आहे हे लक्षात येते.

सकाळ वाल्यांना वेब ची एवढी साधी माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते.

अवांतर -
नुकत्याच मिपावर झालेल्या वर्तमानपत्राच्या कौलात 'सकाळ' ला दिलेले मत मागे घेता येइल काय? ;)

- अभिजीत

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 12:39 am | विसोबा खेचर

सकाळ ने गुगल ऍड टाकुन वाचकांना तर दुखावले आहेच पण स्वःताच्या पायावर धोंडा मारुन घेतला आहे.

अहो पण अश्या जाहिरातींकडे दुर्लक्ष करणे ज्याच्यात्याच्या हातात आहे ना? त्या चवचाल बायांच्या जाहिरातीतून सकाळने चार पैशे मिळवले तर त्यात फार काही गहजब करण्यासारखे आहे असे निदान मला तरी वाटत नाही..

असो,

तात्या.

अभिजीत's picture

12 Dec 2008 - 1:31 am | अभिजीत

गहजब आहे असे नाही पण एक सहज प्रतिक्रिया आहे.
'सकाळ'च्या साइटवर अशा जाहिराती दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत असं मला नाही असं वाटंत ;)

- अभिजीत

सखाराम_गटणे™'s picture

12 Dec 2008 - 8:51 am | सखाराम_गटणे™

सहमत

रामदास's picture

12 Dec 2008 - 8:35 am | रामदास

अधून मधून अननस , सफरचंद अशा सात्वीक फळांची चित्रं टाकावीत .
हो किनै तात्या ?

वाटाड्या...'s picture

12 Dec 2008 - 12:45 am | वाटाड्या...

गहजब नाही हो...तात्या...
पण अवनती बघवली नाही म्हणुन हा धागा...भावना दुखवण्याचा हेतु नाही...ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी...

विसोबा खेचर's picture

12 Dec 2008 - 12:52 am | विसोबा खेचर

या चवचाल जाहिराती बर्‍याचदा फसव्या असतात! मी तर म्हणतो झाले ते बरेच झाले. काही आंबटशौकिन सकाळवाचक या जाहिराती पाहून फसतील, पैशे वगैरे भरतील आणि या फसव्या जाहिरातींमुळे त्यांच्या आंबटशौकीनपणाबद्दल त्यांना चांगली अद्दल घडेल! :)

आपला,
(मजेशीर) तात्या.

केदार's picture

12 Dec 2008 - 2:28 am | केदार

पण कूठल्याही वॄत्तपत्रात अश्या जाहीराती देणे योग्य नाही असे आमचे प्रांजळ मत आहे कारण वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा असतात, लोकशाहीचा चौथा खांब असतात हे आम्हाला शिकविले गेले त्याचा परिनाम.
तश्याच साइटवर जान्यासाठी इतर मार्ग आहेत म्हणून निषेध. शिवाय सकाळ किंवा तत्सम 'वृत्तपत्र' लोक त्यांचा मुलांसमोरही उघडू शकतात.

आम्ही आमच्या ब्लॉग वर त्याची व्यवस्तिथ नोंद घेतली आहे.

http://maiphil.blogspot.com

सुक्या's picture

12 Dec 2008 - 4:21 am | सुक्या

मी पन आज सकाळी वाचाव म्हनुन सकाळ उघडला तर साईड बार मधे या बाला. घाबरुन लगेच बन्द करुन टाकला.
च्यायला आजकाल ही मंदी चालु अन सायबानं पाह्यलं तर बोंबा मारत घरी बसावं लागेल.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

सखाराम_गटणे™'s picture

12 Dec 2008 - 8:56 am | सखाराम_गटणे™

मला तर काही दिसले नाही

http://picasaweb.google.co.in/lh/photo/OUh2AShr-ObNH8T0aw-IUA

परिकथेतील राजकुमार's picture

12 Dec 2008 - 11:09 am | परिकथेतील राजकुमार

चला सकाळ मध्ये चिंटु नंतर दखल घ्यावी अशी काहितरी गोष्ट दाखल झाली तर ! आनंद वाटला
आनंदा चवचाले

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मृगनयनी's picture

12 Dec 2008 - 11:40 am | मृगनयनी

"कलियुग" म्हणतात.... ते हेच का?

कारण काही का असेना.. पण विजय कुवळेकर "लोकमत"ला जॉइन झाल्यापासुन (४-५ वर्षांपुर्वीपासून..) "सकाळ"अंमळ बदललाये... हे मात्र खरं!

:)

'सकाळ'ची नियमित वाचक,

मृगनयनी.

केदार केसकर's picture

12 Dec 2008 - 12:13 pm | केदार केसकर

अरेरे| रोज जे काम करतो इ-सकाळ वाचायचं ते कालच करायच राहीलं. जरा हळहळ वाटली.

घाटावरचे भट's picture

12 Dec 2008 - 12:33 pm | घाटावरचे भट

माझ्याकडेही कालपासून सकाळच्या मुखपृष्ठावर अंमळ कमी कपड्यातल्या बाया दिसत आहेत खर्‍या....पण हे यापूर्वीसुद्धा ५-६ वेळा झालेलं आहे त्यामुळे एवढं काही वाटलं नाही...बाकी सकाळच्या मुखपृष्ठावर अशा जाहिराती असू नयेत एवढं मात्र पटलं. टाईम्स ऑफ इंडिया पण गूगलद्वारा देण्यात आलेल्या जाहिराती वापरतं, पण त्यांच्या संस्थळावर असं काही दिसत नाही. काय बरं कारण असावं?

वाटाड्या...'s picture

12 Dec 2008 - 8:32 pm | वाटाड्या...

मित्रांनो,

सकाळचे श्री, पंकज प्र. जोशी, वरिष्ठ उपसंपादक, ई-सकाळ, सकाळ पेपर्स लि., पुणे यांनी काय तो खुलासा करुन आपल्या शंकांच निरसन केलेलं आहे. मला वाटत हे पुष्कळ आहे. माझ्यावतीनं मी हा विषय इथेच थांबवावा हे चांगल. तेव्हा आपल्या सगळ्या मिपाकरांच आभार...परत एकदा इथे मुद्दाम नमुद करु इच्छितो की कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आणि तो कधिच नसणार...

एक गोष्ट मला अजुनही कळलेली नाही...सकाळला कस कळल की आपण हा विषय इथे चघळतोय ते?

धन्यवाद..

मुकुल...

सुनील's picture

12 Dec 2008 - 8:36 pm | सुनील

एक गोष्ट मला अजुनही कळलेली नाही...सकाळला कस कळल की आपण हा विषय इथे चघळतोय ते?

मिपावरील घडामोडींची दखल माध्यमे घेताहेत, काही काळांपासून.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ई-सकाळवरील खुलासा ह्या कडीवर आहे:-
http://www.esakal.com/esakal/12132008/MaharashtraMumbaiNagpurNasikPuneTa...

आपणास वरिल कडी वाचता न आल्यास गोषवारा खालीलप्रमाणे आहे:-
"पुणे- मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्‌ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.

मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल."

अवांतर १: आपले तात्या, ई-सकाळवरील खुलासा आणि मा.मनोहर पर्रिकर गोव्याचे माजी मुख्यमंत्री (पहा: पुढील धागा ( http://www.misalpav.com/node/5056 )), हे म्हणजे कलियूगातपण तत्व पाळणारे तत्व्वेत्तेच नव्हे काय ?

अवांतर २: आता मि. पा. ने पण "मि. पा. ईफेक्ट" असे लिहीले पाहीजे. ;)

-( सणकी )पाषाणभेद