उद्या मिपा बंद..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
9 Dec 2008 - 5:54 pm
गाभा: 

राम राम मिपाकरहो,

मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मिपावर येणार्‍या अधिकाधिक ट्रॅफिक/डेटाबेसमुळे मिपाची क्षमता वाढवायचे काम सध्या सुरू आहे. सबब, काही चाचण्यांकरता म्हणून उद्या बुधवार दि १० डिसेंबर २००८ रोजी भा प्र वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिपा विश्रांती अवस्थेत असेल. कामकाज लौकर आटपल्यास ते ९ वाजण्याच्या आधीही सुरू होऊ शकेल. सभासदांच्या गैरसोयीकरता मिपा व्यवस्थापन दिलगीर आहे!

आपला,
(मायबाप मिपाकरांचा ऋणी) तात्या.

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

9 Dec 2008 - 6:01 pm | मनस्वी

:(
सगळ्यांना आगाऊ सुप्रभात!
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा.
:)

अवलिया's picture

9 Dec 2008 - 6:02 pm | अवलिया

अरेरे

उद्या हापिसाला सुट्टी मारुन फिरायला जावे असे वाटते.
काम कसे होणार हापिसातले मिपा चालु नसेल तर..............

ठिक आहे. चालेल :)

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

यशोधरा's picture

9 Dec 2008 - 6:02 pm | यशोधरा

मिपा बंद.. भ्यां... :(

पण, अर्थातच ह्यातून काही चांगलेच निष्पन्न होईल, त्यासाठी एक दिवस मिपा बंद असलेले चालेल :)

धमाल मुलगा's picture

9 Dec 2008 - 6:06 pm | धमाल मुलगा

आता उद्या हापिसात येऊन दिवसभर करु तरी काय????

ओ तात्या, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर, नायतर उद्या सुटी टाकून येतो मी ठाण्याला, मालवणला बसु आपण!

मनस्वी, नाना आणि यशोशी पुर्णतः सहमत!!!!

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Dec 2008 - 6:07 pm | ब्रिटिश टिंग्या

वरील सर्वांशी सहमत!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

मिंटी's picture

9 Dec 2008 - 6:11 pm | मिंटी

वरिल सर्वांशी सहमत :(

वेताळ's picture

9 Dec 2008 - 6:07 pm | वेताळ

आता काय उद्याचा दिवस पुन्हा तीच रटाळ पांढरी मनोगती खिचडी खायला पाहिजे. (|:
वेताळ

राघव's picture

9 Dec 2008 - 6:07 pm | राघव

आताशा इतकी सवय झालीये मिपाची की हापिसात कॉम्प्युटर चालू झाला कि पहिले मिपा चालू करायचे असते!!
उद्या चुकल्या चुकल्या सारखे वाटणार बॉ...
पण हरकत नाही. एक दिवस ढकलून घेऊ आम्ही!! :)
मुमुक्षु

छोटा डॉन's picture

9 Dec 2008 - 10:06 pm | छोटा डॉन

मुमुक्षशी सहमत ...

इनफॅक्ट मला आमचे अमराठी कलीग विचारतील सुद्धा " अरे वो तेरे रेसिपी साईट को क्या हो गया ? आज देख नही रहा तु ? "
असो. एक दिवस ढकलु कसाबसा ...

च्यायला व्यसन व्यसन म्हणतात ते हेच का ?

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 11:02 pm | भडकमकर मास्तर

अरे वो तेरे रेसिपी साईट को क्या हो गया
अरेरे ...केवळ रेसिपी साईट म्हणून प्रोजेक्ट केली काय मिपा ही साईट अमराठी लोकांपुढे?
ह.घ्या...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोटा डॉन's picture

9 Dec 2008 - 11:10 pm | छोटा डॉन

अहो म्हणावे लागते रेसिपी साईट ...
म्हणजे साईट ब्लॉक होत नाही, नाहीतर मी इथे दिवसभर "लष्कराच्या भाकर्‍या" भाजत बसतो, टवाळक्या करतो, उगाच वादविवादात हिरीरीने भाग घेतो इ.इ. जर त्यांना कळाले तर लोक त्यावर "एच आर" कडे जाऊन काड्या घालतील ना, मग ही "खास मराठी रेसिप्यांची" साईट आहे म्हणले की भागते ...
शेवटी जो रस्ता पोटाकडे जातो त्याला सगळ्यांचीच सहानभुती असते ...

आपल्याकडे सबुत म्हणुन वर दिसणारी "मिसळपाव प्लेट + दररोज वेगळी खादाडी" आहेच ...

थोडक्यात काय तर "साप भी मरे और लाठी भी ना टुटे" हे संभाळावेच लागते.
असो. आता उद्या काय करायचे जा मुद्द्याचा प्रश्न आहे ....

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

भडकमकर मास्तर's picture

9 Dec 2008 - 11:39 pm | भडकमकर मास्तर

रेसिपीची भानगड समजली...
उत्तम.... =D>
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

रेवती's picture

9 Dec 2008 - 6:17 pm | रेवती

जाम बोर होणार आता.

रेवती

टारझन's picture

9 Dec 2008 - 7:31 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

हास्यक्लबात जा ! आणि लोळा ... =)) असे .. मी तेच करणार आहे .. काही चोचे लगेच "तु कर अधी" असं बोलायला सरसावलेले होते.

बाकी मिपाचा एखादा बैकअप सर्वर असेल तर तो चालू करावा किमान .. खफ. आणि ख.व. तरी ... तिकडेच मोस्टली मज्जा येते. हल्ली लेखांपेक्षा , लेख कसे यावेत यांचे मार्गदर्शनपर लेखच जास्त यायला लागलेत नै ?

- टारानंदयात्री

आनंदयात्री's picture

10 Dec 2008 - 9:21 am | आनंदयात्री

असेच म्हणतो.

-
मारझन डोईफोडे

मराठी_माणूस's picture

9 Dec 2008 - 8:36 pm | मराठी_माणूस

उद्या आजुबाजुचे निश्चीत तब्येतीची चौकशी करणार :&

आमच्याकडच्या रात्रीतून काय दुरुस्त्या करायच्या आहेत त्या करुन घ्या, म्हणजे सकाळी सकाळी गरमागरम ताजे मिपा उघडून वाचताना खंड पडलेला फारसा जाणवणार नाही! ;)

चतुरंग

सुनील's picture

9 Dec 2008 - 9:09 pm | सुनील

अगदी बोलता बोलता, नकळत ऑफशोअर मॉडेलचे तत्व सांगून टाकलेत की राव!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बहुगुणी's picture

9 Dec 2008 - 9:17 pm | बहुगुणी

खरंच, एखादा मिपा mirror सर्व्हर ऑफशोअर (भारतापेक्षा अन्यत्र) ठेवला तर? काही फायदा होईल का?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Dec 2008 - 11:34 pm | llपुण्याचे पेशवेll

मिपा व्यवस्थापनाचा यासाठी आम्ही त्रिवार निषेध करतो.
च्यायला मिपा बंद तर मग आम्ही हापिसात येऊन करायचे काय???????

(दु:खी)
पुण्याचे पेशवे

दवबिन्दु's picture

9 Dec 2008 - 11:44 pm | दवबिन्दु

चुकल्याचुकल्या सारख होयील.

अनिल हटेला's picture

10 Dec 2008 - 7:48 am | अनिल हटेला

>>>>च्यायला मिपा बंद तर मग आम्ही हापिसात येऊन करायचे काय???????

सहमत पेशवे !!!!
थोड बॅकलॉग असलेलं काम करावं लागणार बहुतेक ...
कामात वेळ जाइन .....:-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पिवळा डांबिस's picture

10 Dec 2008 - 9:27 am | पिवळा डांबिस

हे कोण साले अमेरिकावाले मिपाची गोची करताहेत त्यांचा पुरेपूर बंदोबस्त करा हो एकदाचा....
साले आमच्यासारख्यांना उगाच वाईट नांवं देताहेत....
(काय शिंचा त्रास आहे!!!!)
इतके आयटी एक्सपर्ट इथे असून काय फायदा? एक मार्ग शोधून काढता येत नाही.....:)
आम्ही कंप्यूटर अडाणी त्यापेक्षा बरे......
का हे आपले आंध्रावाल्यांसारखे सांगायला "एक्सपर्ट" पण हायर केल्यावर एकमेकांना फोन करून समस्या सोडवणारे!!!!!!
:)

यशोधरा's picture

11 Dec 2008 - 1:11 am | यशोधरा

झालं झालं सुरु!! :)