कलिन्दर या प्राण्या बद्दल कोणाला काही माहित आहे का?

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 Feb 2008 - 3:12 pm

मी लहान असताना आमच्याकडे घराना पोटमाळे असत. त्यात कलिन्दर नावाचे प्राणि वसति साठी असत. काळा रन्ग , लाम्ब शेपटी , लाल डोळे, माकड आणि मांजर सद्रुश हा प्राणी पोटमाळे असलेली घरे संपली तसा नहिसा झाला.
या प्राण्या बद्दल कोणास काही माहित असल्यास सांगावी

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

25 Feb 2008 - 5:02 pm | ध्रुव

याला उदमांजर सुद्धा म्हणतात का??--
ध्रुव

लिखाळ's picture

9 Dec 2008 - 3:01 pm | लिखाळ

बहुधा उदमांजरच असे वाटते.

इंग्रजी मध्ये सिवेट कॅट असे म्हणतात.
-- लिखाळ.

विसुनाना's picture

9 Dec 2008 - 5:13 pm | विसुनाना

अगदी सहमत. याला कोल्हापुरी प्रतिशब्द 'इजाट' असाही आहे.
आमची आजी म्हनायची, "....

हा प्राणी आणि शब्द मी मिरजेत पहिल्यांदा पाहिला आणि ऐकला. हे प्राणी गूळ फार खातात असे ऐकले आहे. फार म्हणजे किती तर एका वेळेला संपूर्ण मोठी ढेपच्या ढेप फस्त करतात म्हणे! :)
चतुरंग

घाटावरचे भट's picture

9 Dec 2008 - 3:37 pm | घाटावरचे भट

गुळाची चव असलेल्या काही विशिष्ट प्रजातींपैकी एक म्हणायचं म्हणजे हे जनावर....

धमाल मुलगा's picture

9 Dec 2008 - 5:33 pm | धमाल मुलगा

=))

भटोबा काय सोडत नाय बॉ...
फुल्ल फॉर्मात बॅटिंग!!!

प्राजु's picture

25 Feb 2008 - 10:56 pm | प्राजु

मी तर हा शब्द आणि हा प्राणी दोन्हीही पहिल्यांदाच ऐकते आहे. आणि इतका गूळ खाणारा हा प्राणी घरात असणे म्हणजे घरमालकाला गुर्‍हाळच सुरू करावं लागेल..:)
- (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ's picture

26 Feb 2008 - 11:06 am | विजुभाऊ

चतुरंग तुम्ही बरोबर आहात. मी हा प्राणी सातारा भागात पाहिला
प्राजु मल वाटते मिरजेत सातार्यात गुर्हाळे भरपुर आहेत.

मैत्र's picture

9 Dec 2008 - 1:59 pm | मैत्र

मला वाटतं कलिंदर म्हणजे रानमांजर. मीही सातार्‍यात पाहिलं आहे आणि कलिंदर हे नावही तिथलंच.
पण सातार्‍याबाहेर या नावाने कोणाला हा प्राणी माहीत नसावा. लहानपणी भीती दाखवायला सांगायचे की कलिंदर येइल :)

अवलिया's picture

9 Dec 2008 - 2:14 pm | अवलिया

कलंदर माहित आहे.
त्याचा याचा काही संबंध असावा असे वाटत नाही

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

आणि कलींदर च्या ऐवजी गिलींडर राह्यला आले.

वेताळ's picture

9 Dec 2008 - 5:50 pm | वेताळ

ह्याला ईझाट हेच नाव इकडे कोल्हापुर भागात आहे.ज्यादा करुन अंधार्‍या भागात हे राहतात.खाण्याबद्दल ज्यादा माहिती नाही.
वेताळ

अनंत छंदी's picture

9 Dec 2008 - 8:18 pm | अनंत छंदी

हे रानमांजरच आहे त्याच्या आणखी दोनतीन जाती आहेत, एकाचा रंग फिकट खाकी असतो शेपटीवर काळे आडवे पट्टे असतात, एक नुसतेच फिकट खाकी असते आणि एक वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे काळेकुट्ट असते. अजूनही कोकणात ह्या जाती आढळतात. आमच्या घराजवळ असलेल्या सुरमाडावर येणारी फळे खाण्यासाठी रात्री काळ्या रानमांजरांची एक जोडी आजही नित्यनेमाने येते.

पिवळा डांबिस's picture

11 Dec 2008 - 4:25 am | पिवळा डांबिस

काय खबर नाय बॉ!!!
आमी शाला मुंबयकर....
आमाला ते गॅसचा "सिलिंडर" मालूम हाय.....
ते घराघरामदी ओटेच्याखाली दडून बसते....
कवा पायला होता के?
-दांबिसअंकल

प्रिती करन्दिकर's picture

11 Dec 2008 - 8:08 am | प्रिती करन्दिकर

मला हा प्राणी अगदी चा॑गलाच महीत आहे. मी मुळची साताराचीच असल्यामुळे मला हेच नाव महीत आहे. अमच्या घरी प्रच॑ड कली॑दर॑ होती वरच्या माळ्यावर , आम्ही त्याला 'कली॑दराची खोली 'च म्हणायचो.
आणि अम्हाला शिक्षा म्हणजे कली॑दराच्या खोलीत को॑डणे! :(
हा प्राणी नुसता गुळ नही सगळ गोड खातो. आणखीन एक गोष्ट अशी की हा प्राणी आपल्या साध्या मा॑जरा॑ना प्रच॑ड घाबरतो.
त्यामुळे आम्ही नेहमी झोपताना अमच्या माऊला जवळ घेउनच झोपायचो :)

योगी९००'s picture

11 Dec 2008 - 4:04 pm | योगी९००

तुमचे नाव करंदिकर ऐवजी कलींदरकर असे असायला पाहिजे होते..

आणि एक गोष्ट...माझ्या नावात पण माऊ आहे.. (हलकेच घ्या).. ;)

आपलाच
खादाडमाऊ

दत्ता काळे's picture

11 Dec 2008 - 3:20 pm | दत्ता काळे

माझा मित्र सुयोग प्रभुणे ( हा मिपा सदस्य देखील आहे ) हा वाईचा (सातारा जिल्हा ) आहे. त्याने कलींदराबद्दल सांगितलेली माहिती.

एकतर कलींदर म्हणजे उदमांजर नव्हे. कलींदर हा प्राणी आस्तित्वात होता. वाईला खूप कलींदर होती.

आकार साधारणपणे मांजरीएवढा, रंग काळा, ह्याला गूळ आवड्तो. विशेष म्हणजे ह्याच्या शेपटीच्या टोकाशी धोत्र्याच्या फळासारखा गुंडा असतो.

लहानमुलांना भिती दाखवायला कलिंदर येइल असं सांगत असत.

शंकरराव's picture

11 Dec 2008 - 4:13 pm | शंकरराव

कलींदराला न घाबरणारा म्हणून 'बिलंदर' शब्द आला का?