आजुबाजुला मिट्ट काळोख होता. पक्या अजुनही पळतच होता शेताच्या बांधावरुन पळायला नीट जमतही नव्हते , पण जीव वाचवायचा होता , म्हणुन पळावे तर लागणारच होते. पायातील चप्पल अचानक तुटली पण चपलेची पर्वा न करता तो अनवाणी पायानी पळत होता ,गावातील दिवे अजुनही दुरवर दिसत होते , कधी एकदा गाव येते असे पक्याला झाले होते. पण मागुन येत असलेली ती काळी शक्ती आज त्याचा रस्ता संपुन देत नव्हती एकदाची ती काळी शक्ती पक्याजवळ येऊन पोहोचली...पक्याने रानदेवाचे स्मरण केले आणी काय झाले अचानक पक्याच्या अंगात दैवी शक्ती आली आणी तो मागे फिरला ताकदीनीशी त्याने त्या काळ्या शक्तीला दुरवर फेकुन दिले आणि पुन्हा घरी निघाला.
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 10:20 am | प्रचेतस
आवरा
-१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
6 Aug 2015 - 10:25 am | नाव आडनाव
:)
6 Aug 2015 - 11:08 am | सस्नेह
इतके दूर का हो पळताय ? काळी शक्ती मागे लागली की काय ? =))
6 Aug 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा
काळी मावशी अस्णार...बाकी गवळीबुवा दुधाऐवजी जिल्ब्यांचा रतीब घालायला लाग्लेत =))
6 Aug 2015 - 11:28 am | प्रचेतस
असं म्हणू नका. नैतर पांढरी मांजर हल्ला करायची उगा.
6 Aug 2015 - 11:37 am | संजय पाटिल
ही संख्या अक्षरात लिहा. आणी मग बोला.
6 Aug 2015 - 11:11 am | ब़जरबट्टू
सिक्वेल लिहा पटकन...
वाचून एकदाच काय ते होऊन जाऊ द्या ..
6 Aug 2015 - 11:14 am | जडभरत
हे काय आहे तरी काय?
7 Aug 2015 - 5:41 pm | gogglya
आपण हात्त करु हा त्या काळी ला.
7 Aug 2015 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा
मागे काळी शक्ति येत नसून पिवळि शक्ति तरल स्वरूपात सोडत सोडत तो पाणिक्य शक्तीचे डबडे ( =)) ) घेऊन पळत पळत चाललाय. असं वाटत होतं वाचताना! :-D
फुरुक फुरुक कापाली वाट , कित्ती दूर माझा दगडी घाट
बुळुक बुळुक बुळुक! :-D
7 Aug 2015 - 7:42 pm | जडभरत
अरारारा
बुवा साष्टांग नमस्कार आपल्या प्रतिभेला!!!
7 Aug 2015 - 6:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्याचं विडंबन करायचा मोह मी आवरतो आणि बुवांना अमंत्रण देतो.
7 Aug 2015 - 7:49 pm | टवाळ कार्टा
अग्दी अग्दी =))
10 Aug 2015 - 9:33 am | उगा काहितरीच
टेंपल रन आठवला ... रजनीकांतवाला !
10 Aug 2015 - 9:54 am | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या ह्या ह्या! :-D