राणेंचे बंड : वस्तुस्थीती की दिशाभूल

कवटी's picture
कवटी in काथ्याकूट
5 Dec 2008 - 6:09 pm
गाभा: 

मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाणांचे नाव जाहीर झाल्याबरोबर राणेनी पक्षश्रेष्ठींविरोधात जळजळीत विधाने करून सबंध महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे.
सर्व मिडियामधून सध्या हिच ब्रेकींग न्युज झळकत आहे. राणे आता काय करणार? काँग्रेसमधेच रहाणार की काँग्रेस सोडणार? काँग्रेस हायकमांड त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार की त्याना काँग्रेसमधून काढून टाकणार अश्या चर्चांना उधाण आले आहे.

पण हे खरेच बंड आहे की लोकांचे लक्ष अतिरेकी हल्ल्यावरून वळवून दुसरीकडे नेण्यासाठी टाकलेला डाव आहे?
प्रत्तेक खळबळजनक बातमी कुठ्ल्यातरी दुसर्‍या खळबळजनक बातमीला लपवत असते.सध्या सत्ताधारी पक्षाला अतिरेकी हल्ला आणि त्याबद्दल मंत्र्यांची उदासीनता याबद्दल प्रचंड जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. हा जनक्षोभ कमी करण्यासाठी व लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या उद्देशाने, तु मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो छापाचा डाव खेळला जातोय?जर या प्रकारचा खेळ खेळला जात आसेल तर ही एक अत्यंत हीन खेळी आहे असेच म्हणावे लागेल.

येत्या काही दिवसात राणेंवर पक्ष काय कारवायी करतो किंवा राणे काय निर्णय घेतात यावरून यामागे नक्की काय उद्देश आहे हे स्पष्ट होइलच. बघू.

(पेट्रोल ५ रु. नी स्वस्त अशीही एक खळबळजनक बातमी झळकत आहे....... आजच पेट्रोल इतके स्वस्त होण्यासारखे नक्की काय घडले?)

कवटी

प्रतिक्रिया

अनामिका's picture

5 Dec 2008 - 6:16 pm | अनामिका

पेट्रोल ५ नाहि १० रु नि स्वस्त.
सिलेंडर २० रु स्वस्त
डिझेल ५ रु नी स्वस्त
निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहेत त्याचा परिणाम
आता निवडणुक आयोग काय झोपा काढतेय का?
"अनामिका"

टारझन's picture

5 Dec 2008 - 6:20 pm | टारझन

आर्रे वा मज्जाच की ... पेट्रोल १० रुपये स्वस्त ? आता मी करिझ्मा नाही तर पल्सर २२० घेउ शकतो..
मत मात्र कॉंग्रेसला जाणार नाही हे णक्की ... जो फायदा होतोय तो करून घ्या :)

- टारझन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2008 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजकारण मोठं विचित्र असतं ! लॉबींग झाले याबाबत दुमत होऊ नये. म्हणजे राणेंना डावल्याचे आम्ही समर्थन करतो असे नव्हे. विलासरावांनी अशोक चव्हाण यांचे नाव सर्वांनी सुचवावे यासाठी आखणी केल्यामुळे राणे साहेबांची चीड्-चीड होणे साहजिकच आहे, पण काँग्रेसच्या कोणत्याच नेतृत्वावर विश्वास नाही म्हणून निडरपणे बोललेले राणेंना महाग पडेल असे वाटत आहे.

विलासराव आणि अशोकराव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. थोडक्यात काय विलासराव जिंकले !!!

(पेट्रोल ५ रु. नी स्वस्त अशीही एक खळबळजनक बातमी झळकत आहे....... आजच पेट्रोल इतके स्वस्त होण्यासारखे नक्की काय घडले?)

पेट्रोलचे भाव दहा रुपयांनी कमी होणार अशी बातमी बर्‍याच दिवसापासून येत होती. शेवटी पाच रुपयांनी का होईना पेट्रोलचे भाव कमी झाले त्यातल्या त्यात ही एक बरी बातमी आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Dec 2008 - 6:48 pm | परिकथेतील राजकुमार

दारुचे भाव कधी कमी होणार ?

आपलाच
दारोबा राणे
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

अनामिका's picture

5 Dec 2008 - 7:26 pm | अनामिका

राणे हे काँग्रेस पक्षासाठी नको त्या जागेच दुखण ठरणार अस निदान मला तरी त्यांनी सेना सोडुन काँग्रेसमधे प्रवेश करतानाच वाटल होत..............मुळात राणे हे अतिमहत्वाकांक्षी आहेत.काँग्रेससारख्या पक्षात त्यांना मनापासुन सामावुन घेणे जितके कठीण होते त्याही पेक्षा ते राणेंसाठी एक कठीण कार्य आहे.सेनेच्या आक्रमक मुशितुन तयार झालेले राणे सेनेतुन बाहेर पडले खरे ,पण राणे आपला मुळ स्वभाव बाजुला सारुन काम करु शकले नाहीत..
पंताना मुख्यमंत्री पद सोडायला लावल्यावर पहिल्याच फटक्यात सेनेने त्यांना मुख्यमंत्री केल्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करायची सवय त्यांना नाही.आणि त्याही पेक्षा त्यांना जितका कालवधी मुख्यमंत्री या नात्याने काम करावयास मिळाला त्या अवधित त्यांनी भरिव काम करुन दाखवले आहे.अशोक चव्हाणांसारखे अनुभवाची कमतरता असणार्‍या व्यक्तीला राणेंना डावलुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद काँग्रेसने द्यावे हे त्यांना न पटणारे आणि न रुचणारे आहे.
राणेंचा अहंकार व सत्तेची हावच त्यांच्या या सद्यपरिस्थितीला कारणीभुत आहे.भुजबळांनी सेना सोडुन राष्ट्रवादिच्या कळपात सामिल झाल्यावर देखिल समता परिषदेची स्थापना करुन राजकारणातल आपल स्थान पक्क केल.
सेनेला शह देण्यासाठी एकवेळ राणेंना काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची धुरा दिली असती पण त्या परिस्थितीत आपली उभी हयात काँग्रेसमधे घालवलेले व गांधी घराण्याशी निष्ठावान राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्यांसाठी राणे "कानामागुन आले व तिखट झाले "असेच ठरले असते यात शंका नाही.
राणेंनी सेना सोडणे हि त्यांची राजकिय आत्महत्या होती .................ज्या विलासरावांच्या भरवशावर राणेंनी सेना सोडण्याचा निर्णय घेतला त्याच विलासरावांनी स्वतःची राजकिय कारकिर्द व महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वतःचे स्थान आबाधित रहावे यासाठी राणेंचा केसाने गळा कापला असेच म्हणावे लागेल.(यात ख्याती प्राप्त पक्ष आहे असे म्हंटले तर वावगे ठरु नये)
उपमुख्यमंत्री म्हणुन भुजबळांचे नाव राष्ट्रवादीने पुढे करुन पहिली खेळी खेळल्यावर (भुजबळ उपमुख्यमंत्री हे राष्ट्रवादीचे ट्रंपकार्ड होते) काँग्रेसला चव्हाणांशिवाय पर्याय नव्हताच्.मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्री दोन्ही पुर्वाश्रमीचे शिवसैनिक हा संदेश जनतेला देणे हे दोन्ही काँग्रेसला परवडणारे नव्हते.
असो या सगळ्या नाटकावर अखेर दोघांच्या नेमणुकीने पड्दा पडला .पण या सगळ्या प्रकरणाला लागलेला कालावधी बघता परिस्थितीच गांभिर्य व सामान्य जनतेच्या सुखदु:खाशी दोन्ही काँग्रेसला काहीही सोयरसुतक नाही ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली असेच म्हणावे लागेल.
जातीपातीचचे राजकारण या देशात कोण करतय ?हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाल.
खेदाने म्हणावे लागेल की राणेंना काँग्रेस कधी कळलीच नाही..................!

राणे सेनेत असताना त्यांना जो मान होता तसा त्यांना काँग्रेसमधे कधी मिळाला नाही आणि मिळणार देखिल नव्हता.............पण विनाशकाले विपरित बुद्धी या उक्ती प्रमाणे राणे वागले आणि स्वतःची अवस्था दैव देते पण कर्म नेते अशी करुन घेतली"

"अनामिका"

भडकमकर मास्तर's picture

5 Dec 2008 - 11:04 pm | भडकमकर मास्तर

मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्री दोन्ही पुर्वाश्रमीचे शिवसैनिक हा संदेश जनतेला देणे हे दोन्ही काँग्रेसला परवडणारे नव्हते.
अगदी अगदी... हे भारी...
पण नाव ठरवायला इतका वेळ घ्यावा श्रेष्ठींनी?? हे म्हणजे जळत्या घरातली माणसं वाचवायची सोडून खुर्चीसाठी भांडण्यासारखं आहे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

5 Dec 2008 - 7:29 pm | प्रभाकर पेठकर

मुख्यमंत्री व उपमुख्य मंत्री दोन्ही पुर्वाश्रमीचे शिवसैनिक हा संदेश जनतेला देणे हे दोन्ही काँग्रेसला परवडणारे नव्हते.

राणेंकडे मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून मुद्दामच पवारांनी ही खेळी खेळली आहे असे दिसते. सेना सोडल्या नंतर राणेंचे पवारांशी काही दिवस गुफ्तगू चालले होते पण राणेंची मुख्यमंत्री पदाची अट पवारांना मान्य नव्हती तेंव्हा राणे काँग्रेसात गेले. जे पद पवारांनी त्यांना नाकारले ते काँग्रेस कडून मिळू नये म्हणून राष्ट्रवादीत 'मराठा' लॉबी कडून माळी समाजाच्या भुजबळाना असणारा विरोध माहित असूनही उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे पद बहाल केले असावे. बहुजन समाजाकडून भुजबळ साहेबांना मिळणारा वाढता पाठींबाही राष्ट्रवादीस फायद्याचा ठरू शकेल असाही विचार असावा.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

मैत्र's picture

6 Dec 2008 - 9:40 am | मैत्र

राणे किंवा भुजबळ - यांनी काय केलं आहे की त्यांना देशातल्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्याची सगळ्यात मोठी पदं मिळावीत. तसंही मोडकांनी उत्तम पद्धतीने मांडलंच आहे.
पण फक्त मी आणि मीच मुख्यमंत्री होउ शकतो इतकं विशाल कर्तृत्व काय आहे त्यांचं?
आणि भुजबळांनी काही वादग्रस्त कारणाने गेल्या वेळी पद सोडलं होतं - ते कारण काय होतं?

दोन्ही प्रश्न माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी आहेत. कारण या दोन्ही बाबतीत काही माहिती नाही.

ता. क. : या जोडी पेक्षा देशमुख आणि आबा काय वाइट होते?

मैत्र's picture

6 Dec 2008 - 9:40 am | मैत्र

राणे किंवा भुजबळ - यांनी काय केलं आहे की त्यांना देशातल्या इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्याची सगळ्यात मोठी पदं मिळावीत. तसंही मोडकांनी उत्तम पद्धतीने मांडलंच आहे.
पण फक्त मी आणि मीच मुख्यमंत्री होउ शकतो इतकं विशाल कर्तृत्व काय आहे त्यांचं?
आणि भुजबळांनी काही वादग्रस्त कारणाने गेल्या वेळी पद सोडलं होतं - ते कारण काय होतं?

दोन्ही प्रश्न माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी आहेत. कारण या दोन्ही बाबतीत काही माहिती नाही.

ता. क. : या जोडी पेक्षा देशमुख आणि आबा काय वाइट होते?

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Dec 2008 - 3:14 pm | बिपिन कार्यकर्ते

पण हे खरेच बंड आहे की लोकांचे लक्ष अतिरेकी हल्ल्यावरून वळवून दुसरीकडे नेण्यासाठी टाकलेला डाव आहे?

जर का असल्या विषयांमुळे जर का जनतेचे लक्ष आतंकवादापासून ढळणार असेल तर आपल्या जनतेचे भले होवो अशी इश्वरचरणी प्रार्थना. वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह. उगाच राजकारण्यांच्या नावाने खडे फोडण्यात काही अर्थ नाही मग.

बिपिन कार्यकर्ते

आंबोळी's picture

6 Dec 2008 - 4:11 pm | आंबोळी

जर का असल्या विषयांमुळे जर का जनतेचे लक्ष आतंकवादापासून ढळणार असेल तर आपल्या जनतेचे भले होवो अशी इश्वरचरणी प्रार्थना. वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह. उगाच राजकारण्यांच्या नावाने खडे फोडण्यात काही अर्थ नाही मग.

सहमत.

यशोधरा's picture

6 Dec 2008 - 4:21 pm | यशोधरा

जर का असल्या विषयांमुळे जर का जनतेचे लक्ष आतंकवादापासून ढळणार असेल तर आपल्या जनतेचे भले होवो अशी इश्वरचरणी प्रार्थना. वी गेट व्हॉट वी डिझर्व्ह. उगाच राजकारण्यांच्या नावाने खडे फोडण्यात काही अर्थ नाही मग.

मीही सहमत

सुनील मोहन's picture

6 Dec 2008 - 4:22 pm | सुनील मोहन

अगदी खरे आहे. आपली लायकीच असे राजकारणी माथ्यावर(कपाळी म्हणूया हवं तर्)मारून घेण्याची आहे.

भडकमकर मास्तर's picture

6 Dec 2008 - 4:31 pm | भडकमकर मास्तर

अहाहा.. आत्ता राणे यांची पत्रकार परिषद पाहिली....
खूप करमणूक झाली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/