गाभा:
मित्र हो,
राजिनामासत्रा नंतर आता रद्दसत्र सुरू झालेले दिसतय. क्रिकेट दौरे तर आधीच रद्द झालेत. आता ठिकठिकाण्चे उदघाटन समारंभही रद्द होउ लागलेत. (आमच्या २ क्लायंटनाही फटका बसला. त्यांचे बाहेरदेशहून येणारे पाहुणे ताजमधेच उतरणार होते. त्यानी आता यायचे पुढे ढकलले.).
अत्ताच आलेल्या बातमी नुसार रत्नागीरीचे साहित्यसम्मेलन रद्द करण्यात आलेले आहे.
याच धरतीवर अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन रद्द करावे काय? आपल्या भावना काय आहेत?
प्रतिक्रिया
2 Dec 2008 - 9:06 pm | बाकरवडी
अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे,
तिथे बॉम्बस्फोट होणार नाहि,
सर्व मंत्री तिकडे जाणारच,सर्व काही पैशाचे असते.
5 Dec 2008 - 5:15 pm | रम्या
>>अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे<<
असं का? मला वाटलं अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे. :D
आम्ही येथे पडीक असतो!
5 Dec 2008 - 5:35 pm | कवटी
>>असं का? मला वाटलं अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन हे अमेरीकेत होणार आहे.>>
अहो नाही... अमेरीकेत होणारे साहित्य सम्मेलन अमेरीकेत होणार आहे. ;)
कवटी
http://www.misalpav.com/user/765
5 Dec 2008 - 5:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग बे एरिया कुठेशी आहे?
5 Dec 2008 - 4:46 pm | कवटी
>>तिथे बॉम्बस्फोट होणार नाहि,
बाकरवडी,
अमेरिकेत बॉम्बस्फोट होतील म्हणून नव्हे तर इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे हा उत्सवी स्वरूपाचा समारंभ रद्द करावा काय?
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार.
कवटी
http://www.misalpav.com/user/765
5 Dec 2008 - 5:08 pm | भडकमकर मास्तर
पाकिस्तानला जाणार्या बस, ट्रेन रद्द झाल्या आहेत ...
व्यापाराचे धोरण बदलले असून नवीन योजना रद्द झाल्या आहेत...
पाकिस्तानात भारतीय बँकांच्या शाखा निघणार होत्या ते रद्द झाले...
बकरी ईदचे सेलिब्रेशनसुद्धा रद्द झाले आहे असे ऐकतो...
.....
कवटीने मात्र अमेरिकेतलेच संमेलन रद्द करण्याची भन्नाट आय्डिआ काढली आहे.... हे आम्हाला सुचलेच नव्हते असे नम्रपणे मान्य करतो.....
पण संमेलन रद्द होऊ नये असे आमचे व्यक्तिगत मत आहे, ते व्यक्त करून मी माझे लेखन संपवतो... बाकी ठालेपाटलांची इच्छा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/