भडकमकर मास्तरांचे स्वागत

कवटी's picture
कवटी in काथ्याकूट
5 Dec 2008 - 4:19 pm
गाभा: 

कित्तेक दिवस अज्ञातवासात गेलेले भडकमकर मास्तर आज पुन्हा मिपावर अवतीर्ण झालेले दिसले. त्यांच्या अनुपस्थीतीमुळे बरेच दिवस त्यांचे नर्मविनोदी लेख, पुस्तक्-नाटक-चित्रपट परिक्षणे, शिल्प/चित्रकला , निदान गेला बाझार फोटो इ. मिपावर आलेले नव्हते.
आता हा सगळा ब्याकलॉग लवकरात लवकर भरून काढा अशी मी त्याना विनंती वजा धमकी देत आहे.

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 4:23 pm | विनायक प्रभू

१+
असेच म्हणतो
कवटी बरोबरची क्रॉस हाडे

धमाल मुलगा's picture

5 Dec 2008 - 4:30 pm | धमाल मुलगा

मास्तरांच्या पुनरागमनाबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

आता हा सगळा ब्याकलॉग लवकरात लवकर भरून काढा अशी मी त्याना विनंती वजा धमकी देत आहे.
+१
सहमत आहे.
असेच म्हणतो.

-(मास्तरांना पुन्हा मिपावर आलेले पाहुन आणंदीत झालेला) ध मा ल.

भडकमकर मास्तर's picture

5 Dec 2008 - 4:40 pm | भडकमकर मास्तर

घरचं नेट कनेक्षन सारखं गंडतं त्यामुळे आम्ही गायब होतो...

आता येत जाईन......आपल्या प्रेमाने मी अगदी गहिवरलो हो....
आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल सुद्धा धन्यवाद....
आता "एखादा मिपाकर महिन्याने परत आला तर त्याला एखादा धागा काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं योग्य आहे का?"असा एखादा धागा काढायची आता सोय झाली.......
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तरांनी आल्या आल्याच उत्तुंग षटकार मारला आहे त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कवटी's picture

5 Dec 2008 - 4:48 pm | कवटी

मास्तरांनी आल्या आल्याच उत्तुंग षटकार मारला आहे त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

त्रिवार सहमत!

धमाल मुलगा's picture

5 Dec 2008 - 4:52 pm | धमाल मुलगा

=))

हाण्ण तिच्याआयला, मास्तर म्हणजे मास्तर हैत बॉ!
आल्याआल्याच हातोडा घेऊन झाले सुरु.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या सहमतीबद्दल धन्यवाद.

-- आदीमाया दुर्बिटणे

मैत्र's picture

6 Dec 2008 - 10:24 am | मैत्र

टारुची आज्जी ... हे सही आहे एकदम .. बेष्ट!

विजुभाऊ's picture

5 Dec 2008 - 4:50 pm | विजुभाऊ

घरचं नेट कनेक्षन सारखं गंडतं त्यामुळे आम्ही गायब होतो...
नेटाने प्रयत्न करुन झाले .आता नेट नीट करा ;)

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

मनस्वी's picture

5 Dec 2008 - 4:47 pm | मनस्वी

मास्तर
शिकवणीमध्ये केवढा गॅप!!!
नवीन वर्गांची वाट बघत आहोत.

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 4:48 pm | विनायक प्रभू

आता नर्म विनोद नकोत. गरम यु द्यात. टाळकी शांत होतील.