गाभा:
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक संस्था एकत्र येऊन कार्यक्रम करत आहेत तर काही ठिकाणी उस्फुर्त कार्यक्रम होत आहेत. या सदरात जर आपल्याला माहीत असलेल्या निषेध सभा, शांती सभा, कँडल लाईट व्हिजीलची वगैरे माहीती असेल तर अवश्य लिहा.
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक संस्था एकत्र येऊन कार्यक्रम करत आहेत तर काही ठिकाणी उस्फुर्त कार्यक्रम होत आहेत. या सदरात जर आपल्याला माहीत असलेल्या निषेध सभा, शांती सभा, कँडल लाईट व्हिजीलची वगैरे माहीती असेल तर अवश्य लिहा.
प्रतिक्रिया
4 Dec 2008 - 12:08 pm | भास्कर केन्डे
आजच आम्ही कनेटिकट येथील ज्यू समाजाने आयोजित केलेल्या प्रार्थणेला गेलो होतो. त्यांची शिस्त, कार्यक्रमाची टापटिप व भावना, सगळेच वैशिष्ट्यपूर्ण वाटले.
येत्या रविवारी आम्ही काही भारतीयांनी मिळून एका हॉटेलाच्या सभागृहात प्रार्थणा सभा आयोजित केली आहे. प्रत्यक्ष मदत कार्याला जाऊ शकत नसल्यामुळे ज्यांना ज्यांना अर्थिक मदत द्यायची आहे त्यांची मदत पावतीसह स्विकारली जाईल व ती भारतातल्या चांगल्या सामाजिक संस्थांना दिली जाईल. तसेच येथे एक सदगृहस्थ आहेत. त्यांनी हैद्राबाद पासून २० किमि आंतरावर असणारी त्यांची जमीन देणगी देण्याचे ठरवले आहे. त्यावर अतिरेकी हल्ल्यात सर्वस्व गमाऊन बसणार्या देशभरातल्या मुलांसाठी (वा महिलासांठी) निवासी विद्यालय वा असेच काही बनवन्याची तयारी असणार्या संस्थांनी त्यांच्या योजना सादर केल्यास त्यांना हे दाण देण्याचा विचार होईल. अधिक माहिती हवी असल्यास व्यनि करावा.
रविवारच्या कार्यक्रमाला न्यू इंग्लंडातील कोणा मिपा कराला येणे शक्य असेल तर कृपया सांगावे मी येथे अधिक माहिती टाकीन.
आपला,
(खारीचा वाटा उचलायला मिळाला तरी धन्यता मानणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
5 Dec 2008 - 7:18 am | विकास
एशियन अमेरिकन कमिशनने पुढाकार घेऊन अनेक भारतीय आणि अभारतीय संघटनांच्या बरोबर कँडल लाईट व्हिजील आयोजीत केले होते. ते एकाच वेळेस (डिसेंबर ४.२००८) ला बॉस्टन, वुस्टर (मॅसॅच्युसेट्स राज्यातील दुसरे मोठे शहर जेथे खूप भारतीय आहेत), बाजूच्या र्होड आयलंड राज्यात राजधानी प्रॉव्हीडन्स आयोजीत केले होते.
त्यांना बॉस्टनच्या कँडल लाईट व्हि़जील साठी मदत केली होती आणि आत्ताच तेथे जाऊन आलो. जवळपास दिडशे माणसे आली होती. त्यात भारतीय आणि अनेक अ-भारतीय आले होते. विशेष म्हणजे, ठरवून आले होते (कामावरून जाता जाता दोन मिनटे थांबले असा प्रकार नव्हता!) . अगदी मला आमच्या बाजूच्या टफ्ट्स विद्यापिठातील अमेरिकन प्राध्यापक आणि त्याची बायको पण भेटले जे केवळ या व्हिजील साठी आले होते. बॉस्टनचा महापौर थॉमस मेनिनो हा शेवटपर्यंत थांबला होता. सुरवातीला त्याचे आणि काही इतर भाषणे झाली आणि नंतर ख्रिश्चन, ज्यू, मुस्लीम, बौद्ध, शिख आणि हिंदू पुजार्यांनी प्रार्थना केल्या.
9 Dec 2008 - 2:19 am | विकास
५ डिसेंबरला संध्याकाळी हार्वर्ड स्क्वेअर य हार्वर्ड विद्यापिठाच्या भागात (पण बाहेर) अजून एक कँडल लाईट व्हिजील केले गेले होते. थंडी असून देखील ११०-१२० माणसे जमली. काही ४०-५० मैलांवरून केवळ त्यासाठी कोणीही ओळखीचे नसून आली. काही ज्यू विद्यार्थीपण असेच माहीती करून लांबून आले होते आणि तसेच काही मुस्लीम धर्मीय.
या वेळेस बॉस्टनच्या सभोवताली किमान २-३ दिवसाच्या अंतरात, ५-६ व्हिजिल्स झाले असतील हे एक वैशिष्ठ्य. दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे यात सर्वधर्मिय आणि भारतीय-अभारतीयांचा असलेला सहभाग. तिसरे वैशिष्ठ्य कोणी एकमेकांशी स्पर्धा अथवा सवंग राजकारण करत नव्हते!
वास्तवीक अशा कँडल लाईट व्हिजिल्सने काय होते असा प्रश्न कुठेतरी मनात येतो... पण असा एकत्रीत सहभाग बघितल्यावर त्यातून बाकी काही नाही तरी माणसे नागरीपद्धतीने एकत्र येतात आणि परदेशातील माध्यमांना, राजकारण्यांना कळत नकळत याची दखल घ्यावी लागते...
9 Dec 2008 - 2:52 am | केदार
नेपरव्हिल ह्या शिकागोच्या उपनगरात फ्रेन्डस ऑफ ईंडीया सोसायटीने, हिंदू व ज्यू समुदायाचे एकत्रीत कॅन्डल लाईट व्हिजील काल दिंनाक ६ डिसे रोजी आयोजीत केले होते. कडाक्याच्या थंडीत देखील १५०-२०० जनांनी हजेरी लावली.
http://abclocal.go.com/wls/story?section=news/local&id=6543204
काल आणी परवा मिळून शिकागोलॅन्ड परिसरात एकून चार व्हिजील आयोजीत केले होते. ३० तारखेला बॅप्स (स्वामीनारायण मंदीर) ने देखील शोकसभा घेतली होती ज्यात काही शे भारतीय सामील झाले होते.